Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटण शहराच्या विकासासाठी 104 कोटींचा निधी मंजूर – विविध कामांना गती

फलटण शहराच्या विकासासाठी 104 कोटींचा निधी मंजूर – विविध कामांना गती

फलटण | साहस Times   :- माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे फलटण शहरासाठी तब्बल 104 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी मंजूर केल्याबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांचे आभार मानले.

यासंदर्भात बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, “फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार सचिन पाटील निवडून आल्यानंतर आम्ही संपूर्ण शहराचा पायी दौरा केला. त्यावेळी अनेक प्रलंबित विकासकामे आमच्या निदर्शनास आली. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला. त्याचाच परिणाम म्हणून आज हा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.


फलटण शहरातील मंजूर विकासकामे आणि निधी

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध भागांमध्ये रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, नवीन नाट्यगृह आदी कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नगरपरिषद हद्दीतील विकासकामे:

प्रभाग क्र. 1 ते प्रभाग क्र. 12:

  • बंधिस्त गटारे
  • अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण
  • पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन
  • प्रत्येकी निधी: 50 लाख रुपये

मुख्य रस्त्यांचे नूतनीकरण:

  1. गिरवी नाका ते सजाई गार्डन नजीक नगरपालिका हद्दीपर्यंत रस्ता₹80 लाख
  2. पिरामिड चौक ते चिमणी शाळा रस्ता₹85 लाख
  3. शंकर मार्केट बाहुली शाळा ते गजानन चौक रस्ता₹85 लाख
  4. सातारा पूल ते पिरामिड चौक रस्ता₹80 लाख
  5. अहिल्यादेवी होळकर चौक ते आंबेडकर चौक रस्ता₹85 लाख
  6. कोर्ट बिल्डिंग ते आमदार सचिन पाटील यांचे घर ते भैरवनाथ मंदिर ते गिरवी रोड रस्ता₹85 लाख

विशेष विकास प्रकल्प:

फलटण शहरात नवीन नाट्यगृह बांधकामासाठी₹8 कोटी (800 लाख)
अहिल्यादेवी होळकर चौक ते गिरवी नाका रस्ता₹1 कोटी (100 लाख)


विकासाच्या नव्या उंबरठ्यावर फलटण शहर

या मोठ्या निधीमुळे फलटण शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे. नगरपरिषद हद्दीतील नागरिकांसाठी मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments