Sunday, September 13, 2026
Homeसाताराराष्ट्रीय सब-ज्युनियर हॉकीसाठी साताराच्या तिघींची महाराष्ट्र संघात चमकदार निवड

राष्ट्रीय सब-ज्युनियर हॉकीसाठी साताराच्या तिघींची महाराष्ट्र संघात चमकदार निवड

साहस Times प्रतिनिधी :-  फलटण सारख्या ग्रामीण भागातून घडणारी गुणवत्ता पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर झळकली आहे. राजकोट (गुजरात) येथे होणाऱ्या हॉकी इंडिया अंतर्गत राष्ट्रीय सब-ज्युनियर स्पर्धांसाठी महाराष्ट्र महिला संघाची अंतिम निवड जाहीर झाली असून, दि हॉकी सातारा संघटनेच्या तिघी खेळाडूंनी सलग तिसऱ्या वर्षी संघात स्थान मिळवून जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
बातमीचा मजकूर:
हॉकी इंडिया व हॉकी महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने राजकोट येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब-ज्युनियर स्पर्धांसाठी स्पर्धापूर्व निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या निवडचाचणीत दि हॉकी सातारा संघटनेच्या नऊ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये कु. निकिता वेताळ, कु. श्रेया चव्हाण, कु. अनुष्का केंजळे, कु. तेजस्विनी कर्वे, कु. अनुष्का चव्हाण, कु. यादव, कु. घाडगे, कु. सिद्धी केंजळे व कु. आरोही पाटील यांचा समावेश होता.
अंतिम निवडीत दि हॉकी साताराच्या कु. निकिता वेताळ, कु. श्रेया चव्हाण व कु. अनुष्का केंजळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्र महिला संघात स्थान पटकावले. विशेष म्हणजे या तिघींनी सलग तीन वर्षे महाराष्ट्र संघात निवड होत सातारा जिल्ह्याला बहुमान मिळवून दिला आहे. या सर्व खेळाडू मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत.
या खेळाडूंना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा महाराष्ट्र संघाचे ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक श्री. महेश खुटाळे सर आणि एनआयएस हॉकी प्रशिक्षक श्री. सचिन धुमाळ सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रशिक्षणात सहाय्यक म्हणून श्री. बी.बी. खुरंगे सर योगदान देत आहेत.
ही निवड प्रक्रिया हॉकी महाराष्ट्रचे अध्यक्ष मा. श्री. कृष्ण प्रकाश सर (आयपीएस), वरिष्ठ उपाध्यक्ष मा. श्री. मनोज भोरे सर व उपाध्यक्ष ऑलिम्पियन मा. धनंजय महाडिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी त्यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत, फलटणसारख्या ठिकाणी एवढी गुणवत्ता घडत असल्याने येथे “एस्ट्रोटर्फ” मैदान होणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराजसाहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकरसाहेब, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकरसाहेब, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री. शिवाजीराव घोरपडे सर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे सर, दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष श्री. बाहुबली शहा तसेच श्री. पंकज पवार, श्री. प्रवीण गाडे, श्री. विजय मोहिते, श्री. महेंद्र जाधव, श्री. सचिन लाळगे व माजी राष्ट्रीय खेळाडू श्री. सुजीत निंबाळकर यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments