Saturday, July 4, 2026
Home Blog Page 93

निरा नदीवरील बंधाऱ्यावर जातीय रागातून दाम्पत्यावर मारहाण; फलटण ग्रामीण पोलिसांकडे गुन्हा दाखल

0
निरा नदीवरील बंधाऱ्यावर जातीय रागातून दाम्पत्यावर मारहाण; फलटण ग्रामीण पोलिसांकडे गुन्हा दाखल

आसू (ता. फलटण), दि. 30 नोव्हेंबर 2025 — निरा नदीवरील बंधाऱ्यावर दाम्पत्यासोबत झालेल्या जातीय वाद आणि मारहाणीच्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसू येथील सौ. रमा नंदकुमार पवार (वय 32) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्या आपल्या पती नंदकुमार पवार यांच्यासह दुपारी 3:30 वाजता बारामती येथे मुलीस भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. 3:40 वाजता, निरा नदीवरील बंधाऱ्याजवळ MH-42 CS-4545 क्रमांकाची पांढरी कार आडवी उभी असल्याने वाहतूक अडली. त्या वेळी कारमधून उतरलेले राजन दिनकर फराटे (रा. आसू) यांनी वाद घालत तक्रारदार दाम्पत्याला थांबवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, वादादरम्यान राजन फराटे यांनी तक्रारदार व त्यांच्या पतीला जातिवाचक शिवीगाळ करत धमकावले. “तुम्ही खालच्या महार जातीचे… गावात राहू देणार नाही… तुमच्यावर केसेस दाखल करीन” अशी वक्तव्ये केल्याचा आरोप नोंदवण्यात आला आहे.

वाद वाढताच तक्रारदार महिलेला गाल, नाक, छाती व गळ्याच्या डाव्या बाजूस शारीरिक मारहाणीमुळे दुखापत झाल्याचे नमूद आहे. तक्रारदारांच्या पतीलाही मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

घटनेनंतर रमा पवार यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी मारहाण, धमकी तसेच जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Liver Disease Risk: रक्तात लपलंय तुमच्या आजाराचं रहस्य, कोणत्या रक्त गटाला सर्वाधिक धोका? रिसर्चमध्ये खुलासा!

0
Liver Disease Risk: रक्तात लपलंय तुमच्या आजाराचं रहस्य, कोणत्या रक्त गटाला सर्वाधिक धोका? रिसर्चमध्ये खुलासा!


Liver Disease: तुमच्या रक्तगटातच तुम्हाला होणाऱ्या आजाराचं रहस्य दडलंय, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर? कोणत्या रक्तगटाला आजाराचा धोका जास्त असतो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

नवीन वैज्ञानिक अभ्यासानुसार, रक्तगट A असणाऱ्या व्यक्तींना ऑटोइम्यून यकृत रोगांचा धोका जास्त असतो. हा अभ्यास जर्नल फ्रंटियर्समध्ये प्रकाशित झालाय. त्यात रक्तगट आणि यकृताच्या आरोग्याशी असलेल्या नात्याचा अभ्यास करण्यात आलाय. रक्तगट A असणाऱ्यांच्या रोगप्रतिकारशक्ती प्रणाली स्वतःच्या यकृतावर हल्ला करू शकते, ज्यामुळे यकृताचे नुकसान होऊन सिरोसिस, कर्करोग किंवा अपयश होऊ शकते. दुसरीकडे रक्तगट B असणाऱ्यांना गंभीर यकृत रोगांचा धोका थोडा कमी असतो, असेही संशोधनात म्हटलंय. हा अभ्यास रक्तगटाच्या आधारे आरोग्य जोखीम समजून घेण्यास मदत करतो. 

काय निघाला निष्कर्ष?

रक्तगट A असणाऱ्या लोकांना ऑटोइम्यून यकृत रोगांचा धोका 20-30 टक्क्यांनी जास्त आहे. यात रोगप्रतिकारशक्ती प्रणाली चुकून यकृताच्या पेशींवर हल्ला करते, ज्यामुळे यकृतात सूज येते आणि हळूहळू नुकसान होते, असे जर्नल फ्रंटियर्समध्ये प्रकाशित या अभ्यासात असे आढळले. रक्तगट O नसणाऱ्या व्यक्तींना म्हणजेच रक्तगट A, B किंवा AB असलेल्यांना रक्त गोठवण्याचे घटक जास्त सक्रिय असतात, ज्यामुळे यकृतातील रक्तप्रवाहावर थोडा परिणाम होऊ शकतो. मात्र रक्तगट B असणाऱ्यांना गंभीर स्थितीचा धोका कमी आहे. हा अभ्यास अनेक रुग्णांच्या डेटावर आधारित आहे. ज्यातून रक्तगट आणि यकृत आरोग्य यांच्यातील संबंध स्पष्ट होतो. =

ऑटोइम्यून यकृत रोग म्हणजे काय?

ऑटोइम्यून यकृत रोग हे दुर्मीळ असले तरी गंभीर असतात. उदाहरणार्थ, ऑटोइम्यून हिपेटायटिस (AIH) मध्ये रोगप्रतिकारशक्ती यकृताच्या पेशींना नष्ट करते, ज्यामुळे सूज आणि दीर्घकाळाचे नुकसान होते. दुसरा रोग म्हणजे प्रायमरी बिलियरी कोलॅंगायटिस (PBC), ज्यात यकृतातील पित्तवाहिन्या हळूहळू खराब होतात. रक्तगट A असणाऱ्यांना AIH चा धोका जास्त, तर B असणाऱ्यांना PBC चा धोका थोडा कमी आहे. हे रोग सुरुवातीला लक्षणे दाखवत नाहीत. पण वेळीच शोधले नाहीत तर लिव्हर फेल होऊ शकते. हे रोग अनुवांशिक असतात, असेही संशोधनात म्हटलंय. 

इतर रोगांचे नाते

रक्तगट O नसणाऱ्यांमध्ये वॉन विलिब्रँड फॅक्टर म्हणजेच एक रक्त गोठवण्याचा घटक जास्त असतो. यामुळे यकृतातील रक्तप्रवाहावर हलका परिणाम होऊ शकतो, पण हा मोठा धोका नाही. रक्तगट A असणाऱ्यांना ऑटोइम्यून हल्ल्याचा धोका जास्त असल्याने, त्यांचे यकृत अधिक संवेदनशील असते. वैज्ञानिकांनी वर्षानुवर्षे रक्तगट आणि इतर रोगांचे नाते शोधले आहे, आणि हा अभ्यास त्याला दुजोरा देतो.  

प्रतिबंध कसे करणार?

रक्तगट A किंवा B असणाऱ्यांनी नियमित यकृत चाचण्या कराव्यात, विशेषतः कुटुंबात यकृत रोगाची पार्श्वभूमी असेल तर नक्की चाचणी करा. सुरुवातीला शोधल्यास औषधे आणि जीवनशैली बदलांमुळे रोग नियंत्रणात येऊ शकतो. अभ्यासानुसार, अनुवांशिक घटक समजून घेतल्यास भविष्यात प्रतिबंधक योजना तयार करता येतील. या रोगाच प्रमाण कमी असले तरी, वेळीच उपचार न केल्यास यकृत कर्करोग किंवा अपयश होऊ शकते. डॉक्टरांना रक्तगटाची माहिती देऊन तपासणी करणे महत्त्वाचे असल्याचे संशोधनात म्हटलंय.

अभ्यासाचे महत्त्व 

रक्तगटाच्या आधारे जोखीम ओळखण्यास मदत करत असल्याने हा अभ्यास क्रांतिकारी आहे. ऑटोइम्यून रोग अंडरडायग्नोज्ड असतात, म्हणजे बरेचदा उशिरा सापडतात. वैज्ञानिक आता आणखी मोठ्या अभ्यास करत आहेत ज्यात जीन आणि पर्यावरणीय घटकांचा समावेश असेल. रक्तगट A असणाऱ्यांनी सतर्क राहावे आणि वार्षिक तपासणी करावी. यामुळे दीर्घायुष्य आणि निरोगी यकृत मिळू शकते, असा सल्ला रिसर्चर देतात. 

 FAQ
 
प्रश्न: नव्या अभ्यासानुसार कोणत्या रक्तगटाच्या लोकांना यकृताच्या ऑटोइम्यून आजारांचा जास्त धोका आहे?

उत्तर: रक्तगट A असणाऱ्या व्यक्तींना ऑटोइम्यून यकृत रोगांचा (जसे AIH आणि PBC) धोका २०-३० टक्क्यांनी जास्त आहे. याउलट, रक्तगट B असणाऱ्यांना हा धोका थोडा कमी आहे.
   
प्रश्न: ऑटोइम्यून यकृत रोग म्हणजे नेमके काय असतात आणि ते का गंभीर असतात?

उत्तर: या रोगांमध्ये स्वतःची रोगप्रतिकार शक्ती चुकून यकृतावर हल्ला करते, ज्यामुळे यकृतात सूज येते आणि हळूहळू नुकसान होते. वेळीच उपचार न झाल्यास यकृत अपयश, सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग होऊ शकतो.
   
प्रश्न: रक्तगट A असणाऱ्यांनी यकृताच्या आरोग्यासाठी काय काळजी घ्यावी?

उत्तर: रक्तगट A असणाऱ्यांनी दरवर्षी यकृताच्या चाचण्या (LFT) कराव्यात, विशेषतः कुटुंबात यकृताचा आजार असेल तर. निरोगी आहार, व्यायाम आणि डॉक्टरांना आपला रक्तगट सांगून नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे; यामुळे आजार लवकर पकडला जाऊन उपचार शक्य होतात.





Source link

फलटण नगरपरिषद निवडणूक २० डिसेंबरला; प्रचारात नव्या जोमानं उतरले कार्यकर्ते

0
फलटण नगरपरिषद निवडणूक २० डिसेंबरला; प्रचारात नव्या जोमानं उतरले कार्यकर्ते

साहस टाईम्स फलटण :- :तांत्रिक कारणांमुळे फलटण नगरपरिषद निवडणूक २ डिसेंबरऐवजी २० डिसेंबर २०२५ रोजी होणार असून, मतमोजणी ३ डिसेंबरऐवजी २१ डिसेंबरला होणार आहे. निवडणुकीची तारीख पुढे ढकलली असली तरीही, अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात कोणतीही खंड पडू न देता प्रचारकार्य नव्या जोमानं सुरू ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अनिकेतराजे नाईक-निंबाळकर तसेच प्रभाग क्रमांक १२ मधील अधिकृत उमेदवार विकास वसंतराव काकडे व स्मिता शहा यांच्या प्रचारात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन पुढील रणनीती निश्चित केली.

विकास वसंतराव काकडे यांना कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले की
“अडचणी जरी निर्माण झाल्या असल्या, तरी मिळालेल्या संधीचे सोनं करण्यासाठी आपण अधिक जोमानं कामाला लागणार आहोत. निवडणुकीची तारीख पुढे गेली असली तरी ही फक्त एक मध्यांतराची वेळ आहे. या मध्यांतराचा शेवट आपण २१ तारखेला भक्कम विजयाने करणार आहोत.”

प्रचाराचे काम अखंड सुरू ठेवण्याचा निर्णय घेत कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद वाढवण्याचे, तसेच आपल्या उमेदवारांबद्दल जनतेत सकारात्मक लाट निर्माण करण्याचे ठरवले आहे.

निवडणूक पुढे ढकलल्यामुळे प्रचाराला अधिक वेळ मिळाल्याचे भांडवल न करता, संघटन अधिक मजबूत करण्यास आणि जनतेशी संपर्क वाढवण्यास हे काळ उपयुक्त ठरणार असल्याचेही कार्यकर्त्यांनी नमूद केले.

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने संविधान दिनी संविधानाचा जागर

0
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने संविधान दिनी संविधानाचा जागर

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने संविधान दिनी संविधानाचा जागर

फलटण : भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शाखेच्या आदेशानुसार देशभर राबविण्यात येत असलेल्या २५ कलमी कार्यक्रमांतर्गत “आपले संविधान – आपले अधिकार” या अभियानाचा एक भाग म्हणून फलटण तालुका शाखेच्या वतीने संविधान दिनानिमित्त भव्य जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून फलटण येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर संपूर्ण बाजारपेठेत फळ विक्रेत्यांना, दुकानदारांना, रिक्षा चालक तसेच नागरिकांना भारतीय संविधानाची प्रस्तावना (Preamble) वितरित करून संविधान जागर व जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमाचे उद्दिष्ट भारताच्या प्रत्येक नागरिकापर्यंत संविधानातील तरतुदी, हक्क आणि अधिकारांची माहिती पोहोचविणे असे स्पष्ट करण्यात आले.
या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन खालील मान्यवरांच्या आदेशाने व उपस्थितीत पार पडले आयु. महावीर भालेराव,अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका, आयु. बाबासाहेब जगताप सर, महासचिव, आयु. विठ्ठल निकाळजे सर, कोषाध्यक्ष, आयु.चंद्रकांत मोहिते, कार्यालयीन सचिव
तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ प्रवचनकार आयु. सोमीनाथ घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बौद्ध उपासक उपासिका यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.यावेळी विशेष उपस्थिती जेष्ठ साहित्यिक तानाजी जगताप, सामाजिक कार्यकर्ते हरीश काकडे उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून “भारतीय संविधान हा प्रत्येक नागरिकाचा अभिमान, समानता व न्याय देणारा जगातील सर्वोत्तम संविधान आहे” असा संदेश देत संविधान मूल्यांवरील बांधिलकी दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले. संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या या प्रशंसनीय उपक्रमाबद्दल भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व उपासक–उपासिका यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

कालकथित दयानंद अण्णा मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण उपक्रम

0
कालकथित दयानंद अण्णा मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण उपक्रम


फलटण : भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते तालुका शाखेचे प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष व समाजनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले आयु. रामचंद्र जगन्नाथ मोरे यांचे चुलते कालकथित दयानंद अण्णा मोरे, रा. समतानगर, विडणी यांचे दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आकस्मिक निधन झाले. दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी अत्यंत भावपूर्ण वातावरणात अस्थी संकलन व पुण्यनोमोदन कार्यक्रम पार पडला. कुटुंबीय, नातेवाईक, बांधव व मान्यवरांच्या उपस्थितीत कालकथित दयानंद अण्णा मोरे यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली.

निसर्ग व पर्यावरण रक्षणाचा विचार अंगीकरून प्रदूषण टाळण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांचा पर्यावरण रक्षणाचा विचार अंगीकारून कालकथित दयानंद अण्णा मोरे यांच्या अस्थीचे विसर्जन पाण्यामध्ये न करता त्या अस्थी एका खड्ड्यांमध्ये अर्पण करून त्यावरती आम्रवृक्षाचे रोप कुटुंबीयांच्या वतीने लावून पर्यावरण रक्षणाचा आदर्श इतरांपुढे ठेवला आहे.

तालुका शाखेचे संस्कार सचिव आ. अमोल भोसले यांनी आपल्या मनोगतातून अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले. ते म्हणाले “तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या बौद्ध धम्मातील तत्त्वांचा विचार अंगीकारल्याशिवाय आपले जीवन परिपूर्ण, शांत आणि कल्याणकारी होऊ शकत नाही.”भोसले यांनी पुढे स्पष्ट केले की धम्म हा फक्त वाचनाचा किंवा ऐकण्याचा विषय नसून तो प्रत्यक्ष जीवनात आचरला पाहिजे.
प्रत्येकाने स्वतःमध्ये खालील मूल्ये विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत प्रज्ञा, करुणा, मैत्रीभाव, अहिंसा, समता त्यांनी आवाहन करताना ठामपणे सांगितले “धम्म आपल्या वर्तनात, बोलण्यात आणि विचारांत दिसला पाहिजे. बुद्धांच्या तत्त्वांवर चाललो तरच समाजात परिवर्तन घडेल आणि खरा कल्याणमार्ग उजळेल.”प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून कुटुंबात, समाजात आणि कार्यक्षेत्रात धम्म आचरणाचा दीप प्रज्वलित करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.शेवटी त्यांनी सर्व उपस्थितांना बुद्ध, धम्म आणि संघाच्या मार्गावर दृढ राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात ज्येष्ठ प्रवचनकार आ. सोमीनाथ घोरपडे यांनी अत्यंत मार्मिक व तत्त्वज्ञानिक प्रवचन दिले.आपल्या प्रभावी शैलीत बोलताना त्यांनी चार आर्य सत्य व बौद्ध धम्मातील पंचस्कंध यावर विस्तृत भाष्य केले.त्यांनी स्पष्ट केले की, दुःख आहे, दुःखसमुदय (दुःखाची कारणे आहेत), दुःखनिरोध (दुःख संपवणे शक्य आहे), दुःखनिरोध गामिनी प्रतिपदा (दुःखमुक्तीचा मार्ग आहे) हीच चार आर्य सत्ये मानवजातीच्या कल्याणाचा आधार आहेत.
पंचस्कंधांविषयी त्यांनी सांगितले की रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान यांचा आसक्तीमुक्त विवेकपूर्वक विचार केल्यावरच खरे समाधान आणि समरस जीवन शक्य होते.प्रवचनादरम्यान त्यांनी किसा गौतमी यांची जीवन कहाणी सांगत अत्यंत हृदयस्पर्शी उदाहरण दिले.आपल्या दुःखात हरवलेल्या मातेला बुद्धांनी अनित्यतेचा संदेश देत
“मृत्यू अपरिहार्य आहे. स्वीकार आणि समजुतीतूनच शांती प्राप्त होते”हा जीवनमूल्यांचा संदेश दिला, यावर त्यांनी सखोल प्रकाश टाकला. घोरपडे सरांनी शेवटी आवाहन केले “दुःखापासून पळून न जाता धम्माला आचरणात आणले तरच दुःखमुक्ती शक्य आहे. धम्म हा श्रद्धा नव्हे तर अनुभव, आचरण आणि जाणीव आहे.”उपस्थित सर्वांनी अत्यंत मनोभावे आणि ध्यानपूर्वक प्रवचन ऐकले.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सचिव आयु बाबासाहेब जगताप यांनी उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला.मोरे कुटुंबीयांच्या कृतिशील कार्याचे कौतुक करत त्यांनी सांगितले “समाजासाठी दिलेल्या योगदानाच्या दृष्टीने मोरे कुटुंब आदर्श ठरत आहे. अशा कुटुंबांकडून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने समाजहितासाठी सतत योगदान देण्याचा संकल्प करावा.”जगताप सरांनी पुढे समाजातील चुकीच्या धारणा आणि अंधानुकरणावर भाष्य करत सांगितले “समाज अंधश्रद्धांच्या गर्तेतून बाहेर आला पाहिजे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला बौद्ध धम्मच विवेक, प्रज्ञा आणि सत्याचा मार्ग दाखवतो. विचार, वर्तन आणि दैनंदिन आचरण हे धम्मावर आधारित झाले पाहिजे. तेव्हाच खरा बदल घडेल.”यावेळी त्यांनी सर्व उपस्थितांना दृढ आवाहन केले की विवेकशीलपणा अंगीकारा, समतावादी आचरण जोपासा, विज्ञाननिष्ठ आणि धम्मनिष्ठ जीवन पद्धती स्वीकारा“बुद्धांच्या तत्त्वांवर चालणे ही केवळ परंपरा नाही. ती प्रगती, शांतता आणि मानवतावादाकडे जाणारी वाट आहे,” असा ठाम संदेश देत त्यांनी उपस्थितांना धम्माचरणाची प्रेरणा दिली.

कार्यक्रमात अस्थि संकलन व पुण्यनुमोदन विधी अत्यंत शिस्तबद्ध व धम्मपरंपरेनुसार पार पडले.
या विधीचे संचलन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे अध्यक्ष आ. महावीर भालेराव यांनी केले.
विधी दरम्यान त्यांनी उपस्थितांना धम्मपदेश देत सांगितले की “जीवन हा अनित्यतेचा प्रवाह आहे. जन्म-जरा-व्याधी-मरण या सत्यांना समजून घेतल्यावरच प्रज्ञा आणि समत्व प्राप्त होते. विरहातही धम्म स्मरण आणि कृतज्ञता हीच खऱ्या पुण्यनुमोदनेची भावना आहे.”भालेराव सरांनी पुढे स्पष्ट केले की दुःखाचे कारण अज्ञान व आसक्तीत आहे, जागरूकता, प्रज्ञा आणि करुणा हेच धम्माचे मूळ, जीवनाचं मूल्य धम्माचरणातूनच अधिक उजळतं. ते म्हणाले “मृत्यू हा शेवट नसून, अनित्यतेच्या सत्याला स्वीकारत धम्ममार्गावर दृढ राहण्याची आठवण आहे. कालकथितांच्या स्मृतींना सर्वोत्तम आदरांजली म्हणजे सद्गुणांचा स्वीकार होय. अंत:करण भरून टाकणाऱ्या या धम्मपदेशाने उपस्थितांना शांततेचा, दुःखमुक्तीचा आणि धम्मनिष्ठ आचरणाचा संदेश दिला.
कालकथित दयानंद अण्णा मोरें च्या समाजकार्य, माणुसकीची भूमिका आणि पर्यावरणप्रेमाचा सन्मान ठेवत आज समता नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.समाजातील पुढील पिढ्यांना हरित वारसा मिळावा आणि पर्यावरण संवर्धनाचे भान दृढ व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी कालकथित दयानंद अण्णा मोरें च्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या लोकसंग्रह वृत्ती, सामाजिक बांधिलकी आणि निसर्गप्रेमाला कृतज्ञ अभिवादन केले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालयीन सचिव आयु.चंद्रकांत मोहिते, संघटक आयु.विजयकुमार जगताप, तालुका शाखेच्या संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आयु.बजरंग गायकवाड, तालुका शाखेचे प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु.रामचंद्र जगन्नाथ मोरे,
कुटुंबातील सदस्य दर्शना रोनीत वाघमारे(मुलगी), आयु.नरेंद्र दयानंद मोरे(मुलगा), मयुरी नरेंद्र मोरे (सुनबाई), दीपेश दयानंद मोरे(मुलगा), चिराग दयानंद मोरे(मुलगा), सविता दयानंद मोरे (पत्नी), समता नगर येथील बौद्ध उपासक उपासिका, ग्रामस्थ, मोरे कुटुंबातील सर्व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावधान! तुमच्या मुलांना श्वसनाच्या संसर्गांपासून दूर ठेवा, नाहीतर वाढत्या वयात होऊ शकतो अस्थमाचा धोका

0
सावधान! तुमच्या मुलांना श्वसनाच्या संसर्गांपासून दूर ठेवा, नाहीतर वाढत्या वयात होऊ शकतो अस्थमाचा धोका


Childhood Respiratory Infection Can Lead To Asthma Risk: लहान वयात वारंवार होणारे श्वसनाचे संसर्ग (Respiratory Infections) हे भविष्यात अस्थमाचा धोका दुप्पट करतात, असे एका संशोधनातून समोर आले आहे. 5 वर्षांखालील मुलांना आरएसव्ही (Respiratory Syncytial Virus), इन्फ्लुएंझा किंवा न्यूमोनियासारखे गंभीर श्वसनाचे संसर्ग झाल्यास ते धोकादायक ठरू शकते. कारण अशा मुलांना मोठेपणी अस्थमा होण्याची शक्यता असते. काळजी करण्याचे कारण म्हणजे ही शक्यता पूर्ण 100 टक्क्यांपर्यंत असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

Add Zee News as a Preferred Source

 

आरएसव्ही (Respiratory Syncytial Virus) हा एक अत्यंत सामान्य पण लहान मुलांसाठी खूप धोकादायक श्वसनाचा व्हायरस आहे. जगात जवळजवळ प्रत्येक मूल दोन वर्षांचे होईपर्यंत त्याला किमान एकदा तरी याची बाधा होते. विशेषतः 6 महिन्यांखालील आणि अकाली जन्मलेल्या बाळांना याचा सर्वांत जास्त धोका असतो. या व्हायरसची सुरूवात सर्दी, नाक वाहणे, खोकला, ताप या समस्यांनी होते आणि नंतर घरघर, श्वास घेण्यास त्रास, छातीत आवाज येऊन गंभीर स्वरूपात न्यूमोनिया किंवा ब्रॉन्किओलाइटिस होण्याची शक्यता असते. खोकताना,शिंकताना हवेतून किंवा खेळण्यांद्वारे हा व्हायरस सहज पसरतो.

 

संशोधनादरम्यान 1 लाखाहून अधिक मुलांचा 30 वर्षांपर्यंतचा डेटा तपासला गेला. त्यात असे आढळले की, ज्या मुलांना 1 ते 5 वर्षांच्या दरम्यान गंभीर श्वसनाचा संसर्ग झाला, त्यापैकी 25 टक्के मुलांना 18 वर्षांपर्यंत अस्थमा झाला. तर सामान्य मुलांमध्ये हे प्रमाण फक्त 10 ते 12 टक्के होते. विशेषतः आरएसव्ही हा व्हायरस सर्वांत धोकादायक असल्याचे समोर आले. हिवाळ्यात थंडी आणि बंदिस्त वातावरणामुळे याचे प्रमाण खूप वाढते. या व्हायरसची गंभीर बाधा झाल्यास फुफ्फुसांच्या छोट्या नलिका कायमच्या कमकुवत होऊन भविष्यात अस्थमाचा धोका दुप्पट होण्याची शक्यता असते.

 

सध्याच्या काळात भारतात 6 महिन्यांखालील बाळांसाठी निर्सेविमाब नावाची एकच लस उपलब्ध आहे, जी पूर्ण हिवाळी हंगामासाठी संरक्षण देते. डॉक्टरांच्या मते, लहानपणी झालेल्या संसर्गामुळे फुफ्फुसांच्या नलिका कमकुवत होतात आणि त्यांची रचना कायमची बदलते. त्यामुळे वाढत्या वयात शरीर जास्त संवेदनशील बनते आणि धूळ, धूर किंवा वातावरणातून पसरणारा संसर्ग होण्याची शक्यता वाढते; यामुळे अस्थमाचा झटका येऊ शकतो. म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला आहे की, लहान मुलांना सर्दी-खोकला झाला तर दुर्लक्ष न करता त्वरीत तपासणी करा आणि तुमच्या मुलांना वेळेवर लस द्या.

 

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

हिवाळ्यात सर्वांनी ‘या’ एका फळाचे सेवन नक्कीच केले पाहिजे, रोगप्रतिकारशक्ती वाढेलच हृदयाचे आरोग्यही सुधारेल

0
हिवाळ्यात सर्वांनी ‘या’ एका फळाचे सेवन नक्कीच केले पाहिजे, रोगप्रतिकारशक्ती वाढेलच हृदयाचे आरोग्यही सुधारेल


Pomegranate for Winter Health: हिवाळ्यात आपल्या शरीरात ऊर्जेची कमतरता भासत असते. रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते. अशात हवेतील आर्द्रता आणि थंडाव्यामुळे सर्दी-खोकला, ताप तसेच पोटाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. काहीवेळा योग्य वेळी उपचार न केल्यास या समस्या गंभीर स्वरूप घेऊ शकतात. यावर उपाय म्हणून हंगामी फळांचे सेवन करणे कधीही फायदेशीर ठरते. प्रत्येक ऋतूमध्ये येणाऱ्या फळांचे काही औषधी गुणधर्म असतात. डॉक्टर सुद्धा हंगामी फळांचे सेवन करण्याचा सल्ला देत असतात. हिवाळ्यात संत्र्याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, हिवाळ्यात येणाऱ्या या एका फळात संत्र्यापेक्षाही जास्त प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. ते फळ म्हणजे डाळींब.

Add Zee News as a Preferred Source

 

डाळिंबाचे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदे:

डाळिंबात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, के, फॉलिक ॲसिड, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. थंडीत रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते, पण डाळिंबातील व्हिटॅमिन सी सर्दी-खोकला, संसर्गापासून संरक्षण करते. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. यामध्ये पुनिकॅलॅजिन नावाचे खास अँटिऑक्सिडंट असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, अशावेळी डाळिंब रक्तदाब नियंत्रणात ठेवते आणि कोलेस्ट्रॉल कमी करते. संशोधनानुसार रोज 100 मिली डाळिंबाचा रस प्यायल्याने हृदयविकाराचा धोका 30 टक्क्यांनी कमी होतो.

 

डाळिंबामधील कॅन्सरविरोधी गुणधर्म:

डाळिंबामध्ये नैसर्गिक फ्रूटोज आणि ग्लुकोज असल्यामुळे ते नैसर्गिकरित्या ऊर्जा प्रदान करण्याचे काम करते. त्यामुळे तुम्हाला सतत थकवा येणे, अशक्तपणा येणे अशा समस्या असल्यास डाळिंबाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. तसेच थंडीत पचनसंस्था मंदावते, बद्धकोष्ठता होते. डाळिंबातील फायबर आणि पाणी आतड्यांना सक्रिय ठेवते. डाळिंबाच्या सालीची पूड किंवा दाणे चावून खाल्ल्याने अपचन, गॅसची समस्या दूर होते. डाळिंबामध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्मही आहेत. त्यातील एलॅजिक ॲसिड आणि पॉलीफेनॉल्स ब्रेस्ट, प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींची वाढ थांबवतात.

 

डाळिंबाचे त्वचेसाठी फायदे:

एवढेच काय तर डाळिंबाचे सेवन त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. एका मध्यम आकाराच्या डाळिंबामध्ये एका संत्र्यापेक्षा दुप्पट व्हिटॅमिन सी असते. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, पण डाळिंबातील अँटिऑक्सिडंट्स आणि पाण्याचे प्रमाण त्वचेला हायड्रेट ठेवते आणि चमकदार बनवते.

 

असे करा डाळिंबाचे सेवन:

तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात रोज एक डाळिंब किंवा एक ग्लास डाळिंबाचा रस पिणे आरोग्यादायी मानले जाते. लहान मुले ते वृद्धांपर्यंत सर्वांनी नाश्त्यात किंवा जेवणानंतर 1/2 वाटी एवढ्या डाळिंबाच्या दाण्याचे सेवन केले पाहिजे.

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

मोठी बातमी: बारामती अन् फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीला ब्रेक, आता मतदान कधी होणार?

0



Nagarparishad Election: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आज दुपारी पाच वाजता या निवडणुकांसाठीचा प्रचार संपुष्टात येईल. त्यानंतर मंगळवारी  मतदानाची प्रक्रिया पार पडेल. मात्र, त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषेदची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. आता फलटण आणि महाबळेश्वर येथील मतदानप्रक्रिया अनुक्रमे 20 आणि 21 डिसेंबर रोजी पार पडेल. जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रियेबाबत  याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी घेतला आहे.

बारामती नगरपरिषदेत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत होती. मात्र, ही प्रक्रिया पावणेतीन वाजताच बंद झाली होती. याशिवाय, उमेदवारी अर्ज भरतानाच्या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या, यावर काहीजणांनी आक्षेप घेतला होता. न्यायालयाने भाजपच्या दोन उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपल्यानंतरही अर्ज भरण्याचे निर्देश दिले होते. तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरील आरोपाबाबतही न्यायालयीन निर्णय प्रलंबित असल्याने निवडणूक आयोगाने वाद टाळण्यासाठी येथील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

महाबळेश्वर आणि फलटणनंतर बारामतीची निवडणूक देखील पुढे गेली आहे. निवडणूक आयोगाने तसे अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. बारामतीमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सात प्रभागातील उमेदवारांविरोधात बारामतीच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेचा निकाल सत्र न्यायालयाने दिला. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. मात्र, नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहेत. त्याची अपिलाची मुदत संपली नसल्याने ही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार बारामतीतील नगराध्यक्षांच्या निवडणुकीसह काही प्रभागातील सात जागांचा विचार करून ही निवडणूक प्रक्रिया आता 20 डिसेंबर रोज पर्यंत पुढे ढकलली आहे. साहजिकच नगराध्यक्षपदाचाही यामध्ये समावेश असल्याने बारामतीचे नगरपरिषदेचे मतदान थेट 20 डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासह ज्या सात जागांसाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

या नव्या प्रक्रियेनुसार 4 डिसेंबर रोजी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम मुदत 10 डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह देण्याचा व अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी 11 डिसेंबर 2025 रोजी जारी केली जाणार असून 20 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत मतदान होणार आहे. 21 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल होणार आहे. नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही.

Yavatmal Nagarparishad Election: यवतमाळ नगरपरिषद निवडणुकही पुढे ढकलली?

यवतमाळमधील  दिग्रस पांढरकवडा आणि वनी येथील काही प्रभागांची ही निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत. याबाबत अद्याप निवडणूक आयोगाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ज्या ठिकाणी तांत्रिक चुका झाल्या तेथे निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगानं नव्याने कार्यक्रम दिला असून आता निवडणुक 20 डिसेंबरला होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्यामागे न्यायालयीन कारण असल्याचे समोर आले आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Local Bodies Election : नगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी सुमारे 13 हजार 355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनचा व्यवस्था करण्यात आली असून त्यात 13 हजार 726 कंट्रोल युनिट आणि 27 हजार 452 बॅलेट युनिटची उपलब्धता करण्यात आली आहे.

राज्यातील 246 नगरपरिषदा तर 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 2 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. तर मतमोजणी 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे.

आणखी वाचा

“नगरपरिषद निवडणूक माझ्यासाठी महत्त्वाची, गडबड करु नका”; काहीजण मला संपवायच्या मागे लागलेत, धनंजय मुंडेंची परळीकरांना आर्त साद

आणखी वाचा



Source link

फलटण-महाबळेश्वर  नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर, 20 डिसेंबरला होणार मतदान; आयोगाचा आदेश जारी

0



सातारा:  सातारा (Satara) जिल्ह्यातील महत्वाच्या दोन नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात (nagarparishad elections) मोठी अपडेट समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. या दोन्ही नगर परिषदेच्या निवडणुका (Nagar Parishad Election) आता 20 आणि 21 डिसेंबरला होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया लांबीवर पडण्यामागचे न्यायालयीन कारण असल्याचे समोर आले आहे. 

नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अंतिम दिनांक 10 डिसेंबर दुपारी तीन पर्यंत असणार 

दरम्यान, जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रिया बाबत  याचिका दाखल करण्यात आली होती, त्यामुळं जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी 8 दिवसांचा कालावधी घेतला आहे. 4 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक जारी करण्याची तारीख देण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अंतिम दिनांक 10 डिसेंबर दुपारी तीन पर्यंत असणार आहे. चिन्ह नेमून देण्यासाठी आणि अंतिम रित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची दिनांक 11 डिसेंबर 2025 असणार आहे. मतदान प्रक्रिया 20 डिसेंबर 2025 सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत असणार आहे. मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. 

अनिकेतराजे नाईक निंबाळकर फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक शिवसेनेकडून लढवणार आहेत. त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ऐनवेळी त्यांच्या भावाला नगराध्यपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळं फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. 

2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 3 डिसेंबरला निकाल लागणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांचा प्रचार सुरु केला आहे. काही ठिकाणी महायुती झाली आहे तर काही ठिकाणी महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. दरम्यान, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

 

महत्वाच्या बातम्या:

बिहारसारखं यश, नगरपालिकेला 200 पेक्षा जास्त जागांवर भाजपचे नगराध्यक्ष जिंकतील; चंद्रकांत पाटलांना विश्वास

आणखी वाचा



Source link

दिवसातून किती वेळा लघवी होणे सामान्य? मूत्ररोगतज्ज्ञांनी सांगितली डॉक्टरांकडे जाण्याची योग्य वेळ!

0
दिवसातून किती वेळा लघवी होणे सामान्य? मूत्ररोगतज्ज्ञांनी सांगितली डॉक्टरांकडे जाण्याची योग्य वेळ!


Urologists Tips: मूत्रपिंड रक्तातील शरीरातील कचरा फिल्टर करतात आणि मूत्राच्या स्वरूपात शरीरातून बाहेर टाकतात. म्हणूनच, तुम्ही किती वेळा लघवी करता हे तुमच्या आरोग्याचे एक महत्त्वाचे सूचक असते. काही लोक रात्री अनेक वेळा शौचालयात जाण्यासाठी उठतात, तर काही लोक दिवसभर ऑफिसमध्ये बसूनही फक्त एकदाच जातात. ही सवय सामान्यपेक्षा जास्त किंवा कमी असेल तर ती शरीरात बदल किंवा आजाराचे लक्षण असू शकते, असे डॉक्टर सांगतात. मग हे नेमकं प्रमाण किती असतं? याबद्दल न्यू व्हिक्टोरिया हॉस्पिटलमधील कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट डॉ. हमीद अबौदी यांनी माहिती दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

लहान मुले (3-12 वर्षे):

दिवसातून 6 ते 14 वेळा लघवी होणे अगदी सामान्य आहे. मुले मोठी होत गेल्यावर ही संख्या 6-12 पर्यंत कमी होते. यापेक्षा जास्त वेळा जात असतील तर जास्त कोल्ड्रिंक, बद्धकोष्ठता किंवा ऍलर्जी असू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. 

किशोरवयीन मुले (13-19 वर्षे):

दिवसातून फक्त 4 ते 6 वेळाच लघवी होणे हे सामान्य आहे. हार्मोन्समुळे काही काळ जास्त वेळा होऊ शकते, पण ते आपोआप बरे होते. जर बराच काळ जास्त वेळा होत राहिली तर मधुमेह किंवा मूत्रमार्गाचे इन्फेक्शन (UTI) असू शकते, असे डॉक्टर सांगतात. 

प्रौढ (60 वर्षांखालील):

सामान्यपणे दिवसातून 5 ते 8 वेळा आणि रात्री फक्त एकदाच लघवीला जाणे हे बरोबर आहे. स्त्रियांना पुरुषांपेक्षा थोडे जास्त वेळा जाते कारण गर्भावस्थेत बाळाचा दाब पडतो आणि UTIही जास्त होतात. कॉफी, चहा, कोल्ड्रिंक, दारू यामुळेही जास्त वेळा लघवी येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक (60 वर्षांवरील):

वय वाढले की मूत्राशय आणि किडनी कमजोर होतात. त्यामुळे दिवसातून 7-8 वेळा आणि रात्री 2 वेळा लघवीला उठणे सामान्य आहे. पुरुषांना प्रोस्टेट वाढल्यामुळे आणि स्त्रियांना हार्मोन्स कमी झाल्यामुळे जास्त त्रास होतो. बऱ्याचदा घेत असलेली औषधेही लघवी वाढवतात.

कधी डॉक्टरांकडे जायचे?

जर तुम्हाला नेहमीपेक्षा खूप जास्त किंवा खूप कमी वेळा लघवी येत असेल, लघवी करताना जळजळ, दुखणे, रक्त पडणे किंवा रात्री 2-3 पेक्षा जास्त वेळा उठावे लागत असेल तर लगेच मूत्ररोगतज्ज्ञांना भेटा. हे मधुमेह, प्रोस्टेटची समस्या, कर्करोग किंवा इन्फेक्शनचे लक्षण असू शकते, असे डॉक्टर सांगतात.

FAQ

प्रौढ माणसाने दिवसातून किती वेळा लघवीला जाणे सामान्य आहे?

उत्तर: ६० वर्षांखालील प्रौढांसाठी दिवसातून ५ ते ८ वेळा आणि रात्री फक्त एकदाच लघवीला जाणे अगदी सामान्य आहे. स्त्रियांना थोडे जास्त वेळा जाऊ शकते, विशेषतः गर्भावस्थेत किंवा UTI असल्यास.

६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना किती वेळा लघवी येणे ठीक समजावे?

उत्तर: वयस्क लोकांना दिवसातून ७-८ वेळा आणि रात्री २ वेळा लघवीला उठणे सामान्य आहे. याचे कारण मूत्राशय कमजोर होणे, प्रोस्टेट वाढणे (पुरुषांमध्ये) आणि काही औषधांचा परिणाम असतो.

लघवी खूप जास्त किंवा खूप कमी वेळा येत असेल तर कधी डॉक्टरांना भेटावे?

उत्तर: जर नेहमीपेक्षा खूप जास्त वेळा (उदा. दिवसातून १० पेक्षा जास्त) किंवा खूप कमी वेळा लघवी येत असेल, लघवी करताना जळजळ-दुखणे असेल, रक्त पडत असेल किंवा रात्री २-३ पेक्षा जास्त वेळा उठावे लागत असेल तर लगेच मूत्ररोगतज्ज्ञांना (यूरोलॉजिस्ट) दाखवावे. हे मधुमेह, इन्फेक्शन, प्रोस्टेटची समस्या किंवा गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.





Source link