Thursday, July 30, 2026
Home Blog Page 515

हा किळसवाणा Video पाहून तुम्ही लग्नात रोटी खाणं कायमचं सोडून द्याल

0
हा किळसवाणा Video पाहून तुम्ही लग्नात रोटी खाणं कायमचं सोडून द्याल


Disturbing Video Of Wedding: उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका लग्नसोहळ्यात रोटी तयार करताना कर्मचारी चक्क तयार होणाऱ्या रोट्यांवर थुंकत असल्याचं कॅमेरामध्ये कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. हा सारा प्रकार भोजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. हा व्हिडीओ मंगळवारपासून व्हायरल होत असून या प्रकरणी अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांना जाग

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये लग्नातील जेवणामधील रोटी तयार करण्यासाठी पीठ मळताना कर्मचारी या पीठावर थुंकत असल्याचं दिसत आहे. हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली आणि त्यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. 

कठोर शिक्षेची मागणी

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन रोट्यांच्या पिठात थुंकणाऱ्याला अटक केली आहे. मात्र हा व्हिडीओ पाहून या आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. तुम्हीच पाहा हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ…

अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख पटली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 फेब्रुवारी रोजी हा सारा किळसवाणा प्रकार घडला आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचा नाव फरमान असं आहे. या प्रकरणाचा सध्या पोलीस सविस्तर तपास करत आहे. यापूर्वी आरोपीने असा प्रकार केला आहे का? तो कधीपासून असे प्रकार करतोय याबद्दल चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी यासंदर्भातील स्पष्टीकरणाचा व्हिडीओ जारी केला आहे.

ढाब्यावरचा असाच एक व्हिडीओही झालेला व्हायरल

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये अशाच व्हिडीओ व्हायरल जाला होता. त्यावेळी उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथील ढाब्यावर रोटी बनवताना पिठात थुंकणारा कर्मचारी कॅमेरात कैद झालेला. या व्हिडीओमध्ये रोटी तंदूरमध्ये टाकण्याआधी हा कर्मचारी त्यावर थुंकताना दिसत होता. हा व्हिडीओ खाली पाहू शकता…

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सदर ढाबा सील करण्यात आला होता.





Source link

ChatGPT मुळे बनले रिलेशन, युगुलाने सोशल मीडियावर सांगितले कसे AI ने केली नाते निर्माण करण्यात मदत

0
ChatGPT मुळे बनले रिलेशन, युगुलाने सोशल मीडियावर सांगितले कसे AI ने केली नाते निर्माण करण्यात मदत


आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तंत्रज्ञान अतिशय वेगाने पुढे जात आहे. बाहेरच्या कामाव्यतिरिक्त, लोक आता नातेसंबंध सुधारण्यासाठी याचा वापर करीत आहेत कारण एआय मानवासारखा पक्षपाती असू शकत नाही आणि नात्यातील दोन लोकांमध्ये भेदभाव करणार नाही. एआयच्या मदतीने तरुण जोडप्यांना त्यांच्या नात्याबद्दल तिसऱ्या व्यक्तीकडून किंवा मॅरेज कौन्सिलरकडून भरमसाठ फी भरावी लागत नाही.



Source link

सोनं तस्करीचा कॉन्ट्रॅक्ट पॅटर्न! अभिनेत्री 30 वेळा दुबईला गेली; एका ट्रीपसाठी घ्यायची ‘इतके’ लाख

0
सोनं तस्करीचा कॉन्ट्रॅक्ट पॅटर्न! अभिनेत्री 30 वेळा दुबईला गेली; एका ट्रीपसाठी घ्यायची ‘इतके’ लाख



Actress Arrested For Gold Smuggling: विमानतळावर रोखण्यात आल्यानंतर या अभिनेत्रीने आपले वडील डीसीपी असल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं. मात्र त्यानंतरही तिची तपासणी केली गेली आणि ती अडकली.



Source link

‘मधमाशांचे पोळे’ बनले युद्धातील नवे शस्त्र! युक्रेनी सैनिकांनी रशियन फौजांवर फेकले

0
‘मधमाशांचे पोळे’ बनले युद्धातील नवे शस्त्र! युक्रेनी सैनिकांनी रशियन फौजांवर फेकले


Russia ukraine war: रशिया-युक्रेन युद्धाचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये युक्रेनचे सैनिक रशियन सैनिकांवर दारुगोळ्याऐवजी मधमाश्यांनी हल्ला करताना दिसत आहेत.



Source link

अभिनेत्री रण्या वर्षभरात ३० वेळा दुबईला गेली, सोने तस्करीतून एका ट्रिपमधून कमवत असे इतके पैसे

0
अभिनेत्री रण्या  वर्षभरात ३० वेळा दुबईला गेली, सोने तस्करीतून एका ट्रिपमधून कमवत असे इतके पैसे


कन्नड अभिनेत्री रान्या राव हिच्या सोने तस्करी प्रकरणाचा तपास सुरू आहे. बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जप्त करण्यात आलेल्या सोन्याव्यतिरिक्त तिच्या घरातून मोठ्या प्रमाणात सोने आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. १५ दिवसांत तिने चार वेळा दुबईला भेट दिल्याचे सांगितले जाते. तसेच या माध्यमातून ती लाखो रुपये कमवत असे. मात्र, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.



Source link

Income Tax अधिकाऱ्यांची तुमच्या फेसबुक, इंस्टाग्रामवर करडी नजर; 1 एप्रिलपासून लागू होणारा नवा नियम काय?

0
Income Tax अधिकाऱ्यांची तुमच्या फेसबुक, इंस्टाग्रामवर करडी नजर; 1 एप्रिलपासून लागू होणारा नवा नियम काय?


डिजिटल युगात, वेगाने वाढणारे ऑनलाइन व्यवहार आणि क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक यामुळे करचोरीच्या शक्यता वाढल्या आहेत. हे थांबवण्यासाठी, भारत सरकारने प्रस्तावित आयकर विधेयक 2025 मध्ये अनेक कडक तरतुदी समाविष्ट केल्या आहेत. या नवीन कायद्याअंतर्गत, आयकर विभागाला आता करदात्यांच्या डिजिटल डेटामध्ये प्रवेश असेल, ज्यामध्ये ईमेल, सोशल मीडिया अकाउंट्स आणि क्रिप्टो वॉलेट्सचा समावेश असेल. अधिकाऱ्यांना काही शंका असल्यास डिजिटल प्लॅटफॉर्मचे अ‍ॅक्सेस कोड ओव्हरराइड करण्याचे अधिकार दिले जातील. करचोरी रोखण्यासाठी तसेच डिजिटल अर्थव्यवस्था पारदर्शक बनवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर करडी नजर 

या विधेयकामुळे अधिकाऱ्यांना सोशल मीडिया, ईमेल आणि एन्क्रिप्टेड चॅट्सची चौकशी करण्याचे अधिकार मिळाले आहेत. जर एखाद्या व्यक्तीवर करचोरीचा संशय असेल, तर अधिकारी डिजिटल डेटा ऍक्सेस करण्यासाठी ऍक्सेस कोड ओव्हरराइड करू शकतात.

क्रिप्टोकरन्सीवरील कारवाई

क्रिप्टोकरन्सीमधील वाढत्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली आहेत. सध्या, क्रिप्टो व्यवहारांवर 30% कर आणि 1% टीडीएस लागू आहे. परंतु नवीन विधेयकानुसार, अधिकारी क्रिप्टो वॉलेट्स, एक्सचेंजेस आणि एन्क्रिप्टेड चॅट्सची चौकशी करू शकतील. आयकर विधेयकाच्या कलम 247 अंतर्गत, जर एखाद्या अधिकाऱ्याला खात्री असेल की, एखादी व्यक्ती अघोषित मालमत्ता किंवा उत्पन्न लपवत आहे. तर तो व्हर्च्युअल डिजिटल स्पेसचा अ‍ॅक्सेस कोड उघडून किंवा ओव्हरराइड करून कोणताही दरवाजा, तिजोरी, लॉकर किंवा संगणक प्रणाली तपासू शकतो. आयकर कायदा, 1961 च्या कलम 132 मध्ये देखील अशा प्रकारची झडती आणि जप्तीची परवानगी आहे, परंतु यासाठी अधिकाऱ्यांकडे ठोस माहिती असणे आवश्यक आहे.

कायदेशीर प्रक्रिया आणि अधिकार

सहआयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांना डिजिटल डेटा ऍक्सेस करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. सध्याच्या कायद्यांनुसार, इलेक्ट्रॉनिक नोंदींचे निरीक्षण करण्याची परवानगी आधीच आहे, परंतु नवीन विधेयकात ही शक्ती वाढवली आहे. गोपनीयता विरुद्ध पाळत ठेवणे
या प्रस्तावामुळे गोपनीयतेच्या अधिकाराबद्दल वादविवाद सुरू झाला आहे. या तरतुदीमुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. सरकारचे म्हणणे आहे की, हे फक्त संशयास्पद प्रकरणांमध्येच लागू होईल आणि निवड समितीने आढावा घेतल्यानंतरच कारवाई केली जाईल.जर हे विधेयक कायदा बनले तर ते एप्रिल 2026 पासून लागू होईल. यामुळे करचोरी रोखली जाईल आणि डिजिटल अर्थव्यवस्थेत पारदर्शकता येईल. यामुळे करप्रणाली अधिक प्रभावी होईल असा सरकारचा दावा आहे.





Source link

London मध्ये तिरंग्याचा अपमान; खलिस्तान समर्थकाची परराष्ट्र मंत्र्यांच्या कारसमोर धाव, भारतविरोधी घोषणाबाजी करत…

0
London मध्ये तिरंग्याचा अपमान; खलिस्तान समर्थकाची परराष्ट्र मंत्र्यांच्या कारसमोर धाव, भारतविरोधी घोषणाबाजी करत…


S Jaishankar in London: केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून, काही औपचारिक भेटीगाठी आणि बैठकांमध्ये ते सहभागी होताना दिसत आहेत. पण, हा दौरा त्यांना समाधानकारक अनुभव देऊन गेला असं नाही. एका कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमस्थळाहून निघत असतानाच जयशंकर यांना अनपेक्षित विरोधाचा सामना करावा लागला. 

सोशल मीडियावर या क्षणी नेमकं काय घडलं यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथं सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातच जयशंकर आपल्या वाहनात बसताना दिसत आहेत. त्यांच्या वाहनापासून काही अंतर दूरवर सामान्य नागरिकांना प्रवेश निषिद्ध असून, तिथंही पोलीस यंत्रणा तैनात केल्याचं दिसून येतं. लंडन इथं घडलेल्या या घटनेमध्ये सुरक्षा यंत्रणांना न जुमानता एक खलिस्तान समर्थक व्यक्ती अचानकच जयशंकर यांच्या वाहनासमोर धाव घेतो. हाती तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज घेऊन कारसमोर येताच ही व्यक्ती त्याचा अपमान करताना दिसत आहे. 

तिरंग्याचा अवमान केल्याप्रकरणी तातडीनं स्थानिक पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं. पण, या विरोधप्रदर्शनानं आणि त्याच्या भारतविरोधी घोषणाबाजीनं सध्या अनेकांचं लक्ष वेधलं. एस जयशंकर हे 4 ते 9 मार्चदरम्यान ब्रिटनच्या अधिकृत दौऱ्यावर गेले असून, यादरम्यान ते ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेविड लॅमी आणि इतरही अधिकाऱ्यांची भेट घेतील असं सांगण्यात येत आहे. भारत आणि ब्रिटनमधील राजकीय नातेसंबंध आणखी दृढ करण्यच्या हेतूनं त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. 

सदर दौऱ्यात जयशंकर व्यापार, आरोग्य, शिक्षण, संरक्षण सहकार्य आणि दोन देशांतील संबंध या मुद्द्यांवर चर्चा करताना दिसतील. ब्रिटनमागोमाग ते 6 ते 7 मार्चदरम्यान आयर्लंड इथं जाणार असून, तिथं ते सायमन हॅरिस यांची भेट घेणार असून तिथं ते भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. 

काश्मीर मुद्द्यावर जयशंकर यांची कोणती भूमिका? 

लंडनमधील चॅथम हाउस थिंक टँक नावाच्या एका कार्यक्रमात सहाभागी झालं असता जयशंकर यांनी तिथं ‘भारताचा उदय आणि जागतिक स्तरावर देशाची भूमिका’ या मुद्द्यावर चर्चात्मक संवादात सहभाग घेतला. यादरम्यान त्यांनी काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवला जाण्यापासून आर्थिक सुधारणा आणि मतदानाच्या टक्केवारीत वाढ अशा मुद्द्यांवर आपले विचार मांडले. काश्मीरमधील बहुतांश समस्यांवर भाररातील केंद्र सरकारनं तोडगा मिळवला असून, अनुच्छेद 370 हटवणं हे त्यातील पहिलं पाऊल होतं, ज्यानंतर येथील आर्थिक आणि सामाजिक विकासाकडे लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचं त्यांनी या कार्यक्रमादरम्यान सांगितलं. याच कार्यक्रमातून बाहर पडल्यानंतर मात्र जयशंकर यांना एका अनपेक्षित प्रसंगाचा सामना करावा लागला. 





Source link

Hathras Stampede : हाथरसचे दोषी कोण? ‘भोले बाबा’च्या चरणांची धूळ घेण्यासाठी चेंगराचेंगरी, 121 जणांनी गमावलेला जीव

0
Hathras Stampede : हाथरसचे दोषी कोण? ‘भोले बाबा’च्या चरणांची धूळ घेण्यासाठी चेंगराचेंगरी, 121 जणांनी गमावलेला जीव


Hathras Stampede Latest News : 2024 च्या जुलै महिन्यात उत्तर प्रदेशातील हाथरस इथं झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनत अनेकांनी जीव गमावला. भक्तीच्या भावनेनं इथं जमलेल्या या सामान्यांना हे क्षण आपल्या जीवनातील अखेरचे क्षण असतील याची पुसटशीही कल्पना नव्हती. अचानकच सत्संगच्या ठिकाणी गोंधळ माजला आणि उसळलेल्या गर्दीच एकमेकांच्या पायाखाली निष्पाप जीव चिरडले गेले. 

उत्तर प्रदेशाथील हाथरस इथं झालेल्या या भीषण घटनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली असून, त्याबाबतचा अहवाल उत्तर प्रदेश विधानसभेत सादर करणअयात आला आहे. स्थानिक राज्य शासनानं स्थानप केलेल्या समितीनं यासंदर्भातील तपास पूर्ण करत एक अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द करताना प्रमाणाबाहरे उसळलेली गर्दी, आयोजनाचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळं हे संकट ओढावल्याचे मुद्दे अधोरेखित केले. 

समितीनं सादर केलेल्या अहवालानुसार सत्संगच्या ठिकाणहून भाविकांना बाहेर पडण्यासाठीचं कोणतंही नियोजन नसून, या कार्यक्रमाच्या मूळ आराखड्यातच कैक उणिवा दिसून आल्याचं निरीक्षणादरम्यान आढळलं. यामध्ये कट रचला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हणत यासाठी एसआयटी स्थापन केली जाण्याची मागणीसुद्धा केली. सदर अहवालातून समितीनं आयोजकांकडून करण्यात आलेला दावा फेटाळून लावत ही गर्दी कोणत्याही विषारी वायूमुळं उसळली  नसल्याचं स्पष्ट करत चरण राज अर्थात भोले बाबाच्या चरणांनी स्पर्शलेली धुळ घेण्यासाठीची हाक देण्याची कृती या चेंगराचेंगरीस कारणीभूत ठरल्याचं म्हटलं. 

हाथरस प्रकरणात एकूण 1680 पानांचा एक अहवाल शासनापुढे सादर करताना यामध्ये सत्संग केंद्राशी संलग्न असणाऱ्या 11 महत्त्वाच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये मुख्य आयोजक देवप्रकाश मधुकर यांच्याही नावाचा समावेश आहे. दरम्यान, भोले बाबा नामक नारायण सकार हरी यांचा मात्र या एफआयआरमध्ये किंवा 3200 पानांच्या आरोपपत्रातही उल्लेख नाही हे या अहवालातून स्पष्ट झालं. 

या सत्संग कार्यक्रमामध्ये 80000 भाविक येण्याची अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात मात्र तिथं अडीच ते तीन लाखांची गर्दी झाली आणि प्रवचन संपल्यानंतर सगळी गर्दी एकाच दिशेनं निघाल्यानं परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, घटनास्थळी पंखे आणि कूलिंग यंत्रणाही पुरेशा प्रमाणत नसून, पेयजल आणि तत्सम गोष्टींवरही ताण आला आणि गोष्टी बिघडत गेल्या. हे मुद्दा अहवालात नमूद करण्यात आले आहेत. 

 





Source link

‘मोदींच्या चाणक्यनीतीचा फुगा फुटला, ते आता…’, ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; ट्रम्पनितीमुळे भारत अडचणीत

0
‘मोदींच्या चाणक्यनीतीचा फुगा फुटला, ते आता…’, ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; ट्रम्पनितीमुळे भारत अडचणीत


Reciprocal Tariffs On India: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील वस्तूंवर आयात शुल्क आकारण्याची भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील धोरणांवर निशाणा साधला आहे. “भारताकडे संपूर्ण जग एक विश्वासू भागीदार म्हणून पाहत आहे. त्यामुळे देशातील उद्योग क्षेत्राने या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी केले, परंतु त्यांचेच परममित्र प्रेसिडंट ट्रम्प यांनी मात्र मोदींच्या या विश्वासालाच तडाखा दिला आहे. ट्रम्प महाशयांनी आयात शुल्क लादण्याची त्यांची धमकी अखेर खरी केली आहे. त्यामुळे ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ म्हणजे ‘जशास तसा’ कर लागू झाला आहे. या 25 टक्के आयात शुल्काचा फटका चीन, कॅनडा, मेक्सिको आदी देशांसह भारतालाही बसला आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

ट्रम्प महाशय मोदीभक्तांनी उडविलेले फुगे फोडत आहेत

“चीन, कॅनडा आणि मेक्सिकोने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकी मालावर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयावर त्यांचे ‘मित्र’ मोदी आता काय बोलणार आहेत? ट्रम्प हे अमेरिकेचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर मोदी यांनी लगेचच अमेरिका दौरा केला होता. ट्रम्प यांच्या गळाभेटी घेतल्या होत्या. दोघांनीही ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ करीत आपल्या मैत्रीची ग्वाही दिली होती. भारतातील मोदीभक्तांनीही ट्रम्प यांच्या एककल्ली कारभाराचा फटका मोदींमुळे भारताला कसा बसणार नाही, मोदींची चाणक्यनीती कशी यशस्वी ठरली वगैरे फुगे हवेत सोडले होते. मात्र मोदींचे विमान अमेरिकेतून उडाल्यापासूनच ट्रम्प महाशय मोदीभक्तांनी उडविलेले हे फुगे फोडत आहेत,” असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

भारतामधील कोणकोणते उद्योग अमेरिकेवर अवलंबून

“आयात शुल्क म्हणजे ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ लागू करण्याचा ट्रम्प यांचा ताजा निर्णय भारतासाठी मोठा धक्का आहे. कारण अमेरिका हा भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या निर्णयाचा भारतीय उद्योगावर व्यापक दुष्परिणाम होणार आहे. प्रामुख्याने आयटी, औषधे, ऑटोमोबाईल यांसह स्टील आणि ऍल्युमिनियम तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रांना ट्रम्प यांच्या या ‘टॅरिफराज’चा जबर तडाखा बसणार आहे. आधीच ट्रम्प यांनी व्हिसाचे नियम कठोर केले आहेत. त्यामुळे भारतीय आयटी उद्योगासमोर अनेक अडचणी उभ्या आहेत. त्यात आता आयात शुल्क वाढीची भर पडेल. भारतीय औषध कंपन्यांकडून अमेरिकेला सर्वाधिक जेनेरिक औषधांचा पुरवठा होत असतो. या निर्णयामुळे त्यांच्या निर्यातीवर परिणाम होईल. भारतीय वाहन उद्योग आधीच मंदीसदृश स्थितीला तोंड देत आहे. त्यात ‘ट्रम्प टॅरिफ’मुळे परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. भारतीय कापड आणि वस्त्र उद्योगही अमेरिकेला मोठ्या प्रमाणात निर्यात करीत असतो. त्यालाही आयात शुल्कामुळे ब्रेक लागणार आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

भारतासारख्या देशाची आर्थिक समीकरणे बिघडत आहेत

“ट्रम्प महाशयांच्या पहिल्या राजवटीत भारतीय पोलाद उद्योगाला त्यांच्या अशाच धोरणाचा फटका बसला होता. आता त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्येही याच पद्धतीने या उद्योगाला तडाखा सहन करावा लागणार आहे. ट्रम्प त्यांच्या आर्थिक निर्णयांना देशहिताचा मुलामा देत आहेत. अमेरिकन उद्योग क्षेत्राला त्यामुळे चालना मिळेल असे गणित मांडत आहेत. त्यांचे हे गणित सुटते की फसते, हे भविष्यातच समजेल, पण भारतासारख्या देशाची आर्थिक समीकरणे त्यामुळे बिघडत आहेत, त्याचे काय?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

मोदी आता काय करणार?

“ट्रम्प यांच्या दुसऱ्या राजवटीमुळे भारतीय उद्योग आणि अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’ येतील, बायडेन यांच्यापेक्षा ट्रम्प भारतासाठी ‘उजवे’ आहेत, अशा भाकडकथा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोदीभक्तांनी रंगवून सांगितल्या होत्या. मात्र निवडून आल्यानंतर हेच ट्रम्प एका पाठोपाठ एक भारताविरोधी निर्णय घेत या कथांचा रंग खरडून काढत आहेत. ‘टॅरिफ’चा वरवंटा भारतावरही फिरविण्यात त्यांनी कुठलेही ‘डावे-उजवे’ केले नाही. स्वतःला ट्रम्प यांचे परममित्र वगैरे म्हणवून घेणारे आपले पंतप्रधान मोदी आता काय करणार आहेत? ते काय करतील ते करतील, परंतु ट्रम्प यांच्या निर्णयांनी मोदींच्या चाणक्यनीतीचा आणि ट्रम्प मैत्रीचा फुगा फुटला आहे हे मात्र निश्चित,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

 





Source link

साखरपुडा सुरु असताना वधूची मैत्रीण आली अन् तिला बंद खोलीत घेऊन गेली; 4 वर्षांपासून त्या दोघी…

0
साखरपुडा सुरु असताना वधूची मैत्रीण आली अन् तिला बंद खोलीत घेऊन गेली; 4 वर्षांपासून त्या दोघी…


Bride Ring Ceremony : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वधूच्या मैत्रिणीमुळे एक लग्न मोडलंय. साखरपुडा सुरु असताना अचानक वधूची मैत्रीण आली आणि स्टेजवर जाऊन वधूला घेऊन ती थेट बंद खोलीत निघून गेली. वरासह पाहुणे काय घडतंय हे पाहतच राहिले. ही उत्तर प्रदेशातील अलीगडमधील गांधी पार्क परिसरातील आहे. रविवारी रात्री इथल्या एका हॉटेलमध्ये साखरपुडा समारंभाचा कार्यक्रम सुरू होता. तेवढ्यात एक तरुणी तिथे आली. तिने वधूला स्टेजवरून खाली खेचले आणि तिला सोबत घेऊन गेली. तिला एका खोलीत बंद करण्यात आले. तिने स्वतःला त्या खोलीत कोंडून घेतलं. खूप गोंधळ झाला. मग वराला अशी गोष्ट कळली की त्याने ते लग्न मोडलं. 

खरंतर, वधूच्या मैत्रिणीने दावा केला होता की, दोघांचेही समलैंगिक संबंध होते. ही बातमी कळताच वधूच्या कुटुंबाने तिच्या मैत्रिणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. वधूनेही या नात्यातून माघार घेतली. तिने मुलीला ओळखण्यासही नकार देऊ लागली. पण दरम्यान, मुलीने असे पुरावे दाखवले ज्यामुळे साखरपुडा मोडला. (engagement bride friend came and took her to a closed room homosexual relationship for 4 years love affair groom broke marriage)

मिळालेल्या माहितीनुसार, बुलंदशहरमधील पहासू भागातील एका पदव्युत्तर पदवीधर मुलीचे लग्न क्वार्सी परिसरातील एका तरुणाशी निश्चित झाले होते. रविवारी गांधीपार्क बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये रिंग सेरेमनी आणि बेबी शॉवर सेरेमनी सुरू होती. मुलगा आणि मुलगी स्टेजवर असताना पांढरा शर्ट आणि पँट घातलेली एक तरुणी आली. तिने वधू बनणाऱ्या मुलीचा हात धरला आणि तिला ओढू लागली. यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही कुटुंबातील लोकांना काहीही समजले नाही.

निषेधाच्या दरम्यान, मुलगी आणि वधू एका खोलीत बंदिस्त झाले. कुटुंबातील सदस्यांनी दार वाजवले, पण दोघेही बाहेर आल्या नाहीत. दरम्यान, कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. तासाभरानंतर, मुलीने स्वतः दार उघडले आणि बाहेर आली आणि म्हणाली की तिचे त्या मुलीशी चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यावर मुलीच्या बाजूचे लोक संतापले आणि त्यांनी मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे, मुलगी या नात्याला नकार देत होती. तिने असेही म्हटलं की ती त्या मुलीला ओळखतही नाही. यावर मुलीने वधूसोबतच्या तिच्या नात्याचे अनेक पुरावे दाखवले. त्यानंतर वधूच्या कुटुंबाने मुलीला दुसऱ्या खोलीत बंद केले आणि त्यानंतर पोलीस आले. संपूर्ण घटना पाहून, मुलाच्या बाजूच्या लोकांनी नात्यात प्रवेश करण्यास नकार दिला.

मुलीचं नाव बीना आहे. दोघेही गेल्या चार वर्षांपासून, शाळेच्या दिवसांपासून लेस्बियन रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांमध्ये लग्नाबाबत चर्चा सुरू होती. बीना पुढे म्हणाली, माझा बेबी शॉवर झाला होता. लग्न 22 एप्रिल रोजी होणार आहे पण माझ्या मैत्रिणीने लग्न थांबवण्यासाठी माझ्यावर दबाव आणला आणि घरात साडीने गळफास घेण्याची धमकी दिली, त्यानंतर मी ते नाते तोडले. पण ती स्वतः मला सोडून दुसऱ्याशी लग्न करणार होती.





Source link