Sunday, June 28, 2026
Home Blog Page 51

राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय : फलटण व पंढरपूरला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, साखरवाडीला अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर

0
राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय : फलटण व पंढरपूरला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, साखरवाडीला अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर


फलटण :- फलटणच्या प्रशासकीय वाटचालीत आज एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत फलटण (Phaltan) आणि पंढरपूर (Pandharpur) येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तर साखरवाडी (Sakharwadi) येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण–कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे.
या निर्णयामुळे फलटणकरांचे अनेक वर्षांपासूनचे स्वतंत्र जिल्ह्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल टाकले गेले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी सांगितले की, “फलटणला स्वतंत्र जिल्हा करण्याचे आमचे स्वप्न आहे. आज मंजूर झालेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे त्या दिशेने टाकलेले पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. आगामी काळात जिल्हास्तरीय सर्व महत्त्वाची कार्यालये टप्प्याटप्प्याने फलटणमध्ये आणण्याचा आमचा संकल्प आहे.”
याचबरोबर, फलटण येथे टाऊन प्लॅनिंग ऑफिस आणण्यासाठीही प्रयत्न सुरू असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने लवकरच हे कार्यालय फलटणला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले आहेत.
या निर्णयामुळे आता नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामासाठी साताऱ्याला जाण्याची गरज भासणार नाही. फलटणमध्येच अनेक महसूल व प्रशासकीय कामे पूर्ण होतील. तसेच साखरवाडीसारख्या ग्रामीण भागात अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांच्या महसूलविषयक कामांना वेग मिळणार असून प्रशासन अधिक गतिमान होणार आहे.
फलटण, पंढरपूर आणि साखरवाडीच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा निर्णय निश्चितच ऐतिहासिक ठरणार आहे.

सत्तेच्या गणितात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निर्णय ठरणार महत्त्वाचा

0
सत्तेच्या गणितात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निर्णय ठरणार महत्त्वाचा

फलटण | सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीने संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अध्यक्षपदाची लढत अधिकच रंगतदार झाली आहे. अशा या निर्णायक क्षणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर कोणती भूमिका घेणार, याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला ३३ सदस्यांचा ‘मॅजिक फिगर’ अद्याप कुणालाच गाठता आलेला नाही. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी निवडणुकीपूर्वी ‘एकला चलो’ची भूमिका घेतली होती. मात्र निकालानंतरची अंकगणित पाहता, शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना निर्णायक **‘किंगमेकर’**च्या भूमिकेत आली असून, या संपूर्ण निर्णयप्रक्रियेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे वजनदार अस्तित्व प्रकर्षाने जाणवत आहे. जिल्ह्यातील राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, प्रशासनावर असलेली पकड आणि विविध पक्षांतील नेत्यांशी असलेले जवळचे संबंध यामुळे रामराजेंचा एक निर्णय सत्तेचा पारडा कुठे झुकवेल, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
अध्यक्षपदासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असून, पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. भेटीगाठी, गुप्त चर्चा, राजकीय गणिते आणि बदलती समीकरणे यामुळे दररोज नवे अंदाज बांधले जात आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये रामराजे नाईक निंबाळकर कोणती रणनीती आखणार, कोणाला पाठिंबा देणार, की एखादा धक्कादायक निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
सातारा जिल्हा परिषदेत सत्ता नेमकी कोणाची होणार? अध्यक्षपद कुणाच्या गळ्यात पडणार? या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळणार असली, तरी अंतिम चित्र रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निर्णयावरच अवलंबून आहे, हे मात्र निश्चित मानले जात आहे.

