Saturday, July 4, 2026
Home Blog Page 95

आता घड्याळाची वेळ चांगली नाही, इकडे तिकडे बघू नका, आपल चिन्ह कमळ : शिवेंद्रराजे भोसले

0



Shivendraraje Bhosale : आपलं चिन्ह कमळ आहे. आता घड्याळाची वेळ चांगली नाही. आता इकडे तिकडे बघू नका. हातातले घड्याळ वेगळं आहे असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीवर टीका केली. सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर नगरपालिकेच्या प्रचारार्थ
आयोजीत करण्यात आलेल्या सभेत शिवेंद्रराजे बोलत होते. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.  रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळावर जोरदार टीका केली आहे. आपलं चिन्ह कमळ आहे आता घड्याळाची वेळ चांगली नाही, आता इकडे तिकडे बघू नका. हातातलं घड्याळ वेगळं आहे आणि चिन्हाचे घड्याळ वेगळं आहे. सर्वांनी विचार करा आणि भाजपचे उमेदवार निवडून द्या असं आवाहन करत शिवेंद्रराजे भोसले यांनी  रहिमतपूर येथील सभेत राष्ट्रवादीवर टीका केली. 

सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची निवडणूक जाहीर

राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, महाबळेश्वर, फलटण, वाई कराड, म्हसवड, रहिमतपूर, पाचगणी आणि मलकापूर या नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. मेढा नगरपंचायतीत देखील तिरंगी सामना होत आहे. साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारासमोर समोर महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आला. फलटणला रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर रिंगणात आहेत.

रहिमतपूर नगरपालिकेत सुनील माने यांच्या पत्नी नंदना माने विरुद्ध भाजपच्या वैशाली माने यांच्यात लढत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रहिमतपूर नगरपालिकेत सुनील माने यांच्या पत्नी नंदना माने विरुद्ध भाजपच्या वैशाली माने यांच्यात लढत होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

साताऱ्यात दोन्ही राजेंचं मनोमिलन, मंत्री शिवेंद्रराजेंनी दिले संकेत, इच्छुक उमेदवार भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार

 

आणखी वाचा



Source link

किती दिवस जगलो याला महत्त्व नाही, पण कसं जगलो याला महत्त्व आहे! —- आयु. दादासाहेब भोसले

0
किती दिवस जगलो याला महत्त्व नाही, पण कसं जगलो याला महत्त्व आहे! —- आयु. दादासाहेब भोसले

किती दिवस जगलो याला महत्त्व नाही, पण कसं जगलो याला महत्त्व आहे! —- आयु. दादासाहेब भोसले

फलटण : कालकथित बापूराव भैरू घोरपडे यांच्या 27 व्या स्मृती दिनानिमित्त सासकल येथे त्यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना त्यांचे सुपुत्र आयु. माणिक बापूराव घोरपडे व आयुनि संजीवनी माणिकराव घोरपडे यांच्या व त्यांच्या कुटुंबीयाच्या वतीने करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे राज्याचे संघटक तथा पुणे व सातारा जिल्ह्याचे प्रभारी समता सैनिक दलाच्या असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयुष्यमान दादासाहेब भोसले यांनी भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत सांगत त्यांनी किती दिवस जगलो याला महत्त्व नाही, पण कसं जगलो याला महत्त्व आहे असे प्रतिपादन करून कालकथित बापूराव भैरू घोरपडे यांच्या स्मृतीला आदरांजली वाहिली.

या प्रतिष्ठापनेचा विधी पूज्य भंते धम्मानंद बौधी यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी बौद्धाचार्य म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक तथा सातारा जिल्हा पूर्व संघटक आयु. श्रीमंतराव घोरपडे यांनी विधीचे संचलन केले.

आयु श्रीमंतराव घोरपडे यांनी जुन्या परंपरेमधून बापूराव भैरू घोरपडे व त्याकाळी पोतराज म्हणून हिंदू धर्मातील अनिष्ट रूढीला कवटाळून बसलेल्या सर्व तत्कालीन व्यक्तींनी बौद्ध धम्माच्या दिशेने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित होऊन धम्माकडे कसा प्रवास केला याविषयी मांडणी केली. त्या सर्वांनी बौध्द धम्माचे विचार आत्मसात करून केलेल्या कार्याचा उल्लेख केला. येणाऱ्या काळात बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार नियोजित पद्धतीने करण्याचा त्यांनी संकल्प केला. जुन्या जेष्ठ नागरिकांनी त्याकाळी रिपब्लिकन पक्षामध्ये केलेलं काम व त्यांची समाजासाठी असणारी तळमळ यावर भाष्य केले.

