Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेश15 एप्रिलपासून तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा बदलणार ? भारतीय रेल्वेने दिली अत्यंत...

15 एप्रिलपासून तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा बदलणार ? भारतीय रेल्वेने दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

15 एप्रिलपासून तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा बदलणार ? भारतीय रेल्वेने दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

[ad_1]

Railway Tatkal Ticket Booking Time : भारतीय रेल्वेकडून येत्या 15 एप्रिलपासून तात्काळ तिकीट प्रणालीमध्ये बदल करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. या दरम्यान भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.  भारतीय रेल्वेने याबाबत अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. 

एसी आणि नॉन-एसी क्लासेस याबरोबरच एजंट यांच्यासाठी तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा बदणार असल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे. मात्र, सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या सर्वा पोस्ट खोट्या असल्याचे समजते.  याबद्दल रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे 

सोशल मीडिया चॅनेल्सवर काही पोस्ट फिरत आहेत ज्यात तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकिटांसाठीच्या वेगवेगळ्या वेळेबद्दल उल्लेख आहे. एसी किंवा नॉन-एसी क्लासेससाठी तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळ बुकिंगच्या वेळेत सध्या अशा प्रकारचा कोणताही बदल प्रस्तावित नाहीत. एजंटसाठी मंजूर करण्यात आलेल्या बुकिंग वेळेतही कोणताही बदल नाही,” असे आयआरसीटीसीने त्यांच्या निवेदनातम म्हटले आहे

सध्याच्या वेळा काय आहेत?

आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेचे तात्काळ ई-तिकीट हे एक दिवस आधी बुक करता येते, ज्यामध्ये प्रवास सुरू होण्याची तारीख वगळली जाते. ओपनिंगच्या दिवशी एसी क्लाससाठी (२ए/३ए/सीसी/ईसी/३ई) भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १०:०० वाजता आणि नॉन-एसी क्लाससाठी (एसएल/एफसी/२एस) भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ११:०० वाजता हे तिकीट बुक करता येते. विशेष म्हणजे, फर्स्ट एसी सोडून सर्व क्लासमध्ये तत्काळ बुकिंग करता येते.

तात्काळ तिकीटासाठी किती पैसे जास्त द्यावे लागतात?

तात्काळ तिकीटासाठी प्रवाशांकडून प्रत्येक तिकीटावर सामान्य तिकिटाव्यतिरिक्त काही ठराविक शुल्क आकारले जाते. किमान आणि कमाल शुक्लाच्या आत सेकंड क्लाससाठी मूळ भाड्याच्या १० टक्के आणि इतर सर्व क्लासेससाठी मूळ भाड्याच्या ३० टक्के दराने हे शुल्क निश्चित केलेले आहे. कन्फर्म झालेले तात्काळ तिकीट रद्द केल्यानंतर तुम्हाला कोणताही रिफंड दिला जात नाही. आचानक रद्द केल्यास आणि वेटिंग लिस्टमधील तत्काळ तिकीट रद्द केल्यास सध्याच्या रेल्वे नियमांनुसार शुल्क कापले जाते.

 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments