Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 85

‘डोक्यावर परिणाम झालाय’, रणजीत नाईक निंबाळकरांचा रामराजेंवर पलटवार; म्हणाले, महिलांच्या अन्याया

0


Ramraje Nimbalkar vs Ranjitsinh Nimbalkar: सातारा जिल्ह्यातील फलटण (Phaltan) नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Nimbalkar) आणि भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर (Ranjitsinh Nimbalkar) यांच्यात आरोप–प्रत्यारोप सुरु आहेत. महिलांवर अन्याय झाला तर “हा रामराजे काळा कोट घालून कोर्टात उभा राहील,” असे विधान करत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्याला रणजीत नाईक निंबाळकर यांनी नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली. 

Ramraje Nimbalkar: तर काळा कोट घालून मी कोर्टात उभे राहील: रामराजे नाईक निंबाळकर 

रामराजे म्हणाले की, डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस करतील, त्यात सत्य बाहेर येईल. मात्र या घटनेनंतर फलटणचे नाव राज्यभर बदनाम झाले आहे. “समोर बसलेल्या महिलांच्या माहेरहूनही ‘कसलं हे फलटण’ अशा फोन आले असतील. अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्यापेक्षा अधिक दोषी असतो. तुमच्या मागे मी आहे, घाबरू नका. यापुढे कार्यकर्त्यांना किंवा महिला भगिनींना त्रास झाला तर हा रामराजे काळा कोट घालून तुमच्यासाठी कोर्टात उभा राहील,” असे वक्तव्य त्यांनी केले.

Ramraje Nimbalkar: भाजपच्या बदनामीचे मूळ कारण साताऱ्यात: रामराजे नाईक निंबाळकर 

याच सभेत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपवर निशाणा साधत, “भारतीय जनता पार्टीच्या बदनामीचे मूळ कारण हे साताऱ्यात आहे,” असा आरोपही केला. त्यांनी 2019 मधील राजकीय चर्चांचा उल्लेख करत सांगितले की, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, संजीवराजे, जयकुमार गोरे आणि स्वतः आपण एकत्र बसून 2024 ची निवडणूक एकत्र लढवण्याबाबत चर्चा केली होती. “तेव्हाचे मुख्यमंत्री माझ्या बाजूने होते. आता त्यांनी क्लीन चिट दिली असेल, मात्र ते इथे आल्यावर काय बोलायचं तो त्यांचा अधिकार आहे,” असेही ते म्हणाले.

Ranjitsinh Nimbalkar: डोक्यावर परिणाम झाल्यानंतर काही माणसं अशी विधानं करताय: रणजीत नाईक निंबाळकर 

दरम्यान, रामराजे यांच्या या वक्तव्याला भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “साताऱ्यातील भारतीय जनता पार्टी आम्ही उंचीवर नेऊन ठेवली आहे. लोकसभेला याआधी सर्वाधिक मतदान भाजपलाच मिळाले आहे. डोक्यावर परिणाम झाल्यानंतर काही लोक अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत,” असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. 

Ranjitsinh Nimbalkar: महिलांच्या अन्यायावर बोलण्याचा अधिकार त्यांना नाही: रणजीत नाईक निंबाळकर 

रणजीत नाईक निंबाळकर यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही पलटवार करत, “महिलांच्या अन्यायावर बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. सर्व गुन्हेगार उमेदवार त्यांच्या बाजूने उभे आहेत. त्यांचा पाढा मला वाचायला लावू नये, हे सर्व फलटणकरांना माहित आहे,” असा टोला लगावला. तसेच महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असून, विविध योजनांमुळे महिलांचा सर्वाधिक पाठिंबा भाजपला मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.

Ranjitsinh Nimbalkar: फलटणकर हे देवेंद्र फडणवीस यांचे चाहते: रणजीत नाईक निंबाळकर 

दरम्यान, फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 18 डिसेंबर रोजी फलटणला येणार असून, भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. “फलटणकर हे देवेंद्र फडणवीस यांचे चाहते आहेत. त्यांनी दिलेला शब्द ते नेहमी पाळतात. यावेळी फलटणकरांना नेमका कोणता शब्द देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,” असेदेखील रणजीत नाईक निंबाळकर यांनी म्हटले. फलटणच्या निवडणूक रणधुमाळीत दोन्ही बाजूंनी केलेल्या या तीव्र वक्तव्यांमुळे राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला असून, आगामी प्रचारात आणखी आरोप–प्रत्यारोप पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Thane Election BJP: ठाण्यात तडीपार गुंडाचा भाजप प्रवेश शेवटच्या क्षणी रोखला, वरिष्ठ नेते आयत्यावेळी कार्यक्रमाला आलेच नाहीत, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा



Source link

…. तर काळा कोट घालून मी तुमच्यासाठी कोर्टात उभा राहील, रामराजे निंबाळकरांनी विरोधकांन ठणकावलं

0


Ramraje Naik Nimbalkar : फलटण नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या कोपरा सभेत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. यावेळी त्यांनी डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलीस खरं खोटं याचा तपास करतील. मात्र या प्रकरणानंतर फलटणचे नाव बदनाम झालं. समोर महिला बसलेल्या आहेत, त्यांच्या माहेरवरून सुद्धा फोन आले असतील कसलं हे फलटण, अशा प्रकारची विचारणा झाली असेल. मात्र अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्या पेक्षा जास्त दोषी असतो. तुमच्या मागे मी आहे, घाबरू नका. याच्यापुढे कार्यकर्त्यांना आणि महिला भगिनींना त्रास झाला तर हाच रामराजे काळा कोट घालून कोर्टात तुमच्यासाठी उभा राहील, असं वक्तव्य रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलंय. फलटणमधील एका भाषणात ते बोलत होते.

Ramraje Naik Nimbalkar : भाजपच्या बदनामीच मूळ कारण हे साताऱ्यात आहे – रामराजे नाईक निंबाळकर

2019 ला देवेंद्र फडणवीस, अजित पवार, संजीवराजे जयकुमार गोरे, स्वतः मी आणि माजी खासदार एकत्र बसलो होतो. यामध्ये 2024 ची निवडणूक एकत्र लढायची का याबाबत चर्चा केली होती. आत्ताचे मुख्यमंत्री हे तेव्हा माझ्या बाजूने होते. त्यांनी आता क्लीन चिट दिली असेल. मात्र अजूनही ते इथं आल्यावर काय बोलायचं ते बोलतील, त्यांचा तो हक्क आहेत. भारतीय जनता पार्टीच्या बदनामीच मूळ कारण हे साताऱ्यात आहे, असा आरोप सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केलाय.

Omerga: उमरगा नगरपरिषदेच्या प्रचारात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पत्राने वाद पेटला

धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्राने उमरगा नगर परिषदेमध्ये वाद पेटला. उमरगा नगर परिषदेच्या निवडणुकीत मी हसीना पारकर असल्याचे सांगत उमेदवार मतदारांना धमकावत असल्याचे पत्र ओमराजे जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं होतं. मतदार केंद्र स्थलांतरित करण्याची मागणी ही केली होती. त्यावर अभयराजे चालुक्य यांनी सांगितले की, ओबीसी गरीब महिला उमेदवाराला बदनाम करू नका? जनतेने तुम्हाला सर्वसामान्य ओबीसी महिला उमेदवारास हसीना पारकर म्हणण्यासाठी निवडून दिलेलं नाही. राक्षसी महत्वकांक्षी लोकांचं ऐकून जर एक कुटुंब उध्वस्त करत असाल तर ते धोकादायक आहे. निश्चितच त्याचे परिणाम तुम्हाला आता व भविष्यात भोगावे लागतील. असा इशारा चालुक्य यांनी दिला. 

हे देखील वाचा

आणखी वाचा



Source link

भारतात सापडली प्रचंड मोठी सोन्याची खाण! दररोज 220,000,000 रुपांचे सोनं निघेल; एका अडचणीमुळे सगळ काम थांबलयं

0
भारतात सापडली प्रचंड मोठी सोन्याची खाण! दररोज 220,000,000 रुपांचे सोनं निघेल; एका अडचणीमुळे सगळ काम थांबलयं


India Gold Mine : भारतात सोन्याचा धूर निघायचा. आजही लोकांना सोन्याचे प्रचंड आकर्षण आहे. अनेक देशांप्रमाणे, भारताची मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँक, मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करते. तथापि, भारतात सोन्याच्या खाणी खूप कमी आहेत. 99  टक्के सोने परदेशातून आयात केले जाते. आता, सोन्याचा एक मोठा साठा सापडला आहे, जो काढल्यास भारत सोन्याच्या खाणीतील एक पॉवरहाऊस बनू शकतो.

Add Zee News as a Preferred Source

कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील अमरपूर ब्लॉकमध्ये हा सोन्याचा साठा सापडला. या शोधाने देशभरातील भूगर्भशास्त्रज्ञ, उद्योगपती आणि धोरणकर्ते आश्चर्यचकित झाले आहेत. जर भारताला हे सोने काढण्यात यश आले तर ते सोन्याच्या खाणीत एक पॉवरहाऊस बनू शकते. अमरपूर ब्लॉकमध्ये सोन्याचे साठे लक्षणीय असू शकतात. येथे सोन्याचे ग्रेडिंग असामान्यपणे जास्त आहे, प्रति टन 12-14 ग्रॅम इतके ग्रेडिंग आहे, जे सामान्यतः व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या खाणकाम स्थळांपेक्षा 4 ते 7  पट जास्त आहे.

दररोज 25 ते 30 किलो सोने काढले जाईल

राज्याच्या खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाने 600,000 हेक्टर क्षेत्रावरील पुनर्प्राप्ती सर्वेक्षणादरम्यान या शोधाची पुष्टी केली. सुरुवातीच्या पृष्ठभागाच्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या सोन्याच्या पातळीवरून असे दिसून आले की, जर खोलीवर सोन्याची पातळी 8 ते 10  ग्रॅम प्रति टन राहिली तर एका खाणीतून दररोज 25 ते 30 किलोग्रॅम सोने मिळू शकते, ज्याची किंमत आजच्या किमतीनुसार 18 ते 22 कोटी आहे. 

सोन्याचे साठे सापडले आहेत, परंतु ते काढणे एक आव्हान आहे. हे संरक्षित वन क्षेत्र आहे. अमरापूर ब्लॉक संरक्षित वन क्षेत्र आणि पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रात येतो. नियमांनुसार, स्टेज 1 वन मंजुरीशिवाय 10 ते 20 मीटरपेक्षा कमी खोदकाम करण्यास मनाई आहे. सोन्याच्या खाणींबद्दल वन विभागाला अनेक चिंता आहेत, ज्यात वन्यजीव मार्गांवर, भूजल पुनर्भरण क्षेत्रांवर, जवळच्या आदिवासी वस्त्यांवर आणि पश्चिम घाटाच्या संवेदनशील पर्यावरणावर होणारा संभाव्य परिणाम यांचा समावेश आहे.

एका वनक्षेत्रात सोन्याची खाण सापडल्याच्या बातमीने सर्वांनाच गोंधळात टाकले आहे. राजकीय आणि औद्योगिक गट मंजुरी जलद करण्यासाठी दबाव आणत आहेत. सरकारी मान्यता नसल्यामुळे आणि वनक्षेत्रात वाढत्या देखरेखीमुळे, बेकायदेशीर सर्वेक्षण आणि उत्खननाचे प्रयत्न वाढले आहेत. ज्याप्रमाणे पुष्पा चित्रपटातील नायकाने चंदनाची तस्करी केली, त्याचप्रमाणे येथे सोन्याचे खाणकाम आणि तस्करी होण्याची शक्यता आहे. कर्नाटक सरकारने आता वन विनियोग प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी एक आंतर-विभागीय समिती स्थापन केली आहे. 2026 च्या मध्यापूर्वी पहिल्या टप्प्याची मंजुरी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यानंतरच G3-स्तरीय खोल खोदकाम सुरू होऊ शकेल. शक्य असले तरी, व्यावसायिक खाणकाम सुरू होण्यास किमान 5 ते 8 वर्षे लागतील.





Source link

मुधोजी हायस्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या हॉकी संघाचे दैदीप्यमान यश

0
मुधोजी हायस्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या हॉकी संघाचे दैदीप्यमान यश

फलटण प्रतिनिधी :- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने आयोजित अंतिम फेरीच्या स्पर्धेत मुधोजी हायस्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या हॉकी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला असून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे.

या अंतिम सामन्यात मुधोजी हायस्कूलच्या खेळाडूंनी संघभावना, शिस्तबद्ध खेळ आणि कौशल्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघावर मात केली. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा परंपरेला नवा गौरव प्राप्त झाला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल मुधोजी हायस्कूलच्या विजेत्या संघाचे, सर्व खेळाडूंचे, प्रशिक्षक, कोच, पालकवर्ग तसेच हॉकीप्रेमी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे उत्तुंग यश संपादन करून राज्य व राष्ट्रीय स्तरावर शाळेचे नाव उज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

एन. रघुरामन यांचा कॉलम: तुमच्या मुलांना व्यवहारांचा ‘सुवर्ण नियम’ शिकवा

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  तुमच्या मुलांना व्यवहारांचा ‘सुवर्ण नियम’ शिकवा




ही कथा तुमच्या पैशांबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल आहे. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये बिल वाटणे, मित्राला मदत करणे किंवा लहान खर्चासाठी पैसे देणे यासारखे पैशांचे व्यवहार सामान्य आहेत. अलीकडेच एका विद्यापीठातील विद्यार्थिनीने वर्गमित्राला पैसे पाठवले. नंतर असे आढळून आले की वर्गमित्र बॉम्बस्फोटात सामील होता. तपासकर्त्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांमधील पैशांच्या व्यवहाराचा त्वरित मागोवा घेतला. विद्यार्थ्याचा कटात कोणताही सहभाग नसेल तर ती निर्दोष सिद्ध होईल. तथापि, ती निर्दोष सिद्ध होण्यापूर्वी तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला कठोर चौकशीला सामोरे जावे लागेल, जो एक कठीण अनुभव असेल, जळत्या निखाऱ्यावर चालण्यासारखा. जगभरातील विद्यार्थी बिल शेअर करण्यासाठी आणि मित्रांमध्ये व्यवहार करण्यासाठी गुगल पे आणि फोनपेसारख्या यूपीआय किंवा व्यक्ती-ते-व्यक्ती (पीटूपी) पेमेंट ॲप्सचा वापर करतात. ते खोलीचे भाडे, वीज बिल किंवा एकत्र जेवण यासारख्या गट खर्चासाठी स्प्लिटवाइजसारख्या ॲप्सचा वापर करतात. हे ॲप्स जीवन सोपे करतात, परंतु ते एक महत्त्वपूर्ण धोकादेखील लपवतात. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक यूपीआय/पीटूपी व्यवहार कायमचा डिजिटल रेकॉर्ड सोडतो. पोलिस आणि तपास संस्था सहजपणे या नोंदी ट्रॅक करू शकतात. चुकीच्या लोकांसोबत अनवधानाने केलेल्या व्यवहारांमुळे गंभीर प्रकरणेदेखील उद्भवू शकतात, ज्यामध्ये तुमचे बँक खाते जप्त करणेदेखील समाविष्ट आहे. या पैशांशी संबंधित पृष्ठावरील ही कथा फक्त एकच उद्देश पूर्ण करते. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील मुलांनी यूपीआय किंवा डिजिटल व्यवहार करताना, पीटूपी व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. का? कारण हे व्यवहार कुठे नेऊ शकतात हे तुम्हाला कधीच माहीत नसते. मुलांना शिकवा की जेव्हा पैशाचा प्रश्न येतो तेव्हा व्यवहार फक्त त्यांच्या आणि त्यांच्या पालकांमध्ये (ज्यांच्याकडून ते पैसे घेतात) किंवा थेट सेवा प्रदात्यामध्येच असावेत. म्हणून हे तत्त्व पाळा: “प्रत्येकाचा आदर करा, पण प्रत्येकावर संशय घ्या!” आजकाल प्रत्येक वर्तमानपत्रात दररोज सायबर फसवणुकीच्या बातम्या येतात. अशा परिस्थितीत आपल्याला काय करावे यापेक्षा काय करू नये याबद्दल अधिक जाणून घेणे आवश्यक आहे. आणि शास्त्रातील हे वचन नेहमी लक्षात ठेवा: “ज्ञानदेव तू कैवल्यम” – म्हणजे मुक्ती (मोक्ष) केवळ ज्ञानानेच मिळते.



Source link

भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) नूतन कार्यकारिणी सत्कार व मासिक बैठक संपन्न

0
भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) नूतन कार्यकारिणी सत्कार व मासिक बैठक संपन्न

साहस Times (कोळकी ): भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने नूतन कार्यकारिणीचा सत्कार व नवीन कार्यकारिणीची पहिली मासिक बैठक शाहू–फुले–आंबेडकर सभागृह, कोळकी येथे उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीस माण, फलटण, कोरेगाव व खटाव तालुक्यांतील भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) च्या नूतन कार्यकारिणीचा औपचारिक सत्कार करण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) च्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष, सूर्यपुत्र, बौद्धाचार्यांचे जनक व चैत्यभूमीचे शिल्पकार भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त येत्या काळात भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून राज्य संघटक तसेच सातारा व पुणे जिल्हा प्रभारी, समता सैनिक दलाचे असिस्टंट ऑफिसर आयुष्यमान दादासाहेब भोसले आणि राज्य संघटक विजय ओव्हाळ उपस्थित होते. मार्गदर्शन करताना विजय ओव्हाळ म्हणाले की, “भारतीय बौद्ध महासभा ही व्यक्तिकेंद्री नसून समाजकेंद्री संघटना आहे. त्यामुळे अंतर्गत मतभेद विसरून संघटनात्मक एकात्मतेने काम करणे आवश्यक आहे. कोणताही निर्णय वैयक्तिक नसून तो संपूर्ण संघटना व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक निर्णयातूनच घेतला गेला पाहिजे. महासभेतील प्रत्येक पदाला समान प्रतिष्ठा असून पदापेक्षा महासभेच्या २५ कलमी कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी अधिक महत्त्वाची आहे. केंद्र, राज्य व जिल्हा पातळीवरील आदेश राजशिष्टाचार समजून सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) चे अध्यक्ष आयु. नानासो मोहिते म्हणाले की, सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची गरिमा राखून सहकार्याच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे. अध्यक्षपद स्वीकारताना जबाबदाऱ्यांसोबत अधिक परिश्रम घ्यावे लागतात, याची मला पूर्ण जाणीव आहे. आजी व माजी पदाधिकाऱ्यांनी धम्माचा प्रचार व प्रसार करण्याच्या कार्यात सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्ष हा देखील एक व्यक्तीच असल्याने कधीकधी चुका होऊ शकतात; मात्र त्या समजून घेऊन पुन्हा त्या घडू नयेत यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे त्यांनी नमूद केले.

संस्थेच्या प्रोटोकॉलनुसार केंद्र व राज्य स्तरावरून देण्यात आलेला कृती कार्यक्रम पाचही तालुक्यांत प्रभावीपणे राबवून महिला उपासिका शिबिरे, युवक–युवती शिबिरे तसेच समता सैनिक दलाच्या माध्यमातून सैनिक शिबिरे मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्ह्याच्या वतीने देण्यात येणारे स्टेशनरी साहित्य, धम्मयान कॅलेंडर व इतर साहित्य सर्व पदाधिकाऱ्यांना सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने मी स्वतः स्वीकारतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत येणाऱ्या काळातील विविध उपक्रमांबाबत सविस्तर नियोजन व चर्चा करण्यात आली. यामध्ये विवाह संस्कार विधी प्रमाणपत्र, धम्मयान कॅलेंडर, पदाधिकाऱ्यांची, बौद्धाचार्यांची आचारसंहिता,

याचवेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. फलटण तालुका शाखेचे अध्यक्ष आयु. महावीर भालेराव, कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे सर, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष बजरंग गायकवाड, संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष संपत भोसले सर यांनी नवीन कार्यकरणीचा सत्कार केला.यामध्ये अध्यक्षपदी फेरनिवड झालेले आयु. नानासो मोहिते, सरचिटणीस आयु. सुनील कदम, कोषाध्यक्ष आयु. नंदकुमार शिंदे, संस्कार उपाध्यक्ष आयु. अविनाश बारसिंग यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार राज्य संघटक विजय ओव्हाळ व समता सैनिक दलाचे असिस्टंट ऑफिसर आयुष्यमान दादासाहेब भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) च्या वतीने नूतन कार्यकारिणीतील अध्यक्ष आयु. नानासो मोहिते, सरचिटणीस आयु. सुनील कदम, कोषाध्यक्ष आयु. नंदकुमार शिंदे, संस्कार उपाध्यक्ष आयु. अविनाश बारसिंग, उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन) आयु. दिलीप आबाजी टिळक, उपाध्यक्ष (संरक्षण) आयु. दीपक काकडे, हिशोब तपासणीस आयु. बाळासाहेब जाधव, कार्यालयीन सचिव आयु. धनसिंग सोनवणे, संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे व आयु. अनिल कांबळे, प्रचार व पर्यटन सचिव आयु. आबासाहेब बनसोडे व संतोष खरात, संरक्षण सचिव आयु. राजेंद्र तायडे व आयु. संपत भोसले, संघटक अर्जुन ननावरे, निलेश सपकाळ, सुधाकर शीलवंत, सज्जन खरात, संदीप खरात व उत्तम मस्के यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे तालुका शाखेचे सर्व पदाधिकारीफलटण तालुका शाखेचे अध्यक्ष आयु. महावीर भालेराव सर, कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे सर, तालुका कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष बजरंग गायकवाड सर, संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष संपत भोसले सर, ज्येष्ठ प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे सर,माजी सरचिटणीस अरुण गायकवाड, माजी फलटण तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत, शं ज्ञा कांबळे, मा. जिल्हा संघटक कुमार सरतापे, माण तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष अरविंद बनसोडे, जिल्ह्याचे मा. प्रचार व पर्यटन सचिव आयु. सुनिल भोसले,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) चे सरचिटणीस आयु. सुनील कदम यांनी केले. त्यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन करून आजच्या बैठकीतील विषय व घटक स्पष्ट केले.

साताऱ्यात बिबट्याला भयंकर पद्धतीने संपवलं, चारही पंजे तोडले, 18 नखं गायब, जादूटोण्यासाठी वापर झ

0


Satara Leopard: सातारा (Satara News) तालुक्यातील मत्त्यापूर येथील बरड शिवारात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका ऊसाच्या शेतात चारही पाय तोडलेल्या मादी बिबट्याचा (Leopard) मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शेतकरी रविंद्र घोरपडे यांच्या मालकीच्या ऊसाच्या शेतात हा मृतदेह आढळून आला.

वनविभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बिबट्याचा मृत्यू अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा. विशेष म्हणजे या बिबट्याचे चारही पंजे कापून वेगळे करण्यात आले असून, एकूण १८ नखे गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र बिबट्याचे दात आणि मिशा सुस्थितीत असल्याने या घटनेभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे.

Satara Leopard: शिकारीचा संशय, तस्करी किंवा अंधश्रद्धेचा उद्देश?

बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक की मानवनिर्मित, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र चारही पाय कापण्यात आल्याने हा प्रकार शिकारीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. बिबट्याची नखे तस्करीसाठी किंवा अंधश्रद्धेच्या हेतूने वापरण्यात आली का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.  

Satara Leopard: वनविभागाकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.  या घटनेमुळे मत्त्यापूर आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांवरील वाढते हल्ले आणि बेकायदेशीर शिकारीच्या घटनांबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आता या प्रकरणात नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Satara Leopard: साताऱ्यात बिबट्याला भयंकर पद्धतीने संपवलं, चारही पंजे तोडले, 18 नखं गायब, जादूटोण्यासाठी वापर झाल्याचा संशय

Dhule Leopard: धुळ्यात विहिरीत पडला बिबट्या

दरम्यान, धुळे-शिरपूर तालुक्यातील भरवाडे शिवारातील एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना काल (दि. 13) सायंकाळी घडली होती. विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती शेतमालकाला मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाला कळवले असता वन विभागाने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. विहिरीत पडलेल्या बिबट्याला पकडण्यात रात्री उशिरा वन विभागाला यश आले असून या बिबट्याला पकडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा बिबट्या शिरपूर तालुक्यात दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Ahilyanagar : दबा धरून बसला, संधी मिळताच बिबट्याने सिद्धेशवर झडप घातली; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू

आणखी वाचा



Source link

डोळ्यांमध्ये दिसतात High Cholesterol चा अलर्ट? डॉक्टरांनी सांगितले 4 संकेत, पाहता क्षणीच…

0
डोळ्यांमध्ये दिसतात High Cholesterol चा अलर्ट? डॉक्टरांनी सांगितले 4 संकेत, पाहता क्षणीच…


उच्च कोलेस्ट्रॉल बहुतेकदा केवळ हृदयरोगाशी संबंधित असते, परंतु आपले डोळे देखील संकेत देतात. जेव्हा शरीरात जास्त प्रमाणात वाईट कोलेस्ट्रॉल जमा होते तेव्हा ते नसा, कॉर्निया आणि पापण्यांवर परिणाम करू शकते. डोळ्यांची ही लक्षणे वेदनारहित असतात, ज्यामुळे दृष्टी कमी होणे, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका यासारख्या जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात.

Add Zee News as a Preferred Source

वैद्यकीय शास्त्रानुसार, आपले डोळे शरीराच्या रक्तवाहिन्यांची स्थिती प्रकट करतात. जर रक्तात जास्त चरबी असेल तर ती लहान रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते, ज्याचा डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.

पापण्यांवर पिवळे डाग 

जर तुम्हाला तुमच्या वरच्या किंवा खालच्या पापण्यांवर पिवळे गुठळे दिसले तर ते उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण असू शकते. हे गुठळे बहुतेकदा वेदनारहित असतात. ते हळूहळू आकारात वाढतात आणि बहुतेकदा डोळ्यांच्या आतील कोपऱ्यात दिसतात. ते शस्त्रक्रिया किंवा लेसरद्वारे काढले जाऊ शकतात, परंतु जर कोलेस्टेरॉल नियंत्रित केले नाही तर ते पुन्हा दिसू शकतात.

डोळ्यांमध्ये पांढरे किंवा राखाडी रिंग

डोळ्याच्या बाहुलीभोवती राखाडी किंवा पांढरे रिंग दिसल्यास त्याला कॉर्नियल आर्कस म्हणतात. जर ही रिंग 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या दिसली तर ती अनुवांशिक डिस्लिपिडेमिया किंवा उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते. डॉक्टर म्हणतात की ही रिंग कॉर्नियामध्ये लिपिड जमा झाल्यामुळे होते.

अचानक दृष्टी जाणे

उच्च कोलेस्ट्रॉल आपल्या डोळ्यांच्या रेटिनावर देखील परिणाम करू शकते. जेव्हा रक्त जाड होते तेव्हा ते रेटिनाच्या लहान वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करू शकते. लक्षणांमध्ये अचानक अस्पष्ट दृष्टी, प्रकाश चमकणे, एका डोळ्यात दृष्टी कमी होणे किंवा डोळ्यांसमोर काळे डाग येणे यांचा समावेश आहे. ही स्थिती वैद्यकीय आणीबाणी मानली जाते कारण यामुळे कायमचे दृष्टी कमी होऊ शकते.

वारंवार जळजळ आणि लालसरपणा

उच्च कोलेस्टेरॉलमुळे शरीरात जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो, ज्यामुळे डोळ्यांच्या पृष्ठभागावर देखील परिणाम होऊ शकतो. डोळ्यांमध्ये जडपणा, कोरडेपणा, वारंवार लालसरपणा किंवा जळजळ ही लक्षणे आहेत. बहुतेक लोक याचा संबंध स्क्रीन टाइमशी जोडतात, परंतु जर ते दीर्घकाळ टिकून राहिले तर ते रक्तातील लिपिड असंतुलनाचे लक्षण देखील असू शकते.

सूज आणि चरबी

जर डोळ्यांखाली सूज, सूज किंवा चरबीचे स्वरूप कायम राहिले तर ते केवळ झोपेच्या कमतरतेमुळे नसते. याला लिपिड घुसखोरी म्हणतात. उच्च कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमधून चरबी बाहेर पडते आणि ऊतींमध्ये जमा होते, ज्यामुळे डोळे थकलेले दिसतात. डोळ्यांखाली सूज आणि जडपणा येतो.

काय धोके उद्भवू शकतात?

जर तुम्ही तुमच्या डोळ्यांमध्ये या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे हृदयविकाराचा झटका, कायमची दृष्टी कमी होणे, उच्च रक्तदाब, स्ट्रोक इत्यादी होऊ शकतात. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांमध्ये असे बदल दिसले तर तुम्ही ताबडतोब रक्तातील साखरेची चाचणी आणि लिपिड प्रोफाइल चाचणी करून घ्यावी.





Source link

भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) नूतन कार्यकारिणी सत्कार व मासिक बैठक संपन्न

0
भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) नूतन कार्यकारिणी सत्कार व मासिक बैठक संपन्न

साहस Times (कोळकी ) : भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने नूतन कार्यकारिणीचा सत्कार व नवीन कार्यकारिणीची पहिली मासिक बैठक शाहू–फुले–आंबेडकर सभागृह, कोळकी येथे उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीस माण, फलटण, कोरेगाव व खटाव तालुक्यांतील भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) च्या नूतन कार्यकारिणीचा औपचारिक सत्कार करण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) च्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष, सूर्यपुत्र, बौद्धाचार्यांचे जनक व चैत्यभूमीचे शिल्पकार भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त येत्या काळात भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून राज्य संघटक तसेच सातारा व पुणे जिल्हा प्रभारी, समता सैनिक दलाचे असिस्टंट ऑफिसर आयुष्यमान दादासाहेब भोसले आणि राज्य संघटक विजय ओव्हाळ उपस्थित होते. मार्गदर्शन करताना विजय ओव्हाळ म्हणाले की, “भारतीय बौद्ध महासभा ही व्यक्तिकेंद्री नसून समाजकेंद्री संघटना आहे. त्यामुळे अंतर्गत मतभेद विसरून संघटनात्मक एकात्मतेने काम करणे आवश्यक आहे. कोणताही निर्णय वैयक्तिक नसून तो संपूर्ण संघटना व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक निर्णयातूनच घेतला गेला पाहिजे. महासभेतील प्रत्येक पदाला समान प्रतिष्ठा असून पदापेक्षा महासभेच्या २५ कलमी कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी अधिक महत्त्वाची आहे. केंद्र, राज्य व जिल्हा पातळीवरील आदेश राजशिष्टाचार समजून सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) चे अध्यक्ष आयु. नानासो मोहिते म्हणाले की, सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची गरिमा राखून सहकार्याच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे. अध्यक्षपद स्वीकारताना जबाबदाऱ्यांसोबत अधिक परिश्रम घ्यावे लागतात, याची मला पूर्ण जाणीव आहे. आजी व माजी पदाधिकाऱ्यांनी धम्माचा प्रचार व प्रसार करण्याच्या कार्यात सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्ष हा देखील एक व्यक्तीच असल्याने कधीकधी चुका होऊ शकतात; मात्र त्या समजून घेऊन पुन्हा त्या घडू नयेत यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे त्यांनी नमूद केले.

संस्थेच्या प्रोटोकॉलनुसार केंद्र व राज्य स्तरावरून देण्यात आलेला कृती कार्यक्रम पाचही तालुक्यांत प्रभावीपणे राबवून महिला उपासिका शिबिरे, युवक–युवती शिबिरे तसेच समता सैनिक दलाच्या माध्यमातून सैनिक शिबिरे मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्ह्याच्या वतीने देण्यात येणारे स्टेशनरी साहित्य, धम्मयान कॅलेंडर व इतर साहित्य सर्व पदाधिकाऱ्यांना सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने मी स्वतः स्वीकारतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत येणाऱ्या काळातील विविध उपक्रमांबाबत सविस्तर नियोजन व चर्चा करण्यात आली. यामध्ये विवाह संस्कार विधी प्रमाणपत्र, धम्मयान कॅलेंडर, पदाधिकाऱ्यांची, बौद्धाचार्यांची आचारसंहिता,

याचवेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अध्यक्षपदी फेरनिवड झालेले आयु. नानासो मोहिते, सरचिटणीस आयु. सुनील कदम, कोषाध्यक्ष आयु. नंदकुमार शिंदे, संस्कार उपाध्यक्ष आयु. अविनाश बारसिंग यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार राज्य संघटक विजय ओव्हाळ व समता सैनिक दलाचे असिस्टंट ऑफिसर आयुष्यमान दादासाहेब भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) च्या वतीने नूतन कार्यकारिणीतील अध्यक्ष आयु. नानासो मोहिते, सरचिटणीस आयु. सुनील कदम, कोषाध्यक्ष आयु. नंदकुमार शिंदे, संस्कार उपाध्यक्ष आयु. अविनाश बारसिंग, उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन) आयु. दिलीप आबाजी टिळक, उपाध्यक्ष (संरक्षण) आयु. दीपक काकडे, हिशोब तपासणीस आयु. बाळासाहेब जाधव, कार्यालयीन सचिव आयु. धनसिंग सोनवणे, संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे व आयु. अनिल कांबळे, प्रचार व पर्यटन सचिव आयु. आबासाहेब बनसोडे व संतोष खरात, संरक्षण सचिव आयु. राजेंद्र तायडे व आयु. संपत भोसले, संघटक अर्जुन ननावरे, निलेश सपकाळ, सुधाकर शीलवंत, सज्जन खरात, संदीप खरात व उत्तम मस्के यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी सरचिटणीस अरुण गायकवाड, माजी फलटण तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत, शं ज्ञा कांबळे, मा. जिल्हा संघटक कुमार सरतापे, माण तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष अरविंद बनसोडे, जिल्ह्याचे मा. प्रचार व पर्यटन सचिव आयु. सुनिल भोसले,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) चे सरचिटणीस आयु. सुनील कदम यांनी केले. त्यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन करून आजच्या बैठकीतील विषय व घटक स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मसंकल्पाची ज्योत अखंड तेवत ठेवणारे सूर्यपुत्र भैय्यासाहेब यशवंतराव आंबेडकर – चंद्रकांत मोहिते

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मसंकल्पाची ज्योत अखंड तेवत ठेवणारे सूर्यपुत्र भैय्यासाहेब यशवंतराव आंबेडकर – चंद्रकांत मोहिते

साहस Times (फलटण) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्मदीक्षेच्या माध्यमातून “भारत बुद्धमय करण्याचा” जो महान संकल्प केला, तो त्यांच्या पश्चात अखंडपणे पुढे नेण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांच्या सुपुत्र सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांनी केले, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव आयु. चंद्रकांत मोहिते यांनी केले.

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब यशवंतराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाहू फुले आंबेडकर सभागृह, कोळकी येथे आयोजित अभिवादन सभेत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी तालुका शाखेचे अध्यक्ष आयु. महावीर भालेराव, महासचिव आयु बाबासाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कोषाध्यक्ष आयुष्यमान विठ्ठल निकाळजे, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आयुष्यमान बजरंग गायकवाड, ज्येष्ठ प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे, धम्म उपासक विजय निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शनात आयु. चंद्रकांत मोहिते म्हणाले की, भैय्यासाहेब आंबेडकरांनी कधीही वडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरफायदा घेतला नाही. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर उद्योग, व्यवसाय उभे केले आणि नंतर संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांच्या चळवळीला व धम्मकार्याला अर्पण केले. ‘बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस’च्या माध्यमातून बाबासाहेबांचे ग्रंथ, नियतकालिके व विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले.

चैत्यभूमी, कफ परेड येथील बाबासाहेबांचा पुतळा, चवदार तळे क्रांतीस्थळ यांसारख्या स्मारकांच्या उभारणीत भैय्यासाहेबांचा निर्णायक सहभाग होता. “मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही” या ठाम भूमिकेमुळेच चैत्यभूमीचा भव्य आकार साकार झाला. जनतेच्या सहभागातून स्मारक उभारणीसाठी त्यांनी मुंबईभर जनजागृती केली, हे इतिहासात अजरामर आहे.

१९६६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अमृत महोत्सव साजरा करताना ‘भीम-ज्योत’ महू ते मुंबई असा प्रेरणादायी प्रवास काढून धम्मदानाच्या माध्यमातून चैत्यभूमी स्मारक उभारणीला चालना देण्यात आली. तसेच १९६८ साली मुंबई येथे झालेल्या भव्य धम्मपरिषदेत बौद्ध संस्कार आचारसंहिता स्वीकारली गेली आणि “बौद्ध जीवन संस्कार पाठ” हे महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित झाले.

भैय्यासाहेब आंबेडकरांनी “भारत बौद्धमय करीन” हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी बाळगून धम्मदीक्षा, परिषद, मेळावे, विहार उद्घाटने यांद्वारे धम्मप्रसाराला अखंड गती दिली. स्वतः श्रामणेर दीक्षा घेऊन “महापंडित काश्यप” हे दीक्षानाम धारण करत त्यांनी आपल्या आचरणातूनही धम्माचा आदर्श समाजासमोर ठेवला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचार व कार्याला विनम्र नमन करत उपस्थितांनी “जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय”च्या घोषणांनी सभागृह दुमदुमून टाकले.