Health News : बद्धकोष्ठतेला मिनिटांत दूर करतील 5 ड्रिंक्स, टॉयलेट सीटवर बसताच साफ होईल पोटातील घाण

0
Health News : बद्धकोष्ठतेला मिनिटांत दूर करतील 5 ड्रिंक्स, टॉयलेट सीटवर बसताच साफ होईल पोटातील घाण


पोट फुगणे, गॅस, बद्धकोष्ठता, जेवणानंतर लगेच पोटदुखी किंवा शौचालयात जाण्याची इच्छा या सर्व पचनाच्या समस्या आहेत. जरी सामान्य वाटत असले तरी, जर या समस्या सोडवल्या नाहीत तर त्या एकूण आरोग्यावर परिणाम करू शकतात. बरं, येथे आम्ही तुम्हाला काही घरगुती पेयांबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या पोटासाठी खूप चांगले आहेत. तुम्ही हे पेय दररोज पिऊ शकता; ते असंख्य फायदे देतात आणि कोणतेही दुष्परिणाम देत नाहीत. हे पेये जलद निराकरण करण्याऐवजी पचनास मदत करण्यावर लक्ष केंद्रित करतात. भारतीय पदार्थ बहुतेकदा मसाल्यांनी भरलेले असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असू शकतात, परंतु हानिकारक देखील असू शकतात. खरं तर, काही लोक गरम मसाल्याला चांगला प्रतिसाद देत नाहीत. अशा परिस्थितीत, जर एखाद्या व्यक्तीने जास्त मसाल्यांनी बनवलेली भाजी खाल्ली तर त्यांना गॅस किंवा फुगण्याचा अनुभव येऊ शकतो. बरं, आम्ही तुम्हाला भारतीय स्वयंपाकघरात आढळणाऱ्या काही घटकांपासून बनवलेल्या पेयांबद्दल सांगणार आहोत, जे पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहेत.

Add Zee News as a Preferred Source

जिऱ्याचे पाणी 

जिऱ्याचे पाणी पोट फुगणे आणि मंद पचन बरे करण्यासाठी वापरले जाते. जिऱ्यामध्ये काही संयुगे असतात जी पोटातील एंजाइम्सच्या क्रियाकलापांना समर्थन देतात, जे अन्नाचे सहज पचन करण्यास मदत करतात. हे पेय बहुतेकदा गरम सेवन केले जाते, ज्यामुळे ते नियमित वापरासाठी योग्य बनते, विशेषतः जड किंवा अनियमित जेवणानंतर. ते तयार करण्यासाठी, एका ग्लास गरम पाण्यात एक चमचा जिरे घाला आणि ते उकळवा. नंतर, ते थोडे थंड होऊ द्या आणि ते कोमट प्या. हे देखील वाचा – प्रसूतीनंतर मूळव्याधची समस्या का वाढते? बद्धकोष्ठता टाळण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या

बडीशेप पाणी 

गॅस आणि पोटातील पेटके कमी करण्यासाठी बडीशेप पाणी देखील सामान्यतः घेतले जाते. बडीशेप तोंडाला फ्रेशनर म्हणून वापरली जाते कारण ते तोंडाची दुर्गंधी दूर करते, परंतु ते पचन देखील सुधारते. म्हणून, हे पेय जेवल्यानंतर पोट फुगण्याचा अनुभव घेणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. ते हळूहळू काम करते आणि दैनंदिन दिनचर्या सुलभ करते. खूप गरम पाणी पिणे टाळा.

आले आणि ओव्याचा पाणी 

आले आणि ओवा एकत्रितपणे आतड्यांच्या हालचालींना चालना देते. ज्यांना पोटात जडपणा जाणवतो त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. पचन मंद असताना हे पेय अनेकदा वापरले जाते. हिवाळ्याच्या हंगामासाठी हे एक परिपूर्ण पेय आहे, कारण त्याचा तापमानवाढीचा प्रभाव असतो आणि पचन सुधारते आणि शरीराला उबदार करते. हे देखील वाचा – त्रिफळा १ दिवसात बद्धकोष्ठता दूर करेल, आयुर्वेदिक डॉक्टरांनी ते सेवन करण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे – ज्यामुळे पोट स्वच्छ होईल.

ताक 

पचन सुधारण्यासाठी ताक देखील एक उत्तम पर्याय आहे. त्यात नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात, जे पोटाचे संतुलन राखण्यास मदत करतात. हे पचनक्रियेतील बिघाड कमी करण्यास मदत करते आणि दुपारच्या जेवणानंतर फायदेशीर आहे. लिंबू पाणी बद्धकोष्ठता आणि गॅस कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. त्याचे गुणधर्म





Source link

साताऱ्यात भाजपला वगळून सत्ता स्थापनेसाठी वेग, शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

0


सातारा : जिल्हा परिषदेच्या निकालानंतर आता साताऱ्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. सातारा जिल्ह्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू आहेत. शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसााई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, संजीव राजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली.

सातारा जिल्ह्यामध्ये 27 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादीने 20 तर शिंदेंच्या शिवसेनेने 15 जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी 33 जागांची आवश्यकता असून राष्ट्ववादी आणि शिवसेना एकत्र आले तर बहुमताची संख्या पार होते. त्यामुळे भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये हालचाली सुरू आहेत.

साताऱ्यातल्या हॉटेल फर्नमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची, खासदार यांची औपचारिक बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, संजीव राजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण हे उपस्थित होते. 

ही बैठक जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी होती, त्यावर प्राथमिक चर्चा झाल्याचं राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केलं. तर शंभुराज देसाई यांनीही त्याला दुजोरा दिल्याचं दिसून आलं. 

Satara ZP Election Election : सातारा जिल्हा परिषद पक्षीय बलाबल 

भाजप : 27

राष्ट्रवादी काँग्रेस : 20

शिवसेना : 15

शिवसेना (ठाकरे) :00

काँग्रेस : 01

इतर: 02

सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण अंतिम आकडेवारी

सातारा 16

भाजप – 10 
राष्ट्रवादी – 5
शिवसेना – 1

जावली 6

भाजप – 3
राष्ट्रवादी – 1
शिवसेना-2

वाई 08

भाजप – 3
राष्ट्रवादी -5

महाबळेश्वर 4

राष्ट्रवादी -2
शिवसेना-2

खंडाळा 6

भाजप – 1
राष्ट्रवादी -5

फलटण – 16

भाजप – 5
राष्ट्रवादी-3
शिवसेना-8

माण -10

भाजप – 5
राष्ट्रवादी -5

खटाव -14 

भाजप – 8
राष्ट्रवादी-6

कोरेगाव 12

भाजप – 1
राष्ट्रवादी- 9
शिवसेना- 2

कराड – 24

भाजप – 16
काँग्रेस -2
राष्ट्रवादी – 4
राष्ट्रवादी शरद पवार-1
शिवसेना-1

पाटण-14

भाजप – 1
शिवसेना-13

पंचायत समिती एकूण गण 130

भाजप- 53 
राष्ट्रवादी-45
शिवसेना-29
काँग्रेस-   02
श.प. गट 01

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा



Source link

माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली : मकरंद पाटील

0


Satara ZP Election Result 2026 सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत चांगलं यश मिळाल्याचं म्हटलं आहे. सातारा जिल्हा हा कायम राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे मात्र अलीकडची परिस्थिती थोडी वेगळी होती. अजित दादांच्या झालेल्या निधनानंतर पक्षातील कार्यकर्ता थोडा सैरभैर झाला होता. परंतु या जिल्ह्यातील राष्ट्रवादी एकत्र झाली आणि त्याचाच हा परिणाम आहे, असं मकरंद पाटील म्हणाले. 

घुसखोरी करणाऱ्यांना जनतेची चपराक : मकरंद पाटील

सातारा जिल्ह्यातील सर्व मतदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, असं मकरंद पाटील यांनी म्हटलं. आमचे मित्र पक्ष भाजप यांनी या आधीच स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. युती एकत्रीकरणाचा विषय त्यांच्याकडूनच संपलेला होता. यानंतर आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांमध्ये एकत्र चर्चा केली होती. यामुळेच राष्ट्रवादीला एक अपक्ष धरून 21 जागा मिळाल्या आणि शिवसेनेला 15 जागा मिळाल्या यामुळे दोन्ही पक्षांना चांगल्या जागा मिळाल्या, असं मकरंद पाटील यांनी सांगितलं.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी एकत्र अजून कोणतीही चर्चा झालेली नाही. वरिष्ठ आणि प्रमुख कार्यकर्त्यांचं काय म्हणणे आहे हे जाणून घेऊन कोणासोबत सत्ता स्थापन करायची याचा निर्णय घेऊ, असं मकरंद पाटील म्हणाले.  

मी असेल माझा मतदारसंघ असेल, पाटण मतदारसंघ असेल या ठिकाणी बाहेरच्या मंत्र्यांनी येऊन फार मोठ्या घोषणा केल्या, ज्याला घुसखोरी म्हणतो अशा पद्धतीचा प्रयत्न केला. मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या, सगळं झालं. परंतु आमच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात आमच्या पक्षातील सगळे उमेदवार लोकांनी निवडून दिले हिच त्यांना चपराक आहे, असं मकरंद पाटील यांनी म्हटलं.  

शंभूराज देसाई काय म्हणाले? 

पाटणमध्ये देसाई कुटुंबावर प्रेम करणारी जनता आहे.ही जनता आमचे कुटुंब आहे, त्यामुळे आमच्या पाटण मतदारसंघातील जनता अशा लोकांना अजिबात थारा देत नाही.त्यामुळे असे कितीही नेते आले तरी आम्ही त्याची चिंता करत नाही असं उत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं आहे. या आधी जिल्हा परिषदेत फक्त 3 शिवसेनेचे सदस्य होते.मात्र आता तो आकडा 15 झाला आहे.पाचपट संख्या वाढली आहे.त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना अजून मजबूत करण्याची वाटचाल सुरू आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले. 

भाजपच्या गणेश नाईक यांनी पालकमंत्री देसाई यांना मालकमंत्री अशी टीका केली होती. त्याला देसाई यांनी उत्तर दिलं आहे.ही जनताच माझी मालक आहे.माझ्या जनतेने माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे.राष्ट्रवादी सोबत जिल्हा परिषदेच्या सत्तेत जायचं की नाही या बाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे देसाई यांनी सांगितलं आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाला? OBC महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर कोण जिंकलं?

0


सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. सातारा जिल्हा परिषदेवर स्वबळावर सत्ता आणायची या इराद्यानं निवडणूक लढलेल्या भाजपच्या इराद्यांना मतदारांनी ब्रेक लावल्याचं निकालातून पाहायला मिळालं आहे. सातारा जिल्हा परिषदेत भाजपला 27 जागा मिळाल्या असून त्यांच्या विरोधात लढलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास त्यांना सत्ता स्थापनेची संधी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 आणि शिवसेनेनं 15 अशा एकूण 35 जागा जिंकल्या असून सातारा जिल्हा परिषदेत बहुमताचा आकडा 33 इतका आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र शेळके वर्णे जिल्हा परिषद गटातून विजयी झाले आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीला त्यांचा पाठिंबा मिळेल, असं चित्र आहे. सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे.  साताऱ्याच्या 65 पैकी 9 जिल्हा परिषद गट ओबीसी महिलांसाठी राखीव होते. या नऊ गटातील एका जिल्हा परिषद सदस्याला अध्यक्षपदी संधी मिळेल. 

सातारा जिल्हा परिषदेचं अध्यपद कोणाला?

सातारा जिल्हा परिषदेच्या गट रचनेनंतर गटनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेचे 9 गट ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले होते.  यात कराड, पाटण, खटाव मधील प्रत्येकी दोन जिल्हा परिषद गटांचा समावेश होता. तर, कोरेगाव, सातारा आणि जावळी तालुक्यातील एका जिल्हा परिषद गटाचा समावेश होता. कराडमध्ये काले आणि विंग, पाटणमध्ये मारुल हवेली आणि मल्हारपेठ, खटाव तालुक्यात औंध आणि बुध तर साताऱ्यात कोडोली, जावळीत कुडाळ आणि कोरेगावमध्ये वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटात ओबीसी आरक्षण लागू होतं. 

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या 9 गटांपैकी चार जिल्हा परिषद गटात भाजपनं विजय मिळवला. यामध्ये कुडाळ, कोडोली, काले आणि विंग जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे. तर, दोन जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेनेनं विजय मिळवला. ते गट म्हणजे मारुल हवेली आणि मल्हार पेठ होय. राष्ट्रवादी काँग्रेसनं वाठार स्टेशन, बुध आणि औंध जिल्हा परिषद गटात विजय मिळवला आहे. 

सातारा जिल्हा परिषद ओबीसी महिला प्रवर्ग गट, विजयी उमेदवार यादी

जावळी तालुका: कुडाळ जिल्हा परिषद गट 

जयश्री गिरी, भाजप, 11917 मते (विजयी)
पूनम नायकुडे, राष्ट्रवादी काँग्रेस, 5201 
जयश्री शेवते, अपक्ष, 2367

सातारा तालुका: कोडोली जिल्हा परिषद गट 

नीता खरात, भाजप, 7430 मते (विजयी)
कांचन साळुंखे राष्ट्रवादी काँग्रेस 4973
संगीता माने  अपक्ष 4146

कोरेगाव तालुका : वाठार स्टेशन जिल्हा परिषद गट 
जयश्री भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस, 12543 मते (विजयी)
सुनिता मोहिते, शिवसेना, 9078

खटाव तालुका : बुध जिल्हा परिषद गट 

लता कर्णे , राष्ट्रवादी काँग्रेस, 13661 मते (विजयी)
प्रिती त्रिपुटे भाजप 11934 

खटाव तालुका : औंध जिल्हा परिषद गट 
मनीषा फडतरे, राष्ट्रवादी काँग्रेस, 11394 मते (विजयी)
भारती अंकुश गोरे, भाजप, 11342

पाटण तालुका : मल्हार पेठ जिल्हा परिषद गट
विजया कुंभार, शिवसेना, 16275 मते विजयी
सुजाता कुंभार भाजप 8947

पाटण तालुका : मारुल हवेली जिल्हा परिषद गट 
योगिता गिरी, शिवसेना,16203 मते विजयी
वैशाली गुरव, भाजप,  7164

कराड तालुका: विंग जिल्हा परिषद गट 
शैलजा शिंदे, भाजप

कराड तालुका: काले जिल्हा परिषद गट 
मनीषा पाटील, भाजप

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, शिवसेनेला सत्तेत बसण्याची संधी,भाजपचं नेमकं काय चुकलं?  

0


सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेसाठी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.  भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व अपक्ष यांच्या भाजपविरोधी आघाडीने एकत्रित ताकद दाखवत सत्तास्थापनेच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता कोणाच्या हाती जाणार, याबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे.  भाजपच्या अतिआत्मविश्वासाने आता त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची ही संधी गमावली आहे.

सातारा जिल्ह्यात अत्यंत चुरशीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली. कोरेगाव आणि फलटण तालुके वगळता बहुतांश तालुक्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट, शिवसेना व मित्र पक्षांनी भाजपविरोधी आघाडी करत थेट लढत दिली होती.  मतमोजणीनंतर या आघाडीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आकडेवारीतून स्पष्ट झाले राजकीय गणित…

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निकालानुसार भाजप 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा गाठण्यात भाजप अपयशी ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसला 20, शिवसेनेला 15, राष्ट्रीय काँग्रेसला 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 तर अपक्ष व इतरांना 1 जागा मिळाली आहे. एकूण 65 सदस्यांच्या सातारा जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 33 जागांची गरज राहिली आहे.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भाजपविरोधी आघाडीची एकत्रित सदस्य संख्या 37 वर पोहोचत असल्याने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याची संधी या आघाडीकडे झुकलेली दिसत आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आगामी काळात तीव्र राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

साताऱ्यात सत्तास्थापनेची रणधुमाळी सुरू

सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी बहुमताच्या जवळ असलेल्या भाजपविरोधी आघाडीला संधी अधिक असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी कोणत्या पक्षाचा उमेदवार पुढे येणार, कोण कोणाला पाठिंबा देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा जिल्ह्यातील पंचायत समित्यांपैकी फलटण, माण येथे समसमान बलाबल झाले असून सभापतींचा निर्णय चिठ्ठीवर राहणार आहे.

सातारा: 16 जागांमध्ये भाजप 10, राष्ट्रवादी 5, शिवसेना 1

महाबळेश्वर : 4 जागांमध्ये 2 सेना, राष्ट्रवादी 2,

वाई : 8 जागामध्ये राष्ट्रवादी 5 , भाजप 3

खंडाळा : 6 जागांमध्ये राष्ट्रवादी 4, भाजप 2

कोरेगाव : 12 जागांमध्ये 9 राष्ट्रवादी, शिवसेना 2, भाजप 1

सातारा : 16 जागंमध्ये 10 भाजप, राष्ट्रवादी 5, सेना 1

पाटण : 14 पैकी 13 शिवसेना, भाजप 1

खटाव : 14 जागांमध्ये 8 भाजप, राष्ट्रवादी 6

माण : 10 जागांमध्ये 5 भाजप, राट्रवादी 5

जावली : 6 जागांमध्ये भाजप 3, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1

सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटामध्ये :

भाजप 27, राष्ट्रवादी 20, शिवसेना 15, काँग्रेस 1, स्वाभिमानी 1, अपक्ष 1

सातारा : 8 जागांमध्ये भाजप 5, राष्ट्रवादी 2, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1

कराड दक्षिण व उत्तर : 12 जागांमध्ये भाजप 8, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 2, राष्ट्रीय काँग्रेस 1, अपक्ष 1

महाबळेश्वर : 2 जागांमध्ये राष्ट्रवादी 1, शिवसेना 1

खंडाळा : 3 गटामध्ये राष्ट्रवादी 2, भाजप 1

कोरेगाव : 6 जागांमध्ये भाजप 1, राष्ट्रवादी 3, शिवसेना 2

पाटण : 7 जागांपैकी शिवसेना 6, भाजप 1

फलटण : 8 जागांपैकी शिवसेना 5, भाजप 2, राष्ट्रवादी 1

माण : 5 जागांपैकी राष्ट्रवादी 3, भाजप 2

खटाव : 7 जागांपैकी भाजप 4, राष्ट्रवादी 3

वाई : 4 जागांपैकी राष्ट्रवादी 3, भाजप 1,

जावली : 3 जागांपैकी भाजप 2, शिवसेना 1

राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन जिल्हा परिषद मध्ये सत्ता स्थापन करणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. जिल्ह्यामध्ये भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येणार का ते पाहावं लागेल. निवडणुकीपूर्वी  मंत्री शंभूराजे देसाई यांच्या घरी झालेली चहा पे चर्चा यशस्वी झाली असल्याचं पाहायला मिळतंय. रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन काका पाटील यांसारखे मातब्बर नेतेमंडळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी भेटीला गेले होते.

हेदेखील वाचा



Source link

बरड जिल्हा परिषद गटात शिवसेना–राजे गटाचा दणदणीत विजय; सौ. वैशाली संदीप कांबळे प्रचंड बहुमताने विजयी

0
बरड जिल्हा परिषद गटात शिवसेना–राजे गटाचा दणदणीत विजय; सौ. वैशाली संदीप कांबळे प्रचंड बहुमताने विजयी


फलटण प्रतिनिधी :- बरड (ता. फलटण) जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत शिवसेना व  राजे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी प्रचंड बहुमताने दणदणीत विजय मिळवला आहे. सामाजिक कार्य व शिक्षण क्षेत्रातील भक्कम कामगिरीच्या जोरावर त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन करत ही निवडणूक जिंकली आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या गटात सौ. वैशालीताई कांबळे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. मतमोजणीअंती त्यांचा विजय घोषित होताच संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला.
निंबळक (ता. फलटण) येथील रहिवासी असलेल्या सौ. वैशालीताई कांबळे या सामाजिक कार्यकर्त्या असून मालोजीराजे शेती विद्यालयात त्या उपक्रमशील शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांतील त्यांच्या कार्याला मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला आहे.
विजयानंतर  बोलताना सौ. वैशालीताई कांबळे म्हणाल्या,
“हा विजय माझा नसून बरड गटातील जनतेचा आहे. समाजातील वंचित घटकांचा विकास, दर्जेदार शिक्षण आणि महिलांचे सक्षमीकरण यासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करेन.”
यावेळी शिवसेना व राजे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विजयानंतर बरड जिल्हा परिषद गटात नव्या आणि प्रभावी नेतृत्वाची सुरुवात झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

साहस टाईम्स तर्फे हार्दिक अभिनंदन

पंचायत समितीवर महायुतीची मोठी मुसंडी; सभापतीपदावरही दावा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा ठाम विश्वास

0
पंचायत समितीवर महायुतीची मोठी मुसंडी; सभापतीपदावरही दावा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा ठाम विश्वास

फलटण प्रतिनिधी :-  फलटण तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीने आपली ताकद अधिक भक्कम केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पंचायत समितीच्या एकूण १६ पैकी ८ जागा जिंकत महायुतीने निम्म्याला निम्मे यश संपादन केले असून, फलटण विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या ४ जागा निवडून आल्या आहेत. विधानसभा आणि नगरपालिका आधीच महायुतीकडे असल्याने आता पंचायत समितीच्या सभापतीपदावरही आमचाच दावा असल्याचा ठाम विश्वास माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केला.
निवडणूक निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रणजितसिंह निंबाळकर पुढे म्हणाले की, “गेल्या निवडणुकीत आमचा केवळ एक जिल्हा परिषद सदस्य होता. मात्र, यावेळी ही संख्या चारवर पोहोचली आहे. तसेच पंचायत समितीचे ८ सदस्य निवडून आल्याने तालुक्यात आम्ही ‘निम्म्याला निम्मे’ झालो आहोत. हा आमचा आलेख प्रगतीचा आणि विकासाचा आहे.”
सभापतीपदाचा निर्णय चिठ्ठीद्वारे होणार असला तरी, फलटणच्या विकासासाठी दैव आणि नशीब आमच्याच बाजूने राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी काळातील भूमिकेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, पंचायत समितीत विरोधात बसावे लागले तरी आम्ही प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करू आणि जर सभापतीपद मिळाले तर विकासात्मक कामांना गती देऊ.
काही ठिकाणी, विशेषतः विडणीसारख्या जागा अत्यंत निसटत्या मतांनी गमावल्या असल्या तरी एकूण निकालाने महायुतीला मोठी बळकटी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, ज्येष्ठ नेते अजितदादांच्या निधनामुळे कोणताही विजयोत्सव साजरा न करण्याचा निर्णय जाहीर करत त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व मतदारांचे मनापासून आभार मानले.
यावेळी आमदार सचिन पाटील यांनीही जनतेचे आभार मानताना सांगितले की, “फलटण तालुक्याने परिवर्तनाचा जो निश्चय केला होता, त्याला या निवडणुकीतही मतदारांनी भाजप-राष्ट्रवादी महायुतीला भरभरून पाठिंबा देत दुजोरा दिला आहे. पंचायत समितीसाठी तालुक्याने दोन्ही बाजूंना समान न्याय दिला असला, तरी सभापतीपदाची चिठ्ठी परमेश्वराच्या इच्छेने आमच्याच बाजूने निघेल, अशी आमची भावना आहे.”

फलटण तालुक्यात राजेगटाचा दमदार पुनरागमन; जिल्हा परिषदेत ५, पंचायत समितीत ८ जागांवर विजयसभापती पदाचा फैसला चिठ्ठीवर; राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता

0
फलटण तालुक्यात राजेगटाचा दमदार पुनरागमन; जिल्हा परिषदेत ५, पंचायत समितीत ८ जागांवर विजयसभापती पदाचा फैसला चिठ्ठीवर; राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता

फलटण | प्रतिनिधी  :- फलटण तालुक्यात तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापवले आहे. अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकांमध्ये शिवसेना राजेगटाने जिल्हा परिषदेत आठपैकी पाच जागा जिंकत मोठा राजकीय करिश्मा केला, तर पंचायत समितीच्या १६ जागांपैकी शिवसेना राजेगट व भाजप यांनी प्रत्येकी ८ जागा जिंकत बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता पंचायत समिती सभापती पदाचा निर्णय चिठ्ठीद्वारे होणार असून, संपूर्ण फलटण तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

जिल्हा परिषद गटांचे निकाल – चुरशीची लढत, दिग्गजांना धक्का
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप व शिवसेना यांच्यात तुल्यबळ लढती पाहायला मिळाल्या.
कोळकी गटातून स्व. माजी आमदार चिमणराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री कदम यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी जयकुमार शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
वाठार निंबाळकर गटातून भाजपचे विष्णू लोखंडे विजयी झाले.
गुणवरे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. ऋतुजा अभिजित जगताप, तर बरड गटातून शिवसेनेच्या सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी विजय मिळवला.
हिंगणगाव गटात दोन वेळा मतमोजणी होऊनही भाजपाच्या अ‍ॅड. सौ. किरण निलेश नलावडे यांनी माजी जि.प. सदस्या सौ. सारिका ताई अनपट यांचा धक्कादायक पराभव केला.
तरडगाव गटातून शिवसेनेचे गिरीश बनकर यांनी एकतर्फी विजय मिळवला, तर विडणी गटात सौ. ज्योती गौतम मोरे यांनी अत्यल्प फरकाने बाजी मारली.
पंचायत समितीत अटीतटीची लढत; दोन्ही गटांना ८-८ जागा
पंचायत समितीच्या १६ जागांमध्ये राजेगट शिवसेना व भाजप यांना प्रत्येकी ८ जागा मिळाल्या आहेत.
तरडगाव गणातून सौ. योगिता दीपक गायकवाड, पाडेगाव गणातून राहुल दादासो नरुटे, साखरवाडी–पिंपळवाडी गणातून कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांनी विजय मिळवला.
सस्तेवाडी गणातून गणेश मल्हारी तांबे, विडणी गणातून सौ. पुष्पा रामचंद्र चोपडे, गुणवरे गणातून सौ. वनिता धनाजी आढाव, बरड गणातून सौ. स्वाती हणमंत आटोळे यांनी भाजप उमेदवारांना धक्का दिला.
हिंगणगाव, सुरवडी, सासवड, जाधववाडी, वाठार निंबाळकर यांसह अनेक गणांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचे निकाल लागले. अखेर दोन्ही गटांना समसमान आठ जागा मिळाल्याने सभापती पदासाठी चिठ्ठीचा मार्ग निश्चित झाला आहे.
पराभवाचा वचपा काढत राजेगटाची मुसंडी
मागील विधानसभा व नगरपालिका निवडणुकांतील पराभवानंतर राजेगट शिवसेनेने या निवडणुकीत जोरदार पुनरागमन करत जिल्हा परिषदेत पाच जागा जिंकल्या. पंचायत समितीतही आठ सदस्य निवडून आल्याने आगामी काळात फलटण तालुक्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.