Saturday, July 25, 2026
Home Blog Page 423

15 एप्रिलपासून तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा बदलणार ? भारतीय रेल्वेने दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

0
15 एप्रिलपासून तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा बदलणार ? भारतीय रेल्वेने दिली अत्यंत महत्त्वाची माहिती


Railway Tatkal Ticket Booking Time : भारतीय रेल्वेकडून येत्या 15 एप्रिलपासून तात्काळ तिकीट प्रणालीमध्ये बदल करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. या दरम्यान भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.  भारतीय रेल्वेने याबाबत अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. 

एसी आणि नॉन-एसी क्लासेस याबरोबरच एजंट यांच्यासाठी तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा बदणार असल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे. मात्र, सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या सर्वा पोस्ट खोट्या असल्याचे समजते.  याबद्दल रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे 

सोशल मीडिया चॅनेल्सवर काही पोस्ट फिरत आहेत ज्यात तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकिटांसाठीच्या वेगवेगळ्या वेळेबद्दल उल्लेख आहे. एसी किंवा नॉन-एसी क्लासेससाठी तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळ बुकिंगच्या वेळेत सध्या अशा प्रकारचा कोणताही बदल प्रस्तावित नाहीत. एजंटसाठी मंजूर करण्यात आलेल्या बुकिंग वेळेतही कोणताही बदल नाही,” असे आयआरसीटीसीने त्यांच्या निवेदनातम म्हटले आहे

सध्याच्या वेळा काय आहेत?

आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेचे तात्काळ ई-तिकीट हे एक दिवस आधी बुक करता येते, ज्यामध्ये प्रवास सुरू होण्याची तारीख वगळली जाते. ओपनिंगच्या दिवशी एसी क्लाससाठी (२ए/३ए/सीसी/ईसी/३ई) भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १०:०० वाजता आणि नॉन-एसी क्लाससाठी (एसएल/एफसी/२एस) भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ११:०० वाजता हे तिकीट बुक करता येते. विशेष म्हणजे, फर्स्ट एसी सोडून सर्व क्लासमध्ये तत्काळ बुकिंग करता येते.

तात्काळ तिकीटासाठी किती पैसे जास्त द्यावे लागतात?

तात्काळ तिकीटासाठी प्रवाशांकडून प्रत्येक तिकीटावर सामान्य तिकिटाव्यतिरिक्त काही ठराविक शुल्क आकारले जाते. किमान आणि कमाल शुक्लाच्या आत सेकंड क्लाससाठी मूळ भाड्याच्या १० टक्के आणि इतर सर्व क्लासेससाठी मूळ भाड्याच्या ३० टक्के दराने हे शुल्क निश्चित केलेले आहे. कन्फर्म झालेले तात्काळ तिकीट रद्द केल्यानंतर तुम्हाला कोणताही रिफंड दिला जात नाही. आचानक रद्द केल्यास आणि वेटिंग लिस्टमधील तत्काळ तिकीट रद्द केल्यास सध्याच्या रेल्वे नियमांनुसार शुल्क कापले जाते.

 





Source link

Hanuman Birth Place : हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, झारखंड की कर्नाटक?

0
Hanuman Birth Place : हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, झारखंड की कर्नाटक?


Hanuman Birth Place : चैत्र पौर्णिमेला राम भक्त हनुमानजीचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. देशभरात मोठ्या हनुमान जन्मोत्सव थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो. चैत्र पौर्णिमेला जन्मदिवस आहे, मात्र हनुमानजी यांच्या जन्मस्थळावरुन मात्र वाद आहे. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, झारखंड की कर्नाटक नेमक्या कोणत्या राज्यात हनुमानाच्या जन्म  यावरून कायम वाद होताना आपण पाहिलं आहे. 

रामाचे जन्मस्थान अयोध्या आहे, पण रामभक्त हनुमानजींचे जन्मस्थान (Hanuman Birth Place) कुठे आहे? कर्नाटकातील किष्किंधा की महाराष्ट्रातील अंजनेरी? या प्रश्नावरून महाराष्ट्रात कायम वाद होतो. अंजनेरी हे गाव नाशिक शहरापासून त्र्यंबक रस्त्यावर 26 किमी अंतरावर आहे. हनुमानजींची आई अंजनी गावाला लागून असलेल्या टेकडीवर राहत असल्याने या गावाला अंजनेरी असे नाव पडलं असं स्थानिक लोकांचं मत आहे. 

हनुमानजींचा जन्म अंजनगढ नावाच्या डोंगरावरील एका गुहेत झाला. अंजनगड पर्वताच्या शिखरावर एक छोटेसे मंदिर देखील आहे, ज्यामध्ये लहान हनुमानजी त्यांच्या आईच्या मांडीवर दिसतात. नाशिक आणि इगतपुरीच्या या टेकड्यांमध्ये रामायणात उल्लेख केलेली किष्किंधा वसलेली होती आणि येथे सुग्रीव राज्य करत होते असे स्थानिक लोकांचे मत आहे. लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक पंचवटीत काही किलोमीटरवर अंतरावर कापले होते.

सीतेच्या अपहरणानंतर, जेव्हा राम-लक्ष्मण सीता मातेला शोधण्यासाठी निघाले तेव्हा या पर्वतांच्या खाली त्यांना हनुमानजी भेटले, ज्यांनी त्यांची सुग्रीवाशी मैत्री केली. अंजनगड टेकडी हे देखील ट्रेकिंगचे ठिकाण आहे. टेकडीच्या पायथ्याशी एक हनुमानजी मंदिर आहे तिथे ध्यानात लीन असलेली हनुमानजीची मोठी मूर्ती आहे. येथून डोंगराच्या माथ्यावर असलेल्या अंजनी मातेच्या मंदिरासाठी ट्रेकिंगला सुरुवात होते. पायी चालत शिखरावर पोहोचायला 3 तास ​​लागतात. लोकांना वाटेत हनुमानजीशी जोडून एक तलाव दिसतो. वरून या तलावाचा आकार कोणाच्यातरी पायाचा उजवा पंजा असा दिसतो.

जुग सहस्त्र योजनेतील हनुमान चालीसा भानूमध्ये चौपई आहे. लिल्यू ताही गोड फळ जानु । स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा हनुमानजींनी सूर्याला लाल फळ समजून गिळण्यासाठी उडी मारली तेव्हा हा तलाव तयार झाला होता. पंजाची दिशाही पूर्वेकडे असते, म्हणजे जिथून सूर्योदय होतो. या गोष्टीमुळे लोकांच्या विश्वासाला अधिक बळ मिळाले आहे.

मात्र, कर्नाटकातील महंत दंडस्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी दावा केला आहे की, अंजनेरी हे हनुमानजींचे जन्मस्थान नाही. हनुमानजींचा जन्म कर्नाटकात झाला आणि खरी किष्किंधा तिथेच आहे. तसं तर हनुमानजींचे जन्मस्थान असल्याचा दावा केवळ महाराष्ट्र आणि कर्नाटकात केला जात नाही. भारतात एकूण 9 ठिकाणे आहेत जिथे हनुमानजींचा जन्म झाल्याचा दावा केला जात आहे. हनुमान जीच्या जन्मस्थानावर दावा केला जात आहे ती ठिकाणे म्हणजे अंजनेरी- महाराष्ट्र, किष्किंधा- कर्नाटक, गोकर्ण- कर्नाटक, तिरुपती पर्वत- आंध्र प्रदेश, गुमला- झारखंड, कैथल- हरियाणा, डांग- गुजरात, सुजानगड- राजस्थान, डेहराडून- उत्तराखंड. हनुमानजी हे हिंदूंच्या सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहेत. प्रत्येक घरात त्याची पूजा केली जाते. 





Source link

सूटकेसमधून गर्लफ्रेंडला बॉइज हॉस्टेलमध्ये आणलं; रंगेहाथ पकडला गेला अन्..; पाहा Video

0
सूटकेसमधून गर्लफ्रेंडला बॉइज हॉस्टेलमध्ये आणलं; रंगेहाथ पकडला गेला अन्..; पाहा Video


Student Girlfriend In Suitcase Watch Video: ‘प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं’ असं म्हटलं जातं. खरं तर आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी प्रेमात पडलेली माणसं काहीही करु शकतात असंही म्हणतात. कोणी चंद्र-तारे तोडून आणण्याचा शब्द देतो तर कोणी तळहाताच्या फोडाप्रमाणे तुला जपेल असं सांगतो. मात्र सध्या समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये प्रेयसीच्या अखंड प्रेमात पडलेल्या एका तरुणीने आपल्या प्रेयसीलाच बॅगमध्ये कोंबल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सारा प्रकार हरियाणामधील सोनीपतमध्ये समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो असून, असा दावा केला जात आहे की, सदरचा व्हिडीओ सोनीपतमधील ओपी जिंदल युनिव्हर्सिटीतल्या कॉलेजच्या हॉस्टेलमधला आहे.

रंगेहाथ पकडलं

मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलींना आणि मुलींच्या हॉस्टेलमध्ये मुलांना प्रवेश नसतो. मात्र हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका प्रेमवीराने आपल्या प्रेयसीबरोबर काही खासगी क्षण घालवता यावेत या उद्देशाने तिला चक्क एका सूटकेसमध्ये कोंबून मुलांच्या हॉस्टेलमध्ये आणलं. मात्र हा मुलगा पकडला गेला. त्याला सुरक्षारक्षकांनी रंगेहाथ पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

सुरक्षारक्षकांना का आली शंका?

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण त्याच्या प्रेयसीला सुटकेसमध्ये लपवून मुलांच्या हॉस्टेलमध्ये आणत होता त्यावेळी अचानक बॅगेतून मुलगी किंचाळल्याचा आवाज आला. आधी या तरुणीचं दुर्देव असं की बॅगेत बसलेली त्याची प्रेयसी किंकाळली तेव्हाच समोर सुरक्षारक्षक होते. त्यानंतर महिला सुरक्षारक्षकाला बोलावून बॅग उघडून तपासण्यात आली असता तरुणाचा भांडाफोड झाला. या बॅगमध्ये हात-पाय दुमडून चक्क एक मुलगी बसल्याचं बॅगेची चैन उघडताच स्पष्ट झालं. 

पाहा Video: मेट्रो स्टेशनवर अश्लील चाळे! त्याने गर्लफ्रेंडच्या टी-शर्टमध्ये हात घातला अन्..; Video मुळे संतापाची लाट

महिला सुरक्षारक्षक बॅगेत डोकावतात अन्…

बॅगेत तरुणी असल्याचं पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी तातडीने या मुलीला बॅगेतून बाहेर काढलं. व्हायरल व्हिडीओमध्ये काही महिला सुरक्षारक्षक बॅगेची चैन उघडत असल्याचं दिसत आहे. बॅगेची चैन उघडल्यानंतर काहीजणी बॅगेत काय आहे पाहायला डोकावतात तेव्हा बॅगेतून एका तरुणीचं डोकं बाहेर येतं. ही मुलगी त्याचा कॉलेजची आहे की बाहेरची हे स्पष्ट झालेलं नाही. दोघांची नावंही समोर आलेली नाही. मात्र ज्या लॉबीमध्ये या दोघांची चोरी पकडली गेली तिथेच मोबाईल कॅमेरात कैद केलेला व्हिडीओ व्हायरल झालाय हे मात्र नक्की. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…

अनेकांनी केली टीका

अनेकांनी हा बावळटपणा असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी या तरुणाला आणि तरुणीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तुम्हाला या व्हिडीओबद्दल काय वाटतंय ते कमेंट करुन नक्की कळवा.





Source link

Shani Vakri 2025: 3 Zodiac Signs to Get Rich and Wealthy This Year

0
Shani Vakri 2025: 3 Zodiac Signs to Get Rich and Wealthy This Year



Shani Vakri 2025: 3 Zodiac Signs to Get Rich and Wealthy This Year | Shani Vakri 2025: शनि चालणार उलट चाल, ‘या’ तीन राशींची होणार चांदी; दिवस रात्र वाढणार धन संपत्ती आणि पैसा





Source link

Dandeli to Radhanagari wildlife corridor should be opened says Stalin Dayanand of Vanashakti Sanstha

0
Dandeli to Radhanagari wildlife corridor should be opened says Stalin Dayanand of Vanashakti Sanstha



Dandeli to Radhanagari wildlife corridor should be opened says Stalin Dayanand of Vanashakti Sanstha | दांडेली ते राधानगरी वन्य प्राणी कॉरिडॉर खुला केला पाहिजे; शक्तीपीठ महामार्ग आंबोलीतून जात असेल तर न्यायालयात धाव





Source link

Residents oppose liquor shops in buildings Residents are troubled as there are already two beer bars

0
Residents oppose liquor shops in buildings Residents are troubled as there are already two beer bars



Residents oppose liquor shops in buildings Residents are troubled as there are already two beer bars | इमारतींमधील मद्यदुकानाला रहिवाशांचा विरोध; आधीच दोन बिअरबार असल्याने रहिवाशी त्रस्त





Source link

भारतातील पहिले होमिओपॅथी भवन ‘येथे’ साकारले

0
भारतातील पहिले होमिओपॅथी भवन ‘येथे’ साकारले



वर्धा : वैद्यकीय शिक्षणाच्या विविध शाखा आहेत. त्यात होमिओपॅथी ही शाखा पण स्वतंत्र स्थान राखून आहे. या शाखेचे जनक जर्मनी येथील डॉ. सॅम्यूएल हणीमन हे होत. आधुनिक वैद्यक शास्त्राचे शिक्षण घेत असतांनाच विविध शाखाचा त्यांनी अभ्यास केला. त्याकाळी उपचार खूप वेदनादायी होत असत. तेव्हा मुळाशी जात हणीमन यांनी स्पष्ट केले की आपल्या विचार, भावना, संवेदनेचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो. त्याचीच परिनीती म्हणजे आपल्यास आजार जडतो. म्हणून मानसिक लक्षनांचा अभ्यास करीत रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे व रोगी रोगमुक्त करणे, असे तंत्र विकसित केले. त्यास होमिओपॅथी मान्यता मिळाली, असे डॉ. आनंद गाढवकर सांगतात.

या शास्त्राच्या अभ्यासक, डॉक्टर व हितचिंतक मंडळींनी एकत्र येत होमिओपॅथी भवन उभे करण्याची भूमिका मांडली. ती आता प्रत्यक्षात साकारली आहे. वर्धेलगत सालोड येथे हे भवन साकारले आहे. या बैद्यकीय प्रणालीबाबत अभ्यास तसेच चर्चा घडवून आणण्यासाठी हे भवन उपयुक्त ठरेल. भारतात असे या शाखेचे हे पहिलेच भवन असल्याचे सांगण्यात येते. होमिओपॅथीक मेडिकल असोसिएशनतर्फे याची उभारणी झाली आहे.

हणीमन जयंती दिनी या भवनाचे लोकार्पण झाले. या प्रसंगी पदमश्री डॉ. विलास डांगरे, आमदार अभिजित वंजारी व अँड. शीतल पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. डांगरे यांनी त्यांना प्राप्त पद्मश्री सन्मान होमिओपॅथीसाठी कार्यरत सर्व अभ्यासू डॉक्टरांना समर्पित केला. आमदार वंजारी यांनी या भवनाच्या  विस्तार व संशोधन कार्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची हमी दिली.

होमिओपॅथी शिबीरे या भवनात आयोजित करावी. त्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे मत उपसरपंच आशिष कुचेवार यांनी व्यक्त केले. प्रस्ताविकातून डॉ. अनिल लोणारे यांनी भवन उभारण्याचे कार्य नमूद केले. अहवाल वाचन डॉ. दत्ता कुंभारे व डॉ. रवी देशमुख यांनी केले. डॉ. शुभांगी निमकर, डॉ. मिलिंद  वासेकर, डॉ. आनंद गाढवकर व डॉ. सुचित्रा कुर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्र सांभाळले.

आयोजनात डॉ. रेणुका गाढवकर, प्रशांत खातदेव, विनय डहाके, निखिल ताल्हन, स्नेहल ताल्हन, हर्षल खासबागे, साक्षी वानखेडे, अमृता चौधरी रेखा खैरनार व अन्य डॉक्टरांनी योगदान दिले. या भवनाचा विस्तार करीत भव्य मेडिकल वाचनालय उभे करण्याचा संकल्प आयोजक होमिओपॅथी संघटनेने सोडला आहे.



Source link

Varanasi Gang Rape: 22 जणांकडून तरुणीवर बलात्कार! मोदींनी वाराणसीत पोहोचताच विमानतळावर पोलिसांना…

0
Varanasi Gang Rape: 22 जणांकडून तरुणीवर बलात्कार! मोदींनी वाराणसीत पोहोचताच विमानतळावर पोलिसांना…


PM Modi Briefed On Varanasi Gang Rape Case: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे 19 वर्षाच्या तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपशील जाणून घेतला. वेगवेगळ्या विकास कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी आपल्या मतदारसंघात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी या प्रकरणासंदर्भात काही महत्त्वाचे निर्देश दिल्याची माहिती समोर येत आहे. मोदींनी वाराणसी विमानतळावर उतरताच पोलिसांना या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. 

नऊ आरोपी अटकेत

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये 19 वर्षाच्या तरुणीचं अपहरण करुन 22 जणांनी तिच्या सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 22 जणांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा पीडित तरुणीने केला आहे. पोलिसांनी आम्ही आतापर्यंत या प्रकरणामध्ये नऊ आरोपींना अटक केली असून, इतरांचा शोध सुरु असल्याची माहिती दिली आहे. 

उत्तर प्रदेश सरकारनेच दिली माहिती

पोलीस आयुक्त, उपायुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना या प्रकरणासंदर्भातील तपासाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनाही या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा दिली जावी अशा सूचना केल्या. तसेच भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची सूचनाही पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना केली. “पंतप्रधान मोदी वाराणसीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना पोलीस आयुक्तांनी, उपायुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी बालत्कार प्रकरणाच्या तपासाचा संपूर्ण तपशील दिला,” असं उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

मोदींनी काय निर्देश दिले?

“पंतप्रधान मोदींनी या प्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भविष्यात अशा गोष्टी घडू नये म्हणून उपाययोजना करण्याचे आदेशही पंतप्रधानांनी दिलेत,” असंही उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केलं आहे. 

नेमकं हे प्रकरण काय?

वाराणसीच्या लालपूर परिसरात वास्तव्यास असणारी पीडित मुलगी 29 मार्च रोजी मित्राच्या घरी जाण्यासाठी निघालेली. याआधीही अनेकदा ती या मित्राच्या घरी गेली होती. पण यावेळी पीडिता मित्राच्या घरी गेल्यानंतर स्वत:च्या घरी परतलीच नाही. 4 एप्रिलला मुलीच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच दिवशी अपहरणकर्त्यांनी पीडित मुलीची सुटका केली. या मुलीला अंमली पदार्थांचा डोस देण्यात आला होता. पीडितेला पांडेपूर अपहरणकर्त्यांनी चौकात सोडलं होतं. पीडितेने तिथून एका मित्राचं घर गाठलं. तिथून तिला तिच्या घरी नेण्यात आलं. नंतर तिने तिच्या वडिलांना या घटनेची माहिती सांगितली. पीडितेच्या वडिलांनीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार हुक्का बार, हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यादरम्यान लैंगिक अत्याचारात अनेक लोक सहभागी झाले होते. माझ्यावर एकूण 22 जणांनी बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी हुकुलगंज आणि लल्लापुरा भागातील 9 जणांना ताब्यात घेतलं असून इतर फरार आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.





Source link

तुमची आवडती ऑनस्क्रीन जोडी कोणाबरोबर? अशोक सराफ ‘या’ दिग्गज अभिनेत्रीचं नाव घेत म्हणाले, “तिचे सुरुवातीचे चित्रपट…”

0
तुमची आवडती ऑनस्क्रीन जोडी कोणाबरोबर? अशोक सराफ ‘या’ दिग्गज अभिनेत्रीचं नाव घेत म्हणाले, “तिचे सुरुवातीचे चित्रपट…”



Ashok Saraf on who is your favorite onscreen couple takes late actress Ranjana Deshmukhs name shares experience of working with her: तुमची आवडती ऑनस्क्रीन जोडी कोणाबरोबर? अशोक सराफ ‘या’ दिग्गज अभिनेत्रीचं नाव घेत म्हणाले, “तिचे सुरुवातीचे चित्रपट…”





Source link

भीम जयंतीचा पाया घालणारे पुण्याचे रणपिसे : इतिहासातील एक महत्त्वपूर्ण सुरुवात

0
भीम जयंतीचा पाया घालणारे पुण्याचे रणपिसे : इतिहासातील एक महत्त्वपूर्ण सुरुवात

पुणे –दरवर्षी १४ एप्रिलला संपूर्ण देशात आणि जगभरात ‘भीम जयंती’ साजरी केली जाते. पांढरे शुभ्र कपडे, निळा झेंडा आणि ‘जय भीम’च्या घोषणा हे दृश्य कुठेही दिसले, की समजायचं – बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस साजरा होतोय. पण ही परंपरा नेमकी कधी आणि कुठे सुरू झाली, याबाबत फारच थोड्यांना माहिती आहे.

भीमजयंतीची सुरुवात पुण्यातून!
आपल्या देशातील अनेक वैचारिक, सामाजिक, वैज्ञानिक चळवळींची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुणे शहरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
ही ऐतिहासिक घडामोड घडवून आणणारे होते थोर समाजसेवक जनार्दन सदाशिव रणपिसे.

रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी खडकी येथील दलित मंडळाच्या अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांचा पहिला वाढदिवस साजरा केला. त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत मिरवली. पुढे प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटांवरून मिरवणुका काढून ‘भीम जन्मोत्सव’ला प्रचंड जनाधार मिळवून दिला.

जयंती साजरी करण्याच्या परंपरेचे शिल्पकार
खडकी परिसरातील प्रत्येक वस्तीत ही परंपरा वाढवून, सर्व वस्त्यांचे एकत्रीकरण करत रणपिसेंनी ‘दलित मंडळ’ स्थापन केले. या मंडळामार्फत मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली जाऊ लागली.

रणपिसे यांचा सामाजिक प्रवास
२४ ऑगस्ट १८९८ रोजी सासवड येथे जन्मलेले रणपिसे हे त्या काळातील पुणे जिल्ह्यातील पहिले दलित मॅट्रिक पास विद्यार्थी होते. त्यांनी पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.
१९१८–२१ या काळात त्यांनी ‘सन्मार्ग दर्शक मंडळा’च्या माध्यमातून व्याख्याने, नाटके, प्रौढ शिक्षणवर्ग, व्यायामशाळा यांचे आयोजन करून समाजात जागृती केली.

महार सेवादलाचे कमांडर इन चीफ
रणपिसे यांनी महार सेवादलाची स्थापना करून तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यांनी राजकारणात फारशी चळवळ केली नाही, पण समाजकार्यात त्यांचा मोठा वाटा होता. पुण्यात डॉ. आंबेडकरांना मानपत्र आणि इमारत निधी उभारण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.

इतिहासात उपेक्षित पण प्रभावी योगदान
१९३९ मध्ये कायदे मंडळात निवडून आलेल्या चौदा प्रतिनिधींचे श्रेय देखील रणपिसेंकडे जाते. महात्मा गांधी पुण्यात उपोषणाला बसले असताना बाबासाहेब नॅशनल हॉटेलमध्ये होते. त्यावेळी रणपिसे सरकारी सेवेत असूनही बाबासाहेबांच्या मदतीला धावून गेले.

एक कार्यकर्ता, एक द्रष्टा
रणपिसे हे केवळ एक समाजसेवक नव्हते, तर त्यांनी सामाजिक चळवळींच्या मूळ गाभ्यातून कार्य केले. आज संपूर्ण जगभर साजरी केली जाणारी ‘भीम जयंती’ पुण्यातून, त्यांच्या हस्ते सुरू झाल्याचा इतिहास उजेडात आणणे ही काळाची गरज आहे.


संदर्भ:
मिलिंद मानकर, लेखक – “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींचे संग्राहक”
लोकराज्य मासिकातील विशेष लेख समभार )

)