







संजय खोडके या संधीचे नक्की सोने करतील. मधल्या दहा वर्षाच्या अनुभवांमुळे त्यांच्यात भरपूर बदल झाला आहे. राजकारणाची समज आधीपासूनच त्यांच्यात उत्तम आहे. कामे कसे करून घ्यायचे, फाईल कशा हलवायच्या, कोणती गोटी कुठे फिट करायची हे कौशल्य त्यांना अवगत आहे. विधानसभा निवडणुकीतील पडझडीमुळे जिल्ह्यात निवडून आलेले बहुतांश आमदार अगदी नवखे आहेत. त्या पार्श्वभूमीवर संजय खोडके यांचे आमदार होणे, ही अमरावती जिल्ह्यासाठी अतिशय चांगली गोष्ट झाली आहे. अमरावती शहर व जिल्ह्याच्या समस्या त्यांना माहित आहे. आपला अनुभव व प्रशासकीय कौशल्याचा उपयोग ते जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी नक्की करतील, हा विश्वास आहे.

Sat, 22 Mar 202508:48 AM IST
Manoj Jarange Patil – मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली आहे. क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी टिका केली आहे.

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाचा फक्त वापर केला आहे. क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी टिका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा नागपूरस्थित पत्रकार प्रशांत कोरटकर अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. यावर मनोज जरांगे पाटील यांनी टिकास्त्र सोडले. प्रशांत कोरटकर कसा सापडत नाही, तो काय सरकारचा सोयरा आहे काय, असं जरांगे म्हणाले.

फलटण | साहस Times :- माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे फलटण शहरासाठी तब्बल 104 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी मंजूर केल्याबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांचे आभार मानले.
यासंदर्भात बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, “फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार सचिन पाटील निवडून आल्यानंतर आम्ही संपूर्ण शहराचा पायी दौरा केला. त्यावेळी अनेक प्रलंबित विकासकामे आमच्या निदर्शनास आली. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला. त्याचाच परिणाम म्हणून आज हा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.“
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध भागांमध्ये रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, नवीन नाट्यगृह आदी कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
✅ प्रभाग क्र. 1 ते प्रभाग क्र. 12:
✅ फलटण शहरात नवीन नाट्यगृह बांधकामासाठी – ₹8 कोटी (800 लाख)
✅ अहिल्यादेवी होळकर चौक ते गिरवी नाका रस्ता – ₹1 कोटी (100 लाख)
या मोठ्या निधीमुळे फलटण शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे. नगरपरिषद हद्दीतील नागरिकांसाठी मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे.