Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 74

पांथस्थ आयोजित ‘ओरिसा’ अभ्यास दौरा : २४ ते ३० मार्च २०२६

0
पांथस्थ आयोजित ‘ओरिसा’ अभ्यास दौरा : २४ ते ३० मार्च २०२६

साहस Times :- पांथस्थच्या वतीने ऐतिहासिक, सांस्कृतिक व पुरातत्वीय वारशाचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘ओरिसा अभ्यास दौरा’ आयोजित करण्यात आला आहे. हा अभ्यास दौरा २४ मार्च ते ३० मार्च २०२६ दरम्यान होणार असून, तो ५ रात्री व ६ दिवसांचा असेल. या दौऱ्यासाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख २३ जानेवारी २०२६ आहे.
या अभ्यास दौऱ्यात ओरिसा राज्यातील बौद्ध, जैन व हिंदू परंपरेशी संबंधित महत्त्वाच्या पुरातत्वीय व ऐतिहासिक स्थळांना भेट दिली जाणार आहे. अभ्यास दौऱ्याच्या कार्यक्रमात पुढील स्थळांचा समावेश आहे —
ललितगिरी पुरातत्वीय स्थळ व वस्तुसंग्रहालय, उदयगिरी व रतनगिरी पुरातत्वीय स्थळे, खंडगिरी लेणी समूह, शांती स्तूप, कलिंग युद्ध अभिलेख, कोणार्कचे प्रसिद्ध सूर्य मंदिर, पुरी येथील जगन्नाथ मंदिर, कुरुमा, जिरंग व लांगुडी ही महत्त्वाची पुरातत्वीय स्थळे तसेच चिलिका सरोवर व परिसरातील प्रेक्षणीय स्थळे.
या अभ्यास दौऱ्याचा उद्देश इतिहास, शिल्पकला, स्थापत्य, धर्मपरंपरा व सांस्कृतिक वारसा यांचा प्रत्यक्ष अभ्यास करणे हा आहे. अभ्यास दौऱ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांनी व इतिहासप्रेमींनी ‘अभ्यास दौऱ्यावर येणार असाल तरच समूहात जोडून घ्यावे’, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
अभ्यास दौऱ्याबाबत अधिक माहिती व सहभागासाठी खालील व्हॉट्सअ‍ॅप समूहात सहभागी होता येईल —
समूह लिंक : https://chat.whatsapp.com/DujnLnSJ3okEbS74NHApNF
सुरज रतन जगताप
.      (लेणी अभ्यासक )

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर : पाणी, सत्ता आणि परिपक्व नेतृत्वाचा राष्ट्रीय ब्रँड

0
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर : पाणी, सत्ता आणि परिपक्व नेतृत्वाचा राष्ट्रीय ब्रँड

फलटण प्रतिनिधी :- श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे एक राजकीय क्षेत्रातील राष्ट्रीय ब्रॅण्ड आहेत .मनावर घेणे व मनात आणलं तर कोणत्याही क्षेत्रावर आपली हुकूमत प्रस्थापित करणे जर ठरवलं तर मग ठरलं हे त्यांचें एक मोठे वैशिष्ट्य आहे.
म्हणून अनेकांना कधी वर्ज्य वाटत नाहीत.
सर्वव्यापी व अद्ययावत असा अदृश्य हात …!
Love him or hate him, but you can ‘t ignore him…हे वाक्य अगदी श्रीमंत रामराजे यांना अगदी तंतोतंत लागू होते .
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना 1996 मध्ये महाराष्ट्र शासनाने, मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली केली. ज्याचा मुख्य उद्देश कृष्णा खोऱ्यातील जलसिंचन प्रकल्प जलद गतीने पूर्ण करणे, कृष्णा नदीच्या वाट्याच्या पाण्याचा वेळेत विनियोग करणे आणि परिसरातील पाणी व्यवस्थापन सुधारणा होत ज्यामुळे सिंचन क्षमता वाढेल व  दुष्काळी भागाचा विकास होईल.
1995 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजप युतीचे सरकार मा .मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले मात्र अपक्ष आमदारांचा पाठिंबा यामागे असल्यामुळे व सिंचनाच्या माध्यमातून राजकीय पाठबळ देणे किंवा मिळणे हा एक हेतू होता.
या सर्वामागे मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या दूरदृष्टी कोनातून पश्चिम महाराष्ट्रातून हळूवारपणे एक आदर्श व पाणी प्रश्न बाबतीत संवेदनशील असलेले अभ्यासू नेतृत्व पवार साहेबांनी वेळीच हेरले होते व ते होते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या रुपाने निर्माण केले.
कृष्णा पाणी तंटा लवादाचा निर्णय सन 1975-76 दरम्यान झाला होता त्या लवादाच्या निर्णयानुसार राज्याला मिळालेल्या पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक होते.
त्या दरम्यान शासनाने पाटबंधारे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी 5 विकास महामंडळाची स्थापना केली त्यापैकी हे एक होते.
सिंहावलोकन केल्यास जलसंपदा विभागाला (पूर्वीचा पाटबंधारे विभाग) १५० वर्षाचा इतिहास आहे.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १९६० साली झाली त्या दरम्यान पूर्वीच्या मुंबई राज्याचे विभाजन महाराष्ट्र व गुजरात मध्ये झाले, १९६० साली सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाटबंधारे विभाग व ईमारत/ रस्ते विभाग असं विभाजन झाले, नंतर काही दशकानंतर २००४ पासून पाटबंधारे विभागाचे जलसंपदा विभाग म्हणून नामकरण करण्यात आले सन १९९५ पासून महाराष्ट्र राज्य व प. महाराष्ट्र च्या ऐतिहासिक पाणी प्रश्न व्यवस्थापन सुधारणा चे साक्षीदार व मंत्री म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे वैविध्यपूर्ण असे आहे व ते आपल्या फलटण करांन करता वैभवशाली व गौरवशाली आहे.
मा .विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदी असताना महसूल राज्यमंत्रीपद देण्यात आले होते, २००४ मध्ये त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली, सातारा जिल्हा च्या पालकमंत्री पदांची काही वर्ष धुरा समर्थपणे सांभाळली, २०१३ मध्ये राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून सुध्दा वर्णी लागली होती
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अनेक योजनांचे व विकास पर्वाचे माझ्या सहित अनेक जण साक्षीदार आहे
मतदारसंघ राखीव झाल्याने रामराजे यांचे पुनवर्सन करणे आवश्यक होते म्हणून २०१० ला पवार साहेबांनी पहिल्यांदा विधानपरिषद वर संधी उपलब्ध करून दिली तशी त्यांना तीन वेळा संधी मिळाली व एका टर्म मध्ये विधानपरिषद चे सभापती म्हणून संधी दिली त्यांनी प. महाराष्ट्र बरोबर फलटण खंडाळा लोणंद माळशिरस तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी अलौकिक असे समाजहिताचे काम केले म्हणून त्यांना मानणारा वर्ग व मतदार या भागात प्रचंड प्रमाणात आहे.

महाराष्ट्र राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार महाराष्ट्रात एकूण ४०० नद्या आहेत. महाराष्ट्र राज्याला सिंचनाची जुनी परंपरा आहे . आपल्या कडे कालवा पध्दतीने सिंचन करण्याच्या मुद्यावर व उत्क्रांती मध्ये सर एम. विश्वेशवरैया यांचा सिंहाचा वाटा आहे .
लोकसहभागातून सिंचन पद्धतीचे व्यवस्थापन तंत्र सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याने अंगिकारले आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उच्च विद्याविभूषित , सुसंकृत राजकारणी म्हणून आजही त्यांच्याकडे पाहिले जाते.
रामराजे हे राजघराण्यातील असले तरी खरोखरच राजकीय राजयोग उपभोगला आहे.
१९९१ ला ऐतिहासिक फलटण नगरीचे नगराध्यक्ष .. १९९५ ते २०१३ पर्यंत ते लाल दिव्याच्या गाडीतच होते. काँग्रेस राष्ट्रवादी चे सरकार गेल्यानतर त्यांच्या साठी राष्ट्रवादी ने विधानपरिषद सभापती वर अविश्वास ठराव आणला होता आणि पुन्हा रामराजे लाल दिव्यातच राहिले .
रामराजे यांच्या कडे अनेक वर्षे कृष्णा खोरे विकास महामंडळ होते, कारण त्यांचा पाणीप्रश्नी खूपच प्रचंड प्रमाणात अभ्यास व अनुभव पदरी होता म्हणून त्यांची या विषयातील व्यासंगी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती व आहे म्हणून यांचे योगदान पाणीप्रश्नी खूप उल्लेखनीय आहे.
Maharashtra ‘s powerful leader Ram Raje Naik Nimbalkar…..!!!

माझं सुंदर फलटण…. स्वच्छ फलटण…मी फलटण कर…!

राजुरीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी भव्य मेळावा; शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यावर भर

0
राजुरीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी भव्य मेळावा; शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यावर भर

फलटण प्रतिनिधी :- राजुरी (ता. फलटण) येथील भैरवनाथ मंदिर परिसरात गावातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमीकरण मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात सामाजिक कार्यकर्त्या वैशाली कांबळे यांनी महिला सक्षमीकरण व सबलीकरण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी शासकीय योजनांचा योग्य वापर कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आणि अर्ज प्रक्रिया कशी असते, याची माहिती त्यांनी दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची ओळख करून देत पात्र लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यात आली.
शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निराधार महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले असून, पात्र महिलांना निश्चितपणे लाभ मिळवून देणार असल्याचे वैशाली कांबळे यांनी सांगितले. यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळाला.
फलटण बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष शांताराम कारंडे यांनी कामगार नोंदणीचे महत्त्व तसेच नोंदणीमुळे मिळणारे विविध लाभ याबाबत सविस्तर माहिती दिली. कामगारांनी वेळेत नोंदणी करून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्रप्रमुख संदीप कांबळे उपस्थित होते. तसेच राजुरीचे सरपंच मनोहर पवार, उपसरपंच अनिता साळुंखे, फलटण तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार, श्रीराम कारखान्याचे संचालक मारुती सांगळे, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराज पाटील, भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब सांगळे, माजी सरपंच जयकुमार इंगळे यांच्यासह भारत गावडे, विठ्ठल खुरुंगे, माऊली जाधव, मफतलाल पवार, सोमनाथ गावडे, पोपट हगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रमेश बागाव, पिंटू रणदिवे, अमोल बागाव, बापू बागाव यांनी विशेष परिश्रम घेतले. मेळाव्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून शासनाच्या योजनांविषयी जागरूकता निर्माण झाल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

डायबिटिस कंट्रोल करतील ‘हे’ 4 पदार्थ, आठवड्याभरात मिळेल रिझल्ट

0
डायबिटिस कंट्रोल करतील ‘हे’ 4 पदार्थ, आठवड्याभरात मिळेल रिझल्ट



आजकाल मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे, परंतु वेळेवर त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी, तुम्हाला केवळ औषधांवर अवलंबून राहण्याची गरज नाही; काही पदार्थ देखील प्रभावी आहेत.



Source link

फलटण तालुक्यात अपघाताचा बनाव करून इसमाचा खून; अवघ्या ४ तासांत दोन आरोपी अटकेत

0
फलटण तालुक्यात अपघाताचा बनाव करून इसमाचा खून; अवघ्या ४ तासांत दोन आरोपी अटकेत


फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील सस्तेवाडी हद्दीत अपघाताचा बनाव करून एका इसमाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश बाळु मदने (वय ४०, रा. सस्तेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची खबर उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथून प्राप्त झाल्यानंतर अकस्मात मयत रजिस्टर नंबर ०१/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्ताचे थारोळे आढळून आले. तसेच मयताची मोटारसायकल साईड स्टॅण्डवर सुस्थितीत उभी असून तिच्या स्विचमध्ये चावी असल्याचे निदर्शनास आले. या संशयास्पद बाबींमुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
मयताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, काही वेळापूर्वी शेतात ससे पकडण्यासाठी आलेल्या दोन अनोळखी इसमांबरोबर गणेश मदने यांचे भांडण झाल्याची माहिती मिळाली. मध्यरात्री निर्जनस्थळी घटना घडल्याने तांत्रिक तपासाला मर्यादा होत्या, तरीही गोपनीय बातमीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास अधिक वेगाने पुढे नेला.
अखेर अवघ्या चार तासांत रोहन कैलास पवार (वय २०, रा. सोमवार पेठ, फलटण) व गणेश शंकर जाधव (वय २२, सध्या रा. सोमवार पेठ, फलटण, मुळ रा. विद्यानगरी, मुंबई) या दोघांना आरोपी म्हणून निष्पन्न करण्यात आले. परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना शिताफीने अटक केली.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप जगताप करीत आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैशालीताई कांबळे यांना बरड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी द्यावी ;राजे गटातील कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्ठींकडे जोरदार मागणी**

0
सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैशालीताई कांबळे यांना बरड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी द्यावी ;राजे गटातील कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्ठींकडे जोरदार मागणी**


फलटण (ता. फलटण): निंबळक (ता. फलटण) येथे रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राजे गटाची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा बैठक पार पडली. या बैठकीत राजे गटाच्या वतीने निंबळक येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैशालीताई कांबळे यांना बरड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी, अशी आग्रही व एकमुखी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली.
सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सौ. वैशालीताई कांबळे यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत, त्या या गटासाठी योग्य व सक्षम उमेदवार ठरतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. स्थानिक जनतेशी असलेला त्यांचा थेट संपर्क व सामाजिक कामाचा अनुभव लक्षात घेता त्यांना संधी द्यावी, अशी भावना बैठकीतून व्यक्त झाली.
यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण यांचे उपस्थित ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मान्यवर म्हणून
मा. श्री. भोजराज नाईक निंबाळकर (गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटी),
मा. श्री. वामनराव यादव (माजी सदस्य, पंचायत समिती),
मा. श्री. दत्तात्रय शिंदे (संचालक, श्रीराम सहकारी साखर कारखाना, फलटण),
मा. श्री. दादासाहेब कापसे (माजी चेअरमन, निंबळक विविध कार्यकारी सोसायटी),
मा. श्री. धनंजय कदम (चेअरमन, निंबळक विविध कार्यकारी सोसायटी),
मा. श्री. मेघराज मोहनराव नाईक निंबाळकर (चेअरमन, श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, निंबळक),
श्री. शंभूराज नाईक निंबाळकर (संचालक, मालोजीराजे सहकारी बँक, फलटण),
श्री. निमराज, विश्वराज, कृष्णराज नाईक निंबाळकर,
श्री. देवानंद कापसे (जनरल मॅनेजर, संत ज्ञानेश्वर नागरी पतसंस्था),
मा. श्री. रवींद्र भोसले (माजी उपसरपंच, निंबळक),
मा. श्री. बाबासाहेब गंगावणे (माजी प्राचार्य, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण)
यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, राजे गट आगामी निवडणुकीत सक्षम व लोकप्रिय उमेदवार देण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले.

केस अगदी झपाट्याने गळू लागलेत? लगेच 4 पदार्थ खाणं सोडा, नाहीतर महागडी औषधंही कामी येणार नाहीत

0
केस अगदी झपाट्याने गळू लागलेत? लगेच 4 पदार्थ खाणं सोडा, नाहीतर महागडी औषधंही कामी येणार नाहीत


आजच्या धावपळीच्या जीवनशैली, प्रदूषण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. आपण अनेकदा महागडे शाम्पू, तेल आणि केसांच्या उपचारांवर हजारो रुपये खर्च करतो, परंतु आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला विसरतो.

Add Zee News as a Preferred Source

केस गळण्याचे खरे कारण तुमच्या आहारात असू शकते. खरं तर, आपण जे काही खातो त्याचा थेट आपल्या केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून, जर तुम्हाला केस गळण्याची चिंता असेल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातून काही पदार्थ ताबडतोब काढून टाकावेत. चला या पदार्थांबद्दल जाणून घेऊया (केस गळण्यास कारणीभूत अन्न) जे तुमच्या केसांसाठी धोकादायक ठरू शकतात.

साखर
साखर केवळ वजन वाढवत नाही तर केस गळण्याचे एक प्रमुख कारण देखील आहे. जेव्हा तुम्ही जास्त साखर खाता तेव्हा शरीरात इन्सुलिनची पातळी वाढते. वाढलेल्या इन्सुलिनची पातळी पुरुष आणि महिला दोघांमध्येही अँड्रोजन हार्मोन सक्रिय करते. हा हार्मोन केसांच्या कूपांना आकुंचन देतो, ज्यामुळे केस पातळ होतात आणि केस गळतात. शिवाय, साखरेमुळे टाळूमध्ये जळजळ होते, ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात.

उच्च ग्लायसेमिक पदार्थ
पिझ्झा, पास्ता, पांढरी ब्रेड आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स यांसारख्या रिफाइंड मैद्यापासून बनवलेले पदार्थ शरीरात साखरेची पातळी वेगाने वाढवतात. हे पदार्थ हार्मोनल असंतुलन निर्माण करतात. जे लोक त्यांच्या आहारात रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे जास्त प्रमाण वापरतात त्यांना अकाली केस गळणे आणि टक्कल पडण्याची शक्यता जास्त असते. त्यांच्या जागी संपूर्ण धान्ये घेणे हा एक चांगला पर्याय आहे.

डाएट सोडा आणि आर्टिफिशियल स्वीटनर्स
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात बरेच लोक नियमित साखरेऐवजी “डाएट सोडा” किंवा “साखरमुक्त” पर्याय निवडतात. यामध्ये कृत्रिम स्वीटनर्स असतात, जे केसांच्या कूपांना नुकसान पोहोचवू शकतात आणि टाळूच्या आरोग्याला धोका निर्माण करू शकतात. सोडा किंवा कोल्ड्रिंक्स जास्त प्रमाणात पिल्याने तुमचे केस त्यांची चमक गमावू शकतात आणि ते मुळांपासून कमकुवत होऊ शकतात.

अल्कोहोल आणि कॅफिन
अल्कोहोल शरीराला डिहायड्रेट करते. डिहायड्रेशनमुळे केस कोरडे, ठिसूळ आणि तुटू शकतात. अल्कोहोल शरीरातील झिंकची पातळी देखील कमी करते, जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक खनिज आहे. त्याचप्रमाणे, जास्त चहा किंवा कॉफी पिल्याने शरीरातील पोषक तत्वांचे शोषण होण्यास अडथळा येऊ शकतो.

त्याऐवजी काय खावे?

फक्त हे पदार्थ काढून टाकणे पुरेसे नाही; तुम्हाला तुमच्या आहारात काही निरोगी पदार्थांचा समावेश करावा लागेल:

प्रथिने – अंडी, मसूर आणि चीज.

लोह – पालक, मेथी आणि डाळिंब.

ओमेगा-३ – अक्रोड आणि अळशी. 





Source link

प्रभाग क्रमांक ११ मध्ये प्रचारात स्वर्गीय दत्ता काका साने यांच्या सामाजिक योगदानाचा वारसा घेऊन चालणाऱ्या मयुरी साने यांची आघाडी

0
प्रभाग क्रमांक ११ मध्ये प्रचारात स्वर्गीय दत्ता काका साने यांच्या सामाजिक योगदानाचा वारसा घेऊन चालणाऱ्या मयुरी साने यांची आघाडी

पिंपरी-चिंचवड : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील निवडणूक सध्या चर्चेत आहे. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून ऍड. मयुरी निलेश साने यांनी प्रचार मोहीम सुरू केली असून, जनतेकडून मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक ठरत आहे.

या प्रभागाशी संबंधित आणि सामाजिक कार्यासाठी परिचित असलेल्या स्वर्गीय दत्ता काका साने यांनी प्रभागात शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा यासह अनेक विकासकामे राबवली आहेत. त्यांच्या कामाचा वारसा मयुरी साने यांच्या प्रचारात दिसून येत असून, नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालेले दिसते.

मयुरी साने यांच्या प्रचार मोहिमेत झालेल्या भेटीगाठी, जनतेशी संवाद आणि योजनाबद्ध प्रचारातून त्यांना मिळणारा प्रतिसाद विशेष लक्षवेधी ठरत आहे. नागरिकांच्या अपेक्षा आणि प्रश्नांवर त्यांनी मांडलेली स्पष्ट भूमिका प्रचाराला अधिक उंची देत आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, प्रभाग क्रमांक ११ मधील निवडणूक अजून खुली असली, तरी मयुरी साने यांच्या उमेदवारीकडे नागरिकांकडून दिसणारा प्रतिसाद सध्या सकारात्मक आहे. स्वर्गीय दत्ता काका साने यांच्या कार्याचा आणि आपुलकीचा वारसा मयुरी साने पुढे कसा उचलतात, हे निकालाच्या दिवशी पाहणे महत्वाचे ठरेल.

लोकशाही प्रक्रियेत अंतिम निर्णय मतदारांच्या हक्कात असतो. १६ जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर प्रभाग क्रमांक ११ मधील चित्र स्पष्ट होईल, आणि मयुरी साने यांना नागरिकांकडून कितपत पाठबळ मिळते, हे दिसून येईल.

बरड पंचायत समिती गणासाठी विद्या वाघमोडे यांना राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून उमेदवारीची जोरदार मागणी

0
बरड पंचायत समिती गणासाठी विद्या वाघमोडे यांना राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून उमेदवारीची जोरदार मागणी


फलटण प्रतिनिधी :- आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरड पंचायत समिती गणात राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस पक्षाकडून सक्षम, जनतेशी नाळ जोडलेली आणि सामाजिक कार्यात सक्रीय असलेली महिला उमेदवार देण्याची चर्चा वेग घेत आहे. याच पार्श्वभूमीवर बागेवाडी (बरड) गावच्या विद्या अरविंद वाघमोडे यांना उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी नागरिकांतून पुढे येत आहे.
राष्ट्रवादी (अप) काँग्रेस पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या म्हणून विद्या वाघमोडे यांनी गेल्या अनेक वर्षांत सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरीव काम केले आहे. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारी, महिलांचे प्रश्न, मूलभूत नागरी सुविधा तसेच ग्रामविकासाशी संबंधित विषयांवर सातत्याने आवाज उठवणारी कार्यकर्ती म्हणून त्यांची ओळख आहे.
बरड, बागेवाडी, रांजणी (पुनर्व.), मुंजवडी, राजुरी, भवानीनगर, विवर (पुनर्व.), शेरेशिंदेवाडी, निंबळक आणि वाजेगाव (पुनर्व.) या गावांमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असून नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बरड पंचायत समिती गणातून विद्या वाघमोडे यांना उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा आता जनतेकडून व्यक्त होत आहे.

साताऱ्यात शेडवर नव्हे तर प्रकाश शिंदेंच्या रिसॉर्टवर रेड पडली; शंभूराज देसाईंना ‘ढ’ म्हणत सुषमा

0


Sushma Andhare on Satara Drug Case: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या साताऱ्यातील दरे गावापासून जवळच असलेल्या सावरी येथे मुंबई पोलीसांनी तब्बल 115 कोटींचा 45 किलो ड्रग्सचा साठा जप्त केला होता. पोलिसांनी ज्या हॉटेलवर धाड टाकली होती ते एकनाथ शिंदेंचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे (Prakash Shinde) यांच्या मालकीचे असून ते दरे गावचे सरपंच रणजीत शिंदे सांभाळतात, अशी माहिती समोर आली होती. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दबावामुळे या प्रकरणात कारवाई होत नसल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्याने केला जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाच्या उप नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट केलाय. 

सुषमा अंधारे पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, एक महिना होतं आला तरी सावरी जिल्हा सातारा येथे ड्रग्जच्या अनुषंगाने धाड पडली होती. मुलुंड वर्धा येथे धाड पडली आणि त्यानंतर मुलुंडच्या पोलिसांनी पुण्यातून विशाल मोरे याला अटक झाली होती. सावरी येथे जी रेड पडली, त्यामध्ये प्रकाश शिंदे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ आहे. ते म्हणाले आम्ही ती प्रॉपर्टी विकली आहे. ते खोटे बोलत आहेत. ज्यावेळी शाहरुख खानच्या मुलाला अटक झाली होती, त्यावेळी 13 ग्राम कोकेन होतं, 21 ग्राम चरस, 5 ग्राम एमडी ड्रग्ज मिळाल होतं. त्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणात पोलिसांनी धाड टारली आणि ड्रग्ज कसं-कसं सापडलं हे समोर आलं. त्या पत्रकार परिषदेत एक बाई देखील चमकोगिरी करायला पोहोचल्या होत्या. ज्या सावरीमध्ये 115 कोटी रुपये ड्रग्ज सापडलं, त्याठिकाणी ना सीसीटीव्ही समोर आले, ना पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. रेड टाकणारे पीआय आत्मजित सावंत आहेत कुठे? त्यांच्या जिवाला काही धोका आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

Sushma Andhare on Satara Drug Case: शंभूराज देसाई पालकमंत्री म्हणून ‘ढ’ 

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, प्रकाश शिंदे नेमके कोण आहेत? त्यांचा सबंध नाही असं म्हणत आहेत. तिथे बॅकवॉटरमध्ये कुणी बांधकाम केलं आहे. 1200 मीटर रस्ते त्याठिकाणी बांधण्यात आले, ते कोणी बांधले याबाबत पालकमंत्री शंभूराजे देसाई माहिती का देत नाही? प्रकाश शिंदे यांनी सर्वे नंबर 17 मधील कागदपत्रे दाखवले आणि ती आपली नाही म्हणाले. परंतु सदर प्रॉपर्टी ही सर्वे नंबर 13 मधील आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री म्हणून ‘ढ’ आहेत, असा हल्लाबोल त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावर केला. 

Sushma Andhare on Satara Drug Case: स्पॉटवर असणारा ओंकार डिगे गायब कुठे झाला?

115 कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं आहे. त्याठिकाणी स्पॉटवर असणारा ओंकार डिगे गायब कुठे झाला? त्या गावचा सरपंच जो युवा सेनेचा पदाधिकारी आहे तो कुठे आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केले. तर  सगळ्यात मोठा गौप्यस्फोट म्हणजे ही रेड शेडवर नाही तर प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टवर पडली आहे. देवेंद्र फडणवीस या प्रकरणी उत्तरे देणार आहेत की नाही? शेडवर रेड पडली नाही ते लोक रिसोर्टममध्ये राहत होते आणि तिथेच रेड पडली आहे, असा गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी केलाय. 

Sushma Andhare on Satara Drug Case: ड्रग्जच्या धंद्याला शंभूराज देसाई यांचा पाठिंबा आहे का?

ओमकार डिगेला अटक कधी होणार आहे? ते अनधिकृत बांधकाम अजून पाडलं का नाही? पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी काय कारवाई केली आहे? ड्रग्जच्या धंद्याला शंभूराज देसाई यांचा पाठिंबा आहे का? राज्याच्या निवडणुकीत वारेमाप पैसा वाटला जात आहे तो कुठून आला आहे? सातारा पोलीस यांचा कारभार प्रचंड संशयास्पद आहे. प्रकाश शिंदे या प्रकरणात नाही, असं सातारा पोलीस म्हणत असतील तर आतापर्यंत त्यांनी कुणा-कुणावर कारवाई केली. पोलीस अद्याप माध्यमांच्या समोर आलेले नाहीत. किरीट सोमय्या यांचा हातोडा आता त्या सावरी येथील अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई करणार आहात का? असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Sanjay Raut on CR Patil: गुजरातचा नेता छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार असल्याचं म्हणाला, संजय राऊतांनी भाजपला धू-धू धुतलं, म्हणाले, तुमच्या गुजरातमध्ये सगळे बकासूर नेतेच जन्माला आले का?

आणखी वाचा



Source link