
Priyanka Chopra Post : प्रियांका चोप्राने अमेरिकेहून भारतात पोहोचल्यानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात सहभागी होण्यासाठी अभिनेत्री पोहोचली असल्याची चर्चा होती, पण तसे काहीही घडलेले नाही.

Priyanka Chopra Post : प्रियांका चोप्राने अमेरिकेहून भारतात पोहोचल्यानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात सहभागी होण्यासाठी अभिनेत्री पोहोचली असल्याची चर्चा होती, पण तसे काहीही घडलेले नाही.

Western Railway Disrupted: पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघरमधील वैतरणा स्टेशनजवळील रेल्वे तडा गेल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या पालघर स्थानकात खोळंबल्या आहेत. तर, लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. सध्या रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम चालू असून चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीच्या महिन्यात थंडी, ऊन व पावसाचा खेळ सुरू आहे. बहुतांश भागात थंडीचा प्रकोप कमी झाला आहे. तर तापमान वाढले आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. असे असले तरी सकाळी आणि रात्री मोठ्या प्रमाणात थंडी पडत आहे. पुढील काही दिवसांत राज्याचे हवामान कोरडे राहणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Narayana Murthy on 70 Hour Work Week: नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन आठवडा 70 तासांचा असावा असं वक्तव्य केल्यानं इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी सर्वांचच लक्ष वेधलं होतं. ज्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा याच मुद्द्ला अनुसरून वक्तव्य केलं आहे. 70 तासांच्या कार्यालयीन आठवड्यासंदर्भातील वक्तव्यानंतर मूर्ती यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्याचसंदर्भात आता त्यांनी आपली बाजू मांडत कोणीही कोणाही व्यक्तीला दीर्घकाळ, तासन् तास काम करण्यासाठी सांगू शकत नाही किंबहुना गरजही नाही. पण, प्रत्येकानं ही बाब स्वत:हून समजून घ्यावी, विचार करावा असं ते म्हणाले.
आपण इन्फोसिसमध्ये 40 वर्षांहून अधिक काळासाठी जवळपास 70 तासांहून अधिक काम केल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्या वक्तव्याला अनुसरून अशा मुद्द्यांवर चर्चा करण्याव्यतिरिक्त स्वत:हून विचार किंवा आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं मूर्ती यांनी स्पष्ट केलं. ‘मी सकाळी 6.30 वाजता नोकरीच्या ठिकाणी पोहोचत असे आणि तिथून रात्री 8.30 वाजता निघत असे. हे पूर्णपणे सत्य असून, मी खरंच असं केलंय. त्यामुळे हे पूर्णपणे चुकीचं आहे असं कोणीही म्हणू शकत नाही’, असं ते म्हणाले. एका कार्यक्रमादरम्यानच्या व्याख्यानानंतर नोकरी आणि दैनंदिन आयुष्यातील संतुलन याविषयी वक्तव्य करताना आपण 40 वर्षे याच चक्रात असल्याची बाबही उपस्थितांपुढे ठेवली.
मूर्ती यांच्या वक्तव्यानुसार, तुम्हाला हे करायचंय (नोकरीचे तास) हे तुम्हाला कोणी सांगू शकत नाही या मुद्द्यावर ते ठाम दिसले. मूर्ती यांच्या मते एखाद्या गरीबाच्या भविष्यावर आपण जास्त काम केल्यानं किंवा काम न केल्यानं नेमका कसा परिणाम पडेल, याचा विचार करूनच अमुक एका व्यक्तीनं त्याच पद्धतीनं मेहनत घ्यावी.
इन्फोसिसच्या सहसंस्थापकांनी केलेल्या वक्तव्यातून एक वेगळा दृष्टीकोन त्यांनी सर्वांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. ‘आपण जर जास्त मेहनत घेतली, जास्त चांगलं काम केलं, जास्त पैसे कमवले आणि जास्त कर दिला तरच त्या मुलाचं भविष्य उज्वल होऊ शकेल’, असं ते म्हणाले. यादरम्यान त्यांनी जर्मन शास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचाही उल्लेख केला. एखादी चांगली व्यक्ती, जी मेहनती आहे, महत्त्वाकांक्षी आहे, त्या व्यक्तीची बुद्धी तल्लख आहे, शिस्तप्रिय आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाला प्रगतीच्या वाटेवर नेऊ शकतात हा विचार त्यांनी सर्वांपुढे ठेवला. यावेळी त्यांनी आणखी एका मुद्द्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं. आज देशातील 60 टक्के भारतीय दर महिन्याला मोफत अन्नधान्यावर अवलंबून असल्याचं सांगत इतकं दारिद्र्य एखाद्या आर्थिक स्वरुपातील भक्कम देशाचा गुणविशेष नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Tue, 21 Jan 202503:09 AM IST

Pune News : खंडणी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असलेले वाल्मीक कराड यांचे पुणे कनेक्शन उघड झाले आहे. वाल्मीक कराड यांचे पुण्यातील फर्ग्युसन रोडवर दुसऱ्या पत्नीच्या नावाने एका इमारतीत दोन ऑफिस घेतले असून या मालमत्तेप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक अडचणीत आले आहे. दत्ता खाडे असे या नगरसेवकाचे नाव असून त्यांची बीड जिल्हयातील केज येथे सीआयडीने चौकशी सुरू केली आहे.

Tue, 21 Jan 202503:04 AM IST
Sushant Singh Rajput Birthday : सुशांत हा अभिनय विश्वातील एक उगवता तारा होता. पण, त्याने आपले आयुष्य का संपवले याचे कारण कुणालाच कळले नाही.

Sushant Singh Rajput Birth Anniversary : टीव्हीच्या दुनियेतून मोठ्या पडद्यावर प्रवेश करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतची आज जयंती आहे. या अभिनेत्याचा चित्रपट प्रवास अतिशय अद्भुत होता. तरुण वयात मोठे पराक्रम गाजवणाऱ्या सुशांतने त्याच्या करिअरच्या शिखरावर असताना जगाचा निरोप घेतला. सुशांत हा अभिनय विश्वातील एक उगवता तारा होता. पण, त्याने आपले आयुष्य का संपवले याचे कारण कुणालाच कळले नाही. अभिनेता म्हणून सुशांत दमदार होताच, पण एक व्यक्ती म्हणून त्याच्यात अनेक गुण होते.

Viral News : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला जगातील सर्वात श्रीमंतांपासून अनेक बड्या नामवंतांनी हजेरी लावली होती. त्यात मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांचाही समावेश होता. दरम्यान, सोशल मीडियावर त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्याला नेटकऱ्यांनी आता ‘न्यू मीम’ म्हटलं आहे. हा फोटो अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांच्या प्रेयसी लॉरेन्स सांचेझशी संबंधित आहे.

PM Modi wishes Donald Trump : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र घेऊन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर अमेरिकेला पोहोचले आहेत. ट्रम्प यांच्या शपथविधी प्रसंगी त्यांनी मोदी यांचे पत्र ट्रम्प यांना दिले आहे. तसेच मोदी यांनी एक्सवरपोस्ट करत ट्रम्प यांना ‘माय डियर फ्रेंड’ संबोधत शुभेच्छा दिल्या आहेत. जयशंकर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष दूत म्हणून ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.