Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 76

शिक्षणासोबत संस्कारांची जोड महत्त्वाची – चंद्रकांत मोहिते

0
शिक्षणासोबत संस्कारांची जोड महत्त्वाची – चंद्रकांत मोहिते


फलटण | प्रतिनिधी फलटण शहरातील सोमवार पेठ येथे पौष पोर्णिमेचे औचित्य साधून लहान मुला-मुलींसाठी संस्कार वर्गाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी थोर समाजसुधारिका सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थित बालक-बालिकांसाठी सुत्त पठन, वंदना तसेच भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गोष्टी सांगण्यात आल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये नैतिक मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी विचार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी बोलताना चंद्रकांत मोहिते यांनी “फक्त शिक्षण नव्हे तर त्यासोबत चांगल्या संस्कारांची जोड मिळाल्यासच भावी पिढी सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक बनेल,” असे मत व्यक्त केले.
या संस्कार वर्गाच्या आयोजनासाठी प्रदीप खरात, विशाल शिंदे, किशोर मोरे, शिंदे मावशी यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच वाघमारे परिवार, शिंदे परिवार, खरात परिवार यांच्यासह सोमवार पेठ येथील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे परिसरातील पालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यातही असे संस्कारात्मक उपक्रम नियमितपणे राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.

केवळ पदासाठी नकोत, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या, धम्म चळवळीला वाहून घेणाऱ्या महिलांची कार्यकारिणी हवी – सुजाता गायकवाड

0
केवळ पदासाठी नकोत, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या, धम्म चळवळीला वाहून घेणाऱ्या महिलांची कार्यकारिणी हवी – सुजाता गायकवाड

केवळ पदासाठी नकोत, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या, धम्म चळवळीला वाहून घेणाऱ्या महिलांची कार्यकारिणी हवी – सुजाता गायकवाड

शिंगणापूर : महाराष्ट्र राज्य संघटक पुणे तसेच सातारा जिल्हा प्रभारी समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु.दादासाहेब भोसले आणि राज्य संघटक विजय ओव्हाळ यांच्या उपस्थितीत व भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा पूर्व चे अध्यक्ष नानासो मोहिते व सातारा जिल्हा पूर्व ची सर्व कार्यकारणी यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्षा सुजाता गायकवाड यांच्या अधिपत्याखाली माण तालुका महिला कार्यकारणीची निवड नुकतीच पार पडली.
माण तालुक्याच्या महिला कार्यकारणीच्या अध्यक्षपदी स्नेहल बनसोडे, सरचिटणीस शितल शिंदे, कोषाध्यक्ष मंगल रणपिसे, प्रचार पर्यटन उपाध्यक्ष अंजली सरतापे,संस्कार सचिव सुनिता सरतापे, निलाबाई सरतापे, समता सैनिक दल संरक्षण ज्योती खरात, संघटक नीलम भोसले,विजया भोसले यांची निवड करण्यात आली. याच वेळी शिंगणापूर येथील ग्राम शाखेची स्थापना ही करण्यात आली. ग्राम शाखेच्या अध्यक्षपदी सायली भोसले, सरचिटणीस प्रतिज्ञा भोसले, कोषाध्यक्ष ज्योती भोसले, उपाध्यक्ष संस्कार दिपाली भोसले, उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन सुनिता भोसले, कार्यालयीन सचिव वैशाली भोसले यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य संघटक पुणे तसेच सातारा जिल्हा प्रभारी समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु.दादासाहेब भोसले आणि राज्य संघटक विजय ओव्हाळ,राज्य संस्कार सचिव बाळासाहेब गायकवाड, राज्य हिशोब तपासणीस अरुण गायकवाड, भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा पूर्व चे अध्यक्ष नानासो मोहिते, सरचिटणीस सुनील कदम, संस्कार उपाध्यक्ष अविनाश बारसिंग, हिशोब तपासणीस बाळासाहेब जाधव,संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे व सातारा जिल्हा पूर्व ची सर्व कार्यकारणी, वंचित बहुजन आघाडीचे युवराज भोसले, राज्य संस्कार सचिव बाळासाहेब गायकवाड,फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष शिवाजी सावंत व माण तालुका अध्यक्ष अरविंद बनसोडे, सरचिटणीस श्रीमंत भोसले व सर्व कार्यकारिणी व उपस्थित सर्वांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना राज्य हिशोब तपासणीस म्हणाले, ” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या या धम्म संस्थेच्या वतीने सुरू असणाऱ्या धम्मकार्यामध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तेव्हा सर्वांनी जास्तीत जास्त महिला जोडण्याचा प्रयत्न करूया.”
यावेळी माजी प्राचार्य शिवाजी सावंत सर म्हणाले, “महिला या पुरुषांपेक्षा चांगल्या प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात.धम्म संस्कार देण्यामध्ये त्यांचे योगदान कायम राहिले आहे. संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध शिबिरांमध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. जास्तीत जास्त महिलांचे संघटन निर्माण करावे.”
उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सातारा जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्ष आयुनि सुजाता गायकवाड म्हणाल्या, ”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यांचा भारत बुद्धमय करण्याचा संकल्प जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर महिलांनी सक्षमपणे धम्म चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. सातारा जिल्हा पूर्व विभागात एकूण पाच तालुके येतात. या सर्व तालुक्यांच्या कार्यकारिणी सक्षम करण्यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत असून, प्रत्येक ठिकाणी महिलांची सशक्त तालुका कार्यकारिणी उभी करण्याचा आमचा संकल्प आहे.
केवळ पदासाठी नकोत, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या, धम्म चळवळीला वाहून घेणाऱ्या महिलांची कार्यकारिणी हवी आहे.
यासाठी उपासिका शिबिरे नियमितपणे घेतली पाहिजेत, जेणेकरून महिलांमध्ये धम्माची समज, आत्मविश्वास आणि संघटनशक्ती वाढेल. यापूर्वी स्थापन केलेल्या महिला कार्यकारिणी फलटण, खटाव आणि कोरेगाव येथे यशस्वीपणे धम्माचे काम करत आहेत.”
कार्यकारिणी निवड धम्म सभेची सांगता सरणंतंय घेऊन झाली.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व्यसनमुक्तीचा संदेश; फलटणमध्ये अंनिस व समविचारी समितीचा जनजागृती उपक्रम

0
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व्यसनमुक्तीचा संदेश; फलटणमध्ये अंनिस व समविचारी समितीचा जनजागृती उपक्रम

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व्यसनमुक्तीचा संदेश; फलटणमध्ये अंनिस व समविचारी समितीचा जनजागृती उपक्रम
फलटण प्रतिनिधी –
समाजामध्ये दिवसेंदिवस व्यसनांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र चिंताजनक बनत चालले आहे. विशेषतः नवीन वर्षाच्या सुरुवातीला तरुण वर्ग पार्टीच्या नावाखाली दारू, गुटखा यांसारख्या व्यसनांकडे वळत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) व समविचारी मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथील महात्मा फुले चौकात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी नागरिकांसह तरुण वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमादरम्यान अंनिसच्या कार्यकर्त्यांनी “नवीन वर्षाच्या सुरुवातीला दूध प्या, पण दारू व गुटख्यासारखी व्यसने करू नका”, “व्यसनापासून दूर रहा आणि आपले जीवन सुंदर बनवा” अशा जोरदार घोषणा दिल्या. या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला असून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
महात्मा फुले चौकात मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांना व तरुणांना अंनिस व समविचारी मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या वतीने दूध वाटप करण्यात आले. अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत नवीन वर्षाची सुरुवात अशा सकारात्मक व सामाजिक संदेशाने झाल्याची भावना व्यक्त केली.
या जनजागृती कार्यक्रमास आनंद देशमुख (माजी उपविभागीय पोलीस अधिकारी), प्रशांत भुजबळ (माजी इन्कम टॅक्स अधिकारी), डॉ. दीपक शेंडगे, मंदाकिनी गायकवाड, अयान अत्तार, ज्योतीराम बोराटे, मोहिनी कुलकर्णी, आरती काकडे, जयवंत काकडे, पत्रकार बाळकृष्ण भगत, हनुमंत शिंदे, निलेश अहिवळे, प्रसाद शेंडगे, वसीम शेख, सुनील जाधव, बनसोडे सर, सोमनाथ नाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा प्रभावी संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report

0



<p>You can love him… or you can hate him… but you can’t ignore him… साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना हे वाक्य एकदम फिट होतं… उदयनराजे हे ‘रसायन’च वेगळं आहे… त्यांच्यावर कुणी टिका केली तरी ते नेहमी आपल्या मस्तीत असतात… आणि आपल्या स्टाईलमध्येच विरोधकांना उत्तर देतात… मग कौतुकाचा क्षण असेल, तर बघायलाच नको…<br />साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची ही प्रसिद्ध ‘कॉलर स्टाईल’ पुन्हा एकदा दिसली… &nbsp; निमित्त होतं गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी राजेंवर तयार केलेल्या एका गाण्याच्या प्रदर्शनाचं… &nbsp; सातारा रक्षक प्रतिष्ठानचे सुशिल मोझर यांनी हे गाणं तयार केलंय… &nbsp;<br />गाणं ऐकवलं जात असताना उदयनराजेंनी त्यावर ठेका धरला… &nbsp; रजनीकांत स्टाईल गॉगल लावला… &nbsp; आणि प्रसिद्ध कॉलर उडवण्याची अॅक्शन करून दाखवली… &nbsp; आता एवढी स्टाईल मारल्यावर डायलॉगबाजी नाही केली, तर कसं चालेल?<br />छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या उदयनराजेंचे सातारा आणि परिसरात असंख्य चाहते आहेत… &nbsp; त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल तर पेटंट करून घेतली पाहिजे, असंही काहीजण गमतीनं सुचवतात… &nbsp; जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा-तेव्हा ‘राजे’देखील आपला ‘स्वॅग’ दाखवतात आणि ‘प्रजे’ची करमणूक करतात… &nbsp; साताऱ्याहून वैभव बोडकेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.&nbsp;</p>



Source link

साताऱ्यात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा भव्य समारोप | शासनाकडून ३ कोटींचा निधी, पुढेही मदतीची ग्वाही

0
साताऱ्यात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा भव्य समारोप | शासनाकडून ३ कोटींचा निधी, पुढेही मदतीची ग्वाही

मराठी ही केवळ संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा : मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचा आत्मा, अस्मिता आणि अभिमान आहे. मराठी टिकली तरच आपले अस्तित्व टिकेल, याची जाणीव प्रत्येक मराठी माणसाने ठेवली पाहिजे. मराठी ही केवळ संवादापुरती मर्यादित न राहता अर्थार्जन व रोजगाराची भाषा झाली पाहिजे, असे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सातारा येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी भाषेचे वैभव, दरारा आणि दिमाख जपणे हे केवळ कर्तव्य नसून पवित्र जबाबदारी आहे. या साहित्य संमेलनासाठी शासनाने ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, भविष्यातही अशा संमेलनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मराठी साहित्याचा ‘महाकुंभ’ साताऱ्यात
१ ते ४ जानेवारीदरम्यान सातारा येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. समारोप कार्यक्रमास ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री व स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पायाभरणी झालेल्या साताऱ्याच्या पवित्र भूमीत हे संमेलन होणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “हे संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम नसून मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा, सांस्कृतिक आत्मविश्वासाचा आणि विचारस्वातंत्र्याचा उत्सव आहे. मराठी भाषेच्या सर्व प्रवाहांचा हा संगम आहे.”
हिंदी भाषेची सक्ती नाही – मराठीला प्राधान्य
महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती अजीबात होणार नाही, असा ठाम शब्द उपमुख्यमंत्र्यांनी दिला. मराठी भाषेचा सन्मान वाढवण्यासाठी राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या आवारात मराठी ललित पुस्तकांच्या विक्रीसाठी ५० टक्के सवलतीचे स्टॉल उपलब्ध करून दिले जातील. लेखन व प्रकाशन व्यवसायावरील कर कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
शंभराव्या संमेलनासाठी मोठे निर्णय
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, येणारे शंभरावे साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरेल. यानिमित्ताने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शंभर संमेलनाध्यक्षांसाठी ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने सन्मान निधी देण्यात येईल, तर पुढील संमेलनाध्यक्षांसाठी महादजी शिंदे यांच्या नावाने सन्मान निधी दिला जाईल. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे स्मारक सातारा येथे उभारण्यासाठी एमआयडीसीत दीड एकर जमीन देण्यात येणार आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुन्हा सुरू करण्यात येणार असून, ग्रामीण साहित्याचे विविध भाषांमध्ये भाषांतर करून प्रकाशनासाठी शासन निधी उपलब्ध करून देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील साहित्य परिषदेच्या इमारतीसाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्याचे पत्रही यावेळी प्रदान करण्यात आले.
संमेलन साताऱ्याच्या वैभवात भर घालणारे – विश्वास पाटील
संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले की, हे संमेलन साताऱ्याच्या वैभवात भर टाकणारे ठरले. मराठी भाषेतील रसग्रहण, अलंकार आणि विनोद नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सोशल मीडियामुळे वाढणारी असहिष्णुता चिंताजनक असल्याचे सांगत, मराठी भाषेच्या सांस्कृतिक अस्तित्वासाठी लढा सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शंभरावे संमेलन पुण्यात
भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले की, शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार असून, पहिले संमेलनही पुण्यातच झाले होते. त्यामुळे एक ऐतिहासिक वर्तुळ पूर्ण होणार आहे. या निमित्ताने दुबईतही विशेष साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
समारोप कार्यक्रमात संमेलनाला मोलाची मदत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले, सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले, तर विविध ठराव सुनिताराजे पवार यांनी मांडले.

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका : शिवसेना स्वबळावर मैदानात – ना. एकनाथ शिंदे यांचा निर्णायक आदेश

0
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका : शिवसेना स्वबळावर मैदानात – ना. एकनाथ शिंदे यांचा निर्णायक आदेश


फलटण प्रतिनिधी :-  आगामी सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शिवसेनेच्या वतीने स्वबळावरच लढविण्याचा ठाम निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ना. एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. “जिल्ह्यात शिवसेनेची खरी ताकद दाखवण्याची हीच वेळ आहे,” असा स्पष्ट संदेश देत त्यांनी स्थानिक नेतृत्वाला सज्ज राहण्याच्या ठोस सूचना केल्या.
सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर पार पडलेल्या बैठकीत ना. एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री ना. शंभूराज देसाई आणि ना. भरत गोगावले उपस्थित होते. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा रणसंग्राम पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीत संघटन मजबूत करणे, गावोगावी शिवसेना पोहोचवणे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देणे याबाबत ठोस राजकीय रणनीती ठरवण्यात आली. जिल्ह्यातील शिवसैनिकांनी एकजुटीने आणि जोमाने कामाला लागावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या निर्णायक चर्चेसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, जिल्हा समन्वयक विराज खराडे, तालुका प्रमुख नानासो इवरे, ज्ञानेश्वर पवार, अमोल निंबाळकर, अॅड. संदीप कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय विद्यापीठांचे कुलगुरू : पाणी संघर्षातून विकासाचा दीपस्तंभ – श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

0
पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय विद्यापीठांचे कुलगुरू : पाणी संघर्षातून विकासाचा दीपस्तंभ – श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर


फलटण प्रतिनिधी :-  जनतेच्या ऋणानुबंधातून घडलेलं लोकाभिमुख नेतृत्व
लोकशाहीच्या लोकोत्सवात जनतेच्या विश्वासावर उभं राहिलेलं, लोकमान्य आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे आजही महाराष्ट्र पाहतो आहे. समाजकारण आणि राजकारणातील एक दीपस्तंभ म्हणून ओळख असलेल्या रामराजेंना जनसागऱ्याच्या साक्षीने “पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय विद्यापीठांचे कुलगुरू” असे संबोधले जाते, हेच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे.
जनतेच्या ऋणातून मुक्त व्हावं असं त्यांना कधीच वाटलं नाही, कारण हे ऋण म्हणजे दुष्काळी परिस्थितीवर मात करत पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केलेल्या अटोकाट प्रयत्नांची जबाबदारी. शिवारात वाहणारे पाणी, कालवे आणि खळखळून वाहणारे बंधारे हे त्या संघर्षाचं जिवंत प्रतीक आहेत.
वयाच्या ८० व्या वर्षांकडे वाटचाल करत असतानाही तालुक्यातील प्रत्येक प्रश्नावर सतत कार्यरत असलेलं, अद्ययावत तंत्रज्ञानाशी नातं जपणारं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यातही खंबीरपणे उभं राहणारं हे नेतृत्व आजही तितकंच लढवय्यं आहे. डीपफेक बातम्यांचं पेव फुटलेलं असतानाही विश्वासार्हतेचा किल्ला अजूनही अभेद्य आहे.
आजची युवापिढी दुष्काळ पाहिलेला नाही, पण त्या पाण्यामागचा संघर्ष मात्र रामराजेंच्या कर्तृत्वात कोरलेला आहे. सातारा जिल्हा, फलटण, लोणंद, खडाळा परिसरातील सामान्य माणूस आणि युवक आजही मोठ्या विश्वासाने व आशेने त्यांच्या नेतृत्वाकडे पाहतो आहे.
महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नावर विचारांशी तडजोड न करता केलेला संघर्ष, शासनदरबारी उठवलेला बुलंद आवाज आणि जनतेचा आशिर्वाद यामुळे सातारा जिल्हा व फलटण तालुक्याचं नाव राज्याच्या नकाशावर सुवर्ण अक्षरांनी नोंदवलं गेलं, हे नाकारता येणार नाही.
उर्वरित काळात फलटण तालुक्याचा कायापालट करण्याचा निर्धार त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट दिसतो आहे. काही मंडळी वैफल्यग्रस्त होऊन आरोप-प्रत्यारोपांची मॅरेथॉन सुरू ठेवत असली, तरी जनतेच्या मनातील नवचैतन्याचं वारं आजही महाराज साहेबांच्या अवतीभोवतीच घोंगावत आहे.
म्हणूनच, लवकरच फलटण तालुक्यात जनसागऱ्याच्या साक्षीने विकासात्मक सहस्त्रचंद्रदर्शनाचे विविध, विलक्षण आणि विलोभनीय परिवर्तनाचे किरण रेखाटले जातील, अशी ठाम भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
माझं सुंदर फलटण…. स्वच्छ फलटण….मी फलटण कर…!
          

सस्तेवाडी पंचायत समिती गणासाठी संदीप शिंदे यांची उमेदवारी जाहीर व्हावी; ग्रामस्थांची ठाम मागणी

0
सस्तेवाडी पंचायत समिती गणासाठी संदीप शिंदे यांची उमेदवारी जाहीर व्हावी; ग्रामस्थांची ठाम मागणी


फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील सस्तेवाडी पंचायत समिती गणासाठी धुरंधर व लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे संदीप शिंदे यांना उमेदवारी मिळावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. सातत्यपूर्ण जनसंपर्क, लोकांच्या समस्या तत्परतेने सोडवण्याची कार्यपद्धती आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे आपल्याला उमेदवारी निश्चित मिळेल, असा विश्वास संदीप शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
सस्तेवाडी पंचायत समिती गणासाठी भाजप खासदार गटातून उमेदवारी मिळावी यासाठी पंचक्रोशीत संदीप शिंदे यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दिवंगत माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून गेली ३५ वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात निष्ठेने कार्यरत असलेले संदीप शिंदे हे एक विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पत्नी शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्याविरोधात त्यांनी मागील जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत निसटता पराभव झाला असला, तरी खचून न जाता त्यांनी समाजसेवेचा वेग अधिक वाढवला. जनतेशी असलेला घट्ट जनसंपर्क आणि लोकहिताच्या प्रश्नांवर केलेले सातत्यपूर्ण कार्य हे त्यांचे बलस्थान ठरले आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवून “दादांचा शब्द म्हणजे अंतिम आदेश” मानत काया-वाचा-मनाने काम करणारे कार्यकर्ते म्हणून संदीप शिंदे यांची ओळख आहे. पंचक्रोशीत दांडगा जनसंपर्क, १५० हून अधिक बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच सुमारे २०० तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे असे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे.
रणजित दादांच्या माध्यमातून शिंदेवाडी-कंबळेश्वर पूल (७० लाख), खुंटे-शिंदेवाडी रस्ता (१.५ कोटी), खुंटे-पाटणेवाडी रस्ता (२ कोटी), स्मशानभूमीची भिंत, दलित वस्तीतील रस्ते आदी अनेक विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
अशा कार्यक्षम, निष्ठावान आणि तळागाळातील जनतेशी नाळ जोडून काम करणाऱ्या नेतृत्वाला पंचायत समितीची उमेदवारी मिळावी, अशी ठाम अपेक्षा सस्तेवाडी पंचायत समिती गणातील जनतेतून व्यक्त होत आहे.

फलटणच्या राजकारणात ऐतिहासिक पाऊल : बहुजन समाजाला सन्मानाची नवी ओळख

0
फलटणच्या राजकारणात ऐतिहासिक पाऊल : बहुजन समाजाला सन्मानाची नवी ओळख

फलटण प्रतिनिधी :फलटण शहराच्या राजकीय इतिहासात प्रथमच बौध्द व इतर बहुजन समाजाला सन्मानाचे आणि निर्णायक स्थान मिळाल्याने सर्वत्र समाधान व आनंदाचे वातावरण आहे. तब्बल ३० वर्षांच्या राजकीय प्रवासात जे कधी घडले नाही, ते आज घडले असून नगरसेवक मा. सचिनसर अहिवळे यांची “प्रमुख पक्ष” मानल्या जाणाऱ्या पक्षात गटनेते (पक्ष प्रमुख) म्हणून निवड करण्यात आली आहे.
विश्वासाचा सन्मान, इतिहासाची नवी नोंद
आदरणीय मा.खा. श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा), नगराध्यक्ष मा. श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर (दादा) तसेच फलटण–कोरेगाव मतदारसंघाचे आमदार मा. श्री. सचिन पाटीलसाहेब यांनी बौध्द व इतर बहुजन समाजावर दाखवलेला हा विश्वास म्हणजेच नगरसेवक सचिन अहिवळे यांना बहाल करण्यात आलेले गटनेते पद होय.
वंचिततेचा इतिहास, सन्मानाची आजची घडी
फलटणच्या ३० वर्षांच्या राजकीय इतिहासात या समाजाला केवळ मतांसाठी वापरले गेले; मात्र सन्मानाचे, जबाबदारीचे स्थान कधीच दिले गेले नाही. नगरसेवक असतानाही पक्षातील महत्त्वाचे पद देण्याचे धाडस पूर्वी कुणी केले नव्हते. मात्र आज त्या अन्यायकारक परंपरेला छेद देत बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम झाले आहे.
सामाजिक आत्मसन्मानाचा विजय
या निर्णयामुळे बौध्द व इतर बहुजन समाजाचा आत्मसन्मान उंचावला असून, राजकीय ताकदीने अन्यायाला प्रत्युत्तर देण्याची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
नगरसेवक मा. सचिनसर अहिवळे यांच्यावर गटनेते पदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल
आम्ही समस्त समाज बांधव
आदरणीय मा.खा. श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा),
नगराध्यक्ष मा. श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर (दादा),
मा. आमदार श्री. सचिन पाटीलसाहेब,
तसेच श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर
यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. 

        हरिष काकडे ( सामाजिक कार्यकर्ते )

पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा

0
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा


फलटण, दि. ४ : फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माजी आमदार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष व शिवसंदेशकार कै. कॉ. हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ७ व ८ जानेवारी रोजी माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल (घडसोली मैदान), फलटण येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संघ सहभागी होणार आहेत. अत्यंत उत्साही, आनंदी आणि खेळकर वातावरणात या स्पर्धा नेहमीच यशस्वीपणे पार पडत असून, यंदाही तसाच उत्साह पाहायला मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात येणार असून, त्यानंतर फलटण शहर व तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय नेते यांच्या संघांमध्ये प्रदर्शनीय सामना रंगणार आहे. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघांमध्ये नियमानुसार साखळी व अंतिम सामने खेळवले जाणार आहेत.
फलटण शहर व तालुक्यातील क्रिकेटप्रेमींनी दोन्ही दिवस या स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.