एक खूप गहन बाब आहे की, पूजेच्या बाबतीत अत्युच्च समर्पण भावसमजू शकतो. परंतु कर्मकांडाच्या आहारी जाऊन त्या गोष्टीचावेडेपणा निश्चितच चुकीचा होय.आपल्या संतांनी हीच बाब उत्तमरीत्यासमजून घेतली होती. भक्तिकाळात एक मोठे काम झाले. त्या काळीप्रचलित धर्म अनेक कारणांमुळे निष्प्राण होत होता. भरकटत होता. यासंतांनी त्यात प्राण फुंकले. सध्या शिक्षण तंत्रज्ञानाला कलेचाही थोडाआधार घ्यायला हवा, अन्यथा ते पूर्णपणे कोरडे होईल. धर्माच्याबाबतीतही हेच घडत आहे. काही लोक धर्माला राजकारणाच्याआश्रयाला घेऊन जात आहेत, तर काही निव्वळ कर्मकांडांकडे. खरंतर धर्माला योगाशी जोडावे लागेल. यंत्रयुगात हे अत्यंत गरजेचे आहे.विशाल धार्मिक परंपरा अशा ठिकाणी उभी राहिली आहे. जिथे धर्म,अर्थ, काम आणि मोक्ष असे मार्ग आहेत. ध्येय निश्चित केल्यानंतरचमार्गावरून चालावे.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: धर्माला योगाशी जोडावे लागेल,या युगात ते अत्यंत गरजेचे
मनोज जोशी यांचा कॉलम: एका ‘इस्लामिक नाटो”चाआपल्यासाठी अर्थ काय ?
आजकाल ‘इस्लामिक नाटो” बद्दल बरीच चर्चा आहे.परंतु मध्य पूर्वेतील इस्लामिक युतीची कल्पना नवीननाही. १९५५ मध्ये सोव्हिएत युनियनचा सामनाकरण्यासाठी ब्रिटन आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालीबगदाद कराराची स्थापना झाली होती. त्यात इराक, तुर्की,पाकिस्तान आणि इराण यांचा समावेश होता. त्याचवर्षीत्याचे केंद्रीय करार संघटनेत (सेंटो) रूपांतर झाले. हीव्यवस्था १९७९ मध्ये विघटित झाली. २०१५ मध्ये सौदीअरेबियाने इसिसविरुद्ध युद्ध पुढे नेण्यासाठी इस्लामिकमिलिटरी दहशतवाद प्रतिबंधक आघाडीची स्थापनाकेली होती. २०१७ मध्ये पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुखराहील शरीफ यांना त्यांचे पहिले लष्करी कमांडर म्हणूननियुक्त करण्यात आले होते. आता पाकिस्तान-सौदीसामरिक परस्पर संरक्षण करार अस्तित्वात आला आहे. त्यात नाटोप्रमाणेच संघटेतील कोणत्याही देशावर हल्ला करणे हा संपूर्ण संघटनेवर हल्ला मानला जाईल आणि त्याला प्रत्युत्तर दिले जाईल अशी तरतूद आहे. तुर्कीदेखील या गटात सामील होण्याचा विचार करत आहे.सध्या अशा //”इस्लामिक नाटो’ सारखी कोणतीही औपचारिक संघटना अस्तित्वात नसली तरी त्याचीशक्यता गंभीर भू-राजकीय परिणाम करू शकते. सौदी-पाक करार इराणसोबत अमेरिका-इस्रायल युद्ध, इस्रायलने कतारवर बॉम्बहल्ला, येमेनवरील सौदी-युएईतणाव आणि भारताचे ऑपरेशन सिंदूर यासारख्याघटनांच्या पार्श्वभूमीवर आला आहे. या घटनांनंतर मध्यपूर्वेतील इस्रायलच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवरसौदी अरेबियाला एक विश्वासार्ह युतीची गरजअसल्याचे जाणवले. पाकिस्तानबद्दल सांगायचे तर सौदीअरेबिया त्याच्या डळमळीत अर्थव्यवस्थेला आर्थिकजीवनरेखा प्रदान करू शकते. १९६७ च्या सुरक्षाकरारानंतर – आणि पुन्हा एकदा काबातील अतिरेकीघुसखोरी आणि १९७९ मध्ये इराणी क्रांतीच्यापार्श्वभूमीवर – पाकिस्तानी सैन्याने सौदी अरेबियालासुरक्षा प्रदान केली हे आठवते. पाकिस्तानची अण्वस्त्रक्षमता देखील या गटासाठी एक मोठी वाढ आहे.इस्लामाबादने काश्मीरवर आंतरराष्ट्रीय पाठिंबा मागितलाआहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या इस्लामिक संदर्भात हावाद मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शक्तिशालीइस्लामिक सुरक्षा गटातील सदस्यत्वामुळे पाकिस्तानचाराजनैतिक प्रभाव वाढू शकतो. इतर सदस्य देश काश्मीरमुद्द्याचे लष्करीकरण करण्यास नाखूष असले तरीही. याव्यवस्थेत तुर्कीयेचा रस मध्य पूर्वेतील घडामोडींशीजोडलेला आहे. तो एकेकाळी उस्मानी साम्राज्याचा भागहोता. नाटो सदस्य असूनही तुर्कीयेला अमेरिकेवरीलअवलंबित्व कमी करायचे आहे. खरंच त्याच्या मजबूतलष्करी क्षमतेमुळे तो स्वतःला इस्लामिक जगाचा नेताम्हणून पाहतो. शिवाय त्याच्याकडे एक मजबूत संरक्षणउद्योग आणि युद्धभूमीचा मोठा अनुभव आहे. ही नवीदिल्लीसाठी एक सामरिक चिंता असू शकते. पश्चिमआशिया, आफ्रिकेचा काही भाग आणि दक्षिणआशियामध्ये पसरलेला असा वैचारिकदृष्ट्या आधारितलष्करी गट प्रादेशिक संतुलनाची पुनर्परिभाषा करेल.त्याकडे भारत दुर्लक्ष करू शकत नाही. मध्य पूर्वेतील याघडामोडींचा एक तात्काळ परिणाम म्हणजे युएई आणिभारत यांच्यातील महत्त्वपूर्ण संबंध समोर आला आहे.अलिकडेच युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेदयांनी भारताचा अधिकृत दौरा केला. मध्य पूर्वेतीलवाढत्या तणावादरम्यान झालेल्या या भेटीने बरेच लक्षवेधले. अधिकाऱ्यांच्या मते दोन्ही नेत्यांनी भारत-युएईव्यापक धोरणात्मक भागीदारी आणि आर्थिक संबंध पुढेनेण्यावर चर्चा केली.सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजेधोरणात्मक संरक्षण भागीदारीवर करार करण्याच्याइराद्याची घोषणा. सौदीच्या नेतृत्वाखालील तथाकथित//”इस्लामिक नाटो’ ला युएईचा प्रतिसाद असल्याचे दिसूनयेते. भारताचे परराष्ट्र धोरण पारंपारिकपणे बहुध्रुवीय जगातभरभराटीला आले आहे. त्यांनी व्यावहारिकराजनैतिकतेद्वारे मुस्लिम बहुसंख्य देशांशी आपले संबंधव्यवस्थापित केले आहेत. “इस्लामिक नाटो’ याव्यावहारिकतेची जागा ओळख-आधारित आघाडी घेऊशकते. यामुळे भारताची कूटनीतिच्या पातळीवरीललवचिकता कमी होईल. विशेषतः पश्चिम आशियामध्ये.येथे नवी दिल्लीने सौदी अरेबिया, इराण, इस्रायल आणिआखाती देशांशी असलेले आपल्या संबंधात मोठेसंतुलन आणले आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे .)
‘इस्लामिक नाटो”चा कणा बनू शकतातअशाच प्रदेशांमधून भारताच्या आर्थिकजीवनरेषा जातात. पर्शियन आखात,लाल समुद्र आणि हिंदी महासागर. परंतुमुस्लिम बहुल देशांचेही धोरणात्मकहितसंबंधांमध्ये खोलवर मतभेद आहेत.
Source link
फलटण तालुक्यात भाजपमध्ये नाराजीचा भडका; निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप, निवडणुकीत मोठ्या उलथापालथीची शक्यता

फलटण – नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात भाजपच्या अंतर्गत राजकारणाला चांगलाच उधाण आले आहे. या निवडणुकीत पक्षातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारून नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्यात आल्याने असंतोषाची लाट पसरली आहे. यामुळे भाजपच्या निर्णयप्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याचा थेट फटका निवडणूक निकालांवर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘इन्कमिंग’ सुरू असल्याने जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये बळावत आहे. याचे ठळक उदाहरण म्हणजे भाजपचे फलटण तालुकाध्यक्ष अमित रणवरे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची घटना. पक्षाने डावलल्यामुळे नाराज झालेल्या रणवरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यामुळे सुरवडी गण आणि निंभोरे पंचकृषी परिसरात प्रचंड नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.
या घडामोडींमुळे भाजपला या मतदारसंघात मोठा सेटबॅक बसण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. अमित रणवरे आपला अपक्ष अर्ज मागे घेणार की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल; मात्र सध्यातरी त्यांचा बंडखोर पवित्रा भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे.
याचबरोबर कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यापासून निष्ठावंत असलेले कार्यकर्ते बाळासाहेब कदम यांचे चिरंजीव सिद्धिराज कदम यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला की मुद्दाम अवैध करण्यात आला, याबाबत गिरवी गावात जोरदार चर्चा सुरू आहे. सिद्धिराज कदम यांच्या राजकारणाच्या सुरुवातीलाच असा अडथळा आणण्यामागे काही राजकीय डावपेच तर नाहीत ना, असा सवाल स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे. राजकारणात नव्याने प्रवेश करणाऱ्या तरुण नेतृत्वाला बाजूला सारण्याचा हा प्रयत्न असल्याची कुजबुजही ऐकू येत आहे.
जर भाजपने येत्या काळात नाराज निष्ठावंतांची समजूत काढली नाही, तर याचा मोठा फटका पक्षाला बसणार, यात कोणतीही शंका नाही. या परिस्थितीचा थेट फायदा शिवसेनेचे किरण साळुंखे पाटील, अमोल सस्ते आणि सह्याद्री कदम यांना होण्याची दाट शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
एकंदरीत फलटण तालुक्यात भाजपच्या अंतर्गत नाराजीमुळे निवडणूक रणधुमाळी अधिकच रंगण्याची चिन्हे असून, येत्या काही दिवसांत घडणाऱ्या घडामोडी तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणार
समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर भक्तवडीत उत्साहात संपन्न

कोरेगाव (प्रतिनिधी) : समता सैनिक दलाचे सैनिक प्रशिक्षण शिबिर भक्तवडी, तालुका कोरेगाव येथे भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने यशस्वीपणे संपन्न झाले. या शिबिरामध्ये पुरुष १७ व महिला २४ अशा एकूण ४१ प्रशिक्षणार्थींनी समता सैनिक म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले.
यावेळी बोलताना समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले म्हणाले, “समता सैनिक दल म्हणजे शक्तीचे प्रदर्शन नव्हे, तर शिस्त, संघटन आणि संविधानिक मूल्यांवर आधारित समाजरक्षणाची चळवळ आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल स्थापन करण्यामागे अतिशय स्पष्ट, दूरदृष्टीपूर्ण आणि क्रांतिकारी हेतू ठेवला होता. तो हेतू केवळ संघटन उभारणीपुरता मर्यादित नव्हता, तर समाजपरिवर्तनाचा शिस्तबद्ध मार्ग होता.
अन्याय-अत्याचारांपासून समाजाला संरक्षण मिळावे. दलित, वंचित व बौद्ध समाजावर होणाऱ्या अन्याय, छळ, दंगली व सामाजिक बहिष्काराच्या घटनांना शिस्तबद्ध आणि अहिंसक पद्धतीने प्रतिकार करता यावा, हा प्रमुख उद्देश होता.
स्वाभिमान व आत्मसन्मान जागृत करणे हा हेतू होता
“आपण गुलाम नाही, तर या देशाचे समान नागरिक आहोत” ही भावना समाजमनात रुजवण्यासाठी संघटित, गणवेशधारी व शिस्तबद्ध दल उभारण्याचा बाबासाहेबांचा विचार होता.” असे दादासाहेब भोसले म्हणाले.
यावेळी बोलताना राजाराम कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला भारतीय बौद्ध महासभा ही धम्म संस्था दिली.यासोबतच त्यांनी समता सैनिक दल ही दिले. आज सैनिकांची गरज का आहे याचाही आपण विचार करायला हवा. जास्तीत जास्त सैनिक शिबिरांचे आयोजन आपल्याला करायला हवे.
हे प्रशिक्षण समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तसेच सातारा व पुणे जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे प्रभारी, राज्याचे संघटक दादासाहेब भोसले, डिव्हिजन ऑफिसर संपत भोसले आणि समता फोर्सच्या कंपनी कमांडर अर्चना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. त्यांनी शिस्त, संघभावना, कवायत, संविधानिक मूल्ये व सामाजिक जबाबदारी यांचे सखोल प्रशिक्षण सैनिकांना दिले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष राजाराम कांबळे, माजी अध्यक्ष सुनील कांबळे, कोरेगाव तालुक्याच्या महिला शाखेचे अध्यक्ष शर्मिला आवाडे, उपाध्यक्ष निलेश मोरे तसेच सैनिक अमोल गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी वाटर स्टेशनच्या जयश्री कांबळे लोणंद च्या गंगुबाई सोनवणे उपस्थित होत्या.
या शिबिरास भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) चे अध्यक्ष नानासो मोहिते यांनी परवानगी देत शुभेच्छा व्यक्त केल्या. समता, बंधुता व न्याय या मूल्यांची जपणूक करणारे समर्पित सैनिक घडविण्याच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे ठरले, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Ladki Bahin: ई-केवायसी करुनही पैसे मिळेना; ‘लाडक्या बहिणीं’चा हफ्ता आचारसंहितेच्या कचाट्यात?

Ladki Bahin: लाडकी बहिणीचा हप्ता रखडल्यामुळे राज्यातीव महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.
Source link
साताऱ्यातील लव्ह ट्रँगलची रक्तरंजित कहाणी, महिलेने एक्स अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराल
Satara Crime Murder news: सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्याला हादरवून टाकणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून (Love Triangle) एका तरुणाचा अत्यंत निर्घृण खून करण्यात आला. तरुणाचा खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणात एका महिलेसह तिचा पती आणि दोन प्रियकरांचा सहभाग उघडकीस आला असून, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Phaltan Murder news)
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात मौजे सोमंथळी गावातील सागर दादासो दडस यांनी 21 जानेवारी ला आपला भाऊ सतीश उर्फ आप्पा दादासो दडस याची हरवल्याची तक्रार दाखल केली होती. विडणी परिसरात शोध घेऊन ही सतीशचा थांगपत्ता लागला नाही. दरम्यान सागर यांना त्याच्या मालकाकडून धक्कादायक माहिती मिळाली. लखन बुधावले याचा फोन आला असून सतीश उर्फ आप्पा दडस याला लखन बंडू बुधावले आणि सतीश तुकाराम माने यांनी बेदम मारहाण केली आहे,याची माहिती त्याने पोलिसांना दिली असता पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील मौजे सोमंथळी येथील सतीश ऊर्फ आप्पा दडस याचे 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्याच्यासोबत काम करणाऱ्या लखन बंडू बुधवाले व सतीश तुकाराम माने यांच्यासोबत भांडण झाले होते. या वादात संबंधित महिलेच्या नवऱ्याने सतीशच्या डोक्यात रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेतो असे सांगून त्याला विडणी येथील मांगोबामाळ परिसरात आणण्यात आले. मात्र, पुढे त्याला फलटण तालुक्यातील धुळदेव गावाच्या हद्दीतील भिवरकर वाडी येथे नेऊन पुन्हा डोक्यात दगड घालून निर्घृण मारहाण करण्यात आली.
Crime news: साताऱ्यातील लव्ह ट्रँगलची रक्तरंजित कहाणी
या संपूर्ण कृत्यात लखन बंडू बुधवाले, सतीश तुकाराम माने व रेश्मा लखन बुधवाले यांचा थेट सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. खून केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सतीश दडस याचा मृतदेह लाकडे कापण्याच्या मशीनने तुकडे केला. मुंडके, खांद्यापासून हात आणि गुडघ्यापासून पाय वेगळे करून हात, मुंडके व पाय निरा नदीत फेकून देण्यात आले, तर उर्वरित मृतदेह फलटण तालुक्यातील साठे गावातील एका शेतात गाळात पुरून ठेवण्यात आला, अशी कबुली संशयितांनी दिल्याची माहिती फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी दिली.
या संतापजनक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या गुन्ह्याचा तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणामुळे संपूर्ण फलटण तालुका हादरून गेला आहे. अनैतिक प्रेमसंबंधाच्या त्रिकोणातून माणुसकीला काळिंबा फसणारी घटना घडली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून या गुन्ह्यातील महिलेसह तिच्या प्रियकराला आणि नवऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे याची माहिती फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी दिले आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
फलटण तालुक्याला ३० वर्षांनंतर खरे स्वातंत्र्य – जयकुमार गोरे यांची पाडेगावातून घणाघाती घोषणा

फलटण :- फलटण तालुका गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यात नव्हता, तर पारतंत्र्यातच होता. मात्र सन २०२५ मध्ये तालुक्याला खरे स्वातंत्र्य मिळाले असून आता सामान्य जनतेला विकासकामांसाठी कुणाच्या वाड्यावर मुजरा करण्याची गरज उरलेली नाही, असे ठाम प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केले.
पाडेगाव येथे आयोजित भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महायुती) यांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ना. गोरे म्हणाले,
“पाटणवरून कुणीही येवो, काहीही बोले—काळजी करण्याचे कारण नाही. डीपीडीसीमधून एक रुपया जरी मिळाला नाही तरी चालेल, त्याच्या दहा पट निधी ग्रामविकास विभागातून देण्याची ताकद माझ्यात आहे.”
विरोधकांवर जोरदार टीका
विरोधकांवर, विशेषतः राजे गटावर सडकून टीका करताना ना. गोरे यांनी तरडगाव जिल्हा परिषद गटाचा मुद्दा उपस्थित केला.
ते म्हणाले,
“सलग २५ वर्षे मंत्रीपद व पालकमंत्रीपद भूषवूनही जर शिंदे माळ येथे साधा डीपी देता आला नसेल, तर नेमका कसला विकास केला? १५ वर्षे आमदार राहूनही गावचा विकास होत नसेल, तर सत्ता केवळ विरोधकांना त्रास देण्यासाठी वापरली, हेच सिद्ध होते.”
तरडगाव जिल्हा परिषद गटाचा अनुशेष भरून काढण्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून द्या, मी या गटासाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले.
रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
“ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील सांगतील तेवढा निधी मंजूर करण्याची ताकद आमच्यात आहे. मी फक्त ग्रामविकास मंत्री आहे; खरे मंत्री रणजितसिंह नाईक निंबाळकरच आहेत,” असे सांगत ना. गोरे यांनी रणजितसिंहांच्या नेतृत्वावर स्पष्ट शिक्कामोर्तब केले.
ही निवडणूक ग्रामविकास खात्याची – जयकुमार गोरे
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले,
“ही निवडणूक म्हणजे ग्रामविकास खात्याची निवडणूक आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या सर्व संस्था ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे गावाचा विकास हवा असेल, तर रणजितदादा आणि भाजपाच्या पाठीशी ठाम उभे राहा.”
विरोधकांचा ‘सुपडा साफ’ होणार – रणजितसिंह नाईक निंबाळकर
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले,
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयकुमार गोरे फलटण तालुक्याच्या विकासासाठी खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. आमदार सचिन पाटील यांनी प्रशासन थेट गावोगावी नेले. या निवडणुकीत तरडगावसह संपूर्ण तालुक्यातून विरोधक संपुष्टात येतील.”
८ जिल्हा परिषद गट, १६ पंचायत समिती गणांमध्ये महायुतीचा विजय – सचिन पाटील
आमदार सचिन पाटील म्हणाले,
“तरडगाव जिल्हा परिषद गटासह फलटण तालुक्यातील सर्व ८ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गणांमध्ये विरोधकांचा सुपडा साफ होणार आहे.”
या मेळाव्यास पाडेगाव व परिसरातील नागरिक, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
IIT Mumbai Research: मेंदूविकारांच्या निदानासाठी AI ठरलं वरदान; आयआयटी मुंबईचं नवीन संशोधन चर्चेत

IIT Mumbai New Reserch: आगामी काळ हा वैद्यकिय विश्वातील खूप महात्त्वाचा काळ ठरणार आहे. वैद्यकिय क्षेत्रात होणारे बदल मोठमोठ्या आजारांच्या निदानासाठी कारणीभूत ठरतील. एआय तंत्रज्ञानामुळे आरोग्य क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. विशेषतः मेंदूशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांच्या निदानासाठी आता कृत्रिम प्रज्ञेचा प्रभावी वापर होणार आहे. अल्झायमर, पार्किन्सन्स, मेंदूतील गाठी यांसारख्या आजारांचे वेळेत आणि अचूक निदान करणे आजपर्यंत मोठे आव्हान होते. मात्र आता हे चित्र बदलताना दिसत आहे.
मेंदूविकारांच्या निदानात एआयची भूमिका
कृत्रिम प्रज्ञा म्हणजेच एआय मोठ्या प्रमाणावर माहितीचे विश्लेषण करून सूक्ष्म बदल ओळखू शकते. मेंदूच्या आजारांमध्ये हे बदल सुरुवातीला लक्षात येत नाहीत. मात्र एआयच्या मदतीने हे संकेत लवकर ओळखता येणार आहेत.
अल्झायमर किंवा पार्किन्सन्ससारख्या आजारांमध्ये मेंदूतील पेशी, प्रथिने आणि जनुकांमध्ये होणारे बदल एआय सहज शोधू शकते. त्यामुळे डॉक्टरांना योग्य वेळी निर्णय घेणे सोपे होणार आहे.
ब्रेनप्रॉट प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य
ब्रेनप्रॉट हा मानवी मेंदूशी संबंधित विविध स्तरांवरील माहिती एकत्र आणणारा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. निरोगी मेंदू आणि आजारग्रस्त मेंदू यातील फरक या प्रणालीद्वारे स्पष्टपणे समजू शकतो.
या प्लॅटफॉर्ममध्ये जनुकांची माहिती, प्रथिनांची पातळी आणि जैवचिन्हांमधील बदल यांचा सविस्तर अभ्यास करता येतो. संशोधक, डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी यांच्यासाठी हे एक उपयुक्त साधन ठरणार आहे.
ड्रगप्रॉटएआय उपचारासाठी कसा उपयुक्त
ड्रगप्रॉटएआय हा एआयवर आधारित प्लॅटफॉर्म औषधांच्या परिणामांचा अंदाज घेण्यासाठी वापरला जाणार आहे. कोणते औषध कोणत्या मेंदूविकारावर अधिक प्रभावी ठरेल, हे ठरवण्यासाठी ही प्रणाली मदत करणार आहे.
यामुळे उपचार अधिक वैयक्तिक आणि अचूक होण्याची शक्यता आहे. चुकीच्या औषधांचा धोका कमी होऊन रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास मदत मिळू शकते.
हे नक्की वाचा: साडेचार तास यकृत शरीराबाहेर अन् 2 वर्षांच्या चिमुरडीला नवजीवन; भारतातील पहिली शस्त्रक्रिया परळच्या वाडीया रुग्णालयात!
संशोधनामागील भारतीय प्रयत्न
आयआयटी मुंबईतील प्रा. संजीव श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. अंकित हालदार यांच्या सहकार्याने या प्रकल्पाची निर्मिती झाली आहे. संशोधकांच्या टीमने अनेक वर्षांच्या अभ्यासातून हे प्लॅटफॉर्म विकसित केले आहेत.
हे संशोधन भारताला मेंदूविकारांच्या अभ्यासात जागतिक नकाशावर आणणारे ठरत आहे. देशातील संशोधन क्षमता आणि एआय तंत्रज्ञानाची ताकद याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.
एआयच्या मदतीने मेंदूच्या आजारांचे निदान आणि उपचार अधिक अचूक, वेगवान आणि प्रभावी होणार आहेत. ब्रेनप्रॉट आणि ड्रगप्रॉटएआयमुळे भविष्यात मेंदूविकारांवर नियंत्रण मिळवणे सोपे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एन. रघुरामन यांचा कॉलम: कामाचे ठिकाण बदलणार, मग स्वतःलाही बदला
“दिमाग का दही हो गया’ अशा शब्दांत एका मिडल लेव्हल व्यवस्थापकाने स्वतःशीच कुरकुर केली. कारण तेथे बोलण्यासाठी कुणीही नव्हते. मोठ्या दुकानाच्या मजल्यावर तो एकटाच होता. पण अचानक मागून आवाज आला, “हे दही काय आहे?’ त्याला माहीत होते की ते कोण आहे. त्याने मागे वळूनही पाहिले नाही आणि शांतपणे म्हणाला, “तू ते कुठे खातोस? तुला माहीत नाही.’ पण आवाज कायम राहिला, “म्हणूनच मी विचारत आहे.’ त्यावर त्याचा राग अनावर झाला आणि तो म्हणाला, “गप्प बस. तू काहीही बोलत राहा. आता माझे मन बिघडू देऊ नकोस.’ आता आवाज थोडा कठोर झाला आणि म्हणाला, “अबे…’ व्यवस्थापकाने मध्येच अडवले, “कोणतेही वाईट शब्द बोलू नकोस’. आवाज थोडा मंद झाला आणि म्हणाला, “मी तुझ्याकडूनच सर्व शिव्या शिकलो.’ चौकशी झाली तर मी तुम्हाला उघड करेन.’ व्यवस्थापक निघून गेला आणि ओरडला, ‘अरे देवा, मला कुणासोबत काम करावे लागत आहे ?’२०३५ किंवा २०४० च्या दुकानात आपले स्वागत आहे. एकही मध्यमस्तरीय व्यवस्थापक किंवा एकही कर्मचारी नसेल. सर्वत्र रोबोट असतील. सर्वत्र रोबोटच प्रॉडक्शन बेल्टवर काम करतील. मग, तुम्ही रोबोटला हे घे. माझ्या आईने बनवलेले… असे म्हणू शकणार नाही आणि तो तुमच्या अनुत्पादक वेळेकडे डोळेझाक करेल. तुम्ही शौचालयात जाणे, सिगारेट ओढणे किंवा ‘दही’ सारख्या निरुपयोगी गोष्टी करण्यात किती वेळ वाया घालवला आणि शिफ्टच्या शेवटी तुमचे योगदान काय होते हे ते अचूकपणे नोंदवेल. तुम्हाला एक तर इशारा देणारे पत्र मिळेल किंवा रोबोट्सशी संवाद साधण्याच्या कोर्ससाठी वर्गात पाठवले जाईल. हो, कंपन्या आता विशिष्ट क्षेत्रात प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्हाला वर्गखोल्यात पाठवतील. एआय कामाच्या ठिकाणी धोका बनत आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल, तर येथे एक अलीकडील उदाहरण आहे. अमेरिकेतील एका कुटुंबाने एआय चॅटबॉटचा वापर करून हॉस्पिटलच्या मोठ्या बिलाला आव्हान दिले. त्यामुळे ते जवळपास १.६ कोटी रुपयांवरून सुमारे २७ लाख रुपये झाले. हे कसे झाले याचे आश्चर्य वाटते? कुटुंबातील एका सदस्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला फक्त चार तासांच्या उपचारांसाठी १.९५ लाख डॉलरचे बिल देण्यात आले. परंतु ते विम्याने भरलेले नव्हते. एका कुटुंबाने अँथ्रोपिकच्या एआय चॅटबॉट, क्लाऊडच्या मदतीने आयटमाइज्ड बिलाचे विश्लेषण केले आणि एआयला डुप्लिकेट बिलिंगसारख्या मोठ्या चुका आढळल्या. रुग्णालयाने मास्टर प्रक्रियेसाठी शुल्क आकारले आणि नंतर त्याच्या प्रत्येक उपप्रक्रियेचे स्वतंत्रपणे बिल केले. त्याला अनबंडलिंग म्हणतात. एआय तिथेच थांबले नाही. या चुकांचा उल्लेख करून एक शक्तिशाली कायदेशीर वाद पत्रदेखील तयार केले. यामुळे रुग्णालयाला त्याचे बिल ८०% पेक्षा जास्त कमी करावे लागले. एआयदेखील शिकारी किंमत ओळखण्यास सुरुवात करत आहे. २०२० पासून तुमच्या कामाच्या क्षेत्राबद्दल विचार करा. गेल्या पाच वर्षांत कामाच्या जगात प्रचंड बदल झाले आहेत. साथीच्या रोगाने दूरस्थ आणि हायब्रिड कामाच्या युगाची सुरुवात केली. मानसिक आरोग्य आणि वैयक्तिक आणि कामाच्या जीवनातील कमी होत जाणारे अंतर एकेकाळी कार्यालयात निषिद्ध मानले जात असे. आता नियोक्त्यांसाठी प्राधान्य बनले आहे. लोक निवृत्तीचे वय ६० पेक्षा जास्त करून काम करत आहेत. याचा अर्थ असा की आज कामाच्या ठिकाणी पाच पिढ्या एकत्र राहतात. प्रत्येकी वेगवेगळ्या कामाच्या आणि व्यवस्थापनाच्या शैली आहेत. पुढील दोन दशके आणखी बदल घडवून आणतील. हे बदल मुख्यत्वे एआय द्वारे चालवले जातील. काही वर्षांत मध्यमस्तरीय व्यवस्थापक इतिहास बनतील. एआय कामे हाती घेते. तेव्हा फार कमी लोक महत्त्वाचे आणि सर्जनशील निर्णय घेण्यास सक्षम महासत्ता बनू शकतील. परंतु त्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही पुरेसे पात्र असले पाहिजे. फंडा असा की : भविष्यातील लीडर्स मानव आणि बुद्धिमत्ता प्रणालींमधील समन्वय व्यवस्थापित करतील. परंतु भावनिक बुद्धिमत्ता असलेलेच वेगळे मानले जातील. त्यास सहानुभूती आणि तांत्रिक समजुतीची जोड हवी. असेच लोक भविष्यातील कार्यस्थळाची दिशा ठरवतील.
Source link
साताऱ्यातील रक्तरंजित लव्ह ट्रँगल, महिलेने EX अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला मारलं, तुकडे शेततळ्यात फेकले
साताऱ्यातील रक्तरंजित लव्ह ट्रँगल, महिलेने EX अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला मारलं, तुकडे शेततळ्यात फेकले

