Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रसंघर्ष सभा – आंबेडकरी चळवळीचा नवचैतन्याचा जागर !

संघर्ष सभा – आंबेडकरी चळवळीचा नवचैतन्याचा जागर !

साहस टाईम्स :- दि. ५ एप्रिल रोजी चेंबूर येथे आंबेडकरी क्रांती दल आयोजित संघर्ष सभा मोठ्या उत्साहात आणि चळवळीच्या धगधगत्या ऊर्जेत पार पडली. सम्राट अशोक जयंतीच्या मंगलमय दिवशी झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या समर्पित कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती लावली आणि चळवळीच्या कार्याला अधिक बळ दिलं.

येत्या काळात आंबेडकरी क्रांती दल सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणार आहे. दलाची नवीन कार्यकारिणी ही अत्यंत जोशात आणि तयारीत आहे.
यामध्ये माझे मेव्हणे आणि लढवय्ये शाहीर सचिन डांगळे, वैभव मोरे, दिनेश जाधव, निनाद पवार, सुनील भद्रिके, शिवम खंडेजोग, किरण तांबे, पवन कांबळे, हृषीकेश वाघमारे आणि स्नेहल दाभोलकर ही नावं उठून दिसतात. या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी दमदार कार्यक्रम होणार आहेत.

या संघर्ष सभेच्या निमित्ताने चळवळीतील अनेक जुन्या आणि नव्या मित्रांची भेट झाली. चरण जाधव, पंकज पठारे, चरण जाधव, श्रीधर वाघमारे, प्रवीण जावळे या काही काळ संवाद न झालेल्या या सहकाऱ्यांशी विचारांची देवाण-घेवाण झाली. रोहित ढाले, अतिश बनसोडे आणि राहुल प्रधान या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी वक्ते म्हणून यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचं मार्गदर्शन केलं. त्यांचा अनुभव आणि शब्द हे नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायक ठरणार आहेत.

आणि सर्वात विशेष बाब म्हणजे राईट टू लव्ह च्या माध्यमातून आपण जी चळवळीची वाट चालतो आहोत, त्याची दखल आज घेतली जात आहे. आपण प्रत्यक्ष अनेकांना भेटलो नसलो, तरी के. अभिजीत हे नाव आणि त्यामागची ध्येयप्रेरणा लोकांच्या मनात ठसत चालली आहे, याची प्रचिती या कार्यक्रमात मला आली. हा अनुभव खूपच भारावून टाकणारा होता.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी मला संविधानाची सुंदर फ्रेम आणि पुस्तक देऊन सन्मानित केलं. ही बाब माझ्यासाठी शब्दात न मावणारी आहे – कारण हा फक्त सन्मान नाही, तर माझ्या चळवळीतील योगदानाची पावती होती.

ही ऊर्जा घेऊन आंबेडकरी क्रांती दल पुढचं पाऊल अधिक जोमात टाकणार आहे – कारण लढा अजून संपलेला नाही… फक्त आता तो अधिक तीव्र होणार आहे!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments