Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 463

भारतीय रिझर्व्ह बँकेची उत्क्रांती

0
भारतीय रिझर्व्ह बँकेची उत्क्रांती



डॉ. नरेंद्र जाधव,अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, माजी (२०२२ पर्यंत) राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्य

आजपासून बरोबर ९० वर्षांपूर्वी म्हणजेच १ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) स्थापन झाली. या भारतीय रिझर्व्ह बँकेची गणना आज जागतिक पातळीवरच्या अग्रगण्य मध्यवर्ती बँकांमध्ये केली जाते हे साऱ्या भारतीयांसाठी भूषणास्पद आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना हिल्टन यंग कमिशन यांच्या शिफारशीवरून आणि ‘आरबीआय अॅक्ट- १९३४’ या कायद्यान्वये करण्यात आली. हिल्टन यंग कमिशन भारतात आले ते १९२६ साली. परदेशातून उच्चविद्याविभूषित होऊन मायदेशी परतल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी या कमिशनसमोर एक महत्त्वाची साक्ष दिली होती. (त्यामुळे आरबीआयची स्थापना डॉ. आंबेडकरांनी केली असा अनेकांचा समज आहे. परंतु ही बाब वास्तवाला धरून नाही). भल्याभल्यांना कल्पना नाही परंतु वस्तुस्थिती अशी की, आरबीआयची स्थापना ही सुरुवातीला खासगी भागधारकांची बँक म्हणून झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, आरबीआय अॅक्ट- १९४८ या अन्वये तिचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. आपला देश पारतंत्र्यात असताना, ऑगस्ट १९४३ मध्ये आरबीआयचे तिसरे आणि भारतीय म्हणून पहिले गव्हर्नर होण्याचा मान मिळाला तो सी. डी. देशमुख यांना. सुरुवातीला या बँकेचे मध्यवर्ती कार्यालय कोलकाता येथे होते. १९३७ साली ते दिल्लीला न नेता ते मुंबईला स्थलांतरित व्हावे हा निर्णय दूरदर्शीपणाचा ठरला. हे कार्यालय दिल्लीत असते तर आरबीआयला सरकारी कार्यालयाची ‘कळा’ आली असती. मुंबईला आल्यामुळे आरबीआयची स्वत:ची कार्यालयीन व्यावसायिक संस्कृती विकसित होऊ शकली. कोणत्याही मध्यवर्ती बँकेची वाटचाल ही त्या त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत होणाऱ्या स्थित्यंतराशी सुसंगत अशा प्रकारे होत असते. आरबीआयच्या बाबतही हेच घडले, मात्र एक अपवाद राखून.

बहुतेक देशांच्या मध्यवर्ती बँका स्थापन झाल्या, त्यापूर्वीच त्यांच्या अर्थव्यवस्था विकसित झालेल्या होत्या. भारतात मात्र तशी स्थिती नव्हती. स्वतंत्र भारताला (१९४७ साली) जी अर्थव्यवस्था लाभली ती त्याआधीच्या शंभर वर्षांमध्ये शून्य टक्के विकास झालेली. देशांतर्गत वित्त प्रणाली अविकसित असलेली. त्यामुळे स्वतंत्र भारताच्या रिझर्व्ह बँकेसमोर आव्हान होते ते दुहेरी स्वरूपाचे : आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी देशांतर्गत वित्त प्रणाली ( Financial System) विकसित करणे व त्याच वेळी सर्व वित्त संस्थांचे प्रभावी नियमन करणे. आणखी एक आव्हान होते : आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी सरकारकडे मर्यादित संसाधने असल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून सरकारला आवश्यक तेवढा कर्जपुरवठा करणे, हे ते आव्हान.

गेली ९० वर्षे रिझर्व्ह बँकेने ही सारी आव्हाने लीलया पेलली आहेत याचा सर्व भारतीयांना अभिमान वाटायला हवा. राष्ट्रीयीकरण झाल्यानंतरच्या गेल्या ७५ वर्षांच्या कालखंडात रिझर्व्ह बँकेची उत्क्रांती चार टप्प्यांमध्ये झालेली दिसते. या सर्व टप्प्यांमधून संक्रमण करीत असताना आरबीआयची नीती अशी होती की, एखादा विभाग पुरेसा प्रगत झाला की त्याला वेगळे काढून स्वतंत्रपणे विकास घडवून आणायला वाव द्यायचा. या प्रक्रियेतूनच कृषी क्षेत्रासाठी ‘नाबार्ड’, औद्याोगिक क्षेत्रासाठी ‘आयडीबीआय’ तसेच ‘सिडबी’ या विकास बँकांची निर्मिती झाली.

पायाभरणीचा टप्पा (१९५० ते १९६९) : या टप्प्यावर १९४९ चा ‘बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट’ अस्तित्वात आला. बँकिंग संस्थांना आदेश देण्याचे व त्यांच्या नियमनाचे अधिकार आरबीआयला प्राप्त झाले. याच टप्प्यावर सहकारी पतसंस्थांचे सबलीकरण करण्यात आले. कृषीसाठी दीर्घकालीन पतपुरवठा विभाग – ‘अॅग्रिकल्चर क्रेडिट डिपार्टमेंट’ निर्माण करण्यात आला (जो पुढे नाबार्डमध्ये रूपांतरित झाला). औद्याोगिक क्षेत्राला पतपुरवठ्यासाठी ‘इंडस्ट्रियल फायनान्स डिपार्टमेंट’ निर्माण करण्यात आले (पुढे आयडीबीआय). बचत आणि गुंतवणुकीला उत्तेजन देण्यासाठी पहिला ‘म्युच्युअल फंड’ निर्माण केला (१९६४) तोही रिझर्व्ह बँकेनेच. (त्याचे नाव युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया; ज्याची ‘यूटीआय बँक’ होऊन तिचेही पुढे १९९३ मध्ये अॅक्सिस बँक या नावाने खासगी व्यापारी बँकेत रूपांतर झाले).

१९६० च्या दशकाच्या मध्यावर भारतीय अर्थव्यवस्थेवर पहिला मोठा पेचप्रसंग उद्भवला. चीन (१९६२) व पाकिस्तान (१९६५) युद्धांपायी अमाप सरकारी खर्च, वाढलेली अर्थसंकल्पीय तूट, १९६६ व १९६७ मध्ये सलग दोन वर्षे पडलेला राष्ट्रव्यापी दुष्काळ- यामुळे रुपयाचे अवमूल्यन करावे लागले. पंचवार्षिक योजनांना तीन वर्षांसाठी स्थगिती द्यावी लागली. या सर्व घडामोडींतून पुढचा टप्पा उद्भवला.

विस्ताराचा टप्पा (१९६९-१९८५) : १९६९ हे वर्ष टर्निंग पॉइंट ठरले. त्या वर्षी १४ मोठ्या खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले (१९८० मध्ये आणखी सहा) यातून भारतीय वित्त प्रणालीच्या मोठ्या विस्तारीकरणाला प्रारंभ झाला. बँक राष्ट्रीयीकरणातून तीन गोष्टी घडल्या – (१) बचतीला देशभरात चालना, (२) बँकांच्या शाखांचा ग्रामीण व निमशहरी भागात प्रचंड विस्तार आणि (३) बँकांचा पतपुरवठा जो प्रामुख्याने मोठ्या उद्याोगांसाठी ‘राखीव’ होता त्यात दिशाबदल करून ‘कृषी, लघुउद्याोग व लघु व्यापारी’ क्षेत्रांना कर्जासाठी प्राधान्य मिळावे म्हणून त्यांच्यासाठी ३३.३ टक्के कर्जपुरवठा सुनिश्चित करण्यात आला. (पुढे तो ४० टक्के झाला). एकूण काय, तर ‘क्लास बँकिंग’चे ‘मास बँकिंग’मध्ये रूपांतर झाले. त्यामुळे बँका या आर्थिक-सामाजिक परिवर्तनाचे एक प्रभावी साधन बनल्या. या बेसुमार विस्ताराचे काही दुष्परिणाम झाले. बँकिंग क्षेत्रातील स्पर्धात्मक गुणवत्ता कमी झाली, शाखांच्या जाळ्यामुळे नियंत्रण अनेकदा प्रभावहीन झाले. त्यातून नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स (एनपीए) प्रमाणाबाहेर वाढले. याचीच परिणती भारतीय वित्त प्रणाली तिसऱ्या टप्प्याकडे जाण्यामध्ये झाली.

एकत्रीकरण व संतुलित विकास (१९८५-९०) : या तिसऱ्या टप्प्यावर तीन बदल करण्यात आले- शाखांच्या विस्तारीकरणावर मर्यादा, प्रत्येक बँकेसाठी स्वतंत्र ‘अॅक्शन प्लॅन’ आणि सर्व बँकांसाठी ‘हेल्थ कोड’ची निर्मिती. नवीन वित्तीय साधने ( Financial Instruments) सादर करण्यात आली. उदा.- कमर्शियल पेपर्स, सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स. लघुउद्याोगांसाठी ‘सिडबी’या शिखर संस्थेची स्थापना करण्यात आली. ‘अग्रक्रम क्षेत्रांना’ कर्जपुरवठा करण्याचे बंधन विदेशी बँकांनाही लागू करण्यात आले.

१९८५ नंतर बेसुमार सरकारी खर्चामुळे अर्थसंकल्पीय तूट प्रचंड प्रमाणात वाढली; त्यातच ‘गल्फ वॉर’मुळे परकीय चलनाच्या जमा-खर्चात तफावत खूपच वाढल्यामुळे चलन-गंगाजळी आटत जाऊन फक्त एक अब्ज डॉलर (म्हणजे १५ दिवसांच्या आयातीला पुरेल इतकेच) परकीय चलन आपल्याकडे उरले. देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला.

या निर्णायकी अवस्थेत, केंद्र सरकार कोसळण्याच्या मार्गावर असताना गव्हर्नर वेंकिटरामानन यांच्या नेतृत्वाखाली आरबीआयने पुढाकार घेऊन ४७ टन सोने परदेशी पाठवून कर्ज घेण्याचा कटू निर्णय घेतला… खरे तर ‘आर्थिक नीती-लकव्या’च्या त्या काळात यथोचित निर्णय घेऊन देश वाचविला. नंतर नवे सरकार आले. डॉ. मनमोहन सिंग वित्तमंत्री झाले. अभूतपूर्व पेचप्रसंगावर मात करण्यासाठी, सर्वंकष बदल घडवून आणण्यासाठी ‘उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण’ धोरणे स्वीकारून त्यांनी नव्या आर्थिक प्रगतीचा पाया रचला.

वित्तीय प्रणालीचे उदारीकरण, जागतिकीकरण (१९९१- …) : शेवटच्या या चौथ्या टप्प्याची वैशिष्ट्ये म्हणजे (१) मौद्रिक नीतीत मोठे फेरबदल (२) वित्तीय संस्थांचे सबलीकरण (३) देशांतर्गत वित्तीय संस्था जागतिक अर्थकारणाशी जोडल्या जाण्याची प्रक्रिया सुरू (४) नव्या खासगी बँकांना परवाने (५) बँकांचे नियमन, ऑडिट व तंत्रज्ञान यांत मोठ्या सुधारणा (६) डिजिटलायझेशनद्वारे पेमेंट व सेटलमेंट सिस्टीममध्ये अभूतपूर्व फेरबदल.

२००८ चा जागतिक पेचप्रसंग असो किंवा कोविडचा दणका; आरबीआयच्या कुशल नेतृत्वामुळे भारतीय वित्त प्रणाली तावून-सुलाखून बाहेर पडली. आज जनधन योजना, आधार व मोबाइल फोन यांमुळे बँकिंग प्रणालीत सुधारणा झाल्या आहेत. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय)मुळे भारतीय वित्तीय प्रणाली, पेमेंट आणि सेटलमेंटच्या डिजिटलायझेशनच्या संदर्भात अमेरिका व चीन यांच्याखालोखाल तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हे सारे परिवर्तन- नव्हे क्रांतिकारक बदल झाले आहेत ते रिझर्व्ह बँकेमुळे. जागतिक पटलावर मध्यवर्ती बँक म्हणून आरबीआयने महत्त्वाचे स्थान पटकावले आहे ते त्यामुळेच!

माझी रिझर्व्ह बँक

मी स्वत: अर्थतज्ज्ञ म्हणून तब्बल ३१ वर्षे आरबीआयमध्ये नोकरी केली, आरबीआयचा प्रमुख अर्थतज्ज्ञ आणि प्रधान सल्लागार या पदावरून, पुणे विद्यापीठाचा कुलगुरू असताना, स्वेच्छानिवृत्ती घेतली.

रिझर्व्ह बँकेने संशोधनाच्या, प्रशासनाच्या ज्या संधी मला दिल्या तशा जगात कुठेही मिळू शकल्या नसत्या. त्यातून २० वर्षे अनेक गव्हर्नरांच्या भाषणांचे पहिले मसुदे (ड्राफ्ट) लिहिण्याचा अनुभव तर विलक्षणच आहे. अगदी अलीकडे आरबीआयचा अधिकृत इतिहास लेखनाच्या पाचव्या खंडासाठी (१९९७-२००७) नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली.

यापूर्वीच्या चारही खंडांच्या समित्यांचे प्रमुख होते सेवानिवृत्त गव्हर्नर. पहिल्या खंडाचे संपादन तर स्वत: सी. डी. देशमुख यांनी केले होते!

गेल्या नव्वद वर्षांत आरबीआय अनेकांचे आयुष्य समृद्ध करून गेली; त्यातला मीही एक भाग्यवान!



Source link

एप्रिल महिना महाभयानक! महाराष्ट्रासह भारतातील ‘या’ राज्यात जोरदार पाऊस आणि तुफान वादळ येणार? हवामान खात्याचा अलर्ट

0
एप्रिल महिना महाभयानक! महाराष्ट्रासह भारतातील ‘या’ राज्यात जोरदार पाऊस आणि तुफान वादळ येणार? हवामान खात्याचा अलर्ट


India Weather Forecast: हवामानात चित्र विचित्र बदल होत आहेत.  भारतीय हवामान विभागाने (IMD) भयानक अलर्ट दिला आहे. आयएमडीनुसार, पुढील काही दिवसांत देशाच्या अनेक भागात हवामानात मोठा बदल होणार. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण भारत, पश्चिम आणि मध्य भारतात हवामानात मोठा बदल होणार आहे. तर,  काही राज्यांमध्ये उष्णतेचा कहर पहायला मिळणार आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये 31 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान मुसळधार पाऊस, वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 2 आणि 3 एप्रिल रोजी केरळ आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. या काळात  ताशी 40 ते 60 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने वारे वाहतील. 

मागील 24 तासांत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये जोरदार वारे वाहत होते. तर, गंगीय पश्चिम बंगालमध्ये उष्णतेची लाट पहायला मिळाली.  की 1 ते 3 एप्रिल दरम्यान पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, माहे, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

वायव्य भारतात उष्णता वाढेल

पुढील तीन दिवसांत वायव्य भारतातील कमाल तापमानात 5 ते 7 अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. बिहारमध्येही तापमान 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. 30 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान आसाम आणि त्रिपुरामध्ये जोरदार वारे आणि वादळांचा धोका आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि किनारी आंध्र प्रदेशात उष्ण आणि दमट हवामान असेल.

वायव्य भारतात तापमान 7ते 7 अंशांनी वाढेल. बिहारमध्ये तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 1 ते 3 एप्रिल दरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात पाऊस आणि वादळ अपेक्षित आहे. 2 आणि 3 एप्रिल रोजी केरळ आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस पडेल. तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही पाऊस पडू शकतो. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि त्रिपुरामध्ये 31 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेची लाट येऊ शकते. हवामान खात्याने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जिथे पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता आहे, तिथे लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा आणि वीज पडण्याच्या दुर्घटनेपासून बटाव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 





Source link

रसिक स्पेशल: ‘अर्थ’संपन्न आयुष्यासाठी उभारू मराठीची गुढी!

0
रसिक स्पेशल:  ‘अर्थ’संपन्न आयुष्यासाठी उभारू मराठीची गुढी!




सर्वांना नववर्षाच्या दोन दोन शुभेच्छा! पहिल्या शुभेच्छा दोनच दिवसांनी, १ एप्रिलला नवे आर्थिक वर्ष सुरू होत आहे म्हणून आणि दुसऱ्या शुभेच्छा अर्थातच गुढीपाडव्याच्या, कारण आज मराठी नवीन वर्षाचा आरंभ होतो म्हणून. या दोन्ही नव्या वर्षांचे स्वागत करताना मनात विचार येतो की, अभिजात भाषेचा दर्जा देऊन केंद्र सरकारने मराठीचा सन्मान केल्याने एकाएकी तिच्यातील मरगळ संपून मराठी गौरव गीते गायिली जात आहेत. खरे तर मराठी भाषा आधीपासून अभिजात होती आणि आहेच, पण आता त्याबद्दल खूप बोललं, लिहिलं जाऊ लागलं आहे. मग या सगळ्यांचा मराठी भाषिकांच्या आर्थिक प्रगतीसाठी काही लाभ होणार का? असाही सूर उमटतो आहे. त्यामुळे मराठी नववर्ष आणि आर्थिक नववर्ष असा दुहेरी योग गाठून मराठी भाषेच्या अर्थकारणाचा विचार करू… गोदाकाठच्या सातवाहन राजा हालने इ. स. पूर्व २०० मध्ये लिहिलेल्या गाथा सप्तशतीमधल्या काव्यातूनही त्या काळातील निसर्ग, समाजरचना आणि व्यवहारांबद्दलची माहिती मिळते. भाषिक व्यवहार हा फक्त साहित्यिक नसतो, तर आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक असतो. भाषा ही माध्यम असल्याने ती आयुष्यातील प्रत्येक घटकाला स्पर्श करते. प्रामुख्याने ती आपल्या जगण्याच्या अर्थकारणासाठी महत्त्वाची ठरते. उदाहरण द्यायचे, तर स्थानिक व्यापाऱ्यांशी आपण मराठीतून खरेदी किंवा विक्रीचा व्यवहार करतो. पण, राष्ट्रीय पातळीवर इतर राज्यांतील ग्राहकांशी किंवा व्यापाऱ्यांशी व्यवहाराची वेळ येते, तेव्हा हिंदी किंवा इंग्रजी वापरावी लागते. हाच आर्थिक व्यवहार आंतरराष्ट्रीय पातळीवर जातो, तेव्हा इंग्रजीशिवाय पर्याय नसतो, कारण इंग्रजी ही आता जगाने व्यवहाराची भाषा म्हणून मान्य केली आहे. म्हणून जगातील बहुतेक देश आयात-निर्यातीचे करार इंग्रजीतच करतात. हेच उदाहरण उलट पद्धतीने घेऊ. ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आपली बाजारपेठ वाढवायची आहे, त्यांना भारतात यायचे झाले तर प्रामुख्याने हिंदी आणि स्थानिक भाषांचा विचार करावा लागतो. कारण स्थानिक ग्राहकाशी त्याच्या मातृभाषेतून बोलले तरच त्याच्याशी भावनिक जवळीक वाढणार असते. उदाहरणार्थ, ट्रॅक्टर तयार करणारी कंपनी आंतरराष्ट्रीय असली, तरी त्यांना ट्रॅक्टर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला विकायचा असेल, तर त्याला समजेल अशा भाषेतून म्हणजे मराठीतून जाहिरात करावी लागते. ती विविध माध्यमांतून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी लागते. त्यासाठी शेतकरी काय पाहतो, वाचतो याचा अभ्यास करावा लागतो. तो पंढरीच्या वारीला जात असेल, तर त्या मार्गावर त्याला दिसेल अशा जाहिराती कराव्या लागतात. याचाच अर्थ, ग्राहक हा राजा असेल, तर तो म्हणेल त्या भाषेत आंतरराष्ट्रीय कंपन्यांना व्यवहार करावे लागतात. थोडक्यात, ज्या भाषेत सर्व राज्य व्यवहार, न्यायनिवाडा आणि व्यापार-उदीम चालतो, ती भाषा तिच्या वापरामुळे टिकून राहते, नवनव्या शब्दांची भर घालून वाढत राहते. मराठीला समृद्ध बनवायचे असेल, तर आधी सर्व कायदे, न्यायनिवाडे, बँकेतील व्यवहार, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाची पाठ्यपुस्तके मराठीतून व्हायला हवीत. फक्त कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, चित्रपटांतून येणारी सांस्कृतिक मराठी म्हणजे तिचा वापर नव्हे, तर सामान्य माणूस दैनंदिन व्यवहारात किती मराठी वापरतो, याला फार महत्त्व आहे. मराठी माणूस कोणीही परभाषिक व्यावसायिक दिसला की झटकन आपल्या तोडक्यामोडक्या हिंदीत किंवा इंग्रजीत बोलायला लागतो. जणू काही मराठीतून बोललो तर समोरची व्यक्ती वस्तू विकणार नाही किंवा नीट सेवा देणारच नाही! ही व्यवहारातील भाषिक मानसिक गुलामगिरी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखली होती. त्यांनी फारसी आणि अरबीचे आक्रमण रोखण्यासाठी राज्यव्यवहार कोश तयार केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही भाषाशुद्धी चळवळ राबवली आणि इंग्रजीतील अनेक शब्दांना पर्यायी शब्दांची निर्मिती केली. हे सर्व शब्द आजही आपण सहजपणे वापरतो. हा एका अर्थी भाषिक स्वातंत्र्याचा लढाच होता. इंग्रजी भाषा समृद्ध झाली, कारण त्यांनी सातत्याने सर्व भाषांतील शब्द जसेच्या तसेच उचलले आणि इंग्रजीतून वापरात आणले. त्यामुळे ती जागतिक भाषा झाली. मराठीलाही त्या उंचीवर आपली गुढी उभारायची असेल, तर जागतिक ज्ञान मराठी भाषेतून उपलब्ध करून द्यावे लागेल. या संदर्भात आपण कुठे आहोत, हे पाहताना जे चित्र दिसते ते अगदीच निराशाजनक नाही. जगातील १४ कोटींहून अधिक लोक मराठी भाषिक आहेत. त्यामुळे मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची, तर जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. ज्ञानकोश, विश्वकोश, शब्दकोश, संस्कृतिकोश आदी शेकडो कोश निर्माण करणारी मराठी भाषा मुळातच समृद्ध आणि संपन्न आहे. फक्त आपण तिचा आवर्जून वापर करत नाही. या आर्थिक नववर्षाच्या निमित्ताने, सगळे अर्थव्यवहार मराठीतून करायचा निर्धार मराठी भाषिकांनी करायला हवा. बँकेतील सही मराठीत असावी, तेथील सर्व व्यवहारांची नोंद मराठीतून ठेवण्याचा आग्रह असावा, व्हॉट्स अॅप, फेसबुक आदी समाजमाध्यमांचा वापर मराठीतून करावा, ई कॉमर्स संकेतस्थळांवरुन मराठीतून वस्तू मागवाव्यात, ‘ओटीटी’वर मराठी भाषेतून जगभरातील चित्रपट आणि मालिका पाहाव्यात, इंटरनेटवर मराठीतून माहिती घ्यावी, साधे मेसेजही मराठीतूनच लिहिले जातील, हे पाहावे. यामुळे काय होईल की, मराठी भाषेला प्रचंड मागणी आहे, हे इंटरनेटला समजेल. या प्लॅटफॉर्म्सनी वापरलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला कळेल की मराठी भाषेतून खूप व्यवहार होत आहेत. मग ते सर्व तंत्रज्ञान मराठीतून आणण्याचा प्रयत्न करतील. स्वाभाविकच मराठीत सगळे ज्ञान उपलब्ध झाल्याने तिचा वापरही वाढेल. भारतातील सर्वात जास्त क्रयशक्ती असलेल्या प्रदेशांत महाराष्ट्राचा समावेश होतो. मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकच्या परिघातील चार कोटींहून अधिक मराठी भाषिक सर्वांत जास्त खरेदी करतात. या सर्व ग्राहकांनी सगळे आर्थिक व्यवहार मराठीतून करायचे ठरवले, तर स्वाभाविकच मराठीतून जाहिराती तयार होतील, त्या दाखवण्यासाठी मराठीत बातमीपत्रे आणि मालिका बनवाव्या लागतील. मराठी दैनिके, मासिके आणि नियतकालिके या जाहिरातींमुळे वाढतील. एकंदरीतच सृजनशील, प्रतिभावान मराठी लोकांची मागणी वाढेल. मराठी उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल. मराठी वस्तू आणि सेवांना जगभरातून मागणी वाढली, तर जगभरातील लोकांनाही व्यवहारासाठी मराठीचा वापर करावा लागेल… मराठीच्या उत्कर्षाचे हे स्वप्न साकारण्यासाठी आजच्या इतका दुसरा चांगला मुहूर्त कुठला असेल? चला तर मग, नवसंवत्सराची अन् नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात करताना, आपल्या आयुष्याच्या ‘अर्थ’संपन्नतेसाठी मराठी भाषेची गुढी उभारुया! (संपर्कः prasadmirasdar@gmail.com)



Source link

वेबमार्क: ‘बझ’ भारतीय ‘टॅटू’चं जागतिक गोंदण!

0
वेबमार्क:  ‘बझ’ भारतीय ‘टॅटू’चं जागतिक गोंदण!


समीर गायकवाड15 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

सामान्यत: ज्या कला लोकांच्या जाणिवांशी घट्ट निगडीत नसतात, त्यांच्याविषयी समाजमनात फारसे आकर्षण नसते. मात्र, समाजाच्या विविध वयोगटांपैकी तरुण पिढीशी कनेक्ट असणाऱ्या एखाद्या गोष्टीवर आधारलेला सिनेमा अथवा माहितीपट ट्रेंडमध्ये आला की त्यावर समाजमाध्यमांत चर्चा सुरू होते. अशाच धाटणीतला ‘बझ’ हा माहितीपट २८ फेब्रुवारीला जिओ हॉटस्टार ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय.

भारतातील प्रसिद्ध टॅटू कलाकारांपैकी एक असलेल्या एरिक डिसूझा यांचा प्रवास दाखवणारा हा माहितीपट कला आणि व्यक्तिविकास यांच्यातील संबंध व त्याचे महत्त्व अधोरेखित करतो. त्यामुळे तो निव्वळ माहितीपटापेक्षाही एक हळूहळू उलगडत जाणारी हृदयस्पर्शी कहाणी बनला आहे. व्यक्तीच्या जडणघडणीची सालपटे निघत जावीत, तसा त्यातील घटनापट समोर येतो.

‘बझ’चा विषय केवळ टॅटू काढण्याचा वा त्याच्या माहितीचा नाही, तर त्याआडच्या सामाजिक भावनांचा आहे. विविध वयातले लोक त्याकडे कसे पाहतात, यावरही त्यात कटाक्ष टाकला आहे. पूर्वीच्या काळी शरीराच्या विविध भागांवर गोंदवलं जायचं. त्यामध्ये आणि आताच्या लक्षवेधी टॅटूमध्ये काय फरक आहे, याचे मर्म माहितीपटात उत्तमपणे उलगडले आहे. नादिष्ट, नशेडी, क्रिंज, ठरकी, वाह्यात, छंदीफंदी, लक्ष वेधून घेऊ इच्छिणारे वा आकर्षणकेंद्री लोकच टॅटू काढतात असा समज रूढ आहे. तो कशामुळे रूढ आहे, याचा वेधक शोध यात घेतला आहे.

मुंबईच्या रस्त्यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धीपर्यंतचा एरिकचा प्रवास ‘बझ’मध्ये चित्रित झाला आहे. टॅटूची कलाकृती एखाद्याच्या वैयक्तिक आवडनिवडीची, स्वभाव-गुणवैशिष्ट्यांची माहिती देत व्यक्तिविशेषाच्या बाबतीतले छुपे सत्य कसे समोर आणते, हे पाहण्यासारखे आहे. अंगावर गोंदलं जावं की नको, याविषयी आपल्यात मतभेद असूनही आपल्या सर्वांच्या मनात त्याचे स्वरूप एका हव्याहव्याशा अनुभूतीचे आहे. वास्तवात हा एक वैयक्तिक स्तरावरचा सर्वसामान्य मानवी अनुभव आहे. मात्र, तो दृश्य स्वरूपात इतरांच्या नजरेला पडत असल्याने ज्याने टॅटू काढून घेतलेला असतो, त्याच्या मनातले त्या विषयीचे भाव आणि त्याच्या टॅटूकडे पाहणाऱ्या इतरेजनांचे भाव नक्कीच भिन्न असतात. या दोन्हींची सांगड कशी घालणार, याचे मजेदार उत्तर ‘बझ’ देतो. एरिक डिसूझा यांची या क्षेत्रातील कारकीर्द तब्बल वीस वर्षांची आहे, यावरूनच या माहितीपटातली रंगीनियत लक्षात यावी!

एरिक एका रात्रीत सर्वोच्च स्थानी पोहोचले नाहीत. त्यासाठी त्यांनी जो संघर्ष केलाय, तो स्क्रीनवरच पाहणे इष्ट! अनेक अडथळ्यांची शर्यत त्यांनी पार केली, अनेकदा अपयशही आले. पण, खचून न जाता ते पुढे जात राहिले. दिग्दर्शक माहिर खान यांनी या माहितीपटाच्या चित्रीकरणासोबतच एका अर्थाने एरिकच्या कलाकृतीही डिजिटल रुपात जतन केल्या आहेत. काहींना ही सर्व अतिशयोक्ती वाटू शकते, मात्र ज्या वेगाने तरुणाई आणि नवी टीनएजर पिढी या कलेकडे आकृष्ट होतेय, ते पाहता काही वर्षांनी टॅटू हा बहुताशांच्या देहभागांचा घटक झालेला असेल. लोकांचे सामाजिक, लैंगिक, वैयक्तिक दृष्टिकोनही त्यावरूनही निश्चित केले जातील. ‘बझ’च्या काही दृश्यांमध्ये टॅटू कसा काढला जातो नि विविध अवयवांवर टॅटू काढला जाताना कोणती दक्षता घ्यावी लागते, याची अतिशय रंजक माहिती मिळते. टॅटूचे आरेखन कसे होते, त्यात रंग कसे भरले जातात आणि त्याचे अंतिम टचअप कसे केले जाते, याचे विश्लेषण रंजक आहे.

एरिक यामध्ये एकेठिकाणी सांगतात की, टॅटू काढणं हे कलेच्या परिवर्तनशीलतेविषयी सकारात्मक असण्याचं लक्षण आहे. लोकांना मनोआघात आणि अव्यक्त वेदनांवर मात करण्यासाठी तसेच सामाजिक सीमा ओलांडण्यास टॅटू कामी येऊ शकतो. एरिकचे आतापर्यंतचे सर्वोत्तम काम म्हणजे त्याच्या पत्नीच्या हातावरचा अत्यंत आखीवरेखीव बोलका टॅटू, ज्याला आंतरराष्ट्रीय टॅटू परिषदांमध्ये सहा पुरस्कार मिळाले आहेत. या टॅटूमध्ये टिपलेले तपशील आणि त्यातील गूढतेचे प्रमाण एरिकमधल्या कलाकाराच्या कौशल्याचा पुरावा आहे. एरिक वास्तववादी आणि ऑर्गनिक टॅटूमध्ये तरबेज आहेत, याची साक्ष जागोजागी येते. फ्री स्टाइल टॅटूवर त्यांचे हात सफाईदारपणे काम करतात. पूर्ण शरीरभरून काम करण्यासाठी केवळ अधिक शाई आणि संयम लागतो असे नव्हे, तर त्या जटिल प्रक्रियेसाठी वचनबद्ध क्लायंटची आवश्यकता असते. त्याशिवाय टोटल बॉडी टॅटू काढता येत नाही. अर्ध्यात सोडून दिलेले टॅटू विद्रूपीकरणास हातभार लावतात.

‘बझ’मध्ये एरिक डिसूझा, रॉबिन बहल, जोसी पॅरिस रेंटली, सचिन आरोटे, दीप कुंडू आणि व्हायलेट डिसूझा यांची प्रमुख कामे आहेत. अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क अंतर्गत अन्य सहनिर्मात्यांनी याची निर्मिती केली आहे. एका वेगळ्या विषयाची रंजक माहिती अनुभवण्यासाठी ‘बझ’ लक्षात राहील. जाता जाता… या महिन्यातील आवर्जून पाहण्यासारख्या मल्याळी थ्रिलर सिनेमांमध्ये.. सूक्ष्मदर्शिनी (जिओ हॉटस्टार), पानी, रेखाचित्रम (सोनी), गोलम (ॲमेझॉन) ही नावे महत्त्वाची.

(संपर्कः sameerbapu@gmail.com)



Source link

बालमैफल: आधी कडू मग…

0
बालमैफल: आधी कडू मग…



राच्या कुंपणापलीकडून रंगा जोरजोरात हाका मारत होता, ‘‘काकू…काकू…’’ एरवी अशा हाका ऐकल्यावर वेदा धावत गेली असती आणि कमरेवर हात घेत तिने रंगाला जाब विचारला असता, ‘‘काय रे रंगादादा, कशाला हाका मारतोयस रे जोरजोरात आईला?’’ पण आज मात्र तिनं डोक्यावरून पांघरुण ओढून घेत आणखीनच गाढ झोपेचं सोंग केलं. रंगाच्या हाका जोरजोरात चालू होत्या पलीकडून. आई कोणत्यातरी कामात एवढी गढली होती आणि स्वयंपाकघरातून मिक्सरचा आवाज येत होता, त्यामुळे रंगाच्या हाका तिच्या कानावर पडल्याच नाहीत. शेवटी बाबाच बाथरूममधून तरातरा बाहेर आले आणि म्हणाले, ‘‘अगं स्नेहा, किती वेळ झाला रंगा तुला हाका मारतोय. लक्ष कुठे आहे तुझं?’’

‘‘हो का! ऐकूच आलं नाही मला. पाहते, पाहते.’’ असं म्हणत घाईघाईनं हात पुसत आई दरवाजा उघडायला गेली तोपर्यंत कुंपणावरून हाका मारून कंटाळलेला रंगा दारात येऊन पोहचला होता.

‘‘काकू, वेदा उठली नाही का अजून?’’ रंगानं आश्चर्यानं विचारलं.

‘‘नाही रे,’’ असं म्हणत आई गालातल्या गालात हसली. पांघरुणाआडून वेदाही हसली.

‘‘ये ना, रंगा, आत ये.’’ आई असं म्हणेपर्यंत रंगा आत येऊन सोफ्यावर बसलाच होता. आई त्याच्यासाठी चहा घेऊन आली. कपबशीच्या आवाजावरून वेदानं ओळखलं, पण तोच आवाज ऐकून रंगा म्हणाला, ‘‘काकू, चहा नको मला, कडुलिंबाची पानं न्यायला आलोय. आजी तिकडे जिरं, हिंग, मिरी, ओवा, मीठ, साखर वगैरे तयार ठेवून वाट बघतेय. तुमच्याकडे आहे ना कडुलिंबाचं झाड?’’

‘‘झाड आहे रे, पण तुला कडुलिंबाच्या चटणीत काय घालतात ते माहीत आहे?’’

‘‘अहो काकू असं काय, मी आता बारावीची परीक्षा झाल्यावर आजीला मदत करतो बरं स्वयंपाकघरात. त्यात आज पाडवा, मग आजी मला कशी सोडेल.’’ रंगादादाच्या घरीही कडुलिंबाची चटणी असते आज, इकडे वेदाचे कान टवकारले, पांघरुणातल्या पांघरुणात.

‘‘आज पाडव्याच्या दिवशी वेदा उशिरा उठेल ना, सकाळी सकाळी ती कडू चटणी खावी लागेल म्हणून, मीही असंच करायचो लहानपणी.’’ रंगादादा हे सांगत असतानाच बाबा पूजा करून आले.

‘‘अरे बाबा, सतरा तरी हाका माराव्या लागतील आणि उठल्यावर नाक दाबून ती चिमूटभर चटणी भरवावी लागेल तिला. त्यातही हजार नाटकं करील ती.’’ बाबांचं हे बोलणं ऐकून हसण्याचा खळखळाट झाला.

‘‘लहानपणी रंगाही पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी शेजारच्या मोरेकाकांकडे जायचा आणि लपून बसायचा. आठवतं का रे रंगा तुला?’’

‘‘हो, हो, चांगलंच आठवतं.’’ खो खो हसत रंगा म्हणाला, ‘‘आणि तिथेही मोरेकाकू मला कडुलिंबाची चटणी खायला द्यायच्या.’’ परत सगळे जोरजोरात हसायला लागले.

‘‘रंगादादा…’’ म्हणत वेदा पांघरुण जोरात बाजूला झटकत बाहेर आली. अजूनही आई, बाबा आणि रंगा जोरजोरात हसतच होते. हे पाहून वेदा दरवाजाआडच थबकली. ‘‘पण मी थोडा मोठा झाल्यावर हे सगळं थांबलं काका. मी आपणहून आजीला मदत करायला लागलो कडुलिंबाची चटणी करायला. मला कडुलिंबाच्या चटणीचं महत्त्व समजलं. आमच्या शाळेत आम्ही सातवीत असताना एक आयुर्वेदिक डॉक्टर आले होते त्यांनी आहारातलं कडू रसाचं स्थान आम्हाला सांगितलं. ते म्हणाले, शरीरातील पचन न झालेल्या घटकांचे पाचन करणारा, तोंडाला चव आणणारा असा का कडू रस असतो. हा कडू रस खाल्ला की जंत होत नाहीत आणि हो, हा अगदी कमी प्रमाणातच खायचा असतो. एवढं तरी त्यांनी सांगितलेलं आज मला आत्ता आठवतंय. ते ऐकल्यापासून मी पाडव्याच्या दिवशी सकाळी मोरेकाकांकडे जाऊन लपून बसणं बंद केलं आणि घरी थोडीशी कडुलिंबाची चटणी खायला लागलो, बरं का काका.’’

आता चटणी खाताना आई, बाबा आणि आजी आणखी काही कडू गोष्टींचं महत्त्व सांगतात. ते म्हणतात, ‘‘अयोग्य गोष्टींना वेळीच नाही म्हणणं, उगाचच कोणी आग्रह केला तर मनाविरुद्ध एखादी गोष्ट न करणं अशा अनेक गोष्टी असतात ज्या कोणालातरी कडू वाटत असतील. त्या आपण सुरुवातीलाच केल्या तर पुढे होणारा त्रास आपोआप वाचतो. म्हणून आजी म्हणत असते सुरुवातीलाच कडू खावं मग शेवट आपोआपच गोड होतो. बाबा तर म्हणतात, कष्टाचं तसंच आहे, कोणत्याही कष्टाचा नेहमी अनेकांना कंटाळा येतो, काम करण्याचा आळस येतो, पण जर जिद्दीनं आणि संयमानं हा कष्टाचा कडू घोट सातत्यानं घेतला तर यशाचं गोड फळ चाखता येतं आणि हे फळ खाताना तो कडू घोट लक्षातही येत नाही.’’

‘‘खरंय तुझ्या घरच्यांचं म्हणणं. आज दुपारी श्रीखंड खाल्ल्यावर हा कडुलिंब लक्षात तरी असतो का आपल्या?’’ कडुलिंबाची पानं रंगाच्या हातात देत बाबा म्हणाले. रंगाचं हे बोलणं संपतं न संपतं तोच वेदा बाहेर येत म्हणाली, ‘‘आई, मला कडुलिंबाची चटणी देतेस ना? रंगादादा मला भरव ना चटणी.’’

‘‘द्या, द्या काकू चटणी माझ्याकडे.’’ आईनं रंगाच्या हातात कडुलिंबाच्या चटणीची वाटी ठेवली. रंगानं भरवलेली चटणी वेदा आनंदानं खात असताना पाहून आई-बाबा दोघांनाही खात्री झाली की, आपलं लेकरू आता खरं समजूतदार झालं. कडू घास आनंदानं गिळताना न रडणारं. त्यामुळे वेदासाठी नवं वर्ष आनंदाच्या गोड क्षणांनी ओसंडून जाणारं असेल.

joshimeghana.23@gmail.com



Source link

प्रांजळ आत्मचरित्र

0
प्रांजळ आत्मचरित्र



शांता गोखले हे अनुवाद कार्यासाठी परिचित नाव! ‘दुर्गा खोटे’, ‘स्मृतिचित्र’, ‘माझा प्रवास’, ‘धग’, खानोलकर – एलकुंचवार यांच्या नाटकांचा अनुवाद, इंग्रजी- मराठी रंगभूमीशी निगडित अभ्यासक आणि रसिक प्रेक्षक, अध्यापन – क्षेत्र, पटकथाकार, कला समीक्षक, द्विभाषिक लेखिका, सदर – लेखन आणि कादंबरीकार. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, साहित्य अकादमी पारितोषिक प्राप्त, अनेक संस्थांकडून सन्मानित, जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी आणि बरेच काही…

शांता गोखले यांच्या ‘ One foot on the Ground A life Told Trough the Body’ या इंग्रजी आत्मचरित्राचा अनुवाद ‘एक पाय जमिनीवर’ हा करुणा गोखले यांनी केला आहे.दोन्ही पाय जमिनीवर टेकलेले असलेच पाहिजेत म्हणून ‘एक पाय जमिनीवर’ हे शीर्षक!

‘‘माझ्या शरीरानं मला जे काही दिलं होतं आणि जे दिलं नव्हतं त्या सगळ्यासाठी माझं माझ्या शरीरावर बेहद्द प्रेम होतं.’’ असं त्या म्हणतात. शरीराकडे बघण्याचा रुपकात्मक दृष्टिकोन टाकून त्याकडे प्रगल्भपणे पाहावे, शरीराकडे आनुषंगिक बाब म्हणून न पाहता एक मध्यवर्ती घटित म्हणून बघावं ही कल्पना त्यांना आवडली. स्वत:चं शरीर असं लख्ख प्रकाशात तळहातावरच्या आवळ्यासारखं निरखून पाहावं, म्हणजे त्यात पारदर्शकता येईल असं त्यांना वाटलं आणि त्यामुळेच या आत्म-चरित्राला अनोखेपण प्राप्त झालं.

यातील काही प्रकरणांची नावं दात, नाक, केस, डोळे, मेंदू अशी अवयवांवरून आहेत. एकेका टप्प्यावर या अवयवांनी कशी साथ दिली अथवा सोडली, कसे उपचार करावे लागले, त्यामुळे भावविश्वाची जडण-घडण कशी झाली याचा विचार यात मांडला आहे. कधी डॉक्टरांची बेफिकिरी कधी स्वत:चं दुर्लक्ष, यामुळे अनेक व्याधींना सामोरं जावं लागलं. मग चाचण्या, तपासण्या, विविध यंत्र- ती हाताळणारे अकुशल हात, त्या मागोमाग येणाऱ्या वेदना अशा बऱ्याच गोष्टी आल्या तरी ती आजाऱ्याची रडकथा होत नाही.

आपला सावळा रंग, नाक, दात यातल्या उणिवा असोत की रूढ अर्थाचं सौंदर्य नसो, त्यांना त्याची जाणीव आहे आणि त्या त्याची मिश्कीलपणे खिल्ली उडवतात. या गोष्टी खरोखरीच बीन महत्त्वाच्या असून, माणूस म्हणून व्यक्ती कशी आहे याचे महत्त्व त्या अधोरेखित करतात. शरीराबद्दल तटस्थपणे बोलत असतानाच त्या त्याचा आदरही करतात. शरीरभान हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. इतका की त्यांनी सुरुवातच अशी केली आहे की, ‘‘शरीराच्या सुरुवातीपासूनच सुरुवात करते : माझा जन्म!’’

