Thursday, July 30, 2026
Home Blog Page 514

भांडण झालेल्या शेजाऱ्याची घरी गेली, चिडलेल्या बापाने 5 वर्षांच्या लेकीला निर्जनस्थळी नेलं अन् नंतर कपडे…; गावकऱ्यांसह पोलीसही हादरले

0
भांडण झालेल्या शेजाऱ्याची घरी गेली, चिडलेल्या बापाने 5 वर्षांच्या लेकीला निर्जनस्थळी नेलं अन् नंतर कपडे…; गावकऱ्यांसह पोलीसही हादरले


उत्तर प्रदेशातील सितापूर येथे बापाने पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 40 वर्षीय पित्याने आपल्या 5 वर्षांच्या चिमुरडीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाचे चार तुकडे केले. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे मुलगी शेजाऱ्याच्या घऱी गेल्याच्या क्षुल्लक कारणावरुन ही हत्या करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीचं आणि शेजाऱ्याचं भांडण झालं होतं, आणि यामुळेच त्याला मुलगी त्याच्या घऱी गेल्याचं आवडलं नव्हतं. मोहित मिश्रा असं आरोपीचं नाव आहे. 

25 फेब्रुवारीला मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मोहित मिश्रा यानेच ही तक्रार दाखल केली होती. “आम्ही गुन्हा दाखल केला आणि तिचा शोध घेण्यासाठी चार पथकं तयार केली. शोध सुरु केला असता आम्हाला एक मृतदेहाचा एक भाग सापडला. दुसऱ्या दिवशी, आणखी काही भाग सापडले, ज्यावरून तिची हत्या झाल्याची पुष्टी झाली,” असं अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रवीण रंजन सिंह यांनी सांगितलं.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्ही लोकांची चौकशी करत असतानाच तिचे वडील अचानक गायब झाले. “तिच्या वडिलांनी फोन आईकडे दिला आणि अचानक गायब झाले. जेव्हा तो गायब झाला तेव्हा आम्ही कुटुंबातील सदस्यांना मुलगी बेपत्ता होण्याआधी नेमकं काय घडलं याबद्दल विचारलं. जेव्हा तो पुन्हा परत आला तेव्हा आमी त्याच्याकडे चौकशी केली. यावेळी त्याने आपण मुलीची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली,” असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

आरोपीने पोलिसांना सांगितलं की, कुटुंबाचे एकेकाळी शेजारी राहणारे रामू यांच्या कुटुंबाशी चांगले संबंध होते. ते नेहमी एकमेकांच्या घरी ये जा करत असत. “काही दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंबात भांडण झालं आणि त्यांनी एकमेकांना भेटणं बंद केलं. मोहितने आपल्या मुलीला अनेकदा रामूच्या घरी जाऊ नकोस असं सांगितलं होतं. पण तरीही ती खेळण्यासाठी त्यांच्या घरी जात होती,” असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

मोहितने पोलिसांना सांगितलं की, घटनेच्या दिवशीही त्याने मुलीला रामूच्या घरुन येताना पाहिलं ज्यामुळे त्याचा संताप झाला. “संतापाच्या भरात त्याने मुलीला बाईकवरुन निर्जनस्थळी नेलं. तिथे त्याने तिच्याच कपड्यांनी तिचा गळा आवळळा. यानंतर मृतदेह शेतात फेकून दिला,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी जववळपास 100 जणांची चौकशी केली. 





Source link

‘तू टिकली आणि मंगळसूत्र घालत नसशील तर नवऱ्याला कशाला तुझ्यात रस असेल,’ न्यायाधीशांनी महिलेला सुनावलं

0
‘तू टिकली आणि मंगळसूत्र घालत नसशील तर नवऱ्याला कशाला तुझ्यात रस असेल,’ न्यायाधीशांनी महिलेला सुनावलं



न्यायाधीशांच्या बेछूट वक्तव्यांबद्दल तक्रारी करण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही हे निराशाजनक आहे, असं वकिलाने म्हटलं आहे.
 



Source link

सुपरफास्ट ट्रेनचे डबे लाल रंगाचेच का असतात? कारण कोणालाच ठाऊक नसेल

0
सुपरफास्ट ट्रेनचे डबे लाल रंगाचेच का असतात? कारण कोणालाच ठाऊक नसेल


Indian Railway Interesting Facts: भारतात ज्याप्रमाणं मुंबई लोकलला या शहराची लाईफलाईन म्हटलं जातं अगदी त्याचप्रमाणं देशातील संपूर्ण रेल्वेसेवेचंही जगभरातून कौतुक होतं. दर दिवशी याच रेल्वेच्या माध्यमातून लाखोंच्या नव्हे तर कोट्यवधींच्या संख्येनं प्रवासी प्रवास करताना दिसतात. अशा या देशात राजधानी, शताब्दी, वंदे भारत, सुपरफास्ट, मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेन अशा विविध श्रेणीतील रेल्वेगाड्या धावतात. 

देशाच्या कानाकोपऱ्याला रेल्वे मार्गानं जोडणाऱ्या या रेल्वेगाड्या समाजातील प्रत्येक श्रेणीला त्यांच्या खिशाला परवडेल अशाच दरात प्रवासाची मुभा देतात. भारतीय रेल्वेअंतर्गत देशभरात धावणाऱ्या प्रत्येक गाडीला श्रेणीनुसार एक खास रंग दिला जातो. सुपरफास्ट ट्रेनपासून पॅसेंजर ट्रेनपर्यंत प्रत्येक रेल्वेगाडीचा वेगळा रंग हा सांकेतिक असून ही बाब फार कमी प्रवाशांना ठाऊक आहे. 

बहुतांश सुपरफास्ट ट्रेन या लाल रंगाच्याच असता. तर, पॅसेंजर ट्रेनना निळा रंग दिला जातो. यामागचं नेमकं कारण माहितीय? रेल्वेच्या लाल रंगाच्या कोचला LHB म्हणजेच लिंक हॉफमॅन बुश Linke-Hofmann-Busch असं म्हटलं जातं. सध्याच्या घडीला रेल्वेचे हे कोच पंजाबच्या कपूरथळा इथं तयार केले जातात असं सांगण्यात येतं. 

हे लाल कोच अॅल्युमिनियमपासून तयार करण्यात येतात आणि इतर कोचच्या तुलनेत त्यांचं वजन कमी असतं. या कोचला डिस्क ब्रेकची सुविधा असून कमी वजनामुळं ते ताशी 200 किमी इतक्या वेगानं धावतात. राजधानी आणि शताब्दी ट्रेनमध्ये हे लाल रंगाचे कोच पाहायला मिळतात. असं म्हणतात की, अपघातादरम्यान LHB कोच एकमेकांवर जात नाहीत, ज्यामुळं जीवित हानीचा धोका कमी होतो. 

रेल्वेमध्ये कायमच प्रवाशांच्या हिताचा विचार करत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. कोचचा रंग आणि त्यांचं वर्गीकरण त्याच दृष्टीकोनातून करण्यात येतं. हा झाला एक मुद्दा, पण रेल्वेमध्ये आसनव्यवस्थेपासून ट्रेनचा वेग इथपर्यंत प्रत्येक गोष्ट ही काही समीकरणांना अनुसरूनच आखण्यात येते. 





Source link

जयकुमार गोरे आणखी एका महिलेसोबत माझ्यासारखंच वागलेत, ती लवकरच समोर येईल; पीडित महिलेचा दावा

0


सातारा: एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, या प्रकरणातील संबंधित महिलेने जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्याविरोधात 17 तारखेपासून उपोषणाला बसण्याबाबत मी ठाम असल्याचे या महिलेने सांगितले. मला या सहा वर्षांमध्ये अनेकदा मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला होता. तरीही मी शांत होते. मला ज्यावेळी पत्र आलं त्यावेळी मी मला त्रास होतोय यासाठी कलेक्टर ऑफिसला दिवसभर थांबून कलेक्टरांना ही सर्व हकीकत सांगितली. त्याचबरोबर पोलीस अधीक्षकांना सांगितली. मात्र, माझी कोणी दखल घेतली नाही किंवा या गोष्टीचा तपास करण्यासाठी पोलीस आले नसल्याचे देखील यावेळी महिलेने सांगितले. त्यामुळे मी 17 तारखेला माझी बदनामी होत असल्याने उपोषण करणार असल्याचा निर्णयावर ठाम असल्याचे महिलेने सांगितले. (Satara Crime News)

यावेळी संबंधित महिलेने आणखी एक खळबळजनक दावा केला. गेल्या दोन दिवसांपासून आणखी एक महिला माझ्या संपर्कात आहे. मी तिचं नाव सांगून तिची ओळख उघड करणार नाही. मात्र, माझं जयकुमार गोरे यांच्याबाबत जे मत आहे, तेच तिचंही मत आहे. ती येत्या दोन दिवसांत मीडियासमोर येऊन जयकुमार गोरे यांच्याबाबत बोलेल, असा दावा संबंधित महिलेने केला. मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. हे आपल्या विरोधात राजकीय कटकारस्थान होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

जयकुमार गोरे निर्दोष सुटला नसता, मी त्याच्यावर उपकार केले म्हणून तो सुटला; महिलेचा दावा

2019 साली जयकुमार गोरेला शपथविधीसाठी केस आडवी येत होती, तेव्हा त्यांनी मला प्रेशर आणलं. आम्ही तुम्हाला जीवे मारु, कुटुंबाला त्रास देऊ, अशी धमकी मला देण्यात आली. त्यामुळे ऑक्टोबर 2019 मध्ये मी ती केस मागे घेतली. मी केस करताना डगमगले नाही, मी तेव्हाही डगमगले नाही.  मी म्हणाले की, मला लेखी लिहून हवं की, मी पुन्हा असं करणार नाही. कुठल्याहीप्रकारचा त्रास देणार नाही. मग जयकुमार गोरे यांनी मला माफीनामा लिहून दिला. त्यावेळी कोर्टाच्या चेंबरमध्ये जिथे मी भावासोबत बोलत होतो, तेव्हा गोरे यांनी मला दंडवत घातला होता. मला वाटली एवढी शिक्षा झाल्यावर हा पुन्हा असं करणार नाही. त्यामुळे चांगुलपणाच्या भावनेतून मी ते केस मागे घेतली. अन्यथा जयकुमार गोरे या केसमधून निर्दोष सुटले नसते. ही केस निर्दोष सुटण्यासारखी नव्हती. काल जयकुमार गोरे पेपर दाखवत होते, मला निर्दोष सोडण्यात आले आहे. पण जयकुमार गोरे निर्दोष असता तर पोलिसांनी 10 दिवस तुरुंगात का ठेवलं? मुंबई उच्च न्यायालयाने तुझा जामीन अर्ज का फेटाळला? सातारच्या कोर्टात अटकपूर्व जामीन का फेटाळला, पोलीस ठाण्यात उपस्थित राहिल्यावर गोरेला जामीन मिळाला. मी त्यावेळी उपकार करुन सोडलं, तर तू मलाच पु्न्हा त्रास द्यायला लागलास. त्याला कंटाळून मी पुन्हा संघर्ष करण्याचे ठरवले आहे, असे संबंधित महिलेने सांगितले.

जयकुमार गोरेंनी माझ्यासमोर दंडवत घातला होता, महिलेचा दावा

जयकुमार गोरे यांना एका महिलेला शरीराच्या काही अवयवांचे आक्षेपार्ह फोटो पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. हे प्रकरण 2017 साली न्यायालयात गेले होते. 2019 साली न्यायालयाने आपल्याला याप्रकरणात निर्दोष मुक्त केल्याचे जयकुमार गोरे यांनी म्हटले होते. याबाबत बोलताना महिलेने म्हटले की, जयकुमार गोरे यांनी माझ्यासमोर साक्षात दंडवत घालत माफी मागितली होती. माझ्या मागे कोणताही बोलावता धनी नाही, मी एकटी खंबीर आहे. 17 तारखेला मी उपोषणाला बसणार आहे, यावर मी ठाम आहे. मी संघर्ष करणार नाही तर दुसरा पर्याय वापरणार आहे. मी कुटुंबासह आत्मदहन करणार आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी माझ्यासोबत आणखी एका महिलेला त्रास दिला आहे ती महिला सुद्धा माझ्या संपर्कात असल्याचं या महिलेने सांगितलं आहे.

आणखी वाचा

तुम्ही महिलेला नाXX फोटो पाठवले की नाही सांगा, पत्रकाराच्या प्रश्नावर जयकुमार गोरे कोर्टाचा आदेश फलकवत म्हणाले…

अधिक पाहा..



Source link

एसटी कर्मचाऱ्यांच्या थकबाकी व अन्य मागण्यांसाठी फलटण आगारासमोर निदर्शने

0
एसटी कर्मचाऱ्यांच्या थकबाकी व अन्य मागण्यांसाठी फलटण आगारासमोर निदर्शने

फलटण, ५ मार्च २०२५ – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी महामंडळ) प्रलंबित असलेल्या आर्थिक मागण्यांची पूर्तता करण्याच्या मागणीसाठी आज फलटण आगाराच्या गेटसमोर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

संघटनेने पुढील प्रमुख मागण्या मांडल्या:

1️⃣ दि. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या कालावधीतील थकबाकी त्वरित अदा करावी.
2️⃣ २०१८ च्या महागाई भत्त्याची थकबाकी देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी.
3️⃣ २०१६ ते २०२० दरम्यान घोषित केलेल्या वेतनवाढीतील घरभाडे भत्ता ८, १६, २४ टक्क्यांनी वाढवून थकबाकी अदा करावी.
4️⃣ वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के करावा आणि राहिलेली थकबाकी अदा करावी.
5️⃣ शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना ५३% महागाई भत्ता थकबाकीसह द्यावा.
6️⃣ भविष्य निर्वाह निधीतून कर्मचाऱ्यांना मागणीनुसार त्वरित उचल द्यावी.
7️⃣ अन्यायकारक शिस्त व आवेदन पद्धत रद्द करून नवीन प्रणाली लागू करावी.

या निदर्शनांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष पोपट सोनावले, सचिव योगेश भागवत, संघटक सचिव गणेश सावंत, खजिनदार निरप्पा वाघमोडे, विभागीय सदस्य सुरेश अडगळे, बाळासाहेब जगताप, सुजित जगताप, तसेच ज्येष्ठ नेते सुरेश पन्हाळे, दत्तात्रय कोळेकर, दीपक बेलदार, विलास डांगे, प्रवीण बोबडे, गणेश ननवरे, महेश अनिल भोसले, सागर चांगण, निलेश बोधे, नितीन शिंदे आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

कामगार संघटनेने स्पष्ट केले की, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

2000 च्या नोटांचे असंख्य बंडल, दागिने अन् बेहिशोबी संपत्ती; उपायुक्तांच्या घरांवर धाड टाकल्यानंतर अधिकारी चक्रावले

0
2000 च्या नोटांचे असंख्य बंडल, दागिने अन् बेहिशोबी संपत्ती; उपायुक्तांच्या घरांवर धाड टाकल्यानंतर अधिकारी चक्रावले


ओडिशामधील (Odisha) राज्य परिवहन प्राधिकरणाचे उपायुक्त प्रदीप कुमार महांती यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. दक्षता विभागाने गुरुवारी त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले. त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती मिळवल्याचा आरोप आहे. या छापेमारीत 2000 च्या नोटांचे बंडल, सोने चांदीचे दागिने आणि संपत्तीशी संबंधित अनेक कागदपत्रं सापडली आहेत. 

भुवनेश्वरमध्ये विशेष जज विजिलेंसच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या सर्च वॉरंटच्या आधारे दक्षता विभागाने भुवनेश्वर, खोरधा, पुरी, नयागड आणि कटक येथील एकूण 9 ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 2 एडिशनल एसी, 13 डीसीपी, 12 पोलीस निरीक्षक आणि 25 एएसआय सह अनेक अधिकारी सहभागी होते. 

कोणत्या जागांवर करण्यात आली छापेमारी?

– मैत्री विहार, चंद्रशेखरपुर, भुवनेश्वर 
– रघुनाथपुर, भुवनेश्वरमध्ये 4 बीएचके फ्लॅट
– कुसुपल्ला, रणपुर, नयागढ़ येथील फार्महाऊस
– गोविंदप्रसाद, भुवनेश्वरमध्ये 5 निर्माणधीन इमारत
– टांगी – खोरधा येथील पुरातन घर
– भक्ती रत्न लेन, जेनारी गाछा चौक, पुरी टाऊन येथील नातेवाईकाचं घर
– मालिपड़ा, भुवनेश्वरमध्ये नातेवाईकाच्या नावे पेट्रोल पंप 
– बालिखंड – नातेवाईकाच्या नावे निर्माणाधीन इमारत

– कटक स्थित STA कार्यालय

छापेमारीदरम्यान विजिलेंस अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने, संपत्तीची कागदपत्रं आणि काही आर्थिक पुरावे सापडले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या कागदपत्रांची छाननी केली जात आहे. जर आरोप सिद्ध झाले तर उपायुक्तांविरोधात कडक कारवाई केली जाईल. दक्षता विभाग त्यांचं बँक खातं, देवाण घेवाण आणि अघोषित संपत्तीसंबंधी तपास करत आहेत. 

काय कारवाई केली जाऊ शकते?

दक्षता विभागाच्या या कारवाईला भ्रष्टाचाविरोधातील एक मोठी मोहीम म्हणून पाहिलं जात आहे. ओडिशात अशा प्रकारच्या बेनामी संपत्तींविरोधात याआधीही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी जिल्हयात मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली आहे. ओडिशा सरकारने भ्रष्टाचाराविरोधात वेगवान मोहीम सुरु केली असून, ही कारवाई त्याचं उदाहरण म्हणून सांगितलं जात आहे. दरम्यान या कारवाईतून आणखी काय खुलासे होतात हे पाहावं लागणार आहे. 





Source link

भारतातील सर्वसामान्यांना मोठा दिलासा, तुमच्या आयुष्याशी निगडीत 53 औषधे झाली स्वस्त; सरकारने निश्चित केल्या किंमती!

0
भारतातील सर्वसामान्यांना मोठा दिलासा, तुमच्या आयुष्याशी निगडीत 53 औषधे झाली स्वस्त; सरकारने निश्चित केल्या किंमती!


Medicines Price: आजारी पडल्यावर आपल्याला डॉक्टरकडून गोळ्या औषधांची मोठी यादी दिली जाते. औषध निर्मात्या कंपन्यांकडून यासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. त्यामुळे अनेकदा सर्वसामान्यांना ही औषधे परवडणारी नसतात. पण आता सर्वसामान्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण सरकारने यासंदर्भात नियम बनवला आहे. याद्वारे 53 औषधांचे दर आटोक्यात येणार आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

वेदना, ताप, संसर्ग, मल्टीविटामिन, कॅल्शियम डी३, मधुमेह, हृदय आणि इतर जीवनशैली आजारांवर वापरल्या जाणाऱ्या औषधांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सरकारने अशा 53 नवीन औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत. 

या निर्णयामुळे कंपन्या ठरल्यापेक्षा जास्त किमतीत ही नवीन औषधे विकू शकणार नाहीत. यासंदर्भात राष्ट्रीय औषधनिर्माण किंमत प्राधिकरण म्हणजेच एनपीपीएने एक नोटिफिकेशन जारी केली आहे. ज्यामध्ये 53 नवीन औषधांच्या किमती निश्चित करण्यात आल्याचे म्हटले आहे.

एनपीपीएच्या नोटिफिकेशननुसार कंपन्या निश्चित किमतीपेक्षा जास्त शुल्क आकारू शकणार नाहीत. कंपन्या सरकारने निश्चित केलेल्या 53 औषधांच्या किमतींवर फक्त जीएसटी आकारू शकतील. जर कंपन्यांनी जीएसटी भरला असेल तरच त्या ग्राहकांकडून औषधांच्या निश्चित किमतीवर तो वसूल करू शकतील, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.  

बहुतेक लोकांना वेदना, ताप, संसर्ग, मल्टीविटामिन, कॅल्शियम डी3, मधुमेह, हृदय इत्यादी जीवनशैलीशी संबंधित विविध आजारांसाठी औषधांची आवश्यकता असते. सरकारच्या या निर्णयामुळे सर्व लोकांना दिलासा मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. 

एनपीपीए काय करते?

एनपीपीए ही एक सरकारी नियामक संस्था आहे. जी भारतातील औषधांच्या किमती नियंत्रित करते. ही संस्था रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत येते. औषधांच्या किमतींवर लक्ष ठेवणे आणि अनुसूचित नसलेल्या औषधांच्या किमतींवर लक्ष ठेवणे आणि सुधारात्मक कारवाई करणे हे प्राधिकरणाचे काम आहे. ही नियामक संस्था वेळोवेळी गरजेनुसार औषधांच्या किमती निश्चित करते आणि औषधांची उपलब्धता आणि उपलब्धता ठरवण्याचे काम करते.





Source link

‘काचा लावाsss’ कारसमोर बर्फाचे लोट येताना पाहून उडाला थरकाप; अंगावर काटा आणतोय हा व्हिडीओ

0
‘काचा लावाsss’ कारसमोर बर्फाचे लोट येताना पाहून उडाला थरकाप; अंगावर काटा आणतोय हा व्हिडीओ


Jammu Kashmir Sonamarg Avalanche : उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमस्खलनाची घटना ताजी असतानाच जम्मू काश्मीरमध्येही अशीच काहीशी परिस्थिती उदभवल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी जम्मू काश्मीरणधील सोनमर्ग इथं एक भयंकर हिमस्खलन झालं आणि या क्षणाची दृश्य अनेकांच्याच अंगावर काटा आणून गेली. 

सोशल मीडियावर सध्या हा हिमस्खलानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कार किंवा तत्सम वाहनासमोरून बर्फाचे लोट अतिप्रचंड वेगानं येताना दिसत आहे. काही सेकंदांच बर्फाचं हे वादळ आपल्या वाहनावर धडकणार हे ठाऊक असताना या परिस्थितीत बचाव करण्यासाठी ‘काचा बंद कराsss’ असा जिवाच्या आकांतानं या माणसांनी आरडाओरडा केला आणि तितक्यातच या हिमस्खलानं या वाहनाला विळख्यात घेतलं. सर्वत्र बर्फच बर्फ… अशीच काहीशी स्थिती या क्षणी पाहायला मिळाली. 

कधी होतं हिमस्खलन? 

प्रचंड हिमवृष्टीनंतर बर्फाच्या एका थरावर दुसरा थर साचतो तेव्हा हिमस्खलनाची घटना घडते. ही संपूर्ण प्रक्रिया नैसर्गिकरित्या होत असून, जसजसं उतारावर गुरुत्वाकर्षण वाढलं तरतसं इतरही काहीर कारणांमुळं बर्फाचे थर विरळ होऊ लागतात आणि ते गुरुत्वाकर्षनाच्या नियमानुसार अतिप्रचंड वेगानं कोसळू लागतात. हिमस्खलन नेमकं कधी आणि कुठे होईल याचे पूर्वसंकेत देता येत नसले तरीही कोणत्या ठिकाणी बर्फाचा थर विरळ झाला आहे यावरून तिथं हिमस्खलनाचा धोका आहे की नाही याचा अंदाज लावता येतो. 

देशात पश्चिमी हिमालयीन क्षेत्र हिमस्खलनाच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील असून, यामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असल्याचं म्हटलं जातं. हिमालयातील हिमस्खलनाच्या भागांना तीन श्रेणींमध्ये विभागलं जातं. ज्यामध्ये रेड झोन अति धोकादायक, ब्लू झोन त्याहून कमी धोकादायक आणि यलो झोन असं क्षेत्र असतं जिथं क्वचितप्रसंगी हिमस्खलनासारख्या घटना घडतात. 

 





Source link

बिलिंग काऊंटरवर बडीशेप खाल्ली अन् कोसळला… जागीच प्राण सोडला; धक्कादायक Video पाहाच

0
बिलिंग काऊंटरवर बडीशेप खाल्ली अन् कोसळला… जागीच प्राण सोडला; धक्कादायक Video पाहाच



Terrifying Video From Hotel: हा व्हिडीओ पाहून अनेकांची भितीने गाळण उडाली आहे. अवघ्या क्षणभरात हा सारा प्रकार घडला.



Source link

क्रूरतेची परिसीमा! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, नराधमांनी शरीरावर असिड ओतले, जबरदस्तीने खाऊ घातले गोमांस

0
क्रूरतेची परिसीमा!  अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, नराधमांनी शरीरावर असिड ओतले, जबरदस्तीने खाऊ घातले गोमांस



Moradabad gang rap : यूपीतील मुरादाबादमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.  



Source link