Saturday, July 4, 2026
Home Blog Page 94

आईला बॉयफ्रेण्डसोबत पाहिलं नको त्या अवस्थेत, मुलाने ट्रकमध्ये दोघांचे मृतदेह भरुन…

0
आईला बॉयफ्रेण्डसोबत पाहिलं नको त्या अवस्थेत, मुलाने ट्रकमध्ये दोघांचे मृतदेह भरुन…


Double Murder Case: अनैतिक संबंधांचा शेवट हा नेहमी वाईटच होतो, हे पुन्हा एकदा दिसून आलंय. एका मुलाने आपल्या आईला नको त्या अवस्थेत तिच्या बॉयफ्रेण्डसोबत पाहीलं. यानंतर त्याला राग अनावर झाला. या रागाच्या भरात ते जे केलं. ते फारच भयानक होतं. सिरसा येथील सिकंदरपूर थेडी येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडालीय. एका मुलाने त्याच्या आई आणि तिच्या प्रियकराची अनैतिक संबंधांमुळे गळा दाबून हत्या केली. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील सिकंदरपूर थेडी गावात एका तरुणाने आपल्या आई आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली, तर शुक्रवारी सकाळी आरोपी स्वतः मृतदेह घेऊन पोलिस ठाण्यात हजर झाला. लेखचंद हा गावातीलच शेजारी होता. आई-प्रियकराचे अवैध संबंध मुलाला मान्य नव्हते. अनेकदा वाद झाले, पण शेवटी त्याने दोघांनाही संपवलं आणि पोलिसांसमोर हजर झाला.

नेमकं काय घडलं?

एका 20-22 वर्षांच्या तरुणाने आपल्या आई अंगूरी देवी (वय अंदाजे 50) आणि तिच्या प्रियकर लेखचंद (वय अंदाजे 50) यांचा गळा दाबून खून केला. दोघांचेही अनैतिक संबंध असल्याचे त्याच्या निदर्शनास आले होते. याचा राग त्याच्या मनात होता. गुरुवारी रात्री सुमारे 2 वाजता सिकंदरपूर थेडी गावात हत्या झाली. शुक्रवारी सकाळी आरोपी स्वतः पिकअप ट्रकमध्ये दोन्ही मृतदेह घेऊन सिरसा शहरातील सदर पोलिस ठाण्यात पोहोचला.

आरोपीने काय सांगितलं?

त्याने पोलिसांना सांगितलं की, “मी अनेकदा आईला समजावलं, पण ती ऐकली नाही. त्यामुळे मी प्रथम लेखचंदचा आणि नंतर आईचा गळा दाबला.” हत्येनंतर तो थेट पोलिस स्टेशनला गेला आणि शरण आला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन सिरसा सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

FAQ

प्रकरण कधी आणि कुठे घडले?

उत्तर: ही घटना २७ नोव्हेंबर २०२५ च्या रात्री सुमारे २ वाजता हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील सिकंदरपूर थेडी गावात घडली. आरोपी दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबरला सकाळी दोन्ही मृतदेह घेऊन सिरसा शहरातील सदर पोलिस ठाण्यात हजर झाला.

खून कोणी आणि का केला?

उत्तर: २०-२२ वर्षांच्या तरुणाने (मयत महिलेचा मुलगा) आपल्या आई अंगूरी देवी (वय अंदाजे ५०) आणि तिच्या प्रियकर लेखचंद (वय अंदाजे ५०) यांचा गळा दाबून खून केला. आईचे लेखचंदबरोबर अवैध संबंध होते आणि त्याला ते मान्य नव्हते, म्हणून त्याने हा दुहेरी खून केला.

आरोपीने पोलिसांना काय सांगितले?

उत्तर: आरोपीने पोलिसांना सांगितले की, “मी अनेकदा आईला समजावले, पण ती ऐकली नाही. त्यामुळे मी प्रथम लेखचंदचा आणि नंतर आईचाही गळा दाबला.” खून केल्यानंतर तो स्वतः पिकअप ट्रकमध्ये दोन्ही मृतदेह घेऊन पोलिस ठाण्यात शरणाला गेला.





Source link

साताऱ्यातील पडळ परिसरातील बेकायदा उत्खनन, एबीपी माझाच्या बातमीनंतर घोटाळा उघड 

0



Satara News : सातारा (Satara) जिल्ह्यातील खटाव (Khatav) तालुक्यातील पडळ (Padal) परिसरात विनापरवाना सुरु असलेल्या उत्खननाचा मोठा घोटाळा समोर आला आहे. लाखो ब्रास उत्खनन करून परवानगी मात्र पाच साडेपाच हजार ब्रास उत्खननाची असल्याने खटाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. एबीपी माझाच्या बातमीने खटाव तालुक्यातील पडळ परिसरातील उत्खननाचा घोटाळा उघड झाला आहे. दरम्यान, याबाबत अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

RRMS इनको प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि मायणी ते शामगाव घाट या रस्त्याचे काम करणारी सोनाई प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला महसूल, गौण खनिज सातारा या कार्यालयाकडून कोणताही गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करण्याबाबत परवाना देण्यात आला नसल्याची धक्कादायक माहिती महसूल अधिकारी बाळासाहेब जाधव (Balasaheb Jadhav) यांनी दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी या अवैध झालेल्या उत्खननावर आवाज उठवला असता वडूज तहसीलदार मॅडम यांनी पंचनामा करत त्या ठिकाणी जादा उत्खनन आढळला नाही असं पत्रक काढण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाची फसवणूक करून संबंधित कंपनी आणि तहसीलदार मॅडमचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप दादासाहेब चव्हाण यांनी केला होता.यावर एबीपी माझा ने बातमी प्रसिद्ध करतात याची दखल सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी तत्काळ घेत महसूल गौण खनिज अधिकारी बाळासाहेब जाधव यांना झालेल्या उत्खननासंदर्भात माहिती घेण्यास सांगितले. त्यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पडळ परिसरात बेकायदा उत्खनन सुरु होते. याबाबतची बातमी एबीपी माझाने प्रसिद्ध केली होती. त्यानंत वेगानं सुत्र हालली. लाखो ब्रास उत्खनन हे बेकायदा सुरु असल्याचे समोर आले आहे. 

या प्रकरणाची चौकशी करुण तहसीलदारांना निलंबीत करावं, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांची मागणी

मायणी ते दहिवडी रस्त्याचे काम करणारी कंपनी मे. RRSM इन्फो प्राइवेट लिमिटेड आणि मायनी ते शामगाव घाट या रस्त्याचे काम करणारी कंपनी सोनाई प्रायव्हेट लिमिटेड यांना गौण खनिज कार्यालयाकडून कोणताही गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करण्यासाठीचा परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळं खटावच्या तहसीलदार मॅडम आणि या कंपनीचे काही अर्थपूर्ण संबंध आहेत का याची चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर तहसीलदार मॅडम यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी केली आहे.

आणखी वाचा



Source link

उन्हापासून त्वचेला वाचवणारी ‘सनस्क्रीन’च ” ठरतेय व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे कारण? जाणून घ्या यामगचे सत्य

0
उन्हापासून त्वचेला वाचवणारी ‘सनस्क्रीन’च ” ठरतेय व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे कारण? जाणून घ्या यामगचे सत्य


Truth Behind Sunscreen Causes Vitamin D deficiency: त्वचेची काळजी घेणे हे प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनले आहे. उन्हाळा असो किंवा हिवाळा कोणीही सनस्क्रीन  लावल्याशिवाय बाहेर जात नाही. उन्हाच्या प्रखर किरणांमुळे त्वचेला इजा पोहोचेल, त्वचा काळी पडेल, त्वचेवर डाग येतील ही भीती असते. विशेषतः स्त्रिया अधिक प्रमाणात सनस्क्रीनचा वापर करतात. पण  त्वचेचे उन्हाच्या किरणांपासून रक्षण करण्यासाठी वापरली जाणारी सनस्क्रीनच तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे मोठे कारण आहे का? असा प्रश्न तुम्हालाही कधी न कधी पडला असेल. चला तर मग यामागचे सत्य जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

सूर्याच्या किरणांमध्ये त्वचेला पोषण देणारे आणि व्हिटॅमिन डी पुरवणारे यूवी-बी किरणे असतात. तज्ज्ञांच्या मते सनस्क्रीन  वापरल्याने सूर्यप्रकाशामुळे त्वचेला मिळणाऱ्या व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी होऊ शकते, पण पूर्णपणे नाही. सन्सस्क्रीन मधील घटक यूवी-बी किरणांना फिल्टर  करण्याचे काम करतात. पण त्यांना पूर्णपणे रोखत नाहीत. त्यामुळे सन्सस्क्रीन वापरल्याने त्वचेला व्हिटॅमिन डी मिळतच नाही हे खोटे आहे. पण हे देखील तुम्ही किती प्रमाणात आणि कोणत्या प्रकारची सन्सस्क्रीन वापरत आहात यावर अवलंबून आहे. 

 

उच्च एसपीएफ (SPF) असलेली सन्सस्क्रीन वापरल्यास ती यूवी-बी किरणांना प्रभावीपणे रोखते. व्हिटॅमिन डीच्या निर्मितीसाठी त्वचेला यूवी-बी किरणांची आवश्यकता असते. उच्च एसपीएफ (SPF) असलेली सनस्क्रीन व्हिटॅमिन डीच्या निर्मितीमध्ये अडथळा आणू शकते. म्हणूनच कमी एसपीएफ (SPF) असलेली सन्सस्क्रीन वापरणे अधिक फायदेशीर ठरते. काही सन्सस्क्रीन असे असतात जे सूर्यप्रकाश पूर्णपणे रोखत नाहीत. यामुळे त्वचेला व्हिटॅमिन डीच्या निर्मितीमध्ये कोणताही अडथळा येत नाही.

 

काही व्यक्ती दररोज सन्सस्क्रीनचा वापर करतात तरीही त्यांच्या शरीरातील व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी किंवा जास्त नसून योग्य प्रमाणात असते. याचे कारण असे की ते, जास्त प्रमाणाच सन्सस्क्रिनचा वापर करत नाहीत. तुम्हीही हा उपाय करू शकता. शिवाय दिवसातून 15 ते 20 मिनिटे सन्सस्क्रीनचा वापर न करता उन्हात थांबा. यामुळे त्वचेला थेट सूर्यप्रकाश मिळेल आणि व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होईल. 

 

याशिवाय आहारात बदल करूनही तुम्ही व्हिटॅमिन डी मिळवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सॅल्मन, मॅकरेल, हेरिंग आणि ट्यूना हे चरबीयुक्त मासे समाविष्ट करू शकता. तसेच दूध, अंडी, मशरूम, तृणधान्ये, संत्र्याचा रस, दही या सर्व पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. 

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमी जाणवतेय? ठरू शकते अनेक गंभीर आजारांचे मोठे कारण…

0
तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमी जाणवतेय? ठरू शकते अनेक गंभीर आजारांचे मोठे कारण…


Vitamin D For Health: आजकालच्या अस्वस्थ जीवनशैलीमुळे प्रत्येकजण आरोग्याच्या कोणत्या न कोणत्या समस्यांना सामोरे जात आहे. काही समस्या अशा आहेत आहेत ज्या सर्वांमध्ये सारख्या आहेत. जसे की शरीरात अनेक पोषण तत्त्वांची कमी असणे त्यातील मुख्य पोषक तत्त्व म्हणजे व्हिटॅमिन डी. शरीरात व्हिटॅमिन डीची कमी जाणवल्यास हाडे आणि स्नायू दुखणे, थकवा आणि अशक्तपणा येणे, त्वचेच्या समस्या येणे; एवढेच काय तर लहान मुलांना मुडदूस आणि प्रौढांना ऑस्टिओमॅलेशिया या गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी शरीरातील व्हिटॅमिन डीची कमी भरून काढणे आवश्यक आहे. पण व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी किती आणि कोणत्या वेळी उन्हात बसायला हवे हे माहीत असणे आवश्यक आहे. 

Add Zee News as a Preferred Source

 

 

तुम्ही उपचारासाठी जेव्हा केव्हा डॉक्टरकडे जाता तेव्हा  व्हिटॅमिन डीची गोळी घेण्याचा किंवा उन्हात चालण्याचा सल्ला आवर्जून दिला जातो. तसेच सकाळच्या उन्हात जास्त व्हिटॅमिन डी मिळतो असे म्हटले जाते. पण खरे तर व्हिटॅमिन डी तेव्हा मिळते जेव्हा आपली त्वचा सूर्याच्या यूवी-बी किरणांच्या संपर्कात येते. जे सूर्याच्या प्रखर किरणांमध्ये असते. आणि सकाळचे म्हणजेच 7 ते 8 वाजताचे ऊन तेवढे प्रखर किंवा परिणामकारक नसते. 

 

व्हिटॅमिन डी मिळवण्याची योग्य वेळ कोणती? 

तज्ज्ञांच्या मते व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे दुपारची वेळ. सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंतचे ऊन अधिक परिणामकारक मानले जाते. यावेळी सूर्याची किरणे सरळ पृथ्वीवर पडत असतात. त्यामुळे यावेळेची सूर्यकिरणे अधिक प्रखर आणि यूवी-बी किरणांनी भरपूर असतात. जे त्वचेच्या खाली असलेल्या कोलेस्ट्रोलचे रूपांतर व्हिटॅमिन डीमध्ये करण्यास मदत करतात. पण ऊन्हात कितीवेळ थांबल्याने व्हिटॅमिन डी योग्यप्रमाणात मिळेल यावर लक्ष  केंद्रित करणे आवश्यक आहे. 

 

त्वचेच्या रंगाप्रमाणे कोणी, किती ऊन घ्यावे?

उजळ त्वचेमध्ये मेलेनिन कमी प्रमाणात  असते. त्यामुळे जर तुमची त्वचाही उजळ रंगाची असले तर तुम्ही 15 ते 20 मिनिटे ऊन्हात थांबले पाहिजे. याउलट सावळ्या रंगाच्या त्वचेमध्ये मेलेनिनचे प्रमाण जास्त असते. जे सूर्याच्या यूवी-बी किरणांना रोखू शकते. त्यामुळे सावळ्या रंगाची त्वचा असणाऱ्या व्यक्तिंनी ऊन्हामध्ये जास्तीत जास्त 30 ते 45 मिनिटे थांबयला हवे. तसेच वाढत्या वयासह त्वचेची व्हिटॅमिन डी शोषून घेण्याची आणि तयार करण्याची क्षमता कमी होते. यामुळे प्रौढांनी आणि वयोवृद्ध व्यक्तिंनी शक्य तितके जास्तवेळ ऊन्हात थांबावे. 

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही सनस्क्रिन लावून ऊन्हात थांबत असाल तर त्वचेला व्हिटॅमिन डी शोषून घेणे कठीण होईल. यामुळे तुम्ही कितीहीवेळ ऊन्हात थांबलात तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तसेच काचेच्या खिडकीजवळ बसून ऊन घेणे टाळा. कारण काच ऊन्हातील यूवी-बी किरणांना तुमच्या त्वचेपर्यंत येण्यापासून रोखते. 

 

शरीरासाठी व्हिटॅमिन डी का आवश्यक आहे? 

आपल्या शरीराच्या निरोगी आरोग्यामध्ये व्हिटॅमिन डीची मोठी भूमिका आहे. व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम आणि फॉस्फेट हे सर्वात आवश्यक तत्त्व शोषून घेण्यास मदत करते. जे हाडे मजबूत करण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असते. तसेच व्हिटॅमिन डीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. एवढेच काय तर मेंदूच्या आरोग्यासाठी देखील व्हिटॅमिन डी फायदेशीर ठरते. 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

भोकरदन नगरपरिषद निवडणुकीत नागरिकांमध्ये चर्चांना उधाण -“चंद्रकांत दानवे भाजपची बी टीम?” नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह!

0
भोकरदन नगरपरिषद निवडणुकीत नागरिकांमध्ये चर्चांना उधाण -“चंद्रकांत दानवे भाजपची बी टीम?” नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह!

जालना : भोकरदनमध्ये नगरपरिषद निवडणुकीची धामधूम वाढत आहे आणि त्याचबरोबर नागरिकांमध्ये एक मोठी चर्चा सुरू झाली आहे.
ती म्हणजे —
“राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते चंद्रकांत दानवे यांनी स्वतंत्र पॅनल उभं केल्याने भाजपला मदत होणार का?”

सुरुवातीपासून मुख्य लढत ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच दिसत होती.
काँग्रेसकडून राजाभाऊ देशमुख, तर भाजपकडून रावसाहेब दानवे हे केंद्रस्थानी होते.

पण अचानक चंद्रकांत दानवे यांनी महाविकास आघाडीपासून वेगळं होत स्वतंत्र पॅनल उभं केलं.
यामुळे काँग्रेसची मते विभागली जाऊन त्याचा फायदा भाजपला होईल अशी शंका लोकांमध्ये निर्माण झाली.

सध्या शहरात, चौकात, टपरीवर एकच चर्चा ऐकू येते —
“दानवे यांनी स्वतंत्र पॅनल का काढलं?
यामागे भाजपला मदत करण्याचा इशारा आहे का?”

ही चर्चा आता केवळ राजकीय नेत्यांपुरती मर्यादित नसून सामान्य नागरिकांतही वाढताना दिसतेय.

निवडणुकीचे वातावरण तापत असून
आता पुढील काही दिवसात या त्रिकोणी लढतीचे परिणाम कुठे झुकतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

एन. रघुरामन यांचा कॉलम: तुम्ही सन्मानजनक कपडे परिधान केलेत का?

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  तुम्ही सन्मानजनक कपडे परिधान केलेत का?


2 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

या आठवड्यात जगभरातील लाखो लोकांनी गुरुवारी नातेवाइकांसोबत ‘थँक्सगिव्हिंग डे’ साजरा करण्यासाठी प्रवास केला. एकट्या अमेरिकेत ३ कोटींहून अधिक लोकांनी हवाई प्रवास केला. त्यापैकी एक अमेरिकन वाहतूक सचिव शॉन डफी होते. या आठवड्यात डफी आणि त्यांच्या विभागाने “नागरिकता मोहीम’ सुरू केली. या मोहिमेत एक व्हिडिओ समाविष्ट आहे. एकेकाळी चांगले कपडे घालून विमान प्रवास करणारे लाेक हाेते. त्यांची आठवण करून देणारा हा व्हिडिओ हाेता. त्यात सूट आणि टायच्या त्या दिवसांची तुलना आजच्या दृश्यांशी केली आहे. लोक पायजमा घालून विमानात चढत होते. विमान परिचारिकांशी वाद घालत अनवाणी फिरत होते. गेल्या पाच वर्षांत विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांना आजच्या आधुनिक अनुभवाचा भाग म्हणून या सर्व गोष्टी सहन कराव्या लागल्या आहेत.

व्हिडिओमध्ये डफी विचारतो, “तुम्ही सन्मानजनक कपडे घातले आहेत का?’ ‘तुम्ही तुमच्या मुलांना नियंत्रित करत आहात का?’ खरे तर त्याचे स्वप्न आहे की ‘प्रवासी गर्भवती महिलांना किंवा वृद्धांना त्यांचे सामान ओव्हरहेड बिनमध्ये ठेवण्यास मदत करताना दिसावेत.’ तो त्यांना संपूर्ण प्रवासात सभ्य कपडे घातलेले पाहू इच्छितो. त्याचे ध्येय महत्त्वाकांक्षी आहे. तो म्हणतो, “चला सभ्यपणा आणि शिष्टाचार परत आणूया.’

प्रवासात अनेक गैरसोयी आहेत. देशभरातील आपल्या गाड्या पाहा. मी माझ्या विमानप्रवासात आणि विशेषतः रेल्वेप्रवासात असे पाहिले आहे की कोच अटेंडंट चांगले कपडे घातलेल्या प्रवाशांना स्वच्छ चादरी आणि उशा देतात. कधी-कधी अतिरिक्त टॉवेलदेखील देतात. तुम्ही लक्ष दिले तर तुम्हाला चांगले कपडे घातलेल्या प्रवाशांशी अटेंडंट कसे संवाद साधतात यात लक्षणीय फरक दिसून येईल. खरे तर चांगले कपडे आपले वर्तनदेखील बदलतात. चांगले कपडे घातलेली व्यक्ती किती वेळा हसते, सभ्य विनोद सांगते आणि सहप्रवाशांशी सभ्यतेने वागतात दिसतात. ते कधीही मोठ्याने बोलत नाही. परंतु काही लोक त्यांचे मोबाइल मोठ्या आवाजात वापरून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. ते विचारवंतांना, वाचकांना आणि एकांतवास शोधणाऱ्यांना त्रास देतात.

मला सर्वात मोठा फरक दिसला तो म्हणजे जेवताना किंवा रॅपर फेकताना त्यांचे आसन स्वच्छ ठेवण्याची त्यांची पद्धत. त्यांच्या लगेजचा आकार पाहून ही बाब आणखी स्पष्ट होते. तुम्ही कल्पना करू शकता का की मुंबईहून पाटण्ययाच्या प्रथम श्रेणीच्या विमानात लाेक जळतणाचे लाकूड घेऊन जात आहेत ? ते तिकीट तपासनीस आणि सहप्रवाशांसोबत त्यांच्या हक्कांसाठी लढतात. परंतु सार्वजनिक ठिकाणी आणि ट्रेनमध्ये प्रवास करताना कधीही त्यांच्या कर्तव्यांबद्दल चर्चा करत नाहीत.

त्यांना मिळणाऱ्या पैशाच्या महापुरात सभ्यपणा आणि सार्वजनिक वर्तन जणू वाहून गेले आहे. ही केवळ भारतातील एक सामाजिक समस्या नाही; डफी सांगतो त्याप्रमाणे अमेरिकेसारख्या सर्वात विकसित देशांमध्येही परिस्थिती अशीच आहे. सार्वजनिक ठिकाणी सभ्य वागणाऱ्यांना पुरस्कार दिले जातील, असा दिवसही दूर नाही. आपण समाजाचा सन्मान देऊन याची सुरुवात केली पाहिजे. आपला ड्रेसिंग सेन्स, बोलण्याची शैली, वर्तन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाइल शिष्टाचारातून हे दाखवू देऊ शकताे. याचा आपल्या वर्तनावर खोलवर परिणाम होईल. कल्पना करा की विमान किंवा ट्रेनमध्ये प्रत्येक जण चांगले कपडे घातलेला आहे. ते सर्व हळू आणि सभ्यपणे बोलत आहे. मी डफीसारखा स्वप्न पाहणारा आहे.

हा लेख मोबाइलवर ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.



Source link

मासिक पाळी दरम्यान नक्की किती रक्तस्त्राव व्हायला हवा? प्रमाण जास्त असल्यास होऊ शकतात गंभीर आजार!

0
मासिक पाळी दरम्यान नक्की किती रक्तस्त्राव व्हायला हवा? प्रमाण जास्त असल्यास होऊ शकतात गंभीर आजार!


Monthly Periods Health: मासिक पाळी हे स्त्रियांच्या निरोगी आरोग्याचे वरदान आहे.  या काळात स्त्रियांचे शरीर नैसर्गिकरित्या स्वच्छ होत असते. मासिक पाळीचे चक्र साधारणतः 21 ते 35 दिवसांचे असते. मासिक पाळी येणे म्हणजे स्त्रियांचे शरीर गर्भधारणेसाठी तयार होत असते. प्रत्येक महिन्यात गर्भाशयाचे आतील आवरण जाड होते आणि अंडाशयातून एक स्त्रीबीज बाहेर पडते. जर गर्भधारणा झाली नाही तर, गर्भाशयाचे जाड आवरण आणि स्त्रीबीज रक्तस्त्रावाच्या स्वरूपात बाहेर पडते. यादरम्यान प्रत्येक स्त्रीला कमी-जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असतो. पण प्रमाणापेक्षा अधिक रक्तस्त्राव होत असेल तर, याचा आोरोग्यावर परिणाम होतो. आणि थकवा येणे, चक्कर येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हा रक्तस्त्राव नेमका किती प्रमाणात व्हायला हवा याबाबात प्रत्येक स्त्रीला माहीत असणे आवश्यक आहे.  

Add Zee News as a Preferred Source

 

निरोगी रक्तस्त्रावाचे प्रमाण किती असते? 

तज्ज्ञांच्या मते मासिक पाळीच्या रक्तस्त्रावाचे सरासरी प्रमाण 30 ते 40 मिली इतके असते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर हे प्रमाण दोन ते तीन चमचे असावे. काही संशोधनानुसार 60 मिलीलीटर हे प्रमाण सुमारे चार चमचे असू शकते. मासिक पाळीच्या रक्तात श्लेष्मा, फॅलोपियन  नलिकांचे आवरण आणि इतर ऊती देखील असतात. एकूण रक्तस्त्रावामध्ये सुमारे 36 टक्के रक्त आणि 64 टक्के इतर घटक असतात. 

 

जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे कसे ओळखाल? 

जर मासिक पाळी दरम्यान तुम्ही सॅनीटरी पॅड ऐवजी मेंस्ट्रुअल कप वापरत असाल तर, किती प्रमाणात रक्तस्त्राव होत आहे हे मोजता येऊ शकते. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जर एकूण रक्तस्त्राव 120 मिली असेल तर त्यापैकी 36 टक्के रक्त असते. म्हणजेच त्यातील 120 मिलीपैकी 43 टक्के रक्त असेल. याप्रमाणे जर मासिक पाळी दरम्यान तुमच्या रक्तस्त्रावातील रक्ताचे प्रमाण 60 मिली किंवा 80 मिली असेल तर, जास्त रक्तस्त्राव झाल्याचे मानले जाऊ शकते. 

 

निरोगी रक्तस्त्राव होण्यासाठी कोणती काळजी घ्याल?

 तुमच्या शरीरात लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 12 यांसारख्या पोषकतत्त्वांची कमतरता जाणवल्यास जास्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात लोह आणि व्हिटॅमिन के युक्त आहाराचा समावेश करा. हिरव्या भाज्या, लाल मांस किंवा चिकन या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी 12 साठी पालक, मेथी यांसारख्या हिरव्या भाज्यांसह अंड्यांचेही सेवन करा. तसेच अळशीच्या बिया, फळे आणि संपूर्ण धान्यांचेही सेवन करा. भरपूर पाणी प्या ज्यामुळे अशक्तपणा आणि थकवा कमी होईल. 
याशिवाय अधिक समस्या जाणवत असतील तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

 

 

 

१. प्रश्न: मासिक पाळीमध्ये किती रक्तस्त्राव होणे सामान्य समजले जाते?

उत्तर: तज्ज्ञांनुसार सामान्य रक्तस्त्राव 30–40 मिलीलीटर (2–3 चमचे) असतो. काही स्त्रियांमध्ये 60 मिलीलीटर (4 चमचे) पर्यंतही सामान्य मानले जाते. त्यापेक्षा जास्त झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

२. प्रश्न: जास्त रक्तस्त्राव झाल्याचे कसे ओळखावे?

उत्तर: जर एका पिरियडमध्ये 80 मिलीलीटरपेक्षा जास्त रक्तस्त्राव होत असेल, दर 1–2 तासांनी पॅड पूर्ण भरत असेल, रात्रीही उठावे लागत असेल किंवा ७ दिवसांपेक्षा जास्त पाळी राहत असेल तर हा जास्त रक्तस्त्राव समजावा. यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, थकवा जाणवतो.

 

३. प्रश्न: जास्त रक्तस्त्राव टाळण्यासाठी काय खावे?

उत्तर: लोह, व्हिटॅमिन K आणि B12 युक्त आहार घ्या. पालक, मेथी, बीट, डाळी, अंडी, लाल मांस/चिकन, संत्री, आळशीच्या बिया आणि भरपूर पाणी. कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्यावीत. त्रास जास्त असल्यास त्वरित स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा.

 

 

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

Supreme Court on Reservation: महाराष्ट्रातील निवडणुकांना स्थगिती? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

0
Supreme Court on Reservation: महाराष्ट्रातील निवडणुकांना स्थगिती? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय


Supreme Court Hearing on Resevation: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक ठरल्याप्रमाणे होईल असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणुकीवर कोणतीही स्थगिती आणलेली नाही. निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असून 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणातही 50 टक्क्यांचा निकष पाळण्यात आलेला नाही असा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. 21 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने आम्ही तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करु असं सांगितलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

तेलंगणात 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असल्याने, उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आणि राज्य निवडणूक आयोगाने तेथील निवडणुकांना स्थगिती दिली. महाराष्ट्रातही मर्यादा ओलांडण्यात आली असल्याने, निवडणुकांवर स्थगिती येणार का? याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने राज्यातील निवडणुकीला स्थगिती दिली नसल्याने, ठरल्या वेळेत पार पडणार आहेत. 

सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान काय घडलं?

वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग: बांठिया आयोगाच्या अहवालावर आम्ही आक्षेप घेतो कारण त्याचा हेतू ओबीसींची संख्या कमी करणे हा होता आणि फक्त आडनाव विचारात घेतले गेले होते.

सरन्यायाधीश सूर्यकांत: आज आपल्याकडे एक बेंचमार्क आहे.. बांठिया आयोग. आम्ही ते वाचलेले नाही पण आता कदाचित त्याकडे गंभीरपणे पाहावे लागेल.

जयसिंग: अवमान हा पुनरावलोकन मागण्याचा छुपा मार्ग आहे.

सरन्यायाधीश: येथे आदेशाचा अर्थ लावला जातो किंवा त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो हा वाद आहे.

सरन्यायाधीश: आम्ही जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत 3  न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी करू.

वरिष्ठ वकील विकास सिंह: तर तोपर्यंत निवडणुका होऊ देऊ नका.

सरन्यायाधीश: आम्ही म्हणणं ऐकलं आहे. मागील सुनावणीत दिलेल्या आदेशाच्या संदर्भात, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने एक संक्षिप्त नोंद सादर केली होती. फक्त 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायत आहेत जिथे आरक्षण 50 टक्क्यांहून अधिक आहे. जे मुद्दे निर्माण होऊ शकतात ते विचारात घेऊन जानेवारी 2026 च्या दुसऱ्या आठवड्यात 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर प्रकरण सूचीबद्ध करावं. दरम्यान, नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका अधिसूचित वेळापत्रकानुसार होऊ शकतात परंतु वरील 40 आणि 17 चे निकाल या कार्यवाहीच्या अंतिम निकालाच्या अधीन असतील.





Source link

शिवसेनेची दत्तनगरमध्ये कोपरा सभा; विकासाची हमी

0
शिवसेनेची दत्तनगरमध्ये कोपरा सभा; विकासाची हमी

साहस Times फलटण :- फलटण नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक १२ मध्ये शिवसेना पक्ष आणि राजेगटाच्या वतीने दत्तनगर येथे कोपरा सभा झाली. या सभेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक उमेदवार विकास वसंतराव काकडे आणि स्मिता शहा उपस्थित होते. तसेच माजी आमदार दीपक चव्हाण आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमुळे सभा उत्साही झाली.

सभेच्या सुरुवातीला विकास काकडे यांनी सांगितले की, प्रभागातील कोणत्याही कामासाठी ते नेहमी तयार राहतील. प्रभागातील लोक मेहनत करून आपले जीवन जगतात, म्हणून प्रशासनातील आवश्यक दाखले लोकांच्या घरी जाऊन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. रस्ते, पाणी आणि स्वच्छतेची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचेही ते म्हणाले.

माजी आमदार दीपक चव्हाण म्हणाले की, श्रीमंत रामराजेंनी फलटण तालुक्याचा विकास घडवला आहे. फलटण हे सुसंस्कृत शहर असून त्याच्या प्रगतीसाठी आम्ही सर्वजण शिवसेनेत आलो आहोत. येथे निर्माण झालेली दहशत संपवणे हे आमचे पहिले ध्येय आहे. शिवसेनेचे उमेदवार सुशिक्षित आणि तरुण असल्याने शहराचा विकास वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, रामराजेंनी फलटणला दिलेले शांततेचे वातावरण बिघडू नये. शहर आणि तालुका योग्य मार्गाने पुढे जावा म्हणून आम्ही शिवसेनेत आलो आहोत. नगराध्यक्ष पदासाठी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हेच योग्य उमेदवार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फलटणमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवणार नाही आणि उद्योगांसाठी लागणारी कामे केली जातील, असेही त्यांनी सांगितले. ताकदीने निवडणूक लढवून जास्तीत जास्त मताधिक्याने विजय मिळवण्याचे आवाहन त्यांनी केले.

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: जेन-झीसाठी मावळती पिढीही काही देऊ शकते

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  जेन-झीसाठी मावळती पिढीही काही देऊ शकते


  • Marathi News
  • Opinion
  • Pt. Vijayshankar Mehta’s Column, The Declining Generation Can Also Offer Something To Gen Z

1 दिवसापूर्वी

  • कॉपी लिंक

जुन्या काळातील लोकांनुसार आयुष्याचे सहा टप्पे होते : बालपण, किशोर, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व, जरावस्था. आता त्यांना नवीन नावे देण्यात आली आहेत: जेन-झी, मिलेनियल्स आणि बेबी बूमर्स. तुम्ही कोणत्याही गटात असला तरीही तुमच्या ऊर्जेचा स्रोत काय आहे हे लक्षात ठेवा. भौतिक संसाधने असल्यास तुम्हाला भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेल. जेन-झी पूर्णपणे वेगळे जीवन जगत आहेत. परंतु याचे एक प्रमुख कारण म्हणजे ते जबाबदाऱ्यांपासून मुक्त आहेत.

त्यांच्यात राष्ट्रवादाची भावना, सामाजिक जाणीव, कौटुंबिक जवळीकतेचा अभाव आहे. ते आनंदात रमतात. क्षमता ओसंडून वाहत आहेत. परंतु शाश्वत घडवण्यासाठी मावळत्या पिढीने त्यांची भूमिका सोडू नये. कारण या नवीन पिढीला काम आणि जीवन संतुलनाच्या आव्हानास सामोरे जावे लागेल. भविष्यात ते इतर सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवतील. परंतु आरोग्यावर त्याचा परिणाम होईल. म्हणून मावळत्या पिढीने त्यांना काही ना काही द्यावे, जेणेकरून त्यांना उपयुक्त ठरेल.



Source link