Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 507

वेरूळ लेणीतील सूर्यकिरणोत्सव: सम्यक संबुद्धांच्या तेजाने उजळलेले चैत्यगृह

0
वेरूळ लेणीतील सूर्यकिरणोत्सव: सम्यक संबुद्धांच्या तेजाने उजळलेले चैत्यगृह

वेरूळ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) | 10 मार्च 2025

तेजस्वी सूर्यकिरणांनी उजळून निघालेली सम्यक संबुद्ध यांची आभा – हा अद्भुत सोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देश-विदेशातून पर्यटक, अभ्यासक, आणि बौद्ध श्रद्धाळू वेरूळच्या दहा क्रमांकाच्या लेणीत एकत्र जमले होते. उत्तरायणातील सूर्यकिरणोत्सवामुळे सम्यक संबुद्धांच्या शिल्पावर पडणारा हा प्रकाशोत्सव प्राचीन स्थापत्यशास्त्र व खगोलशास्त्राच्या अद्भुत मेळाचा साक्षीदार ठरतो.

सूर्यास्ताच्या वेळी तेजःपुंज दर्शन

संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी, उत्तरायणातील मावळतीला जाणाऱ्या सूर्यकिरणांनी मंद प्रकाश असलेल्या चैत्यगृहातील गाभाऱ्यात प्रवेश केला. या किरणांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील प्रलंबपाद अवस्थेतील सम्यक संबुद्ध यांच्या पायांना स्पर्श केला. नंतर हळूहळू ते मुखाच्या दिशेने सरकत गेले आणि ५ वाजून १० मिनिटांनी बुद्धमूर्तीचे तेजस्वी मुख संपूर्ण उजळून गेले. हा सोहळा पाहताना उपस्थित भाविक व अभ्यासक भारावून गेले. अंधारलेल्या पार्श्वभूमीवर सम्यक संबुद्धांचा सोनेरी प्रकाशाने उजळलेला चेहरा पाहताना जणू काही एका तेजाने दुसऱ्या तेजाची भेट घेतली असा भास निर्माण झाला.

शतकानुशतके चालत आलेला नैसर्गिक सोहळा

वेरूळ लेणी समूहातील दहा क्रमांकाची लेणी ही एक ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्रीय चमत्कार मानली जाते. प्राचीन काळातील वास्तुविशारदांनी खगोलशास्त्र आणि स्थापत्य यांचा अद्वितीय संगम साधत ही रचना उभारली आहे. हे सूर्यकिरणोत्सवाचे निसर्गनियमावर आधारित सादरीकरण कित्येक शतकांपासून सुरू आहे.

कलाप्रेमी आणि अभ्यासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दरवर्षी १० आणि ११ मार्च रोजी हा सूर्यकिरणोत्सव वेरूळच्या दहा क्रमांकाच्या लेणीत अनुभवता येतो. यावर्षी या विस्मयकारक सोहळ्यासाठी महाराष्ट्र तसेच देशभरातील इतिहास संशोधक, पुरातत्त्व अभ्यासक आणि पर्यटक येथे उपस्थित होते. याशिवाय परदेशी पर्यटकांनीही या अनोख्या नैसर्गिक घटनेचा आनंद घेतला.

पुढील वर्षासाठी तयारी करा!

ज्यांना हा अद्भुत सोहळा प्रत्यक्ष अनुभवायचा आहे त्यांनी पुढील वर्षाच्या १० मार्चची नोंद करून ठेवावी. पुढच्या उत्तरायणात पुन्हा एकदा वेरूळ लेणीतील बुद्ध प्रतिमेच्या तेजाचा हा अलौकिक सोहळा पाहण्यासाठी आपण भेटूच!

– सूरज रतन जगताप
(लेणी अभ्यासक)

‘मानव हरला, आम्ही हरणार नाही’, TCS कर्मचाऱ्याच्या तेराव्याला मुलाचा फोटो पाहताच कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला

0
‘मानव हरला, आम्ही हरणार नाही’, TCS कर्मचाऱ्याच्या तेराव्याला मुलाचा फोटो पाहताच कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला


Agra Suicide Case: टीसीएस रिक्रूटमेंट मॅनेजर मानव शर्माने व्हिडीओ करत आत्महत्या केली. या घटनेला १३ दिवस उलटले आहेत. शनिवारी त्यांच्या डिफेन्स कॉलनी येथील निवासस्थानी त्याच्या कुटुंबियांकडून तेरावेचे विधी करण्यात झाले. मानवच्या फोटोसमोर आई-वडिलांसह बहिणीलाही अश्रू अनावर झाले. पत्नी निकिता आणि इतर आरोपींना अटक न केल्याने नातेवाईक खूप दुखावले गेले आहेत. डिफेन्स कॉलनीत राहणारे मानव शर्मा यांनी २४ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मानवने व्हिडीओ बनवून पत्नी निकिता शर्मा आणि तिच्या माहेरच्या कुटुंबाला या आत्महत्येसाठी जबाबदार धरले होते. पोलीस या प्रकरणी तपस करत आहेत. 

इतर लोकांविरोधातही केली तक्रार दाखल 

मानवचे वडील नरेंद्र शर्मा यांनी पोलिसांकडे  27 फेब्रुवारीच्या रात्री पत्नी निकिता शर्मा, आई-वडील आणि दोन बहिणींविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. शनिवारी मानव शर्मा यांचा तेराव्याचा विधी होता. तेराव्या विधीसाठी ठेवलेला मानवचा फोटो पाहून वडील नरेंद्र शर्मा, आई नीलम शर्मा आणि बहीण आकांक्षा यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. 

हे ही वाचा : आमचा अपमान झाला म्हणणाऱ्या पाकिस्तानला ICC नं फटकारलं! ‘चॅम्पियन्स ट्रॉफी देताना तुमचे अधिकारी…’

 

पोलिसांना आरोपींना अटक करण्यात यश नाही 

मानव शर्माच्या आत्महत्येला १३ दिवस उलटले असून गुन्हा दाखल होऊन नऊ दिवस उलटले आहेत.  मात्र अद्यापपर्यंत पोलिसांना आरोपींना अटक करण्यात यश आलेले नाही. पोलिसांनी सांगितले आहे की आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हे ही वाचा: ‘इग्नोर कर, झोप तू…’ TCS कर्मचारी मानव शर्माची पत्नी आणि बहिणीचे ‘त्या’ रात्रीचे व्हॉट्सॲप चॅट Viral

 

मानव हारला, आम्ही हारणार नाही

आरोपींना अटक न झाल्याने नातेवाईक खूप  दुखावले आहेत. बहीण आकांक्षा म्हणाली की ” मानव हारला, आम्ही हारणार नाही. मी काही काळ अटकेची वाट पाहीन. पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यास पुढील कारवाई करेन.” 

हे ही वाचा: ‘माझ्या मामानेही माझ्यावर…’; आत्महत्या करणाऱ्या TCS मॅनेजरच्या पत्नीचा Video Viral

 

पोलिसांचे सोशल मीडिया अकाउंटवर लक्ष

पोलीस मानवचा मोबाईल तपासत आहेत. मानवच्या कुटुंबीयांनी इतर पुरावेही पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी मानवची पत्नी निकिताचे सोशल मीडिया अकाउंटही शोधले आहे.

Disclaimer: जीवन अनमोल आहे. त्याचा पूर्ण आदर करा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जर तुम्ही एखाद्या समस्येमुळे किंवा घटनेमुळे व्यथित असाल तर जीवनाचा त्याग करण्याची गरज नाही. चांगले आणि वाईट काळ येतच राहतात. परंतु जेव्हाही काही कारणास्तव तुम्हाला तीव्र निराशा, नैराश्य, ताण वाटेल तेव्हा सरकारने दिलेल्या ९१५२९८७८२१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.

 





Source link

आईसमोरच 5 वर्षांच्या चिमुकलीचा नरबळी, मंदिराच्या पायऱ्यांवर रक्त शिंपडलं; गावकरी बघत राहिले कारण..

0
आईसमोरच 5 वर्षांच्या चिमुकलीचा नरबळी, मंदिराच्या पायऱ्यांवर रक्त शिंपडलं; गावकरी बघत राहिले कारण..


5 Year Old Girl Killed In Front Mother: गुजरातमधील आदिवासी बहुल धोटा उदयपूर जिल्ह्यामध्ये नरबळीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका व्यक्तीने कुऱ्हाडीने पाच वर्षांच्या मुलीची गळा कापून हत्या केली. त्यानंतर त्या मुलीचे रक्त या व्यक्तीने एका मंदिराच्या पायऱ्यांवर अर्पण केलं. धक्कादायक बाब म्हणजे हा सारा प्रकार अनेक लोकांच्या उपस्थितीमध्ये घडला तरी कोणीही या व्यक्तीला थांबवण्यासाठी पुढे आलं नाही. सर्वजण शांतपणे हा सारा प्रकार पाहत उभे होते.

घरातून मुलीला उचलून नेलं

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा सारा प्रकार पमेज गावामध्ये सोमवारी दुपारी घडला. रविवारी सकाळी मुख्य आरोपी लाला तडवी याने या मुलीचं तिच्या राहत्या घरातून आईसमोरच अपहरण केलं. लाला तडवी या मुलीला स्वत:च्या घरी घेऊन गेला. त्याने कुऱ्हाडीने या मुलीच्या मानेवर वार केले. यानंतर आरोपीने मुलीच्या कापलेल्या मुंडक्यामधून पडणारं रक्त जमा करुन त्यापैकी काही रक्त आपल्या घरातील एका छोट्या मंदिराच्या पायऱ्यांवर चढवलं. तडवीने केलेले हे कृत्य पाहून मृत मुलीची आई आणि गावकरी स्तब्ध झाले होते, असंही या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. आरोपी तडवीच्या हातात कुऱ्हाड असल्याने कोणीही त्याला विरोध केला नाही, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

आरोपी तांत्रिक-मांत्रिक नाही?

पोलीस उपनिरिक्षक (एएसपी) गौरव अग्रवाल यांनी आरोपी हा तांत्रिक-मांत्रिक असल्याचं वाटत नाही, असं म्हटलं आहे. तडवीने ही हत्या करण्यामागील खरा हेतू असून समोर आलेला नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृत मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ताडवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. 

नरबळीचा प्रकार?

एएसपी अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटा उदयपुर जिल्ह्यातील बोडेली तालुक्यात ही घटना घडली. तक्रारदार महिलेने तिच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या लाला भाई तडवीने हल्ला करुन मारुन टाकल्याचं म्हटलं आहे. मृत मुलीचं रक्त आरोपीने त्याच्या घरातील मंदिराच्या पायऱ्यांवर शिंपडल्याचंही महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळेच हा नरबळीचा प्रकार असल्याची पोलिसांना शंका असून तडवीवर यापूर्वी असे काही गुन्हे आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत. 

या प्रश्नांची उत्तर पोलीस शोधत आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. सध्या या हत्येमागील हेतू काय आहे याचं कारण शोधलं जात आहे. या सर्व प्रकारामध्ये इतर कोणाचा सहभाग होता का? ही हत्या वादातून झालेली आहे का? या हत्येचं नेमकं कारण काय आहे? या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत आहेत.





Source link

टॉयलेट तुंबल्याने Air India ची Emergency Landing; 10 तास प्रवासी अडकून पडले अन्…

0
टॉयलेट तुंबल्याने Air India ची Emergency Landing; 10 तास प्रवासी अडकून पडले अन्…


Air India Flight Makes U-Turn: अमेरिकेतली शिकागोवरुन दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला एका विचित्र कारणामुळे आपत्कालीन लॅण्डींग करावं लागलं आहे. या विमानातील 12 पैकी 11 टॉयलेट तुंबल्याने वैमानिकाला विमान मागे फिरवावं लागल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. या संदर्भात कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात 10 तास अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

300 प्रवासी असताना एकच टॉयलेट

“एआय 126, शिकागो ते दिल्ली मार्गावरील 6 मार्च 2025 रोजी चालवल्या जाणाऱ्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. शिकागो विमानतळावर उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना तसेच क्रू मेंबर्सला आवश्यक सोयी पुरवण्यात आल्या असून त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहचवण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे,” असं कंपनीने म्हटलं आहे. एअर इंडियाचं 126 विमान 5 मार्च रोजी ग्रीनलॅण्डच्या एअर स्पेसमध्ये असताना विमानातील 12 पैकी 11 टॉयलेट तुंबली. जे एकमेव टॉयलेट काम करत होतं ते बिझनेस क्लासमध्ये होतं. विमानामध्ये 300 प्रवासी असताना ही स्थिती होते. 

अनेकदा टॉयलेट्स तुंबतात

विमानामध्ये अडकलेले प्रवाशी केबिन क्रूबरोबर चर्चा करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक प्रवाशांनी विमानात हे व्हिडीओ शूट केले आहेत. एकाने हा व्हिडीओ शेअर करताना, “विमानामध्ये टॉयलेट तुंबणं काही असामान्य गोष्ट नाही. नको त्या गोष्टी टॉयलेटमध्ये टाकल्याने असे प्रकार घडतात. एखाद्या दोन टॉयलेटमध्ये अशी समस्या झाली तरी विमान उतरवलं जातं. मर्यादीत टॉयलेट्स असल्याने विमानं अशावेळी उतरवली जातात,” असं म्हटलं आहे. 

1)

2)

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत असून प्रवाशांना अशाप्रकारच्या समस्येमुळे त्रास सहन करावा लागल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.





Source link

बलिदान दिन विशेष: संभाजी महाराज 350  वर्षानंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत, सरकारने जीवनचरित्रावर प्रकाश टाकावा, मिटकरींचा लेख

0
बलिदान दिन विशेष:  संभाजी महाराज 350  वर्षानंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत, सरकारने जीवनचरित्रावर प्रकाश टाकावा, मिटकरींचा लेख


  • Marathi News
  • Opinion
  • Amol Mitkari Article; Chhatrapati Sambhaji Maharaj Waiting For Justice | NcP Amol Mitkari

अमोल मिटकरी42 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

आज रोजी शंभूराजांच्या हौतात्म्याला ३५६ वर्ष पूर्ण झालीत. मात्र, अद्यापही त्यांच्या उज्ज्वल जीवनचरित्रावर महाराष्ट्र शासनाने प्रकाश टाकला नाही. विधिमंडळ परिसर व मंत्रालयात त्यांचे तैलचित्र लावण्याचाही प्रयत्न झाला नाही. शासकीय मुद्रणालयात त्यांचे अधिकृत चित्र उपलब्ध नाही. यावेळी तरी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करून इतिहास संशोधकांच्या देखरेखित चरित्र साधन समिती गठित करावी, अशी महाराष्ट्रातील मराठी मनाची जनभावना आहे.

वढू तुळापूर येथे फाल्गुन वद्य अमावस्या ११ मार्च १६८९ रोजी क्रूर औरंगजेबाने संभाजी राजांची हत्या केली. त्या दुर्दैवी दिवसाला आज रोजी ३३६ वर्ष पूर्ण झाली आहेत. इतक्या प्रदीर्घ काळानंतरही संभाजी नावाचे जबरदस्त आकर्षण आजही समाजात असल्याचे अलीकडे प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाने दाखवून दिले आहे. शंभूराजांच्या जीवन चरित्राच्या समकालीन साधनांचा आधार घेत अभ्यास केला, तर मराठा इतिहासात (छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता) त्यांच्या इतका साहसी, पराक्रमी, स्वातंत्र्यप्रेमी, स्वाभिमानी व सुसंस्कृत असा दुसरा छत्रपती झाला नाही.

राजनीतीशास्त्र, शृंगारशास्त्र, अध्यात्मशास्त्र आदींमध्ये पारंगत असलेल्या या राजाने वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी संस्कृतमध्ये “श्रीबुधभुषणम” (राजनीतीपर),”नखशिख” व “नायिकाभेद” हे ब्रजभाशेतील (शृंगार शास्त्रपर),” सातसतक” (अध्यात्म शास्त्रापर) अशी ग्रंथरचना करून त्यांची सांस्कृतिक उंची व साहित्यातील योगदान स्वतःच अधोरेखीत केले. विद्वत्तेबरोबरच दुसरीकडे रणांगण गाजवताना सिद्दी, पोर्तुगीज, डच, इंग्रज व मुघलांशी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर विजयी झुंज देणारे ते अद्वितीय योद्धाही ठरले.

मराठी, हिब्रू, पाली, संस्कृत, इंग्रजी, ब्रजभाषेसह ते १७ भाषेचे जाणकार होते. कवी व तेज:पुंज शरीर संपदा मिळविलेले युवराजही होते. गोव्याचा व्हाइसरॉय ज्याच्यासोबत १२०० गोरे, २५०० काळे शिपाई व ६ तोफा होत्या. त्याला अवघ्या ६०० मराठ्यांनी फोंड्या किल्ल्यावरून पिटाळून लावले. हे संभाजीराजांचे वेगळेपण होते! दिंडोरीतील रामसेज औरंगजेबाचा सरदार शहाबुद्दीन खानाविरुद्ध अनेक वर्ष मूठभर मावळ्यांनी लढवीला.

शिवाय जंजिरा मोहीम, अकबराला राजाश्रय, दंडाराजपुरीवर चाल, भागानगरवर हल्ला, बुऱ्हाणपूर, कारंजा, जालना, औरंगाबाद, सुरत अशा असंख्य १४० लढाया लढून एकाही लढाईत पराभूत न होणारा विजयी योद्धा असा आपला छत्रपती, किती शूर आणि कर्तबगार असेल? वयाच्या ३२ व्या वर्षी ४० दिवस अन्नाचा कणही पोटात नसताना सह्याद्रीचा हा छावा हाल सोसत स्वराज्य रक्षणासाठी समर्पित झाला.

चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मुंबईच्या शासकीय मुद्रणालयात मी काही पुस्तके चाळत असताना माझ्या हाती “संपूर्ण गडकरी” हे शासनाने १९८१ साली प्रकाशित केलेले पुस्तक पडले. त्यात राजसंन्यास हे नाटक छापलेले होते. राजसंन्यासबद्दल आजवर ऐकले होते. मात्र, केवळ तीनच पाने वाचल्यावर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली व कुणाचीही जाणार असेच लिखाण गडकर्‍यांनी केले होते. स्वराज्यासाठी एकीकडे कायस्थांनी दिलेले बलिदान, तर दुसरीकडे गडकरीने प्रकट केलेले त्यांचे वैचारिक दारिद्र्य या माध्यमातून वाचण्यात आले.

गडकर्‍यांनी त्यांच्या राजसंन्यास नाटकात संभाजी राजांना रोमँटिक हिरोच बनविले होते. या विषयाचे गांभीर्य ओळखून मी तात्काळ ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषामंत्री उदय सामंत , उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथराव शिंदे यांच्या लक्षात पत्राद्वारे आणून दिली. त्याचे कारण ही प्रत शासनाने छापलेली होती. त्यावर विविध चॅनेल्सला मी मुलाखती पण दिल्या. गडकरी प्रेमी कायस्थांनी माझ्याशी संपर्क साधून मला व्हाट्सअप वर धमक्यापण दिल्या, पण त्यांना वास्तव सांगितल्यानंतर त्यांनी सुद्धा ते मान्य केले.

राजसंन्यासच्या निमित्ताने मी आणखी इतिहासात शिरलो. त्याच दिवशी दुपारी विधान परिषदेच्या सभागृहात काही सदस्यांनी संभाजीराजांचा धर्म न बदलणारा राजा असा त्यांच्या सोयीचा उल्लेख केला होता. अर्थात हा उल्लेख करताना त्यांच्याकडे साधनांचा कुठलाही आधार नव्हता किंवा तात्कालीन कुठलंही संदर्भ साधन या सदस्यांनी वाचलेले नव्हतं. प्रत्यक्षात विधिमंडळातील या महान सदस्यांनी ऐकीव माहितीच्या आधारावर असे धाडस केले असावे. त्यांना थोडी माहिती असावी म्हणून सांगावेसे वाटते.

बादशाही छावणीत साकी मुस्तैदखान, ईश्वरदास नागर हे दोघे संभाजीराजांच्या देहादंडाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्यांच्या ग्रंथात कुठेही संभाजीराजांना धर्म बदल असा प्रस्ताव औरंगजेबाने दिला नसल्याचे लिहिले आहे. रहुल्ला खानमार्फत बादशहाने दोनच प्रश्न विचारले होते, १) बुऱ्हाणपूर व इतर ठिकाणी लुटलेला खजिना कुठाय? आहे आणि बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवत होते? (संदर्भ-मराठी रियासत मध्य विभाग १, रियासतकार सरदेसाई आवृत्ती दुसरी मुंबई १९२५)असो, मूळ मुद्द्यावर येऊ.

संभाजी राजांवर आजपर्यंत जेवढी नाटके चित्रपटे व कथानके रचली गेली तितकी इतिहासात दुसऱ्या कुणावरही रचली गेली नाहीत. साहित्यिकांच्या लेखणीत शंभूराजांची प्रतिमा स्वैर, दुर्वर्तनी व राज्यबुडव्या अशीच रेखाटली गेली. हे महाराष्ट्राच्या साहित्याचे दुर्दैव म्हणावे लागेल! राजसंन्यास, राज मस्तकाचा आदेश, बेबंदशाही, रायगडाला जेव्हा जाग येते, थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, प्रणयी युवराज, सती गोदावरी, अश्रू ढळले रायगडाचे, दुर्दैवी छत्रपती, प्रतिज्ञा कंकण, अशी तब्बल ८० नाटकं, व ३२ चित्रपटे आजही युट्युब,विकिपीडिया व साहित्य क्षेत्रात जिवंत आहेत.

ज्येष्ठ इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे, डॉ. कमल गोखले, जयसिंगराव पवार यांसारख्या इतिहास संशोधकांनी संभाजी महाराजांच्या चरित्रावरील डाग पुसलेले आहेत. अनेक वर्षानंतर वढू तुळापूर येथील निबिड अरण्यात वा. सी. बेंद्रे यांनी तब्बल २२ वर्ष शोध घेऊन संभाजी राजांची समाधी शोधून त्यावर चौथरा बांधला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी समाधी स्थळाचा जीर्णोद्धार करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर मागील सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री असताना शंभूराजाच्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धारासाठी महाराष्ट्र सरकारकडून साडेतीनशे कोटी उपलब्ध करून दिले.

आज रोजी शंभूराजांच्या हौतात्म्याला ३५६ वर्ष पूर्ण झालीत. मात्र, अद्यापही त्यांच्या उज्ज्वल जीवनचरित्रावर महाराष्ट्र शासनाने प्रकाश टाकला नाही. विधिमंडळ परिसर व मंत्रालयात त्यांचे तैलचित्र लावण्याचाही प्रयत्न झाला नाही. शासकीय मुद्रणालयात त्यांचे अधिकृत चित्र उपलब्ध नाही. यावेळी तरी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करून इतिहास संशोधकांच्या देखरेखित चरित्र साधन समिती गठित करावी, अशी महाराष्ट्रातील मराठी मनाची जनभावना आहे.

सोबतच बलिदान दिनी त्यांना अभिवादन करावे, त्यांचा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये अंतर्भूत करावा. त्यांच्यावरील उरला सुरला बदनामीचा डाग धुऊन काढावा. त्यांच्यावर निर्माण झालेली अश्लील पुस्तके, नाटके व कथा कादंबऱ्या युट्युब आणि विक्री दुकानावरून हटवाव्यात. कारण सह्याद्रीचा छावा अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत झुंजत आहे.

चित्रपट बघून मनोरंजन होऊ शकेल, मात्र देशातील या थोर छत्रपतींचा पराक्रम सानथोरांनी पाठ्यपुस्तकातून आत्मसात केला व सरकारने तसा तो अंत:र्भूत केला तरच हे पुण्याचे काम सरकारकडून घडेल. छत्रपती संभाजी महाराज उपेक्षित राहू नयेत, ही महाराष्ट्राची माफक अपेक्षा आहे. अलीकडेच आयनॉक्स मॉलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वांनी एकत्र येऊन छावा चित्रपट बघितला, त्यातील कवी कलुषा औरंगजेबाला म्हणतो,

हाथी, घोडे, तोफ, तलवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीर मे जकडा राजा मेरा, अब भी सब पे भारी है… “

जय शंभूराजे

(लेखक आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत.)



Source link

औरंगजेबला आव्हान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाला वाचवणारी भारतातील पराक्रमी महाराणी

0
औरंगजेबला आव्हान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाला वाचवणारी भारतातील पराक्रमी महाराणी


Keladi Chennamma: सध्या देशभर गाजत असलेल्या छावा (Chhava) या सिनेमाच्या माध्यमातून  स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास पदड्यावर पहायला मिळत आहे. या चित्रपटामुळे क्रूर मुघल शासक औरंगजेब हा देखील चर्चेत आला आहे. औरंगजेब याच्या क्रूरतेचे अनेक किस्से समोर येत आहेत. यातच आता चर्चेत आली ही ती औरंगजेबला आव्हान देणारी भारतातील पराक्रमी महाराणी. या महाराणीनेच औरंगजेबला आव्हान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाला वाचवले. जाणून घेऊया या महाराणी विषयी. 

इतिहासातील या पराक्रमी महाराणीचे नाव आहे चेन्नम्मा. या राणीचा इतिहासात फार कमी लोकांना माहिती आहे. केलाडीची राणी चेन्नम्मा हिने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर 25 वर्षांहून अधिक काळ उत्कृष्ट राज्य केले. तिने क्रूर हुकूमशहा औरंगजेबापासून तिचे राज्य वाचवले. चेन्नम्माचा जन्म कर्नाटकातील कुंडापुरा येथे सिद्धप्पा शेट्टी नावाच्या लिंगायत व्यावसायिकाच्या घरी झाला. 

केलाडीचा राजा सोमशेखर नायक यांच्याशी चेन्नमा राणीचा विवाह झाला. मात्र, कट रचून त्यांच्या पतीची  हत्या करण्यात आली. पतीच्या निधनानंतर केलाडीच्या लोकांची सुरक्षा आणि कल्याण जबाबदारी चेन्नम्मा यांच्यावर आली. त्यांनी अगदी उत्तम पद्धतीने राज्यकारबार सांभाळला. 

एकदा राज्यातील लोकांशी चेन्नम्मा संवाद साधत असताना त्यांची भेट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम यांच्याशी झाली. राजाराम साधुचे कपडे घालून त्याच्यांकडे आले होते.  मुघल सम्राट औरंगजेबाने त्यांना मारण्यासाठी सैन्य पाठवल्याचे त्यांनी चेन्नमा यांना सांगितले.  दक्षिणेतील प्रत्येक शासक औरंगजेबच्या भीतीमुळे त्यांच्या राज्यातून जाऊ देत नव्हता.

अशा परिस्थितीत चेन्नमा राणीने राजाराम यांनी राज्यातून जाण्याची आणि गिंगीच्या किल्ल्यात तात्पुरता आश्रय घेण्याची परवानगी देण्याची विनंती केली. चेन्नम्माने होकार दिला आणि त्यांना आश्रय दिला. मुघल सैन्याला हे कळताच, औरंगजेबाने चेन्नम्मा यांना धमकीचे पत्र पाठवले. राजाराम आधीच केलाडी राज्यातून निघून गेल्याचे पत्र चेन्नमा यांनी औरंगजेबला पाठवले. 

राणीचे पत्र औरंगजेबापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मुघल सैन्याने केलाडीवर हल्ला केला.  चेन्नम्माने सागर येथील तिच्या लष्करी तळावरून झालेल्या लढाईत मुघलांचा धोका यशस्वीपणे परतवून लावला. अखेर, राजारामच्या यशस्वी पलायनाची बातमी किल्ल्यावर पोहोचल्यानंतर, औरंगजेबाने गिंगीला वेढा घालण्याच्या दिशेने आपले प्रयत्न वळवले.

केलाडीच्या सैनिकांनी मुघल आक्रमणाविरुद्ध शौर्याने लढा दिला. लवकरच मुसळधार पावसामुळे युद्ध थांबले. एके दिवशी, जान निसार खानला औरंगजेबाचा संदेश मिळाला, ज्यामध्ये राजाराम गिंगीमध्ये असल्याची माहिती देण्यात आली. मुघलांनी गिंगीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच केलाडीशी शांतता कराराचा प्रस्ताव ठेवला. चेन्नम्माला तिचे राज्य सुरक्षित आहे हे पाहून दिलासा मिळला.

 





Source link

3130313467080 एवढ्या संपत्तीची मालकिण; एका रात्रीत ही भारतीय तरुणी बनली आशियतील सर्वात श्रीमंत महिला

0
3130313467080 एवढ्या संपत्तीची मालकिण; एका रात्रीत ही भारतीय तरुणी बनली आशियतील सर्वात श्रीमंत महिला


India Richest Women Roshni Nadar : एका रात्रीत एक भारतीय तरुणी आशियतील सर्वात श्रीमंत महिला बनली आहे. ही तरुणी एका रात्रीत 3130313467080 एवढ्या संपत्तीची मालकिण झाली आहे. भारतातील या अति श्रीमंत तरुणीचे नाव आहे  रोशनी नादर. एचसीएलचे संस्थापक शिव नादर यांची ती मुलगी आहे.  वडिलांमुळेच रोशनी नादर एका रात्रीत श्रीमंत झाली. असं केलं तरी काय तिच्या वडिलांनी जाणून घेऊया. 

2019 मध्ये फोर्ब्सच्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत रोशनी नादर स्थान मिळाले आहे. फोर्ब्सच्या श्रीमंत महिलांच्या यादीत त्या 54 व्या क्रमांकावर होत्या. 2009 मध्ये रोशनी यांनी शिखर मल्होत्रा यांच्यासह लग्न केले. त्यांचे  पती एचसीएल हेल्थचे उपाध्यक्ष आहेत.  

ब्लूमबर्ग बिलियनेअर्सच्या आकडेवारीनुसार रोशनी जगातील पाचव्या क्रमांकाची श्रीमंत महिला बनली आहे.  भारतातील तिसरी सर्वात श्रीमंत भारतीय बनली आहे. याशिवाय, ती भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती देखील बनली आहे. 
उत्तराधिकार नियोजनाचा एक भाग म्हणून, एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर यांनी एचसीएल कॉर्पोरेशन आणि वामा दिल्ली सारख्या प्रमोटर संस्थांमधील त्यांचे 47 टक्के हिस्सेदारी त्यांच्या मुलीला भेट म्हणून दिली आहे. एकदा गिफ्ट डीड ट्रान्सफर पूर्ण झाले की, तिला एचसीएल कॉर्प आणि वामावर बहुमत नियंत्रण मिळेल. ज्यामुळे ते एचसीएल इन्फोसिस्टम्स आणि एचसीएलटेकमधील सर्वात मोठे शेअरहोल्डर बनेल. आता सध्या, रोशनी नादरचा दोन्ही कंपन्यांमधील एकूण हिस्सा 57 टक्क्यांहून अधिक झाला आहे.

शिव नादर यांनी 1976 मध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीजची (HCL) स्थापना केली.  रोशनी वयाच्या 27 व्या वर्षी एचसीएल कॉर्पोरेशनची कार्यकारी आणि सीईओ बनल्या. कमी वयातच मोठी उंची गाठणाऱ्या रोशनी या भारतातील यशस्वी उद्योजक महिलांपैकी एक आहेत.  वडील शिव नादर यांच्या पावलावर पाऊल ठेवत रोशनीने यांनी त्यांचे कौशल्य सिद्ध केले आहे आणि कंपनीला यशस्वी टप्प्यावर पोहचवण्यात महत्वाची भूमिका बजावली. कोशनी नादर यांच्या कंपनीच्या व्यवसायाचा कारभार हा जगभरातील 52 देशांमध्ये चालतो.  

दिल्लीतील वसंत व्हॅली स्कूलमध्ये रोशनी यांचे शिक्षण झाले. उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेली. कम्युनिकेशन स्टडीज, रेडिओ, चित्रपट आणि टीव्हीचा अभ्यास केल्यानंतर रोशनी यांनी निर्माती म्हणून काम केले. अनेक नामांकित न्यूज चॅनेलमध्ये त्यांनी न्यूज अँकर म्हणूनही  काम केले.   

 





Source link

Congress on Budget : कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प: कॉंग्रेसची टीका

0
Congress on Budget : कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प: कॉंग्रेसची टीका


अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडलेला अर्थसंकल्प हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प आहे. यातून कोणत्याही घटकाला काहीही फायदा होणार नाही. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे. राज्यात आर्थिक बेशिस्तीचा कारभार सुरु असून आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज झाले असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणणारे भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार असेच दिसते आहे, असा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.



Source link

महाराष्ट्रातील शेतकरी, श्रमिक वर्गाची निराशा करणारा अर्थसंकल्प- माकपची टीका

0
महाराष्ट्रातील शेतकरी, श्रमिक वर्गाची निराशा करणारा अर्थसंकल्प- माकपची टीका


अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्रातील शेतकरी आणि श्रमिक वर्गाची अत्यंत निराशा करणारा असल्याची प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केली आहे . निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी आपले सरकार आले तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल व सोयाबीनला ६ हजार रुपये भाव देऊन सोयाबीनचा दाणा न दाणा खरेदी केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. किसान सन्मान योजनेच्या अनुदानात ३ हजारांची वाढ केली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. दूध व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोसळणाऱ्या दरांचा वारंवार सामना करावा लागतो. दीर्घकालीन उपाय करून दूध व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान रास्त भावाची हमी देण्यासाठी धोरणे घेतली जातील असे आश्वासनही सरकारने वारंवार दिलेले होते. अर्थसंकल्पामध्ये याबाबत कोणत्याही प्रकारची घोषणा न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे, असं नवले म्हणाले. ६,०६,८५५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी विभागाला केवळ ९,७१० कोटी रुपये देण्यात आले आहेत. एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत हा खर्च केवळ १.६ टक्के इतका अल्प आहे. देशभरात कृषी अरिष्टामुळे सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या ज्या राज्यात होतात त्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी विभागाची झालेली ही अशी अवहेलना संतापजनक आहे.



Source link

Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी; ‘लाडक्या बहिणीं’ना २१०० रुपये वाढ नाहीच

0
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी; ‘लाडक्या बहिणीं’ना २१०० रुपये वाढ नाहीच


वर्ष २०२५-२६चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ असे सांगत शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा क्षेत्रांसाठी तरतूद असलेला अर्थसंकल्प आहे. यातून देशांतर्गत, विदेशी गुंतवणूक, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला



Source link