Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 78

एका शेतकऱ्याच्या मुलाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केला ही मोठी गोष्ट; विश्वास पाटलांचे वक्तव्य

0


सातारा :  साहित्य संमेलनासाठी एका पाटलाला अध्यक्ष करा अशी मागणी कुलकर्णी-जोशींनी केली. बिघडलेला गाव जर सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते असं वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी केलं. तसेच विश्वास पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचंही कौतुक केलं, साताऱ्याची गौरवगाथा मांडली. साताऱ्यात सुरू असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

साहित्य संमेलन म्हणजे फक्त एक कार्यक्रम नसतो तर तो आचार विचाराची आणि देशाला दिशा देण्याचा कार्यक्रम असतो. काँग्रेसची स्थापना होण्याआधीही मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाल्याचं विश्वास पाटलांनी नमूद केलं. एका शेतकऱ्याच्या मुलाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केला ही मोठी गोष्ट असल्याचं विश्वास पाटील म्हणाले. 

Vishwas Patil Speech : काय म्हणाले विश्वास पाटील? 

उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, “पाटील म्हटलं की तीन फड आठवतात ते म्हणजे कुस्तीचा फड, तमाशाचा फड आणि उसाचा फड. पण हा पाटील शब्दाच्या फडातला पाटील आहे. 99 व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका पाटलाला करा अशी मागणी जोशी आणि कुलकर्णींनी केली. बिघडलेला गाव जर सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते. ही आपली जुनी वहिवाट आहे.”

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : सावकरांचा किस्सा

विश्वास पाटील यांनी एक जुना किस्सा सांगितला. ते म्हणाले की, “87 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या असे सावरकर म्हणाले होते, ते वाक्य फार गाजले होते. पण त्यांनी पुढं जाऊन सांगितले की मातृभाषेत शिक्षण दिले पाहिजे. त्यावेळी माय मराठीचा पुरस्कार त्यांनी केला. ज्या ज्या वेळी मराठी भाषेवर संकट येतं त्यावेळी आम्ही साहित्यिक लढा देतो.”

नेहरू पंतप्रधान असताना मजनू सुलतानपुरी यांनी त्यांच्यावर टीका केल्याने त्यांना दोन वर्षांचा कारावास भोगावा लागला होता. त्यावेळी मोरारजी देसाई यांनी मध्यस्थी केली आणि म्हणाले माफी मागा. त्यावेळी मजनू सुलतानापुरी यांनी मात्र त्यास नकार दिला, झुकायला नकार दिला. हा किस्सा विश्वास पाटील यांनी सांगितला. 

सध्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता आहे. तुमची आचार संहिता असेल तर आमची विचार संहिता आहे. तुमच्या आचारसंहितेचा काळ हा दोन-तीन आठवडे असतो. पण साहित्यकाची विचार संहिता ही अनेक पिढ्यांपर्यंत चालत असं विश्वास पाटील म्हणाले. 

शेतकरी आत्महत्या करतात हे फक्त शासनाचं अपयश नाही तर समाजाचं देखील अपयश आहे असं मत विश्वास पाटील यांनी व्यक्त केलं. तसेच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचंही ते म्हणाले. 

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

Gold Silver Rate Today : चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण, सोन्याचा दर स्थिरावर; पाहा आजचा दर किती?

0
Gold Silver Rate Today : चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण, सोन्याचा दर स्थिरावर; पाहा आजचा दर किती?


सोने खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही त्याची किंमत तपासली पाहिजे. तुम्ही तुमच्या शहरातील विविध दुकानांमध्ये चौकशी करू शकता किंवा ज्वेलर्सना कॉल करू शकता. जर आजची किंमत अपडेट केली नसेल, तर अपडेट केलेल्या दिवसाची किंमत सोन्याच्या किमती म्हणून प्रदर्शित केली जाईल. या वर्षी सोन्याच्या किमतीत झालेल्या झपाट्याने झालेल्या वाढीमुळे प्रत्येक गुंतवणूकदाराला आश्चर्य वाटले आहे. आज, वर्षाच्या शेवटच्या दिवशी, सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. २ जानेवारी रोजी दोन्ही धातू घसरले. तर, आज प्रमुख शहरांमध्ये सोने आणि चांदीचे नवीनतम दर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

या शहरांमधील सोन्याचे दर

2 जानेवारी 2026 रोजी, उत्तर प्रदेशातील लखनौ, नोएडा, गाझियाबाद, मेरठ, अयोध्या, गोरखपूर, कानपूर, वाराणसी, आग्रा आणि इतर शहरांमधील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ₹१,३१,०४० वर पोहोचली.

