Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 508

सीसीटीव्हीत कैद झाला LIVE दरोडा, Tanishq च्या शोरुममधून 25 लाखांचे दागिने लुटले; पोलिसांसोबत चकमक अन्…

0
सीसीटीव्हीत कैद झाला LIVE दरोडा, Tanishq च्या शोरुममधून 25 लाखांचे दागिने लुटले; पोलिसांसोबत चकमक अन्…


Tanishq Robbery CCTV: तनिष्कच्या शोरुममध्ये दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या आराह येथे हा दरोडा पडला आहे. सकाळी 10.30 वाजता शोरुम उघडताच 5 ते 6 जण आत घुसले आणि बंदुकीचा धाक दाखवत सुरक्षारक्षक, कर्मचारी आणि ग्राहकांना ओलीस ठेवलं. यानंतर तब्बल 25 कोटींचे दागिने चोरुन दरोडेखोरांनी पळ काढला. यावेळी त्यांनी काही रोख रक्कमही सोबत नेली, ज्याचा आकडा समोर आलेला नाही. हा सगळा दरोडा शोरुममधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामध्ये शस्त्रधारी दरोडेखोर ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना दरोडा टाकताना हात वर ठेवायला सांगत आहेत. नंतर चोरीचा माल बॅगेत भरुन ते पळ काढतात. 

आराह पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोपाली चौकातील तनिष्कच्या शाखेत हा दरोडा पडला. शोरूमचे व्यवस्थापक कुमार मृत्युंजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी रोख रक्कम, चेन, नेकलेस आणि बांगड्यांसारखे सोन्याचे दागिने तसेच काही हिऱ्यांचे तुकडे असा मोठा ऐवज लंपास केला. 

सुरक्षारक्षक मनोज कुमार यांनी सगळा घटनाक्रम उलगडला आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर सकाळी 10 वाजता शोरुम उघडलं होतं अशी माहिती त्यांनी दिली आहे. “सहा गुन्हेगार एका गाडीतून आले. त्यांनी रस्त्याच्या पलीकडे आपली गाडी पार्क केली. शोरूमच्या धोरणानुसार, आम्ही एकाच वेळी चारपेक्षा जास्त जणांच्या ग्रुपला आत जाऊन देत नाही. म्हणून आम्ही त्यांना जोडीने आत येण्याची परवानगी दिली. जेव्हा सहावा व्यक्ती आला तेव्हा त्याने माझ्या डोक्यावर पिस्तूल धरले, माझे शस्त्र हिसकावून घेतले आणि माझ्यावर हल्ला केला. त्यानंतर, त्यांनी त्यांच्या बॅगा दागिन्यांनी भरण्यास सुरुवात केली,” असं त्यांनी सांगितलं.

शोरुममधील कर्मचारी रोहित कुमार मिश्रा याने सगळे कर्मचारी जीव वाचवण्यासाठी काऊंटरच्या मागे लपले होते असं सांगितलं. सिमरन या कर्मचाऱ्याने आपण पोलिसांना फोन केला असता 600 मीटरवर पोलीस स्थानक असतानाही पोहचायला  अर्धा तास लागेल असं सांगितल्याचा दावा केला आहे. आम्ही अर्ध्या तासात 25 ते 30 फोन केले असंही तिने सांगितलं. 

दरोड्यानंतर भोजपूरच्या पोलिस अधीक्षकांनी सर्व स्टेशन प्रमुखांना वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी जिल्ह्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो प्रसारित करण्यात आले. या माहितीच्या आधारे, स्टेशन प्रमुखांनी त्यांच्या पथकासह बाबुरा छोटी पुलावर वाहनांची तपासणी सुरू केली. या कारवाईदरम्यान, तीन मोटारसायकलींवर सहा संशयास्पद पुरुष डोरीगंजच्या दिशेने वेगाने जाताना दिसले. 

आम्ही थांबण्यास सांगितलं असता त्यांनी दुचाकीचा वेग वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाठलाग केला असता दरोडेखोरांना पोलिसांवर गोळीबार केला. ज्यामुळे पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. यामध्ये दोघे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी दोन पिस्तूल, 10 काडतुसं, चोरलेले दागिने आणि पल्सर बाईक जप्त केली आहे.  कंपनी नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांना मदत करत आहे. 





Source link

रेल्वे गाड्यांची नावे कशी ठेवली जातात? पाहूयात सविस्तर

0
रेल्वे गाड्यांची नावे कशी ठेवली जातात? पाहूयात सविस्तर


भारतातील प्रत्येक रेल्वेला एक विशिष्ट नाव असते जसे की, हमसफर एक्सप्रेस, महाकाल एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस. पण यांचे नाव कसे ठेवण्यात आले हे अनेकांना माहित नाही. तर जाणून घेऊयात या रेल्वेची नावे कशावरुन ठेवण्यात आली. 

गाड्यांची नावे ठरवण्याची प्रक्रिया 
रेल्वे गाड्यांची नावे खूप विचारपूर्वक आणि विविध पैलूंवर आधारित असतात. या प्रक्रियेत देशाची संस्कृती, इतिहास, भूगोल तसेच त्या गाडीच्या मार्गाचा किंवा तिच्या उद्देशाचा विचार केला जातो. रेल्वे मंत्रालय, राज्य सरकारे आणि रेल्वे झोन यांकडून याबाबत सूचना घेतल्या जातात आणि शेवटी अंतिम निर्णय रेल्वे मंत्रालय घेतो.

गाड्यांची नावे आणि त्यामागील विचार
1. हमसफर एक्सप्रेस – ही ट्रेन प्रवाशांमधील बंधन आणि प्रवासातील साथीदारपणाचा प्रतीक आहे.
2. महाकाल एक्सप्रेस – उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराला समर्पित आहे.
3. बुद्ध पौर्णिमा एक्सप्रेस – भगवान बुद्धांना समर्पित असलेली गाडी आहे.
4. गोदावरी एक्सप्रेस – ही ट्रेन गोदावरी नदीच्या आसपासच्या परिसराला ओळख दाखविणारी आहे.
5. सिंधू दर्शन एक्सप्रेस – सिंधू नदी आणि तिच्या सांस्कृतिक वारशाला समर्पित करण्यासाठी या ट्रेनचे नाव सिंधू दर्शन एक्सप्रेस ठेवले. 
6. वंदे भारत एक्सप्रेस – देशभक्ती, स्वावलंबन आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे.
7. जन शताब्दी एक्सप्रेस – लोकांना जलद आणि स्वस्त दरात रेल्वे सेवा देण्यासाठी चालवली जाते.
8. राजधानी एक्सप्रेस – देशाची राजधानी, दिल्लीला जोडणारी महत्त्वाची ट्रेन आहे.

नाव ठरवण्याचे अंतिम अधिकार  
रेल्वे गाड्यांच्या नावांचा निर्णय रेल्वे बोर्ड घेते. त्यासाठी संबंधित राज्य सरकारे आणि रेल्वे झोनकडून सूचना घेतली जातात. गाडीच्या मार्ग, उद्देश आणि वैशिष्ट्यांवर आधारित तिचे नाव ठरवले जाते. तरीही अंतिम निर्णय हा रेल्वे मंत्रालयाकडे असतो.





Source link

फसवणूक टाळायचीये? पाहा आधार कार्ड लॉक कसं करायचं… समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया

0
फसवणूक टाळायचीये? पाहा आधार कार्ड लॉक कसं करायचं… समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया


How to lock Aadhaar card: आधार कार्ड. भारतात सरकारी काम असो किंवा इतर कोणतंही काम जिथं ओळखपत्रांची आवश्यकता आसते, तिथंतिथं आधार कार्डचा सर्रास वापर केला जातो. केंद्र सरकारच्या वतीनं देशातील नागरिकांसाठी जारी करण्यात आलेलं एक असं ओळखपत्र आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या बायोमेट्रीक डिटेलचा समावेश असतो. पण, हल्ली मात्र ही संपूर्ण प्रणाली सुरक्षित ठेवण्यात आलेली असतानाही सायबर फ्रॉडमध्ये मात्र याच आधार कार्डचा ‘आधार’ घेत फसवणूक केली जाते. 

इथून पुढे मात्र ही प्रकरणं थांबणार असून, देशातील नागरिकांच्या आधार कार्डला आणखी सुरक्षितता प्रदान केली जाणार आहे. ज्याअंतर्गत आधार कार्ड लॉक करता येणार आहे. शिवाय हे करण्यासाठी तुम्हाला ई मित्र सेंटरलाही जाण्याची काहीही आवश्यकता भासणार नाही. 

कसं लॉक करावं आधार कार्ड? 

आधारसकार्ड लॉक करण्यासाठी सर्वप्रथम UIDAI myAadhaar या संकेतस्थळाला भेट द्या. 
यानंतर ‘लॉक/अनलॉक आधार’ हा पर्याय निवडा. 
Next हा पर्याय निवडल्यानंतर आधार वर्चुअल ID (VID), पूर्ण नाव, पिनकोड आणि कॅप्चा एंटर करा. 
यानंतर OTP वेरिफाय होताच आधार बायोमेट्रिक्स लॉक होतील. 

आधार कार्ड लॉक केल्यानं काय फायदा होणार? 

आधार कार्डशी लिंक असणारं फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन आणि फेस डेटा चुकीच्या पद्धतीनं, चुकीच्या कामांसाठी वापरला जाऊ नये यासाठी आधार बायोमेट्रीक लॉक सुरू करण्याचा सल्ला दिला जातो. या सुविधेच्या मदतीनं तुमच्या परवानगीशिवाय ID वेरिफिकेशन, पैशांची देवाणघेवाण किंवा सिमकार्डही दिलं जाणार नाही. युजर/ भारतीय नागरिक कोणत्याही क्षणी बायोमेट्रिक्स लॉक किंवा अनलॉक करू शकतात. यासाठी ते UIDAI पोर्टल किंवा mAadhaar अॅपची मदत घेऊ शकतात. आधार कार्डशी संलग्न माहितीचा वापर करून अनेकांचीच फसवणूक करण्यात आल्याची माहिती आजवर अनेकदा समोर आली आहे. पण, आता मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं असून, त्याचा नागरिकांना कितपत फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 





Source link

Crime Story: 19 मुलींची हत्या, मृतदेहांवर बलात्कार आणि भक्षणाचे आरोप; तरीही कठोर शिक्षा झाली नाही

0
Crime Story: 19 मुलींची हत्या, मृतदेहांवर बलात्कार आणि भक्षणाचे आरोप; तरीही कठोर शिक्षा झाली नाही


Crime Story: 2006 च्या डिसेंबर महिन्यात नोएडात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर राजधानी दिल्लीनंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती. दिल्ली शेजारी एसणाऱ्या नोएडात एका कोठीजवळ मुलांच्या हाडांचे सापळे सापडायला लागल्याने संपूर्ण देश हादरला होता. निठारी हत्याकांड त्यावेळी खूप गाजले होते. एका परिसरातील मुलं सातत्याने बेपत्ता होऊ लागली. या हत्याकांडाला 19 वर्षे झाले तरीदेखील अजूनही याच्या आठवणीने परिसरातील लोकांच्या अंगावर काटा येतो. 

नोएडातील खेडेगाव निठारी अचानक देशभरात चर्चेत आले. मोनिंदर सिंह पंढेर आणि सुरेंद्र कोली या दोघांनी मिळून मानवतेला काळिमा फासणारे कृत्य केले होते. 2005 ते 2006 या एका वर्षात दोघांनी तब्बल 31 लहान मुलांचे बळी दिले. नेमकं काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊया. 

नोएडाच्या सेक्टर 31 मध्ये एका अलिशान घरात मोनिंदर सिंह पंढेर हा गृहस्थ राहायचा. याच्यावर एका वर्षात 31 मुलांना मारल्याचा आरोप आहे. या घटनेचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा पायल नावाच्या मुलीची हत्या झाली. पायलच्या हत्येचा तपास करताना या भयानक हत्याकांडाची उकल झाली. पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली यांच्यावर तब्बल 31 मुलांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र तपासात 19 लोकांची हत्या, लैंगिक शोषण आणि पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले. यात 10 मुलींचा समावेश होता. 

मोनिंदर सिंह पंढेर यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या नाल्यात पोलिसांना 19 हाडांचे सापळे सापडले. ही सापळे महिला व मुलांचे होते. या घटनेनंतर दोघांनाही अटक करण्यात आले. सीबीआयला मानवी हाडांसह 40 असे पॅकेट मिळाले ज्यात मानवी अवयव भरून ते नाल्यात टाकण्यात आले होते. इतकंच नव्हे तर काही मानवी अवयव त्यांनी शिजवूनदेखील खाल्ले होते. 

मोनिंदर सिंह पंढेर हा मुळचा पंजाबचा आहे. 2000 मध्ये त्याने नोएडात एक घर घएतले. सुरुवातीला तो पत्नी आणि मुलासह येथे राहत होता. मात्र 2003मध्ये दोघे पंजाबमध्ये शिफ्ट झाले. तिथेच त्याना एका नोकराची गरज भासली तेव्हा त्यांनी सुरेंद्र कोलीला बोलावून घेतले. सुरेंद्र कोली हा मुळचा उत्तराखंडचा होता. सुरेंद्र मोनिंदरची सगळी कामे करायचा. तिथूनच या हत्याकांडाची सुरुवात झाली. 

मोनिंदर सिंह हा निठारीतील घरात कॉलगर्ल बोलवायचा. त्यातूनच कोलीतील विकृती जागी झाली. सुरेंद्र कोली हा मुलांना चॉकलेट-बिस्किटचे आमिष दाखवून घरी बोलवायचा. त्यानंतर त्यांचा गळा आवळून त्यांच्यावर बलात्कार करायचा. त्यांनतर मृतदेह बाथरुममध्ये घेऊन जाऊन छोटे छोटे तुकडे करायचा. पोटाचा हिस्सा कुकरमध्ये शिजवून खायचा आणि इतर मृतदेह नाल्यात फेकून द्यायचा. कोलीचा जबाब ऐकून पोलिसंही हादरले होते. असं म्हणतात कोलीचा जबाब ऐकून दोन पोलिसांनी उलटी केली होती तर दोन पोलीस बाहेर पळून आले होते. 

सुरुवातीला कोली याने तो नपुंसक असल्याचा दावा केला होता. त्यामुळं पोलिसांनी त्याची मेडिकल केली होती. तेव्हा तो नपुंसक असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र तो मेडिकल स्टोअरमधून उत्तेजना निर्माण होण्यासाठी गोळ्या खायचा त्यानंतर तो बलात्कार करायचा. कोलीने मुलांवरही बलात्कार केल्याचा आरोप आहे. सुरेंद्र कोली हा नेक्रोफिलिया आजाराने ग्रासलेला होता. बलात्कारादरम्यान मुलींना विरोध केल्याची भीती त्याच्या मनात होती. त्यामुळं तो आधी मुलींना ठार करायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करायचा. 

घटनाक्रम सविस्तर

२९ डिसेंबर २००६: घरासमोरील नाल्यात लहान मुले आणि महिलांचे सांगाडे सापडले, मोनिंदरसिंग पंढेर आणि सुरेंद्र कोली यांना अटक करण्यात आली.
8 फेब्रुवारी 2007- कोली आणि पंढेर यांना 14 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवण्यात आले.
मे 2007 – सीबीआयने आपल्या आरोपपत्रात पंढेरला अपहरण, बलात्कार आणि हत्या प्रकरणातून दोषमुक्त केले. दोन महिन्यांनंतर न्यायालयाने फटकारल्यानंतर सीबीआयने त्यांना पुन्हा सहआरोपी केले.
13 फेब्रुवारी 2009 – एका विशेष न्यायालयाने पंढेर आणि कोली यांना एका 15 वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी दोषी ठरवले आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. हा पहिला निकाल होता
3 सप्टेंबर 2014- कोर्टाने कोली विरोधात फाशी देण्याचे अधिकृत फर्मान जारी केले.
4 सप्टेंबर 2014 – कोलीला फाशीसाठी डासना तुरुंगातून मेरठ येथील तुरुंगात हलवण्यात आले.
12  सप्टेंबर 2014 – सुरेंद्र कोलीला फाशी होणार होती. डेथ पेनल्टी लिटिगेशन ग्रुप्स या वकिलांच्या गटाने कोळीच्या फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात पाठवले.
12 सप्टेंबर 2014 – सुप्रीम कोर्टाने सुरेंद्र कोलीच्या फाशीला 29 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली.
28 ऑक्टोबर 2014 – सुप्रीम कोर्टाने सुरेंद्र कोली यांच्या फाशीवरील पुनर्विलोकन याचिका फेटाळली. 2013 मध्ये राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज रद्द केला होता.
28 जानेवारी 2015 – अलाहाबाद उच्च न्यायालयाने कोलीची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली.





Source link

Maharashtra Election News LIVE March 10, 2025: Journalist Arrested : मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केली म्हणून मराठी न्यूज वेबसाइटच्या संपादकाला अटक

0
Maharashtra Election News LIVE March 10, 2025: Journalist Arrested : मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केली म्हणून मराठी न्यूज वेबसाइटच्या संपादकाला अटक


Maharashtra Election 2024 News LIVE: Journalist Arrested : मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केली म्हणून मराठी न्यूज वेबसाइटच्या संपादकाला अटक

Maharashtra Election 2024 News LIVE: Journalist Arrested : मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केली म्हणून मराठी न्यूज वेबसाइटच्या संपादकाला अटक

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Mon, 10 Mar 202507:14 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Journalist Arrested : मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केली म्हणून मराठी न्यूज वेबसाइटच्या संपादकाला अटक

  • ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी होईल अशा बातम्या दाखवून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी एका मराठी वेबसाइटचे पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, पत्रकार खरात यांना झालेली अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.


Read the full story here





Source link

Journalist Arrested : मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केली म्हणून मराठी न्यूज वेबसाइटच्या संपादकाला अटक

0
Maharashtra Election News LIVE March 10, 2025: Journalist Arrested : मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केली म्हणून मराठी न्यूज वेबसाइटच्या संपादकाला अटक


तुषार खरात यांच्यावर कोणते गुन्हे?

पुढे आलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने आदेश देऊन देखील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या एकतर्फी बातम्या दाखवून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी तुषार खरात यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. तुषार खरात यांच्यावर वडूज, दहिवडी, म्हसवड, तळबीड, सोलापूर येथील पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये ॲट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी, बदनामी करणे या गुन्ह्यांचा देखील समावेश आहे.



Source link

पीएम मोदींच्या हस्ते सिल्व्हासात नमो हॉस्पिटलचे उद्घाटन; भारताचे पहिले AI युक्त नी रिप्लेसमेंट रोबोट हॉस्पिटल-Misso

0
पीएम मोदींच्या हस्ते सिल्व्हासात नमो हॉस्पिटलचे उद्घाटन; भारताचे पहिले AI युक्त नी रिप्लेसमेंट रोबोट हॉस्पिटल-Misso


नवी दिल्ली/ सिल्वासा, 7 मार्च 2025: आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 450 बेड असलेले सिल्वासामधील नमो हॉस्पिटलचे पहिल्या चरणाचे उद्घाटन केले. 460 कोटी मूल्य असलेली ही सुविधा या भागातील रुग्णांना अध्यायावत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधानांनी ₹ 2500 कोटी रुपयांची जनकल्याणकारी प्रकल्पांचे उद्घाटन केले, यामध्ये नवीन रुग्णालय, शाळा आणि नागरी सुविधांसह तातडीच्या आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधांचा आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा समावेश होता.

त्यांच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी प्रस्तावित रुग्णालयाचे (3D) थ्री डी मॉडेलचा आढावा घेतला आणि अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांनी टीमचे कौतुक केले. या कार्यक्रमादरम्यान Misso च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक शाह यांच्याकडून सादर करण्यात आलेले भरतात बनलेले सर्वात पहिले एआय- पावर युक्त रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी यंत्रणा आकर्षणाचे केंद्र होते.

“Meril येथे काम करत असताना, आम्ही जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहोत, हे असे तंत्रज्ञान आहे जे केवळ शस्त्रक्रियेची अचूकता वाढवत नाही तर त्याचे क्लिनिकल परिणाम हे रुग्णास जलद गतीने बरे होण्यास मदत करतात. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे आत्मनिर्भरतेच्या दिशेने प्रवास होतो आहे आणि त्यामध्ये Misso हा अभिमानास्पद टप्पा आहे,” असे मेरिलचे सीईओ श्री विवेक शाह म्हणाले.

हे नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतातील सांध्याच्या शस्त्रक्रियांसाठी एक क्रांतिकारक पाऊल असेल, ज्यामध्ये अचूकता आणि रुग्ण जलद गतीने बरे होण्यास मदत मिळेल.

पंतप्रधानांनी भारताच्या आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक आणि तांत्रिक प्रगतीमध्ये उत्सुकता व्यक्त केली. उच्च दर्जाची आरोग्य सेवा अधिक सुलभ पद्धतीने मिळण्यासाठी स्वदेशी वैद्यकीय तंत्रज्ञानाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. नमो हॉस्पिटलचे उद्घाटन हे भारताच्या वैद्यकीय यंत्रणेला बळकटीस देण्यासंदर्भातील एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी, पायाभूत सुविधा पुरवण्याच्या देशाच्या वचन पद्धतीला त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.

(Disclaimer – This article is part of India Dotcom Pvt Lt’s consumer connect initiative, a paid publication program IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)





Source link

बारामतीत संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ मोर्चा, लेक वैभवीची, मदत करणारांना  सहआरोपी करण्याची मागणी!

0
बारामतीत संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ मोर्चा, लेक वैभवीची, मदत करणारांना  सहआरोपी करण्याची मागणी!

बारामती – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामतीत सर्वधर्मीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या वेळी स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सहभाग घेतला.

माध्यमांशी संवाद साधताना वैभवी देशमुख म्हणाली, “माझ्या वडिलांची हत्या झाली, आम्हाला कोणावरही व्यक्तिगत राग नाही. मात्र, ज्यांनी हत्येच्या कटात सहभागी होऊन मदत केली, मग ते प्रशासनातील असोत किंवा इतर कोणी, त्यांना सहआरोपी करावे. ही घटना पुन्हा घडू नये, यासाठी कडक कारवाई आवश्यक आहे.”

फरार आरोपीचा तपास का रखडतोय? धनंजय देशमुखांचा पोलिसांवर सवाल!

धनंजय देशमुख यांनी फरार आरोपी कृष्णा आंधळेचा उल्लेख करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.

“ही टोळी सराईत गुन्हेगारांची आहे. 307 च्या गुन्ह्यात फरार असलेला कृष्णा आंधळे दोन वर्षांपासून मोकाट फिरत आहे. तो केज आणि धारूर भागातही दिसला आहे, मात्र पोलिस त्याला अटक करत नाहीत. असे असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा?”

धनंजय मुंडेंना सहआरोपी करावे?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्याने माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले होते. भाजपसह विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर धनंजय मुंडे यांनी तब्येतीच्या कारणास्तव मंत्रीपदाचा राजीनामा दिला, मात्र त्यांचा विधीमंडळ सदस्यपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुरू आहे.

यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ही मागणी भाजपची आहे. राजकीय हेतूने हे सगळं घडत आहे.”

➡️ हत्येच्या कटात सहभागी असलेल्या प्रत्येकाला कठोर शिक्षा मिळेल का? फरार आरोपी कृष्णा आंधळेला पोलिस कधी अटक करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप; पत्रकार तुषार खरात यांना अटक, राजकीय वातावरण तापले

0
भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप; पत्रकार तुषार खरात यांना अटक, राजकीय वातावरण तापले

सातारा – राज्याच्या आर्थिक अधिवेशनादरम्यान भाजप आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर, ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना मुंबईतून अटक करण्यात आली. गोरे यांच्या बदनामीसाठी 85 हून अधिक एकतर्फी बातम्या प्रकाशित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

अटकेनंतर वडूज येथील रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आज (10 मार्च) वडूज न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे.

तुषार खरात यांच्यावर गंभीर आरोप

न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून जयकुमार गोरे यांच्याविरोधात एकतर्फी बदनामीकारक बातम्या प्रसारित केल्याचा ठपका तुषार खरात यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याशिवाय, वडूज, दहिवडी, म्हसवड, तळबीड आणि सोलापूर येथील पोलीस ठाण्यांतही त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

यामध्ये ॲट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी आणि बदनामीसारख्या गुन्ह्यांचा समावेश असून, संबंधित प्रकरणांमुळे त्यांची अटक झाल्याचं सांगण्यात येत आहे.

“ही अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर” – रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर टीका करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. “महिलेवरील अन्याय, ओबीसींच्या जमिनी बळकावणे आणि कोविड काळातील मेडिकल कॉलेजमधील भ्रष्टाचारासारखी प्रकरणे उजेडात आणल्यामुळेच तुषार खरात यांना अटक करण्यात आली,” असा आरोप पवार यांनी केला.

“सरकार सत्य उघड करणाऱ्या पत्रकारांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आम्ही अशा प्रामाणिक पत्रकारांच्या मागे भक्कमपणे उभे राहू,” असे रोहित पवार यांनी ठामपणे सांगितले.

“माझी बदनामी करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा खटला” – जयकुमार गोरे

जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले असून, तिने राज्यपाल आणि विरोधी पक्षनेत्यांकडे मदतीसाठी पत्र पाठवले होते.

यावर प्रतिक्रिया देताना जयकुमार गोरे आक्रमक झाले आणि “माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार” असल्याचे जाहीर केले. तसेच, “माझी बदनामी करणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार” असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“महिलेवर मी अन्याय केला असल्याचा आरोप केला जात आहे. जर मी दोषी असेल, तर पोलिसांनी स्वतंत्र चौकशी करावी आणि सत्य समोर आणावे,” असे जयकुमार गोरे म्हणाले.

2019 मध्ये न्यायालयाचा निकाल, पण वाद कायम

2019 मध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने जयकुमार गोरे यांना निर्दोष मुक्त केले होते आणि त्यांच्यावरील आरोपांचे रेकॉर्ड हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांच्या विरोधातील वाद चिघळले असून, त्यांचा फोटो महिलेने न्यायालयात सादर केला होता आणि त्यांनी माफी मागितली होती, असा आरोप करण्यात येत आहे.

आता या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधक आणि समर्थक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

जयकुमार गोरेंविरोधात बातम्यातून बदनामी केल्याचा ठपका; पत्रकार तुषार खरात पोलिसांच्या ताब्यात

0


सातारा: राज्याच्या आर्थिक अधिवेशनाच्या दरम्यान विरोधकांनी केलेल्या भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावरील आरोपानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे  (Jaykumar Gore)  यांनी बदनामी करणाऱ्या नेत्यांना नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलं होतं. तर आता 85 हून अधिक एकतर्फी बातम्यातून बदनामी करण्यात आल्याचा ठपका ठेवत, ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तर अटक केल्यानंतर रात्री उशिरा वडूजयेथील रुग्णालयात तुषार खरात (Tushar Kharat) यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आलीय. दरम्यान, आज(10 मार्च) वडूज येथील न्यायालयासमोर पत्रकार तुषार खरात यांना हजर करणार असल्याची माहिती ही समोर आली आहे.

तुषार खरात यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे  

पुढे आलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने आदेश देऊन देखील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या एकतर्फी बातम्या दाखवून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी तुषार खरात यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. तुषार खरात यांच्यावर वडूज, दहिवडी, म्हसवड, तळबीड, सोलापूर येथील पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये ॲट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी, बदनामी करणे या गुन्ह्यांचा देखील समावेश आहे.

तुषार खरात यांना झालेली अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर- रोहित पवार 

एका महिलेवर झालेल्या अन्यायाला ज्यांनी वाचा फोडली तसंच मागासवर्गीय आणि ओबीसी समाजाच्या जमिनी बळकावणे, कोविडच्या काळात मेडिकल कॉलेजमध्ये भ्रष्टाचार करून मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे अशी अनेक प्रकरणं चव्हाट्यावर आणली. ते माण खटाव येथील पत्रकार तुषार खरात यांना झालेली अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे. सरकारची मनमानी खपवून न घेता अशा प्रकारे जनतेच्या हितासाठी निःस्वार्थीपणे लढणाऱ्या प्रामाणिक पत्रकाराचा आवाज कुणी दाबत असेल तर त्यांच्या मागे आम्ही भक्कमपणे उभं राहू. सर्व मिडियाही त्यांच्या पाठीशी राहील, ही अपेक्षा! अशा शब्दात आमदार रोहित पावर यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय  

माझी बदनामी करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार- जयकुमार गोरे

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने राज्यपाल आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून मदतीची याचना केली होती. दरम्यान या प्रकरणावर प्रत्युत्तर देताना  मंत्री जयकुमार गोरे चांगलेच आक्रमक झाले होते. ज्यांना माझ्यावर आरोप केले त्या प्रत्येकावर मी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. तसेच ज्यांनी माझी बदनामी केली त्या संबधितांवर मी अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे. मी अजूनही संबंधित महिलेला त्रास देतोय, असा आरोप केला जात आहे. मी या महिलेला त्रास दिला असेल तर पोलिसांनी त्याची चौकशी करावी. या तपासात मी किंवा संबंधित महिला जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करावी, असे जयकुमार गोरे यांनी म्हटले होते.

2019 मध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती. जे रेकॉर्ड होतं ते देखील हटवण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती गोरे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र,जयकुमार गोरे यांना विवस्त्र फोटो पाठवल्याप्रकरणी त्यावेळी न्यायालयात महिलेची माफी मागितली होती, असा आरोप आता केला जात आहे. त्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक पवित्रा घेत ही कारवाई केली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link