Tuesday, August 4, 2026
Home Blog Page 594

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील तीन दिवस ‘या’ वेळेत महामार्ग राहणार बंद

0
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील तीन दिवस ‘या’ वेळेत महामार्ग राहणार बंद


Mumbai-Pune Express way traffic block : मुंबई पुणे एक्सप्रेसवेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुढील तीन दिवस जर या मार्गाने प्रवास करणार असाल तर तुम्हाला थोड्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. या मार्गावर पुलाचे गर्डर बसवण्यासाठी पुढील ३ दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.



Source link

Jalgaon News: आमच्या पोराला मारला, तुमचीही १-२ खल्लास करु; ५ वर्षापूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा जळगावात रक्तरंजित बदला

0
Jalgaon News: आमच्या पोराला मारला, तुमचीही १-२ खल्लास करु; ५ वर्षापूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा जळगावात रक्तरंजित बदला


त्यांचे १-२ खल्लास करू तेव्हाच शांत बसू –

मृत मुकेशचे चुलते निळकंठ शिरसाठ यांनी सांगितले की,आमच्या मुलाने त्यांच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. तेव्हापासून मुलासोबत त्यांचे जुने वैर होते. आमच्या संपूर्ण कुटूंबाला ते दुश्मन मानत होते व मुकेशला जीवे मारण्यासाठी संधीची वाट बघत होते. त्यांना माहिती होते की, रविवार असल्याने मुलगा घरी असतो. यांच्यासोबत आपण काहीतरी करू. त्यामुळे त्यांनी नियोजन करून त्याच्यावर हल्ला केला व त्याला संपवले. हल्लेखोरांनी कोयते,लोखंडी रॉड, चॉपरआणि तलवारीने हल्ला केला. अनेक लोकांना घरावर विटा देखील फेकल्या. जवळपास २५ ते ३० लोकांना आमच्या घरावर हल्ला केला. त्यांना वाटत असेल की,त्यांनी आमच्या पोराला मारले आहे. त्यांचे देखील आम्ही एक-दोन खल्लास करू,तरच आम्ही राहू. या बदला घेण्याच्या विड्याने परिसरातील तणाव वाढला आहे.



Source link

Donald trump : अमेरिकेचे सुवर्णयुग सुरू; पनामावरून चीनला इशारा.. ट्रम्प यांच्या पहिल्या भाषणातील महत्वाचे मुद्दे.. वाचा

0
Donald trump : अमेरिकेचे सुवर्णयुग सुरू; पनामावरून चीनला इशारा.. ट्रम्प यांच्या पहिल्या भाषणातील महत्वाचे मुद्दे.. वाचा


डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी एका भव्य समारंभात शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर पहिल्याच भाषणात ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचा अवलंब करणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, त्यांना जगभरातील “शांततादूत” आणि “एकसंध” बनवणारा नेता बनायचे आहे. मला शांततेचा दूत मानावे, आम्हाला जगात शांतता हवी आहे. त्याचबरोबर अमेरिकेत भक्कम सैन्य उभं करायचं आहे, पण अमेरिकन सैनिक इतरांच्या युद्धात जाणार नाहीत, असंही ते म्हणाले. मात्र, युक्रेन युद्धाचा त्यांनी कोणताही उल्लेख केला नाही.



Source link

Joe Biden : जो बायडेन यांच्या अखेरच्या आदेशाने कुटूंबीयांना दिलासा, अनेक सरकारी अधिकाऱ्यांनाही दिली माफी

0
Joe Biden : जो बायडेन यांच्या अखेरच्या आदेशाने कुटूंबीयांना दिलासा, अनेक सरकारी अधिकाऱ्यांनाही दिली माफी


अमेरिकेत सत्ताबदल झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सोमवारी शपथ घेतली. पण त्याआधी मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमधून राष्ट्राध्यक्ष म्हणून शेवटचा आदेश जारी केला. पद सोडण्याच्या काही मिनिटांपूर्वी बायडेन यांनी एक निवेदन जारी केले. बायडन यांनी आपला भाऊ जेम्स बायडेन, जेम्स ची पत्नी सारा जोन्स बिडेन, त्यांची बहीण व्हॅलेरी बिडेन ओवेन्स, व्हॅलेरी यांचे पती जॉन ओवेन्स आणि त्यांचे बंधू फ्रान्सिस बायडेन यांना  माफी देण्याची घोषणा केली.



Source link

Kareena Kapoor: बंद करा आता हे; सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मीडियावर संतापली करीना कपूर खान

0
Kareena Kapoor: बंद करा आता हे; सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मीडियावर संतापली करीना कपूर खान


बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. तसेच आम्हाला एकटे सोडा असे देखील म्हटले आहे. पण तिने पोस्ट शेअर करत राग व्यक्त केला आहे. करीनाने राग व्यक्त करणारी पोस्ट काही कारणास्तव डिलिटही केली. आता करीनाची पोस्ट नेमकी काय आहे? चला जाणून घेऊया…



Source link

मुंबईत ‘टोरेस’नंतर आता ‘मनीएज’; १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ४ भूखंडांसह ८ सदनिकांवर टाच, १७ बँक खातीही गोठवली

0
मुंबईत ‘टोरेस’नंतर आता ‘मनीएज’;  १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ४ भूखंडांसह ८ सदनिकांवर टाच, १७ बँक खातीही गोठवली


Moneyedge Group : मुंबईत टोरेस कंपनीने लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची घटना ताजी असताच आता मनीएज नावाच्या कंपनीने देखील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना हजारो कोटी रुपयांना चूना लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोट्यवधी रुपयांच्या मनीएज घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने  कंपनीची मालमत्ता जप्त केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने रायगडमधील १६ एकरांच्या चार भूखंडांसह ठाणे, विरारमधील ८ फ्लॅट जप्त केले आहेत. तसेच, १७ बँक खातीही गोठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  



Source link

Bettiah Raj : बेतिया राजच्या 200 कोटींच्या दागिन्यांचे रहस्य 80 वर्षानंतर उघड; 15,358.60 एकर जमीन अन् बरच काही…

0
Bettiah Raj : बेतिया राजच्या 200 कोटींच्या दागिन्यांचे रहस्य 80 वर्षानंतर उघड; 15,358.60 एकर जमीन अन् बरच काही…


Bettiah Royal Family News : बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बेतियाचा शेवटचा राजा हरेंद्र सिंह यांच्या जतन केलेल्या मालमत्तेपैकी एका ट्रंक उघडण्यात आली आहे. यात मौल्यवान दागिने जप्त करण्यात आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाटणा शाखेच्या स्ट्राँग रूममध्ये ही ट्रंक सुरक्षित ठेवण्यात आली होती. आता राज्य सरकार बेतिया राजाच्या सर्व जंगम आणि मालमत्तेचे मूल्यांकन करत आहेत. 

ही ट्रंक उघडल्यानंतर मोठ्या प्रमाणात सोन्याचे मणी आणि इतर दागिने आढळून आले आहेत. या शोधामुळे उर्वरित बॉक्समध्येही अशा मौल्यवान वस्तू असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे उर्वरित पाच बॉक्सही लवकरच उघडले जाणार आहेत. 

तसंच मुंबईतील एका ज्वेलरने इम्पीरियल बँक ऑफ अलाहाबाद आणि पाटणा (आताची स्टेट बँक ऑफ इंडिया) च्या शाखांमध्ये 1939 साली ठेवलेल्या रत्नांची किंमत अंदाजे 7 लाख 30 हजार 85 रुपये होती. यामध्ये अलाहाबाद प्रयागराज शाखेत ठेवलेल्या दागिन्यांची किंमत 5 लाख 21 हजार 102 रुपये आणि पाटणामध्ये ठेवलेल्या दागिन्यांची किंमत 2 लाख 8 हजार 983 रुपये आहे. त्यावेळी त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची किंमत 40 रुपये प्रति तोला आणि चांदीची किंमत 8 रुपये प्रति तोला ठरवली होती. हिरे जडलेल्या घड्याळाची किंमत त्यावेळी ज्वेलर्सने 51 हजार रुपये ठेवली होती, जी बँकांमध्ये ठेवण्यात आलीय. 

गेल्या महिन्यात बिहार विधानसभेने एक कायदा मंजूर केला, त्यानंतर बिहार सरकारला बेतिया राजच्या सर्व संपत्तीचे अधिकार मिळाले. आता सरकार या मालमत्तांची चौकशी आणि मूल्यांकन करत आहे.

बेतिया राजच्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी आणि चोरीच्या घटना रोखण्यासाठी सरकारने या मालमत्ता आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. 1990 मध्ये बेतिया राज यांच्या संपत्तीतून हिरे आणि दागिन्यांची चोरी ही आशियातील सर्वात मोठी चोरी मानली जात होती.

बेतिया राज यांच्याकडे 15,358.60 एकर जमीन आहे, त्यापैकी 15,215.33 एकर बिहारमध्ये आणि 143.26 एकर उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर या जमिनीच्या अनेक भागांवर अतिक्रमण झालंय. त्यामुळे सरकारने या जमिनीच्या भागांवर पुन्हा हक्क सांगणे आणि त्यांचे संवर्धन करणे आवश्यक असणार आहे. 

बेतिया राजाचा शेवटचा राजा हरेंद्र किशोर सिंह यांचा 26 मार्च 1893 रोजी रहस्यमय मृत्यू झाला. त्याने दोनदा लग्न केली होती, तरी अपत्य नसल्यामुळे त्याच्या घराण्याला उत्तराधिकारी मिळू शकला नाही. राणी शिवरत्न कुंवर ही राजाची पहिली पत्नी म्हणून ओळखली जाते आणि राणी जानकी कुंवर त्यांची दुसरी पत्नी म्हणून ओळखली जाते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे राजाच्या मृत्यूनंतर राणी शिवरत्न कुंवर यांनी गादी घेतली. पण अवघ्या तीन वर्षांनंतर 24 मार्च 1896 रोजी त्यांचाही मृत्यू झाला.

 





Source link

Dinesh Waghmare : दिनेश वाघमारे होणार राज्य निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त, जाणून घेऊया त्यांच्याबद्दल..

0
Dinesh Waghmare : दिनेश वाघमारे होणार राज्य निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त, जाणून घेऊया त्यांच्याबद्दल..


Dinesh Waghmare Maharashtra Election Commissioner: ज्येष्ठ आयएएस अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिनेश वाघमारे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांच्या नावावर राज्यपालांकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राज्यातील महापालिकांसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन निवडणूक आयुक्तांवर असणार आहे.



Source link

BHEL मध्ये 400 पदांची सरकारी नोकरी, कुठे पाठवाल अर्ज? जाणून घ्या

0
BHEL मध्ये 400 पदांची सरकारी नोकरी, कुठे पाठवाल अर्ज? जाणून घ्या


BHEL Engineer Trainee Recruitment 2025: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये शेकडो पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला. 

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये 20 जानेवारी 2025 रोजी इंजिनीअरिंग ट्रेनी आणि सुपरवायझर ट्रेनी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याची अर्ज प्रक्रिया 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. उमेदवार 1 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.  

पदभरतीचा तपशील 

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ने इंजिनीअरिंग ट्रेनी आणि सुपरवायझर ट्रेनी(टेक)च्या एकूण 400 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यापैकी 250 पदे इंजिनीअरिंग ट्रेनीसाठी राखीव आहेत. ज्यामध्ये विविध तांत्रिक शाखांनुसार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इंजिनीअरिंग ट्रेनी पदांमध्ये मेकॅनिकल क्षेत्रासाठी 70, इलेक्ट्रिकलसाठी 25, सिव्हिलसाठी 25, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 20, केमिकलसाठी 5 आणि मेटलर्जीसाठी 5 पदांचा समावेश आहे. पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी (टेक) साठी 150 पदे जाहीर करण्यात आली आहेत. त्यापैकी 140 यांत्रिक क्षेत्रासाठी, 55 इलेक्ट्रिकलसाठी, 35 सिव्हिलसाठी आणि 20 इलेक्ट्रॉनिक्ससाठी आहेत. या रिक्त पदासाठी लागणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार त्यांच्या पात्रता आणि अनुभवाच्या आधारे या पदांसाठी अर्ज करू शकतात आणि भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

कसा कराल अर्ज?

BHEL प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट careers.bhel.in वर जा. होमपेजवर रिक्रूटमेंट ऑफ इंजिनिअर ट्रेनी अँड सुपरवायझर ट्रेनी (टेक) 2025 या लिंकवर क्लिक करा. यानंतर Apply Online चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पुढे सर्व आवश्यक तपशील भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा. सर्वात शेवटी अर्ज सबमिट करा आणि कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा.

अर्ज शुल्क

BHEL प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. जनरल (यूआर), ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांकडून 795 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.  पीडब्ल्यूबीडी (बेंचमार्क अपंगत्व असलेली व्यक्ती), माजी सैनिक आणि एससी/एसटी श्रेणीतील उमेदवारांकडून 295 अर्ज शुल्क घेण्यात येईल. उमेदवारांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इतर ऑनलाइन पेमेंट माध्यमातून अर्ज शुल्क भरता येणार आहे. 

अर्जाची शेवटची तारीख

28 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारींनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.





Source link

Viral Video: पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस शिपायात कडाक्याचं भांडण, व्हिडिओ व्हायरल

0
Viral Video: पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस शिपायात कडाक्याचं भांडण, व्हिडिओ व्हायरल


Viral News: उत्तर प्रदेशातील झाशी येथील एसएसपी कार्यालयासमोर पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस शिपाई यांच्यातील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोघेही पोलीस कर्मचारी एकमेकांच्या अंगावर धावून जात असल्याचे दिसत आहे. एसएसपी कार्यालयात तैनात असलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून दोघांमधील वाद मिटवला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.



Source link