



भारतीय रेल्वे ही आशियातील दुसरी आणि जगातील चौथ्या क्रमांकाच सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. रेल्वेच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी लाखो लोक एका जागेवरुन दुसऱ्या जागी प्रवास करत असतात. भारतीय रेल्वेत वेगवेगळ्या रंगाचे डब्बे आपण पाहिले असतीलच यामधील अंतर किती असतं?
ट्रेनमधील कोच वेगवेगळ्या रंगाचे असतात. यामध्ये लाल, निळ्या आणि हिरव्या रंगाचे असतात. तीन रंगांचे कोच वेगवेगळ्या ट्रेनमध्ये वेगवेगळ्या अंतरामध्ये असतात.
सर्वाधिक ट्रेनमध्ये निळ्या रंगाचे कोच असतात. या कोचला ICF म्हणतात म्हणजे इंटीग्रल कोच फॅक्टरी म्हणतात. याचा कारखाना तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये आहे. निळ्या रंगाचे कोच हे एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट ट्रेनमध्ये असतात. या कोचला एअर ब्रेक असतात. तसेच हे कोच लोह असून 110 किमी ताशी वेगासाठी बनलेले असतात.
लाल रंगाच्या कोचला LHB म्हणजे Linke Hofmann Busch म्हटले जाते. हा कोच 2000 मध्ये जर्मनीमधून भारतात आणले गेले आहेत. या कोचला बनवण्याची फॅक्टरी ही पंजाबच्या कपूरथलामध्ये आहे. लाल रंगाचे डबे स्टेनलेस स्टीलचे बनलेले असतात जे निळ्या रंगाच्या डब्यांपेक्षा हलके असतात. या कोचचा कमाल वेग ताशी 200 किलोमीटरपर्यंत आहे. हे शताब्दी किंवा राजधानी सारख्या ट्रेनमध्ये वापरले जातात.
लाल आणि निळ्या डब्यांव्यतिरिक्त, तुम्ही काही गाड्यांमध्ये हिरवे डबे देखील पाहिले असतील. गरीब रथ सारख्या गाड्यांमध्ये हिरव्या रंगाचे डबे वापरले जातात.




मेरठमधील सौरभ हत्या प्रकरणासारखे आणखी एक प्रकरण यूपीमध्ये समोर आले आहे. बिजनौरमध्ये एका महिलेने आपल्या रेल्वे कामगार पतीची गळा दाबून हत्या केली. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने आधी बसताना पडून नंतर हृदयविकाराचा झटका आल्याचा आरडाओरडा केला, पण शवविच्छेदन अहवालात संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. शवविच्छेदन अहवालात रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नव्हे तर गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वे कर्मचाऱ्याच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्या वहिनीला अटक करून तिची चौकशी केली.

सतीश सबनीस मेमोरियल FIDE रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा 6 एप्रिल 2025 म्हणजेच रविवारी पार पडली.
बुद्धिबळ स्पर्धेच्या 7 व्या आवृत्तीचा वांद्रे येथील उत्तर भारतीय हॉल येथे समारोप झाला. यामध्ये जवळपास 270 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यात अव्वल मानांकित FIDE मास्टर सुयोग वाघ यांचा देखील सहभाग होता.
181 आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू होते ज्यात 1 आंतरराष्ट्रीय मास्टर, 7 FIDE मास्टर आणि 1 महिला FIDE मास्टर होते.
11व्या मानांकित पारस भोईरने अव्वल मानांकित FIDE मास्टर सुयोग वाघचा पराभव केला आणि चॅम्पियन पद पत्कारले.
सुयोगने Black Pieces ची निवड केली होती. त्याने एक मजबूत बचावात्मक सिसिलियन बचाव निवडला. पण एक चुकिची चाल त्याला भारी पडली. मात्र वेदांत पारसने पोझिशनचा फायदा घेत आरामात गेम जिंकून जेतेपद पटकावले.
दुसऱ्या बोर्डावर टाटा स्टीलचा निवडक विद्यार्थी आणि MSDCA चा खेळाडू FIDE वेदांत पानेसरने दक्ष जैनचा पराभव केला.
तिसऱ्या बोर्डावर पुष्कर डेरेने गुरू प्रकाश विरुद्ध विजय मिळवून त्याचे गुण 8 केले.
उत्तम टाय ब्रेकवर पुष्कर दुसरा आणि FIDE मास्टर वेदांत पानेसर यानंतर दुसरा आला.
ही स्पर्धा विविध वयोगटातील स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आली होती. एकूण 3 लाखांहून अधिक रक्कमेची बक्षिसे वितरीत करण्यात आली. मुंबईतील वांद्रे येथील उत्तर भारतीय सेवा संघाच्या सभागृहात ही स्पर्धा पार पडली.
हेही वाचा

