
सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर ( Social Media Influencer) प्रिया सिंह (Priya Singh Case) प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. तिच्यावर जीवघेणा हल्ला करत कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अश्वजीत गायकवाड याच्यासह अन्य तीन आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. कासारवडवली पोलिसांनी ही कारवाई केली असून गुन्ह्यात वापरलेली लँड रोव्हर कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.





