
Pune Nagar kalyan highway pimpljoga accident : पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर येथील अपघाताची घटना ताजी असतांना सोमवारी पहाटेच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातिल पिंपळजोगा येथे नगर कल्याण महामार्गावर भीषण भीषण अपघात झळ आहे. ट्रक, रिक्षा, पीकअप यांच्या तिहेरी अपघातात १० जण ठार झाले आहे. तर काही जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांसह संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची माहिती मिळत आहे. मृत कुटुंबीय हे जुन्नर तालुक्यातील मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे आहेत.





