Monday, June 29, 2026
Home Blog Page 59

७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेमार्फत संविधान प्रस्ताविकेचे वाटप

0
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेमार्फत संविधान प्रस्ताविकेचे वाटप


फलटण : ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने विविध ठिकाणी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाटप करून संविधान जागृती व संविधान जागर करण्यात आला. तालुका शाखेचे कार्यालय सचिव आयु. चंद्रकांत मोहिते यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
भारतीय बौद्ध महासभेच्या BSI मिशन २५ अंतर्गत संविधान जनजागृती व जागर अभियान फलटण तालुक्यामध्ये सातत्याने राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून संविधान प्रत व संविधान प्रस्ताविकेचे वाटप करून नागरिकांमध्ये संविधानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष आयु. समशेरसिंह नाईक निंबाळकर, मुख्याधिकारी आयु. निखिल जाधव, नगरसेवक आयु. सोमाशेठ जाधव तसेच नगरसेविका आयु. अस्मिता लोंढे यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत भारतीय संविधानाची प्रास्ताविका भेट देण्यात आली.
तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आयु. आयोध्या घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल आयु. संध्या वलेकर यांच्यासह धम्ममित्र बालसंस्कार वर्ग, सोमवार पेठ, फलटण येथील बालवर्गातील विद्यार्थी, उपासक-उपासिका व ग्रामस्थांनाही भारतीय संविधानाची प्रास्ताविका वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे उपस्थित होते.
याचप्रसंगी धम्ममित्र बालसंस्कार वर्ग, सोमवार पेठ, फलटण येथील बाल संस्कार वर्गाला भारतीय संविधानाची प्रत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला.

‘मी आज दादांसोबत बारामतीला येतोय, संध्याकाळी घरी मुक्कामाला येईन…’ असं सांगणारे विदीप तिरंग्

0


सातारा: उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत असलेल्या विमान अपघातात त्यांचे सुरक्षारक्षक पोलिस हवालदार विदीप जाधव (Videep Jadhav) (४३) यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी संध्या (३८), मुलगी नेत्रा (१४) आणि मुलगा अद्वीत (१०) असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने ते राहत असलेल्या ठाण्यातील विटावा भागात शोककळा पसरली आहे. मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगावचे ते रहिवासी होते. विदीप हे उपमुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक असले तरी त्यांनी पदाचा रुबाब दाखविला नाही, ते अगदी साधेपणाने वागत बोलत होते. त्यांची पोलिस अशीच ओळख होती. विदीप जाधव यांच्यावरती काल (बुधवार) रात्री उशिरा तरडगाव पालखी तळ परिसरात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या १० वर्षांच्या मुलाने सर्व विधी केले, ते सर्व चित्र पाहून उपस्थिताचे देखील डोळे पाणावले.(Videep Jadhav)

विदीप जाधव हे २००९ मध्ये मुंबई पोलिस दलात भरती झाले होते. २०१० पासून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा पथकात त्यांनी स्थान मिळवले. सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्या. जे. ए. सानप यांचे ते सुरक्षा रक्षक होते, त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा त्यांनी सांभाळली, त्यानंतर २०१९ पासून ते अजित पवार यांचे सावलीसारखे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावत असतानाच काल नियतीने त्यांच्यावर घाला घातला. विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्या समवेत विदीप जाधव व इतर तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 संध्याकाळी घरी मुक्कामाला येईन…

विदीप जाधव यांनी ‘मी आज दादांसोबत बारामतीला येतोय, संध्याकाळी घरी मुक्कामाला येईन’ असं सांगितलं होतं, पण विदीप जाधव हे तिरंग्यात लपेटून परतल्याचे पाहून त्यांच्या वृद्ध आई वडिलांनी आणि पत्नीने केलेला आक्रोश उपस्थितांची काळीज चिरणारा होता. त्यांच्या पश्चात आई वडील, दोन बहिणी, तीन भाऊ, पत्नी संध्या व १३ वर्षांची मुलगी नेत्रा जाधव आणि दहा वर्षांचा मुलगा अद्विक जाधव ही दोन मुले असा परिवार आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम- (How did Ajit Pawar plane crash?)

पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.
– बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे
– ILS (Instrument Landing System) सुविधा नाहीत.
– पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
– विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
– याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.
– धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.
– दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.
– DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.
– लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.
– सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला
– रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले
– आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
– विमानात भीषण आग लागली
– आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही
– अपघाताचा तपास चालू आहे; DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.

आणखी वाचा



Source link

तरुणांमध्ये वाढतोय मणक्याच्या दुखापतींचा धोका ; जीवनशैलीत योग्य बदल करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

0
तरुणांमध्ये वाढतोय मणक्याच्या दुखापतींचा धोका ; जीवनशैलीत योग्य बदल करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला


आपल्या पाठीचा कणा हा आपल्याला सरळ उभं राहायला आणि योग्य शारीरीक हालचालींकरिता मदत करतो. या पाठीच्या कण्याच्या आत असलेली स्पायनल कॉर्ड मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमध्ये संदेश पोहोचविण्याचे काम करते. हात-पाय हलवणे, वेदना जाणवणे, श्वास घेणे तसेच लघवी-मलविसर्जन यांसारख्या क्रिया स्पायनल कॉर्डमुळे शक्य होतात. यातील काही क्रिया आपल्या नियंत्रणात असतात, तर काही आपोआप होतात. स्पायनल कॉर्डला इजा झाली तर त्याचा परिणाम काही वेळापुरता किंवा कायमस्वरूपीही देखील होऊ शकतो.

Add Zee News as a Preferred Source

मणक्याच्या दुखापतीमुळे लाखो लोक त्रस्त आहेत. आजकाल पाठदुखी ही दीर्घकाळ कामावर गैरहजर राहण्याचे आणि अपंगत्वाचे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. एकाच जागी जास्त वेळ बसून काम करणे, बसण्याची चुकीची पद्धत, व्यायामाचा अभाव तसेच सततचा प्रवास किंवा कामाच्या सवयी यामुळे अगदी तरुण वयातही मणक्यावर अतिरिक्त ताण येतो.याशिवाय सकाळचे कोवळे ऊन न मिळ्ल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता हे पाठदुखीचं एक महत्त्वाचं कारण ठरत आहे.

मणक्याच्या दुखापती कशामुळे होतात?

* रस्त्यावरील अपघात

* उंचावरून खाली पडणे

* खेळताना झालेल्या दुखापती

* हिंसाचारामुळे होणारी दुखापत

* टीबी सारखे संसर्ग, गाठी (ट्यूमर)

* वयामुळे होणारी पाठीच्या कण्याची झीज

या दुखापती सौम्य कमजोरीपासून ते पक्षाघाताइतपत या गंभीर असू शकतात.

मणक्याच्या दुखापतींचा धोका कसा कमी कराल?

वाहन चालवताना न विसरता सीट बेल्ट लावणे, मोबाईल  फोनचा वापर न करणे आणि दारू पिऊन वाहन न चालवणे या चांगल्या सवयींमुळे मणक्याच्या दुखापती टाळता येतात. त्याचबरोबर घसरुन पडण्यासारखे किरकोळ अपघात टाळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. घरात रेलिंग बसवणे, रात्रीच्या वेळी घरात योग्य प्रकाश पडेल अशी सुविधा असणे, धूम्रपान व मद्यपान टाळणे, वजन नियंत्रित राखणे, भरपूर पाणी पिणे आणि न घसरणारी पादत्राणे वापरणे गरजेचे आहे.

खेळाडूंनी विशेष काळजी घेत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सुरक्षा साधने वापरणे आवश्यक आहे.पाठदुखी, हात-पाय सुन्न होणे किंवा अशक्तपणा जाणवल्यास  त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वमर्जीने औषधे घेणे धोकादायक ठरू शकते.

मणका निरोगी ठेवण्यासाठी काय कराल?

मणक्याची काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचे सेवन अतिशय गरजेचे आहे. अतिव्यायाम करणे टाळा कारण यामुळेही मणक्याची झीज होऊ शकते.चालणे, पोहणे, सायकल चालवणे, स्ट्रेचिंग आणि योगासनांमुळे मणक्याला आधार देणारे स्नायू मजबूत होतात.कामाच्या ठिकाणी आणि घरी बसताना योग्य शारीरीक स्थिती राखणे, वजन उचलताना पाठ सरळ ठेवणे आणि वजन नियंत्रित राखणे गरजेचे आहे. यामुळे मणक्यावर ताण कमी होतो.





Source link

झोपल्यावर तुमच्याही तोंडातून लाळ येते? सावधान! असू शकतात असुरक्षित आरोग्याचे संकेत

0
झोपल्यावर तुमच्याही तोंडातून लाळ येते? सावधान! असू शकतात असुरक्षित आरोग्याचे संकेत


Causes And Side Effects Of Drooling While Sleeping: तोंडातील लाळ दातांची स्वच्छता, पचन संस्था सुधारणे यांसारख्या कार्यांमध्ये फायदेशीर ठरते. पण तुम्ही निरिक्षण केले असेल की, सकाळी झोपेतून उठल्यानंतर उशी ओली दिसते, ओठांच्या बाजूला पांढरे डाग असतात. हे रात्री झोपेत तोंडातील लाळ बाहेर आल्यामुळे होते. गाढ झोप लागली म्हणून किंवा तोंड उघडं ठेवून झोपल्याने तोंडामधील लाळ बाहेर आली असेल असे समजून याकडे दुर्लक्ष करत असाल तर, असा विचार करणं आत्ताच थांबवा. कारण हे कधीतरी न होता रोज होत असेल तर, असुरक्षित आरोग्याचे मोठे संकेत असू शकते. चला तर मग जाणून घेऊया, काय आहेत यामागची कारणे? आणि यामुळे कोणत्या आजारांचा धोका असू शकतो? 

Add Zee News as a Preferred Source

 

झोपल्यानंतर तोंडातून लाळ का येते?

आरोग्य तज्ज्ञांनुसार, झोपल्यानंतर लाळ गळण्याच्या स्थितीला ‘सियालोरिया’ किंवा ‘हाइपरसलावेशन’ असे म्हटले जाते. या स्थितीत तोंडातून अत्याधिक लाळ गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या थेट झोपेचे आरोग्य आणि श्वसनसंस्थेशी संबंधित आहे. त्यामुळे यामागचे कारण आणि उपाय सर्वांना माहित असणे आवश्यक आहे. 

 

झोपल्यानंतर तोंडातून लाळ येण्याचे कारण काय? 

चुकीची झोपण्याची पद्धत:

झोपल्यानंतर तोंडातून लाळ येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने झोपणे. तुम्ही जर रात्रभर एकाच कुशीवर झोपता किंवा पोटावर (उपडी) झोपता तर तुम्हाला या समस्येला अधिक जाणवेल. कारण गुरुत्वाकर्षणामुळे लाळ तोंडात रोखली जाऊ शकत नाही, ज्यामुळे ती उशीवर सांडते. 

 

नाक बंद होण्याच्या समस्या

जर तुम्हाला सर्दी झाली असेल, सायनसची समस्या असेल तर, झोपेत नाक बंद होऊ शकतो. नाक बंद झाल्यामुळे व्यक्ती तोंडाने श्वास घेऊ लागतो. यामुळे झोपताना तोंड उघडे राहते. यामुळे देखील झोपेत तोंडातून लाळ येते. 

 

अ‍ॅसिड रिफ्लेक्स

अ‍ॅसिड रिफ्लेक्सची समस्या असल्यास यामुळे झोपेच्या स्थितीत पोटातील अ‍ॅसिड वर येऊन घशाला जळजळ होते. हे अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी शरीर अतिरिक्त लाळ निर्माण करते. यामुळे झोपेत लाळ येण्याची समस्या उद्धभवते. 

 

औषधांचे दुष्परिणाम

काहीवेळा औषधांचा दुष्परिणाम होऊन देखील तोंडातून लाळ येण्याची शक्यता असते. विशेषतः मानसिक आजार किंवा अल्जाइमरच्या निदानासाठी असलेल्या औषधांमुळे शरीरात अत्याधिक लाळ निर्मिती होते. जर तुम्हालाही असे आजार असतील आणि औषधांचे सेवन केल्यानंतर तोंडातून लाळ येण्याची समस्या होत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करू नये. 

 

स्लीप एपनियाचे लक्षण 

जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती झोपताना घोरत असेल, सारखी झोप मोड होत असेल तसेच झोपल्यानंतर तोंडातून लाळ येत असेल तर, हे स्लीप एपनिया या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. 

 

झोपताना तोंडातून लाळ येणे कसे थांबवाल?

यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे, कुशीवर किंवा पोटावर झोपण्याऐवजी पाठीवर झोपण्याची सवय करा. जर झोपेत नाक बंद होत असेल तर, झोपण्याआधी वाफ घेणे फायदेशीर ठरेल. दिवसभर पुरेसे पाणी प्या, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमी भासणार नाही. कोणत्याही औषधांमुळे ही समस्या जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या





Source link

रोज फक्त 20 मिनिटे चालल्यावर शरीरात काय बदल होतात? फायदे ऐकून थक्क व्हाल!

0
रोज फक्त 20 मिनिटे चालल्यावर शरीरात काय बदल होतात? फायदे ऐकून थक्क व्हाल!


Benefits Of Walking 20 Minuts Daily: आजकालच्या बदलत्या जीवनशैलीचे परिणाम फक्त शारीरिक आरोग्यावरच नाही तर, मानसिक आरोग्यावरही होत असतात. कामाच्या व्यस्ततेमुळे आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. तसेच काही कामे अशी असतात, ज्यामध्ये सलग 8 ते 9 तास एकठिकाणी बसून काम करावे लागते. शरीराची फारशी हालचाल होत नाही. याशिवाय खाण्याच्या वेळा पाळता येत नाहीत, जंक फूडचे सेवन वाढते. लठ्ठपणा वाढतो, व्यायाम करण्यासही वेळ मिळत नाही. कामाच्या ठिकाणी वाढता ताण, रोजचा धकाधकीचा लोकल प्रवास यामुळे मानसिक आरोग्य बिघडते. सतत थकवा जाणवतो. मुख्य म्हणजे रोज तेच काम, तोच प्रवास यामुळे जीवनातील आनंद हरवून गेला आहे असे वाटते. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, रोज फक्त 20 मिनिटे चालणे या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतो. 

Add Zee News as a Preferred Source

 

अनेक जणांना कामाच्या व्यस्ततेमुळे व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नसेल त्यांच्यासाठी देखील दररोज फक्त 20 मिनिटे चालणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे फक्त आरोग्यदायी फायदेच नाही तर, रोज एक नवीन ऊर्जाही मिळेल. तुम्ही तुमच्या रोजच्या कंटाळवाण्या दिवसाचे रूपांतर एका ऊर्जात्मक आणि आनंददायी दिवसात करू शकता. 

दररोज 20 मिनिटे चालल्याने काय फायदे मिळतात?

1. मानसिक आरोग्य सुधारते

चालण्यामुळे शरीरात एंडोर्फिन (Endirphins) हे ‘फील-गुड’ हार्मोनची निर्मिती होते. यामुळे तणाव कमी होतो, चांगली झोप मिळते, स्मरणशक्तीही सुधारते आणि आनंददायी वाटते. 

2. हृदयाचे आरोग्य 

शरीराची हालचाल न झाल्यास रक्ताभिसरण संस्था मंदावते. शरीरात योग्यप्रकारे रक्तप्रवाह होत नाही. रोज फक्त 20 मिनिटे चालल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत होते, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रोल नियंत्रित राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे सुमारे 30 टक्क्यांपर्यंत हृदयाचा धोका कमी होतो. 

3. पचन सुधारते आणि वजन नियंत्रित राहते

जरी कमी व्यायाम करत असला किंवा व्यायाम करण्यास वेळ मिळत नसेल तरी, दरोरज 20 मिनिटे चालल्याने शरीरातील चयापचय क्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते. तसेच जेवणानंतर चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. 

4. स्नायू आणि हाडे मजबूत होतात

चालल्यामुळे पायांचे स्नायू आणि कमरेचे स्नायू मजबूत होतात. तसेच हाडांची घनता वाढते. ज्यामुळे भविष्यात सांधेदुखीचा त्रास कमी होतो. 

5. शारीरिक ऊर्जा वाढते

चालल्यामळे शरीरातील पेशींना अधिक ऑक्सिजन मिळतो. यामुळे दिवसभर येणारा थकवा नाहीसा होतो. दिवसभरात अधिक ऊर्जा जाणवते. 





Source link

मुंबई शालेय क्रीडा संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रा. राम अहिवळे यांची निवड

0
मुंबई शालेय क्रीडा संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रा. राम अहिवळे यांची निवड


मुंबई : आशिया खंडातील शालेय स्तरावरील खेळाडूंना प्रोत्साहन देणारी सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शालेय क्रीडा संस्था (Mumbai School Sports Association) यांच्या उपाध्यक्षपदी प्रा. राम अहिवळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक, साहित्यिक व क्रीडा क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रा. राम अहिवळे हे एक प्रख्यात बालसाहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या लेखनातून बालमनाचा वेध घेणारी सहज, संस्कारक्षम आणि प्रेरणादायी साहित्यनिर्मिती त्यांनी केली आहे. शिक्षण, साहित्य आणि समाजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. मुधोजी हायस्कूल, फलटण येथे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले, तर रयत शिक्षण संस्था, सातारा येथे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या संस्कारशील परंपरेचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर स्पष्टपणे दिसून येतो.
मुंबई शालेय क्रीडा संस्था ही शालेय स्तरावर क्रीडा प्रतिभा शोधून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंचे मार्गदर्शन, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना संधी मिळवून देण्यात या संस्थेचा मोठा वाटा आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रा. अहिवळे यांची निवड होणे ही निश्चितच सन्मानाची बाब मानली जात आहे.
या निवडीमुळे क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळेल, तसेच शालेय खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावी धोरणे राबवली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रीडा आणि शिक्षण यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी प्रा. अहिवळे यांचा अनुभव निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, साहित्यिक, शिक्षकवर्ग, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध सामाजिक स्तरांतून त्यांचे मनापासून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

पेनी गोल्डबर्ग यांचा कॉलम: एआयचे फायदे घेण्यासाठी शिक्षणावर जास्त लक्ष केंद्रित करावे‎

0
पेनी गोल्डबर्ग यांचा कॉलम:  एआयचे फायदे घेण्यासाठी शिक्षणावर जास्त लक्ष केंद्रित करावे‎




‎‎‎‎‎‎‎‎‎‎गेल्या दोन वर्षांत लार्ज लँग्वेज मॉडेल्सच्या (एलएलएम)‎वाढीमुळे अशी भीती निर्माण झाली की एआय लवकरच‎महाविद्यालयीन शिक्षण, विशेषतः उदारमतवादी कला‎अभ्यास यांना अप्रासंगिक बनवेल. अशा परिस्थितीत‎तरुणांनी कॉलेज सोडून थेट कामावर जाणे चांगले होईल.‎मी पूर्णपणे असहमत आहे. व्यावहारिक अनुभवातून‎शिकणे मौल्यवान आहे. परंतु भविष्यात कोणत्या नोकऱ्या‎आणि कौशल्यांची मागणी असेल याची लोकांना चांगली‎समज असेल तरच ते कार्य करते. हे खरे आहे की‎रोजगाराचे भविष्य अनिश्चित आहे. परंतु तरुणांना शक्य‎तितक्या लवकर कॉलेज सोडून कामगार बाजारात प्रवेश‎करण्याचा सल्ला देणे दिशाभूल करणारे आहे.‎ आधुनिक एआयचे प्रणेते मानले जाणारे जेफ्री हिंटन यांनी‎एकदा त्यांच्या क्षेत्रातील विकासाची तुलना धुक्यातून‎मार्गक्रमण करण्याशी केली : तुम्हाला पुढचा मार्ग दिसतो.‎पण त्यापलीकडे काय आहे ते दिसत नाही.‎शिक्षकांसमोरील आव्हान म्हणजे विद्यार्थ्यांना अशा‎परिस्थितीत प्रभावीपणे काम करण्यासाठी तयार करणे.‎उपाय म्हणजे त्यांना लवकरच कालबाह्य होऊ शकणाऱ्या‎कामांसाठी प्रशिक्षित करणे नाही. तर त्यांना अधिक‎अनुकूल बनवणे.‎ या दृष्टिकोनातून शिक्षणाची भूमिका – आणि विशेषतः‎उच्च शिक्षणाची – पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची बनते.‎भविष्यात कोणत्या कौशल्यांची मागणी असेल हे‎आपल्याला माहित नसल्यामुळे मूलभूत गोष्टींकडे परतणे‎आवश्यक आहे. उदारमतवादी शिक्षण काय करावे यावर‎नव्हे तर कसे विचार करावे यावर भर देते. ते विद्यार्थ्यांना‎तर्क करायला, काळजीपूर्वक वाचायला, स्पष्टपणे‎लिहायला आणि पुराव्यांचे मूल्यांकन करायला शिकवते.‎ही कौशल्ये इतर तांत्रिक कौशल्यांपेक्षा काळाच्या‎कसोटीवर खूप चांगल्या प्रकारे उतरतात. याचा अर्थ असा‎नाही की तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष केले पाहिजे. उलट‎विद्यार्थ्यांनी एआयसोबत काम करायला शिकले पाहिजे.‎गणित, तर्कशास्त्र आणि तर्क शिकवणे; मूलभूत‎पाठ्यपुस्तकांमध्ये व्यस्त राहणे; आणि युक्तिवाद कसे‎तयार केले जातात आणि त्यांची चाचणी कशी केली जाते‎हे समजून घेणे – हे सर्व आजही आवश्यक आहे. ही‎अशी कौशल्ये आहेत जी आपल्याला तंत्रज्ञानाच्या पुढे‎राहण्यास सक्षम करतात. आपण काय शिकावे आणि ते‎कसे शिकवावे? पहिला प्रश्न कठीण आहे आणि‎स्वाभाविकपणे वादविवाद निर्माण करेल. मुख्य‎संकल्पनांच्या महत्त्वावर व्यापक सहमती असू शकते,‎परंतु कालांतराने तपशील बदलतील. पूर्वीच्या‎तंत्रज्ञानाबाबतचा आपला अनुभव विचारात घ्या.‎कॅल्क्युलेटर आणि संगणकांनी अंकगणित शिकवण्याची‎गरज दूर केली नाही. विद्यार्थी अजूनही गणना कशी‎करतात हे शिकतात. त्याचप्रमाणे, स्पेलिंग आणि‎व्याकरण महत्वाचे आहे. एआयला अनेक क्षेत्रांमध्ये‎समान समायोजनांची आवश्यकता आहे. एलएलएम‎आता लेखाचा सारांश देणे किंवा त्याची मध्यवर्ती कल्पना‎ओळखणे अशी कामे करण्यास सक्षम आहेत.‎ असा युक्तिवाद केला जातो की एआय औपचारिक‎शिक्षणाची आवश्यकता कमी करेल कारण ते मागणीनुसार‎माहिती आणि मार्गदर्शन प्रदान करू शकते. परंतु ही‎धारणा या गृहीतकावर आधारित आहे की वापरकर्त्यांना‎काय विचारायचे आहे आणि त्यांना मिळालेल्या उत्तरांचा‎अर्थ कसा लावायचा हे माहित आहे. एआयपासून‎समाजाला फायदा करून द्यायचा असेल तर शिक्षणात‎कमी नाही तर अधिक गुंतवणूक गरजेची असेल.‎(@प्रोजेक्ट सिंडिकेट)‎



Source link

सत्तेच्या केंद्रस्थानी असलेला नेता : अजित पवार यांचा राजकीय आलेख

0
सत्तेच्या केंद्रस्थानी असलेला नेता : अजित पवार यांचा राजकीय आलेख

फलटण :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती, धक्कादायक निधन चटका लावणारे आहे. अत्यतं उमदे व्यक्तिमत्व असणाऱ्या अजितदादांच्या जीवनाचा शेवट नियतीने असा का केला असावा हा प्रश्न राहून राहून मनात येतो. अजित पवार यांची गेल्या ३५ वर्षांवरची कारकीर्द वादळी, झंझावाती होती. काका आणि गेल्या साठ वर्षांच्या राजकारणाचे साक्षिदार असणारे शरद पवार यांच्या तालमीत त्यांनी कारकीर्द सुरु केली. असे सांगितले जाते की, मोठ्या झाडाखाली लहान झाड फार काळ तग धरत नाही, वाढत नाही. खुरटे रहाते. अंतर समाजाचे हे म्हणणे अजित पवार यांनी खोटे ठरवले. खरे तर अजित पवार हे नेतृत्व गुण घेऊन ते जन्माला आले होते. तडफ होती. सर्वसामान्यांचे प्रश्न समजण्याची जाणीव होती. प्रशासनावर पकड होती. स्पस्टवक्तेपणा असला तरी आतल्या गाठीचे ते नव्हते. खुनशी, डूख ठेवणारे नव्हते. असेल ते तोंडावर, मोकळेपणाने आणि थेट होते. सहाजिकच अशी व्यक्ती परवडणारी नसते. मात्र तिने केल्या तिच्या जागेमुळे तिला बाजूला करणे ही सोपे नसते. अजित दादा यांनी राज्यात काँग्रेसचे राज्य होते तेंव्हा काँग्रेसमध्ये आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर राष्ट्रवादीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले होते. शरद पवार यांच्यावर राजीव गांधींच्या निधना नंतर व्ही. पी. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवली. त्यावेळी अजित पवार खरे तर खासदार म्हणून निवडून गेले होते. मात्र शरद पवार यांना आणि यांचा अत्यंत सुरक्षित मतदार संघ म्हणून अजित पवार यांनी राजीनामा देऊन शरद पवार यांच्यासाठी जागा रिकामी दादा पुन्हा दिल्लीकडे महाराष्ट्राचे राजकारण केले. विशेषतः शरद व्यक्ति मत्वात अग्रणी होते. काँग्रेस केली. मात्र त्या नंतर अजित वळले नाही. त्यांनी सांभाळण्याचे काम पवार यांचा विश्वासपात्र त्यांच्यावेळी अजितदादा पक्षातून शरद पवार बाहेर पडल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. शरद पवार यांची भिस्त काँग्रेसमधून फुटून येणाऱ्या नेते कार्यकर्त्यांवर होती. मात्र संगमा आणि तारिक अन्वर सोडता शरद पवार यांच्या त्या बंडाला खासदारांनी साथ दिली नाही. काही प्रमाणात राज्यात आमदार सहभागी झाले. मात्र त्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या वयाच्या, काही कमी अधिक वयाच्या मंडळींची टीम तयार केली. शरद पवार हे सगळ्यांचे मार्गदर्शक होते मात्र पक्षाचे काम वाढवण्याचे, पक्ष सांभाळण्याचे काम अजित पवार यांनी केले. आज राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांच्याबरोबर गेले हे त्यांच्या योग्यवेळी योग्य निर्णयाचे, लवचिकतेचे द्योतक आहे. सहावेळा उपमुख्यमंत्री ते झाले. पण मुख्यमंत्री होता आले नाही. होण्याची संधी असताना ती गमावल्याची थेट टीका, मत त्यांनी शरद पवार त्यांच्या विरोधात जाहीरपणे त्यांनी व्यक्त केले. शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष पद सोडले त्या वेळी त्यांनी पक्ष चालवण्याची पूर्ण तयारी आपल्या पद्धतीने केली होती. त्यावेळच्या प्रसंगातून त्यांची ती इच्छा स्पस्ट जाहीर होत होती. आणि अनेकदा पक्ष श्रेष्टींचे ऐकूनही नेतृत्व करण्याची संधी मिळत नाही हे शल्य त्यांना होते. त्यांनी त्या पोटी भाजपच्या मैत्रीची वाट धरली. महायुतीत सामील झाले. शरद पवार यांनी वेळेत त्यांच्या हातात पक्ष सोपवला असता तर पक्ष फुटण्याची वेळ आली नसती. सुप्रिया सुळे दिल्ली आणि दादा राज्यात राहिले असते. पक्ष एकसंघ राहिला असता. पहाटेचा शपथ विधी ते कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळापाशी आत्मक्लेश हा त्यांचा पट होता. मांढरदेव दुर्घटनेत त्यांनी केलेले मदत कार्य ते काम होणार असेल तर हो आणि नसेल तर तोंडावर नाही हा त्यांचा खाक्या होता. त्यांच्या जीवावर राष्ट्रवादी पक्ष चालला होता. सत्तेत होता. घरापासून सुरु झालेल्यास संघर्ष कदाचित सामोपचाराच्या वाटेवर होता तेवढ्यात हे घडले. आता राजकारणात कोणते वळण नव्याने लागेल हे नक्की सांगता येणार नाही. दादांच्या राष्ट्रवादी पुढे जे दोन, तीन पर्याय आहेत त्यातला निवडणे किंवा शरद पवार यांनी पुन्हा एकदा दोन पक्षांना एकत्र करणे आदी विषय असू शकतात. खरेतर दादाच्याही मनात नसतात, वेळेचे पक्के असलेले दादा यांनी यमदूताला वेळ दिली नसताना आपल्यातून अजितदादा निघून गेले. त्याच्या स्मृती राजकारणातून कधीच मिटल्या जाणार नाहीत. मात्र एक झंजावात अनपेक्षितपणे निमाला आहे वास्तव आहे. साहस टाईम्स  न्यूज परिवाराकडून अजितदादांच्या पवित्र आत्म्यास विनम्र श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

बारामतीचा हिरा….

बारामतीचा विश्वकर्मा
विद्येचे प्रतिष्ठान जपणारा
जन सामांन्यांशी जोडलेला
नेता हा माणुसकी जाणणारा…

दिलखुलास संवाद साधत
मनामध्ये शिरणारा
धडाडीने निर्णय घेऊन
जागेवर न्याय करणारा…

असा कसा गेला अकाली
का नाही वेळ ही चुकली?
बारामतीत घडला हा हिरा
बारामतीतच आयुष्य रेषा तुटली…

रुबाबदार रूप तुमचे
पुन्हा आता दिसणार नाही
वाह रे पठ्ठे ही साद
पुन्हा कधी घुमणार नाही…

दुःख दिलेत जन्माचे
पोरके केलेत दादा क्षणात
जरी गेलात नजरे आड
रहाल कायम मनामनात…

जमिनीशी नाळ जोडलेल्या या लोकनेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली…💐🙏🥹
G. वर्षा…

What’s app वरून समभार

कोळकी गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य व कुस्ती क्षेत्राचे दिग्गज बाळासाहेब काशीद आणि पत्नी यांचा भीषण अपघातात मृत्यू

0
कोळकी गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य व कुस्ती क्षेत्राचे दिग्गज बाळासाहेब काशीद आणि पत्नी यांचा भीषण अपघातात मृत्यू


फलटण :- फलटण तालुक्यातील कोळकी गावावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोळकी गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि कुस्ती क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व, ‘स्वराज कुस्ती केंद्रा’चे वस्ताद श्री. बाळासाहेब काशीद आणि त्यांची पत्नी यांचे सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे झालेल्या रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, कुस्ती क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बाळासाहेब काशीद हे आपल्या कुटुंबासह मारुती सुझुकी बॅलेनो कारने प्रवास करत होते. टेंभुर्णी परिसरात रस्ता ओलांडत असताना किंवा पुढे जाण्याच्या प्रयत्नात, त्यांच्या कारचा एका कंटेनर ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या एसटी बसशी जोरदार धडक झाली.
ही धडक इतकी भीषण होती की कार चक्काचूर झाली आणि बाळासाहेब काशीद व त्यांची पत्नी यांना जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी तातडीने मदत केली, परंतु उशीर झाल्याने त्यांना वाचवता आले नाही. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
कुस्ती क्षेत्रासाठी हा अपघात अतिशय मोठा धक्का आहे. बाळासाहेब काशीद हे केवळ राजकीय पदाधिकारी नव्हते, तर कुस्ती क्षेत्रात मार्गदर्शक आणि हाडाचे पैलवान होते. ‘स्वराज कुस्ती केंद्रा’च्या माध्यमातून त्यांनी अनेक मल्ल घडवले, आणि त्यांच्या जाण्याने कोळकी गावाने एक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आणि कुस्ती क्षेत्राचा आधार गमावला आहे.
कोळकी ग्रामस्थांनी “एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीला आणि पैलवानांच्या मार्गदर्शकाला आम्ही आज मुकलो आहोत,” असे सांगून दु:ख व्यक्त केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने मोठा धक्का. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली. दुःखाच्या प्रसंगी आज फलटण-कोरेगावमधील सर्व निवडणूक प्रचार कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा.      

0
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने मोठा धक्का. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली. दुःखाच्या प्रसंगी आज फलटण-कोरेगावमधील सर्व निवडणूक प्रचार कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा.      

                  

फलटण : .   “राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विकासाचा महामेरू अजितदादा पवार (Ajit Dada Pawar) यांचे आज झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी मनाला चटका लावणारी आणि अतीव दुःख देणारी आहे. त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महायुतीचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. आज आम्ही खंबीर मार्गदर्शक गमावला आहे,” अशा अत्यंत भावूक शब्दांत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.                                                                                 बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याचे वृत्त समजताच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.

या अत्यंत दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, “अजितदादांच्या निधनामुळे आम्ही स अत्यंत धक्क्यात आणि दुःखात आहोत. या
आजचे सर्व प्रचार दौरे आणि कार्यक्रम रद्द

या अत्यंत दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, “अजितदादांच्या निधनामुळे आम्ही सर्वजण अत्यंत धक्क्यात आणि दुःखात आहोत. या पार्श्वभूमीवर, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नियोजित असलेले सर्व प्रचार कार्यक्रम, कोपरा सभा, रॅली आणि दौरे रद्द करण्यात आले आहेत.” सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी आणि आजचा दिवस आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी समर्पित करावा, असे आवाहन त्यांनी केले.
स्पष्टवक्ता आणि प्रशासनावर पकड असणारा नेता हरपला”

श्रद्धांजली वाहताना रणजितसिंह पुढे म्हणाले, “अजितदादा हे राजकारणातील एक असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांची प्रशासनावर जबरदस्त पकड होती. कामाचा प्रचंड उरक आणि दिलेला शब्द पाळण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. सकाळी ६ वाजता कामाला सुरुवात करणारा आणि रात्री उशिरापर्यंत जनतेच्या सेवेत रमणारा असा नेता पुन्हा होणे नाही. फलटण तालुक्याच्या विकासात त्यांचे योगदान आम्ही कधीही विसरू शकणार नाही                                                     महायुतीचा कणा तुटला…”

“गेल्या काही वर्षांत महायुतीमध्ये काम करत असताना दादांचा जो सहवास आणि मार्गदर्शन लाभले, ते माझ्यासाठी मोलाचे होते. कितीही कठीण प्रसंग आला तरी न डगमगता निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आम्हाला प्रेरणा देत असे. आज त्यांच्या जाण्याने महायुतीचा कणाच तुटला आहे.

विकासाच्या प्रश्नांवर राजकारण बाजूला ठेवून मदत करणारा असा दिलदार नेता आज आपल्यात नाही, यावर अजूनही विश्वास बसत नाही,” असे रणजितसिंह यांनी सांगितले. बातमी तयार करा