Tuesday, August 25, 2026
Homeदेश-विदेश2000 च्या नोटांचे असंख्य बंडल, दागिने अन् बेहिशोबी संपत्ती; उपायुक्तांच्या घरांवर धाड...

2000 च्या नोटांचे असंख्य बंडल, दागिने अन् बेहिशोबी संपत्ती; उपायुक्तांच्या घरांवर धाड टाकल्यानंतर अधिकारी चक्रावले

2000 च्या नोटांचे असंख्य बंडल, दागिने अन् बेहिशोबी संपत्ती; उपायुक्तांच्या घरांवर धाड टाकल्यानंतर अधिकारी चक्रावले

[ad_1]

ओडिशामधील (Odisha) राज्य परिवहन प्राधिकरणाचे उपायुक्त प्रदीप कुमार महांती यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. दक्षता विभागाने गुरुवारी त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले. त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती मिळवल्याचा आरोप आहे. या छापेमारीत 2000 च्या नोटांचे बंडल, सोने चांदीचे दागिने आणि संपत्तीशी संबंधित अनेक कागदपत्रं सापडली आहेत. 

भुवनेश्वरमध्ये विशेष जज विजिलेंसच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या सर्च वॉरंटच्या आधारे दक्षता विभागाने भुवनेश्वर, खोरधा, पुरी, नयागड आणि कटक येथील एकूण 9 ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 2 एडिशनल एसी, 13 डीसीपी, 12 पोलीस निरीक्षक आणि 25 एएसआय सह अनेक अधिकारी सहभागी होते. 

कोणत्या जागांवर करण्यात आली छापेमारी?

– मैत्री विहार, चंद्रशेखरपुर, भुवनेश्वर 
– रघुनाथपुर, भुवनेश्वरमध्ये 4 बीएचके फ्लॅट
– कुसुपल्ला, रणपुर, नयागढ़ येथील फार्महाऊस
– गोविंदप्रसाद, भुवनेश्वरमध्ये 5 निर्माणधीन इमारत
– टांगी – खोरधा येथील पुरातन घर
– भक्ती रत्न लेन, जेनारी गाछा चौक, पुरी टाऊन येथील नातेवाईकाचं घर
– मालिपड़ा, भुवनेश्वरमध्ये नातेवाईकाच्या नावे पेट्रोल पंप 
– बालिखंड – नातेवाईकाच्या नावे निर्माणाधीन इमारत

– कटक स्थित STA कार्यालय

छापेमारीदरम्यान विजिलेंस अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने, संपत्तीची कागदपत्रं आणि काही आर्थिक पुरावे सापडले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या कागदपत्रांची छाननी केली जात आहे. जर आरोप सिद्ध झाले तर उपायुक्तांविरोधात कडक कारवाई केली जाईल. दक्षता विभाग त्यांचं बँक खातं, देवाण घेवाण आणि अघोषित संपत्तीसंबंधी तपास करत आहेत. 

काय कारवाई केली जाऊ शकते?

दक्षता विभागाच्या या कारवाईला भ्रष्टाचाविरोधातील एक मोठी मोहीम म्हणून पाहिलं जात आहे. ओडिशात अशा प्रकारच्या बेनामी संपत्तींविरोधात याआधीही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी जिल्हयात मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली आहे. ओडिशा सरकारने भ्रष्टाचाराविरोधात वेगवान मोहीम सुरु केली असून, ही कारवाई त्याचं उदाहरण म्हणून सांगितलं जात आहे. दरम्यान या कारवाईतून आणखी काय खुलासे होतात हे पाहावं लागणार आहे. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments