Tuesday, June 30, 2026
Home Blog Page 61

लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून पहिल्याच प्रजासत्ताक दिनी समशेर नाईक निंबाळकर यांचा फलटणकरांना विकासाचा संदेश

0
लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून पहिल्याच प्रजासत्ताक दिनी समशेर नाईक निंबाळकर यांचा फलटणकरांना विकासाचा संदेश

फलटण प्रतिनिधी उमेश काकडे  : माननीय उपस्थित मान्यवर,
फलटण नगर परिषदेचे सन्माननीय सदस्य, अधिकारी–कर्मचारी,
माझ्या प्रिय फलटणकर माता-भगिनींनो, बांधवांनो आणि देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थी मित्रांनो,
आज आपण सर्वजण आपल्या भारत देशाच्या प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन अत्यंत अभिमानाने साजरा करत आहोत.
हा दिवस आपल्याला संविधानाची ताकद, लोकशाहीचे मूल्य आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी यांची आठवण करून देतो.
या पवित्र दिवशी मी स्वातंत्र्यलढ्यातील सर्व शहीदांना व छत्रपती शिवाजी महाराज तसेच राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सर्वच महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो.
माझ्या प्रिय फलटणकरांनो,
आज या मंचावर लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून उभा राहताना मला अभिमान वाटतो. हा माझा वैयक्तिक सन्मान नसून, फलटणच्या जनतेने लोकशाहीवर दाखवलेल्या विश्वासाचा हा सन्मान आहे.
प्रजासत्ताक दिन आपल्याला अधिकार देतो, पण त्याचबरोबर जबाबदारीही देतो.
फलटण शहराचा सर्वांगीण, समताधिष्ठित आणि शाश्वत विकास हेच माझ्या कार्यकाळाचे मुख्य ध्येय राहील.
फलटणच्या विकासासाठी आमची स्पष्ट भूमिका –
▪️ स्वच्छ व आरोग्यदायी शहर – स्वच्छता, पाणीपुरवठा व आरोग्य सेवांवर भर
▪️ मजबूत पायाभूत सुविधा – दर्जेदार रस्ते, प्रकाशव्यवस्था व मूलभूत सुविधा
▪️ तरुण व महिलांना संधी – रोजगार, कौशल्य विकास व महिला सक्षमीकरण
▪️ पारदर्शक प्रशासन – जनतेसाठी, जनतेसोबत चालणारी नगर परिषद
▪️ सर्वसमावेशक विकास – कोणताही भेदभाव न करता प्रत्येक घटकाला न्याय
माझ्या प्रिय नागरिकांनो,
फलटण हे केवळ शहर नाही, ती आपली ओळख आहे, आपला अभिमान आहे.
या शहराच्या प्रगतीसाठी आपला सक्रिय सहभाग हाच खरा विकासाचा पाया आहे.
आज प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांनी एक संकल्प घेऊया —
➡️ संविधानाचे पालन करू
➡️ शहर स्वच्छ ठेवू
➡️ कायद्याचा सन्मान करू
➡️ आणि फलटणला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेऊ
शेवटी,
मी तुम्हा सर्वांना खात्री देतो की,
फलटणच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे, निःपक्षपातीपणे आणि पूर्ण ताकदीने काम करेन.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
आपलाच
श्री.समशेर हिंदुराव नाईक निंबाळकर

गणेश नाईक म्हणाले, त्यांचे नामोनिशाण संपवून टाकू; मंत्री शंभुराज देसाईंचाही आक्रमक पलटलवार

0


सातारा: महायुतीत एकत्रित असूनही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय वाद चव्हाट्यावर येत आहे. गणेश नाईक यांनी महापालिका निवडणुकांवेळी एका मुलाखतीत एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला होता, आता पुन्हा एकदा नाईक यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय. मी आज परत बोलतो आहे, भाजपाने परवानगी दिली, तर त्यांचे नामोनिशाण संपवून टाकू असे गणेश नाईक (Ganesh naik) यांनी म्हटले होते. त्यावरुन, आता शिवसेना नेत्यांकडून पलटवार केला जात आहे. आधी मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केल्यानंतर आता मंत्री शंभुराज देसाईंकडूनही (Shambhujraj desai) गणेश नाईकांना आक्रक शैलीत इशारा देण्यात आला आहे. 

भाजपाने परवानगी दिली, तर त्यांचे नामोनिशाण संपवून टाकू, मी आज परत बोलतो आहे. मात्र, भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष आहे. पक्षाने आदेश दिला म्हणून आम्ही ते मान्य केले. मनाला पटले नसले तरीही कार्यकर्त्यांनी सहन केले. पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य केला, अशा शब्दात गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला होता. आता, नाईक यांच्या टीकेला शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलं आहे. गणेश नाईक यांनी केलेल्या टीकेवर शिवसेना नेते तथा मंत्री शंभुराज देसाई यांनीही आक्रमक शैलीत पलटवार केला आहे. राजकारणात कोणीच कोणाला कमी नसते, एखाद्याला संपवायची भाषा केली तर बाकीचे हाताची घडी घालून बसत नाहीत. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा आमची भूमिका घेणार, आमचा पक्ष सुद्धा तोडीस तोड उत्तर देणार, अशा शब्दात शंभुराज देसाई यांनी मंत्री गणेश नाईक यांच्या टीकेला प्रत्त्युतर दिलं आहे. 

पद्म पुरस्कार व महाराष्ट्राचा सन्मान

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यावरुन विचारलेल्या प्रश्नावरही शंभुराज देसाई यांनी उत्तर दिलं.  
केंद्र सरकारच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या “महाराष्ट्राचा सन्मान” मोहिमेअंतर्गत पद्म पुरस्कार माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात. पद्म पुरस्कार हे कोणत्याही राजकीय शिफारशीवर नव्हे, तर संबंधित व्यक्तींच्या आयुष्यभराच्या कार्याचा, सामाजिक योगदानाचा आणि राष्ट्रासाठी केलेल्या सेवेचा सखोल अभ्यास करून दिले जातात. या पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या ज्येष्ठ मान्यवरांवर राजकीय टीका करणे हे महाराष्ट्राच्या सन्मानालाच धक्का देणारे आहे, असेही शंभुराज देसाई यांनी म्हटले. 

हेही वाचा

गणेश नाईक तुमचं जास्त होतंय, कोणाला साफ करण्याची भाषा करताय? एकनाथ शिंदेंमुळे तुम्ही…. संजय शिरसाटांचा नाईकांवर पलटवार

आणखी वाचा



Source link

फलटण नगर परिषदेचा मुख्य ध्वजारोहण समारंभ उत्साहात साजरानगराध्यक्ष समशेरशिंह नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन

0
फलटण नगर परिषदेचा मुख्य ध्वजारोहण समारंभ उत्साहात साजरानगराध्यक्ष समशेरशिंह नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन


फलटण | भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त फलटण नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभात नगराध्यक्ष श्री. समशेरशिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
समारंभानंतर उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष म्हणाले की, प्रजासत्ताक दिन हा आपल्या संविधानाची ताकद, लोकशाही मूल्ये आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये यांची आठवण करून देणारा पवित्र दिवस आहे.
यावेळी त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सर्व शहीदांना, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुषांना अभिवादन केले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून उभे राहताना हा सन्मान वैयक्तिक नसून फलटणकरांनी लोकशाहीवर दाखवलेल्या विश्वासाचा सन्मान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फलटण शहराचा सर्वांगीण, समताधिष्ठित व शाश्वत विकास हेच आपल्या कार्यकाळाचे मुख्य ध्येय राहील, असे त्यांनी सांगितले.
शहराच्या विकासासाठी स्वच्छता व आरोग्य सेवांना प्राधान्य, दर्जेदार रस्ते व भक्कम पायाभूत सुविधा, तरुण व महिलांसाठी रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी, पारदर्शक प्रशासन तसेच कोणताही भेदभाव न करता सर्वसमावेशक विकासावर भर देण्याची ग्वाही नगराध्यक्षांनी दिली.
फलटण हे केवळ शहर नसून प्रत्येक नागरिकाची ओळख व अभिमान आहे, असे सांगत शहराच्या प्रगतीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
समारोप करताना प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांनी संविधानाचे पालन करणे, शहर स्वच्छ ठेवणे, कायद्याचा सन्मान करणे आणि फलटणला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन नगराध्यक्षांनी केले.

तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रोज कृतज्ञतेने स्मरण करा – भंते काश्यप

0
तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रोज कृतज्ञतेने स्मरण करा – भंते काश्यप

तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रोज कृतज्ञतेने स्मरण करा – भंते काश्यप

फलटण : मानवी जीवन हे क्षणभंगुर, अनित्य आणि परिवर्तनशील आहे. जन्म, जरा, व्याधी व मरण या चार अनिवार्य सत्यांच्या कक्षेतच मानवाचे जीवन फिरते. म्हणूनच भय, राग, द्वेष, लोभ व अज्ञान यात जीवन घालवण्याऐवजी तथागत बुद्धांनी दाखविलेल्या धम्ममार्गावर चालणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भंते काश्यप यांनी केले.
भगवान बुद्धांनी मानवाला वास्तवाचे दर्शन घडवण्यासाठी अनिच्च, दुक्ख आणि अनत्ता ही त्रिसूत्री दिली. या तत्वांचे आकलन झाल्यावर मनातील अहंकार, आसक्ती व भीती आपोआप नष्ट होते. यासंदर्भात त्यांनी पुढील पाली गाथेचा उल्लेख केला-
“सब्बे संखारा अनिच्चा,
यदा पञ्ञाय पस्सति ।
अथ निब्बिन्दति दुक्खे,
एसा मग्गो विसुद्धिया ॥”
“सर्व संयोगी गोष्टी अनित्य आहेत, हे जेव्हा मनुष्य प्रज्ञेने पाहतो, तेव्हा तो दुःखापासून विरक्त होतो. हाच शुद्धीचा व मुक्तीचा मार्ग आहे.”

आज मानवाच्या मनात जी भीती आहे ती वास्तवातून नव्हे, तर अज्ञानातून निर्माण झाली आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड, भूतभान, अमंगल समजुती यामुळे मन अधिकच अस्थिर होते. बुद्धांनी अशा सर्व अज्ञानाधारित समजुतींना नाकारून विवेक, प्रज्ञा आणि अनुभवाधारित सत्यावर भर दिला. म्हणूनच धम्म हा वैज्ञानिक, तार्किक आणि मानवी कल्याणावर आधारित आहे, असे भंते काश्यप यांनी स्पष्ट केले.
मन हे चंचल आहे. चित्त विचलित झाले की कामना, कल्पना व अस्थिर विचार उत्पन्न होतात. यामुळे अस्वस्थता वाढते आणि झोपेतही स्वप्नांच्या रूपाने मन सक्रिय राहते. यावर उपाय म्हणून तथागत बुद्धांनी समथा व विपश्यना ध्यान सांगितले. ध्यानाने चित्त एकाग्र होते, शुद्ध होते आणि अंतर्मन शांत होते.
मनाच्या स्वरूपावर प्रकाश टाकणारी पुढील पाली गाथा याठिकाणी महत्त्वाची ठरते-

“चित्तं दन्तं सुखावहं,
चित्तं रक्खेथ मेधावी ।
दुन्निग्गहस्स लाहू,
यतो कामो निग्गहो ॥”

“संयमित मन सुख देणारे असते. ज्ञानी व्यक्तीने आपल्या मनाचे रक्षण करावे, कारण असंयमित मन अत्यंत कठीण असते आणि ते दुःख निर्माण करते.”

सुख हे बाह्य साधनांमध्ये नाही, तर अंतर्मनाच्या शुद्धतेत आहे. शील, समाधी व प्रज्ञा या त्रिशिक्षणावर आधारित जीवनच खरे मंगल जीवन ठरते. ध्यान ही केवळ क्रिया नसून आत्मपरिक्षणाची, आत्मशुद्धीची आणि मुक्तीची प्रक्रिया आहे, असे भंते काश्यप यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत बुद्धांचा हाच करुणा, विवेक आणि प्रज्ञेवर आधारित धम्म आधुनिक मानवासाठी पुनरुज्जीवित केला. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी माणसाला अंधश्रद्धेपासून मुक्त करून आत्मसन्मान, समता व मानवतेचा मार्ग दाखविला.
या संदर्भात अत्त दीप भव या बुद्धवचनाचे महत्त्व अधोरेखित करताना भंते काश्यप म्हणाले-
“अप्प दीपो भव, अप्प सरणो भव ।
धम्म दीपो भव, धम्म सरणो भव ॥”
“स्वतःच स्वतःचा दीप बना, स्वतःच स्वतःचा आधार बना. धम्मालाच दीप माना आणि धम्मालाच शरण जा.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला धम्म म्हणजे पलायन नव्हे, तर संघर्षातून मुक्तीकडे जाणारा मार्ग आहे. त्यामुळे रोज ध्यानसाधना करा, मनातील भीती व अज्ञान दूर करा आणि तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कृतज्ञतेने स्मरण करून त्यांच्या विचारांप्रमाणे जीवन जगा. तरच खऱ्या अर्थाने सुख, शांतता व समाधान आपल्या आयुष्यात स्थिरावेल, असे आवाहन भंते काश्यप यांनी केले.

भगवान बुद्धांनी कधीही अंधश्रद्धा किंवा आंधळा विश्वास शिकवला नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले की
धम्म हा फक्त ऐकण्यासाठी नसून, अनुभवण्यासाठी आहे. म्हणूनच धम्माचे तीन टप्पे सांगितले जातात-
श्रवण (ऐकणे) – धम्मदेशना ऐकणे, मनन-चिंतन (विचार करणे) – ऐकलेल्या धम्माचा अर्थ समजून घेणे. आचरण (प्रयोगात आणणे) – जीवनात उतरवणे. जो धम्म ऐकतो पण आचरण करत नाही, त्याला परिवर्तन होत नाही. आणि जो आचरण करतो, त्यालाच मुक्तीचा अनुभव येतो.
निब्बाण म्हणजे काय? निब्बाण हा शब्द अनेकदा चुकीच्या अर्थाने समजला जातो. निब्बाण म्हणजे मृत्यू नाही, स्वर्ग नाही, आत्म्याचा नाश नाही.
निब्बाण म्हणजे राग, द्वेष आणि मोह यांचा पूर्ण निरोध, तृष्णेचा (तन्हा) अंत, दुःखाच्या कारणांचा अंत. बुद्धांच्या भाषेत- “तन्हा क्षय होणे हाच निब्बाण आहे.”निब्बाण ही मानसिक अवस्था आहे. जिथे-
मनात आसक्ती नाही, द्वेष नाही, भीती नाही, अज्ञान नाही, निब्बाण प्राप्त व्यक्ती जिवंत असतानाच दुःखमुक्त होते. तो जगतो, वागतो, बोलतो—पण बंधनात अडकत नाही. बुद्धांनी निब्बाणाबद्दल सांगितले -निब्बाण म्हणजे शांतता (शांति), निब्बाण म्हणजे वैराग्य, निब्बाण म्हणजे मुक्ती. मग महापरिनिब्बाण म्हणजे काय?
महापरिनिब्बाण म्हणजे- पूर्णपणे शरीराचा अंत झाल्यानंतरची अवस्था जेव्हा एखादी व्यक्ती- जिवंतपणीच निब्बाण प्राप्त करते, सर्व कर्मबंध तोडते
पुनर्जन्माचे बीज नष्ट करते, आणि नंतर तिचे शरीर नष्ट होते, तेव्हा ती अवस्था महापरिनिब्बाण म्हणतात.
सोप्या शब्दांत फरक- निब्बाण महापरिनिब्बाण जिवंत असतानाच प्राप्त शरीर नष्ट झाल्यावर दुःखातून मुक्त मन पुनर्जन्माचा पूर्ण अंत बुद्ध व अरहंतांनी अनुभवलं बुद्धांचे अंतिम निर्वाण भगवान बुद्धांनी कुशीनगर येथे देहत्याग केला,
तो प्रसंग म्हणजेच महापरिनिब्बाण. बुद्धांचा अंतिम संदेश (महत्त्वाचा!) भगवान बुद्धांचे शेवटचे शब्द होते – “वयधम्मा संखारा, अप्पमादेन संपादेथ.”
“सर्व संयोगी वस्तू नाशवंत आहेत.”
प्रमाद न करता, जागरूकतेने स्वतःची मुक्ती साधा.
हा संदेश सांगतो – कुणीही आपल्याला वाचवणार नाही. मुक्ती स्वतःच्या आचरणातूनच मिळते

धम्म ऐकणे पुरेसे नाही. त्यावर मनन, चिंतन आणि आचरण आवश्यक आहे. निब्बाण म्हणजे पलायन नाही, तर जागरूक जीवन महापरिनिब्बाण म्हणजे पुनर्जन्माचा पूर्ण अंत. धम्म हा ग्रंथात नाही, तर जगण्यात आहे. आचरणातच निब्बाणाचा मार्ग आहे.

ही धम्मदेसना भीमराव लोंढे सर व विठ्ठल निकाळजे सर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा पूर्व चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, संस्कार सचिव अमोल काकडे, स्नेहल जगताप, मनिषा जगताप, कमल सोनवले, रजनी माने, प्रसन्नजीत लोंढे, पराग लोंढे, प्रफुल्लता लोंढे, सुहास माने, भारतीय बौद्ध महासभा राज्याचे संघटक तथा समता सैनिक दलाचे असिस्ट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल बाबुराव निकाळजे सर, आयु.अरविंद आपासो काकडे, भाग्यश्री विठ्ठल निकाळजे, सीता दादासाहेब भोसले, शोभा अरविंद काकडे, सागर दादासाहेब भोसले, विजय विठ्ठल निकाळजे, अजय विठ्ठल निकाळजे उपस्थित होते.

Satara : मोठी बातमी! कोंबड्याच्या शेडमधून 55 कोटींच्या ड्रग्जसह हजारो कोटींचा कच्चा माल जप्त

0


Satara Crime News : कराडच्या (Karad) पाचपुतेवाडी येथे पुण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (डीआरआय विभागाने) मोठी कारवाई केली असल्याचे समोर येत आहे. डीआरआय विभागाने ड्रग्स (Drugs Case) बनवले जात असलेले कोंबड्यांचे शेड सील केल असून याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या बाबा मोरे याला ताब्यात घेतला आहे. या ठिकाणाहून डीआरआय (DRI) पथकाने अंदाजे 55 कोटीचा अमली पदार्थ तयार करण्याचा कच्चा माल व साहित्य ताब्यात घेतले असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे. (Satara Drugs Case)

दरम्यान, ही कारवाई एनडीपीएस कायद्यानुसार करण्यात आल्यानं ड्रग्जवर कारवाई झाल्याची चर्चा आहे. सातारा जिल्ह्यात महिन्यात दुसरी कारवाई झाली आहे. डिसेंबरमध्ये मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापेमारी करत ड्रग्ज जप्त केलं होतं. डीआरआय विभागानं केलेल्या कारवाईबाबत सातारा पोलीसही अनभिज्ञ असल्याची माहिती आहे. कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या DRI म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली असल्याचे समोर येत आहे.

Satara Drugs Case : तब्बल 55 कोटीचा ड्रस तयार, हजारो कोटी रुपयांचा कच्चा माल जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यापासून या ठिकाणी ड्रग्स तयार केलं जात होतं. सध्या 55 कोटीचा ड्रस हा तयार होता आणि हजारो कोटी रुपयांचा कच्चा माल या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. कच्चामालातून एमडी ड्रग्स बनवला गेला असता तर हजारो रुपयांचा ड्रग्स तयार झाला असता. वेळीच पुण्यातील DRI विभागाच्या पथकाने या शेडवर धाड टाकून मोठा ड्रग्सचा साठा ताब्यात घेतला आहे.

Karad Drugs Case: कारवाईसाठी थेट गुजरात आणि हैदराबादवरून पथक कराडमध्ये

दरम्यान, नक्की या ठिकाणी कोणतं अमली पदार्थ तयार केलं जात होतं याबाबत सातारा जिल्ह्यात उलट सुलट चर्चा सुरू असून या कारवाईची माहिती सातारा आणि कराड पोलिसांना नसल्याचेही समोर येत आहे. तर कारवाईसाठी आलेले पथक हे गुजरात व हैदराबाद वरून आल्याचं समजत असून एकूण कारवाई विषयी कुठलीही अधिकृत माहिती दिली जात नाही. परिणामी तपासाअंती या प्रकरणाचीअधिकृत माहिती कळू शकणार आहे. मात्र या घटनेने परिसर एकच खळबळ उडाली असून तपासात नेमकं काय सत्य बाहेर येतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा

जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश

आणखी वाचा



Source link

भारतात दुर्मिळ धातूचा महाप्रचंड खजिना सापडला! 63.5 लाख टन साठा, चीनची मक्तेदारी मोडणार

0
भारतात दुर्मिळ धातूचा महाप्रचंड खजिना सापडला! 63.5 लाख टन साठा, चीनची मक्तेदारी मोडणार


Rare earth mine : भारताला मोठा जॅकपॉट लागला आहे.   कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेटे प्रदेशात 6.35 दशलक्ष टन दुर्मिळ पृथ्वी घटक (REEs) आणि यट्रियमचे प्रचंड साठे आढळले आहेत. हा शोध BHU येथील पृथ्वी विज्ञान विभागातील शास्त्रज्ञांनी लावला आहे. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (GSI) च्या प्राथमिक अंदाजांचे समर्थन आहे.
स्मार्टफोन, इलेक्ट्रिक वाहने, संरक्षण उपकरणे, एरोस्पेस, पवन टर्बाइन आणि हरित ऊर्जा यासारख्या आधुनिक उद्योगांमध्ये दुर्मिळ पृथ्वी घटकांचा वापर केला जातो. सध्या, भारत आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, विशेषतः चीनकडून. भारताला तांत्रिक आणि धोरणात्मकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी हा शोध महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

Add Zee News as a Preferred Source

बीएचयूच्या भूगर्भशास्त्र विभागाचे डॉ. रोहित पांडे यांनी सांगितले की, गुंडलुपेट प्रदेशात एक दुर्मिळ कार्बोनेटाइट-सायनाइट अग्निजन्य संकुल आढळले आहे. हा प्रदेश अंदाजे 2.5 अब्ज वर्षे जुना आहे, जो पृथ्वीवरील जीवनाची सुरुवात नुकतीच झाली होती त्या काळापासूनचा आहे. या संशोधनात अत्याधुनिक युरेनियम-लीड (U-Pb) डेटिंग तंत्रांचा वापर करण्यात आला, ज्यामुळे खडकांचे वय आणि उत्पत्ती अचूकपणे निश्चित करणे शक्य झाले.

संशोधनानुसार, या प्रदेशात भूगर्भीय क्रियाकलाप दोन टप्प्यात घडले. पहिल्या टप्प्यात, सुमारे 2.59 अब्ज वर्षांपूर्वी, गुलाबी सायनाइट खडकांची निर्मिती झाली. दुसऱ्या टप्प्यात, सुमारे 120 दशलक्ष वर्षांनंतर, पांढऱ्या कार्बोनेटाइट खडकांचा परावर्तित झाला. गुंडलुपेट प्रदेशात सेरियम, लॅन्थॅनम, निओबियम आणि फॉस्फरससारखे दुर्मिळ पृथ्वी घटक आढळले आहेत. जे भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा आणि प्रगत तंत्रज्ञानासाठी आवश्यक आहेत. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनात बीएचयूचे डॉ. रोहित पांडे आणि संशोधक डॉ. महेंद्र कुमार सिंग यांच्यासह भूगर्भीय सर्वेक्षण ऑफ इंडियाचे समीर देबनाथ, तिरुवनंतपुरम येथील राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान अभ्यास केंद्राचे डॉ. एन.व्ही. चलपती राव, डब्लिन, आयर्लंड येथील ट्रिनिटी कॉलेजचे डॉ. डेव्हिड च्यू आणि रशियातील कार्पिन्स्की भूगर्भीय संशोधन संस्थेचे डॉ. बोरिस बेल्यात्स्की यांचा समावेश होता. हे संशोधन नुकतेच नेदरलँड्सच्या एल्सेव्हियर ग्रुपच्या ‘प्रीकॅम्ब्रियन रिसर्च’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

वायव्य आणि दक्षिण भारतातील भागात, जसे की गुजरातमधील अंबाडोंगर, राजस्थानमधील नुआनिया, तामिळनाडूमधील होगेनाक्कल आणि सेवात्तूर आणि मेघालयातील सांग व्हॅलीमध्ये देखील कार्बोनेटाईट संकुल आढळले आहेत. असे असूनही, देशाला त्याच्या दुर्मिळ पृथ्वी घटकांच्या बहुतेक गरजा आयातीद्वारे पूर्ण कराव्या लागतात. गुंडलुपेटे येथील हे खडक भारताच्या आर्थिक आणि धोरणात्मक भविष्यासाठी एक मजबूत पाया बनू शकतात.





Source link

आठ दिवसांपासून साताऱ्यातील तरुण बेपत्ता; पुण्यातील लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ; बंद खोलीतून

0


Pune Crime News: सातारा (Satara) जिल्ह्यातील वाई येथून आठ दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या 27 वर्षीय तरुणाचा पुण्यात (Pune) मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील गजबजलेल्या कॅम्प (लष्कर) परिसरातील एका लॉजमध्ये या तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याचे उघडकीस आले आहे. पीयूष ओसवाल (रा. वाई, जि. सातारा) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे ओसवाल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ही घटना कॅम्प परिसरातील ‘मुकेश लॉज’मध्ये उघडकीस आली. बुधवारी दुपारी लॉजमधील एका बंद खोलीतून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. कर्मचाऱ्यांनी संबंधित खोलीचा दरवाजा ठोठावून आवाज दिला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लॉज प्रशासनाने तात्काळ बंडगार्डन पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, पीयूष ओसवाल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची अवस्था आणि खोलीत पसरलेली दुर्गंधी पाहता, पीयूषने सुमारे दोन ते तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Pune Crime News: आठ दिवसांपासून बेपत्ता, वाई पोलिसांकडे तक्रार

पीयूष हा मूळचा वाई येथील रहिवासी असून, तो गेल्या आठ दिवसांपासून घरातून निघून गेला होता. घरी न परतल्याने आणि कोणताही संपर्क न झाल्यामुळे कुटुंबीयांनी वाई पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. वाई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असतानाच, पुण्यात त्याचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.

Pune Crime News: पोलिसांकडून तपास सुरू 

घटनास्थळाचा पंचनामा करून बंडगार्डन पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. पीयूष पुण्यात कधी आला, तो संबंधित लॉजवर कधीपासून वास्तव्यास होता आणि त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबतची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाई पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली असून, दोन्ही पोलीस ठाण्यांच्या समन्वयातून पुढील तपास केला जात आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : नवऱ्याला सोडून मित्रासोबत लिव्ह-इनमध्ये राहायची, पतीने दागिने घ्यायला नम्रता-शाहरुखला बोलावलं अन्…; घटनेनं पुण्यात खळबळ

Nagpur Accident: एकीचे 7 महिन्यांपूर्वीच लग्न, तर दुसरीच्या लग्नाची घरात लगबग, हळदी-कुंकवासाठी निघालेल्या दोघी बहिणींवर काळाची झडप, अन्…..; नागपूर हादरलं!

