Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 75

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये शशिकांत टिंगरे ठरणार ‘जायंट किलर’?

0
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये शशिकांत टिंगरे ठरणार ‘जायंट किलर’?

पुणे : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात विविध अंदाज, चर्चा आणि भाकिते रंगताना दिसत आहेत. काही ठिकाणी प्रचाराच्या सुरुवातीलाच विजयाचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात मतदारांचा कौल काय असेल, याबाबत अनिश्चितताच कायम आहे.

अशा वातावरणात पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत ऊर्फ शशी अण्णा टिंगरे यांचे नाव सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहे. प्रचारादरम्यान दिसून येणारा लोकसहभाग, नागरिकांशी असलेला थेट संवाद आणि एकूणच जनसेवक म्हणून तयार झालेली त्यांची प्रतिमा यामुळे प्रभागातील राजकीय चित्र वेगळे वळण घेत असल्याचे दिसत आहे.

शशी अण्णा टिंगरे यांच्या प्रचार यंत्रणेची बांधणी, नियोजनबद्ध प्रचार आणि नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद हे सर्व घटक लक्षवेधी ठरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कोणतेही पद नसतानाही सातत्याने नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम केल्याची त्यांची ओळख प्रभागात पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

प्रचारादरम्यान अनेक नागरिकांकडून “पद नसतानाही जनतेसाठी काम करणारा उमेदवार” अशी प्रतिमा शशिकांत टिंगरे यांच्याबाबत व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ते केवळ एक उमेदवार म्हणून नव्हे, तर प्रस्थापित राजकीय समीकरणांना आव्हान देणारा घटक ठरू शकतात, असा अंदाज काही राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

प्रभाग क्रमांक १ मधील लढत चुरशीची असली, तरी सध्याचे वातावरण पाहता शशिकांत टिंगरे यांच्या उमेदवारीकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याचे चित्र आहे. ते ‘जायंट किलर’ ठरतात का, आणि जनतेकडून मिळणारा प्रतिसाद प्रत्यक्ष मतांच्या रूपाने कितपत उमटतो, हे येत्या निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

लोकशाही प्रक्रियेत अंतिम निर्णय हा मतदारांचाच असतो. त्यामुळे प्रचारातील चर्चा, वातावरण आणि अपेक्षा यापेक्षा १६ जानेवारीचा निकाल काय सांगतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी नगरसेवक संजय नेवाळे यांच्या विकासकामांमुळे सत्यभामा नेवाळे यांना मिळणार मतदारांची पोचपावती?

0
माजी नगरसेवक संजय नेवाळे यांच्या विकासकामांमुळे सत्यभामा नेवाळे यांना मिळणार मतदारांची पोचपावती?

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आरक्षणामुळे अनेक ठिकाणी राजकीय समीकरणांमध्ये बदल होताना दिसत आहेत. काही प्रभागांमध्ये या बदलांमुळे अनिश्चितता निर्माण झाली असली, तरी काही ठिकाणी नागरिकांनी पुढाकार घेत नव्या समीकरणांची जुळवणी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अशाच प्रकारचे राजकीय चित्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये दिसून येत आहे. या प्रभागातून माजी नगरसेवक तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला व साहित्य समितीचे माजी अध्यक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय नेवाळे यांच्या पत्नी सत्यभामा संजय नेवाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

विशेष म्हणजे, ही उमेदवारी केवळ पक्षीय निर्णयापुरती मर्यादित नसून, स्थानिक नागरिकांमधून आलेल्या मागणीतून आकारास आल्याची चर्चा प्रभागात ऐकायला मिळत आहे. संजय नेवाळे यांनी नगरसेवक म्हणून कार्यरत असताना प्रभाग क्रमांक ११ मध्ये राबवलेल्या विविध विकासकामांची सकारात्मक आठवण आजही नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

रस्ते, मूलभूत सुविधा, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम तसेच नागरिकांच्या प्रश्नांचे वेळेत निराकरण या बाबींचा उल्लेख नागरिकांकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळे संजय नेवाळे यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा वारसा सत्यभामा नेवाळे यांच्या उमेदवारीला कितपत पूरक ठरतो, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

सत्यभामा नेवाळे यांच्या उमेदवारीनंतर प्रचाराला वेग आला असून, प्रभागात चांगलेच निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे. मात्र लोकशाही प्रक्रियेत अंतिम निर्णय हा मतदारांचाच असतो. त्यामुळे संजय नेवाळे यांच्या विकासकामांची पोचपावती मतदार कितपत आणि किती मताधिक्याने सत्यभामा नेवाळे यांच्या पारड्यात टाकतात, हे १६ जानेवारीला स्पष्ट होणार आहे.

प्रभाग क्रमांक ११ मधील निवडणूक लढत चुरशीची ठरण्याची शक्यता असून, सत्यभामा नेवाळे यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील राजकीय चित्राला नवी दिशा मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चेतन बेंद्रे यांच्या उमेदवारीने प्रभाग क्रमांक १५ ची राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे

0
चेतन बेंद्रे यांच्या उमेदवारीने प्रभाग क्रमांक १५ ची राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे

पिंपरी चिंचवड : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उमेदवारी जाहीरनामे, प्रवेश-माघार आणि अंतर्गत समीकरणांमुळे मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगताना दिसत आहे. २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर वातावरण काहीसे शांत झाले असले, तरी त्याची धग अद्यापही राजकीय वर्तुळात जाणवत आहे.

याच बदलत्या राजकीय समीकरणांचा प्रभाव पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे. या प्रभागात सामाजिक आणि राजकीय घडामोडींमुळे निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सामाजिक कार्यकर्ता म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात परिचित असलेले चेतन बेंद्रे हे सुरुवातीला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांना उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा देखील होती. मात्र अधिकृत उमेदवारी जाहीर होताच त्यात चेतन बेंद्रे यांचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारणाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी चेतन बेंद्रे यांनी केलेले कार्य लक्षवेधी राहिले आहे. त्यामुळेच त्यांना उमेदवारी का नाकारण्यात आली, याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, एका सुशिक्षित आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्त्याला प्रत्यक्ष राजकारणात आणण्याची संधी शिवसेना पक्षाने साधली. शिवसेनेने प्रभाग क्रमांक १५ मधून चेतन बेंद्रे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर या प्रभागातील निवडणूक चित्राला वेगळीच कलाटणी मिळाल्याचे दिसून येत आहे.

या साऱ्या राजकीय घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक १५ मधील लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचे संकेत आहेत. चेतन बेंद्रे यांच्या उमेदवारीमुळे काही प्रमाणात सकारात्मक, तर काही प्रमाणात नकारात्मक प्रतिक्रिया उमटत असल्या, तरी एकंदरीत वातावरण त्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.

विशेष म्हणजे, चेतन बेंद्रे यांचा आजपर्यंतचा सामाजिक प्रवास, नागरिकांशी असलेला थेट संपर्क आणि प्रश्न सोडवण्यासाठीची कार्यपद्धती पाहता, प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांमध्ये त्यांच्या नावाला सध्या पसंती मिळताना दिसत आहे. याबाबतची चर्चा नागरिकांमधून उघडपणे होत असल्याचे चित्र आहे.

आता शिवसेनेच्या उमेदवाराच्या रूपात चेतन बेंद्रे प्रभाग क्रमांक १५ मध्ये बाजी मारणार का, आणि जर त्यांनी यश मिळवले तर ते किती प्रभावी ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंतच्या सामाजिक कार्यामुळे प्रभाग क्रमांक १४ मध्ये कैलास कुटे यांना वाढते जनसमर्थन

0
आतापर्यंतच्या सामाजिक कार्यामुळे प्रभाग क्रमांक १४ मध्ये कैलास कुटे यांना वाढते जनसमर्थन

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्रात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ अ गटातील निवडणूक सध्या विशेष चर्चेत आहे. विविध पक्षांचे उमेदवार रिंगणात असले तरी या प्रभागात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार कैलास कुटे यांचे नाव सातत्याने चर्चेत राहिले आहे.

प्रचाराच्या निमित्ताने नागरिकांशी थेट संवाद, बैठका आणि प्रचार फेऱ्यांमधून कैलास कुटे यांना मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याचा अनुभव, स्थानिक प्रश्नांची जाण आणि सातत्याने जनतेशी असलेला संपर्क यामुळे मतदारांमध्ये त्यांच्या विषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, प्रभाग क्रमांक १४ मधील प्रचारादरम्यान कैलास कुटे यांच्या बाजूने झुकणारा जनमताचा कल जाणवतो आहे. नागरिकांशी झालेल्या संवादातून मूलभूत सुविधा, विकासकामे आणि प्रशासनातील पारदर्शकतेबाबत त्यांनी मांडलेली भूमिका मतदारांना भावताना दिसत आहे.

या प्रभागात लढत असली तरी प्रचारातील एकूण वातावरण पाहता कैलास कुटे यांना तुलनेने अनुकूल स्थिती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मात्र लोकशाही प्रक्रियेत अंतिम निर्णय हा मतदारांचाच असतो आणि तो १६ जानेवारीला मतपेटीत बंद होणार आहे.

प्रचाराच्या सध्याच्या चित्रावरून प्रभाग क्रमांक १४ मधील निवडणूक निकालाबाबत उत्सुकता वाढली असून, कैलास कुटे यांच्या बाजूने उमटणारा जनसमर्थनाचा कौल किती मताधिक्याने प्रत्यक्षात दिसून येतो, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: सत्संगाला गेल्यावर शरीर,‎मनाचेही स्नान घडावे‎

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  सत्संगाला गेल्यावर शरीर,‎मनाचेही स्नान घडावे‎


  • Marathi News
  • Opinion
  • Pt. Vijayshankar Mehta’s Column, After Going To Satsang, One Should Bathe The Body And Mind

8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सत्संग ऐकण्याचाही स्वतःचा एक नियम असतो. गरुड‎काकभूशुंडीच्या घरी गेले तेव्हा वडाखाली सत्संग होत होता.‎तुलसीदास लिहितात- ‘करि तड़ाग मज्जन जलपाना, बट तर गयउ‎हृदयँ हरषाना।’ तलावात स्नान करून आणि अल्पोपहार घेतल्यानंतर ते‎आनंदी मनाने वडाच्या झाडाकडे गेले. आता येथे तीन गोष्टी लिहिल्या‎आहेत. प्रथम स्नान केले नंतर अल्पोपहार मग ते प्रसन्न झाले. सत्संग‎ऐकायला जाता तेव्हा तुमचे शरीर शुद्ध करा, काहीतरी खाऊन जा.‎कारण भूक तुम्हाला गोपाळाची पूजा करू देत नाही. आनंदी राहू देत‎नाही. जगाची चिंता बूट आणि चप्पलेसोबत घराबाहेर ठेवा. येथे‎स्नान‎ाचा सखोल अर्थ आहे. आपले शास्त्र सांगते की मनुष्याने मंत्र‎स्नानही केले पाहिजे. आपण शरीराला पाण्याने स्नान घालतो. परंतु‎मनाच्या स्नानासाठी प्राणवायू लागतो. म्हणून मंत्र घ्या. तो श्वासात‎उतरवा. मन धूत आहात असे त्याला शरीरात वाहू द्या. मग सत्संगात‎बसा. हे केल्यानंतर सत्संगात मिळणारी गोष्ट अद्वितीय, अद्भुत आणि‎खूप उपयुक्त असेल. ‎



Source link

भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्व अंतर्गत माण तालुका कार्यकारणीची निवड जाहीर

0
भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्व अंतर्गत माण तालुका कार्यकारणीची निवड जाहीर


माण (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्व अंतर्गत माण तालुका कार्यकारणीची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. या निवड प्रक्रियेत सर्वानुमते बाळासाहेब सरतापे यांची माण तालुका अध्यक्षपदी, अरविंद बनसोडे यांची सरचिटणीसपदी तर सुनील भोसले यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य संघटक (पुणे) व सातारा जिल्हा प्रभारी दादासाहेब भोसले, राज्य संघटक विजय ओव्हाळ, राज्य संस्कार सचिव बाळासाहेब गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष नानासाहेब मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
संघटन अधिक बळकट करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देणे व सामाजिक कार्य प्रभावीपणे राबवणे, हा नव्या कार्यकारणीचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर व राज्य संघटक दादासाहेब भोसले यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संघटनात्मक बांधणीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना विजय ओव्हाळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली ही मातृसंस्था असून बौद्ध धम्म देशभर पोहोचवण्याचे ऐतिहासिक कार्य महाराष्ट्राने केले आहे. येणाऱ्या काळात BSI-25 हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी संघटन अधिक मजबूत करण्याची गरज आहे. तसेच प्रलंबित प्रश्न सनदशीर मार्गाने, एकजुटीने लढवण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्य संस्कार सचिव बाळासाहेब गायकवाड यांनी बौद्धाचार्यांची संख्या वाढवणे आणि केवळ विधीपुरते न थांबता धम्म समाजात खोलवर रुजवण्यासाठी काम करण्यावर भर दिला.
कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मोहिते, जिल्हा सरचिटणीस सुनिल कदम, संस्कार विभाग उपाध्यक्ष अविनाश बारसिंग, हिशोब तपासनीस बाळासाहेब जाधव, संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, राज्य हिशोब तपासनीस अरुण गायकवाड, जिल्हा महिला विभागाध्यक्ष सुजाता गायकवाड, फलटण तालुका माजी अध्यक्ष शिवाजी सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत माण तालुक्यात संघटन अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमात श्रीमंत भोसले यांनी निवडपत्र वाचन केले, तर जिल्हा सरचिटणीस सुनिल कदम यांनी जुनी कार्यकारणी बरखास्त करून सातारा जिल्हा अध्यक्ष पूर्व अध्यक्ष नानासो मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारणीची निवड प्रक्रिया पूर्ण केली. माण तालुक्यात उपासिका शिबीर, समता सैनिक दल व विविध संस्कार शिबिरे राबवण्याचे आव्हान यावेळी देण्यात आले.

यावेळी बाळासाहेब गायकवाड राज्य संस्कार सचिव,विजय ओव्हाळ राज्य संघटक, महाराष्ट्र राज्य, दादासाहेब भोसले राज्य संघटक तथा समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर, नानासाहेब मोहिते सातारा जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष, सुनिल कदम सर जिल्हा सरचिटणीस, सुजाता गायकवाड, जिल्हाध्यक्ष महिला विभाग, संस्कार विभाग उपाध्यक्ष सातारा जिल्हा पूर्व, अविनाश बारसिंग,सातारा जिल्हा पूर्व चे सरचिटणीस सुनिल कदम, शिवाजी सावंत वंचित चे युवराज भोसले, आयु.बाळासाहेब जाधव जिल्ह्याचे हिशोब तपासणीस, माण तालुका अध्यक्ष अरविंद बनसोडे, सरचिटणीस श्रीमंत भोसले, सुनिल भोसले, कुमार सरतापे, सोनाजी भोसले, प्रशांत शिंदे, बाळासाहेब भोसले उपस्थित होते.

फलटण नगरपालिकेत सत्तांतर : उपनगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादीचा दावा, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 50% जागांची मागणी

0
फलटण नगरपालिकेत सत्तांतर : उपनगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादीचा दावा, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 50% जागांची मागणी


फलटण | प्रतिनिधी  :- फलटण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक यश मिळवत तब्बल 35 वर्षांची राजे गटाची सत्ता उलथवून लावली आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांनी एकत्र येत नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक निवडून आणत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निकालामुळे फलटणच्या राजकारणात नवे समीकरण आकारास आले आहे.
नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची निवड झाली असली, तरी या विजयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही मोठा वाटा असल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रचार, संघटन आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रभावी भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावे, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी मांडली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,
“महायुतीच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचा वाटा मोठा आहे. त्यामुळे सत्तेतील सहभाग म्हणून उपनगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणे योग्य ठरेल.”
मात्र त्यांनी पक्षातील शिस्त आणि आघाडीतील एकात्मतेवर भर देत स्पष्ट केले की,
“महायुतीची कोअर कमिटी जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. पक्ष व आघाडीच्या हितासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे महत्त्वाचे आहे.”
दरम्यान, उपनगराध्यक्ष पदावरून महायुतीतील हालचालींना वेग आला असून अंतिम निर्णयाकडे फलटणकरांचे लक्ष लागले आहे. कोअर कमिटी नेमकी कोणती भूमिका घेते आणि सत्तेतील समतोल कसा राखला जातो, यावर आगामी राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत.
याचबरोबर येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रच निवडणूक लढवणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले असून, या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 50 टक्के जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केली आहे.

‘तुम्ही तर देवालाही सोडलं नाही,’ शबरीमला मंदिर सोने चोरी प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टाने सुनावलं, फेटाळून लावली याचिका

0
‘तुम्ही तर देवालाही सोडलं नाही,’ शबरीमला मंदिर सोने चोरी प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टाने सुनावलं, फेटाळून लावली याचिका



Supreme Court on Sabarimala Temple Gold Theft: मंदिरातून चोरीला गेलेले सोने हे 1998-99 मध्ये यूबी ग्रुपचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांनी दान केलेल्या द्वारपालांच्या (द्वारपालांच्या) मूर्तींवर लावलेल्या लेपचा मोठा भाग होता. चोरीनंतर, केरळ उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि उच्चस्तरीय चौकशीला सुरुवात केली.
 



Source link

कालकथित नामदेव भागोजी अडसूळ यांच्या अस्थि संकलनातून पर्यावरण रक्षणाचा संदेश

0
कालकथित नामदेव भागोजी अडसूळ यांच्या अस्थि संकलनातून पर्यावरण रक्षणाचा संदेश


बारामती : कालकथित (ता. बारामती) येथे दिवंगत नामदेव भागोजी अडसूळ (वय ९३ वर्षे) यांच्या अस्थि संकलनाचा कार्यक्रम सामाजिक, वैज्ञानिक व पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून अत्यंत अर्थपूर्ण पद्धतीने संपन्न झाला.
अडसूळ कुटुंबीयांच्या वतीने पाण्यात अस्थी प्रवाहात न सोडता त्या खड्ड्यात विधीपूर्वक टाकून, त्यावर कालकथित नामदेव भागोजी अडसूळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंब्याचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण रक्षण व निसर्गसंवर्धनाचा प्रभावी संदेश समाजास देण्यात आला.
हा समाजप्रबोधनात्मक उपक्रम भारतीय बौद्ध महासभा शाखा बारामती तालुका यांच्या पुढाकाराने पार पडला. कार्यक्रमास बौद्धाचार्य आयु. सोमनाथ विश्वनाथ लोंढे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष व बौद्धाचार्य आयुष्यमान महावीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. आयु.सोमनाथ विश्वनाथ लोंढे यांनी अस्थि संकलन व पुण्यानुमोदन विधींचे संचलन केले. यावेळी फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव यांनी आपल्या मार्गदर्शनातून पर्यावरण रक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन व सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.
हा उपक्रम पारंपरिक प्रथांना नवा अर्थ देणारा असून, श्रद्धा आणि निसर्ग यांचा समतोल साधणारा आदर्श उपक्रम म्हणून समाजात कौतुकास पात्र ठरत आहे.

सातारा जिल्हा व फलटण तालुक्यातील जनतेची गळचेपी होऊ देणार नाही…!!!

0
सातारा जिल्हा व फलटण तालुक्यातील जनतेची गळचेपी होऊ देणार नाही…!!!


