Tuesday, June 30, 2026
Home Blog Page 72

फलटण तालुक्यात बनावट खतांचा धक्कादायक प्रकार उघड

0
फलटण तालुक्यात बनावट खतांचा धक्कादायक प्रकार उघड


फलटण | प्रतिनिधी.  फलटण तालुक्यातील टाकळवाडे (ता. फलटण, जि. सातारा) येथे शेतकऱ्यांच्या विश्वासाशी घात करणारा गंभीर प्रकार समोर आला आहे. टाकळवाडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. मार्फत शेतकऱ्यांना पुरवण्यात येणारी खते बनावट असल्याचे उघड झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पतपुरवठ्यासह खते, बी-बियाणे व कृषी औषधांची विक्री करणाऱ्या या संस्थेमध्ये बनावट खतांची विक्री होत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला मिळाली होती. त्यानंतर कृषी विभागाने तातडीने कारवाई करत संस्थेच्या गोडावूनमधून खतांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.
प्रयोगशाळेच्या अहवालात संबंधित खत मानकांनुसार नसून ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी दि. ०८ जानेवारी २०२६ रोजी श्रीमती सोनाली सुतार, कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण), फलटण तालुका कृषी विभाग यांनी दिलेल्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात नोंदवण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे व पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार करीत आहेत.
बनावट खतांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सुशिक्षित आणि सर्वसामान्य चेहऱ्याला वाढती पसंती.चेतन बेंद्रे ठरू शकतात सत्तेच्या सारीपाटावरले नवे वजीर.

0
सुशिक्षित आणि सर्वसामान्य चेहऱ्याला वाढती पसंती.चेतन बेंद्रे ठरू शकतात सत्तेच्या सारीपाटावरले नवे वजीर.

पिंपरी चिंचवड : राजकारणात पक्षाची धुरा ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या पाठीवर उभी असते. आणि त्यातही जर कार्यकर्ता सुशिक्षित आणि संयमी असला तर सत्तेची गणिते पक्षाला मांडायला आणखी सोपी जातात.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ ( ड ) मधून ही अश्याच एका सुशिक्षित चेहऱ्याची चर्चा सध्या जोरात आहे. ते नाव आहे, शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन गौतम बेंद्रे.

अनेक राजकीय घडामोडींनंतर चेतन बेंद्रे यांनी अखेर शिवसेना पक्षाची वाट धरली. आणि पक्षाने देखील तितकीच दखल घेत चेतन यांना प्रभाग क्रमांक १५ ( ड ) मधून अधिकृत उमेदवारी जाहीर केली.

कदाचित ही उमेदवारी जाहीर झाल्या नंतर लोकांमध्ये विविध चर्चा रंगतील असे काहीसे वाटत होते. पण तसे काही झाले नाही. जनतेने पक्षा पेक्षाही जास्त चेतन बेंद्रे यांना अधिक प्राधान्य देत शिवसेना पक्षाच्या माध्यमातून चेतन बेंद्रे यांना जोरदार पाठिंबा दिलेला दिसत आहे.

प्रभाग क्रमांक १५ मध्ये चेतन बेंद्रे यांनी आजपर्यंत केलेले दखलपात्र असे सामाजिक काम त्यांना या साऱ्या सत्ताकारणाच्या गणितात कायम उजवे ठेवत आहे.

आपल्यातून आपल्यासाठी उभा राहिलेला सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून चेतन बेंद्रे यांना वाढती पसंती मिळत आहे. आणि त्यातच त्यांच्याकडे असलेल्या सामाजिक कामाचा मोठा अनुभव त्यांना अजून फायद्याचा ठरत आहे.

चेतन बेंद्रे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १५ (ड ) ला एक सुशिक्षित नगरसेवक लाभणार या चर्चांनी जोर धरला आहे. पण शेवटी मतांची जुळवणी महत्वाची असते. ती मतांची जुळवणी चेतन बेंद्रे यांच्या पारड्यात किती आकड्यांच्या रुपात पडणार हे येत्या १६ जानेवारीला कळेलच.

एन. रघुरामन यांचा कॉलम: माणूस जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरतो तेव्हा तंत्रज्ञानच एकमेव उपाय असतो

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  माणूस जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरतो तेव्हा तंत्रज्ञानच एकमेव उपाय असतो


  • Marathi News
  • Opinion
  • N. Raghuram’s Column, When Humans Fail To Fulfill Their Responsibilities, Technology Is The Only Solution

17 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नवीन वर्षाचा पहिला दिवस आठवड्याच्या मध्यभागी आल्यामुळे बहुतेक ठिकाणी गर्दीपेक्षा हॉटेलिंगवर आधारित व्यवसाय अधिक पाहायला मिळाला. मात्र, तरीही पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार, शहरात नवीन वर्षाच्या निमित्ताने मद्यपान करून गाडी चालवल्याची (ड्रंक अँड ड्राइव्ह) ४४८ प्रकरणे नोंदवली गेली. गेल्या वर्षी ही संख्या ३१० होती, म्हणजेच यात ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. साहजिकच, जेव्हा पोलिस तपासणी नाके वाढवतात, तेव्हा अशी प्रकरणे जास्त समोर येतात. इतरही अनेक शहरांमध्ये अशीच वाढ झाली असेल. मात्र, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यामुळे झालेले अपघात आणि मृत्यू यांचा राष्ट्रीय स्तरावरील अधिकृत डेटा इतक्या लवकर मिळणे कठीण आहे.

पुणे हे केवळ एक उदाहरण आहे. केवळ भारतच नाही, तर कदाचित संपूर्ण जग या समस्येशी झुंजत आहे. लोकांच्या बेजबाबदारपणामुळे वाढणाऱ्या चिंतेने, या क्षेत्रातील अनेक वर्षांच्या उदासीनतेनंतर तंत्रज्ञान उद्योगाला पुन्हा एकदा उपाय शोधण्यास प्रवृत्त केले आहे. मद्यधुंद चालकांमुळे होणारे अपघात आणि मृत्यू कमी करण्यासाठी या वर्षी आपण ‘ब्रेथ-बेस्ड’ (श्वासावर आधारित) आणि ‘टच-बेस्ड’ (स्पर्शावर आधारित) सेन्सरसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब पाहू शकतो.तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काम कसे करते? हे तंत्रज्ञान चालकाचा श्वास चालकाच्या बाजूचा दरवाजा, डॅशबोर्ड किंवा स्टिअरिंगवर बसवलेल्या सेन्सरपर्यंत खेचून घेते. चालक नैसर्गिकरीत्या श्वास घेतो तेव्हा सेन्सर श्वासातील अल्कोहोलचे प्रमाण ओळखतो. हे पारंपरिक ‘ब्रेथ ॲनालायझर’पेक्षा वेगळे आहे, ज्यामध्ये चालकाला जोराने श्वास सोडावा लागतो. मग ठरवलेल्या सेटिंगनुसार, कदाचित कार सुरूच होणार नाही. जर कार सुरू झाली आणि एसीची सुविधा मिळाली, तरी चालक गिअर बदलू शकणार नाही. जेणेकरून चालकाला एसीचा आराम तर मिळेल, पण जोपर्यंत मशीन अल्कोहोलची मर्यादित पातळी ओळखत नाही, तोपर्यंत त्याला गाडी चालवता येणार नाही. तंत्रज्ञानाकडून चूक होऊ शकते का? १०० टक्के होऊ शकते. सामान्यतः लोक अजूनही तंत्रज्ञानावर पूर्ण विश्वास ठेवायला तयार नाहीत. दुसरीकडे, चालकांना अशी भीती वाटते की ही डिटेक्शन सिस्टिम कारवर गरजेपेक्षा जास्त नियंत्रण मिळवेल. कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधित टीकाकार ‘फॉल्स पॉझिटिव्ह’ (चुकीचा निकाल) येण्याची शक्यताही वर्तवत आहेत. नुकताच मी न्यूयॉर्कहून कॅनडाला रस्ते मार्गाने गेलो. आम्ही ताशी ६० मैल (एमपीएच) या ठरवलेल्या मर्यादेत चाललो होतो. अमेरिकेत पोलिस ६५ एमपीएचपर्यंत दुर्लक्ष करतात, पण ६५ च्या पुढे गेल्यावर कारवाई करतात. मात्र, माझ्या बहिणीसारख्या फार कमी लोकांना माहीत आहे की पोलिस ६७ एमपीएचपर्यंतही थांबवत नाहीत, कारण २ एमपीएचचा ‘टेक्नॉलॉजी फॉल्ट बेनिफिट’ दिला जातो. हा ‘फॉल्स अलार्म’ हीच एकमेव गोष्ट निर्मात्यांना वाहनांमध्ये हे तंत्रज्ञान बसवण्यापासून रोखत आहे. विमा कंपन्या (इन्शुरन्स लॉबी) याचे जोरदार समर्थन करत आहेत, कारण यामुळे एकट्या अमेरिकेत दरवर्षी सुमारे १० हजार जीव वाचू शकतात आणि कंपन्यांच्या पैशांचीही मोठी बचत होईल. पण टीकाकारांचे असे मत आहे की हे तंत्रज्ञान अजून इतके प्रगत नाही की ज्यामुळे निष्पाप चालकांना त्रास होणार नाही. तसेच, जर सिस्टिमने पॉझिटिव्ह निकाल दिला तर पुढे काय करायचे, याबद्दलची मार्गदर्शक तत्त्वे अजून ठरलेली नाहीत. कदाचित कार सुरू होणार नाही, पण सिस्टिम थेट पोलिसांना फोन करेल का? सध्या तरी कुणालाच माहीत नाही.

हे तंत्रज्ञान सध्या चाचणी आणि सुधारणेच्या टप्प्यात आहे. हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपन्या ठामपणे मानतात की सध्या काल्पनिक ‘फॉल्स-पॉझिटिव्ह’ दराचा अंदाज लावणे खूप घाईचे ठरेल. डेव्हलपर्सचा असा युक्तिवाद आहे की ऑटोमोबाइलमध्ये एकही अशी सुरक्षा यंत्रणा नाही, जिची इतक्या अचूकतेने चाचणी केली जाते, जितके लक्ष टीकाकार ड्रंक-ड्राइव्हवर देत आहेत. अलीकडेच स्वीडिश कार निर्माता व्होल्वो कारने एक पर्यायी मार्ग अवलंबला आहे.

तुमच्या मोबाइलवर हा कॉलम ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.



Source link

डॉ. पवन मल्हारी सोनवणे यांना सुशिक्षित चेहरा म्हणून प्रभाग क्रमांक ४ ( अ ) मधून जनतेची पसंती.

0
डॉ. पवन मल्हारी सोनवणे यांना सुशिक्षित चेहरा म्हणून प्रभाग क्रमांक ४ ( अ ) मधून जनतेची पसंती.

पुणे : यंदाची निवडणूक महाराष्ट्रातील अनेक सुशिक्षित चेहऱ्यांनी रंगली जाणार असे दिसत आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच महानगरपालिकेतून अनेक सुशिक्षित चेहरे, महानगरपालिकेच्या दालनात नागरिकांचे प्रतिनिधित्व करणार असल्याची दाट शक्यता आहे.

अश्याच एका सुशिक्षित चेहऱ्याची चर्चा पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ ( अ ) मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.पवन मल्हारी सोनवणे यांच्या अनुषंगाने रंगताना दिसत आहे.

स्थानिक नागरिकांसोबत असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे सबंध आणि गेली अनेक वर्ष आपल्या डॉक्टरी पेशासोबतच त्यांनी जपलेली सामाजिक कार्याची बांधिलकी नागरिकांना आपलीशी वाटू लागली आहे. आणि सध्यातरी जनतेच्या मनाचा कौल हा डॉ.पवन सोनवणे यांच्याकडे झुकलेला दिसत आहे.

आपल्या प्रामाणिक सामाजिक कार्याच्या विश्वासावर आणि बदलत्या युगाच्या आधुनिकतेच्या तत्वावर आपल्या माणसांच्या विकासाचे ध्येय घेऊन, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या डॉ.पवन यांना जनतेची पसंती तर मिळत आहेच, पण मतांच्या रुपात त्यांच्या नावाची किती जोरात शिट्टी वाजणार हे पाहणे त्याहुनी जास्त महत्वाचे आहे.

साखरवाडीत सर्वांगीण विकासाला गती — विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ व भूमिपूजन सोहळा संपन्न

0
साखरवाडीत सर्वांगीण विकासाला गती — विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ व भूमिपूजन सोहळा संपन्न


साखरवाडी (ता. फलटण) येथे गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ व भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. माजी खासदार मा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार मा. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर वहिनी साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या विकासकामांमध्ये  येथील शासकीय दवाखान्यासाठी नूतन इमारत बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी, तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांची डांबरीकरण व दुरुस्तीची कामे यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे ग्रामस्थांना उत्तम आरोग्यसेवा, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण तसेच मजबूत पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून साखरवाडीच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांनी या विकासकामांमुळे गावाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीस मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते श्री. प्रल्हादतात्या साळुंखे पाटील, भाजपा महिला तालुकाध्यक्षा सौ. उषाताई राऊत, युवा नेते श्री. अमरसिंह नाईक निंबाळकर, श्री. विक्रमसिंह (आप्पा) पांडुरंग भोसले (माजी सरपंच, साखरवाडी ग्रामपंचायत) यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

गरोदरपणातील बीपी आई आणि बाळासाठी धोकादायक, डॉक्टरांनी सांगितले खास उपाय

0
गरोदरपणातील बीपी आई आणि बाळासाठी धोकादायक, डॉक्टरांनी सांगितले खास उपाय


उच्च रक्तदाब हा एक मूक किलर म्हणून देखील ओळखला जातो कारण तो हळूहळू तुमच्या शरीराला हानी पोहोचवतो. दरम्यान, गर्भधारणेदरम्यान, जेव्हा शरीरात अनेक बदल होतात, तेव्हा रक्तदाब पातळी वाढणे आणि कमी होणे यांचा धोका असतो. हे लक्षात घेतले पाहिजे की गर्भधारणेदरम्यान या दोन्ही स्थिती गंभीर मानल्या जातात आणि आई आणि तिच्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

Add Zee News as a Preferred Source

उच्च रक्तदाब ही एक गंभीर समस्या 

गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब सामान्यतः २० व्या आठवड्यात (दुसऱ्या तिमाहीत) दिसून येतो. या स्थितीला जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतात. ही स्थिती गर्भवती महिलेसाठी आणि तिच्या न जन्मलेल्या बाळासाठी हानिकारक असू शकते.

गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाबाची कारणे?

गर्भधारणेदरम्यान, शरीरातील हार्मोनल पातळी बदलते. रक्ताचे प्रमाण देखील वाढते. हे सर्व घटक महिलेचा रक्तदाब वाढवू शकतात. त्याचप्रमाणे, ताणतणाव, आहारातील अनियमितता आणि गर्भधारणेदरम्यान निष्काळजीपणा देखील महिलेचा रक्तदाब वाढवू शकतो.

गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाबाची लक्षणे कोणती आहेत?

उच्च रक्तदाबाची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. तथापि, तुमच्या शरीरात काही बदल उच्च रक्तदाब दर्शवू शकतात. गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या या समस्या उच्च रक्तदाबाशी संबंधित आहेत: वारंवार डोकेदुखी, चेहऱ्यावर सूज येणे आणि हातांना सूज येणे. त्याचप्रमाणे, डोळ्यांसमोर काळी वर्तुळे येणे, जलद वजन वाढणे आणि वरच्या ओटीपोटात वेदना होणे यासारख्या समस्या उच्च रक्तदाबाची गंभीर लक्षणे असू शकतात. म्हणून, गर्भधारणेदरम्यान कधीही त्याकडे दुर्लक्ष करू नका.

गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब कसा टाळायचा?

गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा आणि दररोज थोडे चालत जा. योग आणि ध्यान यासारख्या निरोगी सवयी स्वीकारा. पुरेशी झोप घ्या आणि चांगली विश्रांती घ्या. तसेच, दररोज तुमच्या रक्तदाबाची पातळी तपासा.

उच्च रक्तदाब टाळण्यासाठी आहार

रक्तदाब पातळी व्यवस्थापित करण्यासाठी, तुमचा आहार शक्य तितका निरोगी बनवा. ताज्या भाज्या आणि फळे, संपूर्ण धान्य आणि उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ खा. पॅकेज केलेले पदार्थ, तळलेले पदार्थ आणि मसालेदार पदार्थ टाळा. साखर आणि चहा आणि कॉफीचे सेवन देखील कमी करावे. हायड्रेटेड रहा, पाणी, नारळ पाणी आणि भाज्या प्या. तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेले सप्लिमेंट्स वेळेवर घ्या.





Source link

No Exam Govt Job: परीक्षेशिवाय मिळतात ‘या’ सरकारी नोकऱ्या; फक्त एक मुलाखत अन् नोकरी कन्फर्म!

0
No Exam Govt Job: परीक्षेशिवाय मिळतात ‘या’ सरकारी नोकऱ्या; फक्त एक मुलाखत अन् नोकरी कन्फर्म!


Government Jobs Without Exam: सरकारी नोकरी मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. कारण त्यात नोकरीची हमी, नियमित पगार, समाजात प्रतिष्ठा आणि भविष्याची स्थिरता मिळते. मात्र, साधारणपणे या नोकऱ्या मिळवण्यासाठी कठीण परीक्षा, मोठा अभ्यासक्रम आणि अनेक टप्प्यांची प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यामुळे अनेक जण मधेच हार मानतात. पण काही सरकारी नोकर्या अशा आहेत ज्यात लेखी परीक्षा देण्याची गरज नसते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

फक्त मुलाखत, गुणवत्ता यादी किंवा कागदपत्र तपासणीवर निवड होते. हे पर्याय त्यांच्यासाठी उत्तम आहेत ज्यांना लवकर नोकरी हवी किंवा परीक्षेत अपयश येत असेल. विविध विभाग अशा भरत्या काढतात ज्यात व्यावहारिक कौशल्यावर भर असतो.

वन विभागातील संरक्षण पदे

राज्यातील वन खाते नियमितपणे वनरक्षक किंवा वन्यजीव संरक्षणाशी संबंधित पदांसाठी जागा काढते. यात लेखी परीक्षेऐवजी शारीरिक चाचणी किंवा मुलाखत घेतली जाते. निसर्गप्रेमी आणि जंगलातील जीवजंतूंची काळजी घेणाऱ्यांसाठी ही नोकरी योग्य आहे. तुम्हाला जंगलाचे रक्षण, अवैध शिकार थांबवणे आणि वनसंपदेची देखभाल करावी लागते. पात्रतेसाठी फक्त दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे पुरेसे आहे. या पदावर चांगला पगार आणि रोमांचक अनुभव मिळतो.

रेल्वेतील शिकाऊ उमेदवार

भारतीय रेल्वे दरवर्षी इलेक्ट्रीशियन, वेल्डर, फिटर आणि मेकॅनिक अशा तांत्रिक क्षेत्रातील शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करते. यात कोणतीही परीक्षा नसते, फक्त दहावी आणि आयटीआयच्या गुणांवर गुणवत्ता यादी तयार होते. निवड झालेल्यांना रेल्वेच्या कार्यशाळा आणि डेपोत तांत्रिक काम शिकवले जाते. ट्रेनच्या भागांची दुरुस्ती आणि देखभाल हे मुख्य काम असते. पात्रतेसाठी आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक आहे. ही नोकरी तुम्हाला व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी उत्तम संधी देते.

पोस्ट विभागातील ग्रामीण डाक सेवक

भारत पोस्ट खाते दरवर्षी ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांसाठी जागा काढते. यात लेखी परीक्षा किंवा मुलाखत नसते, फक्त दहावीच्या गुणांवर गुणवत्ता यादी बनते. ग्रामीण भागात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही नोकरी आदर्श आहे. तुम्हाला डाक वितरण, बँकिंग सेवा आणि इतर सरकारी कामे हाताळावी लागतात. ही प्रक्रिया सोपी असल्याने लवकर नोकरी मिळण्याची शक्यता असते.

राज्य सरकारी कार्यालयातील पदे

अनेक राज्यांमध्ये सरकारी दफ्तरांत लिपिक, कनिष्ठ सहाय्यक आणि टायपिस्ट पदांसाठी भरती होते. यात बहुतेक वेळा शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्र तपासणीवर निवड होते, कधीकधी टायपिंग चाचणी घेतली जाते. स्थानिक रहिवाशांना प्राधान्य मिळते. ही पदे ब्लॉक किंवा पंचायत स्तरावर असतात. कामात कागदपत्रांचे रेकॉर्ड, डेटा एंट्री आणि फाइल व्यवस्थापन यांचा समावेश असतो. ही नोकरी स्थिर आणि कमी तणावाची असते.

अशा नोकऱ्यांचा फायदा  

अशा परीक्षेशिवाय मिळणाऱ्या नोकर्या जलद आणि कमी मेहनतीच्या असतात. त्या युवकांना प्रोत्साहन देतात जे पारंपरिक परीक्षा प्रक्रियेत अडकले आहेत. मात्र, या संधींची माहिती मिळवण्यासाठी सरकारी वेबसाइट्स आणि जाहिराती पाहत राहणे गरजेचे आहे. अशा नोकर्या मिळवल्याने तुम्ही अनुभव गोळा करू शकता आणि पुढे मोठ्या पदांवर जाऊ शकता. एकंदरीत, सरकारी क्षेत्रात प्रवेश करण्याचा हा सोपा मार्ग आहे.





Source link

फलटण तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
फलटण तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद


फलटण – माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून फलटण तालुक्यातील नीरा देवघर लाभक्षेत्रातील गावांमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, नागरिकांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाअंतर्गत आज विडणी येथे झालेल्या दौऱ्यात शेतकरी व नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या जागीच सोडविण्यात आल्या.
या दौऱ्यात नीरा देवघर पाणी वितरण व्यवस्था, महसूल, कृषी, महावितरण, पोलीस प्रशासन, पंचायत समितीचे विविध विभाग, पशुवैद्यकीय, आरोग्य, महिला व बालकल्याण, वन विभाग, जलसंधारण, धोम बालकवडी, नीरा उजवा कालवा, सार्वजनिक बांधकाम विभाग (जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासन), सामाजिक वनीकरण, शिक्षण, जीवन प्राधिकरण, पाणीपुरवठा, भू-अभिलेख, परिवहन महामंडळ, एनएचएआय (पालखी महामार्ग), रेल्वे प्रशासन, पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नियोजित दौऱ्यात नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेण्यात आल्या व अनेक प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. ज्या अडचणी त्वरित सोडविणे शक्य नव्हते, त्या संदर्भात संबंधित विभागांचे अधिकारी आणि नागरिकांची संयुक्त बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार सचिन पाटील यांनी दिले.
आतापर्यंत तब्बल 41 गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला असून, प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा मोठा सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. “असा आमदार आम्ही यापूर्वी कधी पाहिला नाही,” अशा शब्दांत नागरिकांनी आमदार सचिन पाटील यांचे आभार मानत गौरवोद्गार काढले.

अनुभवी संगीत शिक्षक / शिक्षिका आवश्यक!

0
अनुभवी संगीत शिक्षक / शिक्षिका आवश्यक!

जाहिरात
अनुभवी संगीत शिक्षक / शिक्षिका आवश्यक!

साहस Times :- वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या कमला निंबकर बालभवन या प्रयोगशील शाळेसाठी बालवर्ग ते माध्यमिक वर्गांसाठी अनुभवी व प्रशिक्षित संगीत शिक्षक/ शिक्षिका आवश्यक आहेत. इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा.
आवश्यक कौशल्ये :
सुरेल व तालबद्ध गायन (शास्त्रीय संगीताचे ज्ञान असणाऱ्या व गायनासोबत पेटी वाजवता येणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.)
शालेय विद्यार्थ्यांसोबत काम करण्याची आवड
विविध प्रकारची गीते शिकून मुलांबरोबर त्याचे प्रयोग करून पाहण्याची तयारी
पात्रता :
संगीत विषयातील पदवी / डिप्लोमा / समतुल्य अनुभव
शाळेत अध्यापनाचा अनुभव असल्यास प्राधान्य
कामाचे ठिकाण : कमला निंबकर बालभवन, फलटण
वेळ : अर्धवेळ / पूर्णवेळ
संपर्क :
कमला निंबकर बालभवन, लक्ष्मीनगर, फलटण
मो: 9405304816
इमेल : contact@pssphaltan.org

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 /01/2026

ब्रेस्ट मिल्क काढण्यासाठी पंपिंग करणे योग्य की अयोग्य? यामुळे बाळाच्या स्तनपानावर काय परिणाम होतो?

0
ब्रेस्ट मिल्क काढण्यासाठी पंपिंग करणे योग्य की अयोग्य? यामुळे बाळाच्या स्तनपानावर काय परिणाम होतो?


प्रसुतीनंतर काही आठवड्यांनी जेव्हा आई पुन्हा कामावर रुजु होण्याचा किंवा बाळाला काही काळासाठी घरी ठेऊन बाहेर जाण्याचा विचार करते तेव्हा तिच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न हा उभा राहतो की बाळाचे स्तनपान कसे सुरु राहिल? यावर पर्याय म्हणजे  ब्रेस्ट पंपचा वापर. हे वापरल्याने स्तनातील संपूर्ण दूध काढून घेता येतं, जेणेकरून जास्त दूध तयार देखील होतं. 

Add Zee News as a Preferred Source

बाळाला यशस्वीपणे जन्म दिल्याबद्दल अभिनंदन. नवीन मात्र ब्रेस्ट पंपिंगबद्दलच्या अनेक गैरसमजांमुळे महिलांमध्ये अनावश्यक भीती निर्माण करतात.या गैरसमजुती कोणत्या आणि त्यामागची वास्तविकता काय आहे हे या लेखाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.

गैरसमज: पंपिंग म्हणजे बाळ व्यवस्थित स्तनपान करू शकत नाही

वास्तविकता: थेट स्तनपान किंवा ब्रेस्ट पंपने काढलेले दूध पिणे दोन्ही परिस्थितीत बाळाला समान पोषण मिळते. पंपिंगमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. त्यामुळे गोंधळून जाऊ नका किंवा घाबरू जाऊ नका. काम, आरोग्याच्या समस्या किंवा बाळाशी संबंधित आव्हानांमुळे थेट स्तनपान शक्य नसतानाही, पंपिंगमुळे मातांना स्तनपान सुरू ठेवता येते.

गैरसमज: पंपिंग केल्याने दुधाची पोषकता कमी होते. बाळाला आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत

वास्तविकता: पंप केलेले स्तनपान हे थेट स्तनपानाइतकेत पोषक असते. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पंप केलेल्या दुधातही त्याच अँटीबॉडीज, प्रथिने, चरबी आणि जीवनसत्त्व असतात. दुधाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी योग्यरित्या साठवणे आणि स्वच्छता महत्त्वाची आहे, परंतु पंपिंगमुळे स्वतःहून स्तनपानाचे पोषणमुल्य कमी होत नाही. तुम्ही बाळासाठी सुरक्षितपणे दूध पंप करू शकता.

गैरसमज: ब्रेस्ट पंप वापरणे वेदनादायक आणि हानिकारक आहे; त्यामुळे ब्रेस्ट पंप टाळणेच योग्य

वास्तविकता: अनेक महिला ब्रेस्ट पंपिंगचा पर्याय निवडतात आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची अस्वस्थता किंवा वेदना होत नाही. योग्य आकाराचा पंप,  सक्शन आणि योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कोणतीही अडचण येत नाही. आधुनिक ब्रेस्ट पंप कोणत्याही समस्येशिवाय बाळाच्या नैसर्गिक स्तनपानाच्या पद्धतीप्रमाणेच प्रभावी ठरते. त्यामुळे ताण घेऊ नका आणि तज्ञांनी सांगितल्यानुसार ब्रेस्ट पंपचा वापर करा.

गैरसमज: ब्रेस्ट पंपमुळे दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम होतो आणि दुध उत्पादन कमी होते, ज्यामुळे बाळ भुकेले आणि अशक्त राहते

वास्तविकता: उलट, नियमित पंपिंगमुळे शरीराला अधिक दूध तयार करण्याचा संकेत मिळतो. पंपिंग सत्र चुकवणे, चुकीच्या आकाराचे फ्लेंज वापरणे किंवा पंपिंगचे अयोग्य तंत्र यामुळे दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. जेव्हा बाळाच्या आरोग्याचा प्रश्न येतो, तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. जर तज्ञांनी तुम्हाला ब्रेस्ट पंप वापरण्याचा सल्ला दिला असेल, तर योग्य प्रकारे पंप कसा वापरावा हे त्यांच्याकडून समजून घ्या.





Source link