आणखी वाचा



Source link

एन. रघुरामन यांचा कॉलम: यशस्वी होण्यासाठी लीडर, पालक आणि शिक्षक – हे सर्व एका टेलरकडून शिका!

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  यशस्वी होण्यासाठी लीडर, पालक आणि शिक्षक – हे सर्व एका टेलरकडून शिका!




वसंत पंचमीच्या दिवशी, जेव्हा मी माझ्या टेलरकडे जायला निघालो होतो तेव्हा माझी पत्नी नाराज झाली. ती म्हणाली, “मला समजत नाही की तुम्ही एकाच शर्टचे माप देण्यासाठी वारंवार टेलरकडे का जाता? किमान काही जोड कपडे तरी शिवून घेत जा, म्हणजे चकरा वाचतील.’ माझ्याकडे यावर कोणतेही ठोस उत्तर नव्हते. मात्र, गाडी चालवताना मी विचार करत होतो की, मला टेलरकडे जाणे इतके का आवडते? जेव्हा मी दुकानात पोहोचलो तेव्हा मालकाने माझे स्वागत केले आणि कुटुंबाची चौकशी केली. त्यांना उत्तर दिल्यानंतर मी पांढरा कपडा शर्ट शिवण्यासाठी दिला. मालक जेव्हा टेप काढत होते तेव्हा त्यांच्या सहायकाने तत्परतेने विचारले, “साहेबांचे माप गेल्या महिन्यातच घेतले होते, पुन्हा माप घ्यायचे का?’ मालकाने होकारार्थी मान हलवली. त्यानंतर सहायकाकडे बिल-बुक आणि पेन घेऊन सूचना लिहिण्याशिवाय पर्याय उरला नाही. मला वाटले की, आता घरी गेल्यावर पत्नीला देण्यासाठी माझ्याकडे एक योग्य उत्तर आहे. परंतु, मी घरी जाऊन पत्नीला काय सांगितले हे सांगण्यापूर्वी हे सांगणे आवश्यक आहे की, टेलरकडे जाण्यापूर्वी हैदराबादच्या प्रभा एकंबरम यांनी ट्रेनर आणि मेंटरच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवर (ज्याचा मी देखील भाग आहे) एक गोष्ट शेअर केली होती. त्यांनी या शुभ दिवशी महाराष्ट्रातील एका आर्थिकदृष्ट्या दुर्बल वैद्यकीय विद्यार्थ्याला गोल्ड हार्ट फाउंडेशनकडून शिष्यवृत्ती मिळवून दिली आणि एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला उत्तम प्लेसमेंट मिळवून देण्यात मदत केली. ज्ञान आणि स्वप्नांचे वास्तविक परिणामात रूपांतर करणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट आहे. परतताना प्रभा यांच्याशी बोलत होतो की, त्या ही कामे कशी करतात. त्यांनी मला अतिशय व्यवस्थित समजावून सांगितले की, त्या नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यातील दुवे अतिशय बारकाईने जोडतात. एक मेंटर म्हणून त्या त्यांना करिअरसाठी तयारही करतात. त्या संभाषणाने मला एका बातमीची आठवण करून दिली. ज्यात म्हटले होते की, अमेरिकेसारख्या प्रगत देशातही बिझनेस स्कूल आपल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्या बातमीनुसार, २०२५-२०२६ दरम्यान हार्वर्ड आणि कोलंबियासारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमधील प्लेसमेंटचे प्रमाण कोविडपूर्व स्तरापेक्षा कमीच आहे. या संस्थांनी संभाव्य नियोक्त्यांकडून मिळालेल्या सूचनांनुसार करिअर-रेडीनेसवर भर देणारा नवीन अभ्यासक्रम सुरू करूनही ही स्थिती आहे. यामुळे माझे मन प्रभा यांच्यासारख्या व्यक्तींचे प्रयत्न आणि ज्या संस्था आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळवून देण्यासाठी झगडत आहेत, यांच्यातील तुलनेकडे वळले आणि तेव्हाच मला त्या टेलरच्या कामाचा खरा अर्थ समजला. प्रत्येक लीडर, पालक, शिक्षक, कोच आणि मेंटरला पुढची पिढी यशस्वी होताना पाहायची असते. पण यश हे यावर अवलंबून असते की, ते या पिढीकडे त्या टेलरच्या दृष्टिकोनातून कसे पाहतात. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या टेलरला भेटता तेव्हा तो तुम्हाला नवीन नजरेने पाहतो आणि म्हणूनच तो प्रत्येक वेळी तुमचे नवीन माप घेतो. माप घेताना तो बाजारात येत असलेल्या नवीन फॅशनबद्दलही सविस्तर बोलतो. तो तुमच्या सहमतीची वाट पाहत नाही, तर फक्त सांगत जातो की बाजारात किंवा या हिवाळ्यासाठी काय नवीन ट्रेंड सुरू आहे. आता आपल्या सभोवतालचे जग पाहा. जग आपल्याला अनेकदा जुन्या नजरेने किंवा जुन्या चष्म्यातूनच पाहते. ते आपल्याला नवीन दृष्टिकोनातून पाहत नाही. एखाद्या क्रिकेटपटूने एका मॅचमध्ये शतक झळकावले तर जग त्याच्याकडून प्रत्येक मॅचमध्ये शतकाची अपेक्षा करू लागते. आणि जर आपल्यापैकी कोणी एखाद्या क्षेत्रात अपयशी ठरले असेल तर दुर्दैवाने आयुष्यभर त्याच अपयशाच्या आधारावर आपले मूल्यमापन होत राहते.
फंडा यह है कि आपण प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक परिस्थितीकडे प्रत्येक भेटीत नवीन नजरेने पाहण्यासाठी टेलरचा दृष्टिकोन अवलंबला पाहिजे. कारण जेव्हा आपण त्यांच्याकडे नवीन नजरेने पाहतो तेव्हा एक नवीन गुण किंवा चांगली गोष्ट दिसून येते. पूर्वग्रह हा संयमाचा शत्रू आहे.



Source link

“पद हवे असतील तर शिस्त पाळा!” – जाहीर सभेत अजित पवारांचा संताप, गैरहजर संचालकांना थेट तंबी

0
“पद हवे असतील तर शिस्त पाळा!” – जाहीर सभेत अजित पवारांचा संताप, गैरहजर संचालकांना थेट तंबी

बारामती :  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ आज श्री क्षेत्र कन्हेरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. मात्र या जाहीर सभेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे दोन संचालक गैरहजर असल्याचं लक्षात येताच अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
“पदं हवी असतात तेव्हा सतत मागे लागता आणि आता असं वागता? हे मला अजिबात चालणार नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी संबंधित संचालकांची कानउघडणी केली. ते नेमके कुठे आहेत? अशी विचारणा करत त्यांनी उद्याच दोघांना भेटीसाठी बोलावण्याचा स्पष्ट आदेशही दिला.
यावेळी अजित पवार म्हणाले, “सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे. काही पदाधिकारी वेगळ्या भूमिका घेत असतील तर त्याचा मला फरक पडत नाही. मात्र विनाकारण उघडं पडू नका,” असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ होती. मात्र अपवाद वगळता अजित पवार यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने अनेक इच्छुक नाराज झाले होते. याच नाराजीतून काहींनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचं चित्र होतं.
हीच अंतर्गत नाराजी ओळखून अजित पवार यांनी जाहीर सभेत थेट आणि आक्रमक भूमिका घेत पदाधिकाऱ्यांना शिस्तीचा इशारा दिला. त्यांच्या या ठाम पवित्र्यानंतर पक्षातील नाराज इच्छुकांनी आपसूकच तलवार म्यान केल्याचं बोललं जात असून राष्ट्रवादीत पुन्हा एकदा एकसंघतेचा सूर दिसू लागला आहे.

हनुमान मंदिर, बरड येथे नारळ फोडून जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराचा दिमाखदार शुभारंभ

0
हनुमान मंदिर, बरड येथे नारळ फोडून जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराचा दिमाखदार शुभारंभ


फलटण :-  जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. वैशाली संदीप कांबळे व पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ. स्वाती हणमंत आटोळे यांच्या प्रचारार्थ हनुमान मंदिर, बरड येथे नारळ फोडून प्रचार शुभारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. धार्मिक व भक्तिमय वातावरणात या प्रचाराची सुरुवात करण्यात आली.
या शुभारंभ कार्यक्रमाला परिसरातील माजी आमदार श्री. दीपक राव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. हनुमान मंदिरात विधीवत पूजा करून नारळ फोडत प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार दीपक राव चव्हाण यांनी दोन्ही उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा देत, सर्वसामान्यांच्या विकासासाठी त्या नक्कीच प्रभावी काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.
आमदार चव्हाण यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सक्षम व कार्यक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे नमूद केले. सौ. वैशाली कांबळे व सौ. स्वाती आटोळे या दोन्ही उमेदवार जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून विकासाचा ध्यास घेऊन काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी एकजुटीने काम करून दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.