Tuesday, June 30, 2026
Home Blog Page 63

फलटणमध्ये महायुतीचा रणशिंगनाद! पाडेगावातून झेडपी–पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा भव्य शुभारंभ

0
फलटणमध्ये महायुतीचा रणशिंगनाद! पाडेगावातून झेडपी–पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा भव्य शुभारंभ


फलटण | प्रतिनिधी :- फलटण तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) यांची महायुती प्रचारात अधिक आक्रमक होताना दिसत आहे. आगामी निवडणुकीचा धुराळा उडवून देण्यासाठी महायुतीच्या अधिकृत प्रचाराचा शुभारंभ शुक्रवार, दि. 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता पाडेगाव (ता. फलटण) येथे होणार आहे.
या भव्य प्रचार शुभारंभाचे उद्घाटन राज्याचे मंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून, पाडेगाव येथून संपूर्ण ग्रामीण भागात महायुतीची ताकद दाखवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला जाणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतील राजकीय चढाओढीत महायुती आपली ठाम भूमिका मांडणार असून, विकासकामे, शासकीय योजना, तसेच फलटण तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीचा अजेंडा थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला महायुतीचे तालुकास्तरीय पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध आघाडीचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणार असल्याचे संकेत कार्यकर्त्यांकडून दिले जात असून, पाडेगाव येथून सुरू होणाऱ्या या प्रचारामुळे संपूर्ण फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण तापणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अनिष्ट परंपरांना फाटा देत धम्मविचाराने कालकथित जायबाई धोंडीबा घोरपडे यांचा अस्थी संकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न

0
अनिष्ट परंपरांना फाटा देत धम्मविचाराने कालकथित जायबाई धोंडीबा घोरपडे यांचा अस्थी संकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न


फलटण :  समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धा, कर्मकांड व अनिष्ट परंपरांना ठाम नकार देत बौद्ध धम्माच्या तर्कशुद्ध, मानवतावादी व वैज्ञानिक परंपरेनुसार कालकथित जायबाई धोंडीबा घोरपडे यांचा अस्थी संकलन व पुण्यानुमोदन विधी अत्यंत शांत, धम्ममय व विचारप्रवण वातावरणात पार पडला.
भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व) चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संघटक, बौद्धाचार्य व केंद्रीय शिक्षक आयु. श्रीमंतराव धोंडीबा घोरपडे, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा (पूर्व) चे माजी अध्यक्ष आयु. भीमराव धोंडीबा घोरपडे, तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांच्या मातोश्री कालकथित जायबाई धोंडीबा घोरपडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा विधी पूज्य भंते काश्यप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
धम्मविचारांचे सखोल विश्लेषणात्मक मांडणी
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ विधी न करता धम्मविचारांचे विश्लेषण, चिंतन व आचरण यावर दिलेला भर.
मधुकर घोरपडे यांनी काल कालकथित जायबाई घोरपडे यांच्या आयुष्यातील आठवणी सांगताना त्यांच्या साधेपणा, संस्कारशीलता व कुटुंबातील मार्गदर्शक भूमिकेचा उल्लेख केला. त्यांच्या आठवणींमधून एका सामान्य गृहिणीचे असामान्य धम्मशील जीवन उलगडून आले. आयु. लक्ष्मण निकाळजे यांनी जुन्या कौटुंबिक आठवणी सांगत भीमशाहीर वामनदादा कर्डक यांचे गीत सादर केले. या गीतातून केवळ श्रद्धांजली नव्हे, तर आंबेडकरी चळवळीचा संघर्ष, आत्मसन्मान व सामाजिक जाणीवेचा वारसा अधोरेखित झाला.
भारतीय बौद्ध महासभेचे राज्यस्तरीय ऑडिटर अरुण गायकवाड यांनी कालकथित जायबाई घोरपडे यांच्या माहेरगाव वखारी येथील आठवणींना उजाळा देत, त्यांच्या जीवनातील सामाजिक जडणघडण स्पष्ट केली. त्यांच्या भाषणातून स्त्रीजीवन, कुटुंबसंस्कार व धम्ममूल्ये यांचा सुंदर संगम समोर आला.
माजी प्राचार्य शिवाजी सावंत यांनी आपल्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाला तत्त्वज्ञानात्मक खोली दिली. त्यांनी धम्मपदातील निकायमधील भंते आनंद व तथागत बुद्ध यांच्यातील संवादाचा संदर्भ देत –
“शीलरक्षणाचे प्रयोजन काय?”
या प्रश्नाचे उत्तर बुद्धांनी निर्वाणाच्या दिशेने कसे नेले, हे प्रभावीपणे मांडले. याच धम्मविचारामुळे आपण स्वतः बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारात कसे सहभागी झालो आणि या प्रवासात घोरपडे परिवाराचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी विशद केले.
चंद्रकांत मोहिते यांनी भगवान बुद्धांचा धम्म हा मनकेंद्रित असल्याचे सांगत धम्मपदातील गाथांचे विश्लेषण केले. “मन हेच सर्व गोष्टींचे उगमस्थान आहे” हा बुद्धविचार त्यांनी आजच्या सामाजिक वास्तवाशी जोडून स्पष्ट केला. यासोबतच आईच्या महिम्याचे गीत सादर करून वातावरण भावनिक केले. भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व) व शाखा फलटण तालुका यांच्या वतीने त्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

कालकथित जायबाई धोंडीबा घोरपडे या धम्मशील, शांत स्वभावाच्या व संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व होत्या. धम्मकार्याला वाहून घेतलेल्या कुटुंबातील ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांनी आयुष्यभर सत्य, करुणा, मैत्री व समतेच्या मूल्यांची जोपासना केली. त्यांच्या संस्कारातूनच घोरपडे कुटुंबाने सामाजिक, शैक्षणिक व धम्मचळवळीत मोलाचे योगदान दिले आहे.
भंते काश्यप यांचे धम्ममार्गदर्शन
पूज्य भंते काश्यप यांनी तथागत बुद्ध व महामानवांना वंदन केल्यानंतर जीवनात होणाऱ्या अंतर्गत बदलांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
“आपल्या जीवनाचा शास्ता म्हणजे धम्म आहे. महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर मिळणारा आनंद हा अद्वितीय असून तो जीवनाला दिशा देतो,” असे सांगत त्यांनी बुद्ध–धम्म–संघ या त्रिरत्नांप्रती समर्पित भावना ठेवून कर्मरूपाने पुण्यकर्म करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
आयोजन व उपस्थिती
हा अस्थी संकलन व पुण्यानुमोदन विधी
भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी पार पाडला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्र, राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी व उपासक -उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवैध संबंधातून उफाळलेल्या रागातून युवकाची अमानुष हत्याफलटण तालुक्यात खळबळ, मृतदेहाचे तुकडे करून नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार

0
अवैध संबंधातून उफाळलेल्या रागातून युवकाची अमानुष हत्याफलटण तालुक्यात खळबळ, मृतदेहाचे तुकडे करून नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार


फलटण (प्रतिनिधी): फलटण तालुक्यात अवैध संबंधाच्या संशयातून एका युवकाची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली असून, या प्रकाराने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रियकर आणि संबंधित महिलेच्या नवऱ्याच्या मदतीने युवकाची लाकूड कापण्याच्या मशीनने हत्या करून त्याचे अवयव वेगळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे सोमंथळी (ता. फलटण) येथील सतीश उर्फ आप्पा दादासो दडस याचा मंगळवार, दि. १४ जानेवारी २०२५ रोजी त्याच्याच कामातील काही लोकांशी वाद झाला होता. या वादानंतर संबंधित महिलेच्या नवऱ्याने सतीशच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले.
जखमी अवस्थेत सतीशला उपचारासाठी दवाखान्यात नेत असल्याचा बनाव करून आरोपींनी त्याला विडणी येथील मांगोबामाळ परिसरात नेले. मात्र उपचार न करता पुढे धुलदेव गावाच्या हद्दीतील भिवरकर वाडी येथे नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून पुन्हा हल्ला करण्यात आला.
यानंतर आरोपींनी केलेला कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे ठरले आहे. लाकूड कापण्याच्या मशीनचा वापर करून सतीश उर्फ आप्पाचे मुंडके, खांद्यापासून हात व गुडघ्यापासून पाय वेगळे करण्यात आले. मुख्य धड साठे गावातील एका शेतात गाळात पुरून ठेवण्यात आले, तर हात, पाय आणि मुंडके निरा नदीत फेकून दिल्याची कबुली संशयित आरोपींनी दिल्याचे समजते.
या अमानुष हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

६ महिन्यांत फलटण शहर १०० टक्के खड्डेमुक्त करणार – माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ग्वाही

0
६ महिन्यांत फलटण शहर १०० टक्के खड्डेमुक्त करणार – माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ग्वाही

फलटण :-  फलटण शहराचा विकास आता वेगाने होणार असून शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलटणच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मंत्री जयकुमार गोरे यांनी शहर व तालुक्याचे सक्षम ‘वकीलपत्र’ घेतले असल्याने विकासकामांना गती मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. “आज मी फलटणकरांना शब्द देतो की येत्या सहा महिन्यांत फलटण शहर १०० टक्के खड्डेमुक्त (Pothole Free) केले जाईल,” अशी खणखणीत ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजकीय सौजन्य दाखवत नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सौ. प्रियादर्शनी रणजितसिंह भोसले यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच स्वीकृत नगरसेवक अशोकराव जाधव, सुदाम (अप्पा) मांढरे यांच्यासह विरोधी गटातून निवडून आलेले युवराज अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचेही मनापासून अभिनंदन केले.

आमदार सचिन पाटील म्हणाले, “लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी फलटण शहराच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्णत्वास नेण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रत्येक विकासात्मक निर्णयात आम्ही ठामपणे सोबत राहू.”

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत सांगितले, “फलटण शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रणजितदादांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सर्व नगरसेवकांची टीम सज्ज आहे. नगरपालिका ही कुणाच्याही खासगी मालकीची नसून ती सर्वसामान्य जनतेची आहे, हे विसरू नये.”
कार्यक्रमाचे आभार नवनियुक्त उपनगराध्यक्ष सौ. प्रियादर्शनी रणजितसिंह भोसले यांनी मानले. यावेळी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आता करिअरसाठी अनुभव नाही तर अनुकूल क्षमता आणि निश्चय महत्त्वाचा ठरतो

0
आता करिअरसाठी अनुभव नाही तर अनुकूल क्षमता आणि निश्चय महत्त्वाचा ठरतो


जवळजवळ प्रत्येक उद्योग क्षेत्रासमोर एक मोठं आव्हान आहे. ते आव्हान म्हणजे नोकरी मिळवणे. कामातील कौशल्ये इतक्या वेगाने बदलत आहेत की नोकरीमधील आव्हान दिवसेंदिवस बदलत आहे. नोकऱ्या असणाऱ्या किंवा प्रोफेशनल्सकडे आता हा प्रश्न नाही की, कुणाकडे नोकरीचा किंवा कामाचा किती अनुभव आहे. यामध्ये खरा प्रश्न हा आहे की, समोरची व्यक्ती बदलत्या गरजांशी किती लवकर जुळवून घेत आहे. कारण आताच्या नोकरीतील स्किल्स असे आहे की, तुम्ही स्वतःला सततच्या बदलात किती बदलता आणि अपडेट ठेवता. 

Add Zee News as a Preferred Source

‘Beyond AI, CVs & JDs with LinkedIn’ हाच मुद्दा दुसऱ्या एपिसोडमध्ये केंद्रस्थानी आहे. झी मीडियाच्या सहकार्याने तयार झालेल्या “अबाउट एआय” च्या दुसऱ्या भागात हा विषय आहे. या संभाषणात लिंक्डइनच्या एपीएसी व्हीपी – टॅलेंट अँड लर्निंग सोल्युशन्स रुची आनंद आणि विप्रोचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर संजीव जैन हे आहेत. भारतातील बदलत्या नोकरीच्या क्षेत्रात AI आणि त्याच्या स्किल्सची मागणी वेगाने बदलत आहे. तसेच करिअर सुरक्षित करण्यासाठी आणि भविष्यासाठी काय आवश्यक आहे यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

AI च्या काळात शिकणं कधीच संपणार नाही 

एआयने आपण काम कसे समजून घेतो आणि कसे अंमलात आणतो या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे. रुची आनंद या बदलाचे प्रमाण स्पष्ट करताना सांगतात की, आज कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली 70% कौशल्ये 2030 पर्यंत पूर्णपणे बदलली असतील. याचा अर्थ असा की,नावीण्य अन् नवनव्या गोष्टी शिकण्याकडे कल राहिलेला नाही. मात्र व्यावसायिकांना त्यांच्या स्किल्समध्ये सतत नवीन कौशल्ये जोडावी लागतील.

संजीव जैन, या युगाचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी, एआयच्या प्रभावाची तुलना औद्योगिक क्रांतीदरम्यान उदयास आलेल्या असेंब्ली लाइनशी करतात. यामुळे काम करण्याची पद्धत कायमची बदलली. त्यांच्या मते, आज एआय समजून घेतल्याने संस्थांना मोठ्या प्रमाणात इनोवेशन करण्यास सक्षम बनवले आहे. म्हणूनच AI साक्षरता आता केवळ प्रवेश-स्तरीय पदांसाठीच नाही तर नेतृत्व भूमिकांसाठी देखील आवश्यक आहे. एआयची गरज आता किमान आवश्यकता बनली आहे. पण व्यावसायिक याचा कसा वापर करुन घेतील आणि गोष्टी अधिक क्रियाशील करतील याकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. 

नवीन प्राधान्ये: मानवी कौशल्यांचे वाढते महत्त्व

जसजसे AI ज्ञान अधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. तसतसे मानवी जीवनात त्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होत आहेत. रुची आनंद स्पष्ट करतात की, सर्जनशीलता, समस्या सोडवणे, स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणि नव नवे उपक्रम यासारखी कौशल्ये आता तंत्रज्ञानापासून  फायनान्स आणि ऑपरेशन्सपर्यंत प्रत्येक भूमिकेत महत्त्वाची आहेत. ही अशी वेगवेगळी कौशल्ये रिक्रूटर्स एकाच व्यक्तीमध्ये शोधत असतात. भारतातील 64% रिक्रूटर्स करणारे असे मानतात की टेक्निकल आणि मानवी कौशल्यांचे योग्य संतुलन असलेले उमेदवार शोधणे त्यांना कठीण जात आहे. 

शिकणे हीच खरी ओळख

ही दरी भरून काढण्यासाठी, सतत शिकणे आणि ते स्पष्टपणे दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रुची आनंद हे ट्रॅफिक सिग्नलच्या उदाहरणाने स्पष्ट करतात. कोणत्याही कारणाशिवाय सतत नोकरी बदलणे किंवा ब्रेक घेणे हे रिक्रूटर्ससाठी रेड सिग्नलप्रमाणे असते. या मागची कारणे प्रोफेशनल्सला समझावणे अतिशय महत्त्वाचे असते. अपूर्ण प्रोफाइल तसेच ज्यामध्ये महत्त्वाचे स्किल्सची माहिती नसेल त्या गोष्टी यल्लो सिग्नल म्हणून ओळखले जाते. दरम्यान, एक स्पष्ट आणि मजबूत प्रोफाइल – ज्यामध्ये चांगला प्रोफाइल सारांश, एक मजबूत स्किल सेट आणि ‘ओपन टू वर्क’ असे असते ते रिक्रूटर्सना हिरवा सिग्नल देते.

Open to Work, नोटिस पीरियड, सॅलरी एक्सपेक्टेशन आणि अपडेटेड स्किल्स यासारखे फिचर्स रिक्रूटर्सला महत्त्वाचे असतात. यावरुन त्या प्रोफेशनलची तयारी आणि त्याबाबत विश्वास निर्माण होण्यास मदत होते. मिळालेल्या आकडेवारीनुसार, ज्या LinkedIn प्रोफाइल्समध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त स्किल्स असतात. त्यांना रिक्रूटर्सद्वारे निवडण्याची शक्यता 5.6 टक्के अधिक असते. बदलत्या जॉब मार्केटमध्ये अशाच प्रोफेशनला चांगली मागणी आहे आणि तेच पुढे जाणार आहेत. ज्यांच्याकडे शिकण्याची इच्छा, निश्चय आणि स्वतःला बदलण्याची क्षमता असेल त्यांना पहिल प्राधान्य दिलं जातं. 

Beyond AI, CVs & JDs चा दुसरा संपूर्ण एपिसोड येथे पाहा 





Source link

फलटण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सौं. प्रियदर्शनी भोसले यांची बिनविरोध निवड

0
फलटण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सौं. प्रियदर्शनी भोसले यांची बिनविरोध निवड

फलटण :-फलटण नगरपालिकेच्या सभागृहात आज उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी सौं. प्रियदर्शनी भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सौं. प्रियदर्शनी भोसले यांना राजकीय वारशाची पार्श्वभूमी लाभली आहे. त्यांचे सासरे दिलीपसिंह भोसले यांनी यापूर्वी फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कामकाज केले आहे, तर त्यांच्या सासू सौं. मधुबाला भोसले यांनी नगरसेविका म्हणून नागरिकांच्या प्रश्नांसाठी सक्रिय भूमिका बजावली होती. या अनुभवाचा लाभ शहराच्या विकासासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याच विशेष सभेत स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सुदामराव मांढरे व अशोकराव जाधव, तसेच शिवसेनेचे श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे नगरपालिकेच्या कामकाजाला अधिक बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या सर्व निवडींबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले, ॲड. नरसिंह निकम, अभिजित नाईक निंबाळकर तसेच सर्व नगरसेवकांनी अभिनंदन केले. फलटण शहराच्या विकासासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून प्रभावी व लोकाभिमुख कार्य होईल, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

‘हे जनतेला मुर्खात काढायचे काम’, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंची थेट देवभाऊंना विनंती,अजित दादांन

0


Satara: राज्यात महापालिकेनंतर आता  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूका होत आहेत . या पार्श्वभूमीवर या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी साताऱ्यात केली आहे. मुख्यमंत्री देवा भाऊ यांना त्यांनी विनंती करत ‘उमेदवार फोडून त्यांच्यावर जेवढा खर्च करता त्यापेक्षा कमी खर्च हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी खर्च करता येईल’ असे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत. 

काय म्हणाले बिचुकले?

बिचुकले म्हणाले,”साताऱ्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होत असताना राज्यामध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी असं सरकार असून खाली एकमेकांविरुद्ध लढायचं हे म्हणजे जनतेला मूर्खात काढण्याचं काम आहे. पुण्यातील निवडणुकीत अजितदादा यांना शिव्या घालण्यात आल्या. त्यामुळे अजितदादा तुम्ही माझा आदर्श घ्या, मी कोणाच्या दारात जात नाही, असा सल्ला देखील अभिजीत बिचुकले यांनी अजित पवार यांना दिला आहे. त्याचबरोबर भाजपच्या बैठकीतून उदयनराजे निघून गेल्याच्या घटनेवर बोलताना अभिजीत बिचुकले यांनी, उदयनराजेनी विचार करावा एकीकडे देवेंद्र फडणवीस तुम्हाला मालक म्हणतात आणि दुसरीकडे भाजपने तुमची काय अवस्था केली आहे. याचा विचार तुम्ही जरूर करावा, असे अभिजीत बिचुकले यांनी म्हटले आहे. 

कोण आहे अभिजित बिचुकले?

अभिजीत बिचुकले हे त्यांच्या चित्रविचित्र बोलण्यामुळे राज्यभरात प्रसिद्ध आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक खळबळजनक वक्तव्य केली आहेत. बिग बॉसच्या 15 व्या पर्वात ते दिसले होते. ‘मला पंतप्रधान व्हायचे आहे, मी आणि एलॉन  मस्क एकत्र आलो तर जग जिंकू’ असं वक्तव्य यापूर्वी त्यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीत त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. बिग बॉसमध्ये प्रसिद्धी मिळवलेले अभिजीत बिचुकले अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात, ज्यात बॉलिवूड स्टार आणि शो होस्ट सलमान खानशी झालेल्या वादाचा समावेश आहे, त्यांनी यापूर्वी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांसारख्या प्रमुख नेत्यांविरुद्ध निवडणूक लढवली आहे.

आणखी वाचा



Source link

माळशिरसची “चौथी कसोटी” सुरूराम सातपुतेंना ‘व्हाईट वॉश’ देण्याचा मोहिते-पाटलांचा एल्गार, राजकीय वर्तुळात खळबळ

0
माळशिरसची “चौथी कसोटी” सुरूराम सातपुतेंना ‘व्हाईट वॉश’ देण्याचा मोहिते-पाटलांचा एल्गार, राजकीय वर्तुळात खळबळ

अकलूज प्रतिनिधी :- सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात माळशिरस तालुका नेहमीच निर्णायक भूमिका बजावत आला आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगर परिषद निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून, याच पार्श्वभूमीवर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आमदार राम सातपुते यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाले तर, याआधीच्या तीन सामन्यांनंतर आता माळशिरसमध्ये “चौथी कसोटी” खेळली जात असून, या सामन्यात राम सातपुतेंना ‘व्हाईट वॉश’ देण्याचा निर्धार मोहिते-पाटील यांनी जाहीर केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
️ उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी ‘फिल्डिंग’ जोरात
२१ जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी माळशिरस तहसील कार्यालयात खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर हे आपल्या समर्थकांसह उपस्थित होते.
पत्रकारांशी संवाद साधताना मोहिते-पाटील यांनी आमदार राम सातपुते यांच्यावर थेट आणि धारदार शब्दांत टीका करत, आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा धुव्वा उडवण्याचे संकेत दिले.
 विजयाची ‘हॅट्ट्रिक’ पूर्ण, आता चौथ्या विजयाचे लक्ष्य
गेल्या वर्षभरातील निवडणुकांचा आढावा घेताना मोहिते-पाटील म्हणाले की, भाजप आणि राम सातपुते यांना सलग तीन मोठ्या राजकीय आघाड्यांवर पराभव स्वीकारावा लागला आहे.
लोकसभा निवडणूक : सोलापूर लोकसभेत प्रणिती शिंदे यांचा विजय
विधानसभा निवडणूक : माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर यांचा दणदणीत विजय
अकलूज नगर परिषद : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची एकहाती सत्ता
या ‘हॅट्ट्रिक’नंतर आता जिल्हा परिषदेचे ९ गट आणि पंचायत समितीचे १८ गण जिंकून राम सातपुतेंना पूर्णपणे ‘सुफडा साफ’ करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
欄 बदललेली राजकीय समीकरणे, नवी आघाडी मैदानात
या निवडणुकीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बदललेली राजकीय गणिते. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोहिते-पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी नवी व्यूहरचना आखली आहे.
विशेष म्हणजे, महायुतीमधील घटक असलेली
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस
एकनाथ शिंदेंची शिवसेना
हे पक्षही या आघाडीत सहभागी झाल्याने माळशिरसमधील राजकीय लढत अधिकच रंजक बनली आहे.
“आम्ही सर्व प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवत आहोत. लोकसभा आणि विधानसभेपासून सुरू झालेला विजयाचा रथ आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरही पोहोचेल. या चौथ्या कसोटी सामन्यात राम सातपुतेंना आम्ही नक्कीच ‘व्हाईट वॉश’ देऊ,” असे ठाम वक्तव्य मोहिते-पाटील यांनी केले.
 अकलूजचा गड आणि जानकरांची भक्कम साथ
आमदार उत्तमराव जानकर आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची जोडी सध्या माळशिरसमध्ये अभेद्य मानली जात आहे. अकलूज नगर परिषदेत मिळालेल्या एकहाती सत्तेमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून, ग्रामीण भागातही हीच लाट कायम ठेवण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.
 राजकीय सामना रंगात, महाराष्ट्राचे लक्ष माळशिरसकडे
थोडक्यात सांगायचे तर, माळशिरसच्या या राजकीय मैदानावर सध्या चेंडू मोहिते-पाटील आणि जानकर यांच्या हातात आहे. मात्र, राम सातपुते ही “कसोटी” कशी खेळणार आणि आपली विकेट कशी वाचवणार, याकडे केवळ सोलापूर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

साखरवाडी जिल्हा परिषद गटात वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवारी जाहीर; प्रतीक्षा रोहन मोहितेंनी दाखल केला अर्ज

0
साखरवाडी जिल्हा परिषद गटात वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवारी जाहीर; प्रतीक्षा रोहन मोहितेंनी दाखल केला अर्ज

फलटण :- जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साखरवाडी जिल्हा परिषद गटातील राजकीय घडामोडींना वेग आला असून वंचित बहुजन आघाडीच्या सौ. प्रतीक्षा रोहन मोहिते यांनी आज अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे साखरवाडी गटातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली असून निवडणूक वातावरण अधिक तापले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रतीक्षा मोहिते यांनी सामाजिक न्याय, महिलांचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांचे हित, युवकांचे शिक्षण व रोजगाराच्या संधी तसेच गावपातळीवरील मूलभूत सुविधा सक्षम करण्यावर आपला भर राहणार असल्याचे स्पष्ट केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. साखरवाडी गटात विविध राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने अधिकृत उमेदवार जाहीर केल्याने निवडणुकीतील चुरस अधिक वाढली आहे. येत्या काळात प्रचाराला वेग येणार असून प्रतीक्षा रोहन मोहिते यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळासह मतदारांचे लक्ष लागले आहे.

मंदिरात शपथ, पण मनात विश्वास नाही? फलटणमधील शपथनाट्यावर संतप्त प्रतिक्रिया

0
मंदिरात शपथ, पण मनात विश्वास नाही? फलटणमधील शपथनाट्यावर संतप्त प्रतिक्रिया

फलटण :-  मंदिरात शपथ, पण मनात विश्वास नाही? फलटणमधील शपथनाट्यावर संतप्त प्रतिक्रिया
संविधान, कायदे आणि लोकशाही मूल्यांवर चालणाऱ्या देशात राजकीय विश्वासाची हमी आज देवाच्या दारात शोधावी लागत आहे का? फलटण नगरपालिकेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. स्वीकृत नगरसेवकांनी वेळेत राजीनामा द्यावा, यासाठी थेट सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध काळूबाई मंदिरात नेऊन त्यांच्याकडून शपथ घेतल्याचा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शपथ… पण का?
ज्या नगरसेवकांवर पक्षाला विश्वास नाही, त्यांच्याकडून “मी वेळेत राजीनामा देईन” अशी देवासमोर शपथ घ्यावी लागते, हे चित्र लोकशाहीसाठी अत्यंत लाजिरवाणे असल्याची भावना व्यक्त होत आहे. राजकीय व्यवहार हे शब्द, लेखी करार, पक्षशिस्त आणि नैतिकतेवर चालायला हवेत. मग पक्षाच्या शब्दाची किंमत इतकी कमी झाली आहे का, की ती मंदिरातील शपथेनेच सुरक्षित करावी लागते?
नगरसेवकांवर पक्षालाच विश्वास नाही का?
या घटनेमुळे सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे – संबंधित पक्षाला स्वतःच्या नगरसेवकांवरच विश्वास नाही का? जर शपथ न घेतल्यास राजीनामा दिला जाणार नाही, अशी भीती पक्ष नेतृत्वाला वाटत असेल, तर हा पक्ष संघटनात्मक अपयशाचा स्वीकार नाही का, असा सवाल जाणकार करत आहेत.
राजकारणात अंधश्रद्धेचा शिरकाव?
आज लोकप्रतिनिधी संविधानाची शपथ घेऊन सत्तेत येतात. मात्र राजकीय सोयीसाठी, दबाव टाकण्यासाठी किंवा बांधिलकी निर्माण करण्यासाठी मंदिरात शपथ घ्यावी लागणे, हा अंधश्रद्धेचा कळस असल्याची टीका होत आहे. राजकीय निर्णय हे कायदे, नियम आणि लोकशाही प्रक्रियेतून व्हायला हवेत; देवाच्या नावावर मानसिक दबाव निर्माण करून नव्हे.
नागरिकांचा संताप अनावर
फलटणमधील नागरिकांमध्ये या प्रकाराबाबत तीव्र नाराजी आहे.
“ज्या पक्षाला स्वतःच्या नगरसेवकांवर विश्वास नाही, तो पक्ष शहराचा कारभार प्रामाणिकपणे कसा चालवणार?” असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.
काही नागरिकांनी तर “हे शपथनाट्य म्हणजे राजकीय अपयशाची कबुली आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्या शपथ मोडली तर जबाबदारी कोणाची?
देवाच्या नावावर घेतलेली शपथ जर पाळली गेली नाही, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? पक्ष, नगरसेवक की देव? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. देवाच्या नावावर राजकारण करून देवाचा आणि लोकशाहीचा एकाच वेळी अपमान केला जात नाही ना, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
फलटणमधील हा शपथनाट्याचा प्रकार केवळ एका नगरपालिकेपुरता मर्यादित न राहता, राज्यातील राजकीय नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.