Saturday, July 4, 2026
Home Blog Page 91

शेतकरी कर्जमाफीवर बोलायचं नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, मंत्री बाबासाहेब पाटलांची कबुली 

0



Babasaheb Patil : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil ) यांनी कराड (Karad) येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी सहकार मंत्र्यांचे अज्ञान समोर आले असून माध्यमांपासून पळ काढताना आढळून आले. तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलायचं नाही असं मुख्यमंत्री सांगितल्याची कबुली बाबासाहेब पाटील यांनी दिली. 

बँका बुडवणाऱ्यांवर कारवाईसाठी सिस्टीममुळे वेळ लागत आहे

यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीला सरकारमधील कोणी आले नाही असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता, मंत्री म्हणाले की, मला याबाबत माहिती नाही. बँका बुडवणाऱ्यांवर कारवाईसाठी सिस्टीममुळे वेळ लागत असल्याचे मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले. लेखापरिक्षणात अ वर्ग तरी संस्था, बँका बंद पडतात. त्यावर कायदा दुरूस्ती करणार असल्याचे बाबासाहेब पाटील म्हणाले. कर्ज घेणाऱ्या आणि बुडवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होणार का? असं देखील त्यांना विचारण्यात आले, यावेळी सहकारमंत्री म्हणाले की, कारखान्यांची यादी पत्रकारांनीच द्यावी असे म्हणाले. मग सहकार खाते काय करतयं? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

कर्जमाफी विषयावर बोलायचं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले. कर्जमाफीमुळं सहकार खात्यावर किती बोजा कमी होईल, असा सवाल देखील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, आकडे काढावे लागतील.

30 जूनआधी कर्जमाफी करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

30 जूनआधी कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही. यावर्षीचे कर्जबाजारी शेतकरीही या कर्जमाफीत बसले आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शब्द दिला आहे. दिलेला शब्द पाळला नाही, दगाफटका केला तर फासावर जाण्याची तयारी आहे”, असंही रोखठोक मत बच्चू कडूंनी यावेळी व्यक्त केलं आहे. 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu )  यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारनं समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. ही समिती अभ्यास करुन अहवाल देणार आहे. आम्हाला सरकारनं योग्य वेळ आणि तारीख दिली आहे. आम्ही तारखेसाठीच आलो होतो. आम्ही समाधानी असल्याचे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Radhakrishna Vikhe Patil: ‘आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची’ आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे

 

आणखी वाचा



Source link

शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी

0


सध्या लग्नाचा हंगाम सुरू असून गेल्या काही दिवसांत सेलिब्रिटी आणि राजकारणी कुटुंबीयांचा लग्नसोहळा संपन्न होत असल्याचं दिसून येत आहे.

सध्या लग्नाचा हंगाम सुरू असून गेल्या काही दिवसांत सेलिब्रिटी आणि राजकारणी कुटुंबीयांचा लग्नसोहळा संपन्न होत असल्याचं दिसून येत आहे.

बिग बॉस फेम सूरज चव्हाण, अभिनेते आदेश बांदेकर यांचे सुपुत्र, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचे विवाह संपन्न झाले आहेत.

बिग बॉस फेम सूरज चव्हाण, अभिनेते आदेश बांदेकर यांचे सुपुत्र, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचे विवाह संपन्न झाले आहेत.

शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांच्यासमवेत अभिनेत्री तेजस्वीनी लोणारीचा विवाह झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.

शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांच्यासमवेत अभिनेत्री तेजस्वीनी लोणारीचा विवाह झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.

सातारा येथे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या कन्येचा विवाह रविराज देशमुख यांच्याशी संपन्न झाला. रेड कार्पेट आणि शाही शामियानातील या लग्नसोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती होती.

सातारा येथे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या कन्येचा विवाह रविराज देशमुख यांच्याशी संपन्न झाला. रेड कार्पेट आणि शाही शामियानातील या लग्नसोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती होती.

सातारा येथे पार पडलेल्या विवाह सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक अत्यंत अभिनंदनीय पाऊल उचलून सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवले.

सातारा येथे पार पडलेल्या विवाह सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक अत्यंत अभिनंदनीय पाऊल उचलून सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवले.

कन्या ऋणालीराजे भोसले आणि चिरंजीव रविराज देशमुख यांच्या शुभविवाह प्रसंगी, त्यांनी लातूर जिल्ह्यातील ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी १० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

कन्या ऋणालीराजे भोसले आणि चिरंजीव रविराज देशमुख यांच्या शुभविवाह प्रसंगी, त्यांनी लातूर जिल्ह्यातील ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी १० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

शेंद्रे, सातारा येथील अजिंक्यतारा साखर कारखाना परिसरात पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्री, आमदार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

शेंद्रे, सातारा येथील अजिंक्यतारा साखर कारखाना परिसरात पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्री, आमदार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी, भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना 10 लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला, जो लातूरमधील ओल्या दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून वापरला जाईल. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

या प्रसंगी, भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना 10 लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला, जो लातूरमधील ओल्या दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून वापरला जाईल. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

लग्नासारख्या कौटुंबिक आणि आनंददायी सोहळ्याच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी जपण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. ओल्या दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या लातूर जिल्ह्यातील जनतेसाठी हा निधी मोठा आधार ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लग्नासारख्या कौटुंबिक आणि आनंददायी सोहळ्याच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी जपण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. ओल्या दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या लातूर जिल्ह्यातील जनतेसाठी हा निधी मोठा आधार ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या विवाह सोहळ्यामध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. त्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर हेही आगे-मागे रांगेत बसल्याचं दिसून आलं.

या विवाह सोहळ्यामध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. त्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर हेही आगे-मागे रांगेत बसल्याचं दिसून आलं.

Published at : 04 Dec 2025 07:51 PM (IST)

राजकारण फोटो गॅलरी

आणखी पाहा



Source link

तुम्हाला सुद्धा डोक्यावर चादर घेऊन झोपायची सवय आहे? आत्ताच ही सवय बदला नाहीतर…

0
तुम्हाला सुद्धा डोक्यावर चादर घेऊन झोपायची सवय आहे? आत्ताच ही सवय बदला नाहीतर…


Hypercapnia due to improper sleeping habitsबरेचजण हिवाळ्यात थंडाव्या पासून वाचण्यासाठी रात्री झोपताना एकत्र दोन-तीन चादर किंवा ब्लँकेटचा वापर करतात. तर काहीजण ब्लँकेटने स्वतःला पायापासून डोक्यापर्यंत पूर्णपणे झाकून घेतात. जर तुम्हालाही अशाप्रकारे झोपायची सवय असेल तर आत्ताच सावध व्हा, कारण तुमची ही सवय तुमच्या अस्वस्थ आरोग्याचे मोठे कारण बनू शकते.

Add Zee News as a Preferred Source

 

 

एका संशोधनानुसार असे समोर आले आहे की, झोपताना पायापासून डोक्यापर्यंत पूर्णपणे चादर घेतल्यास तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात ताजी हवा आणि ऑक्सिजन मिळत नाही. श्वसन प्रक्रियेदरम्यान शरीरासाठी घातक असलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो आणि ऑक्सिजन आत खेचले जाते. पण जेव्हा तुम्ही चादर किंवा ब्लँकेटने तुमचे शरीर पूर्णपणे झाकून घेता तेव्हा कार्बन डायऑक्साइडला बाहेर जाण्यास जागा मिळत नाही. यामुळे श्वास घेताना ऑक्सिजनसह कार्बन डायऑक्साइडही शरीरात खेचला जातो, आणि तुमच्या शरीरातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत जाते. या स्थितीला हायपरकॅप्निया असे म्हटले जाते. यामुळे रक्ताचे पीएच संतुलन बिघडते आणि शरीरातील विविध अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो.

 

कार्बन डायऑक्साइड वाढल्यामुळे प्रथम श्वासोच्छ्वास जलद होतो, डोके दुखणे, चक्कर येणे, थकवा, गोंधळलेपणाची भावना येणे अशा समस्या उद्भवतात. कारण शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने मेंदूवर ताण येतो. कार्बन डायऑक्साइडची पातळी अधिक वाढल्यास रेस्पिरेटरी अ‍ॅसिडोसिस होऊ शकते, ज्यामुळे रक्त जास्त आम्लीय बनते आणि हृदय, फुफ्फुसेमेंदू यांचे कार्य मंदावते. काही वेळा धडधड वाढणे, छातीत जडपणा आणि श्वास घेण्यास त्रासही सुरू होतो. गंभीर स्तरावर हायपरकॅप्नियामध्ये बेशुद्धी, फिट्स, रक्तदाब घसरणे आणि जीवघेणी श्वसन समस्या होण्याची शक्यता निर्माण होते. विशेषत: दम्याचे रुग्ण, जास्त धूम्रपान करणारे किंवा ऑक्सिजन थेरपीवर असलेले रुग्ण यांच्यात हे धोके जास्त आढळतात. हायपरकॅप्नियाच्या या लक्षणांना दुर्लक्षित केल्यास श्वसन संस्थेवर आणि हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

 

थंड हवेपासून वाचण्यासाठी रात्री झोपताना शरीर पूर्णपणे झाकून घेतल्यास ऊब निर्माण होते ज्यामुळे ब्लँकेटमधील तापमान वाढते. सामान्यतः रात्री झोपताना शरीराचे तापमान कमी असणे अनुकूल मानले जाते. त्यामुळे जास्त तापमान वाढल्यास उष्णता जाणवू लागते आणि घाम येऊन अस्वस्थ वाटते. यामुळे झोपेत अडथळा येण्याची शक्यता असते. गाढ झोपेत सतत अडथळा आल्याने शारीरिक तसेच मानसिक समस्या उद्भवतात. झोप पूर्णझाल्याने दिवसभर मेंदूवर जास्त ताण पडून चिडचिड होणे, डोके जड होणे, कामात लक्षलागणे, थकवा यांसारख्या मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.

 

म्हणूनच जर तुम्हाला सुद्धा झोपताना चादर किंवा ब्लँकेटने शरीर पूर्णपणे झाकून घेण्याची सवय असेल तर आत्ताच ही सवय बदला. झोपताना तुम्हाला ताजी हवा मिळत राहील याची काळजी घ्या. तसेच हायपरकॅप्निया बाबतीतील कोणतीही लक्षणे जाणवत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळीच उपचार सुरू करा. 





Source link

थंडीमध्येही अनेक जण रजाई किंवा चादरीतून पाय बाहेर का ठेवतात? 5 मुद्द्यांमधून जाणून साइंस

0
थंडीमध्येही अनेक जण रजाई किंवा चादरीतून पाय बाहेर का ठेवतात? 5 मुद्द्यांमधून जाणून साइंस


या जगात जेवढी माणसं आहेत, तेवढं त्यांचे वेगवेगळ्या सवयी असतात. खास करून झोपबद्दल अनेकांच्या वेगवेगळ्या सवयी असतात. कोणाला शांत झोपेसाठी खास त्यांची आवडीची मऊ उशी लागते. तर काहींना खोलीत अंधार असेल तरच झोप लागते. तर काहींना त्यांची आवडीची जागा, पांघरून, अगदी मस्त थंडी हवा लागते. पण काहींना लोकांना अशी सवय असते की, एसी लावायचा, मस्त ब्लँकेट घ्यायचं पण हो, पाय मात्र ब्लँकेटच्या बाहेर ठेवायचे. ही सवय नाही यामागील वैज्ञानिक कारणं असतात. ही काय कारणं आहेत, आज आपण जाणून घेणार आहोत. 

Add Zee News as a Preferred Source

पहिले कारण – चादरीखाली गुदमरल्यासारखं वाटतं

वैज्ञानिक कारणं असं आहे की, अनेक लोकांना जड रजाई किंवा ब्लँकेटखाली गुदमरल्यासारखे वाटतं. अगदी थोडीशी बंधनाची भावना ज्यांना शांत झोपण्यासाठी अडचण निर्माण करते. अशा परिस्थितीत, अगदी फक्त एक पाय बाहेर काढला तरी त्यांना स्वातंत्र्याची भावना निर्माण होते. हा छोटासा बदल मज्जासंस्था शांत करतो आणि शरीराला झोपण्यास मदत करतो. 

बालपणीच्या सवयी…

अनेकांची बालपणाची सवय मोठ्यापणीही त्यांच्यासोबत असते. जसे की आवडत्या ब्लँकेटमध्ये झोपणे, उशीखाली हात ठेवणे किंवा एक पाय बाहेर ठेवून झोपणे. जर्नल ऑफ सायकोसोमॅटिक रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून असं दिसून आलंय की या सवयी कायम राहतात कारण त्या मेंदूला सुरक्षितता आणि आरामाचा संदेश देण्यास मदत करतात. यामुळे ताण कमी होऊन शांत झोपण्यास मदत होते.

सूक्ष्म-स्वातंत्र्याची भावना!

अनेकांना तणावाची भावना असल्याने झोप लागण्यास त्रास होतो. हा एक मानसिक समाधानाचा भाग आहे, जेव्हा ती व्यक्ती पांघरूनातून पाय बाहेर काढल्यास ते मिळतं. 

मेंदूसाठी ‘झोपेचा संकेत’…

अनेकांना शरीराला झोपेचे संकेत देण्यासाठी रुममधील दिवे मंद करणे, पायमोजे घालणे अशा सवयी म्हणजे चला झोपेची वेळ झाली. अशा प्रकारे अनेक जण मेंदूला झोपेचे संकेत देत असतो. 

तर अनेकांना झोपेत हालचाली करण्याची सवय असते. खरं तर त्यामागे अनेक वेळा दिवसभरातील थकवा किंवा चिडचिड त्यातून दिसते. दिवसभराचा हा ताण अनेक वेळा झोपेवर परिणाम करतो. 

उत्तम आरोग्यासाठी चांगली झोप ही फार आवश्यक असते. त्यामुळे तुमची ही एक छोटीशी सवय चादरीबाहेर पाय काढणे नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 





Source link

शिर्डी संस्थानाकडून सुधीर दळवींना आर्थिक मदत

0
शिर्डी संस्थानाकडून सुधीर दळवींना आर्थिक मदत



मुंबई (mumbai) उच्च न्यायालयाच्या (bombay high court) औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी साई बाबा संस्थान ट्रस्टला ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांना आर्थिक मदत (financial help) करण्याची परवानगी दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी सेप्सिस आजाराने ग्रस्त आहेत.

86 वर्षीय सुधीर दळवी (sudhir dalvi) हे मनोज कुमार यांच्या 1977 मध्ये आलेल्या ‘शिर्डी के साई बाबा’ या चित्रपटात साई बाबांच्या (sai baba)  भूमिकेत झळकले आहेत. या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड आदर आणि प्रसिद्धी मिळाली.

सुधीर दळवी यांच्या चालू वैद्यकीय खर्चासाठी 11 लाख रुपये देण्याची परवानगी मिळावी यासाठी शिर्डी (shirdi) साई बाबा संस्थान ट्रस्टने न्यायालयात धाव घेतली होती.

मागील निर्देशांनुसार, संस्थानाला विशिष्ट रकमेपेक्षा जास्त आर्थिक मदत करण्यापूर्वी उच्च न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे.

याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला होता की सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे उपचाराचा खर्च भागविण्यासाठी मदतीची आवश्यकता असल्याचे याचिकेत म्हटले होते.

या याचिकेचा आढावा घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने ट्रस्टला आर्थिक मदत करण्यास परवानगी दिली. न्यायालयाने याचिकेत नमूद केले की, मानवतेच्या दृष्टीने गरजूंना मदत करणे याेग्य असल्याचे न्यायालयाने याचिकेत नमूद केले आहे.

सुधीर दळवी यांनी साकारलेले साई बाबांचे पात्र भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात संस्मरणीय पात्र आहे.

सुधीर दळवी यांच्या उल्लेखनीय आणि सहानुभूतीपूर्ण अभिनयाने चित्रपटाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांना प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांच्या मनात आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची प्रतिमा मजबूत केली.

चाहते आणि हितचिंतकांनी त्यांच्या बरे होण्याची आशा व्यक्त केली आहे. तसेच या आर्थिक मदतीमुळे अभिनेत्याच्या कुटुंबावरील भार कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा



Source link

EVM घोळ घालण्यासाठीच निकाल 20 दिवस पुढे ढकलला अशी चर्चा; शशिकांत शिंदे काय म्हणाले?

0



सातारा : नगरपालिकांच्या निवडणूक कार्यक्रमात त्रुटी उघड झाल्याने निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, असा आरोप शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केला. निकालाची तारीख ऐनवेळी बदलून 20 दिवसांचा गॅप ठेवण्यात आला, त्यामुळे ईव्हीएममध्ये घोळ होणार अशी लोकांमध्ये चर्चा असल्याचंही ते म्हणाले. 

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावेळीच मी सांगितले होते की एकही त्रुटी न्यायालयात प्रलंबित राहिली तर निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पुढे ढकलली जाईल आणि तसेच घडले, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला याची माहिती होते, तर जबाबदार मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाला हे कसे माहिती नसावे? घाईगडबडीत घेतलेल्या निवडणुका हे निवडणूक आयोगाचे फेल्युअर आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Shashikant Shinde Speech : EVM मध्ये घोळ होणार अशी चर्चा

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, “मतमोजणीसाठी ठेवलेला 20 दिवसांचा गॅप लोकांच्या मनात संशय निर्माण करणारा आहे. लोक खुलेपणाने चर्चा करत आहेत की या काळात EVM मशीनमध्ये काहीतरी घोळ होऊ शकतो. हे सरकार आणि निवडणूक आयोग दोघांचेही फेल्युअर आहे.”

ईव्हीएमबाबत लोकांचा विश्वास ढळत असेल तर सरकार या मशीचा इतका आग्रह का धरत आहे? लोकांच्या मनात शंका निर्माण होत असेल तर येणाऱ्या काळात विना-EVM निवडणुका घेण्यात याव्यात, अशी आमची मागणी आहे असं शशिकांत शिंदे म्हणाले. 

अतिवृष्टीबाबत केंद्राकडे प्रस्ताव न पाठवल्याने शिंदेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अतिवृष्टीचा प्रस्ताव अजूनही केंद्राला न पाठवल्याने आमदार शिंदे यांनी सरकारला असंवेदनशील ठरवले. ते म्हणाले की, “या सरकारला शेतकऱ्यांकडे बघायला वेळ आहे का? कृषिमंत्र्यांच्या खुर्चीवर कोणी टिकत नाही, हा शेतकऱ्यांचा शाप आहे का माहित नाही. “शेतकऱ्यांना सहा महिने, वर्षभरानंतर मदत देऊन काही उपयोग नाही.”

मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार पूर्णपणे अपयशी आहे असं शशिकांत शिंदे म्हणाले.

Shashikant Shinde On Election : निवडणूक प्रक्रिया फक्त दिखावा

शशिकांत शिंदे म्हणाले की, “सरकारमध्येच सर्व ठेकेदार बसले आहेत. साताऱ्यात आमचे उमेदवार सामान्य कार्यकर्ते आहेत. निवडणूक प्रक्रिया आता फक्त फार्स राहिली आहे. प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या हातातले बाहुले आहे, ते सांगतात एक आणि दुसरेच करतात.”

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

Buisness Idea: थंडीत मोठी कमाई करण्याचा सोपा मार्ग, काही तासांतच मिळेल बंपर नफा!

0
Buisness Idea: थंडीत मोठी कमाई करण्याचा सोपा मार्ग, काही तासांतच मिळेल बंपर नफा!


Business Idea:  कमी गुंतवणुकी जास्त नफा मिळेल असा व्यवसाय कराव असे अनेकांना वाटते. पण यासाठीच्या कल्पना अनेकांना माहिती नसतात. तुम्हीदेखील असा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. ज्यात दररोज काही तास काम करुन तुम्ही चांगली कमाई करु शकता. कोणता आहे हा व्यवसाय? सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

कमी भांडवलात जास्त पैसा कमावण्यासाठी सूप बनवण्याचा व्यवसाय हा एक उत्तम पर्याय आहे. विशेषतः हिवाळ्याच्या महिन्यांत, लोक उबदार आणि निरोगी राहण्यासाठी ताजेतवाने सूप शोधत असतात. कमी वेळात आणि कमी खर्चात भरीव उत्पन्न मिळवण्याची ही तुमच्यासाठी एक संधी आहे. तुम्ही हा व्यवसाय घरातून किंवा तुमच्या दुकानात दररोज फक्त 4-5 तास काम करून सुरू करू शकता. लहान शहरांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत, सूपची मागणी सतत वाढत आहे.

हिवाळ्यात लोक उबदार व निरोगी सूप शोधतात. अशावेळी घरगुती, ताजे आणि चविष्ट सूप मिळाले की ग्राहक वारंवार येतात. हा व्यवसाय नोकरी करतानाही फक्त 4-5 तास देऊन चालवता येतो. लहान गाव ते मोठे शहर कुठेही चालतो.

कमी पैश्यात व्यवसाय

सुरुवातीला घरातून किंवा छोट्या दुकानातून सुरू करू शकता. फक्त गॅस, भांडी, कच्चा माल आणि थोडेसे भांडे लागतात. जसजसे ग्राहक वाढतील तसतसे दुकान मोठे करा. भाड्याने जागा घ्यायची झाल्यास बाजार, कॉलेज, ऑफिस परिसर, हॉस्पिटलजवळील गर्दीची जागा निवडा.

चव आणि ताजेपणा हाच यशाचा मंत्र

पॅकेटचे सूप लोकांना आवडत नाहीत कारण त्यात ताजेपणा नसतो. तुमचे सूप नेहमी गरम, ताजे आणि वेगवेगळ्या चवीचे (टोमॅटो, मशरूम, स्वीट कॉर्न, चिकन, मटण इत्यादी) ठेवा. ग्राहकांना पर्याय दिल्यास ते परत परत येतील.

खर्च आणि नफा

एका वाटी सूप बनवण्याचा खर्च फक्त 1015 रुपये, विक्री किंमत 40-60 रुपये ठेवता येते. सुरुवातीला कमी दर ठेवा, नंतर हळूहळू वाढवा. दररोज 70-80 वाट्या विकल्या तरी महिन्याला 70 हजार ते 1 लाख रुपये सहज कमाई होते. 100-150 वाट्या गेल्या तर लाखाच्यावर नफा निश्चित.

व्यवसाय वाढवण्याचा सोपे मार्ग  

घरोघरी डिलिव्हरी सुरू करा.स्विगी-झोमॅटोशी कनेक्ट व्हा.वेगवेगळ्या चवीचे सूप आणि कॉम्बो ऑफर्स द्या. सूपबरोबर ब्रेड स्टिक, गार्लिक ब्रेड द्या.  चांगले रिव्ह्यू मिळाले की ग्राहक आपोआप वाढतात. चांगली चव, स्वच्छता आणि वेळेवर सेवा दिलीत तर हिवाळ्यात सूपचा व्यवसाय तुम्हाला कमी वेळात बंपर कमाई करून देऊ शकेल.

FAQ

प्रश्न १. सूपचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक लागते?

उत्तर: सुरुवातीला घरातून चालवायचे असल्यास फक्त १५-२० हजार रुपये पुरेसे आहेत (गॅस, मोठी भांडी, मिक्सर, कच्चा माल). छोटे दुकान घेतल्यास ५०,००० ते १ लाखापर्यंत गुंतवणूक लागू शकते. नंतर कमाईतूनच व्यवसाय वाढवता येतो.

प्रश्न २. हिवाळा संपला तरी हा व्यवसाय चालेल का?

उत्तर: हो, चालेल! हिवाळ्यात जास्त चालतो हे खरे, पण वर्षभर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना, ऑफिसमध्ये लंचला, जिममध्ये डाएट करणाऱ्यांना आणि घरी आजारी व्यक्तींसाठी ताज्या सूपची मागणी असते. उन्हाळ्यात कोल्ड सूप, गाजर-बीटचे डिटॉक्स सूपही चालतात.

प्रश्न ३. दिवसाला किती वाट्या विकल्या तर चांगला नफा होईल?

उत्तर: जर तुम्ही दररोज ७०-८० वाट्या ५० रुपयांना विकल्या तर महिन्याला साधा ७०,००० ते १ लाख रुपये निव्वळ नफा होऊ शकतो (सगळे खर्च वजा केल्यानंतर). १२०-१५० वाट्या गेल्या तर १.५ ते २ लाख रुपये महिना सहज शक्य आहे.





Source link

हिवाळ्यातलं ऊन ऊबदार वाटतं पण…, ‘सनबाथ’बद्दलचा सर्वात मोठा गैरसमज ऐकून थक्क व्हाल!

0
हिवाळ्यातलं ऊन ऊबदार वाटतं पण…, ‘सनबाथ’बद्दलचा सर्वात मोठा गैरसमज ऐकून थक्क व्हाल!


Sunbathing Misconception: अनेकांना वाटतं की थोडं ऊन मिळालं की ड जीवनसत्त्वाची शरिराची गरज पूर्ण झाली. मात्र प्रत्यक्षात असं नसतं. शरिराची प्रक्रिया यापेक्षा जास्त गुंतागुंतीची असते. सूर्यप्रकाश आवश्यक असतोच पण उन्हात जाणे  आणि शरीरात जीवनसत्त्व D तयार होणे  या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हिवाळ्यातला सूर्य तुम्हाला फसवतो? असं तुम्हाला कोणी सांगितलं तरी ते खोटं ठरणार नाही. ‘सनबाथ’बद्दल काही गैरसमज समजून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

भारत उष्ण कटिबंधातील देश असला तरीही विशेषत: शहरांमध्ये जीवनसत्त्व D ची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येते. हिवाळ्यात ऊन ऊबदार वाटते, पण त्यात UVB किरणे खूप कमी असतात. Vitamin D फक्त UVB किरणांमुळेच त्वचेत तयार होते. त्यामुळे फक्त बाहेर उभे राहिले तरी पुरेसे Vitamin D मिळत नाही. ‘हिवाळ्यामध्ये हवामान, प्रदूषण आणि जीवनशैली या सगळ्याचा एकत्रित परिणाम Vitamin D तयार होण्यावर होतो, असे वॉकहार्ट हॉस्पिटल्सचे एंडोक्रायनोलॉजिस्ट व डायबेटोलॉजिस्ट डॉ. प्रणव घोडी सांगतात.

शहरातील जीवनशैली मोठी अडचण

सकाळी 10 ते दुपारी 2 ही UVB किरणे जास्त असतात तेव्हा बहुतांश लोक ऑफिसात किंवा घरी असतात. त्यामुळे त्वचेला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतच नाही. प्रदूषणामुळेही UVB किरणे अडतात.

थंडी आणि कपडे त्वचा झाकतात

हिवाळ्यात थंडीमुळे लोक एकावर एक कपडे घालतात. परिणामी शरीराची त्वचा पूर्णपणे झाकली जाते, त्यामुळे UVB किरणे त्वचेपर्यंत पोहोचत नाहीत. हिवाळ्यातील प्रदूषणही जास्त असल्याने अजून अडचण वाढते.

गडद त्वचा असल्यास…

भारतीयांची त्वचा गव्हाळ ते काळी असते. मेलेनिन जास्त असल्याने ही त्वचा नैसर्गिक सनस्क्रीनसारखी काम करते. त्यामुळे गोऱ्या त्वचेच्या लोकांपेक्षा आम्हाला Vitamin D तयार करण्यासाठी खूप जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहावे लागते. हिवाळ्यात तर हे जवळपास अशक्यच होते.

आहाराचा फायदा?

दुधात Vitamin D टाकलेले (फोर्टिफाइड), अंडी, मासे, मशरूम यातून थोडे Vitamin D मिळते, पण ते रोजच्या गरजेचा फक्त १०-२०% भाग पूर्ण करते. शहरात राहणाऱ्या बहुतेकांना हिवाळ्यात फक्त सूर्य आणि आहारावर अवलंबून राहून पुरेसे Vitamin D मिळणे कठीण आहे.

काय काळजी घ्याल?  

हिवाळ्यात Vitamin D ची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.शक्य तेव्हा सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत 20-30 मिनिटे हात-पाय-चेहऱ्याला सूर्यप्रकाश द्या.Vitamin D युक्त आहार घ्या.थकवा, हाड दुखणे, सतत सर्दी-पडसे यासारखी लक्षणे दिसली तर डॉक्टरांकडे तपासणी करा आणि गरज पडली तर सप्लिमेंट्स घ्या, असा सल्ला डॉक्टर देतात. 

FAQ

१. हिवाळ्यात ऊन खूप असूनही Vitamin D का कमी पडते?

उत्तर: हिवाळ्यात ऊन ऊबदार वाटते, पण त्यात UVB किरणे खूपच कमी असतात. Vitamin D फक्त UVB किरणांमुळेच तयार होते. शिवाय थंडीमुळे जास्त कपडे घालतो, प्रदूषण जास्त असते आणि सकाळी १० ते दुपारी २ या मुख्य वेळेत आपण घरात-ऑफिसात असतो, म्हणून पुरेसे Vitamin D मिळत नाही.

२. भारतीयांची त्वचा गडद असल्याने Vitamin D वर काय परिणाम होतो?

उत्तर: भारतीयांची त्वचा गव्हाळ ते काळी असते, त्यात मेलेनिन जास्त असते. मेलेनिन नैसर्गिक सनस्क्रीनसारखे काम करते. त्यामुळे गोऱ्या त्वचेच्या लोकांपेक्षा आपल्याला Vitamin D तयार करण्यासाठी ५-१० पट जास्त सूर्यप्रकाश लागतो. हिवाळ्यात UVB कमी असल्याने ही कमतरता आणखी वाढते.

३. हिवाळ्यात Vitamin D ची पातळी कशी वाढवावी?

उत्तर:  शक्य तेव्हा सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान २०-३० मिनिटे हात, पाय, चेहरा उघडे ठेवून सूर्यप्रकाश घ्या.  फोर्टिफाइड दूध, अंडी, मासे, मशरूम यासारखे Vitamin D युक्त पदार्थ खा.  
सतत थकवा, हाड-सांधे दुखणे, स्नायू कमजोरी, वारंवार सर्दी होत असेल तर रक्त तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने Vitamin D चे सप्लिमेंट्स घ्या.





Source link

शाळा_बंद : महाराष्ट्रातील शिक्षकांचा राज्यव्यापी मोर्चा – TET, संचमान्यता आणि वेतनश्रेणीसाठी मोठा संघर्ष!

0
शाळा_बंद : महाराष्ट्रातील शिक्षकांचा राज्यव्यापी मोर्चा – TET, संचमान्यता आणि वेतनश्रेणीसाठी मोठा संघर्ष!

फलटण प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी ५ डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनासाठी एकत्र येणार आहेत. या दिवशी सरकारी, अनुदानित तसेच खासगी शाळा एका दिवसासाठी बंद राहणार असून, शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयांजवळ भव्य मोर्चा काढण्याचे ठरवले आहे.

सातारा जिल्हा समन्वय समितीने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याची आवाहन केली आहे. शिक्षकांनी एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन, शाळा बंद करून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या आंदोलनामागील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

  • २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET परीक्षा अनिवार्य न करणे.
  • संचमान्यता जुन्या निकषांनुसार देणे.
  • शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करणे.

गेल्या अनेक महिन्यांपासून या मागण्यांवर निर्णय न झाल्याने शिक्षक संघटनांनी संप, शाळा बंद आणि राज्यव्यापी मोर्चाचा इशारा दिला आहे. संघटनांचे म्हणणे आहे की, सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर पुढील काळात आणखी तीव्र आंदोलनाची शक्यता आहे.

या आंदोलनामुळे ५ डिसेंबरला राज्यातील शिक्षण व्यवस्था एका दिवसासाठी ठप्प होण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी होऊन आपली ताकद दाखवण्याचे उद्दिष्ट आहे.

फलटण तालुक्यातील आसू येथे जातीय हल्ला; आरोपीवर गुन्हा, तरीही आरोपीला अटक नाही ,पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षणाची मागणी

0
फलटण तालुक्यातील आसू येथे जातीय हल्ला; आरोपीवर गुन्हा, तरीही आरोपीला अटक नाही ,पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षणाची मागणी

फलटण, जि. सातारा (02 डिसेंबर 2025): फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या घटनेत आरोपी राजन दिनकर फराटे यांनी फिर्यादी रमा नंदकुमार पवार आणि तिच्या पतीवर शारीरिक हल्ला केला, अशी तक्रार पीडितांनी केली आहे. पीडितांनी आरोपीच्या तात्काळ अटकेची मागणी केली आहे तसेच त्यांच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्याची विनंती केली आहे.

घटनेनुसार, दि. 30/11/2025 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास, फिर्यादी आणि तिचे पती आसु बाजूकडून बारामतीकडे जात असताना आरोपीच्या मालकीची चारचाकी गाडी MH 42 CS 4545 ने त्यांना अडथळा आणला. आरोपीने गाडी भरधाव वेगाने चालवून फिर्यादीचे पती आणि फिर्यादीवर हाताने मारहाण केली. मारहाणीत फिर्यादीच्या गळ्याच्या डाव्या बाजूला आरोपीचे नख लागल्याचे नमूद केले आहे. दोघांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत.

फिर्यादींच्या मते, आरोपीने जातीय अपशब्द वापरून धमकावले आणि पीडित कुटुंबावर दबाव आणला. आरोपी धनवान असून राजकीय प्रभाव असल्याचेही नमूद केले गेले आहे. घटनेची सुरुवात शुल्लक कारणावरुन झाली असून आरोपीला फिर्यादींची जात माहित होती.

या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 तसेच भारतीय दंड संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तथापि, अद्याप आरोपीवर अटक झालेली नाही.

पीडित कुटुंबाला सुरक्षितता आणि समाजातील न्याय सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • मा. जिल्हाधिकारी सो सातारा
  • मा. जिल्हा पोलिस अधिक्षक सो सातारा
  • मा. आयुक्त समाज कल्याण सो सातारा
  • मा. नोडल ऑफिसर सो सातारा
  • मा. उपविभागीय पोलिस अधिकारी सो फलटण
  • मा. पोलिस निरीक्षक सो फलटण ग्रामीण पोलिस ठाणे
  • मा. तहसिलदार सो फलटण