Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 86

फलटण नगरपरिषद निवडणूक : शिंदे गट–राजे गटाच्या प्रचाराला नवा जोम; आबासाहेब मंदिरातून  प्रचाराची सुरुवात

0
फलटण नगरपरिषद निवडणूक : शिंदे गट–राजे गटाच्या प्रचाराला नवा जोम; आबासाहेब मंदिरातून  प्रचाराची सुरुवात

फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत असून आज पुन्हा एकदा प्रचार मोहिमेला मोठा वेग मिळाला. शिवसेना (शिंदे गट) व राजे गटाच्या संयुक्त प्रचाराची सुरुवात फलटण शहरातील महानुभव पंथाची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आबासाहेब मंदिरातून करण्यात आली.

नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार विकास वसंतराव काकडे आणि स्मिताताई शहा यांनी आत्मविश्वास, नव्या आशा व विकासाच्या दृढ संकल्पासह प्रचाराला प्रारंभ केला. मंदिरात दर्शन घेऊन श्रीफळ वाढविण्यात आले.

यानंतर उमेदवारांनी प्रभागातील घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला. नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, ड्रेनेज व अन्य स्थानिक समस्यांबाबत आपली मते मांडली. या सर्व प्रश्नांवर नियोजनबद्ध व सकारात्मक उपाययोजना राबविण्याची ग्वाही उमेदवारांनी दिली.

प्रचार फेरीदरम्यान महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, तरुणांचा जोमदार पाठिंबा आणि विविध समाजघटकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. जागरूक नागरिकांनी उमेदवारांचे मनःपूर्वक स्वागत करत विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

यावेळी उमेदवारांनी सामाजिक समता, सर्वसमावेशक विकास व शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले

वाढत चाललेला जनसमर्थनाचा ओघ पाहता फलटण नगरपरिषद निवडणूक अधिक चुरशीची व लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: रोजनिशीसारखेच मुलांशी‎ नात्यांचे मूल्यांकन करावे‎

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  रोजनिशीसारखेच मुलांशी‎ नात्यांचे मूल्यांकन करावे‎


  • Marathi News
  • Opinion
  • Pt. Vijayshankar Mehta’s Column, Evaluate Your Relationships With Children On A Daily Basis

1 दिवसापूर्वी

  • कॉपी लिंक

आपली मुले हळूहळू अशा जगात जगत आहेत जिथे त्यांनी‎आपल्यासारखे जगले पाहिजे – हा आग्रह करू नये. काहीही असो.‎ते चांगला माणूस म्हणून जगले पाहिजेत. आपल्या मुलांशी जोडलेले‎रहा. भले मग एखादा तंतू किंवा धागा का असेना. तुमच्याकडे‎काहीही असो, जोडलेले रहा. आपण आपले विचार आणि भावना‎वहीमध्ये लिहितो तेव्हा त्याला जर्नलिंग किंवा रोजनिशी म्हणतात.‎

मुलांसोबतच्या नात्यातही असाच सराव करावा. त्यांचे वर्तन,‎स्वभावातील बदल व तुम्ही काय करू शकता ते लिहा. आपण‎त्यांच्या वह्या, गुणपत्रिका पाहतो. इतर गोष्टींचेही मूल्यांकन करतो.‎परंतु नात्याचा आढावा जर्नलिंगसारखा करावा. मुलाने या महिन्यात‎काय केले – नकारात्मक असो किंवा सकारात्मक – याकडे बारकाईने‎लक्ष द्या आणि ते लिहून ठेवा. आणि त्यांच्या वर्तनाबद्दल मांडलेले‎मुद्दे पालकत्वात नियोजनबद्ध पद्धतीने समाविष्ट करा. तुम्हाला चांगले‎परिणाम मिळतील.



Source link

पुण्यासह साताऱ्यात मिनी काश्मीरचा फील; थंडीच्या अलर्टमुळे शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी, पा

0


पुणे: राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा या ठिकाणी कडाक्याची थंडी (maharashtra Weather Update) पडली आहे.महाबळेश्वरपेक्षाही पुणे गारठल्याचं आज दिसून येत आहे, पुण्यात थंडी चांगलीच वाढली आहे. पुण्याचं तापमान ७ अंश सेल्सियसवरती पोहचलं आहे, तर महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १० अंशावर आहे. पुण्यातील (Pune News) तापमानात दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. त्यामुळे पुणेकर गुलाबी थंडी अनुभवत आहे. (maharashtra Weather Update)

Weather Update: साताऱ्यात येऊ लागला मिनी काश्मीरचा फील

महाबळेश्वर पेक्षा साताऱ्यात थंडीचा कडाका वाढला आहे. थंडी वाढल्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली असल्याचं दिसून येत आहे. साताऱ्यात थंडीचा कडाका प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा झपाट्याने खाली येत आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर पेक्षाही जास्त थंडी साताऱ्यात पडली आहे.  महाबळेश्वरचे १० अंश सेल्सिअस तापमान आहे तर साताऱ्यात ९ अंश सेल्सिअस तापमान आहे. त्यामुळे साताऱ्यातच मिनी काश्मीर असल्याचा फील येऊ लागला आहे. सातारासह ग्रामीण भागात जागोजागी काही प्रमाणात शेकोट्या पेटवल्या जात आहेत. मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे.

Weather Update: थंडीच्या यलो अलर्टमुळे शाळेच्या वेळेत बदल करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जळगावमध्ये शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.पश्चिमी अति थंड कोरड्या वाऱ्यांच्या झोतामुळे ठिकठिकाणी थंडीची लाट किंवा लाट सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे २० ते २५ डिसेंबर पर्यंत थंडीची तीव्रता राहणार आहे. शाळांमध्ये थंडीमुळे सुट्टी जाहीर करणे किंवा वेळेत बदल करणे हा निर्णय प्रशासकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन संबंधित असतो. मात्र मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता जपली जावी हे यामागे मुख्य कारण आहे. तापमानाची तीव्रता (५ डिग्री ते ८ डिग्री), अती थंडी लाट, दाट धुके तसेच काही विद्यार्थी यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते म्हणून त्यांना थंडी लवकर लागते. थंडीमुळे शाळांना सुट्टी देण्यामागे किंवा वेळेत बदल संविधानाचे कलम २१ (सुरक्षित जीवनाचा हक्क) हे नैतिक आणि कायदेशीर आधार आहे. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन जळगांव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण शाळा व्यवस्थापन यांना शाळेच्या वेळेत काही दिवसासाठी बदल करण्यासाठी सूचना कराव्यात अशी विनंती ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आली आहे.

Weather Update: जळगाव जिह्यात सध्या थंडीची लाट

कडाक्याच्या उन्हाळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिह्यात सध्या थंडीची लाट पसरली असून आज जळगावचे तापमान ६.५ अंश सेल्सिअसवरती आले आहे. अनेक नागरिक सकाळी सकाळी बाहेर पडताना गरम कपड्याचा वापर करत आहेत. जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत. तर सलग चौथ्या दिवशी दापोलीचा तापमानाचा पारा घसरला आहे, दापोलीकरांना हुडहुडी भरली आहे.
तापमान ६.५ वर अंश सेल्सिअसवरती आले आहे. तर खेड चिपळूण गुहागरमध्ये देखील थंडीची लाट पसरली आहे.

आणखी वाचा



Source link

‘या’ बँकेत खातं असेल तर ऑनलाईन पेमेंट करता येणार नाही; भारतातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेने जारी केल्या सूचना

0
‘या’ बँकेत खातं असेल तर ऑनलाईन पेमेंट करता येणार नाही; भारतातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेने जारी केल्या सूचना



भारतातील सर्वात मोठ्या खजागी बँकेने सूचना जारी केली आहे. ‘या’ बँकेत खातं असेल तर ऑनलाईन पेमेंट करता येणार नाही. 



Source link

प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिताय? मायक्रो प्लास्टिकचा तुमच्या शरीरावर ‘असा’ होतोय परिणाम!

0
प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिताय? मायक्रो प्लास्टिकचा तुमच्या शरीरावर ‘असा’ होतोय परिणाम!


Drinking water from a plastic bottle: तुम्ही जर प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पीत असाल तर आधीच सावध व्हा. कारण सतत प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पीत असाल तर तुमच्या शरिराराला धोका निर्माण होऊ शकतो. काय आहेत याचे धोके? तुमच्या शरीरावर नेमका कसा होतो परिणाम? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिणं हे नित्याचं झालंय. प्रवासाला निघताना आपण कुठल्याही दुकानातून प्लास्टिकची बाटली घेतो आणि तहान भागवतो.प्लास्टिकची पाण्याची बाटली ही अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत मोडू लागलीये. काही वर्षांपूर्वी प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिणं ही अतिश्रीमंती मानली जायची. पण आता प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिणं ही रोजची गरज झालीय. काहीजण ऑफिसलाही प्लास्टिकची बाटलीच पाणी पिण्यासाठी वापरतात.

तुमच्या आयुष्यातल्या दैनंदिन गरजांचा भाग बनलेली प्लास्टिकची बाटली आणि त्यातलं पाणी सुरक्षित आहे का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अमेरिकेतल्या नॉर्थ कोलंबिया विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार प्लास्टिक बाटलीतलं पाणी आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचा निर्वाळा देण्यात आलाय. या विद्यापीठाच्या संशोधनानुसार प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीत लाखो प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळून आलेत. नळाच्या पाण्यापेक्षाही प्लास्टिकच्या बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण कितीतरी प्रमाणात असल्याचं संशोधन सांगतं.

प्लास्टिकमुळं होणा-या प्रदूषणाचा माणसाच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ लागलाय. समुद्रातल्या प्लास्टिकमुळं जैवविविधता धोक्यात आलीय. एवढंच नाहीतर मायक्रो प्लास्टिकचं प्रमाण माशांच्या शरीरातही आढळून आलंय. आता तर प्लास्टिक पाण्याच्या बाटलीतही मायक्रो प्लास्टिक आढळून आल्यानं हे प्रकरण आणखी गंभीर झाल्याचं सांगण्यात येतंय.

बाटलीबंद प्लास्टिकच्या पाण्यातील मायक्रो प्लास्टिकमुळं पोटात जळजळ होणे, हार्मोनल विकार,अवयवांमध्ये मायक्रो प्लास्टिक गोळा होणे अशा प्रकारचे गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात.  प्लास्टिक बाटली आणि पाणी याचं नातं तोडण्याची गरज निर्माण झालीय. प्लास्टिकचा वापर कमीतकमी करणे हाच यावर ,सर्वात मोठा उपाय असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

तज्ज्ञ काय देतात सल्ला?

प्लास्टिक बाटलीतलं पाणी पिऊ नये, प्लास्टिक पाऊचमधील पाणी पिणं टाळा, प्लास्टिकच्या बाटलीत खूप दिवस साठवलेलं पाणी पिऊ नये तसेच स्टिल किंवा इतर धातूची बाटली पाणी पिण्यासाठी वापरा असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. पाणी हे माणसासाठी अमृतासमान आहे. पण प्लास्टिकच्या बाटलीत हे पाणी गेलं की त्यात मायक्रो प्लास्टिक मिसळलात. त्यामुळं प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिऊन आजारी पडण्यापेक्षा पाणी पिण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करा. सगळ्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी शुद्ध असतं हे डोक्यातून काढून टाका. या संशोधनामुळं भविष्यात पिण्याचं पाणी साठवण्यासाठी प्लास्टिक बाटल्यांऐवजी नवा पर्याय शोधावा लागणार आहे.

FAQ

१. प्रश्न: प्लास्टिकच्या बाटलीतील पाण्यात नेमके काय धोकादायक आढळले आहे?

उत्तर: अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधनानुसार, प्लास्टिकच्या बाटलीबंद पाण्यात लाखो सूक्ष्म प्लास्टिक कण (मायक्रोप्लास्टिक) आढळतात. नळाच्या पाण्याच्या तुलनेत हे कण कितीतरी जास्त प्रमाणात असतात, जे शरीरात शिरकाव करून आरोग्याला हानिकारक ठरतात.

२. प्रश्न: प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी सतत पिल्याने शरीरावर काय परिणाम होऊ शकतात?

उत्तर: मायक्रोप्लास्टिकमुळे पोटात जळजळ होणे, हार्मोनल असंतुलन, अवयवांमध्ये प्लास्टिक कण जमा होणे यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे जैवविविधतेवर आणि मानवी आरोग्यावर दीर्घकाळ विपरीत परिणाम होतो.

३. प्रश्न: प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी टाळण्यासाठी तज्ज्ञ काय सल्ला देतात?

उत्तर: प्लास्टिकच्या बाटली किंवा पाऊचमधील पाणी पूर्णपणे टाळा, जुन्या प्लास्टिक बाटलीत साठवलेले पाणी पिऊ नका. त्याऐवजी स्टील किंवा इतर धातूच्या बाटलीचा वापर करा आणि प्लास्टिकचा वापर शक्य तितका कमी करा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.





Source link

तुम्ही रोज खात असलेले ‘हे’ 3 पदार्थ ठरू शकतात तुमच्या यकृतासाठी हानिकारक, होऊ शकते फॅटी लिव्हरची समस्या

0
तुम्ही रोज खात असलेले ‘हे’ 3 पदार्थ ठरू शकतात तुमच्या यकृतासाठी हानिकारक, होऊ शकते फॅटी लिव्हरची समस्या


Fatty Liver Health: आजच्या धावपळीच्या जीवनात आपण रोज खात असलेले काही पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात, विशेषतः यकृतासाठी. यकृत आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या शरीरातील 500 हून अधिक महत्त्वाचे कार्य करतो जसे की; शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे, पचनास मदत करणे, उर्जा साठवणे, रक्तासाठी प्रथिने तयार करणे आणि संसर्गाशी लढणे. म्हणूनच, यकृताची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Add Zee News as a Preferred Source

 

तज्ज्ञांच्या मते, फॅटी लिव्हर (Non-Alcoholic Fatty Liver Disease) ही समस्या भारतात वेगाने वाढत आहे. सुमारे 25 ते 30 टक्के भारतीयांना याचा त्रास आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रोजच्या आहारातील काही सामान्य पदार्थ, जे यकृतात चरबी साठवतात आणि त्याचे कार्य बिघडवतात. जसे की, प्रोसेस्ड शुगरयुक्त पदार्थ जसे कोल्ड ड्रिंक्स, केक, बिस्किटे आणि चॉकलेट्स. यातील फ्रक्टोज हे यकृतात थेट चरबीमध्ये रूपांतरित होते. संशोधनानुसार रोज एक कॅन कोल्ड ड्रिंक पिणाऱ्यांना फॅटी लिव्हरचा धोका 80 टक्क्यांनी वाढतो.

 

याशिवाय दुसरे धोकादायक पदार्थ म्हणजे तळलेले आणि डीप फ्राय केलेले फ्रेंच फ्राईज, समोसे, वडापाव आणि चिप्स. यातील ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स यकृतात इन्फ्लेमेशन वाढवतात. विशेषतः हिवाळ्यात थंड वातावरणामुळे सर्वांना गरम आणि तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. पण रोज बाहेरील तेलकट पदार्थांचे सेवन केल्यास फॅटी लिव्हरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

 

तिसरा पदार्थ आहे रिफाइंड तेल आणि मैद्याचे पदार्थ जसे व्हाइट ब्रेड, पास्ता, नान किंवा पिझ्झा. यातील रिफाइंड कार्ब्स रक्तातील साखर जलद वाढवतात आणि यकृतात चरबी साठवतात. तज्ज्ञ सांगतात, हे पदार्थ खाणे टाळल्यास फॅटी लिव्हरचा धोका 50 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणे थकवा, पोटात जडपणा, वजन वाढणे अशी असतात. यावर उपाय म्हणून तुम्ही तुमच्या आहारात होल ग्रेन्स, हिरव्या भाज्या, नट्स यांचा समावेश करू शकता. तसेच नियमित व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याशिवाय रोज कमीत कमी 30 मिनिटे चालल्याने यकृत निरोगी ठेवण्यास मदत होते.

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

सुर्यपूत्र भैय्यासाहेब यशवंत आंबेडकर :धम्मकार्यातील त्याग, समर्पण आणि आंबेडकरी वारशाचे खरे शिल्पकार

0
सुर्यपूत्र भैय्यासाहेब यशवंत आंबेडकर :धम्मकार्यातील त्याग, समर्पण आणि आंबेडकरी वारशाचे खरे शिल्पकार

साहस टाईम्स :- चैत्यभूमीचे शिल्पकार : भैय्यासाहेब यशवंतराव आंबेडकर”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र यशवंत ‘भैय्यासाहेब’ आंबेडकर यांचा जन्म १२ डिसेंबर १९१२ रोजी मुंबई येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना न्यूमॅनेटीक आणि पोलिओसारख्या रोगांनी ग्रासले होते. गावठी औषधोपचारांमुळे त्यांना त्यातून बरे करण्यात आले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्यांचा विवाह १९ एप्रिल रोजी मीराताईंसोबत झाला.

भैय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा करून घेतला नाही. त्यांनी आपले आयुष्य आपल्या कर्तृत्वाने उभे केले. त्यांनी प्रथम सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळ परिसरातील बांधकाम व्यवसाय सुरू केला. या उद्योगात त्यांनी कोणालाही वाटेकरी केले नाही. त्यांचा व्यवसाय यशस्वीपणे चालत होता.

यानंतर त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी ‘भारतभूषण प्रिंटिंग प्रेस’ हा छापखाना सुरू केला; नंतर त्याचे नाव ‘बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस’ असे ठेवण्यात आले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या सर्व मुखपत्रांचे व्यवस्थापन भैय्यासाहेबच पाहू लागले. जनता, प्रबुद्ध भारत या नियतकालिकांचे ते सर्वेसर्वा होते. या प्रेसमध्ये बाबासाहेबांचे नामांकित ग्रंथ जसे “Thoughts on Pakistan”, “Federation Versus Freedom”, “Thoughts on Linguistic States” – हे भैय्यासाहेबांनीच छापले. Thoughts on Pakistan या ग्रंथाची अर्पणपत्रिका बाबासाहेबांनी रमाबाईंना समर्पित केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार वि.गो. आपटे लिखित “बौद्धपर्व” हा ग्रंथही त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने प्रकाशित केला. भैय्यासाहेबांचे लिखाण तर्कशुद्ध, विचारसमृद्ध आणि वाक्प्रचारांच्या प्रभावी वापरासाठी प्रसिद्ध होते.
स्मारक उभारणीत मोठा सहभाग : भैय्यासाहेबांनी डॉ.बाबासाहेबांची अनेक महत्त्वपूर्ण स्मारके उभारली. मुंबईतील डॉ. आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन २ एप्रिल १९५८ रोजी झाले व उद्घाटन २२ जून १९५८ रोजी झाले. कफ परेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्याच्या कामात त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. २६ जानेवारी १९६२ रोजी पुतळ्याचे अनावरण व्हावे असा आग्रह त्यांनी धरला आणि आवश्यक निधी स्वतः देऊन ते साध्य केले.
चवदार तळे क्रांतीस्थळावर बाबासाहेबांच्या मनुस्मृती दहनाच्या स्मृतीस्थळासाठी क्रांतीस्तंभ उभारण्याचा आग्रहही भैय्यासाहेबांनीच धरला. चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने दि.२०-३- १९५७ रोजी BMS कडे ४० x ४० ची जागा मागितली. BMS ने ८ x ८ ची जागा मंजूर केली. परंतु मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही असा पवित्रा भय्यासाहेबांनी घेतला . अखेर BMS improvement committee ने ४० x ४० ची जागा मान्य केली . शेड्युल कास्ट फेडेरेशन आणि रिपब्लिकन पक्ष एकसंघ होता तो पर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनताही आपला पै पैसा देत होती. लोकांनी स्टेट बँकेसमोर रांगा लावून स्मारक निधीसाठी पैसे जमा केला, आणि भैय्यासाहेब आंबेडकर कुलाबा –दहिसर–कल्याण भागात फिरून जनजागृती करत होते.
भीम-ज्योत : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अमृत महोत्सव : १९६६ साली डॉ.बाबासाहेबांचा ७५ वा जन्मदिवस “अमृत महोत्सव” स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय भैय्यासाहेबांनी घेतला. त्यानिमित्त ‘भीम-ज्योत’ महू–मुंबई अशी काढण्यात आली. २७ मार्च १९६६ रोजी या ज्योतीचे प्रज्वलन भारताचे मजूरमंत्री ना. जगजीवनराम यांच्या हस्ते झाले व अध्यक्षस्थानी खासदार दादासाहेब गायकवाड होते. भीम-ज्योत महू ते चैत्यभूमी असा प्रदीर्घ प्रवास करत आली आणि प्राप्त झालेल्या धम्मदानातून चैत्यभूमीचे स्मारक उभारण्यात आले.
धम्मकार्याचा अखंड ध्यास : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर भैय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले.
“भारत बौद्धमय करीन” हा बाबासाहेबांचा संकल्प त्यांनी उराशी बाळगला. धम्मदीक्षा, धम्मपरिषदा, मेळावे, गावोगावी विहारांचे उद्घाटन यांमधून त्यांनी धम्मकार्याला गती दिली. विधानपरिषदेत असताना दलित समाजाच्या हक्कांबद्दल त्यांनी जोरदार भूमिका मांडली. पंतप्रधान मोरारजी देसाई यांना भेटून बौद्धांच्या सवलतींबाबत त्यांनी पाठपुरावा केला.
१९६८ मध्ये मुंबई येथे भव्य धम्मपरिषद आयोजित केली. प्रमुख पाहुणे दलाई लामा होते. या परिषदेत बौद्ध संस्कार विषयक आचारसंहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली व “बौद्ध जीवन संस्कार पाठ” हे पुस्तक प्रसिद्ध झाले. भैय्यासाहेब ‘बौद्धाचार्य’ पदाचे जनक मानले जातात. धम्मप्रसाराचा एक अनोखा भाग म्हणजे १९६७ च्या धम्मचक्रप्रवर्तन दिनी भैय्यासाहेबांनी स्वतः श्रामणेर दीक्षा घेतली, व त्यांचे दीक्षानाम “महापंडित काश्यप” ठेवण्यात आले. काही काळ ते चैत्यभूमीतच राहिले.

१९५९ मध्ये संघरक्षित लंडनहून भारतात आल्यावर त्यांनी भैय्यासाहेबांना धार्मिक कार्य सोपविण्याची आणि त्याबदल्यात मानधन देण्याची प्रस्तावना केली. परंतु स्वाभिमानी भैय्यासाहेबांनी स्पष्ट सांगितले—
“मी माझ्या बापाची संस्था विकणार नाही. काम करायचे असेल तर आमच्या संस्थेतच करा.”
आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी आणि बौद्धधम्म प्रसारासाठी अर्पण केले. ते चैत्यभूमीचे शिल्पकार, महापंडित काश्यप, आणि खऱ्या अर्थाने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर होते.
जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम.

जय भीम! जय भारत! नमो बुद्धाय!

संकलन : सोमीनाथ पोपट घोरपडे
सामाजिक कार्यकर्ता, भारतीय बौद्ध महासभा

ब्रह्म चेलानी यांचा कॉलम: भारताच्या हितांकडे दुर्लक्ष करून मैत्री शक्य नाही

0
ब्रह्म चेलानी यांचा कॉलम:  भारताच्या हितांकडे दुर्लक्ष करून मैत्री शक्य नाही


  • Marathi News
  • Opinion
  • Brahma Chellani’s Column, Friendship Is Not Possible By Ignoring India’s Interests

8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अमेरिकेचे भारत धोरण दिवसेंदिवस द्वेषपूर्ण होत चालले आहे. परंतु त्यांनी हे ओळखले पाहिजे की अमेरिकेच्या दीर्घकालीन धोरणात्मक हितसंबंधांसाठी भारतापेक्षा कोणतीही शक्ती महत्त्वाची नाही. कारण लोकसंख्या, भौगोलिक स्थान आणि लष्करी क्षमता – अणुक्षमतेसह – भारत हा अनेक बाबतीत महत्त्वाचा ठरतो. आशियावर वर्चस्व गाजवण्याच्या आणि अमेरिकेच्या वर्चस्वाला बेदखर करण्याच्या चीनच्या प्रयत्नांना भारत आव्हान देऊ शकतो.

जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कारकिर्दीपासून वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारतासोबतची भागीदारी इंडो-पॅसिफिक प्रदेशात सत्तेचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाची मानली आहे. हे धोरण कधीही केवळ भाषणापुरते मर्यादित नव्हते. गेल्या दशकात अमेरिका-भारत सुरक्षा संबंध वेगाने वाढले – विशेषतः लष्करी आंतरकार्यक्षमता, गुप्तचर सहकार्य आणि तंत्रज्ञान देवाणघेवाणीत.

खरे तर ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिका-भारत संबंधांमधील काही वाढ घटली. चीनवरील दबाव वाढवत आणि पाकिस्तानला सुरक्षा मदत कमी करत असताना ट्रम्प यांनी त्यांच्या इंडो-पॅसिफिक धोरणाचा केंद्रबिंदू असलेल्या भारतासोबत सहकार्याचा विस्तारही केला. त्याचा परिणाम स्पष्ट आहे : भारत आज इतर कोणत्याही देशापेक्षा अमेरिकेसोबत अधिक लष्करी सराव करतो आणि अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे.

परंतु या प्रक्रियेत अमेरिकेने भारताला सतर्क राहण्याची अनेक कारणे देखील दिली. अफगाणिस्तानातून त्यांची विचित्र माघार. बायडेन यांच्या कार्यकाळात ती झाली होती. परंतु ती ट्रम्प यांच्या कार्यकाळातील करारावर आधारित होती. यामुळे अमेरिकेच्या नेतृत्वाचा शहाणपणा आणि विश्वासार्हतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले. कारण त्यांनी अफगाणिस्तानला पुन्हा तालिबानच्या ताब्यात दिले. 2022 मध्ये बायडेन प्रशासनाने पाकिस्तानला आयएमएफ बेलआउट मिळवून देण्यास मदत केली आणि नंतर त्यांच्या एफ-16 फ्लीटच्या आधुनिकीकरणासाठी 45 कोटी डॉलर्सचीही मंजुरी दिली. ट्रम्प यांनी पाकिस्तानकडे असलेला हा कल देखील तीव्र केला आहे. कारण अमेरिकेने पाकसोबत केलेल्या क्रिप्टोकरन्सी करारातून ते दिसून येते.

अमेरिकेने अनेकदा भारताच्या हितांकडे दुर्लक्ष केले. असे असूनही रशियाविरुद्ध निर्बंध लागू करताना ते भारताच्या पूर्ण निष्ठेची अपेक्षा करत राहिले. भारताने असहमती दर्शवली आणि सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी वाढवली. भारताला दूरच्या युरोपमधील संघर्षासाठी आपल्या राष्ट्रीय हितांचा त्याग करण्याचे कोणतेही कारण दिसले नाही. विशेषतः रशियावरील पाश्चात्य दबावाचा सर्वात मोठा फायदा चीनला होता. भारताने हे समीकरण यापूर्वीही पाहिले आहे. 2019 मध्ये ट्रम्प यांनी इराणवर कठोर निर्बंध लादले तेव्हा भारताला त्याच्या स्वस्त आणि सर्वात विश्वासार्ह ऊर्जास्रोतांपासून वंचित ठेवण्यात आले. चीनने याचा पुरेपूर फायदा घेतला. मोठ्या सवलतीत इराणी कच्चे तेल खरेदी केले आणि तेथे आपली सुरक्षा उपस्थिती वाढवली. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतरही असाच एक प्रकार उदयास आला. पाश्चात्त्य बाजारपेठांपासून रशियाला वेगळे करून त्यावर लादलेल्या निर्बंधांमुळे तो आर्थिकदृष्ट्या चीनवर अवलंबून राहिला. चीनला रशियाकडून त्याचे ऊर्जा पुरवठा मार्ग मजबूत करता आले. आता चीनला माहित आहे की तैवानविरुद्धच्या कारवाईमुळेही रशियन ऊर्जेवरील त्याचा प्रवेश कमी होणार नाही. यावेळी भारतानेही रशियन तेलावरील सवलतींचा फायदा घेतला. अमेरिका भारताला आवश्यक मानते. परंतु त्याच्या हितांकडे दुर्लक्ष करते. भारताला इंडो-पॅसिफिक प्रदेशातील त्याच्या धोरणाचा आधारस्तंभ बनवायचे आहे. तरीही ते भारताच्या आर्थिक क्षमता, प्रादेशिक सुरक्षा आणि धोरणात्मक स्वायत्ततेला थेट हानी पोहोचवणारी धोरणे देखील राबवते. म्हणूनच भारताला अमेरिकेविषयी अविश्वास वाटतो. भारताला रशियाशी संबंध मजबूत करण्यास भाग पाडले जात आहे. अमेरिकेला आपल्याशी चांगले संबंध हवे असतील तर त्यांनी आपल्याशी समानतेने वागले पाहिजे. (@प्रोजेक्ट सिंडिकेट)

QuoteImage

अमेरिका भारताला आवश्यक मानते तरीही ती भारताच्या हितांकडेही दुर्लक्ष करते. भारताला इंडो-पॅसिफिकमधील त्याच्या रणनीतीचा आधारस्तंभ बनवायचे आहे. एवढे असूनही अमेरिका भारतासाठी हानिकारक धोरणे राबवते.

QuoteImage

हा लेख मोबाइलवर ऐकण्यासाठी QR कोडला स्कॅन करावे.



Source link

एका चुकीमुळे येऊ शकतं तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य धोक्यात; हिवाळ्यातलं ‘साइलेंट थ्रेट’!

0
एका चुकीमुळे येऊ शकतं तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य धोक्यात; हिवाळ्यातलं ‘साइलेंट थ्रेट’!


Lung Health: हिवाळ्यात हवा कोरडी होणे, प्रदूषण वाढणे आणि AQI सतत ‘खराब’ पातळीवर जाणे—या तिन्ही गोष्टींमुळे घरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात बिघडते. अशा वेळी एअर प्युरीफायर्सचा वापर अपरिहार्य बनतो. परंतु, प्युरीफायर सतत चालू ठेवल्यास घरातील आर्द्रता घटते का आणि त्यामुळे फुफ्फुसांना त्रास होतो का, हा प्रश्न अनेकांना पडतो. याच पार्श्वभूमीवर आम्ही तज्ज्ञांकडून याबाबतचे वैज्ञानिक स्पष्टीकरण जाणून घेतले. वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील कन्सल्टंट पल्मनोलॉजिस्ट डॉ. सुलेमान लधानी यांनीही हे खरं असल्याचं सांगितलं.

Add Zee News as a Preferred Source

“एअर प्युरीफायर्स थेट ओलावा कमी करत नाहीत, पण बंद खोलीत ते सतत हाय मोडवर चालू ठेवल्यास घरातील आर्द्रता घटते. कमी आर्द्रतेमुळे नाक, घसा आणि श्वसनमार्गाची आवरणं संवेदनशील होतात. त्यामुळे कोरडेपणा, खवखव, खोकला, आणि डोळे जळजळणे यांसारखे त्रास होऊ शकतात. स्वच्छ हवा महत्त्वाची आहे, पण फुफ्फुसांना स्वच्छ आणि किंचित आर्द्र हवा  सर्वात जास्त आवडते,” असे डॉ. लधानी म्हणाले.

 प्युरीफायरचा वापर कमी करावा का?

डॉ. लधानी यांच्या मते, AQI खूप वाढलेल्या दिवसात, विशेषतः मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी आणि दमा⁠/⁠अॅलर्जी असलेल्या लोकांसाठी, प्युरीफायर आवश्यकच असतात. “उपाय म्हणजे ते बंद करणं नाही; तर योग्य पद्धतीने वापरणं. ऑटो मोडचा वापर करा, काही तासांनी मशीन बंद ठेवा, आणि खोली पूर्णतः सील करून दीर्घकाळ चालू ठेवणं टाळा. योग्य ओलावा राखण्यासाठी प्युरीफायरसोबत ह्यूमिडिफायर, पाण्याचं भांडे किंवा ओला टॉवेल यांचाही उपयोग होतो. घरातील आर्द्रता आदर्शपणे 40–60% दरम्यान असावी,” असे त्यांनी सांगितले.

घरातील हवा खूप कोरडी झाल्याचे कसे कळते?

सतत घसा खवखवणे, सकाळी नाकातून रक्त येणे, कोरडा खोकला, त्वचेला जाणवणारा कोरडेपणा, किंवा श्वसनमार्गात खडबडीतपणा जाणवणे—ही सर्व लक्षणे हवेतील अत्यल्प आर्द्रतेची संकेत असू शकतात.
“लोक यासाठी प्रदूषणालाच दोष देतात, पण घरातील कोरडी हवा हे दुर्लक्षित कारण असतं,” असे डॉ. लधानी म्हणाले.

हवा अधिक निरोगी कशी ठेवता येईल?

प्युरीफायरचा मर्यादित वापर करा; सतत ‘टर्बो’ मोडवर ठेवू नका.खोलीला ओलावा द्या—ह्यूमिडिफायर, पाण्याची वाटी किंवा ओला टॉवेल मदत करू शकतात.सॅलाइन स्प्रेने नाकातील ओलावा टिकवा.प्रदूषण कमी असलेल्या वेळेत (सकाळी) खिडक्या उघडून वायुविजन करा. AQI जास्त असताना खिडक्या⁠/⁠दरवाजे बंद ठेवा.प्युरीफायरचे फिल्टर नियमित तपासा आणि बदलत राहा; ब्लॉक झालेली फिल्टर्स कार्यक्षमता कमी करतात.

आणखी काय लक्षात ठेवावे?

घरातील रोपं प्युरीफायरची किंवा व्हेंटिलेशनची जागा घेऊ शकत नाहीत, पण ते वातावरणात थोडा ओलावा वाढवतात आणि खोली अधिक सुखद बनवतात. “त्या उपयोगी असल्या तरी मुख्य उपाय म्हणून नाही—फक्त पूरक म्हणून पहावीत,” असे डॉ. लधानी म्हणाले. बाहेरची हवा अत्यंत प्रदूषित असली तरी तुमचं घर अधिक सुरक्षित श्वसनस्थान बनवता येऊ शकतं. “गर्भित मुद्दा एकच—स्वच्छ हवा आणि योग्य आर्द्रता यांचा समतोल राखा. फक्त स्वच्छ हवा पुरेशी नाही; स्वच्छ आणि आरामदायी ओलाव्याची हवा फुफ्फुसांसाठी सर्वाधिक हितकारक आहे,” असे डॉ. लधानी यांनी सांगितले.

FAQ

१. प्रश्न : एअर प्युरीफायर चालू ठेवल्याने खरंच घरातील ओलावा कमी होतो का?

उत्तर : होय, थेट नाही पण अप्रत्यक्षपणे होतो. बंद खोलीत प्युरीफायर सतत हाय किंवा टर्बो मोडवर चालू ठेवला तर हवेचा ओलावा खूप कमी होतो. यामुळे नाक-घसा कोरडा पडणे, खवखवणे, खोकला, डोळे जळजळणे असे त्रास होऊ शकतात. पल्मनोलॉजिस्ट डॉ. सुलेमान लधानी यांनीही हे मान्य केलंय.

२. प्रश्न : मग प्रदूषण जास्त असताना प्युरीफायर बंदच करायचं का?

उत्तर : अजिबात नाही! विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा-ॲलर्जीचे रुग्ण असतील तर प्युरीफायर बंद करू नका. फक्त योग्य पद्धतीने वापरा:  ऑटो मोड लावा  
काही तास चालवून थोडा वेळ बंद ठेवा  
खोली पूर्ण सील करू नका  
सोबत ह्यूमिडिफायर, पाण्याची वाटी किंवा ओला टॉवेल ठेवा
आदर्श ओलावा ४०-६० टक्के ठेवा.

३. प्रश्न : घरात हवा खूप कोरडी झाली आहे हे कसं कळेल आणि काय करावं?

उत्तर : ही लक्षणं दिसली तर समजावं की ओलावा खूप कमी आहे:  सकाळी नाकातून रक्त येणे  
घसा सतत खवखवणे, कोरडा खोकला  
त्वचा खूप कोरडी पडणे  
श्वास घेताना खडखडाट जाणवणे

उपाय:  प्युरीफायर कमी वेळ चालवा  
ह्यूमिडिफायर किंवा पाण्याचं भांडं ठेवा  
नाकात सॅलाइन स्प्रे टाका  
सकाळी AQI कमी असताना खिडक्या १५-२० मिनिटं उघडा  
घरात हिरवी रोपं ठेवा (थोडा ओलावा वाढवतात)





Source link

‘777’ ची गुगलवर का होतेय चर्चा? या ट्रेंडिंग नंबरचा खरा अर्थ जाणून घ्या

0
‘777’ ची गुगलवर का होतेय चर्चा? या ट्रेंडिंग नंबरचा खरा अर्थ जाणून घ्या


गुगल ट्रेंड्स सध्या एक नंबर ट्रेंड होतोय. सगळ्यांच्या नजरा फक्त एकाच नंबरवर खिळल्या आहेत. त्या म्हणजे 777 हा नंबर. अगदी मिम्हीसपासून ते स्टोरीपर्यंत हा नंबर दिसतोय. पण प्रत्यक्षात एअर फ्रान्सच्या प्रमुख एअरलाइन चळवळीशी जोडलेली आहे, जी थेट बोईंग 700-300 ईआर विमानाशी संबंधित आहे.

Add Zee News as a Preferred Source

एअर फ्रान्सचा मोठा निर्णय

एअर फ्रान्सने अनेक नवीन लांब पल्ल्याच्या मार्गांवर त्यांची प्रीमियम ला प्रीमियर 777-300ER तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रॅव्हल पोर्टलवर ही बातमी येताच, लोकांनी या नवीन अपग्रेडमध्ये काय समाविष्ट आहे हे जाणून घेण्यासाठी 777 शोधण्यास सुरुवात केली.

या ट्रेंडिंग नंबरचा खरा अर्थ जाणून घ्या. गुगल ट्रेंड्स: 777 इंटरनेटचा नवीन सुपरस्टार बनला आहे. एअर फ्रान्सच्या 777-300 ईआर अपग्रेडमुळे सर्च वाढले आहेत आणि एंजल नंबर आणि गेमिंग क्रेझमुळे तो आणखी व्हायरल झाला आहे. एकूणच, हा एक असा नंबर बनला आहे ज्याकडे प्रत्येकजण पाहत आहे आणि स्वतःची कारणे शोधत आहे.

777 ने गुगलवर खळबळ का निर्माण केली?

गुगल ट्रेंड्स 777 नंबर: आज गुगल ट्रेंड्स उघडणाऱ्या प्रत्येकाला एकाच गोष्टीची ओढ होती: 777 नंबर. पहिल्या दृष्टीक्षेपात, तो एक गूढ, मीम किंवा व्हायरल इंटरनेट स्टोरी वाटला असेल, परंतु वास्तव अगदी वेगळे असल्याचे दिसून आले. ही वाढ प्रत्यक्षात एअर फ्रान्सच्या प्रमुख एअरलाइन चळवळीशी जोडलेली आहे, जी थेट बोईंग 777- 300 ER विमानाशी संबंधित आहे.

गुगल ट्रेंड्सवर 777 का ट्रेंडिंग आहे?

आज सकाळी गुगल ट्रेंड्स उघडणाऱ्या प्रत्येकाला एकाच नंबरकडे आकर्षित केले गेले. 777 पहिल्या दृष्टीक्षेपात, ते एक नवीन मीम, एक गूढ एंजेल नंबर ट्रेंड किंवा व्हायरल थिअरीसारखे वाटत होते, परंतु यावेळी, प्रकरण काहीतरी वेगळेच निघाले. ‘777’ नंबरमध्ये अचानक झालेली ही वाढ प्रत्यक्षात एअर फ्रान्सने बोईंग 777-300 ER बाबत केलेल्या एका मोठ्या हालचालीशी जोडलेली आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.





Source link