Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 481

‘S*x साठी पैसे मागते पत्नी, सासरीची मंडळी…’, पतीची पोलिसात तक्रार; पत्नी म्हणाली, ‘बेडरुममध्ये…’

0
‘S*x साठी पैसे मागते पत्नी, सासरीची मंडळी…’, पतीची पोलिसात तक्रार; पत्नी म्हणाली, ‘बेडरुममध्ये…’


Wife Demands Money For Intimacy: कर्नाटकमधील एका सॉफ्टवेअर कंपनी काम करणाऱ्या व्यक्तीने पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पत्नी पैशांची मागणी करत असल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पत्नीने पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. वायल्लीकल्लव पोलीस स्थानकामध्ये पतीने तक्रार दाखल केली असून पत्नी ब्लॅकमेल करत असल्याचं म्हटलं आहे. 

मॅट्रोमोनिअल साईटवरुन लग्न जुळलं

पत्नी मला ब्लॅकमेल करते, माझा छळ करते, माझ्यावर आर्थिक तणाव टाकून मला मानसिक दृष्ट्‍या आणि शारीरिक दृष्ट्‍या छळते असं या व्यक्तीने तक्रारीत म्हटल्याचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे. तक्रारदार व्यक्तीचं नाव श्रीकांत असं असून त्याच्या पत्नीचं नाव बिंदूश्री असं आहे. दोघे मॅट्रोमोनिअल साईटवरुन एकमेकांना भेटले आणि त्यांचं ऑगस्ट 2022 मध्ये लग्न झालं. 

शरीरसंबंध ठेवायचे असतील त्या दिवशी 5 हजार मागते

लग्न होण्याआधीच बिंदूश्रीच्या आईने पैशांची मागणी केली होती असं श्रीकांतचं म्हणणं आहे. मी माझ्या सासूच्या खात्यावर 3 लाख रुपये पाठवले होते. त्यानंतर लग्नाच्या खर्चात हातभार लावण्यासाठी मी त्यांना पुन्हा 50 हजार पाठवलेले असंही श्रीकांतने म्हटलं आहे. लग्नाला दोन वर्षांहून अधिक कालावधी झाला असला तरी पत्नी माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेवायला तयार होत नाही. माझ्याशी शरीरसंबंध ठेवायचे असतील तर दर दिवसाचे 5 हजार रुपये द्यावे लागतील असं पत्नी सांगते, असा आरोपही श्रीकांतने केला आहे. मी तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती आत्महत्या करेन अशा धमक्या देत असल्याचं श्रीकांतने म्हटलं आहे. मी जवळीक करायला गेल्यावर ती मला मी आत्महत्येच्या चिठ्ठी तुझं नाव लिहून जीव देईन असं धमकावत असल्याचं श्रीकांत म्हणाला आहे. माझ्या गुप्तांगावर हल्ला करुन मला मारण्याचा प्रयत्नही पत्नीने केल्याचा दावा श्रीकांतने केला आहे. 

75 हजारांचा लोनचा हफ्ता मागतात सासरची मंडळी

पत्नीचे कुटुंबीयही आपला मानसिक छळ करतात आणि आपल्याकडून पैसे उकळतात असं श्रीकांतचं म्हणणं आहे. ‘माझ्या पत्नीच्या आणि तिच्या आईच्या नावावर असलेल्या घराच्या कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी सासरची मंडळी माझ्याकडे दर महिना 75 हजार रुपयांची मागणी करतात,’ असं श्रीकांतचं म्हणणं आहे. घरुन काम करताना मिटींग सुरु असल्यास पत्नी मला त्रास देण्यासाठी मुद्दाम गोंधळ घायलाची तर कधी ती माझ्यामागे नाचायची. त्यामुळेच माझी नोकरी गेल्याचंही श्रीकांतने म्हटलं आहे. मी या साऱ्याचे व्हिडीओ पुरावे म्हणून रेकॉर्ड करुन ठेवलेत, असंही श्रीकांतने म्हटलं आहे.

पोटगी म्हणून 45 लाख रुपये हवेत

पत्नीपासून मला घटस्फोट हवा असून याबद्दल तिच्याशी चर्चा केली तेव्हा तिने घटस्फोट हवा असेल तर पोटगी म्हणून 45 लाख रुपये द्यावे लागतील असं मला सांगितल्याचं श्रीकांतचं म्हणणं आहे. 

पत्नीचं म्हणणं बेडरुममध्ये कॅमेरा लावण्याची धमकी देतात सासरची मंडळी

श्रीकांतने तक्रार दाखल केल्यानंतर त्याची पत्नी बिंदूश्रीनेही घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. आपला शारीरिक छळ केला जात असल्याचं तिचं म्हणणं आहे. मला एखाद्या मोलकरणीसारखं वागवलं जात असं बिंदूश्रीने म्हटलंय. हुंड्यासाठी सासरची मंडळी माझा छळ करतात. त्यांनी मला तुझ्या बेडरुममध्ये कॅमेरा बसवू अशा धमक्या दिल्याचंही बिंदूश्रीने तक्रारीत म्हटलं आहे. “तिला गरोदर कर म्हणजे ती सोडून जाणार नाही,” असा सल्ला दिराने पतीला दिल्याचा बिंदूश्रीचा दावा आहे. मी या छळाला कंटाळून माहेरी गेली होते. मात्र सर्व काही नीट होईल या आपेक्षेने परत आले तरी परिस्थिती जैसे थेच आहे, असं बिंदूश्रीने म्हटलं आहे. पोलिसांनी बिंदूश्री आणि श्रीकांतला चौकशीसाठी बोलावले आहे. 





Source link

Meerut Murder: मुलीला फाशीची मागणी करणाऱ्या आईचे भिंग फुटलं, जावईच्या सहानुभूतीचे कारण झाले उघड!

0
Meerut Murder: मुलीला फाशीची मागणी करणाऱ्या आईचे भिंग फुटलं, जावईच्या सहानुभूतीचे कारण झाले उघड!


Meerut Murder Accused Woman’s Mother Truth: मेरठच्या सौरभ राजपूत हत्याकांडात रोज काही तरी नवीन गोष्टी समोर येत आहेत. पोलिसांनी नुकताच नवीन खुलासा केला आहे ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. सौरभच्या हत्येची आरोपी असलेल्या मुस्कानची आई कविता रस्तोगी कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडत होती. एवढंच नाही तर ती आपल्या मुलीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत होती, तिचेच आता भांड फुटलं आहे. कविता ही मुलगी मुस्कानची सावत्र आई असून सौरभही सासूच्या (कविताच्या) बँक खात्यात पैसे पाठवत असे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आता प्रश्न असा आहे की हे पैसे कधी पाठवले गेले आणि कुठे वापरले गेले? कशासाठी पैसे वापरले गेले? याचा तपास मेरठ पोलिसांनी सुरू केला आहे.

‘या’ कारणामुळे जावयाबद्दल सहानुभूती होती?

आधी मुस्कानची आई कविता ही जावई सौरभची बाजू घेताना दिसली. सौरभचे आपल्या मुलीवर खूप प्रेम होते आणि त्याने लग्नासाठी आपल्या कुटुंबालाही सोडले होते, असे तिने सांगितले. तिने त्याला मुलासारखे मानले होते असेही तिने सांगितले. मात्र सौरभच्या कुटुंबीयांनी कविताचे नाव घेत तीही सौरभकडून पैसे घेत असे, असे सांगताच या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.  सौरभच्या कुटुंबीयांनी मुस्कानच्या कुटुंबावर पैशांबाबत अनेक आरोप केले आहेत, ज्याची आता चौकशी सुरू झाली आहे. आपल्या जावयासाठी अश्रू ढाळणारी आई आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

हे ही वाचा: ‘गैरों के बिस्तर पे, अपनों का सोना देखा’, घटस्फोटानंतर धनश्री वर्माने दिले युझवेंद्र चहलच्या ‘बेवफाई’चे संकेत!

 

पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

मेरठचे एसपी सिटी आयुष विक्रम यांनी सांगितले की, ” सौरभकडे सुमारे 6 लाख रुपये होते, त्यापैकी 1 लाख रुपये मुस्कानच्या खात्यात गेले. पोलीस आता मुस्कान आणि तिची आईला कविताला रिमांडवर घेण्याची तयारी करत आहेत. दोन पथके तयार करण्यात आली असून, ते लवकरच आरोपपत्र दाखल करणार आहेत. सध्या पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

हे ही वाचा: Boxing legend Death: ‘या’ ज्येष्ठ बॉक्सरचे निधन, वयाच्या 19 व्या वर्षी जिंकले होते सुवर्णपदक

 

कविताच मुस्कानला घेऊन गेली पोलिसात 

4 मार्च रोजी मुस्कान आणि साहिलने मिळून सौरभची निर्घृणपाने हत्या केली होती. यानंतर दोघेही कशाचीही पर्वा न करता छान फिरायला गेले. पैसे संपल्यावर दोघे घरी परतले. घरी पोहोचताच मुस्कान तिने सगळा प्रकार तिची सावत्र आई कविताला सांगितला. यावेळी कविताने क्षणाचाही विलंब न लावता तिला  पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन आत्मसमर्पण करायला लावली. कविता म्हणाली की, सौरभ हा तिच्या मुलीसाठी सर्वस्व होता, पण मुस्कानने जे काही केले त्यासाठी तिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आता हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे, कारण कवितेच्या सत्यतेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 





Source link

सातारा महिला हॉकी संघाचा भव्य विजय – राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांकाची बाजी

0
सातारा महिला हॉकी संघाचा भव्य विजय – राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांकाची बाजी

पुणे : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, पिंपरी-चिंचवड येथे आयोजित अस्मिता राज्यस्तरीय ज्युनिअर महिला हॉकी स्पर्धेत दि हॉकी सातारा महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. त्यांनी कोल्हापूर संघाचा २-१ असा पराभव करून सातारा जिल्ह्याच्या हॉकी संघटनेसाठी मानाचा तुरा रोवला.

स्पर्धेचा थरारक प्रवास
हॉकी महाराष्ट्र आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अहिल्यानगर, जळगाव, संभाजीनगर आणि सातारा या जिल्ह्यांच्या महिला संघांनी सहभाग घेतला होता. सातारा जिल्ह्याचा महिला संघ हा सब-ज्युनिअर वयोगटातील खेळाडूंनी बनवलेला असूनही, त्यांनी ज्युनिअर गटात जोरदार लढत दिली.

सेमीफायनलमध्ये सातारा संघाने बलाढ्य मुंबई संघाविरुद्ध उत्कृष्ट खेळ करत सामन्यात सुरुवातीला १-० अशी आघाडी घेतली. मात्र, मुंबई संघाच्या तुलनेत पॉलीग्रास मैदानाचा सराव नसल्याने सामना अखेर १-१ ने बरोबरीत सुटला आणि झिरो-एकने सातारा संघाला पराभव स्वीकारावा लागला.

उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान
सातारा संघाच्या तेजस्विनी कर्वे, सिद्धी केंजळे आणि वेदिका वाघमोडे या खेळाडूंना त्यांच्या शानदार खेळासाठी हॉकी स्टिक देऊन गौरविण्यात आले.

मान्यवरांचे कौतुक व आश्वासन
या सामन्याच्या साक्षीदार असलेल्या ऑलिंपियन धनंजय महाडिक आणि विक्रम पिल्ले यांनी सातारा महिला संघाच्या खेळाडूंचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यांनी फलटणसारख्या तालुक्यातील खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीला दाद दिली आणि भविष्यात येथे पॉलीग्रास किंवा स्ट्रो टर्फ मैदान उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

स्पर्धेच्या यशामागील हातभार
स्पर्धेचे बक्षीस वितरण खेल प्राधिकरणाचे रिजनल डायरेक्टर चाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी हॉकी प्रशिक्षक क्लारेन्स लोबो, ओलंपियन अजित लाकरा, विक्रम पिल्ले, धनंजय महाडिक, आंतरराष्ट्रीय खेळाडू रमेश पिल्ले उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे यांनी योग्य नियोजन केले.

मार्गदर्शन व पाठिंबा
सातारा संघाला संघटनेचे सचिव महेश खुटाळे, हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ, बी. बी. खुरंगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विजयी खेळाडू व प्रशिक्षकांचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य शेडगे, दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष बाहुबली शहा, तसेच सदस्य प्रवीण गाडे, महेंद्र जाधव, विजय मोहिते, पंकज पवार, सचिन लाळगे, आणि माजी राष्ट्रीय हॉकी खेळाडू सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले.

सातारा जिल्ह्यातील महिला हॉकी खेळाडूंनी स्पर्धेतील अप्रतिम कामगिरीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही या खेळाडूंचे नाव झळकावे, हीच अपेक्षा!

धावत्या ट्रेनमध्ये तृतीयपंथ्यांकडून तरुणाला मारहाण; अंगावर उड्या मारल्याने तरुणाचा मृत्यू, Video आला समोर

0
धावत्या ट्रेनमध्ये तृतीयपंथ्यांकडून तरुणाला मारहाण; अंगावर उड्या मारल्याने तरुणाचा मृत्यू, Video आला समोर


Transgender Beats Man In Running Train: लोकल ट्रेनमध्ये तृतीयपंथीयांकडून पैशांसाठी अनेकदा प्रवाशांवर बळजबरी केली जाते. या तृतीयपंथीयांनी ट्रेनमध्ये अशाप्रकारे भीक मागण्यावर बंदी घालण्याची मागणी वारंवार केली जाते. हे तृतीयपंथीय अनेकदा प्रवाशांशी वादही घालतात. मात्र मध्य प्रदेशमध्ये धावत्या ट्रेनमधील अशाच वादातून तृतीयपंथीयांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला असून या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. सध्या या खळबळजनक घटनेची मध्य प्रदेशमध्ये चांगलीच चर्चा आहे.

कुठे घडला हा प्रकार आणि कोण आहे मयत तरुण?

मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. तृतीयपंथींनी एका तरुणाला ट्रेनमध्ये इतके मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. मृताचे नाव आदर्श विश्वकर्मा असे आहे, तो विदिशा जिल्ह्यातील गंजबासोडा येथील रहिवासी होता. तो त्याच्या कामासाठी दररोज गंजबासोदा ते भोपाळ ट्रेनने प्रवास करत असे.

8 ते 10 तृतीयपंथींनी केला हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 15 मार्च रोजी घडली. मृत आदर्श रात्री गोंडवाना एक्सप्रेसने गंजबासोडाला परतत होता. दरम्यान, सांचीजवळ वाटेत, काही तृतीयपंथी लोकांनी त्याच्याकडे पैसे मागितले आणि जेव्हा त्याने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे आदर्श आणि या तृतीयपंथीयांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की या तृतीयपंथीयांनी आदर्शला धावत्या ट्रेनमध्ये बेदम मारहाण केली. धावत्या ट्रेनमध्ये 8 ते 10 तृतीयपंथींनी आदर्शला इतक्या क्रूरपणे मारहाण केली की या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गंजबासोडा रेल्वे ट्रॅकजवळ आढळला.

कोणीच तरुणाला वाचवण्यासाठी पुढे आलं नाही

या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, तृतीयपंथी आदर्शला रेल्वेच्या डब्यात बेदम मारहाण करताना दिसत आहेत. तृतीयपंथींनी आदर्शला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही तृतीयपंथी आदर्शच्या अंगावर उड्या मारत आहेत. यावेळी ट्रेनमध्ये उपस्थित असलेले सर्व लोक मूक प्रेक्षक बनून राहिल्याचं दिसून आलं. कोणीही आदर्शला वाचवण्याचा आणि तृतीयपंथींना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्हीच पाहा या घटनेचा व्हायरल झालेला व्हिडीओ…

विश्वकर्मा समाजाने व्यक्त केला संताप

विश्वकर्मा समाजाने आदर्शच्या हत्येवर संताप व्यक्त केला आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आणि ट्रेनमध्ये भीक मागण्यावर बंदी घालण्याची मागणी केली. 





Source link

आनंद जैन प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई उच्च न्यायालयाचं कौतुक; काय आहे नेमकं प्रकरण?

0
आनंद जैन प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई उच्च न्यायालयाचं कौतुक; काय आहे नेमकं प्रकरण?


जय कॉर्प लिमिटेचं संचालक तथा प्रवर्तक आनंद जय कुमार जैन यांना कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे कौतुक केलं आहे. या घोटाळ्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय.

17 मार्च रोजीच्या आदेशात, 2400 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी व्यापारी आनंद जैन यांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वोच्च न्यायालयाने (एससी) कौतुक केलंय. न्यायमूर्ती जेबी पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने आदेश देताना उच्च न्यायालयाच्या धाडसाचे कौतुक केले आणि म्हटले की, “उच्च न्यायालयाने ज्या धाडसाने आदेश दिला आहे त्याचे आम्ही कौतुक करतो आणि कौतुक करतो. कोणत्याही उच्च न्यायालयाकडून हेच ​​अपेक्षित आहे.”

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्षांच्या जवळचे मानले जाणारे एक उच्च-प्रोफाइल उद्योगपती आनंद जैन 2007 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या 40 श्रीमंतांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर होते. ते फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम 11 चे सह-संस्थापक आणि सीईओ हर्ष जैन यांचे वडील देखील आहेत. 

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या झोनल संचालकांना जैन यांच्याशी संबंधित असलेल्या फसवणुकीच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. डिसेंबर 2021 आणि एप्रिल 2023 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत (ईओडब्ल्यू) जैन यांच्याविरुद्ध तक्रारी दाखल करणाऱ्या 61 वर्षीय व्यावसायिक शोएब रिची सिक्वेरा यांच्या याचिकेला उत्तर देताना न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज के. चव्हाण यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. सिक्वेरा यांनी आरोप केला की मुंबई पोलीस निष्पक्ष तपास करत नाहीत, ज्यामुळे त्यांना उच्च अधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप करावा लागला.

जैन आणि जय कॉर्प विरुद्ध आरोप

वैयक्तिक फायद्यासाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर करणे

गुंतवणूकदारांची फसवणूक करणे

कर आश्रयस्थानांमध्ये असलेल्या शेल कंपन्यांद्वारे निधीचे राउंड-ट्रिपिंग करणे

मनी लाँडरिंगच्या उद्देशाने उपकंपन्यांना असुरक्षित अॅडव्हान्स देणे

संशयास्पद आणि बनावट इनव्हॉइस तयार करणे

हे आरोप भारतीय दंड संहिता, 1860 आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 अंतर्गत पूर्वसूचक गुन्हे आहेत .

सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला?

जय कॉर्पने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी विशेष रजा याचिका (एसएलपी) दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार देत म्हटलं आहे की, “या प्रकरणातील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीत उच्च न्यायालय हे किमान करू शकले असते. सीबीआय, मुंबईचे झोनल डायरेक्टर आता उच्च न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशांचे पालन करतील आणि कायद्यानुसार तपास करतील. म्हणून, आम्हाला वादग्रस्त आदेशात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही.”

जय कॉर्पचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी असा युक्तिवाद केला की उच्च न्यायालयासमोरील मूळ याचिका ही केवळ प्राथमिक चौकशीची विनंती होती परंतु ती आता पूर्ण चौकशीपर्यंत वाढली आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की ही याचिका कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर आहे आणि तक्रारदाराच्या प्रामाणिकपणाची तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने हे युक्तिवाद फेटाळून लावले.

“पक्षांकडून उपस्थित असलेल्या विद्वान वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर आणि रेकॉर्डवरील साहित्याचा आढावा घेतल्यानंतर, आम्हाला आक्षेपार्ह आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण आढळले नाही. एफआयआरची कायदेशीरता आणि वैधता आव्हान देण्यासह, उपलब्ध असलेल्या योग्य कायदेशीर उपायांचा लाभ घेण्यासाठी आम्ही पक्षांना मोकळे सोडतो,” असे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. सीबीआयचा

एफआयआर आणि तपास

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयने जय कॉर्प आणि जैन यांच्याविरुद्ध 2,434 कोटी रुपयांच्या फसव्या कारवायांचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. तपासात इतर दोन संस्था – अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर व्हेंचर कॅपिटल आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टीज लिमिटेड – आणि इतर संबंधित पक्षांचाही समावेश आहे.

एफआयआरनुसार, मे 2006 ते जून 2008 दरम्यान, जय कॉर्प लिमिटेडचे ​​संचालक आणि प्रवर्तक म्हणून काम करणाऱ्या जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर व्हेंचर कॅपिटल आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टीज लिमिटेड या दोन संस्था सुरू करण्यासाठी भगिनी कंपन्यांसोबत कट रचला. त्यानंतर या संस्थांनी मुंबई आणि इतर ठिकाणी रिअल इस्टेट विकासासाठी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर अपॉर्च्युनिटीज फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने जनतेकडून 2,434 कोटी रुपये उकळले.

एफआयआरमध्ये पुढे असा आरोप आहे की 31 जानेवारी 2006 रोजी, व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन करण्यासाठी सेटलर आणि ट्रस्टी म्हणून वरील दोन्ही संस्थांनी मुंबई रजिस्ट्रार ऑफ अ‍ॅश्युरन्सकडे एक इन्डेंचर ऑफ ट्रस्ट (IoT) नोंदणीकृत केली. नंतर भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) ने निधीची नोंदणी केली. IoT ने स्पष्टपणे सांगितले की संचालक, अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी संघर्ष असलेल्या कोणत्याही संस्थेसोबत कोणताही व्यवहार किंवा गुंतवणूक केली जाणार नाही. तथापि, या घोषणेचे उल्लंघन करून, जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भगिनी कंपन्यांना गुंतवणूक करून आणि असुरक्षित कर्ज देऊन सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

याव्यतिरिक्त, सीबीआयचा दावा आहे की या सिस्टर कंपनीने बांधकाम प्रकल्पांना न्याय देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून अनेक वर्षांपासून असुरक्षित कर्जे तोट्यात म्हणून नोंदवली आहेत. आरोपी कॉर्पोरेट संस्थांनी बेनामी जमीन खरेदीसाठी आगाऊ देयके न्याय्य करण्यासाठी बनावट करार केले आहेत, ज्यामुळे फसव्या कारवायांना आणखी पाठिंबा मिळाला आहे.

2010 ते 2017 दरम्यान, जैन यांच्या मूळ कंपनीवर बनावट पावत्या आणि कागदपत्रांचा वापर करून ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समधील सरबॅग्स पीटीवाय लिमिटेड आणि अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील अ‍ॅश्युरन्स प्रॉडक्ट्स कॉर्पोरेशनला फसवणूक करून वस्तू निर्यात केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी निधी वळवला गेला.
 





Source link

सरकारकडून आश्वासनानंतर बँक कर्मचाऱ्यांचा संप लांबणीवर

0
सरकारकडून आश्वासनानंतर बँक कर्मचाऱ्यांचा संप लांबणीवर



Bank employees strike postponed after assurance from government सरकारकडून आश्वासनानंतर बँक कर्मचाऱ्यांचा संप लांबणीवर





Source link

‘Guru Mantra’ of unregistered advisors is dangerous – SEBI print eco newsनोंदणी नसलेल्या सल्लागारांचे ‘गुरूमंत्र’ धोक्याचेच

0
‘Guru Mantra’ of unregistered advisors is dangerous – SEBI print eco newsनोंदणी नसलेल्या सल्लागारांचे ‘गुरूमंत्र’ धोक्याचेच



‘Guru Mantra’ of unregistered advisors is dangerous – SEBI print eco newsनोंदणी नसलेल्या सल्लागारांचे ‘गुरूमंत्र’ धोक्याचेच – सेबी, समाजमाध्यमातून ७० हजार दिशाभूल करणाऱ्या आशयाचे निष्कासन





Source link

नाकाबंदीदरम्यान पोलीस अधिकाऱ्याला मोटरगाडीची धडक

0
नाकाबंदीदरम्यान पोलीस अधिकाऱ्याला मोटरगाडीची धडक



motorbike hit police officer at roadblock in goregaon east on thursday || नाकाबंदीदरम्यान पोलीस अधिकाऱ्याला मोटरगाडीची धडक





Source link

महापालिका रोख्यांसाठी ‘एनएसई’चे विशेष संकेतस्थळ

0
महापालिका रोख्यांसाठी ‘एनएसई’चे विशेष संकेतस्थळ



NSE special website for municipal bonds महापालिका रोख्यांसाठी ‘एनएसई’चे विशेष संकेतस्थळ





Source link

सुविधांसाठी बँकांकडून सर्वोत्तम सहकार्याची अपेक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

0
सुविधांसाठी बँकांकडून सर्वोत्तम सहकार्याची अपेक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन



cm devendra fadnavis expressed confidence in continued bank cooperation due to successful infrastructure projects || सुविधांसाठी बँकांकडून सर्वोत्तम सहकार्याची अपेक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन





Source link