Tuesday, June 30, 2026
Home Blog Page 71

“१९९५ ची त्रिशंकू विधानसभा, कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि जलदृष्टीचे नेतृत्व – श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर”

0
“१९९५ ची त्रिशंकू विधानसभा, कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि जलदृष्टीचे नेतृत्व – श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर”

फलटण प्रतिनिधी :-   १९९५ च्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्राच्या अपक्ष आमदारांनी पाठिंब्या च्या बदल्यात अजब मागणी केली होती. प्रत्येक अपक्ष उमेदवार च्या पाठिंब्या च्या बदल्यात वेगवेगळ्या अपेक्षा होत्या, कोणाला मंत्रीपद , कोणाला महामंडळ हवं होतं, या सर्वांना आश्वासन देई पर्यंत तत्कालीन मुख्यमंत्री कै.मा. मनोहर जोशी सर व उप मुख्यमंत्री कै . गोपीनाथ मुंडे यांची दमछाक झाली होती.
त्या अनुषंगाने निकाल लागला तेव्हा काॅगेस चे ८० , शिवसेना ७३, आणि भाजप ६५ आमदार निवडून आले होते . विलासराव देशमुख, छगन भुजबळ असे दिग्गजांचा पराभव झाला होता. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तब्बल ४५ अपक्ष निवडून आले होते .
मॅजिक फिगर साठी मा . शरदचंद्र पवार साहेब यांच्या सहित युतीची धावाधाव सुरू होती पण कै.मा.मुडे साहेब चलाख होते त्यांनी अगोदरच काही दहा आमदारांची मोट बांधली होती, आत्ता फक्त प्रश्न उरला होता पश्चिम महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांचा त्यांची नेमकी डिमांड काय आहे हे लक्षात येत नव्हते चाचपणी सुरू झाली त्या वेळी रामराजे, हर्षवर्धन पाटील, शिवाजी राव नाईक , दिलीप सोपल, अजित घोरपडे कै.भाऊसाहेब गुदगे व इतर असे नवखे व तरुण आमदार होते यांतील काही मंडळी मा. पवार च्या छावणीतील होती बैठकांचे सूर व जोर वाढू लागले त्यात काही मंत्री पदे व महामंडळ अध्यक्ष डील सुरू होत होत कृष्णा खोरे सिंचन विकास ही योजना पुढे सरकू लागली.
कृष्णा नदी प. महाराष्ट्राची जीवनदायिनी समजली जाते तिचं खोरे सोडलं तर बर्या पैकी राज्यभर दुष्काळी परिस्थिती होती कृष्णेचे बरचसं पाणी वाहून कर्नाटक आंध्र मार्गे समुद्राला जाऊन मिळते म्हणूनच गेली अनेक वर्षे कृष्णेचे पाणी अडवण्याचे प्रयत्न व मागणी सातत्याने सुरू होती, याबाबत तंटा लवाद सुरू होता, विधानसभेत सुद्धा यावरून चर्चासत्र सुरू होती मात्र ठोस उपाययोजना होत नव्हती.
मात्र या वेळी विधानसभेच्या त्रिशंकू अवस्थेचा फायदा उचलायचा हे अचूक खेळी रामराजे व काही आमदारांच्या डोक्यात आली व त्यांचे नेतृत्व पाणी प्रश्नावरील व्यवस्थापन व भू- गर्भ शास्त्राचे अभ्यासू श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कडे सुपुर्द केले गेले हा इतिहास आहे . “ सर्वात प्रथम कृष्णा खोरे मधील सर्व सिंचन प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे आश्वासन द्यावे मगच पाठिंबा व पाच वर्षांत सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करावेत, राज्यांची आर्थिक स्थिती पाहता एवढा निधी उभा करणे सोपे नव्हते त्यासाठी महामंडळ स्थापन करून बाजारातून निधी उभा करावयाचा ठरलं व २५ जानेवारी १९९६ रोजी कृष्णा खोरे विकास महामंडळ अस्तित्त्वात आले मात्र रामराजे यांनी दुसरं कोणतंही मंत्रीपद न घेता महाराष्ट्र राज्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी व कृष्णा खोरे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जबाबदारी व खबरदारी घेत फलटण च्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपाध्यक्षपदासाठी मागणी केली .
पाणीप्रश्नी रामराजे यांची दूरदृष्टी व कार्याची नोंद आजमितीस इतिहासात कायम राहील.
महाराष्ट्र राज्याच्या पाणीप्रश्नी रामराजे यांचे योगदान आणि त्याचा एकूण कृषी ,अन्न , नागरी सुविधा व अर्थकारणावर झालेला सकारात्मक परिणाम हा खरं तर स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. कामाच्या निवडलेल्या क्षेत्रात गुणात्मक बदल व मूल्यात्मक वाढ, हे त्यांच्या सार्वजनिक व्यवहारचे वैशिष्ट्य राहिले आहे. जे करायचे ते जाणतेपणाने आणि झपाटल्यासारखे करायचे, लोकशाहीच्या चौकटीत राहून लोकहिताचे निर्णय घेवयाचे, धर्मनिरपेक्ष मूल्यांची जपणूक करावयाची, जुन्या -नव्याचे मेळ घालायचे, अभ्यासक- विचारवंत यांच्याशी नाळ जुळवून ठेवायची,हे रामराजे सातत्याने जपत आलेत, कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना एखादा विद्यार्थीसारखे कुतुहल जागृत ठेवून वाटचाल करीत राहणं, लहान थोर असा भेद न मानता प्रसंगावधान राखत त्या क्षेत्रातील जाणकाराला फोन करून आपल्याला पडलेल्या प्रश्नांचे, शंकांचे निरसन तेव्हाच्या तेव्हा करून घेणे, स्वताला त्या क्षेत्रांशी अद्ययावत ठेवणे आणि अभ्यासकाला लाजवेल असे निष्कर्षसंदर्भ देत राहणे .

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी समाजाच्या व्यापक व चिरंतन विकासाच्या वाटचालीसाठी दिलेले योगदान पुढील पिढीपर्यंत घेऊन जाणारया आणि खरया अर्थाने सुसंस्कृत असलेला ऐतिहासिक वारसा व सांस्कृतिक विचार कार्य रुपाने पुढे नेणारया प्रत्येक कार्यकर्त्याला नेहमीच ताकद देण्यासाठी संवेदनशील राहिले असल्याचे अनेकदा सकृतदर्शनी दिसून आले आहे , अपवाद काही राजकीय निर्णय व राजकीय डावपेचांचे खेळ अंगलट आले मात्र त्याला न जुमानता व न डगमगता त्याला सामोरे गेले मात्र मागे फिरले नाहीत म्हणून तर आज सुध्दा श्रीमंत रामराजे यांची दूरदृष्टीची पाॅवर व राफेल विमानाच्या गतीने प्रमाणे राजकीय प्रवास चांदया पासून ते बाद्या पर्यंत चालू आहे .
श्रीमंत रामराजे यांची सार्वत्रिक ओळख ही राजकारणी असली तरी त्यांनी केवळ राजकारणापुरते स्वताला कधीच बंदिस्त ठेवले नाही.
राजकीय -सामाजिक -सांस्कृतिक- आर्थिकक्रिडाआरोग्य -कृषी -ग्रामीण व शहरी विकास – दुष्काळ मुक्ती करता केलेले योगदान व पाणी प्रश्नावरील व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र राज्य बरोबर प. महाराष्ट्र व आपली कर्मभूमी फलटण लोणंद खडाळा व माळशिरस करता विकासात्मक दूरदृष्टी आणि सकारात्मक हस्तक्षेप या भूमिकेतून लीलया वावरत राहिले. समाजाच्या दैनंदिन जीवनाला भिडणारया सर्वच कळीच्या मुद्यांयाना श्रीमंत रामराजे च्या सार्वजनिक जीवनाने स्पर्श केला आहे. राजकारण हे केवळ निवडणुक, मते मिळवण्यापुरतेच मर्यादित राहत नाही, तर राजकारणावर ज्या ज्या क्षेत्राचा प्रभाव पडत असतो त्या सर्व क्षेत्राप्रति असलेली आत्मीयता व व्यापक विकासासाठीची धडपड म्हणजे राजकारण, हे श्रीमंत रामराजे च्या आजपर्यंतच्या कृतीतून आपल्याला दिसून येईल. त्यामुळेच, श्रीमंत रामराजे कोणतेही क्षेत्र वर्ज्य राहिले नाही आणि राजकारण बाजूला ठेवले तर सर्व पक्षीय नेत्यांनाही आजमितीस रामराजे कधी वर्ज्य वाटले नाहीत .
श्रीमंत रामराजे यांचे जाणतेपण व अन् झपाटलेपण हे खूपच आव्हानात्मक आहे.अनेक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. श्रीमंत रामराजे यांनी ज्या विषयात लक्ष घातले, जे काम केले, ते त्या क्षेत्राला कलाटणी देणारे ठरले आहे.
श्रीमंत रामराजे हे खूप संयमी नेतृत्व म्हणून नावलौकिक मिळविला आहे.
सार्वजनिक जीवनातील राजकारण हे क्षेत्र असे आहे, जिथे जनतेचा थेट संपर्क येत असतो. त्यामुळे या क्षेत्रात वावरणारी व्यक्ती ही संयमी असायला हवी अशी एक अपेक्षा असते. त्यांचा संयम राजकीय संस्कृतीला मिळालेले वरदान आहे. त्यांच्यावर आजवर जितके आरोप प्रत्यारोप झाले त्यातील एक ही आरोप सिद्ध होवू शकला नाही, त्यावर सवंग चर्चा होताना दिसते मात्र या सर्वांमधून जे श्रीमंत रामराजे वर मनापासून प्रेम करतात, त्याची अशी स्पष्ट भावना झाली आहे की काहीही आरोप होऊ देत, ते यातून सहीसलामत बाहेर सुटतात हा सर्व सामान्य लोक रामराजे वर दाखवत असलेला विश्वास आहे, अर्थात महाराजांन सारखे वागणे प्रत्येकालाच जमेलच असं नाही.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे महाराष्ट्र राज्याच्या व प. महाराष्ट्र पाणीप्रश्न , दुष्काळी परिस्थितीत झालेले अमूल्य बदल व दिलेले योगदान पूर्णपणे बाहेर आलेले नाही. महाराज साहेबांनी त्यांच्या उमेदीच्या कार्यकाळात केलेल्या कामांचे काही साक्षीदार आजही गावोगावी आहेत. परंतु तिथपर्यंत मुख्य माध्यमे पोहचली नाहीत, त्यांच्याच जवळपासचे नेते, कार्यकर्ते व स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेनी सुध्दा ते प्रकर्षाने बाहेर आणण्याचे काम केले नाही. त्यामुळे *त्या गावात, तालुक्यात, जिल्हात ** रामराजेनी दिलेल्या योगदानाबद्दल आजची* पिढी अनभिज्ञ राहिली आहे.
श्रीमंत रामराजे यांच्या व्यापक भूमिका आणि व्यवस्थापनाचे रुप पाहता रामराजे हि एक व्यक्ती वाटत नाही तर ती सहजासहजी न उलगडणारी अशी एक संस्था आहे.
सर्व सामान्य मानवी शक्यता ओलांडून संवेदनशील मानवी पटलावर अथांग सागरासारखे गारुड उभा केलेली ही हाडामासाची व्यक्ती विविधांगानी समजून घेणे, हि आजच्या पिढीसाठी अत्यावश्यक आहे.कारण उद्याच्या वर्तमानातील प्रवासाला जेव्हा अडचणी येतील तेव्हा सार्वजनिक जीवनातील ३५ वर्षाचा संकल्प व संघर्षाचा काळ इतिहास लाभलेली ही रामराजे नावाची संस्थात्मक ठेव निश्चितच उभारी देईल .
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आपल्याकरता Strategy corporation आहे.

माझा कचरा माझी जबाबदारी… हरित फलटण…मी फलटण कर.. नंदकुमार मोरे ( फलटण)*

पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, टेम्पो-दुचाकीच्या धडकेत जवानाचा दुर्दैवी अंत; नवजात बालिक

0


Satara Accident: भारतीय सैन्य दलात (Indian Army) कार्यरत असलेला जवान (Soldier) पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर गावी आला असताना त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साताऱ्यात (Satara News) घडली. सिकंदराबाद–श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे सातारा तालुक्यातील दरे गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा अपघातात (Satara Accident) जागीच मृत्यू झाला. या घटनेने दरे गावासह संपूर्ण परळी खोऱ्यावर शोककळा पसरली आहे.

प्रमोद जाधव यांना आई नसल्याने पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ते सुमारे आठ दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते. दरम्यान, काही कामानिमित्त दुचाकीवरून वाढे फाट्याच्या दिशेने जात असताना पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची बातमी कळताच कुटुंबीयांसह गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. आज सकाळी वीर जवान प्रमोद जाधव यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी दरे येथे आणण्यात आले. त्याचदरम्यान त्यांच्या पत्नीने एका गोंडस बालिकेला जन्म दिला. पित्याच्या मृत्यूची बातमी आणि घरात आलेला नव्या जीवाचा आनंद, या दोन्ही भावनांनी कुटुंबीय हादरून गेले.

Satara Accident: काही तासापूर्वीच जन्मलेल्या बालिकेने घेतले अंत्यदर्शन

अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रमोद जाधव यांची पत्नी आणि काही तासांपूर्वीच जन्मलेली चिमुकली मुलगी पित्याच्या अंत्यदर्शनासाठी आणण्यात आली. नवजात बालिकेने घेतलेले वडिलांचे अखेरचे दर्शन पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, अनेकांना अश्रू अनावर झाले. शासकीय इतमामात वीर जवान प्रमोद जाधव यांना मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनातील अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या वीर जवानाच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Akola News : कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना

Shahada Accident : भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर

आणखी वाचा



Source link

EPFO News: अचानक नोकरी गेली किंवा सोडली तर PF च्या पैशांवर मिळेल व्याज? जाणून घ्या!

0
EPFO News: अचानक नोकरी गेली किंवा सोडली तर PF च्या पैशांवर मिळेल व्याज? जाणून घ्या!


EPFO News: खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नेहमी नोकरी जाण्याची भीती असते. कधीकधी ते स्वतः नोकरी सोडून दीर्घ विश्रांती घेतात. नोकरी गेल्यानंतर कंपनी तुमच्या पीएफ खात्यात पैसे जमा करत नाही. जर चार-पाच वर्ष नोकरी नसेल तर पीएफच्या पैशावर व्याज मिळेल का? असा प्रश्न सर्वांना पडतो. आजच्या वेगवान तंत्रज्ञान युगात कंपन्या वारंवार कर्मचाऱ्यांना कमी करतात, ज्यामुळे बेरोजगारी वाढते. काहींना नोकरी मिळवण्यात वर्षानुवर्षे लागतात, तर काहींना कधीच मिळत नाही. अशा परिस्थितीत पीएफमध्ये जमा झालेला पैसा हा एकमेव आधार असतो. पगारदार कर्मचाऱ्यांना असं वाटतं की खात्यात तीन वर्ष कोणतीही हालचाल न झाल्यास व्याज बंद होते. यामुळे अनेक जण घाईघाईत पैसे काढून घेतात. पण कायदा काय सांगतो? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

व्याज थांबण्याबाबतचा सामान्य गैरसमज

नोकरी सोडल्यानंतर फक्त तीन वर्षांपर्यंतच पीएफच्या पैशावर व्याज मिळतं, असं सोशल मीडियात म्हटलं जातं पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे गैरसमज जुने नियम आणि ईपीएफओच्या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधून निर्माण झाले आहेत. सलग तीन वर्ष कोणताही योगदान न झाल्यास व्याज थांबू शकतं, असंजुन्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगितलं होतं. यामुळे अनेक जण गोंधळात पडतात आणि अनावश्यकपणे पैसे काढण्याचा निर्णय घेतात. वास्तविक, हा नियम आता बदललाय. व्याज थांबण्याची मर्यादा तीन वर्षांची नाही. हे गैरसमज दूर करण्यासाठी ईपीएफओने स्पष्ट मार्गदर्शन जारी केलं आहे.

खरंखुरं व्याज मिळण्याचं वास्तव

नोकरी गेली तरी पीएफ खात्यात व्याज मिळत राहतं. हे व्याज 58 वर्षांच्या वयापर्यंत चालू राहतं. म्हणजे, तुम्ही 58 वर्षांचे होईपर्यंत, खात्यात कितीही वर्ष योगदान झालं नसलं तरी व्याज जमा होत राहतं. हे नियम ईपीएफओने स्पष्ट केलं आहेत. उदाहरणार्थ जर तुम्ही 40 वर्षांचे असाल आणि नोकरी सोडली असेल, तर पुढील 18 वर्ष व्याज मिळेल. हे व्याज दरवर्षी निश्चित दराने जमा होतं. ज्यामुळे तुमचा पैसा वाढतो. यामुळे बेरोजगार काळातही आर्थिक स्थिरता मिळते.

2016 च्या नियमांमधील बदल

2016 मध्ये सरकारने ईपीएफ नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले. यापूर्वी तीन वर्षांच्या निष्क्रियतेच्या नियमामुळे व्याज थांबण्याची शक्यता होती, पण या सुधारणेनंतर ही मर्यादा काढून टाकली गेली. आता खाते 58 वर्षांच्या वयानंतरच निष्क्रिय मानलं जातं आणि व्याजही तेव्हाच थांबतं. हे बदल कर्मचाऱ्यांच्या हितासाठी करण्यात आले, जेणेकरून ते दीर्घकाळ व्याजाचा फायदा घेऊ शकतील. या सुधारणांमुळे जुने गैरसमज दूर झाले आणि लोकांना खात्यात पैसे ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळालं.

ईपीएफओची अधिकृत स्पष्टता

ईपीएफओने सोशल मीडियावर एक पोस्ट जारी करुन यावर स्पष्टीकरण दिलंय. नोकरी सोडल्यानंतरही पीएफच्या रकमेवर व्याज मिळत राहतं. सदस्यांना 58 वर्षांच्या वयापर्यंत निश्चित व्याजाचा लाभ मिळतो. यासाठी त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यात अधिक माहिती दिली आहे. ईपीएफओचे हॅशटॅग्स जसे #HumHainNa आणि #EPFOWithYou यासारखे लोकांना आश्वासन देतात. हे स्पष्ट करणं गरजेचं आहे कारण जुने एफएक्यू आणि मार्गदर्शक तत्त्वांमुळे गोंधळ होता.

काय काळजी घ्याल?

पीएफ खाते सक्रिय ठेवण्यासाठी नियमित तपासणी करा. व्याज मिळत राहण्यासाठी 58 वर्षांपर्यंत पैसे काढू नका, जेणेकरून कंपाउंडिंगचा फायदा मिळेल. जर तुम्ही नवीन नोकरीत गेलात तर जुने खाते नवीनशी जोडा. ईपीएफओच्या वेबसाइट किंवा अॅपवर खाते तपासा. हे नियम कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता देतात, विशेषतः बेरोजगारीच्या काळात तुम्हाला याची मदत होईल.





Source link

महिलांना होणारा चौथा सर्वात सामान्य कॅन्सर कोणता? 2 पद्धतीने रोखू शकता

0
महिलांना होणारा चौथा सर्वात सामान्य कॅन्सर कोणता? 2 पद्धतीने रोखू शकता


गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग हा जगभरातील महिलांसाठी एक महत्त्वाचा धोका आहे, कारण हा चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे. सुदैवाने, तो मोठ्या प्रमाणात रोखता येतो. जर लवकर निदान झाले तर उपचार पूर्णपणे शक्य आहेत. तो गर्भाशयाच्या खालच्या भागात उद्भवतो, ज्याला गर्भाशय ग्रीवा म्हणतात. हा गर्भाशय आणि योनीला जोडणारा एक अरुंद भाग आहे. या गर्भाशयाच्या ग्रीवेच्या पेशींमध्ये असामान्य आणि अनियंत्रित वाढ होते तेव्हा गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग विकसित होतो.

Add Zee News as a Preferred Source

या प्रकारचा कर्करोग जवळजवळ नेहमीच मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) च्या सततच्या संसर्गामुळे होतो. हे सहसा प्राथमिक कारण असते. HPV चे अनेक प्रकार आहेत, परंतु जगभरात गर्भाशयाच्या कर्करोगाच्या 75 टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये प्रकार 16 आणि 18 आढळतात. गंभीर HPV संसर्गामुळे पेशींमध्ये असामान्य वाढ होऊ शकते, जी जर लक्ष न देता किंवा उपचार न केल्यास हळूहळू कर्करोगात बदलू शकते.

गर्भाशयाच्या कर्करोगाला रोखणे खूप सोपे आहे. दोन महत्त्वाचे टप्पे महत्त्वाचे आहेत. पहिले, तुम्ही HPV लस घ्यावी आणि सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावेत. दुसरे, नियमित तपासणी करून घ्यावी. गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका जास्त असलेल्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि विशिष्ट कालावधी निवडावा.

कोणत्या चाचण्या मदत करतील?

या चाचण्या आणि तपासणी या कर्करोगाला रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. एक म्हणजे HPV चाचणी, जी शरीरातील विषाणूचे अधिक धोकादायक आणि कमी धोकादायक प्रकार ओळखते. दुसरे म्हणजे पॅप स्मीअर, जे पेशींमध्ये लवकर बदल आणि त्यांची तीव्रता ओळखू शकते ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका असू शकतो.

केव्हा आणि कोणती चाचणी करावी?

गर्भाशयाच्या कर्करोगाच्या चाचणी आणि तपासणीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना नियमित HPV चाचणीची आवश्यकता नाही. पॅप स्मीअर स्क्रीनिंग वयाच्या 21 व्या वर्षी सुरू होऊन वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत चालू ठेवावे. मागील स्क्रीनिंगच्या निकालांवर अवलंबून, या चाचण्यांमधील अंतर 3 ते ५ वर्षांच्या दरम्यान असू शकते. जर काही विसंगती आढळल्या तर, अधिक अचूक माहितीसाठी तुमचे डॉक्टर कोल्पोस्कोपीसह पुढील चाचण्या करण्याचे आदेश देऊ शकतात.

या लोकांनी अधिक काळजी घ्यावी

  • गर्भाशयाचा कर्करोग
  • काही घटक एचपीव्ही संसर्ग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढवतात. जसे की:
  • अनेक लैंगिक भागीदार
  • लैंगिक क्रियाकलापांची लवकर सुरुवात
  • लैंगिक संक्रमित संसर्गाचा इतिहास
  • मुलांची संख्या जास्त
  • एचआयव्ही संसर्ग
  • इतर जननेंद्रियाच्या संसर्गासह सह-संसर्ग
  • धूम्रपान सवयी
  • दीर्घकालीन गर्भनिरोधक वापर
     





Source link

कर्तव्य बजावताना वीरगती; फलटणचा सुपुत्र देशासाठी शहीद

0
कर्तव्य बजावताना वीरगती; फलटणचा सुपुत्र देशासाठी शहीद


साहस Times : देशसेवा आणि जागतिक शांततेसाठी प्राणांची आहुती देणारी हृदयद्रावक घटना फलटण तालुक्यात घडली आहे. फलटण तालुक्यातील बरड येथील ११५ इंजिनिअर रेजिमेंटचे जवान नायक विकास विठ्ठलराव गावडे हे सुदान येथे संयुक्त राष्ट्रांच्या (UN) शांती मोहिमेवर कार्यरत असताना कर्तव्य बजावत असतानाच वीरमरण पावले. त्यांच्या शहादतीमुळे बरड गावासह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
नायक विकास गावडे हे भारतीय लष्करात निष्ठेने सेवा बजावत होते. आफ्रिकेतील सुदान देशात संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेत त्यांची नियुक्ती होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. दुष्काळी भागातून येऊन देशसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या या जवानाच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पार्थिव उद्या गावी येणार
प्राप्त माहितीनुसार, शहीद नायक विकास गावडे यांचे पार्थिव उद्या (रविवारी) सकाळी त्यांच्या मूळ गावी बरड (ता. फलटण) येथे पोहोचणार आहे. यासाठी लष्करी व प्रशासकीय पातळीवर आवश्यक तयारी सुरू आहे.
लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
भारत मातेच्या या वीर सुपुत्रावर बरड येथे शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी लष्कराचे अधिकारी, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नायक विकास गावडे यांच्या शहादतीने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.
शहीद जवान अमर रहे! 

मधुमेह असणाऱ्यांनी फळे खावीत का? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या अचूक उत्तर

0
मधुमेह असणाऱ्यांनी फळे खावीत का? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या अचूक उत्तर


Fruits For People With Diabetes Is Healthy Or Not?: आजकाल मधुमेह टाळण्यासाठी तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातून साखर वर्ज करण्याचा ट्रेंडच सुरू आहे. पण शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात रहावी किंवा एक निरोगी आहार म्हणून फळांचे सेवन केले जाते. साखर, मिठाई, चॉकलेट यांपासून दूर राहणे आरोग्यासाठी चांगले असले, तरी त्याऐवजी गोड म्हणून फळे खाणे अडचणीत टाकू शकते. तज्ज्ञांच्या मते, फळे आरोग्यदायी असली तरी ती जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर वाढण्याचा धोका निर्माण होतो.

Add Zee News as a Preferred Source

 

रिफाइंड साखर टाळण्यासाठी आहारात गोड फळांचा समावेश करावा का?

बहुतेक फळांमध्ये नैसर्गिक साखर (Fructose) असते. केळी, आंबा, द्राक्षं, चिकू, सीताफळ यांसारख्या गोड फळांचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. यामुळे ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढू शकते. विशेषतः मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी हे अधिक धोकादायक ठरू शकते. त्यामुळे रिफाइंड साखर टाळण्यासाठी गोड फळांचे सेवन करणे हा एक आरोग्यदायी पण धोकादायक निर्णय असू शकतो. पण तुम्ही गोड फळांचे सेवन योग्य त्या प्रमाणात केल्यास फायदेशीर ठरू शकते. 

 

फळांचा रस किंवा सरबत पिणे अधिक आरोग्यदायी असते का?

याशिवाय अनेकजण फळांचा रस किंवा सरबत पिणे अधिक आरोग्यदायी समजतात. मात्र जेव्हा फळांचा रस बनवताना फक्त रस उपयोगात आणला जातो आणि फळांचा चोथा फेकून दिला जातो. सफरचंद, संत्रे, चिकू, पेरू अशा अनेक फळांच्या सालींमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. जे पोटाच्या आरोग्यासाठी तसेच संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते. फळांच्या रसामध्ये साल नसल्याने त्यात फायबर नसून फक्त साखर असते. ही साखर थेट रक्तात जाते. त्यामुळे अनेक जणांनी त्यांच्या आहारातून साखर पूर्णपणे वर्ज केली असली तरी त्यांना मधुमेह होण्याची शक्यता वाढते. 

 

फळे योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणात खाणे गरजेचे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, फळे योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे. सकाळी किंवा दुपारच्या जेवणानंतर एक वाटी फळे खाणे योग्य मानले जाते. रात्री उशिरा किंवा सतत फळे खात राहणे टाळायला हवे. तसेच, फळांसोबत काही प्रमाणात ड्रायफ्रूट्स घेतल्यास शुगर नियंत्रित राहते. पण सतत किंवा फक्त फळे खाणे टाळायला हवे. तसेच तुम्हाला डाएट किंवा उत्तम आरोग्यासाठी आहारात फळांचा समावेश करायचा असेल तर अनुभवी आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

घणसोलीचे भूमीपुत्र धनंजय गणेश जगताप यांना शिट्टी चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन

0
घणसोलीचे भूमीपुत्र धनंजय गणेश जगताप यांना शिट्टी चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन


साहस Times :- घणसोली परिसरात येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार धनंजय गणेश जगताप यांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. “घणसोलीचे भूमीपुत्र” म्हणून ओळख असलेले धनंजय जगताप हे समाजसेवेचा समृद्ध वारसा लाभलेले, सुसंस्कृत आणि सुशिक्षित तरुण नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.
स्थानिक प्रश्नांची सखोल जाण, सामान्य नागरिकांच्या अडचणींबाबत असलेली तळमळ आणि सातत्याने केलेले सामाजिक कार्य यामुळे ते घणसोलीतील जनतेच्या विश्वासाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच युवक व महिलांसाठी विकासाभिमुख उपक्रम राबवण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेशी निष्ठावान राहून त्यांनी नेहमीच वंचित, उपेक्षित आणि सामान्य घटकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे. राजकारणाला सेवाभावाची जोड देत पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचे स्वप्न ते घेऊन मैदानात उतरले आहेत.
घणसोलीच्या सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की, येत्या निवडणुकीत “शिट्टी” या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून आपले बहुमूल्य मत धनंजय गणेश जगताप यांच्या पारड्यात टाका आणि त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. परिवर्तनासाठी, विकासासाठी आणि न्यायासाठी एकजुटीने मतदान करूया.

बरखा दत्त यांचा कॉलम: ‘धुरंधर’ चित्रपटाच्या प्रचंड‎ यशामागील रहस्य काय ?‎

0
बरखा दत्त यांचा कॉलम:  ‘धुरंधर’ चित्रपटाच्या प्रचंड‎ यशामागील रहस्य काय ?‎


  • Marathi News
  • Opinion
  • Barkha Dutt’s Column, What Is The Secret Behind The Huge Success Of The Film “Dhurandhar”?

1 दिवसापूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎‎‎‎‎‎‎‎भारतीय बॉक्स ऑफिसवर ८०० कोटी आणि‎जगभरात १,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारा‎//”धुरंधर’ हा एक इतिहास घडवणारा चित्रपट बनला‎आहे. पाकिस्तानचा दहशतवाद्यांना असलेला आश्रय तो‎उघड करतो. तिथेही चित्रपटाला प्रेम मिळाले.‎पाकिस्तानी लग्ने आणि पार्ट्यांमध्ये लोक त्याच्या‎संगीतावर नाचत आहेत. कराचीच्या लियारी भागात‎टोळीयुद्धे दाखवली जातात. त्याच्या प्रचंड यशामागील‎रहस्य हे केवळ चित्रपट निर्माते आणि समीक्षकांनीच‎नव्हे तर आपण प्रेक्षकांनीही समजून घेतले पाहिजे.‎

फोन आणि लॅपटॉपवर नेटफ्लिक्स पाहण्याच्या या युगात‎हा चित्रपट खरोखरच मोठ्या पडद्यावर सिनेमॅटिक‎अनुभव देतो असे म्हणता येईल. उत्कृष्ट स्टारकास्ट,‎अॅक्शन आणि डान्स सीक्वेन्स, सेट डिझाइन आणि ‎‎निर्मितीपासून ते संगीत- कथाकथनापर्यंत – सर्व काही ‎‎मोठ्या पडद्यासाठी तयार केले गेले आहे.‎

७० आणि ८० च्या दशकात वाढलेल्या आपल्यापैकी‎अनेकांच्या कल्पनाशक्तीला चित्रपटांनी आकार दिला‎आहे. दशकांनंतर “धुरंधर’ बद्दलही असेच घडत आहे.‎चित्रपटाने एकात्मता निर्माण करण्यात यश मिळवले‎आहे. हा उत्तम प्रकारे बनवलेला चित्रपट पाहिल्यानंतर‎अनेक लोकांनी बलुचिस्तान, रहमान डकैत आणि‎बेनझीर भुट्टो यांच्या पीपीपीचा इतिहास गुगलवर शोधला‎आहे. कदाचित माहितीपट, बातमी किंवा पुस्तक‎वाचल्यानंतर एवढे झाले नसते.‎

चित्रपटाचा आणखी एक असामान्य पैलू म्हणजे‎जवळपास संपूर्णपणे पाकिस्तानवर आधारित हा‎कदाचित पहिला भारतीय चित्रपट आहे. पाकिस्तानी‎बाजारपेठ, निवडणूक रॅली, खरे पोलिस आणि‎राजकारण्यांपासून प्रेरित असंख्य काल्पनिक पात्रे -‎सर्वकाही अत्यंत काळजीपूर्वक रचले गेले आहे.‎भारतात दहशतवादी हल्ल्यांचा कट रचण्यात‎आयएसआयची भूमिका निर्भयपणे उघडकीस‎आणताना ते पाकिस्तानमधील दैनंदिन जीवनाचे अचूक‎चित्रण देखील करते.‎

काही समीक्षकांनी असा आरोप केला आहे की हा‎चित्रपट भारतीय मुस्लिमांविरुद्ध प्रचार आहे. पण ही एक‎हास्यास्पद टीका आहे. चित्रपटात आपल्याच‎लोकांविरुद्ध संशय निर्माण करतो असा एकही क्षण दिसत‎नाही. निश्चितच भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी‎लोकांशी तुलना करतात तेच त्यांचे सर्वात मोठे नुकसान‎करत आहेत. भारतीय मुस्लिमांकडे कधीही अशा‎दृष्टिकोनातून पाहू नये. असे करणारे लोक समुदायाचा‎अपमान करतात. मी दोन मुस्लिम मित्रांसोबत हा चित्रपट‎पाहिला आणि त्यांनाही तो माझ्याइतकाच आवडला.‎

आदित्य धर यांच्या चित्रपट निर्मितीची आणखी एक‎पद्धत विचार करायला लावणारी आहे. ती म्हणजे‎काल्पनिक दृश्ये आणि वास्तविक जीवनातील फुटेजची‎सांगड. एक प्रेक्षक म्हणून या चित्रपटात खूप भावनिक‎दृश्ये होती. उदाहरणार्थ- २६/११ च्या मुंबई दहशतवादी‎हल्ल्याच्या नियोजनाची काल्पनिक दृश्ये एका मोठ्या‎पडद्यावर हल्ल्याच्या प्रत्यक्ष प्रतिमांशी जोडली गेली‎आहेत.‎

मी स्वतः त्या दृश्यावरून हल्ल्याचे वृत्तांकन केले. ही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎युक्ती कथाकथन तंत्र म्हणून अत्यंत प्रभावी ठरते. किंवा‎रहमान डकेतचे पात्र घ्या. त्याला मुंबई हल्ल्यातील एक‎प्रमुख दुवा म्हणून चित्रित केले आहे. चित्रपटात तो‎आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्यासोबत कट‎रचताना दाखवला आहे. परंतु प्रत्यक्षात त्याचे नाव‎हल्ल्यावरील भारताच्या स्वतःच्या कागदपत्रांमध्येही‎दिसत नाही. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की चित्रपट‎हे माहितीपट नसतात.‎

आणि शेवटी चित्रपटाचे संगीत हा एक मजबूत घटक‎आहे. तो कव्वाली आणि काही जुन्या सुरांना‎पुनरुज्जीवित करतो. बहरीनी शैलीत गायलेले एक‎अरबी गाणे आजकाल एक लोकप्रिय ट्रेंड बनले आहे.‎चित्रपटातील संगीत हे पात्रांइतकेच महत्त्वाचे आहे.‎चित्रपट पाहिल्यानंतरही तेच आठवणीत राहते.‎ पूर्वीच्या पिढ्यांसाठी ‘शोले” होता तशीच आजच्या‎पिढीसाठी ‘धुरंधर” ही एक -कल्ट फिल्म आहे.‎ (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)‎

QuoteImage

भारतीय मुस्लिमांकडे पाकिस्तानशी‎जोडून बघणारे लोक स्वत: च आपले‎नुकसान करत आहेत. मी हा चित्रपट दोन‎मुस्लिम मित्रांसोबत पाहिला आणि‎त्यांनाही तो माझ्याइतकाच आवडला.‎

QuoteImage



Source link

पितळखोरा लेणीतील बारकावे !

0
पितळखोरा लेणीतील बारकावे !

पितळखोरा लेणीतील बारकावे !

साहस Times :- प्राचीन काळातील खडकी जो इतिहासात औरंगाबाद या नावाने ओळखला गेलाय व सद्द स्थितीत छत्रपती संभाजीनगर या नावाने ओळखला जातो या शहरापासून साधारण सत्तर किलोमीटरवरील कन्नड तालुक्यातील काळीमठच्या अंबा तांड्या जवळ गौताळा अभयारण्याच्या आत पितळखोरा नावाचा लेणी समूह आहे.
पितळखोरा लेणी समूह पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भागात विभागला गेला आहे , पुरातत्व विभागाने नव्याने तयार केलेल्या पायर्‍या उतरून पूर्वीचा लाकडी व आत्ताचा लोखंडी पुला जवळ आल्यानंतर एक वाट जाते पुलावरून उजवीकडील लेणी समूहाकडे ज्या मध्ये नऊ लेण्यांचा समूह आहे तर दुसरी वाट जाते आपल्या डावीकडून चार लेण्यांच्या समूहाकडे.
पितळखोरा लेणी समूहातील हे शेवटचे अपूर्ण पण महत्त्वपूर्ण स्थापत्य , हे स्थापत्य पूर्णत्वास कधी गेले नाही या स्थापत्याचा काळ तज्ञांच्या मते इ स.पूर्व १८० च्या आसपासचे आहे. छोटेसेच आटोपशीर पण महत्त्वपूर्ण तपशिलासह.
पहाडात ओबडधोबड पोखरून निर्माण केल्यासारखे वाटणारे हे स्थापत्य म्हणजे स्तंभ विरहित चैत्य, स्थापत्य विशारदांनी आपल्याला हवी तेवढी जागा साफ करून कातळाला तासून घेत समोरील बाजूस वर दर्शनी भागात चैत्य गवाक्षाच्या समान आकार देऊन चैत्य गवाक्षाच्या बरोबर मधोमध इतर लेणी समूहात दिसून येत नाही असे “वातायनाची” तरतूद इथे करून घेतली आहे, याला “चैत्य वातायन” असे संबोधन आहे, याचा उपयोग आतल्या वास्तूत हवा खेळतील रहावी तसेच नैसर्गिक प्रकाश आत प्रवेश करण्यासाठी याचे प्रामुख्याने प्रयोजन. कलाकाराला कलाकुसर करता यावी म्हणून इथे समतल जागा आहे जिथे एक माणूस सहज उभे राहून आपली कलाकृतीतील निपुणता प्रस्तरात उतरवू शकेल पण तसे होऊ शकले नाही, अशी जागा तुम्हाला जुन्नर मधील मानमोडी लेणी समूहातील अपूर्ण चैत्यगृहातील गाभाऱ्यातील स्तूपावर दिसून येईल तसेच भूत लेणीवरील अपूर्ण चैत्यगृहाच्या बाहेरील बाजूस चैत्य गवाक्षाजवळ आहे.
चार पायर्‍या वर चढून गेल्यावर या वास्तूत प्रवेश करण्यासाठी दरवाज्याची व्यवस्था केली गेली आहे पण इथे एक बाब लक्षात घेण्यासारखे आहे ती म्हणजे जसे इतर लेणी समूहात दिसून येणाऱ्या दरवाजा बसवण्यासाठी लागणाऱ्या खोबण्या मात्र इथे दिसून येत नाहीत, म्हणजेच इथे कधीच लाकडी दरवाजा बसवण्यात आलेले नव्हता ही वास्तू सदैव दर्शनास खुली होती पण परिसर आजही दाट अरण्याने वेढेलेले असतांना असे करणे धोकादायक ठरू शकेल.
दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर समोरच एक छोटेखानी स्तूप दिसतो जो सर्वसामान्य माणसाच्या उंची येवढा आहे या स्तूपाला प्रदक्षिणा मारण्यासाठीची जागा सोडण्यात आली आहे पण आत स्तंभ मात्र दिसून येत नाही जे सर्वसामान्यपणे सर्व चैत्यगृहात सर्रासपणे दिसून येतात, या स्तूपाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा स्तूप वर निमुळता होत गेला आहे अशा स्वरूपाचे स्तूप सहजासहजी दिसून येत नाही, जोत्यापासून ते वेदीकेच्या पट्टीपर्यंत कले कले हा स्तूप वर जात जात निमुळता होत गेला आहे , वेदीकेची पट्टी अत्यंत ठसठशीत स्वरूपात असून वरील अंड गुळगुळीत व सुस्थितीत आहे त्यावरील हर्मिकेची पेटी भग्नावशेषात किंचित प्रमाणात शिल्लक आहे तर हार्मिका मात्र काळओघात नष्ट झाली आहे.
ज्या प्रमाणे स्तूप जसा आतल्या बाजूस निमुळता होत गेलाय तसेच या वास्तूच्या भिंती देखील आतल्या बाजूस निमुळत्या होत गेल्या आहेत ही या वास्तुतील खास बाब आहे , एक गोष्ट इथे नमूद करणे आवश्यक आहे ती म्हणजेच आपल्याला सुरूवातीच्या काळातील भाजे लेणी, बेडेसे लेणी व इतर लेण्यांच्या चैत्यगृहातील स्तंभ जे स्तंभशिर्ष व घट विरहित असायचे ते आतल्या बाजूने कलत्या स्वरूपाचे असायचे इथे मात्र त्या गोष्टीला फाटा देण्यात आला आहे इथे आतल्या बाजूस निमुळत्या होत गेलेल्या भिंती आहेत ज्या छान तासून काढल्या आहेत, भिंती तासण्यासाठी लागणाऱ्या छोट्या स्वरूपाच्या छन्नीचे घाव आज ही स्पष्टपणे भिंतीवर दिसून येत आहेत, निमुळत्या होत गेलेल्या या वास्तुचे छत मात्र नेहमीप्रमाणेच गजपृष्ट आकाराचे आहे.
पितळखोरा लेणीचा शोधकर्ता हेन्री कझींस व त्यानंतर या लेणीवर आपल्या “द केव्ह टेंम्पल ऑफ इंडिया” या ग्रंथातून लिखाण करणारे जेम्स फर्ग्युसन तसेच जेम्स बर्जेस यांना या लेणी बाबत माहिती नाही कारण या लेणीचा शोध त्यांच्या नंतर लागला आहे.
स्वातंत्र्य पूर्व काळात हैदराबादच्या निजामांनी या संपूर्ण लेणी समूहाच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला होता जेव्हा हा भूभागावरून त्यांची सत्ता होती त्यांच्यासाठी गुलाम यझदानी यांनी काम पाहीले होते त्यांच्या सोबतीने पुण्याचे म गो दिक्षीत हे देखील होते.
पुढे स्वातंत्र्यानंतर हा लेणी समूह भारत सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने हा लेणी समूह १९५३ मध्ये संरक्षित स्मारक म्हणून घोषीत करण्यात आला व यावर काही प्रमाणात संवर्धनाचे काम ही झाले पण जी प्रसिद्धी पितळखोरा लेणी समूहाला मिळायला हवी होती ती आजपर्यंत मिळालेली नाही.

लेणी स्थापत्यातील बारकावे समजून घेणे जेवढे सोपे वाटतात तेवढे सोपे नाहीत , विशेषत सुरुवातीच्या काळात निर्माण झालेल्या लेण्या आणि त्यातील बारकावे .
“लयन स्थापत्यकला” ही नव्यानेच भारतीय स्थापत्यकलेला मिळालेली देण आहे या आधी अशी स्थापत्य या भारत भूमीवरून निर्माण झालेली नव्हती हे आपण प्रखरपणे समजून घेणे आवश्यक आहे.

लेणीचे सर्व फोटो याच ऐतिहासिक शहरात राहणारे माझे मित्र अमोल बोर्डे यांनी उपलब्ध करून दिले आहेत त्यांचे मनापासून आभार.

या लेणीवरील माझ्या विडिओची लिंक शेअर करतो ते देखील सर्वांनी आवर्जून पाहा व आपला अभिप्राय नोंदवा : https://youtu.be/QYSTWkBlZ6A?si=RScmpbcUYx6oqbHB

सूरज रतन जगताप ( लेणी अभ्यासक )

सस्तेवाडीतील खूनप्रकरण : प्रशासनाची कसोटी, न्यायासाठी रामोशी समाज आक्रमक

0
सस्तेवाडीतील खूनप्रकरण : प्रशासनाची कसोटी, न्यायासाठी रामोशी समाज आक्रमक


फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथे घडलेली गणेश बाळू मदने यांची निघृण हत्या ही केवळ एका गरीब शेतकऱ्याची हत्या नसून, ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर झालेला गंभीर आणि थेट आघात आहे. दिनांक ६ रोजी गणेश बाळू मदने हे आपल्या शेतात काम करत असताना वन्य प्राण्यांची अवैध शिकार करणाऱ्या काही समाजकंटकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या अमानुष हल्ल्यात त्यांची जागीच निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जय मल्हार क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन, फलटण येथे अधिकृत निवेदन सादर करून या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची, तसेच तपास फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्याची मागणी केली आहे. मृत गणेश मदने यांच्या कुटुंबाला तात्काळ न्याय मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, तपासात कोणतीही दिरंगाई, हलगर्जीपणा किंवा कसूर झाल्यास संपूर्ण रामोशी समाज व जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. “आज प्रश्न एकाचा नाही, उद्या कोणाचाही असू शकतो,” असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे. ग्रामीण भागात मेहनत करणाऱ्या रामोशी समाजातील गरीब व्यक्तीचा जीव इतका स्वस्त झाला आहे का, असा संतप्त सवाल या घटनेमुळे उपस्थित होत आहे.
या निवेदनावर जय मल्हार क्रांती संघटनेचे फलटण तालुका अध्यक्ष गणेश हणमंत मदने यांची स्वाक्षरी असून, यावेळी फलटण तालुक्यातील रामोशी समाजाचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत हा विषय शांत होणार नाही, असा ठाम निर्धार समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला असून, प्रशासनासाठी ही घटना खरी कसोटी ठरणार आहे.