फलटण प्रतिनिधी :-  फलटण तालुक्यातील श्रीमत रामराजे नाईक निंबाळकर यांचे निवासस्थान लक्ष्मी व्हिला म्हणून जरी परिचित असेल मात्र वास्तवात ते लोकसेवा व लोकभावनेचे लोकभवन म्हणून ओळखले जाते .
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर नेहमीं म्हणतात, जो सार्वजनिक स्वातंत्र्यला विरोध करतो , तो स्वतःच्याही स्वातंत्र्यावर घाला घालत असतो.
आपल्या देशामध्ये महाराष्ट्र राज्याची एक वेगळी उंची आहे,या देशामध्ये व जगामध्ये प्रगतीच्या दिशेने उंची वाढविण्याचे काम खरया अर्थाने लोकशाहीच्या मार्गाने झाले आहे.लोकशाहीचा महत्त्वाचा गाभा म्हणजे लोकप्रतिनिधी होत. महाराष्ट्रातून निवडून गेलेले लोकप्रतिनिधीचे विधीमंडळ हे विकासपर्वा चे एक पवित्र मंदिर आहे. आपल्या राज्यामध्ये विधानसभा व विधानपरिषद अशी वरिष्ठ सभागृह व कनिष्ठ सभागृह आहेत ज्यांना पारंपरिक पद्धतीने वरचे सभागृह व खालचे सभागृह असे संबोधले जाते.
विधीमंडळ म्हणजे महाराष्ट्रातील लोकशाहीतील सर्वोच्च सभागृह आहे, महाराज साहेबांनी त्यांच्या राजकीय प्रवासात या दोन्ही सभागृहात काम करण्याची संधी फलटण तालुक्याने दिली व संधीचे सोने केले ह्या बाबतीत कोणाच्या मनात साशंकता नाही.
हिंदूह्रदय शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे , माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पंत जोशी , कै. गोपीनाथ मुंडे साहेब, कै. शंकरराव चव्हाण, कै.सुधाकर नाईक, कै.विलासराव देशमुख, कै . आर.आर. पाटील, मा.एकनाथ खडसे, मा. केशवराव धोंडगे, मा. राम कापसे,मा . नारायण राणे साहेब,मा. अशोक चव्हाण साहेब, मा. पृथ्वीराज चव्हाण साहेब, मा. देवेंद्र फडणवीस साहेब , मा.एकनाथ शिंदे ,मा. नितीन जी गडकरी साहेब, मा. अजित दादा पवार यांच्या बरोबरीने संवेदनशील व उठावदार काम केले व विशेषतः मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कार्यकर्तृत्व, विचार , आशिर्वाद व मार्गदर्शन प्रचंड प्रमाणात मिळवत राजकीय प्रवासातील पाणी प्रश्नावरील एक उत्तम अभ्यासक व विकासाची दृष्टीची भागीदारी कशी असावी यांचे दिनक्रमाचे कामकाज हे सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे.
महाराज साहेबांनी अनेक महामहिम राज्यपाल के. विद्यासागर राव, मा. भगतसिंह कोशयारी, मा. के. शंकरनारायणन, मा.एस. सी. जमीर , कै. पी. सी.अलेकझडर अशा महानुभव मान्यवरांचा सहवास लाभला.
महाराज साहेबांनी जागतिक स्तरावर ग्लोबल वार्मिग , वृक्षवल्लीपर्यावरण या विषयावर सुध्दा काम केले आहे.
वृक्षवल्ली हि शहरी लोकांसाठी आॅकसिजन देणारी फुफसे आहेत हे सांगण्याचा सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न केला आहे.
आजमितीस सुध्दा अनेक व्यासपीठांवर राजकीय फटकेबाजी बरोबर समाजस्वास्थ्याला असलेले धोके बाबतीत नेहमीच सकारात्मक विचार व स्मार्ट मार्गदर्शन करायला मागेपुढे पाहत नाहीत कारण हे आपलं एक राष्ट्रीय सेवावृत्तीचे कर्तव्य आहे हे समाजातील प्रत्येक घटकाला समाजवणयाचा व सांगण्याचा अटोकाट प्रयत्न करत असतात.
अनेक संकटे येतील- जातील, नवीन प्रतिनिधी येतील- जातील, ज्या पध्दतीने तुकाराम महाराजांची गाथा पाण्यामध्ये बुजविण्याचा प्रयत्न झाला, परंतु समाज मनातून ही गाथा तरली,ती समाजासाठी वरती आली तसेच भविष्याकाळातील फलटण तालुक्यातील जनतेचे मूलभूत प्रश्न, गरजा, पायाभूत सुविधाआर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी वर्तमानकाळात सुध्दा महाराजांचा लोकशाहीच्या माध्यमातून मजबूत, बळकट व मंगलमय होण्यासाठी नेहमीच संवेदनशील व कटिबद्ध असणार हे निश्चित …!!

माझा अभिमान फलटण….. माझा स्वाभिमान फलटण….मी फलटण कर…!