Tuesday, August 4, 2026
Home Blog Page 595

Viral Video: पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस शिपायात कडाक्याचं भांडण, व्हिडिओ व्हायरल

0
Viral Video: पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस शिपायात कडाक्याचं भांडण, व्हिडिओ व्हायरल


Viral News: उत्तर प्रदेशातील झाशी येथील एसएसपी कार्यालयासमोर पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस शिपाई यांच्यातील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोघेही पोलीस कर्मचारी एकमेकांच्या अंगावर धावून जात असल्याचे दिसत आहे. एसएसपी कार्यालयात तैनात असलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून दोघांमधील वाद मिटवला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.



Source link

GK : भारतातील एकमेव राज्य, जिथे एकही रेल्वे स्टेशन नाही; का ते जाणून घ्या?

0
GK : भारतातील एकमेव राज्य, जिथे एकही रेल्वे स्टेशन नाही; का ते जाणून घ्या?


भारतात एका गावातून दुसऱ्या गावाला एसटी बसने जोडलं आहे. त्यानंतर भारतात रेल्वेचे जाळे पसरलंय. ज्यामुळे आरामदायी, जलद आणि स्वस्त प्रवास म्हणून भारतीयांची रेल्वेला पसंती आहे. भारतात प्रत्येक राज्यात आणि शहरात रेल्वे स्टेशन आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भारतातील एका राज्य आजही रेल्वे स्टेशन नाही. आज आपण सामान्य ज्ञानमध्ये याच राज्याबद्दल जाणून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षांमध्ये अशाप्रकारचे प्रश्न विचारले जातात. भारतातील हे राज्य आहे जिथे एकही रेल्वे स्टेशन त्याचं नाव सिक्कीम आहे. सुंदर लँडस्केप आणि वाढती लोकसंख्या आणि पर्यटकांची सर्वात अधिक पसंती असून या राज्यात एकही रेल्वे स्टेशन नाही. यामागील कारण जाणून घेऊयात. 

भारतीय रेल्वे प्रणाली ही जगातील चौथ्या क्रमांकाची आणि आशियातील सर्वात मोठी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संपूर्ण रेल्वे नेटवर्क अंदाजे 70,000 किलोमीटर असून 7,000 हून अधिक स्थानकं आहेत. दररोज 13,000 हून अधिक प्रवासी गाड्या आणि 8,000 हून अधिक मालवाहू गाड्या इथे धावतात. ज्यामुळे ते भारताच्या वाहतूक नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग बनते. (The only state in India without a single railway station Sikkim Know why)

सिक्कीम हे भारतातील एकमेव राज्य आहे ज्याच्या सीमेवर कोणतेही रेल्वे स्टेशन नाही. हे राज्य हिमालयाच्या कठीण प्रदेशात वसलेले असल्याने, खडकाळ टेकड्या आणि आव्हानात्मक लँडस्केप, रेल्वे संपर्क टिकवून ठेवणे रेल्वे अधिकाऱ्यांसाठी कठीण काम झालंय. असे असूनही, सिक्कीम रस्ते आणि हवाई मार्गाने चांगले जोडलेले असून जवळची रेल्वे स्थानके शेजारच्या पश्चिम बंगालमध्ये आहेत. सिक्कीमच्या जवळ दोन रेल्वे स्टेशन आहेत. एक सिलीगुडी रेल्वे स्टेशन आणि न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशन आहेत. सिक्कीमपासून सुमारे 114 किलोमीटर अंतरावर असलेले, सिलीगुडी हे या प्रदेशासाठी एक प्रमुख वाहतूक केंद्र आहे. त्यानंतर सुमारे 125 किलोमीटर अंतरावर असलेले, न्यू जलपाईगुडी हे सिक्कीमला रस्त्याने प्रवेश देणारे दुसरे प्रमुख स्थानक आहे.

सिक्कीममध्ये सध्या रंगपो नावाच्या रेल्वे स्टेशनचे बांधकाम सुरू आहे. पूर्ण झाल्यानंतर, हे स्टेशन रंगपो शहर आणि सिक्कीमच्या तीन जिल्ह्यांना जोडेल. यामुळे राज्यातील वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि उर्वरित भारताला एक महत्त्वाचा दुवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

तर भारताच्या ईशान्य भागात असलेल्या मिझोराममध्ये एकच रेल्वे स्टेशन असून त्याच नाव बैराबी आहे. हे स्टेशन कोलासिब जिल्ह्यात आहे. मर्यादित रेल्वे सुविधा असूनही, मिझोराम हे रस्ते आणि हवाई नेटवर्कद्वारे उर्वरित भारताशी चांगले जोडलेले आहे. मिझोरामनंतर दुसरे ईशान्येकडील राज्य मेघालयमध्ये मेंडीपठार हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे. हे पूर्व गारो हिल्स जिल्ह्यात वसलेले आहे. राज्यात रेल्वे मर्यादित असली तरी रस्ते वाहतूक हे संपर्काचे प्राथमिक साधन राहिलंय. 

 





Source link

Nashik Crime : नवरा पहिल्या पत्नीकडंच रहात असल्याने मूल होत नाही, दुसऱ्या पत्नीनं भावाच्या मदतीने पतीला संपवलं

0
Nashik Crime :  नवरा पहिल्या पत्नीकडंच रहात असल्याने मूल होत नाही, दुसऱ्या पत्नीनं भावाच्या मदतीने पतीला संपवलं


पतीच्या ओरड्याच्या आवाज ऐकून पहिली पत्नी निरमा धावत गेली, तेव्हा सुनिता, राज,  आदित,  त्यांचा नातेवाईक दीपक आणि एक अनोळखी व्यक्ती असे पाच जण तिचा पती भावसारला मारहाण करत होते. या सगळ्यांनी मिळून भावसारला मारहाण केली आणि त्याच्या पोटावर, छातीवर आणि पाठीत वार केले. आदितने भावसारच्या डोक्यात रॉड घातला, हा घाव वर्मी लागल्यामुळे भावसार रक्तबंबाळ होऊन पळत पत्नी निरमाजवळ आला, यानंतर निरमा आणि इतरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.



Source link

महाआघाडीत फूट? BMC निवडणुकीत शरद पवारांचा पक्ष ५० जागा लढण्याच्या तयारीत, उद्धव ठाकरे पोहोचले ‘सिल्व्हर ओक’वर

0
महाआघाडीत फूट? BMC निवडणुकीत शरद पवारांचा पक्ष ५० जागा लढण्याच्या तयारीत, उद्धव ठाकरे पोहोचले ‘सिल्व्हर ओक’वर


विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर काँग्रेसकडूनही यावर प्रतिक्रिया देण्यात आली. त्यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचे मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली.



Source link

आमिर खानची नवी गर्लफ्रेंड कोण? सलमान खानच्या प्रश्नाला मुलगा जुनैदने दिलेल्या उत्तराने वेधले लक्ष

0
आमिर खानची नवी गर्लफ्रेंड कोण? सलमान खानच्या प्रश्नाला मुलगा जुनैदने दिलेल्या उत्तराने वेधले लक्ष



आमिर खान हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या आमिर कोणाला डेट करत आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. आता आमिरचा लेक जुनैद खान याविषयी काय म्हणाला चला जाणून घेऊया…



Source link

Tula Shikvin Changlach Dhada: अक्षराच्या जुन्या मित्राची एण्ट्री अधिपतीच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येणार?

0
Tula Shikvin Changlach Dhada: अक्षराच्या जुन्या मित्राची एण्ट्री अधिपतीच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येणार?


झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ पाहिली जाते. या मालिकेतील अक्षरा आणि अधिपतीचे लग्न तर झाले आहे. पण भुवनेश्वरी सतत त्यांच्या आयुष्यात अडथळे आणत असते. आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे. मालिकेत अक्षराच्या जुन्या मित्राची एण्ट्री झाली आहे. याचा फायदा भुवनेश्वरी घेणार आहे.



Source link

प्रियकर नातं मोडेना, तरुणीने अवयव निकामी होईपर्यंत विष पाजलं; न्यायाधीशांना म्हणाली ‘मी एकुलती…’; कोर्टाने घडवली जन्माची अद्दल

0
प्रियकर नातं मोडेना, तरुणीने अवयव निकामी होईपर्यंत विष पाजलं; न्यायाधीशांना म्हणाली ‘मी एकुलती…’; कोर्टाने घडवली जन्माची अद्दल


केरळमध्ये एका 24 वर्षीय तरुणीला कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. तरुणीने दोन वर्षांपूर्वी आपल्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केली होती. ग्रीष्मा असं या तरुणीचं नाव आहे. नात्यातून सुटका करण्यासाठी तिने आपला 23 वर्षीय प्रियकर शरॉन राज याची विष पाजून हत्या केली होती.  

गेल्या आठवड्यात ग्रीष्मा आणि तिच्या काकाला हत्येसाठी दोषी ठरवणाऱ्या स्थानिक न्यायालयाने गुन्ह्याच्या गांभीर्यापेक्षा आरोपीचे वय विचारात घेण्याची गरज नाही असं निरीक्षण नोंदवलं. आरोपीने तिच्या शैक्षणिक कामगिरी, पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास नसणे आणि ती तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी आहे हे कारण देत शिक्षेत सौम्यता मागितली होती.

गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी वकिलांनी परिस्थितीजन्य, डिजिटल आणि वैज्ञानिक पुराव्यांवर अवलंबून असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. केरळमध्ये फाशीची शिक्षा भोगणारी ग्रीष्मा ही सर्वात तरुण महिला ठरली आहे. पीडितेच्या वकिलाने निकालानंतर न्यायालय पुरावे स्वीकारेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

“मी कोर्टासमोर युक्तिवदा करत असताना, कोर्ट आम्ही दिलेले पुरावे स्विकारेल असा विश्वास होता. हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचा युक्तिवाद मी केला. तसंच याप्रकरणी फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती. हा आदर्श निर्णय आहे,” असं विशेष सरकारी वकील व्ही एस विनीत कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.

2022 मध्ये ग्रीष्माने प्रियकराला पॅराक्वॅट या तणनाशकाने बनलेले आयुर्वेदिक टॉनिक देऊन विषप्रयोग केला होता. 11 दिवसांनी सर्व अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाल होता. तामिळनाडूमधील एका लष्कर जवानाशी लग्न ठरल्यानंतरही राज नातं संपवण्यास तयार नसल्याने ग्रीष्माने हत्येचा कट आखला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीष्माने याआधी पळांच्या ज्यूसमध्ये पॅरासिटोमॉल टॅब्लेट मिसळून राजची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण चव खराब असल्याचं सांगत त्याने पिण्यास नकार दिला होता. 

तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील पारासला येथील रहिवासी असलेला राज हा बीएससी रेडिओलॉजीचा विद्यार्थी होता. ग्रीष्माला भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली दोषी ठरवण्यात आले, ज्यामध्ये खून देखील समाविष्ट आहे. तिचे काका निर्मलाकुमारन नायर यांना पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. आरोपीच्या आईलाही ताब्यात घेण्यात आले होते, परंतु पुराव्याअभावी तिला निर्दोष सोडण्यात आलं.





Source link

प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते? जाणून घ्या पद्धत

0
प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते? जाणून घ्या पद्धत



इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती 25 आणि 26 जानेवारीला भारतात असणार आहेत. पण तुम्हाला माहित आहे का प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते?



Source link

अभिनयसोडून शेती करायला लागला, पूर आणि आगीमुळे कर्जबाजारी झालेला प्रसिद्ध अभिनेता! एक शक्कल लढवली अन्..

0
अभिनयसोडून शेती करायला लागला, पूर आणि आगीमुळे कर्जबाजारी झालेला प्रसिद्ध अभिनेता! एक शक्कल लढवली अन्..


Filmy Kissa Marathi : अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचे असू शकते, हे अनेक कलाकारांच्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे. काही कलाकारांना या क्षेत्रात यश मिळते, तर काहींना परतीचा मार्ग निवडावा लागतो. लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांनी आपले करिअर बदलले आणि शेतीकडे वळले. यातील सर्वात उल्लेखनीय उदाहरण म्हणजे अभिनेता राजेश कुमार. बिहारच्या छोट्या गावात जन्मलेला आणि मुंबईतील चंदेरी दुनियेत करिअर करण्यासाठी आलेला राजेश कुमार सध्या पालघरमध्ये सेंद्रिय शेती करत आहे.



Source link

पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

0


Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

Follow AI generated Transcription – (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 मी गावी आल्याने माझ्या नाराजीची चर्चा आहे असं एकनाथ शिंदेंनी आता म्हटलेल आहे तसच एवढी वर्ष काम केल्यानंतर काही अपेक्षा असतात असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलाय तसच पालक मंत्र्यांची अपेक्षा ठेवण्यात वावग काय असा देखील सवाल एकनाथ शिंदेंनी आता उपस्थित केला आहे राजकीय नको आज काय आहेत राजकीय बघायला गेल महाराष्ट्रात नाराज अस चर्चा मात्र प्रत्यक्षात बघायला गेलं तर तुम्ही विकास कामा संदर्भात. चालना देण्यासाठी त्याचा सगळं तुम्ही पाहणी करा, विजिट करा, काही ठिकाणी आम्ही जाऊ, काही ठिकाणी मुख्यमंत्री जातील, आम्ही जाऊ पाहून या ठिकाणी आणि म्हणून या भागाचा विकास करणं, काया पालट करणं आणि इथल्या लोकांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवणं आणि इथला इतिहास, इथली संस्कृती जोपासण, वाढवणं हा देखील उद्देश आहे. महायुतीच्या मध्ये पक्षांमध्ये कोणतीहील किंवा नाराजी नाही कारण आता जे का…



Source link