Prakash Ambedkar : “खरा निकाल लागलाच नाही, तरी…”, प्रकाश आंबेडकरांचे उद्धव ठाकरेंना आवाहन

0
32
Prakash Ambedkar : “खरा निकाल लागलाच नाही, तरी…”, प्रकाश आंबेडकरांचे उद्धव ठाकरेंना आवाहन


शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले, राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला, त्याच्यामुळे युतीमधील आमचे मित्रपक्ष उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. अपेक्षा होती की, खरा निकाल लागेल मात्र, खरा निकाल लागला नाही. उद्धव ठाकरे यांच्याप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो. ज्या दिवशी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत नाव आणि चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली, त्याच दिवशी शिवसेना (UBT) यांची हार झाली होती. आज फक्त औपचारिकता बाकी होती. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.



Source link