Tuesday, June 30, 2026
Home Blog Page 73

पंचशील ध्वज : धम्म, इतिहास आणि मानवमूल्यांचा संगम

0
पंचशील ध्वज : धम्म, इतिहास आणि मानवमूल्यांचा संगम

साहस Times :-  आज 8 जानेवारी जागतिक बौध्द धम्म पंचशील ध्वज दिन त्यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा!पंचशील ध्वज हा केवळ रंगांचा संगम नाही; तो भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्ममार्गाचा, शीलप्रधान जीवनाचा आणि मानवमूल्यांच्या सार्वत्रिकतेचा जिवंत प्रतीक आहे. जिथे हा ध्वज फडकतो, तिथे अहिंसा, करुणा, मैत्री, प्रज्ञा आणि समतेचा संदेश शब्दांवाचून पोहोचतो. पंचशील ध्वज म्हणजे अंधश्रद्धेचा नव्हे, तर विवेक, समजूत आणि आचरणशील नैतिकतेचा ध्वज आहे.
भगवान बुद्धांनी मानवाला बाह्य कर्मकांडांपासून मुक्त करून अंतःकरणाच्या शुद्धतेकडे नेले. त्या शुद्धतेचा पाया म्हणजे शील. पंचशील ही शीलाची मूलभूत रचना आहे. प्राणीहिंसा टाळणे, चोरी न करणे, असंयम टाळणे, असत्य भाषण टाळणे आणि नशेपासून दूर राहणे ही पाच तत्त्वे म्हणजे धम्माच्या जीवनमार्गाचे पाच स्तंभ आहेत. पंचशील ध्वज या तत्त्वांची सतत आठवण करून देत आपल्या आचरणाला दिशा देतो.

पंचशील ध्वजाची निर्मिती :
पंचशील ध्वजाची निर्मिती ही बौद्ध धम्माच्या आधुनिक इतिहासातील एक महत्त्वाची घटना मानली जाते. इ.स. १८८५ मध्ये श्रीलंकेतील (तत्कालीन सिलोन) कोलंबो येथे स्थापन झालेल्या एका विशेष समितीमार्फत या ध्वजाची रचना करण्यात आली. ब्रिटिश वसाहतवादी काळात बौद्ध धर्माची ओळख, प्रतीके आणि परंपरा दुर्लक्षित होत असताना, बौद्ध समाजाला एकत्र आणणाऱ्या आणि धम्माची वैश्विक ओळख दर्शवणाऱ्या प्रतीकाची गरज निर्माण झाली होती. या गरजेतून पंचशील ध्वजाचा जन्म झाला.
या समितीत पूज्य हिक्काडुवे सुमंगल थेरो (अध्यक्ष), पूज्य मिगेट्टुवत्ते गुणानंद थेरो, तसेच पाश्चात्त्य बौद्ध विचारवंत कर्नल हेन्री स्टील ऑल्कॉट, डोनाल्ड डॉन कॅरोलिस हेवाविथारणा (डॉन कॅरोलिस हेवाविथारणा), अँड्रिस बायर धर्मगुणवर्धना, चार्ल्स ए. डीसिल्वा, पीटर डी. अबेऊ, विल्यम डी. अबेऊ, विल्यम एल. फर्नांडो, एन. एस. फर्नांडो आणि कार्लिस पुजिथा गुणवर्धना (सचिव) यांचा समावेश होता. या सर्वांनी मिळून बुद्धांना ज्ञानप्राप्तीनंतर प्रकट झालेल्या सहा रंगांच्या प्रभामंडलाच्या संकल्पनेवर आधारित ध्वजाची रचना केली.
हा बौद्ध ध्वज २८ मे १८८५ रोजी वैशाख पौर्णिमेच्या (बुद्ध जयंती) दिवशी, ब्रिटिश साम्राज्याखालील श्रीलंकेत प्रथमच सार्वजनिकरित्या फडकवण्यात आला. पुढे कर्नल हेन्री स्टील ऑल्कॉट यांनी या ध्वजाच्या रचनेत काही प्रमाणात सुधारणा सुचविल्या, ज्यामुळे तो अधिक सुसंगत आणि सार्वत्रिक स्वरूपाचा बनला.
इ.स. १८८९ मध्ये हा सुधारित ध्वज जपानचे बौद्ध भिक्षू अंगारिका धम्मपाल (अनागारिक धम्मपाल) आणि कर्नल ऑल्कॉट यांच्या माध्यमातून म्यानमार (तत्कालीन बर्मा) येथील बौद्ध संघाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर हा ध्वज श्रीलंका, म्यानमार, थायलंड, जपान, चीन आदी देशांमध्ये बौद्ध धम्माचे प्रतीक म्हणून स्वीकारला जाऊ लागला.
अखेरीस इ.स. १९५० मध्ये भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत पंचशील ध्वजाला अधिकृतपणे “आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वज” म्हणून मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे पंचशील ध्वजाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि तो संपूर्ण बौद्ध जगताच्या ऐक्याचे प्रतीक ठरला.
आज पंचशील ध्वज हा केवळ ऐतिहासिक वस्तू नसून, तो शील, करुणा, प्रज्ञा आणि समतेच्या धम्ममूल्यांचा वाहक आहे. त्याचा इतिहास हा बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाचा, संघटनाचा आणि जागतिक स्वीकाराचा इतिहास आहे.

ध्वजातील रंग : धम्मगुणांचे प्रतीक
या ध्वजातील प्रत्येक रंग केवळ सौंदर्य नसून धम्माचा एक गुण प्रकट करतो. निळा रंग करुणा व मैत्रीची जाणीव करून देतो; पिवळा रंग प्रज्ञा आणि मध्यम मार्गाचे स्मरण करून देतो; लाल रंग परिश्रम, वीर्य आणि साधनेचे प्रतीक आहे; पांढरा रंग चित्तशुद्धी व मुक्तीची दिशा दाखवतो; केशरी रंग त्याग, संयम आणि विरक्तीचे दर्शन घडवतो. या सर्व रंगांचे मिश्रण म्हणजे सर्व मानवजातीसाठी असलेला धम्म भेदरहित, द्वेषरहित आणि करुणामय.

पंचशील ध्वज आणि भारतीय बौद्ध चळवळ
भारतामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्मदीक्षेनंतर पंचशील ध्वजाला विशेष सामाजिक व वैचारिक महत्त्व प्राप्त झाले. हा ध्वज केवळ धार्मिक ओळख न राहता आत्मसन्मान, समता आणि विवेकवादी क्रांतीचे प्रतीक बनला. तो सांगतो की मनुष्याची किंमत जन्मावर नव्हे, तर आचरणावर ठरते.
पंचशील ध्वजासमोर उभे राहणे म्हणजे केवळ नतमस्तक होणे नाही; तर आपल्या विचारांची, शब्दांची आणि कृतींची जबाबदारी स्वीकारणे होय. कारण धम्म हा पूजा-पाठापुरता मर्यादित नाही, तर तो जगण्याचा शास्त्र आहे. म्हणून पंचशील ध्वजाला आदर देणे म्हणजे कापडाला वंदन करणे नव्हे; तर शील, समाधी आणि प्रज्ञेला वंदन करणे आहे. ज्या दिवशी हा ध्वज आपल्या चौकातच नव्हे, तर आपल्या मनात फडकू लागेल, त्या दिवशी बुद्धांचा धम्म खऱ्या अर्थाने समाजात अवतरलेला असेल.

आयु. सोमीनाथ पोपट घोरपडे, संस्कार सचिव
भारतीय बौध्द महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व)
मोबाईल नं : 9284658690

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणजे पाणीप्रश्न व विविध विकास प्रकल्पाच्या वाटचालीचा दस्तऐवज…!!!

0
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणजे पाणीप्रश्न व विविध विकास प्रकल्पाच्या वाटचालीचा दस्तऐवज…!!!


फलटण प्रतिनिधी :-  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाटचाली पाहताना असा एकेक धागा वेगवेगळ्या जिल्ह्यांशी, तालुक्यातील पाणीप्रश्नी , पुनर्वसन व सर्व पक्षीय कार्यकर्ते , सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून केलेले कर्तृत्व व मदतकार्यातून अनेक वाडी वस्ती, गावा गावात डोंगरदर्या वरील दहा घरांची वस्ती जरी असली तरी तिथं आपले पणाचे कौटुंबिक नाती न तुटणारे जिव्हाळेचे हितसंबंध संबंध निर्माण करुन मिळालेल्या राजकीय संधीचे सोने केली आहे व पश्चिम महाराष्ट्राच्या पाणी संघर्षाचे मुख्य होकायंत्र व प. महाराष्ट्र राजकीय विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून तर आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेच मात्र अनेक राज्यांतील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, जनतेच्या दरबारात व महाराष्ट्र राज्यातील जनता जनार्दन त्यांच्या कडे एक भगिरथ व जलनायक म्हणून आजही पाहतोय.
यांची राजकीय कारकीर्द आत्ता चार दशकांचा माईलस्टोन पार करून पाच दशकांचा ऐतिहासिक प्रवास चांदया पासून ते बाद्या पर्यंत राजकारण व समाजकारण चा सफर राफेल विमानाच्या गतीने पुढे सरसावत आहे…!
महाराज साहेबांच्या जडणघडणी मध्ये अनेक सर्वपक्षीय मान्यवर नेते मंडळी सह अनेकांचे कौटुंबिक संबंध आहेत विशेषतः आजही पवार कुटुंबातील सर्वाशी आपुलकीचे संबंध आहेत हे नाकारता येणार नाही.
आजउद्या जरी महाराज साहेबांनी कोणाला शब्द टाकला तरी दस्तऐवजाला अधिकृत संकेतस्थळावरून लोकमान्यता मिळाल्याशिवाय राहणार नाही , मात्र काही दृष्टीहिन मंडळी व्यक्तीदेवषाने वैफल्यग्रस्त आहेत, काही गोरे असले तरी त्यांचे धंदे काळे आहेत त्याला काय करायचे त्याला कोणतेच रामबाण औषध लागू होत नाही, हेच तर खरं महाराजांच्या लोकभावनेचे लोकभवनाचे लाॅजिक आहे म्हणून आजमितीस सुध्दा त्यांची मॅजिकची पारदर्शकता निदर्शनास येत आहे.
मध्यंतरीच्या काळात राष्ट्रीय राजकारणातील समृद्धीचा मार्गाला हिरवा कंदील मिळाला होता मात्र अनेक शिवरात व वाडी वस्ती वर पाणी खळखळल्या शिवाय महाराष्ट्र सोडायचा नाही हा दृष्टिकोन व दृढनिश्चय केल्याने थांबले असावेत.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर ( अहिल्यानगर) या सहा जिल्ह्यात पाणी प्रश्नावरील अनेक प्रकल्पांना गती मिळाली ती महाराज साहेबांच्या माध्यमातुन म्हणून तर त्या भागात त्यांना मानणारा चाहतावर्ग प्रचंड प्रमाणात आहे.
मा. शरद पवार यांच्या राजकारणाचे किस्से महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात. राजकीय विषयांवरील कोणतीही चर्चा पवारांशी संबंधित किस्साशिवाय रंगत नाही.निवडणुकी च्या काळात पवार एकाला कामाला लागायला सांगतात आणि दुसर्यांला उमेदवारी देतात,एकाचा प्रचार करतात आणि दुसर्यांला निवडून आणण्याचा प्रयत्न करतात अशा काही वास्तवातल्या काही काल्पनिक गोष्टी सतत चर्चेत असतात. राजकारण हा मराठी माणसाचा आवडता विषय. पारा वरच्या, कट्टा या वरच्या गप्पांमध्ये शह- काटशहा च्या राजकारणावर विशेष भर असतो. काही नाट्यमय, धक्कातंत्राचा अवलंब असलेल्या, कल्पना पलिकडचे विश्व तिथं अवतरत असते, त्यामुळे स्वाभाविकच मा.शरद पवार साहेब यांच्याशी संबंधित अनेक खरया खोट्या गोष्टी प्राधान्याने असतात तसेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बाबतीत काही मंडळी बेताल वक्तव्य करीत असतात.
विरोधक आरोप प्रत्यारोपातून चर्चेत रंग भरण्यासाठी वास्तवला कल्पिताचा आधार देऊन काही गोष्टी सांगितल्या जातात, कुठल्याही गप्पांच्या फडाची ती स्वाभाविक गरजही असते परंतु आपल्या कडच्या सवंग लोकरुढी मध्ये मूलभूत गोष्टी कधीच चर्चेत येत नाहीत. रामराजे यांनी केलेली विविध विकास कामे, पाणी प्रश्नावरील योगदान, राज्यातील अनेक विरोधकांना केलेल्या मदतीचे किस्से, दस्तुरखुद्द मा.पवार साहेबांचा लक्षवेधक व अभ्यासू चेहरा कौन हे मुंबई -पुणयातील पत्रकारांच्या बैठकीतून हमखास चर्चिले जातात व सांगितले जातात … यांचा माझ्या सहित अनेक जण साक्षीदार आहेत.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणजे अप्रकाशित व अशक्य होणारं पर्वाला शक्यतो मध्ये उतरायला लावून प्रकाशित होणारे दस्तावेज आहे …!!!
जनतेमध्ये क्रेझ असणारे एक उत्तम होकायंत्र….!!!

आपलं सुंदर फलटण…. स्वच्छ फलटण…मी फलटण कर..!
श्री .नंदकुमार मोरे…

तुमच्याही शरीरात ‘हे’ बदल दिसतायत? असू शकतात कर्करोगाचे संकेत, आत्ताच सावध व्हा!

0
तुमच्याही शरीरात ‘हे’ बदल दिसतायत? असू शकतात कर्करोगाचे संकेत, आत्ताच सावध व्हा!


Know Which Are The Early Signs Of Cancer: कर्करोग हा एक असा आजार आहे, ज्याचे नाव ऐकताच सर्वांच्या कपाळावर आठ्या पडतात. एका संशोधनानुसार, कर्करोगामुळे जगभरात दररोज सुमारे 26,000 पेक्षा जास्त लोक मृत्यू मुखी पडतात. कर्करोग झाल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यभर मृत्यूशी झुंज द्यावी लागते. कर्करोगाची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. त्यामुळे बऱ्याचवेळा उपचारासाठी उशीर होतो आणि आरोग्याची गंभीर परिस्थिती निर्माण होते. पण तुम्हाला माहीत आहे का? शरीरात होणारे काही सामान्य बदल कर्करोगाचे संकेत देत असतात. पण याबाबत योग्य माहीती नसल्याने दुर्लक्ष केले जाते. तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत असे घडू नये यासाठी योग्य माहिती असणे आवश्यक आहे. सदर लेखात याबाबत सविस्तर जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

 

वजनात अचानक घट होणे

बऱ्याचवेळा व्यायाम आणि डाएटिंग न करताही अचानक वजनात घट होते. कामाची व्यस्थता, धावपळ, खाण्याच्या वेळांची अनियमितता यामुळे वजनात अचानक घट होत आहे. असे मानून याकडे दुर्लक्ष केले जाते. पण शरीरात होणारा हा बदल कर्करोगाच्या सुरूवातीचा मोठा बदल आहे. जर 1 किंवा 3 महिन्यात तुमचे वजन 4 ते 5 किलो पर्यंत अचानक कमी झाले तर, त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. हे फु्फ्फुसांच्या कर्करोगाचे सुरूवातीचे लक्षण असू शकते. 

 

सतत जास्त प्रमाणात थकवा येणे

दिवसभर काम आणि धावपळ केल्याने थकवा येणे हे सामान्य मानले जाऊ शकते. पण योग्य प्रमाणात झोप आणि आवश्यक आहार घेऊनही तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर, सावध व्हा. कारण, कर्करोगाच्या सुरुवातीला सतत थकवा येणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे अशी सामान्य पण गंभीर समस्या उद्भवतात. हे पोटाच्या किंवा रक्ताच्या कर्करोगाचे सुरूवातीचे लक्षण असू शकते. 

 

सतत अंगदुखी असणे

तुम्हाला रोज अंगदुखी जाणवत असेल, तसेच डोके दुखी जाणवत असेल तर हे देखील कर्करोगाच्या सुरूवातीची लक्षणे असू शकतात. विशेषतः तुम्हाला सतत डोके दुखी जाणवत असेल तर, याकडे दुर्लक्ष करू नका. कारण सततच्या सामान्य डोके दुखीचे रूपांतर मायग्रेनमध्ये होऊन ते ब्रेन ट्यूमरचे मोठे कारण बनू शकते. तसेच रोजची पाठदुखी पुढे गंभीर स्वरूप घेऊन कोलोन किंवा प्रोस्टेट कर्करोगाला आमंत्रण देऊ शकते. 

 

सतत ताप येणे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते ताप तेव्हा येतो जेव्हा आपले शरीर एखाद्या अंतर्गत इन्फेक्शनशी लढत असते. जसे की, सर्दी-खोकला झाल्यावर ताप येणे सामान्य मानले जाते. पण तुम्हाला सतत ताप येत असेल तर, हे रक्ताच्या कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. 

 

त्वचेवर होणारे परिणाम 

त्वचेचा रंग गडद किंवा पिवळसर होणे, डोळ्यांचा रंगही पिवळसर दिसणे, त्वचेला खाज सुटणे किंवा लाल चट्टे येणे. ही लक्षणे देखील सामान्य असली तरीही त्वचेच्या कर्करोगाची सुरूवात असू शकते. 

 

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीला वरील लक्षणे जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. तसेच ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि कर्करोगापासून त्यांचा बचाव व्हावा यासाठी ही बातमी नक्कीच शेअर करा. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

सह्याद्री कदम अजित पवार गटात दाखल; शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह ; शक्तीप्रदर्शन‘खासदार गटा’चे पारडे जड, शरद पवार गटाला मोठा धक्का

0
सह्याद्री कदम अजित पवार गटात दाखल; शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह ; शक्तीप्रदर्शन‘खासदार गटा’चे पारडे जड, शरद पवार गटाला मोठा धक्का


फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि युवा नेते सह्याद्री कदम यांनी अखेर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ गटाला रामराम ठोकला असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
फलटण तालुक्याचे माजी आमदार आणि दिग्गज नेते स्वर्गीय चिमणराव कदम यांचे सुपुत्र असलेल्या सह्याद्री कदम यांच्या या निर्णयामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सातारा येथे पार पडलेल्या भव्य प्रवेश सोहळ्याने जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले.
हा प्रवेश सोहळा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, जिल्हा बँकेचे संचालक व फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह महायुतीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलटण ते सातारा : शक्तीप्रदर्शनाचा धुरळा
या प्रवेशासाठी सह्याद्री कदम यांनी फलटण तालुक्यातून शेकडो समर्थकांची जमवाजमव केली होती. शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह साताऱ्याकडे कूच करत समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. फलटण ते सातारा मार्गावर आणि सातारा शहरात या शक्तीप्रदर्शनाने परिसर दणाणून गेला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय समीकरण
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर असताना सह्याद्री कदम यांचा हा प्रवेश शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुती, म्हणजेच ‘खासदार गटा’चे पारडे अधिक जड झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. या नव्या राजकीय समीकरणाचा आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फायदा होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

मुधोजी महाविद्यालयाचा एनएसएस कॅम्प ठरला ऐतिहासिक; भिलकटी येथे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचा दिमाखदार समारोप

0
मुधोजी महाविद्यालयाचा एनएसएस कॅम्प ठरला ऐतिहासिक; भिलकटी येथे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचा दिमाखदार समारोप

फलटण प्रतिनिधी :- मुधोजी महाविद्यालयाचा एनएसएस कॅम्प ठरला ऐतिहासिक; मिलकटी येथे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचा दिमाखदार समारोप
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मौजे भिलकटी येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचा प्रारंभ दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी झाला होता. या शिबिराचा समारोप समारंभ दि. ४ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला.
समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मुधोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या इतिहासातील हा आत्तापर्यंतचा सर्वांत यशस्वी कॅम्प असल्याचे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री. ना. निंबाळकर शंभुराजे यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. फिरोज शेख यांनी करून समारोप कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. मनोगतात प्रा. काळेल सर यांनी सात दिवसांत स्वयंसेवक, प्राध्यापक व शिबिराधिकारी यांनी केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेत आभार व्यक्त केले. शिबिरातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करताना, या शिबिरामुळे त्यांच्या आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलांविषयी भावना व्यक्त केल्या.
प्रमुख पाहुण्यांच्या भाषणात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरे अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी उत्साहाने व शिस्तबद्ध पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात मा. प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी विद्यार्थ्यांच्या व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच शिबिराच्या यशाचे खरे मोजमाप असल्याचे सांगत या यशस्वी कॅम्पबद्दल समाधान व्यक्त केले.
या सात दिवसीय शिबिरात कडाक्याच्या थंडीतही विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये योगा, प्राणायाम, कार्डिओ डान्स, झुम्बा डान्स, मॉर्निंग वर्कआउट, सत्संग, प्रभात फेरी, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, हळदी-कुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, मोफत दंतचिकित्सा व नेत्रतपासणी शिबिर, तसेच विविध महत्त्वपूर्ण विषयांवरील व्याख्याने यांचा समावेश होता.
समारोपाच्या दिवशी मिलकटी गावातील ग्रामस्थांनी प्रभात फेरीचे स्वागत सडा-रांगोळीने केले तसेच शिबिरार्थींना पुरणपोळीचे स्नेहभोजन दिले.
या कार्यक्रमास फलटण तालुका पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर, नवनिर्वाचित नगरसेवक श्री. पांडुरंग गुंजवटे, मिलकटी गावचे सरपंच मा. श्री. प्रकाश गोडसे, उपसरपंच मा. श्री. निलेश गोरे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका, तंटामुक्ती समिती अध्यक्षा, तलाठी, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका, पोलीस पाटील श्री. शांताराम विद्युल काळेल, कृषी अधिकारी गजानन ननावरे, डॉ. शरद कांबळे, उद्योजक प्रीतम नाळे, डॉ. प्रियंका कारंडे, निवृत्त अधिकारी श्रीकांत डिसले, तसेच गावातील आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मुधोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे दुसरे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत शेट्ये, डॉ. वैशाली कांबळे, प्राध्यापक वृंद, सीडीसी सदस्य, प्रशासकीय कर्मचारी, सेवक श्री. संजय सोनार व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. या यशस्वी शिबिराने महाविद्यालय व मिलकटी गाव यांच्यातील सामाजिक नाते अधिक दृढ झाले.

रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा… 27 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण; ‘तुलसी अक्सिडेंट अँड जनरल हॉस्पिटल’चा 28 व्या वर्षात प्रवेश

0
रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा… 27 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण; ‘तुलसी अक्सिडेंट अँड जनरल हॉस्पिटल’चा 28 व्या वर्षात प्रवेश


फलटण प्रतिनिधी. :-  फलटण शहरातील आरोग्यसेवेचा एक विश्वासार्ह आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “तुलसी अक्सिडेंट अँड जनरल हॉस्पिटल” ने दि. 7 जानेवारी 2026 रोजी आपल्या यशस्वी सत्ताविसाव्या वर्धापनदिनाचा सोहळा साजरा करत 28 व्या वर्षात पदार्पण केले. रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा या उदात्त तत्वावर गेली 27 वर्षे अखंडपणे कार्यरत असलेल्या या रुग्णालयाने हजारो रुग्णांचे प्राण वाचवत सामाजिक आरोग्यसेवेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
आई-वडिलांचे आशीर्वाद तसेच आदरणीय लोकनेते कै. श्री. हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन, आदरणीय मा. खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा), सौ. ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर (वहिनी साहेब), सन्माननीय नवनिर्वाचित नगराध्यक्ष फलटण नगरपालिका श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे सहकार्य तसेच आदरणीय मा. आमदार श्री. सचिन दादा पाटील यांच्या सततच्या पाठबळामुळे तुलसी हॉस्पिटलची सेवा अधिक व्यापक आणि सक्षम होत गेली.
 आरोग्यसेवेसोबत सामाजिक व प्रशासकीय योगदान
फक्त वैद्यकीय सेवा नव्हे तर सामाजिक, प्रशासकीय व संघटनात्मक क्षेत्रातही आगवणे कुटुंबाने उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 ठळक यश व सन्मान (Achievements)
▪️ 27 डिसेंबर 2016 – फलटण नगरपरिषद स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती
▪️ 12 ऑगस्ट 2017 – Global Economic and Research Association, Tirumalai (Tamilnadu) कडून “भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अवॉर्ड”
▪️ 25 नोव्हेंबर 2019 – Clean and Spotless Track Record in Professional Career साठी Star Award of Excellence 2019–2020, Apex Insurance Consultant Service, Delhi
▪️ 16 डिसेंबर 2019 – India International Friendship Society, New Delhi कडून राष्ट्रीय गौरव अवॉर्ड
▪️ 12 नोव्हेंबर 2020 – भाजप डॉक्टर सेल, फलटण तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती
▪️ 9 मार्च 2021 – केंद्र शासन पुरस्कृत दिशा (जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण) समिती सदस्यपद
▪️ 25 फेब्रुवारी 2025 – रुग्ण कल्याण समिती, उपजिल्हा रुग्णालय फलटण सदस्यपदी मा. आमदार श्री. सचिन पाटील यांच्या निर्देशानुसार नियुक्ती
 कृतज्ञतेची भावना
या यशस्वी वाटचालीत लाभलेल्या सर्व रुग्णांचा विश्वास, समाजाचे प्रेम, राजकीय व प्रशासकीय सहकार्य आणि तुलसी हॉस्पिटलच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे अथक परिश्रम यामुळेच हे शक्य झाले असल्याची भावना आगवणे कुटुंबीयांनी व्यक्त केली. भविष्यातही आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार व संवेदनशील आरोग्यसेवा देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
आपल्या सर्वांचे सहकार्य व आशीर्वाद असेच कायम राहावेत, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
✍️
डॉ. सौ. दिपा आगवणे
डॉ. प्रविण आगवणे
डॉ. प्रज्ञा आगवणे
डॉ. हर्षवर्धन आगवणे
समस्त तुलसी हॉस्पिटल स्टाफ

माजी आमदार हरिभाऊ निंबाळकर यांचा वारसा तरुण पत्रकारांनी जोपासला – माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

0
माजी आमदार हरिभाऊ निंबाळकर यांचा वारसा तरुण पत्रकारांनी जोपासला – माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

फलटण प्रतिनिधी : माजी आमदार स्व. हरिभाऊ निंबाळकर यांनी राजकीय, सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात दिलेला मूल्याधिष्ठित वारसा आजच्या तरुण पत्रकारांनी समर्थपणे जोपासला आहे, असे गौरवोद्गार माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काढले. तरुण पत्रकारांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या प्रसंगी ते बोलत होते.
पत्रकारांनी केवळ बातम्या मांडण्या .पुरतेच मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारे उपक्रम राबवावेत, असा संदेश या स्पर्धेतून मिळतो. क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळाच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शासकीय अधिकारी एकत्र येत असल्याने परस्पर सलोखा, संवाद आणि मैत्री वाढीस लागते, असेही त्यांनी नमूद केले.
या क्रिकेट स्पर्धेत स्थानिक पत्रकार संघटनांनी पुढाकार घेत उत्कृष्ट नियोजन केले असून, खेळाडूंसाठी उत्तम सुविधा, शिस्तबद्ध आयोजन आणि क्रीडा स्पर्धेचा खरा आनंद जपण्यात आला आहे. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकारांनी मैदानावर खेळाचा आनंद घेत आपले दैनंदिन तणाव विसरून सहभाग नोंदवला.
यावेळी मान्यवरांनी पत्रकारांच्या या उपक्रमाचे कौतुक करत स्पर्धेसाठी सदिच्छा भेट दिली. समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या अशा उपक्रमांतून पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी अधिक ठळकपणे समोर येते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. स्पर्धेमुळे तरुणांमध्ये खेळाची आवड वाढेल तसेच पत्रकार व प्रशासन यांच्यातील नाते अधिक दृढ होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या आयोजक पत्रकारांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे भविष्यातही अशा क्रीडामूल्य जपणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प करण्यात आला.

लेझीमच्या तालावर अकलूजचा विजयोत्सव! विजय चौकात २० व्या भव्य लेझीम स्पर्धा २०२६चे दिमाखदार उद्घाटन

0
लेझीमच्या तालावर अकलूजचा विजयोत्सव! विजय चौकात २० व्या भव्य लेझीम स्पर्धा २०२६चे दिमाखदार उद्घाटन


अकलूज  | लेझीमच्या गजरात आणि ढोल-ताशांच्या निनादात विजय चौक परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. सहकार महर्षी शंकरराव (काकासाहेब) नारायणराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त, संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘२० व्या भव्य लेझीम स्पर्धा २०२६’ चे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
या सोहळ्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री. संग्रामसिंह मोहिते-पाटील, नूतन नगरसेवक श्री. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील तसेच रेश्मा अडगले यांच्या हस्ते करण्यात आले.
अकलूजची लेझीम ही केवळ परंपरा नसून जागतिक ओळख ठरली आहे. आदरणीय श्री. जयसिंह (बाळदादा) मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूजच्या लेझीमने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवत इतिहास घडवला आहे. हा गौरवशाली वारसा पुढे नेणाऱ्या सर्व सहभागी शाळा, संघ व वादक कलाकारांचे यावेळी विशेष कौतुक करून स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान, अकलूज नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये आदरणीय श्री. विजयसिंह (मोठेदादा) मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पॅनलला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळाच्या वतीने सर्व नूतन नगरसेवक-नगरसेविका व नगराध्यक्षा रेश्मा अडगले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले अकलूजचे ग्रामस्थ सहभागी झाले होते. लेझीमच्या तालावर साजरा झालेला हा सोहळा अत्यंत चैतन्यमय आणि प्रेरणादायी ठरला.

हिवाळ्यात मोजे घालूनही पायांना थंडी वाजते? सावधान! असू शकतात हृदयविकाराच्या धोक्याचे संकेत

0
हिवाळ्यात मोजे घालूनही पायांना थंडी वाजते? सावधान! असू शकतात हृदयविकाराच्या धोक्याचे संकेत


Always Cold Feet Can Lead To Heart Disease: हिवाळ्यात थंडी जाणवणे हे साधारण आहे. पण काही जणांना जास्त प्रमाणात थंडी वाजते तर, काही जणांना तितकासा थंडावा जाणवत नाही. तसेच थंडाव्यापासून वाचण्यासाठी स्वेटर, हात मोजे, पाय मोज्यांचा वापर केला जातो. पण उबदार कपड्यांचा वापर करूनही थंडी वाजते. विशेषतः हातांना आणि पायांना जास्त थंडी वाजते. तुमच्या सोबतही असे होते का? जर, ‘हो’ तर ही बातमी नक्कीच वाचा कारण ही सामान्य लक्षणे नसून हृदय विकाराचे संकेत असू शकतात.

Add Zee News as a Preferred Source

 

शरीरातील वासोकोनस्ट्रिक्शन प्रक्रिया म्हणजे काय?

जेव्हा वातावरणातील तापमान घसरते आणि थंडी जाणवू लागते, शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. या प्रक्रियेला ‘वासोकोनस्ट्रिक्शन‘ असे म्हटले जाते. यावेळी शरीरातील रक्तप्रवाह मेंदूच्या नसा, फुफ्फुसे आणि मूत्रपिंड अशा महत्त्वाच्या अवयवांकडे खेचला जातो. ज्यामुळे हात आणि पायांपर्यंत पुरेशाप्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. ज्यामुळे हातांना आणि पायांना योग्यप्रमाणात ऊर्जा मिळत नाही. यामुळेच काहीवेळा हिवाळ्यात थंडीमुळे हात-पाय सुन्न पडतात, झिणझिण्या जाणवतात. काहीवेळा तर, हात-पाय निळे पडण्याची शक्यता असते. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी हृदयाला अधिक काम करावे लागते. ज्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.

 

जर तुम्हालाही या समस्येला सामोरे जावे लागत असेल आणि याकडे दर्लक्ष करत असाल तर, आत्ताच सावध व्हा. कारण जेव्हा तुमचे हृदय शरीरात रक्तप्रवाहीत करण्याचे काम योग्य रित्या करण्यास असमर्थ ठरते तेव्हा तुम्हाला अतिप्रमाणात थंडी जाणवते.

 

यामुळे आरोग्याबाबत पुढील गंभीर समस्या जाणवतात:

  • अनियंत्रित रक्तदाब
  • हृदयविकाराचा धोका
  • थायरॉइड
  • मधुमेह
  • एनीमिया
  • मानसिक ताण-तणाव

 

यापासून कसे वाचाल?

  • रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी रोज सकाळी किमान अर्धातास व्यायाम करा.
  • नेहमी उबदार कपडे घाला.
  • आहारात पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्नपदार्थांचा समावेश करा.
  • ताण-तणाव कमी करण्यासाठी ध्यान-धारणा करा.

 

तसेच उबदार वाावरणात असल्यानंतरही तुम्हाला अधिक प्रमाणात थंडी जाणवत असेल , त्वचेचा रंग पिवळा किंवा निळा होत असेल किंवा हातांना आणि पायांना झिणझिण्या येऊन सूज येत असेल तर, त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. उपचार सुरू करा.

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

पोलिसांकडून महिला भाजपा कार्यकर्त्याला बेदम मारहाण, ताब्यात घेत असताना कपडे फाटेपर्यंत मारलं

0
पोलिसांकडून महिला भाजपा कार्यकर्त्याला बेदम मारहाण, ताब्यात घेत असताना कपडे फाटेपर्यंत मारलं



BJP Worker Assaulted by Police: भाजपाच्या महिला कार्यकर्त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी भाजपाच्या महिला कार्यकर्त्याला ताब्यात घेत असताना तिला कपडे फाटेपर्यंच मारहाण केली. हे सर्व व्हिडीओत कैद झालं असून, सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 



Source link