सोने आणि चांदीची किंमत किती आहे?

जर तुम्ही २२ कॅरेट सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर २२ कॅरेट सोन्याची सध्याची किंमत प्रति १० ग्रॅम ₹१,२४,८०० आहे. आज चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम ₹२,५६,००० आहे.

योग्य वेळी खरेदी

आजच्या जगात, सोने हे केवळ दागिन्यांचाच नाही तर कठीण काळात एक मजबूत सुरक्षा देखील आहे. परिणामी, लोकांना 2026 मध्ये सोन्याचा दर जाणून घ्यायचा आहे जेणेकरून ते योग्य वेळी खरेदी करू शकतील किंवा गुंतवणूक करू शकतील.

सोन्याची मागणी का वाढत आहे?

तज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणूकदार महागाई आणि जागतिक जोखमींपासून बचाव करण्यासाठी सोन्याला एक मजबूत मालमत्ता मानतात. या वर्षी, मध्यवर्ती बँकांकडून सतत खरेदी, भू-राजकीय तणाव आणि डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याची मागणी झपाट्याने वाढली आहे.





Source link

फलटणचे नूतन नगराध्यक्ष समशेरदादा रंगले भक्तीमय वातावरणात

0
फलटणचे नूतन नगराध्यक्ष समशेरदादा रंगले भक्तीमय वातावरणात


फलटण प्रतिनिधी : फलटण नगरीत आज भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक समतेचे दर्शन घडले. नूतन नगराध्यक्ष समशेरदादा व सौ. मनीषा वहिनीसाहेब यांनी फलटण येथील श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट, दक्षिण काशी येथे आयोजित नागपूर सदभक्त मंडळ व श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या पंचावतार उपहार वार्षिक महोत्सवात भक्तीभावे सहभाग नोंदवला.
सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू असलेल्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना नगराध्यक्षांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सर्वसामान्य भाविकांप्रमाणे पंगतीत बसून महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच उपस्थित साधुसंत, महंत व आचार्यगणांचे आशीर्वाद घेतले. या भक्तीमय वातावरणात नगराध्यक्ष अक्षरशः भक्तीरंगात रंगून गेले होते.
या प्रसंगी श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टच्या वतीने आचार्य बाबाजी व सुदामराज बाबा यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्षांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला विश्वस्त श्री बाळासाहेब ननावरे, जय ज्योती नागरी पतसंस्थेच्या संचालिका सौ. माधुरी ननावरे, श्री शंभूराज बोबडे, श्री सुमित चोरमले, श्री अजित गायकवाड सर तसेच नागपूरकर संत-महंत व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन विश्वस्त श्री बाळासाहेब ननावरे यांनी केले.

जेवताना मोबाईलवर रिल्स पाहण्याची सवय ठरु शकते घातक; अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

0
जेवताना मोबाईलवर रिल्स पाहण्याची सवय ठरु शकते घातक; अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती


Watching Reels While Eating: मोबाईल ही गरज राहिली नसून व्यसन झालं आहे, असं वाक्य एका मराठी चित्रपटात आहे. खरोखरच आज मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. म्हणजे अगदी छोट्या-मोठ्या कामांसाठी ही पाच इंचाची स्क्रीन आपल्याला आपल्या हातात किंवा खिशात हवीच असते. मग ते फोन कॉलसारखं बेसिक फिचर असो किंवा अगदी जेवताना रिल्स बघणं असो, मोबाईल मस्ट आहे!

Add Zee News as a Preferred Source

सगळं काही रील स्क्रोल करत

आपल्यापैकी अनेकजण जेवताना किंवा इतर छोटी-मोठी काम करताना जसं चहा पिताना गैरे निवांत रील स्क्रोल करत बसलेलो असतो. हल्ली ही सवय फार सामान्य झाली आहे. तुम्ही हॉटेलमध्ये बघा किंवा ऑफिस कॅन्टीनमध्ये बघा सगळीकडे अशी मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली मंडळी दिसतील. मात्र ही सवय अगदी सहज सोपी कृती असून दैनंदिन जीवनाचा भाग झालेली असली तरी त्याचे बरेच दुष्परिणाम आहेत. एका नव्या संशोधनामधून हे सिद्ध झालं आहे.

कोणी केलाय हा अभ्यास?

‘हेल्थलाइन’मधील एका आरोग्यविषय अहवालानुसार, बीजिंग विद्यापीठाने रिल्स स्क्रोल करण्यासंदर्भातील विषयावर एक अभ्यास केला. या अभ्यासाच्या निष्कार्षांमधून असे दिसून आले की जेवताना मोबाईल फोन वापरणे किंवा टीव्ही पाहणे शरीरावर फारच नकारात्मक परिणाम करतं.

अहवालात काय होते?

बीजिंग विद्यापीठातील या संशोधनातून असे दिसून आले की, जेवताना मोबाईल फोन वापरणे किंवा टीव्ही पाहिल्याने आपलं लक्ष अन्नापासून विचलित करते. अशाप्रकारे पूर्ण लक्ष अन्नावर न ठेवता ते सेवन केल्याने आपल्या मेंदूला जेवल्याचं समाधान मिळत नाही. आपला मेंदू फोनवर लक्ष केंद्रित करण्यासाठीही बरीच ऊर्जा खर्च करतो. यामुळेच जेवणानंतर तृप्ततेचा संकेत देणाऱ्या हार्मोन्सचे योग्यरित्या उत्सर्जित होत नाहीत. परिणामी, व्यक्तीची भूक हळूहळू कमी होते.

काय परिणाम होतात?

जेवताना लक्ष विचलित झाल्यामुळे अन्नाच्या सुगंधाची आणि चवीची जाणीव कमी होऊ शकते. यामुळे हळूहळू खाण्याचा आनंद कमी होतो. याचा दुरोगामी परिणाम असा होतो की लोक प्रक्रिया केलेले आणि बाहेरील अन्न पसंत करू लागतात. या पद्धतीनं बराच काळ राहिल्यास चयापचयावर परिणाम होतो, ज्यामुळे शेवटी आरोग्य बिघडते. यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो.

या समस्याही बळावतात

जेवणादरम्यान जास्त स्क्रीन टाइममुळे केवळ लठ्ठपणाच वाढतो असे नाही तर मधुमेह, उच्च रक्तदाब या सारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका देखील वाढतो. याचसंदर्भातील अजून एक समस्या म्हणजे एकाग्रतेचा अभाव! हल्ली हा अभाव लोकांमध्ये खूप दिसून येतो. या एकग्रतेच्या अभावामुळे एक तर लवकर किंवा खूप हळू जेवण जातो. यामुळे टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाच्या समस्यांचा धोका वाढतो. शिवाय, याचा जीवनशैलीवरही परिणाम होतो.

आता हे एवढे तोटे पाहता जेवताना मोबाईल दूर ठेवलेलाच बरा, नाही का?





Source link

फलटण तालुक्यात राजकीय भूकंप! कोळकी–चौधरवाडीत राजे गटाला मोठा हादरा

0
फलटण तालुक्यात राजकीय भूकंप! कोळकी–चौधरवाडीत राजे गटाला मोठा हादरा

फलटण :- फलटण तालुक्यात राजकीय भूकंप! कोळकी–चौधरवाडीत राजे गटाला मोठा हादरा
फलटण तालुक्यातील राजकारण सध्या वेगाने नवे वळण घेत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या फलटण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवत सत्तास्थापना केली. नगराध्यक्ष पदासह तब्बल 18 नगरसेवक निवडून आणत बहुमत मिळवणाऱ्या या आघाडीने सलग 35 वर्षे फलटणवर वर्चस्व गाजवणाऱ्या राजे गटाची सत्ता संपुष्टात आणली.
या निकालानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली असून, राजे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत असतानाच, कोळकी परिसरावर दीर्घकाळ प्रभुत्व असलेल्या राजे गटाला मोठा हादरा बसला आहे.
कोळकी व चौधरवाडी येथील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी राजे गटाशी फारकत घेत थेट भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केल्याने तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कोळकी येथील प्रभावी कार्यकर्ते अभिजीत शिंदे, बाळासाहेब रिटे व संजय अहिरे यांनी राजे गटाला रामराम ठोकत भाजपची वाट धरली आहे. तसेच चौधरवाडीचे विद्यमान सरपंच तुकाराम कोकाटे व प्रल्हाद दंडीले यांनीही राजे गटाशी संबंध तोडून मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे कोळकी व चौधरवाडी परिसरात भाजपचे संघटन अधिक मजबूत झाले असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला याचा मोठा फायदा होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. राजे गटातील वाढती नाराजी, अंतर्गत मतभेद आणि बदलते राजकीय वारे यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी भाजपकडे मोर्चा वळवल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.
दरम्यान, भाजप नेतृत्वाने पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत “सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर विकासाभिमुख राजकारण अधिक मजबूत करण्याचा संकल्प” व्यक्त केला आहे. या घडामोडींमुळे फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये चुरस वाढणार हे निश्चित मानले जात आहे.

विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर

0


Marathi Sahitya Sammelan : ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठी साहित्य संमेलनाचे (Marathi Sahitya Sammelan) अध्यक्ष विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी त्यांच्या ‘संभाजी’ या कादंबरीत आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) तीव्र आंदोलन छेडले आहे. “विश्वास पाटील यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी आणि कादंबरीतील आक्षेपार्ह मजकुरात दुरुस्ती करावी, अन्यथा साहित्य संमेलन उधळून लावले जाईल,” असा थेट इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

संभाजी ब्रिगेडने विश्वास पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत “ते जेम्स लेनचे मावस भाऊ आहेत का?” असा सवाल उपस्थित केला आहे. “संभाजी महाराजांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे लिखाण करून महाराष्ट्राची बदनामी करण्यात आली आहे,” असा आरोप करत ब्रिगेडने संतप्त भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी साताऱ्यातील पवई नाका परिसरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान विश्वास पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशीही या प्रकरणी चर्चा झाल्याची माहिती ब्रिगेडच्या वतीने देण्यात आली.

Marathi Sahitya Sammelan : विश्वास पाटील माफी मागणार का?

दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने मध्यस्थी करत संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत कादंबरीतील वादग्रस्त मुद्दे, माफीची मागणी आणि संमेलन शांततेत पार पडावे याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. संभाजी ब्रिगेडने स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, “विश्वास पाटील यांनी जर माफी मागितली नाही, तर आम्ही यापूर्वी दिलेला इशारा मागे घेणार नाही.” त्यामुळे संमेलन अध्यक्षीय भाषणात विश्वास पाटील माफी मागतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Marathi Sahitya Sammelan : शरद पवारांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाही? 

दरम्यान, एकीकडे रयत शिक्षण संस्थेतील दररोज सुमारे 1 हजार विद्यार्थ्याना साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहण्यासाठी फर्मान काढण्यात आले आहे. दुसरीकडे रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख शरद पवार असून देखील साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रणच नसल्याची शरद पवारांच्या कार्यालयाची माहिती आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्याकडून मात्र शरद पवारांना 2 वेळा निमंत्रण देण्यासाठी गेलो असता त्यांची भेट होऊ शकली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तर भेट झाली नसली तरी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाहक वि. जा. पिंगळे यांनी बारामती हॉस्टल येथे जाऊन सचिवांकडे निमंत्रण दिल्याचा दावा केला आहे.   

आणखी वाचा 

BJP Municipal Corporation Result 2026: महानगरपालिका निवडणुकीत मतदानापूर्वीच भाजपचा विजयाचा सपाटा, आठ नगरसेवक जिंकले, कल्याण डोंबिवली -3, धुळे -3, पनवेल-1, भिवंडीत एका उमेदवाराचा विजय

आणखी वाचा



Source link

भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादनासाठी मोफत लक्झरी बससेवा

0
भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादनासाठी मोफत लक्झरी बससेवा

फलटण प्रतिनिधी : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या प्रवासात कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी संग्राम अहिवळे मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत दि. ३१ रोजी नागरिकांसाठी मोफत ४ लक्झरी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरवर्षी १ जानेवारी रोजी देशभरातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी भीमा कोरेगाव येथे दाखल होत असतात. ही बाब लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचा लाभ मिळावा, या उद्देशाने ही वाहनसेवा सुरू करण्यात आली आहे.
या मोफत वाहनसेवेचा लाभ युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर घेत असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत संग्राम अहिवळे यांनी राबवलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.

राष्ट्रीय सब-ज्युनियर हॉकीसाठी साताराच्या तिघींची महाराष्ट्र संघात चमकदार निवड

0
राष्ट्रीय सब-ज्युनियर हॉकीसाठी साताराच्या तिघींची महाराष्ट्र संघात चमकदार निवड

साहस Times प्रतिनिधी :-  फलटण सारख्या ग्रामीण भागातून घडणारी गुणवत्ता पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर झळकली आहे. राजकोट (गुजरात) येथे होणाऱ्या हॉकी इंडिया अंतर्गत राष्ट्रीय सब-ज्युनियर स्पर्धांसाठी महाराष्ट्र महिला संघाची अंतिम निवड जाहीर झाली असून, दि हॉकी सातारा संघटनेच्या तिघी खेळाडूंनी सलग तिसऱ्या वर्षी संघात स्थान मिळवून जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
बातमीचा मजकूर:
हॉकी इंडिया व हॉकी महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने राजकोट येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब-ज्युनियर स्पर्धांसाठी स्पर्धापूर्व निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या निवडचाचणीत दि हॉकी सातारा संघटनेच्या नऊ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये कु. निकिता वेताळ, कु. श्रेया चव्हाण, कु. अनुष्का केंजळे, कु. तेजस्विनी कर्वे, कु. अनुष्का चव्हाण, कु. यादव, कु. घाडगे, कु. सिद्धी केंजळे व कु. आरोही पाटील यांचा समावेश होता.
अंतिम निवडीत दि हॉकी साताराच्या कु. निकिता वेताळ, कु. श्रेया चव्हाण व कु. अनुष्का केंजळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्र महिला संघात स्थान पटकावले. विशेष म्हणजे या तिघींनी सलग तीन वर्षे महाराष्ट्र संघात निवड होत सातारा जिल्ह्याला बहुमान मिळवून दिला आहे. या सर्व खेळाडू मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत.
या खेळाडूंना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा महाराष्ट्र संघाचे ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक श्री. महेश खुटाळे सर आणि एनआयएस हॉकी प्रशिक्षक श्री. सचिन धुमाळ सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रशिक्षणात सहाय्यक म्हणून श्री. बी.बी. खुरंगे सर योगदान देत आहेत.
ही निवड प्रक्रिया हॉकी महाराष्ट्रचे अध्यक्ष मा. श्री. कृष्ण प्रकाश सर (आयपीएस), वरिष्ठ उपाध्यक्ष मा. श्री. मनोज भोरे सर व उपाध्यक्ष ऑलिम्पियन मा. धनंजय महाडिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी त्यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत, फलटणसारख्या ठिकाणी एवढी गुणवत्ता घडत असल्याने येथे “एस्ट्रोटर्फ” मैदान होणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराजसाहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकरसाहेब, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकरसाहेब, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री. शिवाजीराव घोरपडे सर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे सर, दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष श्री. बाहुबली शहा तसेच श्री. पंकज पवार, श्री. प्रवीण गाडे, श्री. विजय मोहिते, श्री. महेंद्र जाधव, श्री. सचिन लाळगे व माजी राष्ट्रीय खेळाडू श्री. सुजीत निंबाळकर यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

,

पोलीस कॉन्स्टेबल महिलेच्या वेशात कोर्टात पोहोचला, ओळख पटल्यानंतर सहकारी अधिकाऱ्यांनीच ठोकल्या बेड्या, कारण…

0
पोलीस कॉन्स्टेबल महिलेच्या वेशात कोर्टात पोहोचला, ओळख पटल्यानंतर सहकारी अधिकाऱ्यांनीच ठोकल्या बेड्या, कारण…



आपण पकडले जाऊ नये यासाठी आरोपीने वारंवार वेष बदलला. पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून काढला असला तरी, तो पोलिसांच्या एक पाऊल पुढेच राहिला.
 



Source link

भीमा कोरेगाव लढाई : इतिहास, वास्तव , शौर्य आणि दलित अस्मितेचा निर्णायक टप्पा

0
भीमा कोरेगाव लढाई : इतिहास, वास्तव , शौर्य आणि दलित अस्मितेचा निर्णायक टप्पा

भीमा कोरेगाव लढाई : इतिहास, वास्तव , शौर्य आणि दलित अस्मितेचा निर्णायक टप्पा
साहस टाईम्स :-  इतिहास हा केवळ भूतकाळाची नोंद नसतो; तो वर्तमानाला दिशा देतो आणि भविष्याला प्रश्न विचारतो. भीमा कोरेगावची लढाई ही अशीच एक ऐतिहासिक घटना आहे, जी दोनशेहून अधिक वर्षांनंतरही समाजमन अस्वस्थ करते, कारण ती शोषितांच्या शौर्याची, स्वाभिमानाची आणि प्रतिकाराची साक्ष देते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे दिलेल्या ऐतिहासिक भाषणात दलित समाजाला उद्देशून जे शब्द उच्चारले, ते केवळ प्रेरणादायी नव्हते, तर ठोस ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित होते.
ते म्हणाले होते –
“तुम्ही शुरविरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नव्हे; तर तुम्ही भिमा कोरेगावला जाऊन बघा. तुमच्या पूर्वजांची नावे तेथे कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेडबकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात…”
हे विधान म्हणजे दलित समाजाला दिलेली आत्मसन्मानाची जाणीव तर होतीच, पण त्याचबरोबर इतिहासाला दिलेले थेट आव्हान होते.
भीमा कोरेगावची लढाई आज अनेक कारणांनी पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या हिंसाचाराला सात वर्षे पूर्ण होत आहेत. हा केवळ दंगलीचा प्रसंग नव्हता, तर दलित अस्मितेवर, इतिहासावर आणि स्मरणपरंपरेवर झालेला जाणीवपूर्वक हल्ला होता. दिनांक १ जानेवारी २०१८ रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैन्य यांच्यात दिनांक १ जानेवारी १८१८ साली झालेल्या ऐतिहासिक युद्धाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भीमा कोरेगाव येथे हजारो नागरिक एकत्र जमले होते. हा जमाव कोणत्याही राजकीय षड्यंत्रासाठी नव्हता, तर इतिहासातील एका शौर्यगाथेचे स्मरण करण्यासाठी आणि या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या शूर वीरांना मानवंदना देण्यासाठी आला होता.
इतिहास स्पष्टपणे सांगतो की, या युद्धात ब्रिटिश सैन्याचा विजय झाला होता. मात्र हा विजय दलित समाजासाठी केवळ ब्रिटिशांचा विजय नव्हता, तर शतकानुशतके अपमान, अन्याय आणि अस्पृश्यतेखाली चिरडल्या गेलेल्या महार समाजाच्या शौर्याचा विजय होता. त्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात महार समाजातील मोठ्या संख्येने सैनिक कार्यरत होते. समाजाने ज्यांना अस्पृश्य ठरवले होते, त्याच समाजातील सैनिकांनी रणांगणावर अतुलनीय पराक्रम गाजवला. हीच या लढाईची खरी ताकद आहे.
इतिहास अभ्यासकांच्या मते, दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २८ हजार सैनिक पुण्यावर आक्रमणासाठी सज्ज होते. त्यांच्या समोर ईस्ट इंडिया कंपनीची केवळ ८०० सैनिकांची तुकडी उभी होती. या तुकडीत तब्बल ५०० महार सैनिक होते. सुरुवातीला पेशव्यांनी सुमारे ३००० सैनिकांची फौज हल्ल्यासाठी पाठवली होती. फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीनं तब्बल १२ तास खिंड लढवली. संख्या, शस्त्रास्त्रे आणि सैनिकी ताकद असूनही पेशव्यांच्या सैन्याला विजय मिळवता आला नाही. उलट, जनरल जोसेफ स्मिथ यांच्या नेतृत्वाखालील मोठे सैन्य दाखल होईल, या भीतीने पेशव्यांचे सैन्य रणांगणातून माघार घेऊन पळ काढू लागले. हा इतिहास आहे कल्पना नव्हे. ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत भारतीय वंशाचे सैनिक होते आणि त्यातील बहुसंख्य महार समाजाचे होते. हे सर्व सैनिक बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री विभागाशी संलग्न होते. म्हणूनच भीमा कोरेगावची लढाई ही केवळ दोन सैन्यांमधील संघर्ष नसून, दलित चळवळीच्या इतिहासातील एक निर्णायक आणि अभिमानास्पद टप्पा आहे.