आयु.लक्ष्मण निकाळजे म्हणाले, संतांनी सुद्धा समतेचा विचार दिला. भेदभावाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनीही पंचशीलाचा मार्ग दाखवला. तेव्हा आपण सर्वांनी तोच विचार अंगीकरावा. यातच स्वतः च आणि समाजाचे हीत आहे. बापूदादांनी सुद्धा हाच विचार दिला.आपले खरे दैवत भगवान बुद्ध, बाबासाहेब आणि संत आणि त्यांचा विचार हाच आहे.”
यावेळी बोलताना बौध्द धम्माचे जेष्ठ प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे यांनी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या चार प्रकारच्या व्यक्तींमधील प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या व्यक्तीसारखं होण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आपली अस्मिता असणाऱ्या वास्तु, बुद्ध विहार, लेण्या आणि स्मारके यांचे जतन करण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यासाठी दुसऱ्या समाजातील कोणी येणार नाही तेव्हा त्याचे पावित्र आपणच राखले पाहिजे. सर्वांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यावर विशेष भर द्यावा असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास खंडाळा तालुक्याचे अध्यक्ष यशवंत खुंटे (आप्पा), वंचित बहुजन आघाडीचे माजी सातारा जिल्हा पूर्व अध्यक्ष भीमराव घोरपडे, बौद्धाचार्य जेष्ठ धम्मसेवक संजय घोरपडे, भानुदास घोरपडे, जगन्नाथ घोरपडे, मंगेश अहिवळे, शेखर गायकवाड, नितीन जाधव, नितीन अहिवळे, नंदकिशोर गायकवाड, सुधाकर चाबुकस्वार, उत्तम बापूराव लोंढे, बापूराव भैरू घोरपडे यांचे नातू योगेश माणिकराव घोरपडे, दीपक माणिकराव घोरपडे, मदने व आडके परिवारातील शिष्य मंडळी, निकिता घोरपडे, सारिका घोरपडे, मंगल घोरपडे, लता घोरपडे, शीतल घोरपडे, माजी ग्रामपंचायत सदस्य उज्वला घोरपडे या ही उपस्थित होत्या. यावेळी घोरपडे परिवारातील सर्व कुटुंबीय व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: स्पर्धात्मक जगात रिलॅक्स ‎राहण्याचे सूत्र शिका‎

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  स्पर्धात्मक जगात रिलॅक्स ‎राहण्याचे सूत्र शिका‎


  • Marathi News
  • Opinion
  • Pt. Vijayshankar Mehta’s Column, Learn The Formula For Staying Relaxed In A Competitive World

8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मागील वर्षांच्या तुलनेत सुशिक्षित आणि पात्र व्यक्तींची संख्या वाढली‎आहे. स्वाभाविकच स्पर्धा देखील वाढेल. परंतु आता स्पर्धा अगदी‎युद्धात रूपांतरित झाली आहे. लोकांनी त्यांच्या स्पर्धकांना ताण, चिंता‎आणि अपमान देण्याचे नवीन मार्ग शोधले आहेत. कधीकधी एखादा‎स्पर्धक कमकुवत असेल तर ताे तणावग्रस्त, चिंतेत बुडताे आणि‎अपमानाने दुखावले जातात, अगदी आत्महत्येचा विचारही करतात.‎हा देखील हिंसाचार आहे.

कोणत्या युगात स्पर्धा नव्हती? अवतारांचा‎काळ असो किंवा संत आणि ऋषींचा काळ असो. प्रत्येकाने‎आव्हानांना तोंड दिले. पण त्यांच्या पद्धतींचा सराव केला पाहिजे.‎त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करण्यास त्यांच्या‎निर्णयांची पूर्णपणे जाणीव ठेवण्यास आणि त्यांच्या कमकुवतपणाचे‎निरीक्षण करण्यास शिकवले. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या हल्ल्यांमुळे‎दुखावले जात असाल तर दररोज ही पद्धत वापरून पहा. श्वास घेताना‎ताजेपणा आणि सहजता श्वासात घ्या आणि इतरांमधून आलेली‎नकारात्मकता श्वासाद्वारे सोडा. ही पद्धत तुम्हाला स्पर्धात्मक जगात‎आरामात ठेवेल.



Source link

भकास शहराला बदलण्याचा निर्धार; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची तीव्र टीका व विकासाची ग्वाही

0
भकास शहराला बदलण्याचा निर्धार; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची तीव्र टीका व विकासाची ग्वाही

साहस Times प्रतिनिधी :  फलटण शहरात आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सुरू असलेल्या दौऱ्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सत्ताधारी गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. तीस वर्षाहून अधिक काळ फलटण नगरपालिकेवर सत्ता उपभोगणाऱ्यांनी शहराचा विकास खुंटवून भकास करण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला.

नाईक निंबाळकर म्हणाले, “अनेक विकासकामांत मोठा भ्रष्टाचार झाला असून शहरात एकही रस्ता नीट नसणे ही त्यांच्या अपयशाची पावती आहे. भुयारी गटार योजनेचे पैसे कुठे गेले याचा पत्ता नाही. पाणीपुरवठा योजनेतही मोठा भ्रष्टाचार झाला आहे.”

त्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या बदलत्या भूमिकेवरही निशाणा साधत—प्रत्येक निवडणुकीत स्वार्थापोटी पक्षबदल आणि मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप केला.

याउलट आपल्या नेतृत्वाखाली केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीनंतर अल्पावधीतच फलटण तालुक्यात कोट्यवधींचा निधी आणून अनेक प्रकल्पांना गती दिली असून ग्रामीण भागासह शहरातही विकासकामे सुरू आहेत. शहरातील रस्त्यांसाठी मंजूर निधीची कामे पावसामुळे थांबली होती; मात्र पुढील सहा महिन्यांत रस्त्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजे गटावर टीका करताना नाईक निंबाळकर म्हणाले, “प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षातून लढत जनतेचा विश्वास त्यांनी गमावला आहे. विधानसभेला मिळालेला धक्का तर आहेच; आता नगरपालिकेतही मोठा धक्का बसणार आहे.”

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना मिळणारा अभूतपूर्व जनसमर्थन पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला. सर्व २७ नगरसेवकही प्रचंड मतांनी विजयी होतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान, नाईक निंबाळकर यांच्या प्रचारदौऱ्याला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले जात आहे.

प्रभाग 12 मध्ये विकास काकडे व स्मिता शहा यांचा जनसंपर्क, नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यावर भर

0
प्रभाग 12 मध्ये विकास काकडे व स्मिता शहा यांचा जनसंपर्क, नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यावर भर

फलटण प्रतिनिधी :- प्रभाग क्रमांक 12 मध्ये अधिकृत उमेदवार विकास वसंतराव काकडे आणि सौ. स्मिता शहा यांनी प्रभागातील विविध भागांना भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. घराघरात जाऊन लोकांच्या समस्या आणि गरजा जाणून घेण्यावर त्यांचा विशेष भर होता. या भेटींना नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

दौऱ्यात नागरिकांनी रस्त्यांची खराब अवस्था ही सर्वात मोठी समस्या असल्याचे सांगितले. अनेक ठिकाणी मोठे खड्डे असल्यामुळे वाहन चालवणे कठीण होते आणि अपघातांचा धोका वाढतो, अशी तक्रार करण्यात आली. त्याचप्रमाणे ड्रेनेज वारंवार तुंबते, घाण पाणी रस्त्यावर येते आणि त्यामुळे दुर्गंधी व आरोग्याच्या अडचणी निर्माण होतात, असेही नागरिकांनी नमूद केले. काही भागांत स्ट्रीट लाईट नसल्याने रात्री भीती वाटते, विशेषतः विद्यार्थ्यांना व महिलांना त्रास होतो, असेही सांगण्यात आले.

नागरिकांनी प्रभागासाठी काही महत्त्वाच्या विकासाच्या मागण्या देखील केल्या. त्यात , उद्यान व जॉगिंग ट्रॅक, सीसीटीव्ही कॅमेरे,  आणि स्वच्छतेसाठी अधिक गाड्या व कर्मचारी यांचा समावेश आहे.

या सर्व समस्यांवर बोलताना विकास काकडे आणि स्मिता शहा म्हणाले,
“प्रभागातील प्रत्येक अडचण आम्ही मनापासून सोडवू. पाणी, रस्ते, प्रकाश आणि स्वच्छता या मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू. नागरिकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो आम्ही कामातून सिद्ध करू.”

प्रचार मोहिमेला महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून प्रभाग 12 मध्ये धनुष्य-बाण चिन्हाला वाढते समर्थन मिळत असल्याचे दिसत आहे.

