Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 462

IPL 2025 RCB vs GT: मोहम्मद सिराजची भावुक घरवापसी; बंगळुरूविरुद्ध खेळताना निर्णायक कामगिरी

0
IPL 2025 RCB vs GT: मोहम्मद सिराजची भावुक घरवापसी; बंगळुरूविरुद्ध खेळताना निर्णायक कामगिरी



‘खरं सांगायचं तर माझ्या कारकि‍र्दीत विराट कोहलीची भूमिका अतिशय मोलाची आहे. मी कठीण कालखंडातून जात असताना २०१८ आणि २०१९ मध्ये त्याने मला साथ दिला. नेहमी पाठिंबा दिला. विराटमुळेच बंगळुरूने मला रिटेन केलं. त्यानंतरच माझी कामगिरी बहरली. कारकि‍र्दीचा आलेख चढताच राहिला. आरसीबीची साथ सोडणं हा माझ्यासाठी अतिशय भावुक करणारा क्षण होता. मी या संघासाठी ७ वर्ष खेळलो. आरसीबीसाठी खेळलेल्या प्रत्येक सामन्याला चाहत्यांनी भरभरून पाठिंबा दिला. त्यांचं प्रचंड प्रेम लाभलं. आरसीबीविरुद्ध खेळणं हा माझ्यासाठी सर्वस्वी नवा अनुभव असेल’, असं सिराजने गुजरात टायटन्सच्या एका व्हीडिओदरम्यान सांगितलं होतं. सात वर्ष आरसीबीचं प्रमुख अस्त्र असलेल्या सिराजनेच बुधवारी गुजरातच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

आरसीबीसाठी सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. आरसीबीसाठी खेळतानाच त्याने सलग दोन निर्धाव षटकं टाकण्याचा पराक्रम केला होता. आरसीबीसाठी त्याने ८७ सामन्यात ८३ विकेट्स घेतल्या आहेत. लिलावात गुजरात टायटन्स संघाने १२.२५ कोटी रुपये खर्चून सिराजला ताफ्यात दाखल केलं. गुजरातचे प्रशिक्षक आशिष नेहरा यांचं बारीक लक्ष गोलंदाजी विभागाकडे असतं. सिराजचा वेग, अचूकता आणि गोलंदाजीतलं वैविध्य कामी येईल हे हेरून त्यांनी सिराजला संघात घेतलं.

बुधवारी झालेल्या लढतीत सिराजने ३ विकेट्स पटकावत बंगळुरूला दणका दिला. सिराजलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर बोलताना तो म्हणाला, ‘मी आरसीबीसाठी सात वर्ष खेळलो. सामना खेळायला आलो तेव्हा मनात थोडं दडपण होतं. पण जसं सामना सुरू झाला गुजरातला जिंकून देणं हे माझं उद्दिष्ट होतं. मी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा चाहता आहे त्यामुळे विकेट मिळाल्यानंतर मी त्याच्यासारखं सेलिब्रेशन करतो. मी सातत्याने खेळत होतो त्यामुळे माझ्या हातून काय चुका होत आहेत हे लक्षात आलं नाही. विश्रांती काळात मी गोलंदाजीवर काम केलं. फिटनेस सुधारला. गुजरातच्या कॅम्पमध्ये दाखल झालो तेव्हा प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्याशी बोलणं झालं. खेळाचा आनंद लूट असं त्यांनी मला सांगितलं. मी तेच केलं आणि यश मिळालं. कागिसो रबाडा, इशांत शर्मा आणि बाकी सगळ्या गोलंदाजांशी बोलणं होतं. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. गोलंदाज म्हणून विकेट पटकावण्याचा विश्वास असणं महत्त्वाचं आहे. फलंदाज चौकार-षटकार लगावणार पण त्याने खचून जायची गरज नाही. मी संघाच्या विजयात योगदान देऊ शकतो हे माझं पक्कं असतं’.

बुधवारी सिराजने बंगळुरूच्या धोकादायक फिल सॉल्टला माघारी धाडलं. सॉल्टला एकदा जीवदान मिळालं होतं पण त्याला त्याचा फायदा उठवता आला नाही. देवदत्त पड्डीकलला त्रिफळाचीत केलं. अर्धशतक करून स्थिरावलेल्या लायम लिव्हिंगस्टोनला सिराजनेच बाद केलं. ४ षटकात अवघ्या १९ धावांच्या मोबदल्यात सिराजने ३ विकेट्स पटकावल्या आणि गुजरातच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.



Source link

साताऱ्यातील तापोळा, बामणोली भागात लाखोंनी वटवाघळं; ग्रामस्थ हैराण तर प्रशासनाचं दुर्लक्ष 

0


सातारा : पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तापोळा आणि बामणोली, पावशेवाडी भागामधील लोकांना आता वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. कोयना जलाशयाच्या बॅकवॉटर परिसरालगत असणाऱ्या झाडांसह संपूर्ण गावात वटवाघुळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच यामुळे   दुर्गंधी पसरत आहे आणि गाड्यांचे मोठे नुकसान होत आहे. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भागातील ग्रामस्थांना वटवाघळांचा नाहक त्रास होत असून प्रशासन याकडे  दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे वटवाघुळांचा बंदोबस्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडे मागणी करणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.

तापोळा आरोग्य विभागाचे केंद्र देखील या भागात आहे. त्यामुळे प्रत्येक झाडांवर वटवाघळांची संख्या वाढली असल्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून या वटवाघळांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे. 

या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात. गेल्या दोन चार वर्षामध्ये तापोळा परिसरातील वटवाघळांची संख्या ही लाखोंच्या घरात गेल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. ग्रामस्थांनी काही तात्पुरते प्रयत्न केले पण त्यामध्ये यश आलं नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदार आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली. पण प्रशासनाने त्याला कोणतीही दाद दिली नाही. सगळं प्रशासन या ठिकाणी असतानाही कोणीही दखल घेत नाही अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. 

पर्यटनावर मोठा परिणाम

वटवाघळांमुळे प्राण्यांच्या अंगावर गोचडी होते आणि माणसालाही त्याचा त्रास होतो. गावाच्या परिसरात आजूबाजूला वटवाघळांची विष्ठा पडलेली असते. त्याचा दुर्गंध मोठ्या प्रमाणावर येतो. त्यमुळे पर्यटक या ठिकाणी जराही थांबत नाहीत. वटवाघळामुळे रोगराई पसरण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे याचा ताबोडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर प्रशासनाला आदेश दिले तर त्यावर योग्य ती उपाययोजना होऊ शकते अशी ग्रामस्थांना आशा आहे. 

ही बातमी वाचा:

                                                                                 

अधिक पाहा..



Source link

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने मोडले कमाईचे सर्व विक्रम, वार्षिक उत्पन्न पोहोचले १३३ कोटींवर

0
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने मोडले कमाईचे सर्व विक्रम, वार्षिक उत्पन्न पोहोचले १३३ कोटींवर


Siddhivinayak Temple : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर पुन्हा एकदा आपल्या ऐतिहासिक कमाईमुळे चर्चेत आले आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मंदिराचे एकूण उत्पन्न १३३ कोटींवर पोहोचले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या (२०२३-२४) तुलनेत १६ टक्क्यांनी जास्त आहे.



Source link

आमदार सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभेच्छा संदेश

0
आमदार सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभेच्छा संदेश

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन सुधाकर पाटील यांना “शांत, संयमी पण तडफदार नेतृत्व” म्हणून ओळखले जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विशेष शुभेच्छा दिल्या.

मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमदार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. केक कापून वाढदिवस साजरा करताना ना. अजितदादा पवार यांनी त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत, फलटण – कोरेगाव मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री इंद्रीजीत नाईक, आमदार सना मलिक, माजी खासदार आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार पाटील यांचे कार्यकर्ते म्हणून घडणे लोकनेते स्व. हिंदुरावजी नाईक निंबाळकर  यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असून, त्यांच्या नेतृत्वामुळे मतदारसंघाच्या विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलली जाणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Mumbai serial blasts case 14 properties belonging to Memon family are hand over to central government after 32 years

0
Mumbai serial blasts case 14 properties belonging to Memon family are hand over to central government after 32 years



Mumbai serial blasts case 14 properties belonging to Memon family are hand over to central government after 32 years | मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट खटला : ३२ वर्षांनंतर मेमन कुटुंबाच्या मालकीच्या १४ मालमत्ता केंद्र सरकारच्या ताब्यात





Source link

Akhilesh Yadav Slams BJP, Claims Waqf Bill Diverts Attention from Maha Kumbh Mela Deaths.

0
Akhilesh Yadav Slams BJP, Claims Waqf Bill Diverts Attention from Maha Kumbh Mela Deaths.



Akhilesh Yadav Slams BJP, Claims Waqf Bill Diverts Attention from Maha Kumbh Mela Deaths. | “महाकुंभमेळ्यातील मृतांची संख्या लपविण्यासाठी वक्फ विधेयक आणले”, अखिलेश यादव यांची भाजपावर टीका





Source link

रामराजे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; कार्यकर्त्यांचा जोश अबाधित!

0
रामराजे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; कार्यकर्त्यांचा जोश अबाधित!

फलटण : गुढीपाडव्याच्या मंगलमय पर्वावर फलटण संस्थांचे अधिपती आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी विलास निवासस्थानी उत्साहाचा माहोल पाहायला मिळाला. सकाळपासूनच कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.

सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या भगिनी माजी नगरसेविका सुभद्राताई नाईक निंबाळकर यांनी औक्षण करून वाढदिवसाचा शुभारंभ केला. यावेळी पुरोहित वर्गाने मंत्रोच्चार करून मंगलमय वातावरण निर्माण केले. या सोहळ्यासाठी फलटण संस्थांचे युवराज, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर लक्ष्मी विलास पॅलेस येथे उभारलेल्या भव्य शामियानात तालुक्यातील हजारो नागरिक आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली. संध्याकाळी उत्तर कोरेगाव येथेही त्यांनी नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

रात्री आठ वाजता फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित ‘भीम फेस्टीव्हल 2025’ च्या ‘भीम गीतांचा जल्लोष’ या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी भीमसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या व भीम गीतांचा आनंद घेतला.

श्रीमंत रामराजे यांना राजकीय, सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष तसेच दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर त्यांच्या गटातील काही नेत्यांनी विरोधी गटात प्रवेश केला असला, तरी वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा जोश आणि अलोट गर्दी पाहता रामराजे यांची लोकप्रियता अजूनही अबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

नवीन आर्थिक वर्षात बदलले नियम; गॅस सिलेंडरचे दर स्वस्त, तर समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला

0
नवीन आर्थिक वर्षात बदलले नियम; गॅस सिलेंडरचे दर स्वस्त, तर समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला


LPG Cylinder Price: आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरू होतंय. या नव्या आर्थिक वर्षासोबत काही नवे बदलही होणार आहेत. हे बदल आपले बँक खातं, टॅक्स, पॅन आधार लिंकिंग, केवायसी यांच्याशी निगडीत आहेत. त्याचबरोबर आज तेल कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे. 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 41 रुपयांनी स्वस्त झाला आहे. 

1 एप्रिलपासून सिलेंडरच्या दरात घट झाल्याने आता दिल्लीत 19 किलो सिलेंडर 1762 रुपयांना मिळणार आहे. तर, कोलकत्तामध्ये 1868.50 रुपये आणि मुंबईत 1713.50 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी दिल्लीत 19 किलो सिलेंडरचे दर 1803 रुपये होते. 

या आधी मार्च महिन्यात तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 6 रुपयांची वाढ झाली होती. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत या महिन्यात कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती कमी झाल्याचे देशातील चार महानगरात पाहायला मिळतेय. दिल्लीत सिलेंडरच्या किंमत 1803 रुपयांनी कमी होऊन 1762 रुपये झाले आहेत. मुंबईत किंमत 1755.50 रुपयांवरून 1713.50 रुपयांवर घसरली. त्याचप्रमाणे, चेन्नईमध्ये आजपासून 1965 रुपयांऐवजी 1921 रुपये द्यावे लागतील. कोलकातामध्ये आता सिलिंडर 1913 रुपयांऐवजी 1868.50 रुपयांना उपलब्ध होईल.

तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. हे सिलिंडर दिल्लीत पूर्वीप्रमाणेच 803 रुपयांच्या दराने उपलब्ध राहील. याशिवाय, 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये 829 रुपये, मुंबईत 802.25 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे. तेल कंपन्यांनी विमान इंधनाच्या किमतीतही बदल केले आहेत. दिल्लीत त्याचा नवीन दर प्रति किलो लिटर $794 असेल.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सर्वात मोठी वाढ एप्रिल 2022 मध्ये झाली होती. 1 एप्रिल 2022 रोजी सिलिंडरची किंमत 249.50 रुपयांवरून 268.50 रुपयांवर पोहोचली होती. यासह, त्यावेळची किंमत प्रति सिलिंडर 2406 रुपयांवर पोहोचली. 1 एप्रिल 2021 रोजीही सिलिंडरची किंमत 27 रुपयांवरून 41 रुपयांपर्यंत वाढली होती. मार्चच्या तुलनेत ही किंमत 1771.50 रुपयांवर पोहोचली.

आयकरात मोठी सवलत

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2025-26 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मध्यमवर्गीयांसाठी आयकरात मोठी सवलत तसेच अनेक बदलांची घोषणा केली होती…ती आजपासून  लागू होणाराय

समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला

समृद्धी महामार्गावरील प्रवास आजापासून महागला आहे. MSRDCने टोलच्या दरात 19 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. आता छोट्या चारचाकी वाहनानांना नागपूर-इगतपुरी प्रवासासाठी 1080 ऐवजी 1290 रुपये मोजावे लागतील. दुसरीकडे राज्यातील सर्वच महामार्गावर टोलसाठी फास्टॅग प्रणाली सक्तीची करण्यात आलीय..





Source link

Elon Musk: “ते बाळ माझेच आहे की…”, तरुणीच्या आरोपांवर एलॉन मस्क यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “मी २० कोटी रुपये दिले”

0
Elon Musk: “ते बाळ माझेच आहे की…”, तरुणीच्या आरोपांवर एलॉन मस्क यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “मी २० कोटी रुपये दिले”



Elon Musk Claims He Paid Ashley St. Clair Millions Amid Paternity Dispute |”ते बाळ माझेच आहे की…”, तरुणीच्या आरोपांवर एलॉन मस्क यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “मी २० कोटी रुपये दिले”





Source link

तुमच्या कामाची बातमी! एप्रिल महिन्यात 16 दिवस बँकांना सुट्टी, संपूर्ण यादी पाहून घ्या

0
तुमच्या कामाची बातमी! एप्रिल महिन्यात 16 दिवस बँकांना सुट्टी, संपूर्ण यादी पाहून घ्या


List of Holidays in April 2025:  एप्रिल 2025 मध्ये तब्बल 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू असणार आहेत. तर राज्यानुसार सुट्ट्या कमी-जास्तदेखील होऊ शकतात. 

एप्रिल महिन्यात येणारे सण-उत्सव, महापुरुषांची जयंती या निमित्त या सुट्टया असणार आहेत. त्याचबरोबर शनिवार-रविवारदेखील सुट्टी असतील. एप्रिल महिन्यात 16 दिवस सुट्ट्या आल्याने नागरिकांना बँकेच्या कामांचे नीट नियोजन करावे लागणार आहे. सुट्ट्यांच्या तारखांची नोंद करुन त्यानुसार तुम्हाला कामांचे नियोजन करावे लागणार आहे. जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर त्याचे आधीच नियोजन करा. कारण शनिवार आणि रविवारला जोडून सुट्टी आल्याने सलग तीन दिवस बँका बंद राहू शकतात. सु्ट्ट्याची यादी एकदा पाहाच. 

कधी बँका बंद राहणार 

1 एप्रिल- वार्षिक लेखाबंदी- संपूर्ण देशभरात सुट्टी

5 एप्रिल- बाबू जगजीवनराम जयंती-   हैदराबाद
 
6 एप्रिल-            रविवार – देशभरात 

10 एप्रिल            महावीर जयंती   –   देशभरात
 
12  एप्रिल          दुसरा शनिवार –   देशभरात

13 एप्रिल          रविवार    –   देशभरात

14 एप्रिल          डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती   – देशभर
         
16 एप्रिल            बोहाग बिहू           गुवाहाटी

18 एप्रिल           गुड फ्रायडे         चंदीगड, श्रीनगर वगळून संपूर्ण देशभरात

20 एप्रिल             रविवार       देशभर

21 एप्रिल             गरिया पूजा           आगरतळा

26 एप्रिल            चौथा शनिवार           देशभर

27 एप्रिल               रविवार                 देशभर

29 एप्रिल            परशुराम जयंती             शिमला

30 एप्रिल           बसव जयंती, अक्षय्य तृतीया    बंगळुरू 





Source link