मुंबई : आशिया खंडातील शालेय स्तरावरील खेळाडूंना प्रोत्साहन देणारी सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शालेय क्रीडा संस्था (Mumbai School Sports Association) यांच्या उपाध्यक्षपदी प्रा. राम अहिवळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक, साहित्यिक व क्रीडा क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रा. राम अहिवळे हे एक प्रख्यात बालसाहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या लेखनातून बालमनाचा वेध घेणारी सहज, संस्कारक्षम आणि प्रेरणादायी साहित्यनिर्मिती त्यांनी केली आहे. शिक्षण, साहित्य आणि समाजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. मुधोजी हायस्कूल, फलटण येथे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले, तर रयत शिक्षण संस्था, सातारा येथे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या संस्कारशील परंपरेचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर स्पष्टपणे दिसून येतो. मुंबई शालेय क्रीडा संस्था ही शालेय स्तरावर क्रीडा प्रतिभा शोधून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंचे मार्गदर्शन, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना संधी मिळवून देण्यात या संस्थेचा मोठा वाटा आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रा. अहिवळे यांची निवड होणे ही निश्चितच सन्मानाची बाब मानली जात आहे. या निवडीमुळे क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळेल, तसेच शालेय खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावी धोरणे राबवली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रीडा आणि शिक्षण यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी प्रा. अहिवळे यांचा अनुभव निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, साहित्यिक, शिक्षकवर्ग, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध सामाजिक स्तरांतून त्यांचे मनापासून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
गेल्या दोन वर्षांत लार्ज लँग्वेज मॉडेल्सच्या (एलएलएम)वाढीमुळे अशी भीती निर्माण झाली की एआय लवकरचमहाविद्यालयीन शिक्षण, विशेषतः उदारमतवादी कलाअभ्यास यांना अप्रासंगिक बनवेल. अशा परिस्थितीततरुणांनी कॉलेज सोडून थेट कामावर जाणे चांगले होईल.मी पूर्णपणे असहमत आहे. व्यावहारिक अनुभवातूनशिकणे मौल्यवान आहे. परंतु भविष्यात कोणत्या नोकऱ्याआणि कौशल्यांची मागणी असेल याची लोकांना चांगलीसमज असेल तरच ते कार्य करते. हे खरे आहे कीरोजगाराचे भविष्य अनिश्चित आहे. परंतु तरुणांना शक्यतितक्या लवकर कॉलेज सोडून कामगार बाजारात प्रवेशकरण्याचा सल्ला देणे दिशाभूल करणारे आहे. आधुनिक एआयचे प्रणेते मानले जाणारे जेफ्री हिंटन यांनीएकदा त्यांच्या क्षेत्रातील विकासाची तुलना धुक्यातूनमार्गक्रमण करण्याशी केली : तुम्हाला पुढचा मार्ग दिसतो.पण त्यापलीकडे काय आहे ते दिसत नाही.शिक्षकांसमोरील आव्हान म्हणजे विद्यार्थ्यांना अशापरिस्थितीत प्रभावीपणे काम करण्यासाठी तयार करणे.उपाय म्हणजे त्यांना लवकरच कालबाह्य होऊ शकणाऱ्याकामांसाठी प्रशिक्षित करणे नाही. तर त्यांना अधिकअनुकूल बनवणे. या दृष्टिकोनातून शिक्षणाची भूमिका – आणि विशेषतःउच्च शिक्षणाची – पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची बनते.भविष्यात कोणत्या कौशल्यांची मागणी असेल हेआपल्याला माहित नसल्यामुळे मूलभूत गोष्टींकडे परतणेआवश्यक आहे. उदारमतवादी शिक्षण काय करावे यावरनव्हे तर कसे विचार करावे यावर भर देते. ते विद्यार्थ्यांनातर्क करायला, काळजीपूर्वक वाचायला, स्पष्टपणेलिहायला आणि पुराव्यांचे मूल्यांकन करायला शिकवते.ही कौशल्ये इतर तांत्रिक कौशल्यांपेक्षा काळाच्याकसोटीवर खूप चांगल्या प्रकारे उतरतात. याचा अर्थ असानाही की तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष केले पाहिजे. उलटविद्यार्थ्यांनी एआयसोबत काम करायला शिकले पाहिजे.गणित, तर्कशास्त्र आणि तर्क शिकवणे; मूलभूतपाठ्यपुस्तकांमध्ये व्यस्त राहणे; आणि युक्तिवाद कसेतयार केले जातात आणि त्यांची चाचणी कशी केली जातेहे समजून घेणे – हे सर्व आजही आवश्यक आहे. हीअशी कौशल्ये आहेत जी आपल्याला तंत्रज्ञानाच्या पुढेराहण्यास सक्षम करतात. आपण काय शिकावे आणि तेकसे शिकवावे? पहिला प्रश्न कठीण आहे आणिस्वाभाविकपणे वादविवाद निर्माण करेल. मुख्यसंकल्पनांच्या महत्त्वावर व्यापक सहमती असू शकते,परंतु कालांतराने तपशील बदलतील. पूर्वीच्यातंत्रज्ञानाबाबतचा आपला अनुभव विचारात घ्या.कॅल्क्युलेटर आणि संगणकांनी अंकगणित शिकवण्याचीगरज दूर केली नाही. विद्यार्थी अजूनही गणना कशीकरतात हे शिकतात. त्याचप्रमाणे, स्पेलिंग आणिव्याकरण महत्वाचे आहे. एआयला अनेक क्षेत्रांमध्येसमान समायोजनांची आवश्यकता आहे. एलएलएमआता लेखाचा सारांश देणे किंवा त्याची मध्यवर्ती कल्पनाओळखणे अशी कामे करण्यास सक्षम आहेत. असा युक्तिवाद केला जातो की एआय औपचारिकशिक्षणाची आवश्यकता कमी करेल कारण ते मागणीनुसारमाहिती आणि मार्गदर्शन प्रदान करू शकते. परंतु हीधारणा या गृहीतकावर आधारित आहे की वापरकर्त्यांनाकाय विचारायचे आहे आणि त्यांना मिळालेल्या उत्तरांचाअर्थ कसा लावायचा हे माहित आहे. एआयपासूनसमाजाला फायदा करून द्यायचा असेल तर शिक्षणातकमी नाही तर अधिक गुंतवणूक गरजेची असेल.(@प्रोजेक्ट सिंडिकेट)
फलटण :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती, धक्कादायक निधन चटका लावणारे आहे. अत्यतं उमदे व्यक्तिमत्व असणाऱ्या अजितदादांच्या जीवनाचा शेवट नियतीने असा का केला असावा हा प्रश्न राहून राहून मनात येतो. अजित पवार यांची गेल्या ३५ वर्षांवरची कारकीर्द वादळी, झंझावाती होती. काका आणि गेल्या साठ वर्षांच्या राजकारणाचे साक्षिदार असणारे शरद पवार यांच्या तालमीत त्यांनी कारकीर्द सुरु केली. असे सांगितले जाते की, मोठ्या झाडाखाली लहान झाड फार काळ तग धरत नाही, वाढत नाही. खुरटे रहाते. अंतर समाजाचे हे म्हणणे अजित पवार यांनी खोटे ठरवले. खरे तर अजित पवार हे नेतृत्व गुण घेऊन ते जन्माला आले होते. तडफ होती. सर्वसामान्यांचे प्रश्न समजण्याची जाणीव होती. प्रशासनावर पकड होती. स्पस्टवक्तेपणा असला तरी आतल्या गाठीचे ते नव्हते. खुनशी, डूख ठेवणारे नव्हते. असेल ते तोंडावर, मोकळेपणाने आणि थेट होते. सहाजिकच अशी व्यक्ती परवडणारी नसते. मात्र तिने केल्या तिच्या जागेमुळे तिला बाजूला करणे ही सोपे नसते. अजित दादा यांनी राज्यात काँग्रेसचे राज्य होते तेंव्हा काँग्रेसमध्ये आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर राष्ट्रवादीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले होते. शरद पवार यांच्यावर राजीव गांधींच्या निधना नंतर व्ही. पी. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवली. त्यावेळी अजित पवार खरे तर खासदार म्हणून निवडून गेले होते. मात्र शरद पवार यांना आणि यांचा अत्यंत सुरक्षित मतदार संघ म्हणून अजित पवार यांनी राजीनामा देऊन शरद पवार यांच्यासाठी जागा रिकामी दादा पुन्हा दिल्लीकडे महाराष्ट्राचे राजकारण केले. विशेषतः शरद व्यक्ति मत्वात अग्रणी होते. काँग्रेस केली. मात्र त्या नंतर अजित वळले नाही. त्यांनी सांभाळण्याचे काम पवार यांचा विश्वासपात्र त्यांच्यावेळी अजितदादा पक्षातून शरद पवार बाहेर पडल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. शरद पवार यांची भिस्त काँग्रेसमधून फुटून येणाऱ्या नेते कार्यकर्त्यांवर होती. मात्र संगमा आणि तारिक अन्वर सोडता शरद पवार यांच्या त्या बंडाला खासदारांनी साथ दिली नाही. काही प्रमाणात राज्यात आमदार सहभागी झाले. मात्र त्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या वयाच्या, काही कमी अधिक वयाच्या मंडळींची टीम तयार केली. शरद पवार हे सगळ्यांचे मार्गदर्शक होते मात्र पक्षाचे काम वाढवण्याचे, पक्ष सांभाळण्याचे काम अजित पवार यांनी केले. आज राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांच्याबरोबर गेले हे त्यांच्या योग्यवेळी योग्य निर्णयाचे, लवचिकतेचे द्योतक आहे. सहावेळा उपमुख्यमंत्री ते झाले. पण मुख्यमंत्री होता आले नाही. होण्याची संधी असताना ती गमावल्याची थेट टीका, मत त्यांनी शरद पवार त्यांच्या विरोधात जाहीरपणे त्यांनी व्यक्त केले. शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष पद सोडले त्या वेळी त्यांनी पक्ष चालवण्याची पूर्ण तयारी आपल्या पद्धतीने केली होती. त्यावेळच्या प्रसंगातून त्यांची ती इच्छा स्पस्ट जाहीर होत होती. आणि अनेकदा पक्ष श्रेष्टींचे ऐकूनही नेतृत्व करण्याची संधी मिळत नाही हे शल्य त्यांना होते. त्यांनी त्या पोटी भाजपच्या मैत्रीची वाट धरली. महायुतीत सामील झाले. शरद पवार यांनी वेळेत त्यांच्या हातात पक्ष सोपवला असता तर पक्ष फुटण्याची वेळ आली नसती. सुप्रिया सुळे दिल्ली आणि दादा राज्यात राहिले असते. पक्ष एकसंघ राहिला असता. पहाटेचा शपथ विधी ते कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळापाशी आत्मक्लेश हा त्यांचा पट होता. मांढरदेव दुर्घटनेत त्यांनी केलेले मदत कार्य ते काम होणार असेल तर हो आणि नसेल तर तोंडावर नाही हा त्यांचा खाक्या होता. त्यांच्या जीवावर राष्ट्रवादी पक्ष चालला होता. सत्तेत होता. घरापासून सुरु झालेल्यास संघर्ष कदाचित सामोपचाराच्या वाटेवर होता तेवढ्यात हे घडले. आता राजकारणात कोणते वळण नव्याने लागेल हे नक्की सांगता येणार नाही. दादांच्या राष्ट्रवादी पुढे जे दोन, तीन पर्याय आहेत त्यातला निवडणे किंवा शरद पवार यांनी पुन्हा एकदा दोन पक्षांना एकत्र करणे आदी विषय असू शकतात. खरेतर दादाच्याही मनात नसतात, वेळेचे पक्के असलेले दादा यांनी यमदूताला वेळ दिली नसताना आपल्यातून अजितदादा निघून गेले. त्याच्या स्मृती राजकारणातून कधीच मिटल्या जाणार नाहीत. मात्र एक झंजावात अनपेक्षितपणे निमाला आहे वास्तव आहे. साहस टाईम्स न्यूज परिवाराकडून अजितदादांच्या पवित्र आत्म्यास विनम्र श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
बारामतीचा हिरा….
बारामतीचा विश्वकर्मा विद्येचे प्रतिष्ठान जपणारा जन सामांन्यांशी जोडलेला नेता हा माणुसकी जाणणारा…
दिलखुलास संवाद साधत मनामध्ये शिरणारा धडाडीने निर्णय घेऊन जागेवर न्याय करणारा…
असा कसा गेला अकाली का नाही वेळ ही चुकली? बारामतीत घडला हा हिरा बारामतीतच आयुष्य रेषा तुटली…
रुबाबदार रूप तुमचे पुन्हा आता दिसणार नाही वाह रे पठ्ठे ही साद पुन्हा कधी घुमणार नाही…
दुःख दिलेत जन्माचे पोरके केलेत दादा क्षणात जरी गेलात नजरे आड रहाल कायम मनामनात…
जमिनीशी नाळ जोडलेल्या या लोकनेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली…💐🙏🥹 G. वर्षा…
फलटण :- फलटण तालुक्यातील कोळकी गावावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोळकी गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि कुस्ती क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व, ‘स्वराज कुस्ती केंद्रा’चे वस्ताद श्री. बाळासाहेब काशीद आणि त्यांची पत्नी यांचे सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे झालेल्या रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, कुस्ती क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बाळासाहेब काशीद हे आपल्या कुटुंबासह मारुती सुझुकी बॅलेनो कारने प्रवास करत होते. टेंभुर्णी परिसरात रस्ता ओलांडत असताना किंवा पुढे जाण्याच्या प्रयत्नात, त्यांच्या कारचा एका कंटेनर ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या एसटी बसशी जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कार चक्काचूर झाली आणि बाळासाहेब काशीद व त्यांची पत्नी यांना जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी तातडीने मदत केली, परंतु उशीर झाल्याने त्यांना वाचवता आले नाही. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. कुस्ती क्षेत्रासाठी हा अपघात अतिशय मोठा धक्का आहे. बाळासाहेब काशीद हे केवळ राजकीय पदाधिकारी नव्हते, तर कुस्ती क्षेत्रात मार्गदर्शक आणि हाडाचे पैलवान होते. ‘स्वराज कुस्ती केंद्रा’च्या माध्यमातून त्यांनी अनेक मल्ल घडवले, आणि त्यांच्या जाण्याने कोळकी गावाने एक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आणि कुस्ती क्षेत्राचा आधार गमावला आहे. कोळकी ग्रामस्थांनी “एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीला आणि पैलवानांच्या मार्गदर्शकाला आम्ही आज मुकलो आहोत,” असे सांगून दु:ख व्यक्त केले.
फलटण : . “राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विकासाचा महामेरू अजितदादा पवार (Ajit Dada Pawar) यांचे आज झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी मनाला चटका लावणारी आणि अतीव दुःख देणारी आहे. त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महायुतीचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. आज आम्ही खंबीर मार्गदर्शक गमावला आहे,” अशा अत्यंत भावूक शब्दांत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याचे वृत्त समजताच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.
या अत्यंत दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, “अजितदादांच्या निधनामुळे आम्ही स अत्यंत धक्क्यात आणि दुःखात आहोत. या आजचे सर्व प्रचार दौरे आणि कार्यक्रम रद्द
या अत्यंत दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, “अजितदादांच्या निधनामुळे आम्ही सर्वजण अत्यंत धक्क्यात आणि दुःखात आहोत. या पार्श्वभूमीवर, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नियोजित असलेले सर्व प्रचार कार्यक्रम, कोपरा सभा, रॅली आणि दौरे रद्द करण्यात आले आहेत.” सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी आणि आजचा दिवस आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी समर्पित करावा, असे आवाहन त्यांनी केले. स्पष्टवक्ता आणि प्रशासनावर पकड असणारा नेता हरपला”
श्रद्धांजली वाहताना रणजितसिंह पुढे म्हणाले, “अजितदादा हे राजकारणातील एक असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांची प्रशासनावर जबरदस्त पकड होती. कामाचा प्रचंड उरक आणि दिलेला शब्द पाळण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. सकाळी ६ वाजता कामाला सुरुवात करणारा आणि रात्री उशिरापर्यंत जनतेच्या सेवेत रमणारा असा नेता पुन्हा होणे नाही. फलटण तालुक्याच्या विकासात त्यांचे योगदान आम्ही कधीही विसरू शकणार नाही महायुतीचा कणा तुटला…”
“गेल्या काही वर्षांत महायुतीमध्ये काम करत असताना दादांचा जो सहवास आणि मार्गदर्शन लाभले, ते माझ्यासाठी मोलाचे होते. कितीही कठीण प्रसंग आला तरी न डगमगता निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आम्हाला प्रेरणा देत असे. आज त्यांच्या जाण्याने महायुतीचा कणाच तुटला आहे.
विकासाच्या प्रश्नांवर राजकारण बाजूला ठेवून मदत करणारा असा दिलदार नेता आज आपल्यात नाही, यावर अजूनही विश्वास बसत नाही,” असे रणजितसिंह यांनी सांगितले. बातमी तयार करा
Civil Aviation Ministry on Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे एक चार्टर्ड Learjet 45 हे खासगी विमान बुधवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील सर्व 5 जणांचा मृत्यू झाला. हे विमान सकाळी 8.10 वाजता मुंबईहून निघाले होते आणि एका तासाच्या आत बारामतीमध्ये उतरणे अपेक्षित होते. सामान्य परिस्थितीत या दोन विमानतळांमधील प्रवासाला सुमारे 45 मिनिटं लागतात.
Add Zee News as a Preferred Source
तथापि, सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी विमान दुर्घटनाग्रस्त झालं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे वेळेची पुष्टी झाली आहे. हे विमान धावपट्टीपासून 100 फूट आधीच कोसळले. 12 मिनिटांपूर्वीच त्याने एडीएस्-बी (ADS-B) रेडिओ सिग्नल पाठवणं बंद केलं होतं, जे विमानाचा वेग आणि स्थान व्हेरिफाय करणारे नियमित संदेश पाठवत असतात.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या निवेदनात दुर्घटनेच्या घटनाक्रमाची रूपरेषा मांडण्यात आली आहे, ज्यात एक संभाव्य चिंताजनक मुद्दा नमूद आहे. तो म्हणजे वैमानिकाने ‘लँडिंग क्लिअरन्सचा रीडबॅक दिला नाही’, म्हणजेच, जगभरातील कार्यपद्धतीनुसार लँडिंगची परवानगी पुन्हा मागणारा कोणताही संदेश दिला गेला नाही.
‘रीडबॅक’ म्हणजे काय?
‘SKYbrary’नुसार – जे ‘विमान संचालन, हवाई वाहतूक व्यवस्थापन आणि विमानचालन सुरक्षेशी संबंधित सुरक्षा माहितीचे एक इलेक्ट्रॉनिक भांडार’ आहे. ‘रीडबॅक’ म्हणजे संदेश मिळाल्याची आणि तो समजल्याची पुष्टी करण्यासाठी, हवाई वाहतूक नियंत्रकाला तो संदेश पूर्णपणे किंवा अंशतः पुन्हा सांगणे.
यामुळे विमानातील कर्मचारी आणि एटीसी (हवाई वाहतूक नियंत्रण) हे दोघेही समन्वयाने काम करत असल्याची खात्री करू शकतात, जिथे एक गट विमान उडवतो आणि दुसरा त्यांच्या सभोवतालच्या हवाई क्षेत्राचे व्यवस्थापन करतो.
विमान उतरत असताना ‘रीडबॅक’ देखील अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण त्यामुळे वैमानिक आणि एटीसी यांना कोणती धावपट्टी वापरली जात आहे, हवामानाची परिस्थिती काय आहे आणि विमान उतरत असताना जमिनीवर व विमानाजवळच्या परिसरात कोणती वाहतूक आहे, हे निश्चित करता येते. मंत्रालयाने सांगितले की, लियरजेटच्या वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांनी तो रीडबॅक दिला नाही.
शांभवी पाठक यांनी न्यूझीलंडमधील एका संस्थेतून आपले व्यावसायिक वैमानिक आणि फ्लाइट क्रू प्रशिक्षण पूर्ण केले असून जॉर्डनमधील एका सिम्युलेशन केंद्रातून अतिरिक्त प्रशिक्षण घेतले होते.
‘रीडबॅक’ महत्त्वाचा का आहे?
एटीसीने दिलेली माहिती अचूकपणे प्राप्त झाली आहे याची खात्री करण्यासाठी, वैमानिकांसाठी लँडिंगच्या वेळी किंवा विमान आकाशात असतानाच्या कार्यप्रणालीमध्ये ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. या सूचनांमधील कोणताही बदल, जो एटीसीच्या लगेच लक्षात येणार नाही, तो विनाशकारी ठरू शकतो. जसं की या प्रकरणात घडल्याचे दिसते.
स्कायब्ररीनुसार, एटीसी संदेशांमधील खालील घटकांचा रीडबॅक आवश्यक आहे.
– मार्गासाठी मंजुरी – विमानतळावरील हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी, धावपट्टीवर उतरण्यासाठी किंवा तिथून उड्डाण करण्यासाठी, किंवा इतर कोणत्याही उड्डाण हालचालीसाठी मंजुरी आणि सूचना, – वेग, उंची आणि दिशा व्यवस्थापित करण्याबद्दल किंवा बदलण्याबद्दलच्या सूचना, आणि अट-आधारित मंजुरींसह इतर कोणतेही संदेश. – हे सर्व संदेश परत वाचून दाखवले पाहिजेत, जेणेकरून वैमानिकाला संदेश समजला आहे याची एटीसींना खात्री होईल. – हे संदेश ऐकण्याची आणि वैमानिकांना दिलेल्या सूचना आणि वैमानिकांना जे समजले त्यामधील कोणतीही विसंगती दुरुस्त करण्याची जबाबदारी एटीसींची असते.
फलटण : भारतीय समाजाच्या वैचारिक आणि नैतिक जडणघडणीत भगवान बुद्धांचा धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हे दोन मूलस्तंभ आहेत. या दोन्हींचा अंतिम उद्देश एकच आहे, तो म्हणजे मानवमुक्ती, समता, करुणा आणि विवेकाधिष्ठित समाजनिर्मिती. फलटण शहरातील सोमवार पेठ येथे BSI मिशन 25 अंतर्गत संविधान जनजागृती व जागर अभियानांतर्गत भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका यांच्या वतीने सुरू असलेले धम्ममित्र बालसंस्कार वर्ग अंतर्गत सोमवार पेठ फलटण या ठिकाणी संविधान जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धम्ममित्र बाल संस्कार वर्ग हा वर्ग केवळ मुलांना धम्मकथा शिकवणारा उपक्रम नसून, संविधाननिष्ठ नागरिक घडवणारे संस्कार केंद्र म्हणून विकसित होत आहे. ७७ वा प्रजासत्ताक दिन : संविधान जागर २६ जानेवारी २०२६ रोजी, ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाचनालय इमारतीच्या आवारात संविधान जागर करण्यात आला. हा कार्यक्रम केवळ औपचारिक उत्सव नव्हता, तर संविधानाची जाणीव, धम्माची दिशा आणि नागरिक कर्तव्यांची आठवण करून देणारा विचारमंथनाचा सोहळा होता. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, फिरंगाई देवीचे मंदिर शेजारी असतानाही हा बौद्ध उपक्रम अत्यंत शांततेत व परस्पर सन्मानाच्या वातावरणात पार पडला. हे दृश्यच भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेचे जिवंत उदाहरण ठरले. धर्मनिरपेक्षता : बाबासाहेबांचा स्पष्ट विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत वारंवार स्पष्ट केले की, धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्मविरोध नव्हे, तर सर्व धर्मांना समान आदर देणे. संविधानातील कलम २५ प्रत्येक नागरिकाला आपल्या धम्माचे पालन, प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार देते. कोणालाही हा अधिकार नाकारण्याचा हक्क नाही. हाच विचार काळाराम मंदिर सत्याग्रह, महाडचा चवदार तळे सत्याग्रह आणि येवला धर्मांतर घोषणा यामागे होता. हे लढे मंदिरप्रवेशासाठी नव्हते, तर मानवी प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि समतेसाठी होते.
संविधान सभेतील बाबासाहेबांचे ऐतिहासिक कार्य संविधान सभेतील बाबासाहेबांचे कार्य हे केवळ कायदे बनवण्यापुरते मर्यादित नव्हते. विविध जाती, धर्म, भाषा आणि संस्कृतींनी भरलेल्या भारताला एकसंध ठेवणारी मूल्यव्यवस्था त्यांनी संविधानाच्या माध्यमातून उभी केली. स्वातंत्र्य – विचार, श्रद्धा, उपासना आणि अभिव्यक्तीचे, समता – कायद्यापुढे समानता बंधुता – सामाजिक एकात्मतेचा पाया सामाजिक न्याय – वंचितांच्या उत्थानासाठी विशेष तरतुदी ही सर्व मूल्ये मूळात भगवान बुद्धांनी सांगितलेल्या प्रज्ञा, करुणा आणि शील यांच्याशी सुसंगत आहेत. लोकशाहीची बाबासाहेबांची व्याख्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “रक्ताचा एकही थेंब न सांडता लोकांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणणारी प्रणाली म्हणजे लोकशाही.” हीच लोकशाही संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले.
या कार्यक्रमातील मार्गदर्शनातून संविधान जागर भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष यांनी संविधान निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटना समितीचे कार्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर आलेल्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी महापुरुषांच्या जीवनकार्य व विचारांवर प्रकाश टाकणारे साहित्यिक भीमराव लोंढे लिखित गीत सादर करून वातावरण प्रेरणादायी केले.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आयुष्यमान महावीर भालेराव यांनी समाजाची आजची स्थिती, संविधानिक मार्गाने पुढे जाण्याची गरज, कर्तव्य आणि धम्माचरण यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी भारतीय बौद्ध महासभेमार्फत घेण्यात येणाऱ्या २४ शिबिरांपैकी काही शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले. तसेच या बालसंस्कार वर्गाला शुभेच्छा दिल्या. फलटण शाखेचे कार्यालय सचिव चंद्रकांत मोहिते यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन व कार्याची महती सांगणारे साहित्यिक भीमराव लोंढे लिखित गीत सादर करून वातावरणात प्रेरणा व स्फूर्ती निर्माण केली.
भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी बाबासाहेबांचे जागतिक योगदान, कोलंबिया विद्यापीठ, LSE मधील कार्य आणि भारतीय संविधानाचे राष्ट्रनिर्मितीतील स्थान सविस्तर मांडले. संविधान वाचवणे, टिकवणे आणि त्याचा प्रचार व प्रसार करणे हे आपल्या सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी तथागताच्या धम्माच्या अनुषंगाने तथागताने सांगितलेल्या चार प्रकारच्या व्यक्तींमधील प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या समूहासोबत जाण्याची भावना व्यक्त केली. त्यांनी सर्वांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या तसेच धम्ममित्र बालसंस्कार वर्गाच्या शुभेच्छा दिल्या.
भारतीय बौद्ध महासभेचे राज्याच्या संघटक तथा सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयुष्यमान दादासाहेब भोसले यांनी समता सैनिक दल, महार रेजिमेंट, महाड–काळाराम सत्याग्रह व धम्मांतर चळवळीवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. त्यांनी समता सैनिक दलाचे शिबिर व उपासिका शिबिर घेण्याचे आवाहन केले. देशाच्या सेवेत असणाऱ्या महार रेजिमेंटच्या शौर्यपूर्ण कार्याचा उल्लेख करत त्यांनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून धम्मकार्यामध्ये दिलेल्या योगदानाचे महत्त्व विशद केले. त्यांनीही ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी काही युवक-युवतींनी भीमगीतांचे सादरीकरण केले.
संस्कारांची बीजे : पुढील पिढीसाठी या कार्यक्रमात बालसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांना ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तसेच भारतीय संविधानाची प्रत सप्रेम भेट देण्यात आली. तसेच उपस्थितांना संविधानाच्या प्रास्ताविकेची शपथ दोन विद्यार्थ्यांकरवी देण्यात आली. हे कार्य म्हणजे संविधान आणि धम्म केवळ वाचण्यापुरते न ठेवता, जगण्याचा मार्ग बनवण्याचा प्रयत्न आहे. भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सोमवार पेठेत सुरू असलेले हे संस्कार वर्ग हे दाखवतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही जिवंत आहेत, कृतीत उतरले आहेत आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचत आहेत. अशा उपक्रमांतूनच एक विवेकी, समतावादी, करुणाशील आणि संविधाननिष्ठ समाज घडतो. आयोजक, मार्गदर्शक, तरुण कार्यकर्ते, पालक व बालकांचे मनःपूर्वक अभिनंदन. हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक सोमाशेठ जाधव, लोंढे, राज्याच्या संघटक तथा पुणे व सातारा जिल्हा प्रभारी, ड्रायव्हर काका समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु.दादासाहेब भोसले, भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्व संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका शाखेचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, समता सैनिक दलाचे माजी ऑफिसर, गायक लक्ष्मण निकाळजे, धम्ममित्र बालसंस्कार वर्गाचे व्यवस्थापक प्रदीप खरात, विशाल शिंदे, विकी भोसले, भीमराव लोंढे, राजपाल लोंढे, गणेश सावंत, मनीष लोखंडे, किशोर मोरे, गायकवाड सर, प्रसाद शिंदे, अमोल मोरे, सचिन कांबळे, गणेश भोसले,राजू सावंत, शामराव लोंढे, चिराग खरात यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक – उपासिका, बालक – बालिका उपस्थित होत्या.
सायली पाटील या ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी ‘लोकमत’, ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रांसाठी काम केलं. ‘लोकसत्ता’मधील ‘VIVA’ या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी ‘एबीपी माझा’ च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
नाशिक : नाशिक येथील वनरक्षक माधवी जाधव यांच्याशी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांना धीर दिला. या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा करण्यात येईल, असे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिले. माधवी जाधव यांनी घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांना दिली. यावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले की, “गिरीश महाजन यांच्या वागणुकीतून नीच मानसिकता दिसून येते. हे कृत्य केवळ अपमानजनक नसून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (SC/ST Act) गुन्हा ठरू शकते.” या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक पश्चिम कमिटीमार्फत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली, तर स्वतः ॲड. प्रकाश आंबेडकर कायदेशीर मसुदा तयार करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडतील, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने वाद निर्माण झाला. यावर उपस्थित वनविभागातील महिला कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. या घटनेनंतर माधवी जाधव यांना वंचित बहुजन आघाडीने उघड पाठिंबा दर्शवला. “आरएसएस आणि भाजपकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच बहुजन समाजाचा अवमान केला जात आहे,” असा आरोप करत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध केला आहे.
सातारा: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या अंतिम तारीख आहे. त्यामुळे, आता राजकीय पक्ष कामाला लागले असून प्रचाराचा धुरळा पुन्हा उडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या जन्मभूमीतून प्रचाराचा नारळ फोडला. आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय, अडीच वर्षात माझं काम तुम्ही पाहिलंय मी अडीच वर्षात अडीच तास शांत झोपलो नसेल. लाडक्या बहिणींनी ठरवलं होतं लाडक्या भावाला निवडून आणायचं, असे म्हणत पुन्हा एकदा लाडकी बहीण (Ladki bahin) योजनेसंदर्भाने प्रचारात आघाडी घेतली. नुकतेत ठाकरे गटातून शिवसेनेत आलेल्या माजी आमदार दगडू सपकाळ यांच्यासह एकनाथ शिंदेंनी साताऱ्यातून (Satara) तुफा फटकेबाजी केली.
लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी एका वर्षाचा खर्च होता, भल्याभल्यांची हिम्मत झाली नाही. मात्र, जे खोडा घालायचे त्यांना 232 नंबरचा चा घोडा दाखवला. महारष्ट्राच्या इतिहासात 232 जागा महायुतीच्या कधी निवडून आल्या नव्हत्या, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना भरभरुन मतदान महायुतीला केल्याचं म्हटलं. तसेच, माझ्या आईची काटकसर आणि माझ्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पहिले होते, म्हणून मी याचा विचार करुन महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली.
माझी कर्मभूमी मुंबई असली तर माझी जन्म भूमी सातारा आहे, सातारा जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण कारभार करतोय. संपत्ती कमावली यापेक्षा माणसं किती कमवली हे मी पाहिलं. आधीच्या मुख्यमंत्र्यांना स्पीड ब्रेकर आणि स्थगितीशिवाय काही माहित नव्हतं. फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम कराव लागतं, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंवर टीका
मी मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्या स्थगित्या उठवल्या, कोकण ते पश्चिचम महाराष्ट्र जवळ आणण्याचे काम सुरु झालंय. साडेतीन वर्षे झालं आम्ही उठाव केला, झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला शिवसेनाच या भूमीचा आणि लेकरांचा विचार आणि प्रगती करू शकते. गेला तो चोर आणि कचरा असं किती दिवस बोलणार? आमच्या सोबत ते का आले? याचा विचार करा, असा सल्लाही ठाकरेंना दिला. शिवसेनेचा अजेंडाच विकास आहे, शिवसेना ठाण्यापर्यंत मर्यादित आहे म्हणत होते. मात्र, शिवसेना चंदा ते बांदा पसरलीय, दगडू दादांचं अभिनंदन करतो त्यांनी येवडी वर्षे दिली. दगडू दादांनी शिवसेनेसाठी केलेल्या कामाचं चीज करायला पाहिजे होतं. पण, त्यांनी केलं नाही. दगडू दादांनी आणि मी सुद्धा स्वाभिमान दाखवला. या मातीत स्वाभिमान आणि राष्ट्रभक्ती आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी माजी आमदार दगडू सपकाळ यांचं कौतुक केलं.
लाडक्या बहिणींना 2100 देणारच
पर्यटन सुरक्षा दल स्थापन करणारा सातारा पहिला जिल्हा आहे, येथील 22 गावांचं पालकत्व मी स्वीकारतोय, असे म्हणत थेट सभेतूनच एकनाथ शिंदेंनी मंत्री उदय सामंत यांना फोन लावला.(10 हजार लोकांसाठी एक इंडिस्ट्री आणायचं फायनल झालंय, आचार संहिता संपल्यावर याला गती मिळेल असं सामंत यांनी उपमुख्यमंत्री यांना सांगितलं ). कुणबी प्रमाणपत्र देणारा एकनाथ शिंदे आहे, लवकरात लवकर महादेव कोळी जातीच्या जातं पडताळणीचे दाखले देण्याचे काम सुरु होईल, असेही शिंदेंनी म्हटले. पर्यटणाला चालना देण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते करूयात, पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना देतो त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत. आता, 1500 रुपयांचे 2100 रुपये योग्यवेळी करणार हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आम्ही पाळणार आहोत, मी बोलतो ते करून दाखवतो असे म्हणत एक बार मैंने कमिटमेन्ट करदी तो मैं खुदकी भी नही सुनता, अशा डायलॉगही शिंदेना मारला.