सलाडमध्ये आवडीने वेगवेगळ्या सिड्स खाता? पण या लोकांनी अजिबात खाऊ नये

0
सलाडमध्ये आवडीने वेगवेगळ्या सिड्स खाता? पण या लोकांनी अजिबात खाऊ नये


सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया (Sunflower and pumpkin seeds) सामान्यतः आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत किंवा अतिप्रमाणात खाल्ल्यास त्या काही व्यक्तींसाठी समस्या निर्माण करू शकतात. 

Add Zee News as a Preferred Source

सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया खाणे खालील व्यक्तींनी टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने खावे. 

१. ॲलर्जी 
ज्या लोकांना सूर्यफूल किंवा भोपळ्याच्या बियांची ॲलर्जी (allergy) आहे, त्यांनी त्या पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. ॲलर्जीमुळे त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास अडचण येणे (गंभीर प्रकरणांमध्ये) यांसारखे परिणाम शरीरावर होऊ शकतात.

२. किडनीचे आजार 
या बियांमध्ये पोटॅशियम (potassium) आणि फॉस्फरस (phosphorus) सारख्या खनिजांचे प्रमाण जास्त असते. जर एखाद्या व्यक्तीला किडनीचा गंभीर आजार (kidney disease) असेल, तर त्यांची किडनी ही अतिरिक्त खनिजे शरीरातून बाहेर काढू शकत नाही, ज्यामुळे शरीरातील या घटकांचे संतुलन बिघडू शकते.

३. अतिसार
या बियांमध्ये फायबरचे (fiber) प्रमाण चांगले असते. सामान्य परिस्थितीत हे फायबर पचनास मदत करते, परंतु अतिप्रमाणात सेवन केल्यास किंवा पचनाचा विकार असलेल्या व्यक्तींना यामुळे गॅस, पोट फुगणे किंवा अतिसाराचा (diarrhea) त्रास होऊ शकतो.

४. रक्तदाब
सूर्यफूलाच्या बियांमध्ये रक्तदाब कमी करणारे गुणधर्म असू शकतात. जर तुमचा रक्तदाब आधीच खूप कमी (hypotension) असेल, तर जास्त प्रमाणात बिया खाल्ल्याने रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो.

५. विशिष्ट औषधे घेणाऱ्या व्यक्ती:
सूर्यफूल बियांमध्ये ‘फायटोस्टेरॉल’ (phytosterols) असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. परंतु, जर तुम्ही आधीच कोलेस्ट्रॉल किंवा रक्तदाबाची औषधे घेत असाल, तर या बियांच्या अतिसेवनाने औषधांचा प्रभाव वाढू शकतो किंवा आरोग्यावर अनपेक्षित परिणाम होऊ शकतात.

६. मीठ 
बहुतेक बाजारात मिळणाऱ्या भाजलेल्या बियांवर मीठ लावले जाते. उच्च रक्तदाब (high blood pressure) किंवा हृदयविकार असलेल्या लोकांनी खारवलेल्या बिया खाणे टाळावे, कारण यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते आणि रक्तदाबावर वाईट परिणाम होतो.

महत्त्वाची सूचना:
सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बियांचे सेवन नेहमीच संतुलित (moderate) प्रमाणात करावे. जर तुम्हाला आरोग्याची कोणतीही विशिष्ट समस्या असेल, तर तुमच्या आहारात मोठ्या प्रमाणात बदल करण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.





Source link

देशभरात 2,00,00,000 आधार नंबर झाले बंद, UIDAI ने डेटाबेसमधून काढून टाकलं नाव, जाणून घ्या कुणा कुणाचा रेकॉर्ड झाला डिलिट

0
देशभरात 2,00,00,000 आधार नंबर झाले बंद, UIDAI ने डेटाबेसमधून काढून टाकलं नाव, जाणून घ्या कुणा कुणाचा रेकॉर्ड झाला डिलिट


Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या ‘झी 24 तास डिजिटल’मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. ‘प्रहार’ आणि ‘लोकमत’ या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि ‘टीव्ही 9’ आणि ‘न्यूज एक्सप्रेस मराठी’ या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘India.com मराठी’ या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर ‘महाराष्ट्र टाईम्स’ च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

…Read More





Source link

अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखम

0



Accident News: कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात रायचूर- कारवार मार्गावर अपघाताची  एक गंभीर घटना समोर आली आहे. रायचूर-कारवार केएसआरटीसी बस अनियंत्रित होऊन अंकोला तालुक्यातील वज्रळी येथील नवमी हॉटेलजवळ नॅशनल हायवे 63 वर दरीत कोसळली. या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये महिलांसह लहान मुलांचाही समावेश होता. (Raichur Karwar Highway) राज्यात अपघातांची मालिका सुरूच असून मुंबई गोवा मार्गावर केमिकल ट्रक पलटी झाला असून कराड-विटा मार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अतिवेग नडला, बस थेट कोसळली दरीत 

मिळालेल्या माहितीनुसार, बस चालकाचा अतिवेग हा अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बस अचानक अनियंत्रित झाल्यानंतर चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि बस थेट दरीत कोसळली. अपघातानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यल्लापूर आणि अंकोला पोलिसांनीही तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढण्यात मदत केली.

जखमी प्रवाशांना तातडीने अँब्युलन्सद्वारे जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण प्रकरणाची नोंद अंकोला पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. दरम्यान, राज्यात इतर ठिकाणीही अपघातांच्या मालिका घडताना दिसत आहेत.

कराड-विटा मार्गावर भीषण अपघात; 2 मृत्यू 

कराड-विटा मार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ओगलेवाडी येथे रेल्वे स्टेशन ब्रिजजवळ ही धडक एवढी जोरदार होती की नेक्सन कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नेक्सन कार आणि टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ओमकार थोरात (28) आणि गणेश थोरात (25) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत दोघेही कराड तालुक्यातील ओंड गावचे रहिवासी होते. घटनेत ऋषिकेश थोरात आणि रोहन पवार हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई गोवा हायवेवर केमिकलने भरलेला टँकर पलटी

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे पुन्हा एकदा टँकरचा अपघात झाला असून त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. गोव्याहून मुंबईकडे जाणारा केमिकल वाहतूक करणारा टँकर हातखंबा येथील चढावर पलटी झाला. टँकरमध्ये कीटकनाशक असल्याची माहिती मिळाली असून केमिकल गळतीचा धोका नसल्याचं सांगण्यात येतंय. टँकर हटवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. टँकर रस्त्यावर आडवा पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा



Source link

भरधाव वेगात कंट्रोल सुटला, मिनी ट्रॅव्हल्स अक्षरश: हवेत उडून डिव्हायडरवर धडकली, फलटणमध्ये भीषण अपघात, एकाला चिरडलं

0


Phaltan Accident: भरधाव वेगात कंट्रोल सुटला, मिनी ट्रॅव्हल्स अक्षरश: हवेत उडून डिव्हायडरवर धडकली, फलटणमध्ये भीषण अपघात, एकाला चिरडलं

भरधाव वेगात कंट्रोल सुटला, मिनी ट्रॅव्हल्स अक्षरश: हवेत उडून डिव्हायडरवर धडकली, फलटणमध्ये भीषण अपघात, एकाला चिरडलं



Source link

प्रभाग ३ मध्ये शिवसेना उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद; श्रीमंत अनिकेतराजे यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास

0
प्रभाग ३ मध्ये शिवसेना उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद; श्रीमंत अनिकेतराजे यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास

फलटण प्रतिनिधी  : शहरातील विकासाला नवे दिशा देणारे आणि सुशिक्षित नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीला प्रभाग क्रमांक ३ मधून जोरदार पाठिंबा मिळत आहे. राजे गटाचे युवा कार्यकर्ते शक्ती भोसले यांनी प्रभागातील प्रचारसभा घेत नागरिकांना शिवसेना उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन केले.

प्रभाग ३ मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या असलेल्या पूनम सुनील भोसले आणि सुषमा हेमंत ननावरे यांच्या प्रचारार्थ बोलताना शक्ती भोसले म्हणाले की, “श्रीमंत अनिकेतराजे यांच्या नेतृत्वाखाली शहरात सुरक्षा, विकास आणि सुव्यवस्थेला नवी गती मिळेल.”

ते पुढे म्हणाले की, “नगराध्यक्षपदासाठी श्रीमंत अनिकेतराजे यांना तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणाऱ्या सर्व शिवसेना उमेदवारांना नागरिकांनी भरघोस मतांनी विजयी करून आणावे.”

श्रीमंत अनिकेतराजे यांच्या नेतृत्वामुळे प्रभाग ३ चा सर्वांगीण विकास वेगाने होईल, असा ठाम विश्वास शक्ती भोसले यांनी व्यक्त केला.