ज्यांना इतिहास नाकारायचा आहे, ज्यांना दलितांचा शौर्यगौरव सहन होत नाही, त्यांच्यासाठी भीमा कोरेगाव खुपत राहतो. कारण हा इतिहास सांगतो, दलित हा केवळ अन्याय सहन करणारा नाही, तर रणांगण जिंकणारा सिंह आहे. त्यामुळे मनुवादी, सनातनी प्रवृत्ती या लढाईवर वारंवार प्रश्नचिन्ह उभे करतात. अॅड. रोहन जमादार माळवदकर यांसारख्या हस्तकांमार्फत या लढाईचे सत्य दडपून चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्यांच्या खोट्या इतिहासाची आंबेडकरी, पुरोगामी लेखक, इतिहासकार आणि संशोधकांनी अनेकदा पोलखोल केली आहे. काही जण ही लढाई “लढाई नव्हे, तर केवळ चकमक होती” असे सांगतात. परंतु हा दावा पूर्णतः खोटा आहे. या लढाईची तुलना थर्मापीलीच्या युद्धाशी (इ.स.पू.४८०) केली जाते. ज्या प्रमाणे ग्रीससाठी थर्मापीलीचे युद्ध अभिमानाचे प्रतीक आहे, त्याचप्रमाणे बहुजन समाजासाठी भीमा कोरेगावचा संग्राम आहे.
दिनांक २६ मार्च १८२१ रोजी भीमा कोरेगाव येथे उभारण्यात आलेल्या जयस्तंभाची    झाली. या जयस्तंभाचा डिझाइन कॅप्टन नट याने केला होता. तो म्हणतो –
“उपस्थित मान्यवरहो, कोरेगाव येथे झालेली लढाई ही इतिहासातील सर्वात चमकदार लष्करी कामगिरींपैकी एक आहे. पूर्वेकडील राष्ट्रांच्या इतिहासातील ही अत्यंत महान कामगिरी आहे. हा संघर्ष साधा नव्हता, तर रोमन व ग्रीक साम्राज्यांच्या लढायांच्या तोडीचा होता.”
५ नोव्हेंबर १९२५ रोजी मुंबई कौन्सिलमध्ये भाषण करताना कमिशनर मि. एल. जे. माऊंटफोर्ड यांनी स्पष्टपणे सांगितले की, जॉन कंपनीच्या सैन्यात महार सैनिकांचा मोठा भरणा होता आणि कोरेगावचा विजयस्तंभ हा महारांनी गाजविलेल्या पराक्रमाचे प्रतीक आहे.
खडकीची लढाई, येरवड्याची लढाई, भीमा-कोरेगाव ची लढाई, आष्टीची लढाई हा पेशवाईचा अंत होता. छत्रपती प्रतापसिंह भोसले महाराजांची सुटका, महार रेजिमेंटची स्थापना आणि तिचे शौर्य हे सर्व भीमा कोरेगावच्या युद्धाशी थेट जोडलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महारांना लष्करात प्रवेश मिळावा यासाठी केलेली चळवळ, महार बटालियनची स्थापना आणि महार रेजिमेंटच्या बॅजवर कोरेगावचा विजयस्तंभ हे सर्व या इतिहासाची साक्ष देते आहे. म्हणूनच भीमा कोरेगावच्या लढाईविषयी घेतले जाणारे आक्षेप जसे महारांचा या लढाईशी काहीही संबंध नाही, ही लढाई जातीअंतासाठी नव्हती, ही केवळ चकमक होती, संभाजी महाराजांना दिलेली शिक्षा शरियत कायद्यानुसार होती. हे सर्व आक्षेप ऐतिहासिक पुराव्यांच्या कसोटीवर टिकत नाहीत.
ही लढाई महार सैनिकांनी केवळ ब्रिटिशांच्या बाजूने लढली म्हणून महत्त्वाची नव्हती; ती होती जातीयतेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध आणि अमानवी व्यवस्थेविरुद्ध उभारलेली ऐतिहासिक बंडखोरी. गळ्यातील काळा दोरा, थुंकीसाठी गळ्यातील मडके आणि कमरेचा खराटा या अपमानाच्या चिन्हांवर मिळवलेला हा विजय होता.
ही लढाई होती माणुसकीची, अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडणारी; ही लढाई होती स्वाभिमानाची. वास्तविक पाहता, ही लढाई होती मानवमुक्तीची!

आयु.सोमीनाथ पोपट घोरपडे,संस्कार सचिव
भारतीय बौध्द महासभा शाखा सातारा जिल्हा(पूर्व)
मो.नं. 9284658690