Thursday, July 30, 2026
Home Blog Page 517

तुम्ही महिलेला नाXX फोटो पाठवले की नाही सांगा, मंत्री जयकुमार गोरे पॉझ घेत म्हणाले….

0


मुंबई: राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने राज्यपाल आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून मदतीची याचना केली आहे. जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आपल्याला त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो पाठवले होते. हे प्रकरण 2019 साली निकालात निघाले होते. मात्र, आता मंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे पुन्हा या महिलेच्या पाठी लागल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. जयकुमार गोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते आहेत. त्यांच्यावर अशाप्रकारचे गंभीर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी मुंबईत विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली बाजू स्पष्ट केली.

माझ्यावर 2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता. दोन वर्षे हा खटला सुरु होता, 2019 मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला होता. त्या निकालाची प्रत माझ्याकडे आहे. मला या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यावेळी न्यायालयाने मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्याचे आदेश दिले होते. लोकशाहीत न्यायालय सर्वोच्च असते. तुम्हीही (पत्रकार) त्यापेक्षा मोठे नाही. हा निकाल येऊन सहा वर्षे झाली आहेत. किमान कुठल्यावेळी विषय समोर आणावा, याला राजकीय लोकांनी मर्यादा ठेवली पाहिजे, असे मला वाटते. मी सामान्य कुटुंबातून आलो आहे. माझ्या वडिलांचं सात दिवसांपूर्वी निधन झालं. मला भावनिक विषय करायचा नाही. पण ज्या वडिलांना मला संघर्ष करुन मोठं केलं, वाढवलं त्यांच्या मृत्यूनंतर मला अस्थीविसर्जनही करुन देण्यात आले नाही. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधक करतील, ही अपेक्षा मला नव्हती. पण शेवटी राजकारणात अशा गोष्टी होत असतात. मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणे माझी जबाबदारी आहे, असे जयकुमार गोरे यांनी म्हटले. 

माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार, जयकुमार गोरेंचा इशारा

ज्यांना आज माझ्यावर आरोप केले त्या प्रत्येकावर मी आजच सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. तसेच ज्यांनी माझी बदनामी केली त्या संबधितांवर मी अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे. मी अजूनही संबंधित महिलेला त्रास देतोय, असा आरोप केला जात आहे. मी या महिलेला त्रास दिला असेल तर पोलिसांनी त्याची चौकशी करावी. या तपासात मी किंवा संबंधित महिला जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करावी, असे जयकुमार गोरे यांनी म्हटले.

2019 मध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती. जे रेकॉर्ड होतं ते देखील हटवण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती गोरे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र,जयकुमार गोरे यांना विवस्त्र फोटो पाठवल्याप्रकरणी त्यावेळी न्यायालयात महिलेची माफी लागली होती, असा आरोप आता केला जात आहे.

आणखी वाचा

मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया

अधिक पाहा..



Source link

Maharashtra Election News LIVE March 5, 2025: CPM News : शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्राच्या सचिवपदी निवड

0
Maharashtra Election News LIVE March 5, 2025: CPM News : शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्राच्या सचिवपदी निवड


Maharashtra Election 2024 News LIVE: CPM News : शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्राच्या सचिवपदी निवड

Maharashtra Election 2024 News LIVE: CPM News : शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्राच्या सचिवपदी निवड

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Wed, 05 Mar 202506:04 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: CPM News : शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्राच्या सचिवपदी निवड

  • सीपीआय(एम)च्या २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात ४७ वर्षीय डॉ. अजित नवले यांची नवीन राज्य सचिव म्हणून एकमताने निवड झाली.


Read the full story here





Source link

CPM News : शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्राच्या सचिवपदी निवड

0
Maharashtra Election News LIVE March 5, 2025: CPM News : शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्राच्या सचिवपदी निवड



सीपीआय(एम)च्या २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात ४७ वर्षीय डॉ. अजित नवले यांची नवीन राज्य सचिव म्हणून एकमताने निवड झाली.



Source link

ग्रामविकास मंंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?

0


Jaykumar Gore : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा पडून काही तास होत नाही, तोपर्यंत आणखी एक मंत्री आता अडचणीत आला आहे. पहिल्याच प्रयत्नात थेट ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्रीपदाची संधी मिळालेल्या जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. जयकुमार गोरे यांनी स्वत:चे नग्न फोटो महिलेला पाठवल्याचा आरोप होत आहे. जयकुमार गोरे यांच्याकडून सरसेनापती हंबिरराव मोहितेंच्या कुटुंबातील महिलेचा छळ केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मंत्रालयासमोर महिला उपोषण करणार आहे. 

जयकुमार गोरे यांना याच प्रकरणात जेल 

सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे हे सध्या मंत्रीमंडळात ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री आहेत. त्यांना महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मोठी संधी मिळाली आहे. दरम्यान, 2016 मधे काँग्रेसमधे असताना जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे नग्न फोटो पाठवले होते. असे आक्षेपार्ह फोटो पाठवल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर जयकुमार गोरे यांना अटक होऊन दहा दिवसांची जेलमधे रवानगीही झाली होती. त्यानंतर त्यांना जाामिन मिळाला होता. 

जुने प्रकरण पुन्हा समोर का आले?

2016 मध्ये जयकुमार गोरे यांना या प्रकरणात जामिन मिळाल्याने या प्रकरणची चर्चा झाली नव्हती. संबंधित महिलेला जानेवारी महिन्यात निनावी धमकीचे पत्र आल्यामुळे तिने पुन्हा जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर संबंधित महिलेनं पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे. 

17 मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करणार

दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनी 2016 मध्ये आपले विवस्त्र फोटो एका महिलेला पाठवल्याचे प्रकरण पुन्हा समोर आले आहे. या प्रकरणातील महिलेने त्यावेळी दाखल केलेली तक्रार तिच्या नावासहित काही व्हाट्सअॅप ग्रुपवर गेल्या काही दिवसांपासून पूर्वी फिरवली गेली असल्याचा आणि त्याची एक प्रत माझ्या घरी मुद्दाम पाठवली केली असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. याप्रकरणी या महिलेने राज्यपालांना पत्र लिहून मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात 17 मार्चपासून विधान भवना समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. संबंधित महिला ही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील असल्याचं राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, राज्यातला एक पैलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा, तो विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो. हा मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील आहे. 10 दिवस जेलची हवा खातो. त्याच्या पलीकडे जाऊन 10 हजारांचा दंड भरून न्यायालयात माफी मागतो. त्यानंतरही तो महिलेच्या मागे लागतो. विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल तर यापेक्षा लज्जास्पद, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा काळ्या मंत्र्याची यादी रोज वाढत चालली आहे. 

महिला उपोषण करणार, संजय राऊतांचा आरोप 

खासदार संजय राऊत यांनी थेट नाव घेत सरकारला टार्गेट केले. भाजपचे मंत्री, देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत लाडके जयकुमार गोरे यांच्याबाबत हे समोर येत असल्याचे ते म्हणाले. शिवकाळातील सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने छळ आणि विनयभंग केल्याचं समोर आले. ही महिला पुढील काही दिवसात विधानभवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले…

0


मुंबई: राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. जयकुमार गोरे यांनी पीडित महिलेला विवस्त्र फोटो पाठवले, असा दावा केला जात आहे. जयकुमार गोरे (jaykumar gore) हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते मानले जातात. त्यांच्यावर अशाप्रकारचे गंभीर आरोप झाल्याने महायुती सरकारमधील (Mahayuti Government) कलंकित नेत्यांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना विचारणा करण्यात आली. यावर बावनकुळे यांनी म्हटले की,  मला याबद्दल माहिती नाही. याच्याबद्दल माहिती करुन घेईन आणि सांगेल, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांना काढता पाय घेतला.

जयकुमार गोरे यांच्यावर महिलेने केलेल्या आरोपांचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत भाष्य केले. संजय राऊत यांनी म्हटले की, हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानी कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे, या संदर्भातली माहिती समोर आली आहे आणि ती महिला, ती अबला पुढल्या काही दिवसांमध्ये विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे, अशी ती बातमी आहे. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे, आता हे एक पात्र नवीन निर्माण झालं. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंडळातील पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजेत. त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे. त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व रत्न त्यांनी पुन्हा एकदा तपासली पाहिजेत. जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. ही गोष्ट गंभीर आहे आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळे महाराष्ट्र कलंकित होतोय, असे संजय राऊत म्हणाले.

जयकुमार गोरे मंत्री झाल्यावर महिलेच्या पाठी लागले, वडेट्टीवारांचा आरोप

एक पश्चिम महाराष्ट्रातला मंत्री महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो. जेलमध्ये जाऊन येतो आणि मंत्री झाल्यावर तिच्या पाठी लागतो. पहिल्या महिला राष्ट्रपतींची जमीन लाटतो, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले. सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी 2016 पासून फक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्यानेच आपल्याला त्रास दिल्याचे महिलेचे म्हणणे आहे. जयकुमार गोरे यांची त्यांचे विवस्त्र फोटो मला मोबाईलवर पाठवले. या त्रासाला कंटाळून सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद झाला आहे. पण अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक झाली होती. ज्यानंतर गोरे यांना दहा दिवसांची जेलमध्येही जाव लागलं, असं महिलेने राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. महायुती सरकारने याबाबत योग्य कारवाई न केल्यास 17 मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा महिलेने दिला आहे.

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्र्यांने स्वत:चे नग्न फोटो महिलेला पाठवले, संजय राऊतांनी नाव घेतलं, पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता रडारवर!

अधिक पाहा..



Source link

जयकुमार गोरेंकडून सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील महिलेचा छळ, राऊतांचा आरोप; मंत्रालयासमोर महिला उपोषण करणार

0



Jaykumar Gore: जयकुमार गोरेंकडून सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील महिलेचा छळ, संजय राऊतांचा गंभीर आरोप, मंत्रालयासमोर महिला उपोषण करणार



Source link

Todays History : आजच्या दिवशीच भारताला मिळालेलं ‘ब्रह्मास्त्र’! पार पडलेलं समुद्रातून जमिनीवर हल्ला करणाऱ्या ब्रह्मोसचं परीक्षण

0
Todays History : आजच्या दिवशीच भारताला मिळालेलं ‘ब्रह्मास्त्र’! पार पडलेलं समुद्रातून जमिनीवर हल्ला करणाऱ्या ब्रह्मोसचं परीक्षण


आज जगातील अनेक देश भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे वेडे झाले आहेत, ज्याला ‘ब्रह्मास्त्र’ असेही म्हणतात. या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सुरू आहे. या यादीत फिलीपिन्स, इंडोनेशिया, मलेशिया तसेच व्हिएतनामचा समावेश आहे. ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र भारताच्या तिन्ही सैन्यात समाविष्ट आहे. आजच्याच दिवशी, म्हणजे 5 मार्च 2008 रोजी, भारताने समुद्रातून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. एवढेच नाही तर भारताचे हे ‘ब्रह्मास्त्र’ सतत अपग्रेड केले जात आहे. त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्या.

‘ब्रह्मोस’ हे नाव कसे अस्तित्वात आले?

ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारताच्या डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओ माशिनोस्ट्रोयेनिया यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र त्याच्या वेग आणि अचूक हल्ल्यासाठी जगभर ओळखले जाते. ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे नाव भारताच्या ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाच्या मोस्कवा नदीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र भारताच्या तिन्ही सैन्यात समाविष्ट आहे. या क्षेपणास्त्राची मारा क्षमता 300 ते 500 किमी आहे.

जमीन, समुद्र, हवेतून प्रक्षेपित करण्यास सक्षम

ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे ज्यामुळे शत्रूला ते पाडणे सोपे नाही. हे क्षेपणास्त्र जमीन, समुद्र आणि हवेतून डागता येते. आता भारत आणि रशिया दोघेही ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या हायपरसॉनिक आवृत्तीवर एकत्र काम करत आहेत. त्याला ब्रह्मोस-२ असे नाव देण्यात आले आहे. हे नवीन क्षेपणास्त्र मॅक ६ च्या हायपरसोनिक वेगाने शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम असेल.

फायर पॉवर

ब्रह्मोस हे एक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. याचा अर्थ असा की ते ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उडू शकते. त्याची मारा क्षमता ५०० किमी आहे. ज्यामुळे क्षेपणास्त्राची रेंज लांब अंतरावरून नष्ट करता येते. ते पाणबुडीतूनही डागता येते. त्याची खासियत म्हणजे ते लक्ष्यावर अगदी अचूकपणे मारा करते. ते 10 मीटर ते 15 किलोमीटर उंचीवर उडू शकते. भारताच्या ‘ब्रह्मास्त्र’ ब्रह्मोससाठी जग वेडे आहे, फिलीपिन्सनंतर आता हे 3 देश मोठी डील करू शकतात.

‘आग लावा आणि विसरा’ तंत्रात तज्ज्ञ

ब्रह्मोस क्षेपणास्त्र ‘फायर-अँड-फॉरगेट’ तंत्रज्ञानावर काम करते. याचा अर्थ असा की एकदा क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्याला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही. ते आपोआप लक्ष्य गाठते. हे क्षेपणास्त्र सहजासहजी नजरेआड येत नाही. त्यामुळे शत्रूंना त्याचा माग काढणे खूप कठीण आहे. हा एक मोठा फायदा आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे भारताच्या लष्करी सामर्थ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे शत्रूंसाठी एक मोठा धोका आहे आणि भारताच्या सुरक्षेसाठी एक मजबूत ढाल आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्राशी महत्त्वाची माहिती 

* ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रकल्प 1998 मध्ये सुरू झाला.
* 5 मार्च 2008 रोजी भारताने समुद्रातून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
* हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने शत्रूच्या लक्ष्यांवर हल्ला करण्यास सक्षम आहे.
* ब्रह्मोस क्षेपणास्त्र जमीन, समुद्र आणि हवेतून डागता येते.
* हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारला चकमा देण्यास सक्षम आहे.
* ब्रह्मोस क्षेपणास्त्र अतिशय खास हाताळणी तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. याचा अर्थ असा की गोळीबार झाल्यानंतर, लक्ष्य गाठण्यापूर्वी त्याचा मार्ग बदलण्याची क्षमता त्याच्यात असते.
* भारत आणि रशिया ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या हायपरसोनिक आवृत्तीवर एकत्र काम करत आहेत, ज्याला ब्रह्मोस-2 म्हणतात.





Source link

बारामतीत गुंडगिरीचा कहर! ‘मी बारामतीचा भाई’ म्हणत युवकाला मारहाण; रोख रक्कम लुटली

0
बारामतीत गुंडगिरीचा कहर! ‘मी बारामतीचा भाई’ म्हणत युवकाला मारहाण; रोख रक्कम लुटली

बारामती, ५ मार्च: ‘मी बारामतीचा भाई आहे. मला उधारी मागतो का?’ असे म्हणत एका युवकाला बेदम मारहाण करत त्याच्या खिशातील १,००० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे:

  • हर्षद राजू काकडे ऊर्फ बागवान (रा. आमराई, बारामती)
  • अमर सोनवणे ऊर्फ पिन्या (पत्ता नमूद नाही)

याप्रकरणी रोहित मिलिंद बनसोडे (वय २५, रा. हरिकृपानगर, बारामती) यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे हॉटेल चैत्रालीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद बागवान हा पूर्वीपासूनच हॉटेलमध्ये दहशत माजवत होता. तो अनेकदा लोखंडी हत्यारे आणि लाकडी दांडके घेऊन येत जबरदस्तीने वस्तू आणि पैसे उचलत असे.

काही दिवसांपूर्वीच त्याने हॉटेलमधून ७०० रुपयांची दारू घेतली होती, त्या उधारीची मागणी फिर्यादीने केल्यावर हर्षद बागवान भडकला. ‘मी बारामतीतील गुंड आहे, मला हर्षाभाई म्हणतात, कोणीच मला उधारी मागत नाही, तुला राहायचे असेल तर गप्प बस’ असे म्हणत त्याने धमकी दिली होती.

रात्रीच्या वेळी हल्ला

२७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रोहित बनसोडे हे आपल्या आई आणि पुतणीसह पूनावाला गार्डनसमोर जेवणाचे पार्सल घेण्यासाठी गेले होते. त्याच वेळी, दुचाकीवर आलेल्या हर्षद आणि अमर यांनी त्यांना शिवीगाळ करत ‘उधारी का मागतोस?’ असे म्हणत मारहाण केली.

त्यांनी ‘आम्ही बारामतीतील गुंड आहोत, पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आमचे रेकॉर्ड तपास. आमच्या नादाला लागू नको’ अशी धमकी दिली आणि रोहित बनसोडे यांच्या खिशातील १,००० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. फिर्यादीच्या आईने आरडाओरडा केल्यावर आसपासच्या नागरिकांनी धाव घेतली. मात्र, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ केली आणि दुचाकीवरून पळ काढला.

याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

📌 महत्त्वाचे मुद्दे:

✔️ बारामतीत सर्रास गुंडगिरी; पोलिसांपुढे खुलेआम दहशत
✔️ हॉटेल मॅनेजरला ‘मी भाई आहे’ म्हणत मारहाण
✔️ धमकी देऊन १,००० रुपये हिसकावले
✔️ पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

Gandiv: ‘गांडीव’ भारताकडे असलेले जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र; ताकद पाहून चीन आणि पाकिस्तानचा थरकाप उडेल

0
Gandiv: ‘गांडीव’ भारताकडे असलेले जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र; ताकद पाहून चीन आणि पाकिस्तानचा थरकाप उडेल



महाभारताच्या युद्धात अर्जुनाने वापरलेल्या धनुष्यावरून गांडिव क्षेपणास्त्राचे नाव ठेवण्यात आले आहे. हे सुपर मिसाईल शत्रूच्या विमानांच्या हालचालींचा अंदाज घेऊन त्यांना लक्ष्य करू शकते.



Source link

MP: हिरे, सोनं, चांदी… भारतातील ‘या’ राज्यात सगळ्या मौल्यवान धातूच्या खाणी एकदमच सापडल्या; 2026 मध्ये उत्खनन होणार

0
MP: हिरे, सोनं, चांदी… भारतातील ‘या’ राज्यात सगळ्या मौल्यवान धातूच्या खाणी एकदमच सापडल्या; 2026 मध्ये उत्खनन होणार


Madhya Pradesh Geological Survey News:  2026 मध्ये भारताला मोठा जॅकपॉट लागणार आहे. भारतातील या राज्यात हिरे, सोनं, चांदी अशा सर्व मौल्यवान धातूंच्या खाणी एकदमच सापडल्या आहेत. 2026 मध्ये भरात सरकार येथे उत्खनन करणार आहे. हा खजिना भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा बुस्टर ठरणार आहे. जाणून घेऊया भारतातील कोणत्या राज्यात ही मौल्यवान धातूची खाण सापडली आहे. 

भारतातील मध्य प्रदेश या राज्यात मौल्यवान धातुच्या खाणी आहेत. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात हिरे, सोने आणि चांदीचे मोठे साठे सापडण्याची शक्यता आहे. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हे उघड झाले आहे. या जिल्ह्यात मौल्यवान धातुंचा धोश शिवपुरीसाठीच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी उपलब्धी ठरणार आहे.

शिवपुरी जिल्ह्यातील नरवार आणि खानियाधाना तहसीलमध्ये मौल्यवान खनिज संपत्तीचे साठे असल्याचे सर्वेक्षणात उघडकीस आले आहे. येथील 630 चौरस किलोमीटर क्षेत्रावर सर्वेक्षण करण्यात आले. यात 60 हून अधिक गावांचा सामवेश आहे. या परिसराच उत्खननाच्या शक्यतांचा तज्ञांकडून सखोल अभ्यास केला जात आहे.

भारत सरकारच्या खनिज विभागाच्या मते 2026 पासून या भागात उत्खननाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. उत्खननासाठी आवश्यक कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया आधीच सुरू झाल्या आहेत. 2026 मध्ये उत्खनन सुरु झाल्यास शिवपुरीचे आर्थिक चित्र पूर्णपणे बदलू शकते. तसेच येथे रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील.

येथे सापडलेल्या मौल्यवान धातुच्या खाणी या मध्य प्रदेशला नवीन उंचीवर नेऊ शकतात. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाची सरकार आणि प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. जर उत्खननात येथे हिरे, सोने आणि चांदी असे मौल्यवान धातू सापडले तर शिवपुरी औद्योगिक आणि खाण क्षेत्र म्हणून विकसित होऊ शकते. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.  राज्य आणि देशाच्या महसुलातही वाढ होईल. यामुळे 2026 मध्ये होणाऱ्या या उत्खननाकेड सर्वांचेच लक्ष लागले आहे. 





Source link