Saturday, July 4, 2026
Home Blog Page 92

फलटण तालुक्यातील आसू येथे जातीय हल्ला; आरोपीवर गुन्हा, तरीही आरोपीला अटक नाही ,पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षणाची मागणी

0
फलटण तालुक्यातील आसू येथे जातीय हल्ला; आरोपीवर गुन्हा, तरीही आरोपीला अटक नाही ,पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षणाची मागणी

फलटण, जि. सातारा (02 डिसेंबर 2025): फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या घटनेत आरोपी राजन दिनकर फराटे यांनी फिर्यादी रमा नंदकुमार पवार आणि तिच्या पतीवर शारीरिक हल्ला केला, अशी तक्रार पीडितांनी केली आहे. पीडितांनी आरोपीच्या तात्काळ अटकेची मागणी केली आहे तसेच त्यांच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्याची विनंती केली आहे.

घटनेनुसार, दि. 30/11/2025 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास, फिर्यादी आणि तिचे पती आसु बाजूकडून बारामतीकडे जात असताना आरोपीच्या मालकीची चारचाकी गाडी MH 42 CS 4545 ने त्यांना अडथळा आणला. आरोपीने गाडी भरधाव वेगाने चालवून फिर्यादीचे पती आणि फिर्यादीवर हाताने मारहाण केली. मारहाणीत फिर्यादीच्या गळ्याच्या डाव्या बाजूला आरोपीचे नख लागल्याचे नमूद केले आहे. दोघांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत.

फिर्यादींच्या मते, आरोपीने जातीय अपशब्द वापरून धमकावले आणि पीडित कुटुंबावर दबाव आणला. आरोपी धनवान असून राजकीय प्रभाव असल्याचेही नमूद केले गेले आहे. घटनेची सुरुवात शुल्लक कारणावरुन झाली असून आरोपीला फिर्यादींची जात माहित होती.

या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 तसेच भारतीय दंड संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तथापि, अद्याप आरोपीवर अटक झालेली नाही.

पीडित कुटुंबाला सुरक्षितता आणि समाजातील न्याय सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • मा. जिल्हाधिकारी सो सातारा
  • मा. जिल्हा पोलिस अधिक्षक सो सातारा
  • मा. आयुक्त समाज कल्याण सो सातारा
  • मा. नोडल ऑफिसर सो सातारा
  • मा. उपविभागीय पोलिस अधिकारी सो फलटण
  • मा. पोलिस निरीक्षक सो फलटण ग्रामीण पोलिस ठाणे
  • मा. तहसिलदार सो फलटण

नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, इसमाची गेली स्मृती; काय घडलंय नेमकं?

0
नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, इसमाची गेली स्मृती; काय घडलंय नेमकं?


Vitamin B12 deficiency: ठाण्यात एका इसमाला स्मृतीभ्रषांचा त्रास सुरु झाला. त्याच्या एमआरआय स्कॅन करण्यात आले. यात मेंदू छोटा झाल्याचे दिसले. ज्यामुळे सुरुवातीला डिमेंशिया समजले गेले. पण खरे कारण व्हिटॅमिन बी 12 ची तीव्र कमतरता होती. ज्यामुळे मज्जातंतूंचे संकेत बिघडतात. ही समस्या वेळीच ओळखली तर पूर्ण बरे होऊ शकते, अन्यथा कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, असे डॉक्टर सांगतात.

Add Zee News as a Preferred Source

शाकाहारी लोकांमध्ये ही कमतरता का येते?

शाकाहारी लोकांमध्ये काही लोक कठोर शाकाहारी असतात. ते धार्मिक कारणांसाठी प्राण्यांच्या उत्पादनांपासून पूर्णपणे दूर राहतात. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता सामान्य आहे. ही व्हिटॅमिन प्रामुख्याने मांस, मासे, अंडी आणि दूध यांसारख्या प्राण्यांच्या पदार्थांमध्ये आढळते. शाकाहारी आहारात ती नैसर्गिकरित्या मिळत नाही. 

भारतात लाखो लोक शाकाहारी असल्याने ही समस्या मोठी आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासानुसार, शाकाहारी महिलांमध्ये 60% आणि पुरुषांमध्ये 40% लोकांना ही कमतरता असते. याची लक्षणे हळूहळू सुरू होतात. सुरुवातीला थकवा जाणवतो. वेळीच तपासणी केली नाही तर मेंदू आणि मज्जातंतूंना कायमस्वरूपी इजा होते. शाकाहारी लोकांना नियमित तपासणी करावी, असा सल्ला डॉक्टर देतात. 

निदान कसे होते?

स्मरणशक्ती हरवणे, कुटुंबातील सदस्य ओळख न पटणे, रस्ते भूलणे यांसारखे त्रास झाले. सुरुवातीला त्याला प्राथमिक डिमेंशिया समजले गेले. एमआरआय स्कॅनमध्ये मेंदूतील बदल दिसले, ज्यामुळे कुटुंब चिंतेत होते. पण रक्त तपासणीत व्हिटॅमिन बी12 चे प्रमाण खूप कमी म्हणजे 203 पिगी/मिलीपासून खाली असल्याचे आढळले. 

निदानासाठी पूर्ण रक्त तपासणी, सीरम व्हिटॅमिन बी12 पातळी, फोलेट, रक्त चित्रण आणि होमोसिस्टीन पातळी तपासली जाते. ही कमतरता मज्जातंतूंच्या आवरणाला (मायेलिन) इजा करते, ज्यामुळे डिमेंशियासारखी लक्षणे दिसतात. हे ओळखणे सोपे नसते. कारण लक्षणे इतर आजारांसारखी वाटतात. डॉक्टरांना वेळीच शंका असली तर रक्त चाचण्या करून हे सिद्ध करता येते. 

काय सावधगिरी बाळगाल?

सुरुवातीला व्हिटॅमिन बी12 चे इंजेक्शन दिले जातात, ज्यामुळे आठवड्यांत लक्षणे कमी होतात. पातळी जास्त असल्यास शाकाहारी लोकांसाठी गोळ्या दिल्या जातात. रुग्णाच्या केस मध्ये उपचारानंतर स्मरणशक्ती आणि विचारक्षमता सुधारली. उपचाराने मेंदूचे बदलही उलटू शकतात. शाकाहारी लोकांनी आहारात दूध किंवा सोयाबीन असे कृत्रिमरीत्या बी12 युक्त पदार्थ  घ्यावेत. दरवर्षी रक्त तपासणी करणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टर देतात. गर्भवती महिलांना आणि वृद्धांना याचा जास्त धोका असतो,असेही डॉक्टर सांगतात. 

प्रतिबंध कसा करायचा?

व्हिटॅमिन बी12 कमतरता ही डिमेंशिया नव्हे, तर उपचारयोग्य समस्या आहे. शाकाहारी लाईफस्टाइल सुंदर आहे पण पोषक द्रव्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित तपासणी, संतुलित आहार यामुळे ही समस्या टाळता येते असे डॉक्टर सांगतात. 

(Disclaimer – येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)

FAQ 

प्रश्न: डिमेंशियासारखी लक्षणे दिसत आहेत, पण मी फक्त ४०-५० वर्षांचा आहे. तरीही मला डिमेंशिया झाला असण्याची शक्यता आहे का?

उत्तर: नाही. तरुण वयात डिमेंशियासारखी लक्षणे दिसली तर प्रथम व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता तपासावी. ही कमतरता मेंदूला आणि मज्जातंतूंना तात्पुरती इजा करते, ज्यामुळे स्मरणशक्ती जाऊ शकते, रस्ते भूलू शकतात आणि लोक ओळख पटेनासे होतात. पण ही खरी डिमेंशिया नसते; उपचाराने १००% बरे होते.

प्रश्न: मी पूर्ण शाकाहारी आहे आणि धार्मिक कारणाने दूध-दहीही खात नाही. मला व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता होऊ शकते का?

उत्तर: होय, खूप जास्त शक्यता आहे. व्हिटॅमिन बी१२ फक्त प्राण्यांच्या पदार्थांमध्ये (मांस, मासे, अंडी, दूध) नैसर्गिकरित्या आढळते. जे लोक दूध-दहीही घेत नाहीत, त्यांच्यात ही कमतरता ७०-८०% पर्यंत आढळते. त्यामुळे दरवर्षी रक्त तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने बी१२ ची गोळी किंवा इंजेक्शन घेणे आवश्यक आहे.

प्रश्न: व्हिटॅमिन बी१२ कमी असल्याचे कसे कळेल आणि उपचार किती दिवसांत गुण येतो?

उत्तर: साध्या रक्त चाचणीत (Serum Vitamin B12 level) लगेच कळते. सामान्य पातळी २००–९०० pg/mL असते; २०० पेक्षा कमी असल्यास कमतरता असते. उपचाराला सुरुवात केल्यानंतर पहिल्या आठवड्यात थकवा, चक्कर कमी होते आणि १-३ महिन्यांत स्मरणशक्ती पूर्णपणे परत येते. लवकर उपचार केला तर मेंदूचे नुकसान पूर्णपणे उलटते.





Source link

कराडमध्ये नाशिकच्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचा भीषण अपघात, गाडी 20 फूट खाली कोसळली, 20 जखम

0



Karad Satara Accident News : पुणे–बेंगळुरू महामार्गावर साताऱ्यातील कराडजवळ वाठार गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील लेट बी. पी. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, पिंपळगाव बसवंत या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सहलीची बस तब्बल 20 फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये 40 ते 45 विद्यार्थी आणि शिक्षक होते.

पाच विद्यार्थी गंभीर जखमी….

अपघाताचा आवाज होताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी थरारक प्रयत्न करण्यात आले. दुर्घटनेत पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून पंधरापेक्षा अधिक विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना तत्काळ कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट…

घटनास्थळी कराड पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले असून अपघाताचे कारण नेमके काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सहलीचा आनंद घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर क्षणात संकट कोसळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हे ही वाचा –

Nanded Crime: वाढदिवसानंतर आम्ही पळून जाऊन लग्न करणार होतो, सक्षम माझ्यासाठी धर्म स्वीकारणार होता, पण….; नांदेड प्रकरणातील प्रेयसी आचलचा धक्कादायक खुलासा

आणखी वाचा



Source link

‘या’ लोकांचे पेन्शन 1 डिसेंबरपासून बंद होणार? अत्यंत महत्वाचे कागदपत्र सादर करण्याची मुदत संपली

0
‘या’ लोकांचे पेन्शन 1 डिसेंबरपासून बंद होणार? अत्यंत महत्वाचे कागदपत्र सादर करण्याची मुदत संपली



काही लोकांची पेन्शन 1 डिसेंबरपासून बंद होऊ शकते. पेन्शन सुरु राहण्यासाठी अवश्यक असलेला अत्यंत महत्वाचा पुरावा सादर करण्याची मुदत संपली आहे.  



Source link

Brain Health: सतत रील्स पाहण्याची सवय वाढतेय? मेंदूवर होतायत धोकादायक परिणाम, वेळीच सावध व्हा!

0
Brain Health: सतत रील्स पाहण्याची सवय वाढतेय? मेंदूवर होतायत धोकादायक परिणाम, वेळीच सावध व्हा!


Reels Addiction Awareness: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरील रील्स हे मनोरंजनाचे सर्वात लोकप्रिय साधन बनले आहे. काही सेकंदांचे हे व्हिडिओ आकर्षक असल्याने अनेक जण दिवसातून तासन्‌तास रील्स स्क्रोल करत बसतात. एवढेच काय तर कामातून फक्त काही मिनिटांचा वेळ मिळाला, तसेच झोपताना आणि झोपण्याच्या आधी देखील रील्स पाहिल्या जातात. हे आश्चर्यकारक वाटेल, पण रील्स पाहता पाहता अनेकजण त्यांना भूक लागली आहे हे देखील विसरतात. अशा व्यक्तिंना ‘रील्स अ‍ॅडीक्ट’ असे म्हटले जाते. कारण सततची रील्स पाहण्याची सवय कोणत्याही व्यसनापेक्षा कमी नाही. तज्ज्ञांच्या मते ही सवय मेंदूवर गंभीर परिणाम करू शकते आणि हळूहळू मानसिक आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता वाढते.

Add Zee News as a Preferred Source

 

मानसिकतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता:

रील्समध्ये नवीन, मनोरंजक सामग्रीचा सतत प्रवाह मेंदूमध्ये जलद गतीने आणि वारंवार डोपामाइन सोडण्याचा मदत करतो. ज्यामुळे इतर व्यसनांप्रमाणे तृष्णा आणि आवेगपूर्ण वर्तनाचे चक्र तयार होते. यामुळे मेंदूची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते आणि अभ्यास किंवा काम कंटाळवाणे वाटू लागते. कोणतेही काम करताना किंवा वाचताना लक्ष एकाग्र करणे कठीण होते. सतत आणि जलद डोपामाइनमुळे तुमच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम होऊन गोष्टी लगेच विसरणे, लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होणे, आकलन क्षमता मंदावणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या पुढे गंभीर स्वरूप घेऊन अल्झायमर सारखे आजार होण्याची शक्यता असते.

 

मानसिक समस्या उद्भवण्याची शक्यता:

डोपामाईन हे मेंदूमधील एक असे रसायन आहे, जे मेंदूला उत्तेजित करण्याचे कार्य करते. रील्स अ‍ॅडीक्शनमुळे तुमचा मेंदू उच्च-उत्तेजना या समस्येला बळी पडतो. ज्यामुळे चिंता, नैराश्य, न्यूनगंड अशा मानसिक समस्या उद्भवतात. सोशल मीडियावरील या रिल्समध्ये काल्पनिक जीवनशैली, सौंदर्य, स्टायलीश राहणीमान अशाप्रकारचा मजकूर दाखवणारे व्हिडीओज असतात. या रील्स सतत पाहिल्याने तुम्ही तुमच्या सामान्य जीवनशैलीची आणि स्वतःची तुलना करू लागता. यामुळे तुमच्या मनात तुम्ही जीवनाच्या इतर क्षेत्रात तुमच्या पूर्ण क्षमतेनुसार कामगिरी करण्यास असमर्थ असण्याची भावना निर्माण होऊ शकते.

 

अल्पकालीन स्मृतीवर परिणाम:

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सतत रील्स पाहिल्याने झोपेची गुणवत्ता कमी होते. मोबाईल स्क्रीनची ब्ल्यू-रेज आणि मेंदूची सतत चालू असलेली जागरूकता यामुळे झोप उशिरा लागते आणि सकाळी थकवा जाणवतो. इतकंच नाही तर वारंवार माहितीची भर पडल्यामुळे अल्पकालीन स्मृती वरही परिणाम होऊ शकतो.

 

रील्स अॅडीक्शन टाळण्यासाठी उपाय:

रील्स अॅडीक्शन टाळण्यासाठी रील्स रील्स पाहण्याच्या मर्यादित वेळा ठरवा, झोपेच्या आधी सोशल मीडियाटा वापर टाळा आणि दिवसातून एकदा तरी डिजिटल डिटॉक्स करा. नवीन सामग्री तपासण्याचा मोह टाळण्यासाठी सोशल मीडियाचे नोटिफिकेशन बंद करून ठेवा, तुमचा रिकामा वेळ घालवण्यासाठी मोबाईल व्यतिरिक्त इतर साधनांचा उपयोग करा.

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 





Source link

मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, अमेरिकेचा संदर्भ

0



सातारा : राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी (Election) आज प्रचाराचा अंतिम दिवस असून मतदानाच्या एक दिवस अगोदर राज्यातील काही नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाची आणि नगरसेवक पदांच्या निवडणुका पढे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यावरुन, राजकीय मत-मतांतर व्यक्त होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तर, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavan) यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपला संताप व्यक्त केला निवडणूक आयोगाने गोंधळ घातला, याला सरकार जबाबदार आहे, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, या पत्रकार परिषदेतून आंतरराष्ट्रीय राजकारणावर भाष्य करताना त्यांनी मोठा दावा केला आहे. देशाच्या पंतप्रधानपदी (Prime Minister) मराठी माणूस विराजमान होण्याची शक्यता आहे, असे चव्हाण यांनी म्हटले. 

एपस्टाईन फाईल्सवरुन अमेरिकेत गेल्या 6 महिन्यांपासून मोठा गदारोळ आहे, ती फाईल उघड झाल्यावर भारताच्या राजकारणावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कदाचित महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून 

अमेरिकेत मोठा उद्योगपती. जेफ्री अ‍ॅमस्टिन त्याचं नाव आहे. त्या माणसाबद्दलचा हा विषय आहे. त्याने कायदा मोडला. त्याने खूप बेकायदेशीर कारवाया केल्या. त्यात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गुंतवायचं आणि भानगडी करायला लावायच्या असा तो विषय आहे. सर्व मोठ्या राजकीय नेत्यांची नावे अमेरिकेत आली आहेत. त्यात राष्ट्रपती ट्रम्प यांचं देखील नाव आहे. त्यामुळे कदाचित ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागेल. तिकडे निवडणूक आयोगाचे फार कडक निकष आहेत. ट्रम्प यांनी राजीनामा देणं हा त्यांचा विषय आहे.अमेरिकेची संसद त्यांच्या मागे लागली आहे. नावं खुलं करण्यास सांगत आहे. पण ट्रम्प करत नाहीत. संसद ट्रम्प यांच्या पाठिमागे सहा महिन्यापासून असून 10 हजार कागदपत्रं संसदेने ताब्यात घेतले आहेत. संसद ही कागदपत्रं उघड करू शकते. सुब्रमण्यम स्वामी यांनी हा व्हिडीओ केला आहे, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तसेच, आज त्यावर संसदेत गदारोळ होऊ शकतो. त्यामुळे, मी फक्त म्हटलं मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे, त्यातून काय अर्थ काढायचा तो काढा, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

निवडणुका पुढे ढककल्या, मुख्यमंत्रीच जबाबदार

राज्यातील काही नगरापलिका क्षेत्रात निवडणुका पुढे ढकलल्या, त्याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. राज्यात गेली पाच वर्ष नोकरशाहीचे राज्य असून अचानक 20 नगरपालिका पुढे ढकलल्या जातात, त्याला सरकारच जबाबदार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. निवडणूक आयोग हा भाजपचा असल्याने कितीही आंदोलने केली आणि जरी राहुल गांधी यांनी कितीही डोके फोडले तरी यात काहीही होऊ शकत नाही, अशी संतापजनक प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कराड मध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. 

हेही वाचा

अनगरची निवडणूक स्थगित, निवडणूक आयोगाचे निर्देश; राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंची पहिली प्रतिक्रिया

आणखी वाचा



Source link

Teeth Care Tips: फक्त थंड पाणी पिताना किंवा गोड खाल्ल्यावरच दातांना झिणझिण्या येतात, कारण….

0
Teeth Care Tips: फक्त थंड पाणी पिताना किंवा गोड खाल्ल्यावरच दातांना झिणझिण्या येतात, कारण….


Know the reason behind sensitive Teeth: आपल्या शारीरिक आरोग्याप्रमाणे दातांच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपण दिवसभरात तिखट, गोड, आंबट असे वेगवेगळ्या चवीचे कितीतरी पदार्थ खात असतो. अशावेळी दातांची योग्य काळजी न घेतल्यास दाड दुखणे, कीड लागणे, दातांची मजबुती कमकुवत होणे अशा समस्या उद्भवतात. या समस्यांमुळे जेव्हा आपण काही गोड किंवा थंड पदार्थ खातो तेव्हा दातांना झिणझिण्या येतात आणि दात दुखू लागतात. काहीवेळा हे दुखणे असहय्य असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की फक्त थंड पाणी पिताना किंवा गोड पदार्थांचे सेवन केल्यास दातांना झिणझिण्या का येतात? चला तर मग यामगचे खरे कारण जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

तज्ज्ञांच्या मते, दातांच्या समस्या होण्याचे मूळ कारण त्यांवर असलेला इनॅमल (Enamel) थराची कमी आहे. दातांवर असलेला हा जाड थर दाताच्या आतील संवेदनशील भागांचे संरक्षण करतो. आम्लयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे तसेच वाढत्या वयात इनॅमल थराची झीज होऊ लागते आणि दात अधिक संवेदनशील होतात. एकदा इनॅमलची झीज झाली की, तो पुन्हा तयार होत नाही म्हणूनच त्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. 

दातांवरील या संरक्षक थराची झीज झाल्यास, परिणामी थंड किंवा गोड पदार्थ थेट दातातील नसांना स्पर्श करतात आणि त्या त्वरीत आकुंचन पावतात. यामुळेच संवेदनशीलता निर्माण होते आणि थंड पाणी, आइस्क्रीम किंवा गोड पदार्थाचे सेवन करताच अचानक झिणझिण्या येतात. पण याउलट, गरम पाणी पिल्यावर किंवा गरम अन्नाचे सेवन केल्यास असा त्रास कमी जाणवतो. यामागचे कारण म्हणजे गरम तापमानामुळे नसांना उब मिळते आणि त्या आकुंचन पावत नाहीत. म्हणून गरम पदार्थांचे सेवन केल्यास  झिणझिण्या लगेच शांत होतात.

 

दंततज्ज्ञांच्या मते, दातांची संवेदनशीलता वाढत असल्यास दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. हलके दुखणेही पुढे जाऊन मोठ्या समस्येचे रूप घेऊ शकते. यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे संवेदनशीलता टूथपेस्टचा नियमित वापर करा. तसेच दातांवर जास्त दाब देऊन ब्रश करणे टाळा, गोड आणि थंड पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण कमी करा. याशिवाय दर सहा महिन्यांनी एकदा डेंटल चेकअप करणे गरजेचे आहे. कारण झिणझिण्यांचा त्रास लहान वाटला तरी कालांतराने त्याचे रूपांतर गंभीर समस्यांमध्ये होऊ शकते. निरोगी दातांसाठी योग्य काळजी आणि वेळेवर उपचार करणे अधिक अनिवार्य आहे.

 

 

 

1. प्रश्न: थंड पाणी, आइस्क्रीम खाल्ल्यावर दातांना झिणझिण्या का येतात?
उत्तर: दातांवरील इनॅमल थर झिजल्यामुळे थंड,गोड पदार्थ थेट नसांना स्पर्श करतात आणि नसा आकुंचन पावतात, म्हणून झिणझिण्या येतात.

 

2. प्रश्न: गरम पदार्थ खाल्ल्यावर झिणझिण्या लगेच थांबतात, का?
उत्तर: गरम तापमानामुळे नसांना उब मिळते आणि त्या आकुंचन पावत नाहीत, म्हणून त्रास त्वरित कमी होतो.

 

3. प्रश्न: दातांच्या झिणझिण्यांवर काय करावे?
उत्तर: संवेदनशील दातांसाठी खास टूथपेस्ट वापरा, मऊ ब्रशने हलके ब्रश करा, गोड,थंड पदार्थ कमी खा आणि दर 6 महिन्यांनी डेंटिस्टकडे चेकअप करा.

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.





Source link

World AIDS Day 2025:’एचआयव्ही’ स्पर्शाने पसरतो का, या संसर्गाबद्दल असलेल्या गैरसजांमागचे सत्य काय?

0
World AIDS Day 2025:’एचआयव्ही’ स्पर्शाने पसरतो का, या संसर्गाबद्दल असलेल्या गैरसजांमागचे सत्य काय?


World AIDS Day 2025: दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जगभरात ‘जागतिक एड्स दिन’ (World AIDS Day) साजरा केला जातो. एचआयव्हीविषयी जागरूकता वाढवणे, चुकीच्या समजुती दूर करणे आणि सुरक्षिततेचा संदेश समाजापर्यंत पोचवणे हे या दिनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जागतिक एड्स दिनाचा यावर्षीचा संदेश ‘एचआयव्ही साथीचा अंत: समुदाय, काळजी आणि एकता’ (Ending the HIV Epidemic: Community, Care & Solidarity) हा आहे.

Add Zee News as a Preferred Source

भारतात  मागील काही वर्षात एचआयव्हीविषयीची परिस्थिती सुधारली आहे. तरी अजूनही अनेक गैरसमजांमुळे एचआयव्ही  रुग्ण उपचारांपासून दूर राहतात. तज्ज्ञांच्या मते, एचआयव्ही हा संसर्ग रक्त, लैंगिक संबंध किंवा आनुवांशिकरित्या होतो. पण समाजात या संसर्गाबद्दल स्पर्श, एकत्र जेवण, हात मिळवणे किंवा साध्या दैनंदिन संपर्कातून हा आजार पसरतो असे गैरसमज आहे. पण यामागचे सत्य समाजासमोर आणून रुग्णांबद्दल भेदभाव न करता त्यांना मानसिक आधार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक औषधोपचारामुळे एचआयव्ही (HIV) रुग्ण आज पूर्णपणे सामान्य जीवन जगू शकतात. मात्र, चुकीच्या समजुती आणि भीतीमुळे अनेकजण तपासणी आणि उपचार करणे टाळतात. म्हणूनच या लेखाच्या माध्यमातून हे गैरसमज कोणते आहेत आणि त्यामागचे सत्य काय आहे? याबद्दल जाणून घेऊया. 

 

एचआयव्ही संसर्ग स्पर्शाने पसरतो?

हे पूर्णपणे खोटे आहे! एचआयव्ही संसर्ग कधीही स्पर्शाने पसरत नाही. एचआयव्ही हा शरीरातील विशिष्ट द्रवपदार्थांमधून पसरतो, जसे की रक्त, वीर्य, स्त्राव आणि संक्रमित आईचे दूध. हात मिळवणे, मिठी मारणे, एकत्र जेवणे किंवा एखाद्याचे उष्टे खाणे, एचआयव्ही रूग्णाने वापरलेले शौचालय वापरणे किंवा पिण्याचे पाणी पिणे यातील कोणत्याही गोष्टींमुळे एचआयव्ही संसर्ग पसरत नाही.

 

एचआयव्ही आजारावर कोणताही उपाय नाही? 

एचआयव्ही हा आजार पूर्णपणे बरा करता येईल असे उपचार सध्या उपलब्ध नाही, पण त्यावर नियंत्रण आणता येऊ शकते असे उपचार नक्कीच उपलब्ध आहेत. अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी (ART) या प्रभावी उपचाराने एचआयव्ही विषाणूंचे प्रमाण कमी करता येऊ शकते. ज्यामुळे संसर्ग वाढण्यापासून रोखता येते. यामुळे एक एचआयव्ही बाधित व्यक्ती देखील सामान्य, दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. यासाठी शक्य तितक्या लवकर आजाराची लक्षणे ओळखून उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि नियमित औषधोपचार करणे महत्त्वाचे आहे. 

 

एचआयव्ही असल्यास लग्नसंबंध आणि मातृत्व शक्य नाही?

एचआयव्ही असूनही लग्नसंबंध आणि मातृत्व शक्य आहे, पण त्यासाठी योग्य वैद्यकीय मार्गदर्शन, उपचार आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. एचआयव्हीचा प्रसार रोखण्यासाठी अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी प्रभावी ठरते. यामुळे एचआयव्ही नसलेल्या जोडीदाराला संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. तसेच आई-वडीलांपैकी कोणी एचआयव्ही सकारात्मक असेल तर प्रगत प्रजनन तंत्रज्ञानाचा वापर करून बाळाला जन्म देणे शक्य आहे. ज्यामुळे बाळाला एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. 

 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित संबंध, स्वच्छ सुईंचा वापर, वेळोवेळी चाचणी करणे आणि योग्य औषधोपचार सुरू ठेवणे हे सर्वात प्रभावी मार्ग आहेत. एआरटी (Antiretroviral Therapy) उपचार पद्धतीमुळे रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात, तसेच वेळेवर उपचार घेतल्यास विषाणूंचा प्रसारही टाळता येतो.

 

 

 

1. प्रश्न: एचआयव्ही हा संसर्ग स्पर्शाने, मिठी मारून किंवा एकत्र जेवल्याने पसरतो का?
उत्तर: नाही, पूर्णपणे नाही! एचआयव्ही फक्त रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध किंवा आईच्या दुधातून पसरतो; हात मिळवणे, मिठी मारणे, एकत्र जेवण यातून कधीच पसरत नाही.

 

2. प्रश्न: एचआयव्ही झाल्यास आयुष्य संपले का? लग्न-मुलबाळ शक्य नाही का?
उत्तर: नाही! ART उपचाराने एचआयव्ही पूर्णपणे नियंत्रणात राहतो; रुग्ण सामान्य दीर्घायुष्य, लग्न आणि योग्य उपचार-तंत्रज्ञानाने निरोगी बाळही जन्माला घालू शकतात.

 

3. प्रश्न: एचआयव्ही टाळण्यासाठी काय करावे?
उत्तर: सुरक्षित लैंगिक संबंध, स्वच्छ सुई, वेळोवेळी तपासणी, लवकर ART उपचार सुरू करणे; आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एचआयव्ही रुग्णांबरोबर भेदभाव न करता त्यांना मानसिक आधार द्या.

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

नऊ वर्षांनी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत व्यथित उमेदवाराचे भावनिक पत्र चर्चेत**

0
नऊ वर्षांनी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत व्यथित उमेदवाराचे भावनिक पत्र चर्चेत**

फलटण प्रतिनिधी :- नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले. प्रचार, अर्ज छानणी, आचारसंहिता याच सगळ्या प्रक्रियेदरम्यान एक उमेदवार मात्र आपल्या वेदना व्यक्त करणारे भावनिक पत्र घेऊन पुढे आला आहे

“साहेब ! माझं काय चुकलं ?” साहेब ! माझं काय चुकलं ?”

साहेब सप्रेम नमस्कार,

नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजलं, तब्बल नऊ वर्षानंतर होणारी ही सार्वत्रिक 2025 ची पंचवार्षिक निवडणूकीचा मोठा गाजावाजा झाला. सर्वांनी उत्साहाने त्याचे स्वागत केले. प्रत्येक मतदार नागरिक आपापल्या कामाला लागला. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी, अपक्ष उमेदवारांनी कंबर कसली. मतदार राजा खुश झाला. प्रशासनाची नेहमीप्रमाणे लगबग सुरू झाली. शिस्तीचा बडगा निवडणुकीची नियमावली, आदर्श आचारसंहिता सर्वकाही कायद्याच्या चौकटीत सुरू झालं. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. नामनिर्देश दाखल करण्याची तारीख, त्याची वेळ, मिनिटात, सेकंदात, काटे फिरत होते. छानणीच्या दिवशी प्रत्येक अर्जाची चिरफाड झाली, कोणाचं भलं झालं, कोणाचं चुकलं, शर्यतीतून घोडं बाहेर पडल. हे सगळं कसं कायद्याने चाललं होत. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, तुम्ही सांगाल तो नियम, तुम्ही कायदा, निवडणूक आचारसंहिता समजावून सांगत होता. तुम्ही म्हणाल तसं करायचं ठरवलं. अर्जाची छानणी झाली, कोणाचा अर्ज वैध झाला, कोणाचा अवैध झाला, हे कायद्याप्रमाणे ठरवलं कोणी कधी केव्हा कशी इच्छेप्रमाणे माधार घ्यायची कोणी अपिलात जावं कसं जावं हे जे काही असेल ते नियमाप्रमाणे आपल्या आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या नियमावलीत ठरले साहेब !

माझा उमेदवारी अर्ज वैध झाला, माझा प्रचार सुरू झाला. तुमच्या नियमावलीप्रमाणे घरोघरी भेटी घेणं, प्रचार पदयात्रा करणे, कोपरा सभा घेणे, सर्वकाही नियमात करतोय साहेब. त्यात माझं काय चुकलं? प्रचाराची ठरवून दिलेली वेळ, वेळेचं बंधन पाळून काटा इकडे तिकडे होऊ दिला नाही, त्या वेळेचे पालन करून प्रचार केला साहेब ! त्यात माझं काय चुकलं? माझा कार्यकर्ता दिलेल्या वेळेत रात्रंदिवस तहानभूक विसरून जीवाचं रान करून प्रचार कार्यात मला मदत करत होता, त्यात त्याचं काय चुकलं साहेब ! मतदार राजा मतदानाची दिनांक वेळ गाठण्यासाठी परगावावरून रजा काढून, आपला कामधंदा सोडून, उद्योग धंदा सोडून, मतदानाचे पवित्र कर्तव्य बजवण्यासाठी लांबून आपल्या घरी आला साहेब, त्यात त्याचं काय चुकलं? माझ्या नावाचं पॉम्पलेट घरोघरी वाटलं, माझ्या कामाचा जाहीरनामा प्रत्येकाच्या घरात दिला. मी पॉम्पलेट तो जाहीरनामा वाटतो यात माझं काय चुकलं साहेब, मतदार हे या वातावरणात या मानसिकतेमध्ये वीस दिवस लांबलेल्या निवडणूकीची तारखेमुळे हे सगळं लक्षात ठेवल का साहेब, का मला हाच प्रचार पुन्हा करावा लागेल का साहेब ?

हे सर्व मी सांगतोय साहेब, हे मी दहा दिवस केलेला जो प्रचार आहे त्याचं काहीच मोल नाही का साहेब ? यापुढे आणखी दहा दिवस प्रचार करणे म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रचारात वीस दिवसाचा कालावधी असतो का साहेब ? हे मला माहित नाही, ही गोष्ट मी विचारतोय, हे माझं चुकतंय कां साहेब! तुम्ही निवडणुकीच्या शर्यतीची शिट्टी फुंकली, स्टार्ट म्हणाला त्याबरोबर जीवाच्या आकांताने मी सुसाट पळत सुटलो आणि शेवटी फिनिशसाठी तुमचा माणूस नाही म्हणून तुम्ही शर्यत रद्द केली म्हणजे माझ्या कष्टाला काहीच अर्थ नाही का साहेब !                      तुम्ही दिलेल्या नियमा प्रमाणे मी दहा दिवस आचारसंहितेचे पालन करून प्रचार केला, तो रद्द झाला का साहेब ! मला नव्याने प्रचार करण्यासाठी सांगत असताना माझं काय चुकलं ते सांगा साहेब ? पायी प्रचार करत असताना पायाचे तुकडे पडले, गाठी भेटी घेऊन लोकांना हात जोडून मतदान करण्याची विनंती केली, त्याच्याशी बोलताना तोंडाला फेस आलाय. तुम्ही दिलेल्या दिवसात व वेळेत प्रचार करताना दमछाक झालीय साहेब ! प्रचाराची लागणारी ऊर्जा – शक्ती – मानसिकता मनाचे धैर्य, सर्व पणाला लावलं होतं साहेब ! हे सर्व करताना तुम्ही दिलेल्या आदर्श आचारसंहितेची चाकोरी सोडली नाही साहेब ! सांगा साहेब माझं काय चुकलं? तुम्ही कोणाला तरी न्याय देत असताना तो कायद्याने बरोबर असेलही आणि सर्वांना योग्य न्याय मिळालाचं पाहिजे, पण कायद्याने हाही विचार व्हावा की कोणाला तरी न्याय देताना दुस-या कोणावर अन्याय होतोय का? हे ही लक्षात घ्यावे साहेब ! साहेब मी निवडणूक लढवत असताना, माझी काही चुक नसताना माझ्यावर अन्याय होत आहे ही भावना मनाला वेदना देणारी आहे. या मानसिकतेने मी व्यथित झालो आहे.

हे माझ पत्र भावनीक असेल, कायद्याच्या चौकटीत बसणारे नसेल, पण तुम्ही सांगा साहेब माझं काय चुकलं ?

आपला

एक व्यथित उमेदवार,

निरा नदीवरील बंधाऱ्यावर जातीय रागातून दाम्पत्यावर मारहाण; फलटण ग्रामीण पोलिसांकडे गुन्हा दाखल

0
निरा नदीवरील बंधाऱ्यावर जातीय रागातून दाम्पत्यावर मारहाण; फलटण ग्रामीण पोलिसांकडे गुन्हा दाखल

आसू (ता. फलटण), दि. 30 नोव्हेंबर 2025 — निरा नदीवरील बंधाऱ्यावर दाम्पत्यासोबत झालेल्या जातीय वाद आणि मारहाणीच्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसू येथील सौ. रमा नंदकुमार पवार (वय 32) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्या आपल्या पती नंदकुमार पवार यांच्यासह दुपारी 3:30 वाजता बारामती येथे मुलीस भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. 3:40 वाजता, निरा नदीवरील बंधाऱ्याजवळ MH-42 CS-4545 क्रमांकाची पांढरी कार आडवी उभी असल्याने वाहतूक अडली. त्या वेळी कारमधून उतरलेले राजन दिनकर फराटे (रा. आसू) यांनी वाद घालत तक्रारदार दाम्पत्याला थांबवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, वादादरम्यान राजन फराटे यांनी तक्रारदार व त्यांच्या पतीला जातिवाचक शिवीगाळ करत धमकावले. “तुम्ही खालच्या महार जातीचे… गावात राहू देणार नाही… तुमच्यावर केसेस दाखल करीन” अशी वक्तव्ये केल्याचा आरोप नोंदवण्यात आला आहे.

वाद वाढताच तक्रारदार महिलेला गाल, नाक, छाती व गळ्याच्या डाव्या बाजूस शारीरिक मारहाणीमुळे दुखापत झाल्याचे नमूद आहे. तक्रारदारांच्या पतीलाही मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

घटनेनंतर रमा पवार यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी मारहाण, धमकी तसेच जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.