या आत्मचरित्रात आई-वडील पार्श्वभूमीला सतत सावलीसारखे दिसत राहतात. वडिलांनी आईला लग्नानंतर घेऊ दिलेलं शिक्षण, आईच्या भावंडांना शिक्षणासाठी घरी आणणं, शांता आणि निर्मल या आपल्या मुलींना मैदानी खेळ खेळायला, नृत्य करायला प्रोत्साहित करणं, मुलींच्या शिक्षणावर बारीक लक्ष ठेवणं, त्यांची बौद्धिक क्षमता जाणून एका वर्षात दोन इयत्ता करणं, त्यांना शिक्षणासाठी परदेशात पाठवणं, त्यासाठी आवश्यक ती आर्थिक आणि इतरही तरतूद करणं, युनिव्हर्सिटीची निवड करताना निकष लावण्याचा त्यांचा विशिष्ट दृष्टिकोन असणं, (उच्चार सुधारण्यासाठी संस्कृत श्लोक/ नित्यनियमाने म्हणायला लावणं,) वाढत्या वयात शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणं, मुलींना भरपूर आणि सकस आहार मिळावा याचा आग्रह असणं… ‘‘मी आणि तुझ्या वडिलांनी तुला जास्तीत जास्त चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तो तू आयुष्यात त्याचा उपयोग करावा म्हणून,’’ असं जेव्हा आई म्हणते; तेव्हा त्यांनी जागरूकतेने मुलींची जडणघडण केली आहे हे जाणवतं. या सर्वांतून त्यांचे आपसातले घट्ट भावबंध छान उभे राहतात.

लंडनमधली समृद्ध वर्षं, तिथली शिक्षण पद्धती, शिक्षक, तिथले बदलते ऋतू, नाटकं, सांगीतिका, आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहणं, मैत्रिणींबरोबर त्यांच्या घरी सण साजरे करणं, पुस्तकांची दुकानं पालथी घालणं, कँपिंग करणं यातून त्यांनी तिथली संस्कृती जाणून घेतली. डॉ. मकीनेस यांच्याबरोबरच्या चहापानामुळे त्यांच्यासाठी विद्यापीठाच्या बाहेरच्या ज्ञानाचं आणि आनंदाचं नवीन दालनच उघडलं गेलं. ‘हॉस्केल’ यांच्या घरच्या मेजवानीमुळे खानदानी आणि तरल संस्कृतीचं दर्शन घडतं. अभिजन आणि सामान्यांच्या कृती-उक्तीतले फरक आणि वाइनचा आस्वाद घेण्याची धुंद करणारी रीतही कळली.

पुढे नौदलातल्या विजय शहाणेंवर प्रेम, त्या प्रेमातल्या गमती, लग्न, रेणुका-गिरीश यांचे जन्म आणि काही काळ फक्त संसाराच्या पूर्ण जबाबदाऱ्या. विजयचा एकलकोंडा स्वभाव, आर्थिक ढिसाळपणा, नंतर होणारा घटस्फोट, पुढे अरुण खोपकरांशी झालेली ओळख, विवाह आणि सोडचिठ्ठी अशा काही क्लेशदायक घटना त्यांच्या आयुष्यात घडतात, पण त्याही संयतपणे व्यक्त होतात. मुख्य म्हणजे त्या दोघांशी त्यांनी चांगले संबंध ठेवले आहेत.

आपली फजिती, प्रेमातला खुळेपणा, केलेल्या चुका असोत की सावळ्या रंगामुळे आलेले अनुभव असोत… त्यांचा नर्म विनोदाचा झरा कधी आटत नाही. व्ही. एफ. प्रकरणात मनाच्या आतल्या कप्प्यात आलेले विचार सांगताना, पुरुष देहाच्या कुतूहलाबद्दल, लहानपणाच्या लैंगिक अनुभवाबद्दल, वयात येतानाचे अनुभव सांगताना, लग्नातल्या अपयशाबद्दल व्यक्त होताना मोकळेपणा असला तरी कुठेही सवंगपणा येत नाही.

एकूणच या आत्मकहाणीतून पैशापेक्षा आव्हानात्मक कामाला महत्त्व असणं, वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करणं, विवेकवादी, ईश्वर न मानणारी, काटेकोर आणि तत्त्वनिष्ठ, भगिनीभावाबद्दल आस्था, स्त्री- वादाची उत्तम जाण असलेली, उत्तम विनोद बुद्धीला सर्वाधिक महत्त्व देणारी मिश्कील स्त्री असं त्यांचं व्यक्तिमत्त्व उभं राहतं.

करुणा गोखले यांचे मनोगतही वाचनीय आहे. अनुवादिकेच्या अनुभवातूनही शांताबाईंचे व्यक्तिमत्त्व उभे राहते. कार्यपद्धतीतला काटेकोरपणा, शंकेचं निरसन करणं, ‘तुझा निर्णय अंतिम’ असं सांगून विश्वास दाखवणं, अनुवाद प्रक्रियेच्या काही पैलूंचं महत्त्व सांगणं आणि वागण्यातला समतोलपणा करुणा गोखले यांना जाणवला.

मिश्कीलपणा, नर्मविनोद, प्रांजळपणा आणि बहुश्रुत, व्यासंगीपणामुळे सहजगत्या येणाऱ्या अनेकानेक संदर्भांनी या लेखनाला श्रीमंती लाभली आहे.

‘एक पाय जमिनीवर : शरीराच्या भिंगातून उलगडलेला आयुष्याचा पट’ – शांता गोखले, अनुवाद : करुणा गोखले,

पपायरस प्रकाशन, पाने- २८०, किंमत- ४५० रुपये.

meenagurjar1945 @gmail.com



Source link

अजित पवारांचा ठेकेदार व पुढाऱ्यांना स्पष्ट इशारा – “कामाचा दर्जा ठेवा नाहीतर मी अडचणीत येईल!”

0
अजित पवारांचा ठेकेदार व पुढाऱ्यांना स्पष्ट इशारा – “कामाचा दर्जा ठेवा नाहीतर मी अडचणीत येईल!”

बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (२९ मार्च) बारामती तालुक्यातील माळेगाव येथे शेतकरी मेळाव्यात ठेकेदार व पुढाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. “मी शंभरदा सांगितलं, एकतर पुढारपण करा किंवा कॉन्ट्रॅक्टर बना. तुम्ही पुढारी बनणार, माझ्याकडून कामे घेणार आणि कामाचा दर्जा राहिला नाही, तर मी पुन्हा अडचणीत येणार. लोकं म्हणतील, अजित पवारांना हे दिसत नाही का?” अशा शब्दांत त्यांनी ठेकेदार व स्थानिक नेत्यांना सजग केलं.

बारामतीसाठी १ हजार कोटींची कामे मंजूर

अजित पवार यांनी आपल्या भाषणात बारामतीसाठी मंजूर केलेल्या विविध विकासकामांचा उल्लेख केला. “राज्यात असं कुठे घडलं आहे का? शंभर दिवसांत १ हजार कोटी रुपये बारामतीसाठी मंजूर केले. जानाई शिरसाई बंद पाईपलाईन योजनेसाठी ४६० कोटी रुपये, पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी ५६० कोटी रुपये. याआधी असं कधी झालं होतं का?” असा सवाल करत त्यांनी आपली कार्यक्षमता स्पष्ट केली.

“फोटो काढून प्रश्न सुटत नाहीत, प्रशासनावर दरारा असावा लागतो”

अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत, “मी बाकीच्यांसारखं कुठे भेटायला गेलो की फोटो काढायचा, कुणाला नमस्कार केला की त्याचा फोटो काढायचा आणि तो सगळीकडे दाखवायचा – असं करून प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी कष्ट आणि प्रशासनावर दरारा असावा लागतो,” असे ठणकावले.

“संस्थेवर कोणताही डाग लागू देणार नाही”

संस्था टिकवण्याच्या वचनावर बोलताना पवार म्हणाले, “तुम्ही-आम्ही आज आहोत, उद्या नसू. पण संस्था कायम राहणार आहेत. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत संस्थेला टीचभरही चुकीचा डाग लागू देणार नाही. आणि जर मला यापुढे काही जमणार नसेल, तर मी स्पष्ट सांगेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

गुढीपाडव्याला आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा 76 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार

0
गुढीपाडव्याला आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा 76 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार

फलटण : महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा 76 वा वाढदिवस गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर, दिनांक 30 मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण शहरासह ग्रामीण भागात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आदींचा समावेश आहे.

माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी ही माहिती देताना सांगितले की, धोम-बलकवडी, निरा देवघर, एम. आय. डी. सी. सारखे महत्त्वाचे प्रकल्प तालुक्याच्या विकासासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राबवले गेले आहेत. त्यामुळे या प्रकल्पांचा लाभ तालुक्यातील जनतेला मिळत असून, त्यांचे कार्य जनतेच्या प्रगतीसाठी नेहमीच पुढे राहिले आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवून समाजोपयोगी कार्य करण्यात येणार आहे.

यावेळी दीपकराव चव्हाण यांनी सांगितले की, “महाराज साहेबांचा वाढदिवस हा केवळ एक व्यक्तिगत सोहळा नसून, तो संपूर्ण तालुक्यासाठी एक आनंदाचा उत्सव असतो. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे लक्ष्मी-विलास पॅलेस, लक्ष्मीनगर, फलटण येथे दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

‘या’ मुलाने केली होती 3 आठवड्यापूर्वीच म्यानमारमधील भूकंपाची भविष्यवाणी; 2025-2026 मध्ये जगात पुन्हा एकदा मोठं संकट कोसळणार

0
‘या’ मुलाने केली होती 3 आठवड्यापूर्वीच म्यानमारमधील भूकंपाची भविष्यवाणी; 2025-2026 मध्ये जगात पुन्हा एकदा मोठं संकट कोसळणार


म्यानमार आणि त्याच्या आसपासच्या देशांसाठी शुक्रवारचा दिवस खूप भयानक होता. कारण इथे आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे जगाला हादरुन सोडलं. भूकंपामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, शेकडो घरं उद्ध्वस्त झाली. तुम्हाला माहिती आहे का की या विनाशकारी भूकंपाची भविष्यवाणी एका भारतीय मुलाने तीन आठवड्यापूर्वीच केली होती. हा मुलगा म्हणजे भारतीय ज्योतिषी अभिज्ञ आनंद जो कोविड-19 साथीच्या आजाराचे अचूक भाकित करण्यासाठी ओळखला जातो. 

कधी केली भविष्यवाणी?

अभिज्ञ याने तीन आठवड्यांपूर्वीच भूकंपाचा इशारा दिला होता. 1 मार्च रोजी अभिज्ञाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या या व्हिडrओमध्ये असा दावा करण्यात आला होता की, पुढील काही आठवड्यात किंवा या वर्षाच्या मध्यात एक मोठा भूकंप होणार आहे. अभिज्ञ आनंदचा जन्म ऑक्टोबर 2006 मध्ये झाला. तो कर्नाटकातील एका ब्राह्मण कुटुंबातला आहे. आनंदने अगदी लहान वयातच ज्योतिष, वास्तु, आयुर्वेद आणि धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करायला सुरुवात केली. वयाच्या 14 व्या वर्षी ते जगातील सर्वात तरुण प्रमाणित ज्योतिषी बनले. त्यांना संस्कृत, वेद, पुराण आणि ज्योतिषशास्त्राचे उत्तम ज्ञान आहे.  

यापूर्वी केली होती भविष्यवाणी!

अभिज्ञ आनंदने 2019 मध्ये त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ अपलोड केला होता, ज्यामध्ये त्यांनी कोरोना साथीच्या (COVID-19) आगमनाची भविष्यवाणी केली होती. त्यांनी सांगितलं होते की डिसेंबर 2019 ते एप्रिल 2020 दरम्यान जगभरात एक साथीचा रोग पसरेल. त्यांनी या साथीचे कारण ग्रहांची अशुभ स्थिती, विशेषतः राहू आणि केतूचा प्रभाव असल्याचे सांगितलं होतं. या साथीचा परिणाम आरोग्य, अर्थव्यवस्था आणि जागतिक स्थिरतेवर होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांच्या भाकितानुसार, अनेक लोकांचे प्राण जातील आणि अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होईल. त्याची भविष्यवाणी बऱ्याच प्रमाणात खरी ठरली, ज्यामुळे तो जगभरात चर्चेचा विषय बनला. 

नवीन संकटाबद्दल इशारा

अभिज्ञ आनंद यांनी रशिया-युक्रेन युद्धाचीही भविष्यवाणी केली होती. त्यांनी सांगितले होते की फेब्रुवारी 2022 च्या आसपास एक मोठा लष्करी संघर्ष होईल, जे खरे ठरले. आनंद यांनी 2023 मध्ये जागतिक महागाई आणि आर्थिक संकट वाढेल असे भाकीत केले होते. त्यांनी म्हटलं होतं की बाजारात घसरण आणि मंदीचा काळ असेल, जो अनेक देशांमध्ये दिसून आला. त्यांनी भूकंप, पूर आणि वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींबद्दलही इशारा दिला होता, ज्यापैकी बरेच खरे ठरले. अभिज्ञ आनंद यांनी भाकीत केले आहे की 2025-2026 मध्ये जग पुन्हा एकदा मोठ्या संकटातून जाणार आहे. शनि आणि राहू-केतूच्या अशुभ संयोगामुळे हे संकट आणखी गहिरे होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.

अभिज्ञ आनंद यांचे “विवेक” हे यूट्यूब चॅनल आहे ज्यावर ते ज्योतिष, वास्तु, आरोग्य आणि धार्मिक ज्ञानाशी संबंधित गोष्टी शेअर करतात. त्याच्या चॅनेलवर 40 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्याचे व्हिडीओ लाखो लोक पाहतात आणि त्याच्या भाकिते गांभीर्याने घेतली जातात. 





Source link

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्रीने ऐश्वर्या नारकर यांचे केले कौतुक; म्हणाली, “तिच्यात खूप गोडवा…”

0
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्रीने ऐश्वर्या नारकर यांचे केले कौतुक; म्हणाली, “तिच्यात खूप गोडवा…”



Sonalika Joshi praised Aishwarya Narkar remember memories of Mahashweta serial also talks about Sharad Ponkshe: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्रीने ऐश्वर्या नारकर यांचे केले कौतुक; म्हणाली, “तिच्यात खूप गोडवा…”





Source link