Tuesday, June 30, 2026
Home Blog Page 70

फलटण नगरपरिषदेची थकीत कर वसुली मोहीम तीव्र ; थकबाकीदारांचे गाळे सील

0
फलटण नगरपरिषदेची थकीत कर वसुली मोहीम तीव्र ; थकबाकीदारांचे गाळे सील


फलटण : फलटण नगरपरिषदेच्या कर विभागामार्फत मोठ्या प्रमाणात थकीत कर असणाऱ्या मालमत्ता धारकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या सूचनेनुसार ही कारवाई सुरू करण्यात आली असून कर अधिकारी राजेश काळे व कर निरीक्षक रोहित जमदाडे यांच्या नियंत्रणाखाली तीन स्वतंत्र वसुली पथके नेमण्यात आली आहेत.
या पथकांमार्फत थकबाकीदार मालमत्ता धारक तसेच नगरपरिषदेच्या मालकीच्या गाळेधारकांवर कठोर कारवाई करण्यात येत असून, थकीत कर न भरणाऱ्यांचे गाळे सील करण्यात आले आहेत. तसेच पुढील टप्प्यात जंगम मालमत्तेची जप्ती व नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाईही सुरू करण्यात आली आहे.
नगरपरिषदेने फलटण शहरातील सर्व मालमत्ता धारकांना आवाहन केले आहे की, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासह प्रलंबित मालमत्ता कर व पाणीपट्टीचा तात्काळ भरणा करून नगरपालिकेस सहकार्य करावे. अन्यथा वसुलीची मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याची नोंद सर्व थकीत मालमत्ता धारक व नगरपरिषदेच्या मालकीचे गाळेधारक यांनी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बारामती नगरपरिषदेत राजकीय उलथापालथ; अपक्ष नगरसेवकांचा राष्ट्रवादीला पाठिंबा, विरोधकांची ताकद घटली

0
बारामती नगरपरिषदेत राजकीय उलथापालथ; अपक्ष नगरसेवकांचा राष्ट्रवादीला पाठिंबा, विरोधकांची ताकद घटली



साहस Times :- बारामती नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिल्याने सत्ताधारी गट अधिक मजबूत झाला आहे. नीलेश इंगुले, वनिता सातकर आणि मनीषा बनकर यांनी राष्ट्रवादीच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे नगरपरिषदेत विरोधकांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे.
बारामती नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात सहा उमेदवार निवडून आले होते. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आरती शेंडगे, बसपच्या संघमित्रा चौधरी तसेच अपक्ष उमेदवार नीलेश इंगुले, वनिता सातकर, मनीषा बनकर आणि यशपाल पोटे यांचा समावेश होता. या सहा जणांचा स्वतंत्र विरोधी गट तयार होऊन विरोधी पक्षनेत्याची निवड होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
मात्र आता अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नीलेश इंगुले, वनिता सातकर आणि मनीषा बनकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत सत्ताधारी गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधी गटात केवळ तीन नगरसेवक उरले असून नगरपरिषदेतील राजकीय गणिते पूर्णतः बदलली आहेत.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादीची नगरपरिषदेतली ताकद आणखी वाढली असून, येणाऱ्या काळात निर्णयप्रक्रिया आणि सत्ताकारणावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

२४ तासांत महामार्गावरील दरोडा उघडकीस; २० लाखांचा मुद्देमाल जप्त

0
२४ तासांत महामार्गावरील दरोडा उघडकीस; २० लाखांचा मुद्देमाल जप्त


साहस Times  | प्रतिनिधी :-  कुरुंदा पोलीस स्टेशन हद्दीत महामार्गावर झालेल्या गंभीर दरोड्याच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत तब्बल २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीस वाहनाद्वारे धडक देऊन जखमी करण्यात आले. त्यानंतर महामार्गावर दरोडा टाकून आरोपींनी आठ लाख रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने लंपास केली होती. या प्रकरणी कुरुंदा पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा क्रमांक ०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२), ३११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. मोहन बाळासाहेब भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. अवघ्या २४ तासांत आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील रोख रक्कम रुपये ६ लाख ७० हजार, तसेच गुन्ह्यात वापरलेले एक पिकअप वाहन व तीन मोटारसायकली असा एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मुलीच्या जन्मानं आनंद तर दुसरीकडे बापाला अपघातानं हिरावलं; स्ट्रेचरवरील बाळंतिणीने फिरवला नवऱ्य

0


Satara Accident: भारतीय सैन्य दलात (Indian Army) कार्यरत असलेला जवान (Soldier) पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर गावी आला असतानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यातील दरे येथे घडली. (Satara News) सिकंदराबाद–श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे सातारा तालुक्यातील दरे गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा अपघातात (Satara Accident) जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने दरे गावासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. जाधव यांच्या घरी आनंदाचा क्षण शोकामध्ये बदलून गेला. पत्नीला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर जवान प्रमोद जाधव यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. प्रसूतीसाठी आवश्यक औषधी आणण्यासाठी ते मेडिकलकडे निघाले; पण ते परत रूग्णालयात आलेच नाहीत. रुग्णालयाकडे परत येत असताना त्यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. या मन हेलावणाऱ्या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्रमोद जाधव यांच्या पत्नीने ऋतुजा हिने शनिवारी सकाळी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या येण्याने सर्वत्र आनंद असायला हवा होता; पण त्याच वेळी कोणीतरी धाडस करून त्यांच्या पत्नीला सांगितले गेले की, तुमच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्या माहितीनं तिची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली.

Satara Accident: आठ तासांची लेक; ना बापाने लेकीला पाहिलं ना लेकीनं बापाला 

बाळंतीण ऋतुजाला सावरण्यासाठी नर्स, गावकरी आणि नातेवाईक पुढे आले. त्यांनी तिला स्ट्रेचरवरून गावात आणलं. अवघ्या आठ तासांच्या चिमुकल्या लेकीलाही तिच्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. पत्नी ऋतुजाचा स्ट्रेचर पतीच्या पार्थिवाजवळ ठेवला. थरथरत्या हाताने तिने पतीच्या चेहऱ्यावरून अखेरचा हात फिरवला. तो क्षण पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेलं. तो क्षण उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारो होता. प्रमोद जाधव हे लेह-लडाख येथे भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते. सातारा जिल्ह्यातील दरे येथे शनिवारी जवान प्रमोद जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आठ तासांची ओली बाळंतीण पत्नी ऋतुजाला स्ट्रेचरवरून आणले होते. हे दृश्य मन हेलावून टाकणारं होतं.

Satara Accident: आई नसल्याने पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आठ दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले

प्रमोद जाधव यांना आई नसल्याने तेच आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ते सुमारे आठ दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते. दरम्यान, कामानिमित्त दुचाकीवरून वाढे फाट्याच्या दिशेने जात असताना आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. पित्याच्या मृत्यूची बातमी आणि घरात आलेला नव्या जीवाचा आनंद, या दोन्ही गोष्टींना कुटुंबीय हादरून गेले.

Satara Accident: काही तासापूर्वीच जन्मलेल्या चिमुकलीनेही घेतले अंत्यदर्शन

अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रमोद जाधव यांची पत्नी आणि काही तासांपूर्वीच जन्मलेली चिमुकली मुलगी पित्याच्या अंत्यदर्शनासाठी आणण्यात आली होती. नवजात बालिकेने घेतलेले वडिलांचे अखेरचे दर्शन पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, अनेकांना अश्रू अनावर झाले. शासकीय इतमामात वीर जवान प्रमोद जाधव यांना मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनातील अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या वीर जवानाच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा



Source link

इस्रो 2026 कडून एकाचवेळी 15 उपग्रह प्रक्षेपित; PSLV-C62 म्हणजे काय? यातून काय होणार साध्य? A टू Z माहिती!

0
इस्रो 2026 कडून एकाचवेळी 15 उपग्रह प्रक्षेपित; PSLV-C62 म्हणजे काय? यातून काय होणार साध्य? A टू Z माहिती!


PSLV-C62: सध्या देशभरात इस्रोच्या मोहिमेची चर्चा आहे. या मोहिमेद्वारे एकाच वेळी 15 उपग्रहांना सूर्य-सिंक्रोनस पोलर ऑर्बिटमध्ये सोडण्यात आले. ही मोहीम भारताच्या अवकाश क्षेत्रातील वाढत्या भूमिकेचे प्रतीक आहे. ज्यात विविध देशांच्या उपग्रहांना एकत्रितपणे अवकाशात पाठवण्याची क्षमता दाखवली जाते. न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ही ‘सॅटेलाइट टॅक्सी’सारखी सेवा उपलब्ध करून दिली जाते, ज्यात व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा समावेश आहे. काय आहे PSLV-C62 मोहिम? सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

इस्रोच्या 2026 या वर्षातील पहिल्या मोठ्या अवकाश मोहिमेचे नाव PSLV-C62 आहे. ही मोहीम श्रीहरीकोटातील सतीश धवन अवकाश केंद्रावरून सुरू करण्यात आली.
ही मोहीम 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजून 17 मिनिटांनी पहिल्या लॉन्च पॅडवरून सुरू झाली. PSLV रॉकेटच्या इंजिनांनी बंगालच्या उपसागरावर आवाज घुमला. या मोहीमेअंतर्गत इस्रोने 2026 या वर्षातील पहिले मोठे उड्डाण घेतले. ज्यात उपग्रहांना पृथ्वीच्या ध्रुवीय कक्षेत स्थापित करण्यात आले. या प्रक्षेपणात अनेक तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला.

मोहिमेतून काय साध्य?

या मोहिमेची खासियत म्हणजे एकाच वेळी 15 उपग्रह सोडण्याची क्षमता, ज्यात पृथ्वी निरीक्षण, अवकाशात इंधन भरणे, एआय डेटा प्रोसेसिंग आणि हलके दूर्बीण तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ही मोहीम व्यावसायिकदृष्ट्या ‘स्पेस सायबर कॅफे’सारखी आहे. ज्यात एआय प्रोसेसिंगसाठी प्रति मिनिट 2 डॉलर (सुमारे 180 रुपये) भाडे आकारले जाते. याशिवाय अवकाशातील कचरा कमी करण्यासाठी आणि उपग्रहांच्या आयुष्य वाढवण्यासाठी नवीन तंत्र विकसित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

मोहिमेची मुख्य उद्दिष्ट्य काय?

मोहिमेचा मुख्य हेतू पृथ्वी निरीक्षणासाठी उपग्रह स्थापित करणे, अवकाशात इंधन भरणे आणि डॉकिंगची चाचणी घेणे, रिअल-टाइम डेटा विश्लेषण करणे आणि भूभाग नकाशा तयार करणे आहे. याशिवाय उपग्रहांचे आयुष्य वाढवणे, अवकाश कचरा कमी करणे, पुनःप्रवेश तंत्रज्ञानाची चाचणी आणि संचार प्रणाली विकसित करणे हे उद्दिष्ट आहे.

महत्वाचे उपग्रह आणि पेलोड

मोहिमेत EOS-N1 (अन्वेषा) नावाचा DRDO विकसित उपग्रह आहे, जो हायपरस्पेक्ट्रल इमेजिंगद्वारे शेती, माती, खनिज आणि पर्यावरण बदलांचे तपशीलवार विश्लेषण करतो. AayulSAT हा ऑर्बिटेड एरोस्पेसचा उपग्रह अवकाशात इंधन भरण्याची पहिली चाचणी करतो. MOI-1 हा हैदराबादच्या स्टार्टअपचा उपग्रह एआय इमेज लॅब आहे, ज्यात 502 ग्रॅम वजनाचे जगातील सर्वात हलके दूरबीन आहे. इतर उपग्रहांमध्ये नेपाळचा मुनल (भूभाग नकाशा), स्पेनचा केस्ट्रेल (पुनःप्रवेश चाचणी), इंडो-मॉरिशस संयुक्त उपग्रह, ब्राझीलचा अल्डेबरान-1 (समुद्री बचाव) आणि ध्रुव स्पेसचे लाचित आणि थायबोल्ट-3 (संचार चाचणी) यांचा समावेश आहे. याशिवाय, ‘ऑर्बिटल टेम्पल’मध्ये 14000 नावे अवकाशात संरक्षित आहेत.

मोहिमेचे महत्व 

या मोहीमेमुळे भारताची नवीन आणि विश्वसनीय अवकाश केंद्र म्हणून ओळख आणखी मजबूत झालीय. ज्यात स्टार्टअप, संरक्षण संस्था आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांचा सहभाग आहे. विविध देश आणि संस्थांशी सहकार्य करून तंत्रज्ञान विकासाला चालना मिळते. ही मोहीम अवकाश क्षेत्रातील भारताच्या वाढत्या प्रभावाचे उदाहरण आहे, ज्यात खर्च कमी करून जागतिक ग्राहकांना सेवा पुरवली जाते.





Source link

पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; एकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सातारामधील घटनेनं महाराष्ट्र रडला!

0


Pramod Jadhav Satara: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; ऐकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सोलापूरमधील घटनेनं महाराष्ट्र रडला!

पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; ऐकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सोलापूरमधील घटनेनं महाराष्ट्र रडला!



Source link

विद्यार्थ्यांनी धम्मसंस्कारासोबत शिक्षणावर ही लक्ष केंद्रित करावे – सोमीनाथ घोरपडे

0
विद्यार्थ्यांनी धम्मसंस्कारासोबत शिक्षणावर ही लक्ष केंद्रित करावे – सोमीनाथ घोरपडे


फलटण : सोमवार पेठ, फलटण येथे लहान मुला-मुलींसाठी संस्कार वर्ग उत्साहात संपन्न झाला. या संस्कार वर्गात भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव व प्रमुख धम्म प्रचारक सोमीनाथ घोरपडे यांनी मार्गदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी धम्म संस्कारासोबतच आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. धम्म म्हणजे निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग आहे आणि हे जगण्यासाठी आपल्याला उच्च शिक्षणाची सुद्धा गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी सोमीनाथ घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना धम्माचे मूलभूत विचार सोप्या व सहज भाषेत समजावून सांगितले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरु भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले आणि संत कबीर यांच्या विचारांचा बाबासाहेबांच्या जीवनावर व विचारसरणीवर कसा प्रभाव होता, याविषयी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. बाबासाहेबांनी या तिघांना गुरु का मानले, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान संत कबीर यांच्या जीवनातील एका प्रसंगाचा संदर्भ देत समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. अंधश्रद्धा, रूढी-परंपरा यांना नकार देत विवेक, तर्क आणि मानवतावादी विचार स्वीकारण्याचा संदेश त्यांनी मुलांना दिला.
या संस्कार वर्गात लहान बालक-बालिकांना सुत्त पठण, वंदना, तसेच भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गोष्टी सांगण्यात आल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये नैतिक मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी विचार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या संस्कार वर्गाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे कार्यालयीन सचिव आयुष्यमान चंद्रकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या आग्रहास्तव सुरू करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना त्रिसरण-पंचशील यांचे महत्त्व समजावून सांगितले तसेच पंचांग प्रणामाचे महत्त्व स्पष्ट केले.
या उपक्रमासाठी प्रदीप खरात, विशाल शिंदे, विकी भोसले, प्रकाश शिलवंत व वाघमारे परिवार यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच शिंदे परिवार, खरात परिवार यांच्यासह सोमवार पेठ परिसरातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संस्कार वर्गामुळे परिसरातील पालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यातही असे संस्कारात्मक व धम्मप्रेरित उपक्रम नियमितपणे राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.

सौ.वैशाली कांबळे अविष्कार फाउंडेशनच्या राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार 2026 या पुरस्काराने सन्मानित

0
सौ.वैशाली कांबळे अविष्कार फाउंडेशनच्या राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार 2026 या पुरस्काराने सन्मानित

फलटण: फलटण एज्युकेशन सोसायटीचे मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण येथील उपक्रमशील शिक्षिका सौ. वैशाली संदीप कांबळे यांना अविष्कार फाउंडेशनच्या राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आदरणीय सुरेश खराते यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

सौ.वैशालीताई कांबळे या एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याबरोबरच सामाजिक कार्यात ही त्या अग्रेसर असतात.त्यांच्या निंबळक गावातील महिलांना त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून शिलाई मशीन वाटप करणे,त्यांना विविध प्रकारची प्रशिक्षणे देणे, विविध शासकीय योजनांचे लाभ विनामूल्य मिळवून देणे अशा स्वरूपाचे काम चालू आहे. त्यांच्या या सर्व शैक्षणिक, सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम,मुख्याध्यापक श्री. काळे, उपमुख्याध्यापक श्री. माडकर , सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी वर्ग, निंबळक गावचे ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

दररोज 10K पाऊलं चालणे फायदेशीर, पण कसे चालता हे जास्त महत्त्वाचं; कोचने सांगितले 3 स्मार्ट टिप्स

0
दररोज 10K पाऊलं चालणे फायदेशीर, पण कसे चालता हे जास्त महत्त्वाचं; कोचने सांगितले 3 स्मार्ट टिप्स


दररोज चालणे अविश्वसनीयपणे फायदेशीर आहे. आरोग्य तज्ञ आणि डॉक्टर दोघेही सहमत आहेत की दररोज १०,००० पावले चालणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे केवळ मृत्युदर कमी होत नाही तर हृदयाचे आरोग्य, चयापचय आणि तंदुरुस्ती सुधारते. तथापि, जीवनशैली प्रशिक्षक ल्यूक कौटिन्हो म्हणतात की तुम्ही दररोज किती पावले उचलता हे जास्त महत्त्वाचे नाही तर तुम्ही कसे चालता हे जास्त महत्त्वाचे आहे.

Add Zee News as a Preferred Source

जीवनशैली प्रशिक्षक ल्यूक कौटिन्हो यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, “चालणे खूप चांगले आहे, पण जर ते आणखी चांगले केले तर काय होईल?” त्यांनी स्पष्ट केले की वेग, दिशा, कल किंवा हलके वजन वाढवणे यासारखे छोटे बदल तुमच्या चालण्याला पूर्णपणे बदलू शकतात. यामुळे केवळ कॅलरी बर्न वाढत नाही तर स्नायूंची क्रिया, हृदयाची प्रतिक्रिया आणि सांधे यांचे आरोग्य देखील सुधारते.

इंटरवल वॉकिंग

इंटरवल वॉकिंग म्हणजे सामान्य गतीने 1-2 मिनिटे चालणे, त्यानंतर १ मिनिट वेगाने चालणे. हे 20-30 मिनिटे पुन्हा करा. यामुळे हृदय मजबूत होते, चयापचय वाढतो, चरबी जाळण्याचे प्रमाण 2-3३ पट वाढते आणि मानसिक लक्ष केंद्रित होते.

इनक्लाइन वॉकिंग

झुकाव चालण्यासाठी, उतारावर चालणे किंवा ट्रेडमिलवर 5-10 % उतार सेट करा. यामुळे नितंब, हॅमस्ट्रिंग आणि वासरांना बळकटी मिळते, ज्यामुळे अधिक कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तथापि, झुकताना पुढे झुकू नका याची काळजी घ्या; सरळ पवित्रा ठेवा.

उलट चालणे

उलट चालण्याचे देखील अनेक आरोग्य फायदे आहेत. उलट चालण्याचा सराव करण्यासाठी, सुरक्षित ठिकाणी हळू हळू मागे चाला. यामुळे गुडघे मजबूत होतात, संतुलन सुधारते आणि पुनर्वसनासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हे करण्यासाठी, सुरुवातीला आधारासाठी रेलिंग वापरा, नंतर हळूहळू आधाराशिवाय ते स्वतःहून करायला सुरुवात करा.

10000 पावले चालण्याचे फायदे:

१. हृदयाचे आरोग्य सुधारते: नियमित चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
२. वजन नियंत्रण: दररोज 10000 पावले चालल्याने सुमारे 300 ते 500 कॅलरीज जळतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास किंवा टिकवून ठेवण्यास मदत होते.
३. मानसिक आरोग्य: चालण्यामुळे शरीरात ‘एंडोर्फिन’ (Endorphins) सारखी आनंदी संप्रेरके तयार होतात, ज्यामुळे ताण, चिंता आणि नैराश्य कमी होते.
४. हाडे आणि स्नायू मजबूत होतात: यामुळे सांध्यांची लवचिकता वाढते आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
५. रक्तातील साखर नियंत्रित राहते: मधुमेहाच्या रुग्णांसाठी चालणे हे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते





Source link

बटाटा खाल्याने वजन वाढते, हे मिथक आहे की सत्य? तज्ज्ञांकडून जाणून घ्या नेमके उत्तर

0
बटाटा खाल्याने वजन वाढते, हे मिथक आहे की सत्य? तज्ज्ञांकडून जाणून घ्या नेमके उत्तर


Eating Potato Can Lead To Weight Gain: आजकाल सर्वजण  आरोग्य आणि वजनाच्या बाबतील अधिक जागरूक झाले आहेत. प्रत्येकाला एक चांगले आरोग्य आणि सिक्स पॅक अ‍ॅब्स हवे असतात. वजन कमी करण्यासाठी डाएटिंग सुरू करताना बरेचजण त्यांच्या आहारातून बटाटा पूर्णपणे वर्ज करतात. कारण त्यांच्या मते बटाटा खाल्याने वजन अधिक वाढते. काहीवेळेला आई सुद्धा म्हणते “जास्त बटाटा खाऊ नकोस, नाहीतर बटाट्यासारखी जाड होशील!”. तसेच मधुमेहाची समस्या असलेले व्यक्तीही बटाटा खाल्यास रक्तातील साखर वाढेल  या भीतीने बटाटा खाणे टाळतात. पण खरंच बटाटा खाल्याने वजन किंवा रक्ताताली साखर वाढते? असा प्रश्न तुम्हालाही कधी न कधी पडला असेल. चला तर मग तुमच्या या आणि यांसारख्या अनेक प्रश्नाचे नेमके उत्तर आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

 

बटाट्यामध्ये फक्त कॅलरीज असतात का? 

कोणत्याही भाजीत बटाटा वापरला तरी तो चविष्टच लागतो. ‘आज कोणती भाजी बनवायची?’ या प्रश्नाचा खोल विचार केला तरी, शेवटचा पर्याय म्हणून ताटात बटाट्याची भाजीच वाढली जाते. बऱ्याचदा असेल मानले जाते की, बटाट्यात कोणतेही पौष्टिक गुणधर्म नसतात. पण तज्ज्ञ सागंतात की, मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. खरे तर, बटाट्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक फायबर असते आणि कॅलरीज कमी प्रमाणात असतात. बटाट्यात विटॅमिन सी, बी6 आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. म्हणजेच बटाट्यात फक्त कार्ब्स किंवा स्टार्च नाही तर, अनेक पौष्टिक घटकही असतात. 

 

बटाटा खाल्याने वजन वाढते का?

बटाटा खाल्याने वजन वाढते हे की नाही,  हे बटाट्याच्या शिजवण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. बजारात बटाट्यापासून बनलेले अनेक पदार्थ उपलब्ध असतात. बटाटा वापरून फ्रेंच फ्राइज, कटलेट, बटाटा वडा असे अनेक तेलकट जंक फूड बनवले जातात. हे सर्व पदार्थ डिप फ्राय केले जातात. त्यामुळे त्यात कॅलरी आणि निरोगी फॅटचे प्रमाण वाढते. पण तोच बटाटा जर तुम्ही उकडवून, भाजून किंवा ग्रील करून खाल्ला तर, त्यातील कॅलरीजचे प्रमाण आहे तेवढेच राहते. म्हणूनच तज्ज्ञांच्या मते तुमचे वजन बटाटा खाल्याने नाही तर, चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे वाढते. 

 

मधुमेहाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी बटाटा खाणे टाळावे का?

बटाट्यात रक्तातील साखर वाढवणारे ग्लाइसेमिक इेंडेक्स असते. पण बटाटा उकडवल्याने त्यातील स्टार्चचे रूपांतर रेसिस्टेंट स्टार्चमध्ये होते. जे शरीरासाठी फायबर प्रमाणे काम करते.  ज्यामुळे रक्तातील साखर जलद गतीने वाढत नाही. तसेच प्रोटीन आणि फायबर असलेल्या भाज्यांसह बटाटा खाल्ला तर शुगर स्पाइक होण्याची  शक्यता कमी होते. जे मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर मानले जाते. 

 

बटाट्यामध्ये असलेले कार्ब्स आरोग्यासाठी फायदेशीर नसतात का?

बऱ्याचवेळा वजन कमी करण्यासाठी अनेकजण त्यांच्या आहारातून कार्ब्स पूर्णपणे वर्ज करतात. पण तज्ज्ञांच्या मते आहारातून कार्ब्स पूर्णपणे काढून टाकल्यास आरोग्यास धोकादायक ठरू शकते. असे केल्यास शरीराला पुरेशी ऊर्जा मिळणार नाही. ज्यामुळे अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. बटाट्यामध्ये असलेले कॉम्पलेक्स कार्ब्स आणि फायबर शरीराला ऊर्जा पुरवण्याचे कार्य करतात. लंडन आणि अमेरिकेतही लोक अनेकवेळा सकाळच्या नाश्त्यात उकडलेला बटाटा आणि ब्रेड खाणे पसंत करतात. 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link