Monday, July 27, 2026
Home Blog Page 446

जागतिक मंदीचे मळभ! व्यापारयुद्धाच्या भीतीने भांडवली बाजारांना अवकळा, खनिज तेलाच्या किमती चार वर्षांच्या निचांकावर

0
जागतिक मंदीचे मळभ! व्यापारयुद्धाच्या भीतीने भांडवली बाजारांना अवकळा, खनिज तेलाच्या किमती चार वर्षांच्या निचांकावर



US Donald Trump tax Indian stock market Sensex falls जागतिक मंदीचे मळभ! व्यापारयुद्धाच्या भीतीने भांडवली बाजारांना अवकळा, खनिज तेलाच्या किमती चार वर्षांच्या निचांकावर





Source link

बाजाराला औषधोपचाराची गरज – ट्रम्प

0
बाजाराला औषधोपचाराची गरज – ट्रम्प



पीटीआय, वेस्ट पाम बीच

जगभरातील देशांवर लावण्यात आलेल्या आयातशुल्काच्या निर्णयापासून माघार घेणार नाही, असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत इतर देश अमेरिकेबरोबरचा व्यापार अधिक संतुलित करण्यास सहमती देत नाहीत, तोपर्यंत ते आयातीवर नवीन शुल्क लावण्याच्या निर्णयापासून मागे हटणार नाहीत, असे ट्रम्प म्हणाले. या निर्णयामुळे जागतिक वित्तीय बाजार हादरले आहेत आणि मंदीची भीती निर्माण झाली.

‘एअर फोर्स वन’मध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, जागतिक बाजारात घसरण व्हावी, अशी माझी इच्छा नाही. मात्र मोठ्या प्रमाणात शेअर विक्रीचीही चिंता नाही. कधीकधी तुम्हाला काहीतरी दुरुस्त करण्यासाठी औषध घ्यावे लागते.

जागतिक बाजारांत सोमवारी तीव्र घसरण सुरू झाल्यानंतर ५० हून अधिक देशांनी आयातशुल्क धोरण उठवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. त्यानंतर ट्रम्प यांनी याबाबत टिप्पणी केली. ‘‘मी जगभरातील अनेक नेत्यांशी बोललो. ते करार करण्यासाठी उत्सुक आहेत. अमेरिका यापुढे व्यापार तूट स्वीकारणार नाही. एक तर आम्ही व्यापारी संबंध तोडू किंवा नफा कमवू,’’ असे ट्रम्प म्हणाले.



Source link

डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याचे काम रखडले

0
डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याचे काम रखडले



डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील कल्याण बाजुकडील सरकत्या जिन्याचे काम मागील तीन महिन्यांपासून रखडले आहे. या फलाटावर कल्याण बाजुकडे उतरणाऱ्या प्रवाशांना फलाटाच्या मध्यभागी येऊन तेथून जिन्याने जावे लागते. सरकत्या जिन्याच्या रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळेत त्या भागातून फिरणे अवघड होते.

तीन महिन्यापूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर कल्याण बाजुकडे घाईघाईने सरकता जिना उभारणीसाठी या भागातील पादचारी जिना काढून टाकण्यात आला. याठिकाणी खड्ड्याची खोदाई करण्यात येऊन चारही बाजुने पत्रे लावून फलाटावरील सरकता जिना उभारणीचा भाग बंदिस्त करण्यात आला. या पत्र्यांमुळे पादचाऱ्यांना या अरुंद जागेतून जाताना कसरत करावी लागते. सकाळच्या वेळेत मुंबईला जाणारी लोकल पकडताना आणि मुंबईकडून कर्जत, कसाराकडे जाणाऱ्या लोकल डोंंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर आल्या की सरकत्या जिन्याच्या कामाच्या ठिकाणी अरुंद जागेत गर्दी उसळते.

हे काम लवकर पूर्ण करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी प्रवासी, प्रवासी संघटना रेल्वे प्रशासनाकडे करत आहेत. परंतु, रेल्वे प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. मध्य रेल्वेच्या इतर रेल्वे स्थानकांप्रमाणे सर्वाधिक प्रवासी गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानक ओळखले जाते. फलाटावर प्रवाशांना मुक्त संचार करता यावा म्हणून फलाटावर मध्यभागी असलेली उपहारगृह, पुस्तक विक्रीची दुकाने फलाटांच्या एका बाजुला स्थलांतरित करण्यात आली आहेत.

ब्लाॅक अभावी रखडले काम

सरकत्या जिन्याचे काम का रखडले आहे, याविषयी कोणीही रेल्वे अधिकारी स्पष्ट आणि उघडपणे बोलण्यास तयार नाही. मात्र, रेल्वेतील कामाच्या ठिकाणच्या विश्वसनीय सुत्रांनी सांगितले, की सरकत्या जिन्याच्या कामासाठी आवश्यक असलेली अवजड यंत्रणा डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील वाहनतळ जागेत आणून ठेवण्यात आली आहे. ही यंत्रणा रेल्वे स्थानकाजवळ वाहनतळ जागेतून आणण्यासाठी रात्रीतून काम करावे लागणार आहे. यासाठी रेल्वे मार्ग काही तास बंद ठेवावा लागणार आहे. हा रेल्वे मार्ग बंद ठेवण्यासाठीचा ब्लाॅक रेल्वे प्रशासनाकडून मिळत नसल्याने सरकत्या जिन्याचे काम रखडले आहे. हा ब्लाॅक कधी मिळेल याविषयीची खात्री नाही. ब्लाॅक मिळाल्यानंतर हे काम पूर्ण होईल, असे सुत्राने सांगितले.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन व चारवरील सरकत्या जिन्याच्या रखडलेल्या कामाविषयी माहिती घेतो आणि हे काम रखडले असेल तर संबंधितांना त्याविषयी कळविण्यात येईल.-डाॅ. स्वप्निल नीलामुख्य जनसंपर्क अधिकारी, ,मध्य रेल्वे.

रेल्वे प्रशासनाला तिकिटाच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणाऱ्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा प्रत्येक गोष्टीत अंतच पाहायचा का, असे रेल्वेने ठरवले आहे की काय असाच प्रश्न या रेल्वे स्थानकातील रखडलेली कामे, वाढते प्रवासी अपघात पाहता पडतो. रखडलेल्या सरकत्या जिन्याचे काम रेल्वे प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे.- लता अरगडे,अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.



Source link

भारताला जॅकपॉट लागला! ‘या’ राज्यात सापडली पांढऱ्या सोन्याची खाण! सोन्यासारखा मौल्यवान धातू

0
भारताला जॅकपॉट लागला! ‘या’ राज्यात सापडली पांढऱ्या सोन्याची खाण! सोन्यासारखा मौल्यवान धातू


Lithium Bauxite Reserves Discovery : ओडिशा या राज्यामध्ये सोन्याचा मोठा साठा सापडला आहे. येथील सोन्याच्या खाणीत उत्खननही सुरू झाले आहे. अशातच आता भारताला जॅकपॉट लागला आहे. भारताच्या मेघालय राज्यात पांढऱ्या सोन्याची खाण सापडली आहे.  भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (GSI) ला मेघालयातील अनेक जिल्ह्यांमध्ये महत्त्वपूर्ण खनिज साठे सापडले आहेत. यामुळे भाराताच्या अर्थव्यवस्थेला मोठा बूस्टर मिळणार आहे. 

जीएसआयच्या शोधांमध्ये मेघालयमधील पश्चिम खासी हिल्सच्या रिमराई भागात बॉक्साईटचे अनेक साठे सापडले आहेत. पूर्व खासी टेकड्यांमधील एका गावाजवळ अतिरिक्त साठे देखील सापडले आहेत. या सर्वेक्षणात गारो हिल्स परिसरात बॉक्साईट खनिजाचे साठे असल्याच्या वृत्तालाही दुजोरा मिळाला आहे. यामुळे राज्याची अॅल्युमिनियम उत्पादन क्षमता आणखी वाढली आहे.

बॉक्साइट हा अॅल्युमिनियम निर्मितीसाठी एक महत्त्वाचा कच्चा माल आहे. राज्याच्या चुनखडी आणि लिथियम साठ्यांसह, हे मेघालयाला खनिज संसाधन विकासासाठी नव्याने सापडलेल्या या खाणी गेम चेंजर ठरतील. एकट्या पूर्व जैंतिया हिल्समध्ये 29 चुनखडीचे ब्लॉक असल्याचे जीएसआयने सविस्तर मूल्यांकनात म्हटले आहे.येथे सुमारे 566.04 दशलक्ष टन साठा आहे. चेरापुंजीमधील एका ब्लॉकमध्ये 71.78 दशलक्ष टन खनिज आहे. एकूणच, मेघालयातील चुनखडीचा साठा आता 5737.82 दशलक्ष टन इतका आहे. या उच्च-गुणवत्तेच्या साठ्यांमुळे राज्याच्या वाढत्या सिमेंट उद्योगाला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

चेरापुंजीजवळील लिथियमचा शोध ‘लिथियम व्हॅली’चा भाग म्हणून ओळखला जातो.  बॅटरी उत्पादन आणि अॅल्युमिनियम-लिथियम मिश्र धातु उत्पादनात लिथियम महत्त्वाची भूमिका बजावते. जीएसआयने जर्मेनियम सारख्या इतर दुर्मिळ पृथ्वी घटकांसाठी देखील संशोधन सुरू केले आहे. यावरून असे दिसून येते की भारताच्या खनिज नकाशात मेघालयाचे महत्त्व वाढत आहे.

या नवीन शोधांमुळे धोरणात्मक उद्योगांसाठी कच्च्या मालाची पुरवठा साखळी सुधारणार आहे. याशिवाय, राज्याला दीर्घकालीन आर्थिक फायदे देखील होणार आहेत. यापूर्वी 30 जानेवारी  केंद्राने मेघालयात वैज्ञानिक आणि नियमन केलेल्या दृष्टिकोनातून कोळसा खाणकाम पुन्हा सुरू करण्यास औपचारिक परवानगी दिली होती. हा राज्याच्या खाण धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

मेघालयात कोळसा खाणकाम पुन्हा सुरू झाल्यामुळे राज्यालाही याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून खाणकाम शास्त्रोक्त पद्धतीने करणे महत्वाचे आहे. मेघालयात लिथियमचा शोध ही एक मोठी उपलब्धी आहे. बॅटरी बनवण्यासाठी लिथियमचा वापर केला जातो. या नव्या शोधामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मीताला वेग येईल. 

 





Source link

RCB beat MI By 12 Runs After 10 Years at Wankhede Virat Kohli Rajat Patidar Fifty Krunal Pandya 4 Wickets IPL 2025

0
RCB beat MI By 12 Runs After 10 Years at Wankhede Virat Kohli Rajat Patidar Fifty Krunal Pandya 4 Wickets IPL 2025


IPL 2025 MI vs RCB Highlights in Marathi: आरसीबीने १० वर्षांनंतर वानखेडेचं चक्रव्यूह भेदत रोमांचक विजयाची नोंद केली आहे. आरसीबीने मुंबई इंडियन्सचा त्यांच्याच घरच्या मैदानावर १२ धावांनी पराभव केला. आरसीबीनं मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियवर १० वर्षांनी विजय मिळवला. कृणाल पंड्या, विराट कोहली आणि रजत पाटीदार आरसीबीच्या विजयाचे हिरो ठरले.

मुंबईला विजयासाठी अखेरच्या षटकात १९ धावांची गरज होती. कर्णधार रजत पाटीदारने कृणाल पंड्याला गोलंदाजी दिली. कृणालने पहिल्या दोन चेंडूवर विकेट घेतले. पहिल्या चेंडूवर सँटनर तर दुसऱ्या चेंडूवर दीपक चहर झेलबाद झाला. तिसऱ्या चेंडूवर बोल्टने १ धाव घेतली. तर चौथ्या चेंडूवर नमनने चौकार लगावला. तर पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नमन धीर झेलबाद झाला. तर अखेरच्या चेंडूवर त्याने एकही धाव दिली आणि अशारितीने कृणालने संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

आरसीबीने दिलेल्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाची सुरूवात पुन्हा एकदा फारशी चांगली झाली नाही. रोहित शर्मा ९ चेंडूत २ चौकार आणि एक षटकार लगावत १७ धावा करून बाद झाला. तर काही वेळाने रायन रिकल्टनही १७ धावा करत पायचीत झाला. धावा काढण्यासाठी झगडत असलेला विल जॅक्स २२ धावा करत बाद झाला. तर सूर्यकुमार यादव घरच्या मैदानावर २८ धावा करत बाद झाला. गेल्या सामन्यात १९व्या षटकात ज्याला रिटायर्ड आऊट केलं तो तिलक वर्मा २९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५६ धावा करत बाद झाला. संघाकडून अर्धशतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज ठरला.

हार्दिक पंड्याने वादळी फलंदाजी करत विजयाच्या दिशेने आणून ठेवला. पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याच्या भागीदारीने सामना मुंबईच्या बाजूने वळवला होता. पण मुंबईचा संघ पुन्हा एकदा विजयाच्या जवळ येऊन सामना जिंकू शकला नाही. हार्दिक पंड्या १५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४२ धावा करत झेलबाद झाला. यानंतर सँटनर ८ धावा करत झेलबाद झाला. तर दीपक चहरही पहिल्याच चेंडूवर झेलबाद होत माघारी परतला.

आरसीबीच्या गोलंदाजांनी वानखेडेच्या मैदानावर शानदार गोलंदाजी करत मुंबईला विजयापासून रोखले. कृणाल पंड्याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर यश दयाल आणि जोश हेझलवुजने २-२ विकेट तर भुवनेश्वर कुमारने १ विकेट घेतली. सुयश शर्माला विकेट मिळाली नसली तरी त्याने चांगली गोलंदाजी केली.

मुंबई इंडियन्स वि. आरसीबी यांच्यात एक अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बोल्टने पहिल्याच षटकात दुसऱ्या चेंडूवर फिल सॉल्टला क्लीन बोल्ड करत शानदार सुरूवात करून दिली. पण या सुरूवातीनंतरही आरसीबीने विराट-पडिक्कल-रजतच्या खेळीवर २२१ धावांची मोठी धावसंख्या उभारली.

आरसीबीकडून विराट कोहलीने ४२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६७ धावा केल्या. तर देवदत्त पडिक्कलने २२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३७ धावांची खेळी केली. तर सामनावीर ठरलेल्या रजत पाटीदारने ३२ चेंडूत वादळी फटकेबाजी करत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या. यानंतर धावसंख्या २२१ वर नेण्याचं पुढचं काम जितेश शर्माने केलं. १९ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह त्याने ४० धावा केल्या. यादरम्यान त्याने बुमराहच्या अखेरच्या षटकात षटकारही लगावला. मुंबईकडून बोल्ट आणि हार्दिकने २-२ विकेट घेतले तर विघ्नेश पुथूरने एक विकेट घेतली.





Source link

Pooja Sawant shares a special story about buying her first new car

0
Pooja Sawant shares a special story about buying her first new car



Pooja Sawant shares a special story about buying her first new car | “थोडे थोडे पैसे जमवून…”, पूजा सावंतने सांगितला पहिल्या नवीन गाडीचा किस्सा, म्हणाली, “योग्य वेळ…”





Source link

संघर्ष सभा – आंबेडकरी चळवळीचा नवचैतन्याचा जागर !

0
संघर्ष सभा – आंबेडकरी चळवळीचा नवचैतन्याचा जागर !

साहस टाईम्स :- दि. ५ एप्रिल रोजी चेंबूर येथे आंबेडकरी क्रांती दल आयोजित संघर्ष सभा मोठ्या उत्साहात आणि चळवळीच्या धगधगत्या ऊर्जेत पार पडली. सम्राट अशोक जयंतीच्या मंगलमय दिवशी झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या समर्पित कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती लावली आणि चळवळीच्या कार्याला अधिक बळ दिलं.

येत्या काळात आंबेडकरी क्रांती दल सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणार आहे. दलाची नवीन कार्यकारिणी ही अत्यंत जोशात आणि तयारीत आहे.
यामध्ये माझे मेव्हणे आणि लढवय्ये शाहीर सचिन डांगळे, वैभव मोरे, दिनेश जाधव, निनाद पवार, सुनील भद्रिके, शिवम खंडेजोग, किरण तांबे, पवन कांबळे, हृषीकेश वाघमारे आणि स्नेहल दाभोलकर ही नावं उठून दिसतात. या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी दमदार कार्यक्रम होणार आहेत.

या संघर्ष सभेच्या निमित्ताने चळवळीतील अनेक जुन्या आणि नव्या मित्रांची भेट झाली. चरण जाधव, पंकज पठारे, चरण जाधव, श्रीधर वाघमारे, प्रवीण जावळे या काही काळ संवाद न झालेल्या या सहकाऱ्यांशी विचारांची देवाण-घेवाण झाली. रोहित ढाले, अतिश बनसोडे आणि राहुल प्रधान या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी वक्ते म्हणून यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचं मार्गदर्शन केलं. त्यांचा अनुभव आणि शब्द हे नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायक ठरणार आहेत.

आणि सर्वात विशेष बाब म्हणजे राईट टू लव्ह च्या माध्यमातून आपण जी चळवळीची वाट चालतो आहोत, त्याची दखल आज घेतली जात आहे. आपण प्रत्यक्ष अनेकांना भेटलो नसलो, तरी के. अभिजीत हे नाव आणि त्यामागची ध्येयप्रेरणा लोकांच्या मनात ठसत चालली आहे, याची प्रचिती या कार्यक्रमात मला आली. हा अनुभव खूपच भारावून टाकणारा होता.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी मला संविधानाची सुंदर फ्रेम आणि पुस्तक देऊन सन्मानित केलं. ही बाब माझ्यासाठी शब्दात न मावणारी आहे – कारण हा फक्त सन्मान नाही, तर माझ्या चळवळीतील योगदानाची पावती होती.

ही ऊर्जा घेऊन आंबेडकरी क्रांती दल पुढचं पाऊल अधिक जोमात टाकणार आहे – कारण लढा अजून संपलेला नाही… फक्त आता तो अधिक तीव्र होणार आहे!

वेगाने लँडिंग करतानाही विमानाचं टायर उडत का नाही, कारण अतिशय महत्त्वाचं

0
वेगाने लँडिंग करतानाही विमानाचं टायर उडत का नाही, कारण अतिशय महत्त्वाचं


हजारो किलोमीटर प्रति तास वेगाने विमान उतरल्यावर त्याचा टायर का उडत नाही याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण फ्लाइट टायर्सशी संबंधित माहिती जाणून घेणार आहोत. 

जेव्हा तुम्ही रस्त्यावर कार, बस किंवा बाईकने प्रवास करता तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की, जेव्हा ब्रेक किंवा खड्डा असतो तेव्हा कार, बस आणि बाईकचा टायर जम्प घेतो. पण हजारो किलोमीटर वेगाने उतरल्यावरही विमान उडी मारत नाही. कोणत्याही उड्डाणात, त्याचे टायर हे सर्वात महत्वाचे भाग असतात. जर विमानाच्या टायरमध्ये काही समस्या असेल तर अपघाताची शक्यता सर्वात जास्त वाढते. म्हणूनच कोणतीही विमान उत्पादक कंपनी टायर्सकडे विशेष लक्ष देते.

उड्डाणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या टायर्सचे वजन हजारो किलोग्रॅम असते. एवढेच नाही तर 200 ते250 टन वजनाचे विमान ताशी सुमारे 150 ते 250 मैल वेगाने उतरते. पण तरीही तो उंच उडत नाही.  विमानाचे टायर 45 -इंच सिंथेटिक रबर कंपाऊंड कॉम्बिनेशनने बनवले जातात. याशिवाय, ऍल्युमिनियम स्टील हे नायलॉन आणि अरामिडपासून बनवलेल्या कापडासोबत एकत्र केले जाते.

एवढेच नाही तर सर्व टायर नायट्रोजन वायूने ​​भरलेले असतात ज्याचा दाब प्रति चौरस इंच 200 पौंड असतो.  नायट्रोजन हा एक निष्क्रिय वायू आहे. म्हणून, उच्च तापमान आणि दाबातील बदलांचा सामान्य हवेपेक्षा त्यावर कमी परिणाम होतो. लँडिंगच्या वेळी उडी न मारण्याचे हे देखील एक कारण आहे.

याशिवाय, नायट्रोजन वायू भरल्यामुळे, ते सहसा कधीही स्फोट होत नाहीत. कारण या टायर्समध्ये घर्षण झाल्यामुळे आग लागण्याची शक्यता नसते.





Source link

Crime Branch police raids bar in Thane

0
Crime Branch police raids bar in Thane


ठाणे : ठाण्यातील माॅडेला चेकनाका भागातील एका बारवर ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचने कारवाई केली. या बारमध्ये नियमांचे उल्लंघन सुरु होते. तसेच बारमधील वेटर महिला ग्राहकांसोबत अश्लील कृत्य करत होते. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात बारचा व्यवस्थापक, महिला वेटर, ग्राहक अशा २० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

माॅडेला चेकनाका परिसरातील बार नियमांचे उल्लंघन करुन सुरू असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट पाचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांच्या सूचनेनुसार, १० ते १५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक बारवर छापा टाकण्यासाठी निघाले. रविवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास युनीट पाचच्या पथकाने बारमध्ये छापा टाकला. त्यावेळी बारमध्ये मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपकावर गाणी वाजविली जात होती. पाच महिला बारच्या मंचावर नृत्य करत होत्या. तर तीन वेटर महिला ग्राहकांसमोर अश्लील नृत्य करत होते.

पोलिसांच्या पथकाने त्यांची ओळख उपस्थितांना सांगितली. तसेच चौकशीला सुरुवात केली. पोलिसांनी या आठही महिलांची विचारणा केली. त्यावेळी त्यांनी त्यांचे नाव आणि पत्ते पोलिसांना सांगितले. या सर्व महिला नवी मुंबई, ठाणे आणि मिरारोड भागातील असल्याचे समोर आले. तसेच त्या २२ ते ३० या वयोगटातील होत्या. त्यानंतर पोलिसांनी येथील व्यवस्थापकाला परवान्याबद्दल विचारणा केली असता, त्याने पोलिसांसमोर कोणताही परवाना सादर केला नाही. व्यवस्थापकासह पोलिसांनी बारमधील इतर तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तसेच बारमध्ये आलेल्या इतर आठ ग्राहकांची देखील चौकशी केली. या प्रकरणात पोलिसांनी झडती घेतली असता, ग्राहकांनी बारमध्ये उधळलेल्या २ हजार ४६० रुपये आणि व्यवस्थापक बसतो तेथून ३ हजार ७८० रुपये पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, महाराष्ट्र हाॅटेल, उपाहारगृहे, मद्यपान कक्ष यामधील अश्लील कृत्यांना प्रतिबंध घालण्याबाबत व महिलाच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६ चे कलम ८ (२), भारतीय न्याय संहितेचे कलम २९६ आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

ग्राहक मुंबईचे

– या बारमध्ये पोलिसांनी आठ ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील ग्राहक ठाण्यासह मुंबई भागातील असल्याचे समोर आले आहेत. यातील दोघे भांडूपचे, एक विक्रोळीचा, एक काळबादेवीचा आहे. तर उर्वरित ठाण्यातील वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, किसननगर भागातील असून एकजण मुंब्रा येथील आहे.





Source link

खरंच सोन्याचा रेट 1 लाखावरुन 55 हजार रुपयांवर येणार? सोनं 40 टक्क्यांनी स्वस्त होणार?

0
खरंच सोन्याचा रेट 1 लाखावरुन 55 हजार रुपयांवर येणार? सोनं 40 टक्क्यांनी स्वस्त होणार?


Gold Will Come at Rs 55000 :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  2 एप्रिलला पत्रकार परिषद घेत रेसिप्रोकल टॅरिफ चीन आणि भारतासह विविध देशांवर लादत असल्याचे जाहीर केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेचे दूरगामी परिणाम दिसू लागलेत. जर्मनीने आता अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या तिजोरीत ठेवलेले आपले 1200 टन सोने परत मागण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या सोन्याची किंमत 120 अब्ज डॉलर एवढी आहे. सोन्याची दर लवकरच 1 लाखांवर पोहचणार आहेत अशी चर्चा रंगली असतनाच सोनं 40 टक्क्यांनी स्वस्त होणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. सोन्याचा रेट 1 लाखावरुन 55 हजार रुपयांवर येणार असल्याचा दावा मार्केट एक्सपर्ट करत आहेत. 

देशाच्या वायदा बाजारात आणि दिल्लीच्या सराफा बाजारात  सोन्याचे दर 91,400 रुपयांच्या पुढे गेले आहे. दुसरीकडे, देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतींनी 94 हजार रुपयांची पातळी ओलांडली आहे. दोन्ही ठिकाणी सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर आहेत. दुसरीकडे सोन्याचे दर 40 टक्क्यांनी स्वस्त होणार असल्याच्या चर्चेने सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. 

सोन्याचे दर 1 लाख रुपयांवर जाणार नाहीत. उलट सोन्याचे दर 55 हजार रुपयांपर्यंत घसरू शकतात. सोन्याच्या किमती 40 टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.  चालू वर्षात सोन्याच्या किमतीत जवळपास 20 टक्क्यांनी वाढ झाली. अमेरिकन विश्लेषकाने सोन्याच्या दरात तीव्र घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे. अमेरिकेतील मॉर्निंगस्टारच्या विश्लेषकांनी पुढील काही वर्षांत सोन्याच्या दरात 38 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 90 हजार रुपयांच्या पुढे आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर 3100 डॉलर्सपेक्षा जास्त आहे.  आर्थिक अनिश्चितता, महागाईची चिंता आणि भू-राजकीय तणाव यामुळे सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या व्यापारी वादांमध्ये, गुंतवणूकदारांनी सुरक्षित आश्रयस्थानांच्या मालमत्तेकडे वळल्यामुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. 
या कारणांमुळे सोन्याचे दर कमी होवू शकतात. 

जगभरात सोन्याचे उत्पादन वाढले आहे. सोन्याचा जागतिक साठा 9 टक्क्यांनी वाढला आहे.  सोन्याचा पुरवठा देखील वाढला आहे. सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की 71 टक्के केंद्रीय बँका त्यांच्या सोन्याच्या साठवणुकीत कपात करण्याची किंवा ती टिकवून ठेवण्याची योजना आखत आहेत. भविष्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता. 

 





Source link