Tuesday, August 11, 2026
Homeसाताराफलटण नगरपरिषद निवडणूक : शिंदे गट–राजे गटाच्या प्रचाराला नवा जोम; आबासाहेब मंदिरातून ...

फलटण नगरपरिषद निवडणूक : शिंदे गट–राजे गटाच्या प्रचाराला नवा जोम; आबासाहेब मंदिरातून  प्रचाराची सुरुवात

फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत असून आज पुन्हा एकदा प्रचार मोहिमेला मोठा वेग मिळाला. शिवसेना (शिंदे गट) व राजे गटाच्या संयुक्त प्रचाराची सुरुवात फलटण शहरातील महानुभव पंथाची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आबासाहेब मंदिरातून करण्यात आली.

नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार विकास वसंतराव काकडे आणि स्मिताताई शहा यांनी आत्मविश्वास, नव्या आशा व विकासाच्या दृढ संकल्पासह प्रचाराला प्रारंभ केला. मंदिरात दर्शन घेऊन श्रीफळ वाढविण्यात आले.

यानंतर उमेदवारांनी प्रभागातील घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला. नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, ड्रेनेज व अन्य स्थानिक समस्यांबाबत आपली मते मांडली. या सर्व प्रश्नांवर नियोजनबद्ध व सकारात्मक उपाययोजना राबविण्याची ग्वाही उमेदवारांनी दिली.

प्रचार फेरीदरम्यान महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, तरुणांचा जोमदार पाठिंबा आणि विविध समाजघटकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. जागरूक नागरिकांनी उमेदवारांचे मनःपूर्वक स्वागत करत विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

यावेळी उमेदवारांनी सामाजिक समता, सर्वसमावेशक विकास व शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले

वाढत चाललेला जनसमर्थनाचा ओघ पाहता फलटण नगरपरिषद निवडणूक अधिक चुरशीची व लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments