Saturday, July 25, 2026
Home Blog Page 422

विक्रोळी पार्कसाईट परिसरात दोन गटांत हाणामारी, एकजण जखमी

0
विक्रोळी पार्कसाईट परिसरात दोन गटांत हाणामारी, एकजण जखमी


मुंबई : विक्रोळी पार्कसाईट येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात भरविण्यात आलेल्या आमदार कबड्डी चषक स्पर्धेदरम्यान पंचानी दिलेल्या निर्णयावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. शुक्रवारी मध्यरात्री २ च्यादरम्यान ही घटना घडली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले.

विक्रोळी पार्क साईट येथील लालबत्ती क्रीडा मंडळातर्फे ९ ते १२ एप्रिलदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार राम कदम यांच्या नावाने ‘आमदार चषक २०२५’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ११ एप्रिल रोजी रात्री २ वाजता स्पर्धा सुरू असताना पंचानी दिलेल्या निर्णयावरून मैदानात असलेल्या दोन्ही संघामध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली.

यावेळी या दोन्ही गटातील खेळाडूंनी मंडपाची मोडतोड केली. तसेच एकमेकांना खुर्च्यांनी मारहाण केली. यामध्ये अनेकांना किरकोळ मार लागला. तसेच या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला. त्याला राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.





Source link

१३०० रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट, महाराष्ट्रातील किती स्टेशन्सचा समावेश आणि काय-काय असणार सुविधा?

0
१३०० रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट, महाराष्ट्रातील किती स्टेशन्सचा समावेश आणि काय-काय असणार सुविधा?


काय-काय असणार सुविधा –

वेटिंग रूम, फूड कोर्ट, स्वच्छ स्वच्छतागृहे, लिफ्ट, एस्केलेटर आणि डिजिटल सुविधा अशा आधुनिक सुविधांनी स्टेशन्स सुसज्ज करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. सीएसएमटीव्यतिरिक्त दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी (मुंबई), पुणे, नाशिकरोड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्रातील काही प्रमुख स्थानके या योजनेत समाविष्ट आहेत.



Source link

process of pushing Muslims towards secondary citizenship says Prof Subhash Ware

0
process of pushing Muslims towards secondary citizenship says Prof Subhash Ware



process of pushing Muslims towards secondary citizenship says Prof Subhash Ware | मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्वाकडे ढकलण्याची प्रक्रिया; प्रा. सुभाष वारे यांचे प्रतिपादन





Source link

बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून पुन्हा हिंसाचार, जमावाकडून बाप-लेकाची निर्घृण हत्या; परिस्थिती नियंत्रणाबाहेर

0
बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून पुन्हा हिंसाचार, जमावाकडून बाप-लेकाची निर्घृण हत्या; परिस्थिती नियंत्रणाबाहेर


पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागलं, ज्यात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. मुर्शिदाबादमध्ये शुक्रवारी हिंसाचार उसळला होता आणि आतापर्यंत ११८ जणांना अटक करण्यात आली आहे. परिस्थिती पाहता पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर करावा लागला, तर काही भागात सीमा सुरक्षा दलाचीही (बीएसएफ) मदत घेण्यात आली आहे.



Source link

Viral Video : भरबाजारात दोघींनी झिंज्या उपटल्या, एकमेकांना तुडवलं; हाणामारीमागील कारण जाणून बसेल धक्का

0
Viral Video : भरबाजारात दोघींनी झिंज्या उपटल्या, एकमेकांना तुडवलं; हाणामारीमागील कारण जाणून बसेल धक्का


Women Fighting Video :  महिला किंवा तरुणी यांच्यामधील हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर महिलांच्या मारामारीचे असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. या भांडण्यामागील कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. असं म्हणतात मुलींना भांडण्यासाठी विषय लागत नाहीत. कुठल्या विषयावरून दोन महिला एकमेकांच्या झिंट्या उपटील सांगता येणार नाही. असाच एक सोशल मीडियावर महिलांचा भरबाजारातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर महिलांच्या हाणामारीचे व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये महिला एकमेकींना का तुडवत आहे, हे कळल्यानंतर हसू की डोक्याला हात मारून असं काहीस होईल. 

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही आहे. तुम्हाला महिलांचे कपडे प्रेम माहिती आहे ना…, महिलांच्या या कपडे प्रेमामुळे अनेक वेळा तुम्ही पुरुषांना वैतागलेले पाहिलं असेल. अनेक मार्केटमध्ये महिला कपड्यांची खरेदी करतात आणि पुरुष त्यांच्या शॉपिंगच्या बॅग उचलताना पाहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ कपड्या मार्केटमधील आहे. जिथे सुरुवातीला दोन महिला एकमेकांना मारताना दिसत आहे. त्यानंतर हा व्हिडीओ पुढे पाहिल्यावर दिसतं की, एक दोन तीन चार महिला एकमेकांच्या झिंट्या उपटताना दिसत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ मुंबई नाही तर दिल्लीतील कपड्यांच्या मार्केटमधील आहे. झालं असं की, एकच ड्रेस या दोघींना आवडल्याने या दोन महिलांमध्ये त्या एका ड्रेसवरून भांडण झालं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या वादावादीचे रुपांतर हाणामारीत झालं. एकीन दुसरीच्या कानाखाली जोरदार मारली आणि तिला प्रत्युत्तरात तिनेही कानाखाली मारली. त्यानंतर वादाच रुपांतर हाणामारीत झालं आणि त्या दोघांनी एकमेकींना चांगलच चोपलं. दोघींनी एकमेकींची केस ओढले, ड्रेस ओढले. मध्यस्थी करणाऱ्या महिलेलाही त्यांनी या हाणामारीत ओढलं. महिलांचं हे भांडण बघण्यासाठी मार्केटमधील लोकांनी मोठी गर्दी केली होती. 

दरम्यान, हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका यूजर्सने लिहिलंय की, ‘मॉर्डन कपडे घातले तरी हसण्यासारखं काम करतायत. कपडे चांगले पण मानसिकता मात्र बदललेली नाही, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘कपड्यांच्या बाबतीत तडजोड नाही.’





Source link

उड्डाणपुलाच्या कामासाठी नालाच अडवला, अमरावती मार्गावरील प्रकार

0
उड्डाणपुलाच्या कामासाठी नालाच अडवला, अमरावती मार्गावरील प्रकार



अमरावती मार्गावरील निर्माणाधीन उड्डाणपूल ज्या ठिकाणी संपतो त्या ठिकाणी एका नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्याचा प्रवाह अडवण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.

अमरावती मार्गावरील आरटीओ कार्यालय ते आदिवासी भवनादरम्यान एक नाला आहे. हा नाला पुढे नाग नदीला जाऊन मिळतो. या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. त्यासाठी पाण्याचा प्रवाह अडवण्यात आला. त्यानंतर थोडेफार पाणी वाहून जावे म्हणून एक पाईप टाकण्यात आला. पण, पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने पाणी साचू लागले. गेल्या दोन महिन्यापासून येथे पाणी साचल्याने दुर्गंधी येत आहे. तसेच डासांची उत्पत्ती होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागात डासांची संख्या वाढल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

आरटीओ कार्यालय परिसरात कार्यरत असलेल्यांना अळ्या आढळून आल्या आहेत. पाण्यात कचरा देखील टाकण्यात येत आहे. आरटीओजवळील विक्रेते नाल्यात कचरा टाकतात, त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या ठिकाणी दुर्गंधी इतकी आहे की, नाल्याजवळ उभेही राहता येत नाही, असे एका रहिवाशाने सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार, पुलाची पुनर्बांधणी करायची असल्याने पाण्याचा प्रवाह वळवण्यात आला आहे, अडवलेला नाही. पाणी वाहते राहिल्यास बांधकाम करणे शक्य नाही. पुलाचे काम मेअखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. दोन्ही बाजूने नाल्याची स्वच्छता करण्यात यावी. तसेच नाल्यात कचरा टाकला जाणार नाही, याची काळजी महापालिकेने घ्यावी आणि पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नियोजन चुकले

संभावित समस्या लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने वेळीच उपाययोजना केल्यास असे प्रश्न निर्माण होत नाही. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियोजन चुकल्यामुळे पाणी साचत असून डांसाची उत्पत्ती वाढत आहे.

पाण्याचा प्रवाह बंद केल्यामुळे सांडपाणी साचले आहे. दुर्गंधी येत आहे. डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे. त्यामुळे आजाराचा धोका आहे. पाणी वाहते ठेवणे आवश्यक आहे. तसेच साचलेल्या पाण्यात कचरा टाकणाऱ्यांवर निर्बंध आणावे लागतील.- दिलीप जाधव, सचिव, त्रिनयन सोसायटी, प्रियदर्शनी कॉलनी



Source link

तामिळनाडूने रचला इतिहास, राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या सहमतीशिवाय मंजूर केले १० कायदे

0
तामिळनाडूने रचला इतिहास, राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या सहमतीशिवाय मंजूर केले १० कायदे


तामिळनाडूतील द्रमुक सरकारने राज्यपाल किंवा राष्ट्रपतींच्या औपचारिक संमतीशिवाय १० विधेयके अॅक्ट म्हणून अधिसूचित केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच ही विधेयके आपोआप मंजूर झाल्याचा निकाल दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. राज्यपाल किंवा राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीशिवाय एखाद्या राज्याने विधेयके बनवण्याची भारतातील ही पहिलीच वेळ आहे. राज्य सरकारच्या स्वायत्ततेचा आणि संघराज्यरचनेचा विजय म्हणून याकडे पाहिले जात आहे.



Source link

Waft Act 2025 : देशातील ‘या’ राज्यात लागू होणार नाही वक्फ कायदा? नेमकं काय आहे यामागचं कारण?

0
Waft Act 2025 : देशातील ‘या’ राज्यात लागू होणार नाही वक्फ कायदा? नेमकं काय आहे यामागचं कारण?



Waft Act 2025 : देशातील ‘या’ राज्यात लागू होणार नाही वक्फ कायदा? नेमकं काय आहे यामागचं कारण? | waqf act will not be implemented in west bengal cm mamata banerjee statement





Source link

Why Mitchell Marsh is not Playing in LSG vs GT Match Despite of Being Fit IPL 2025 Rishabh Pant Explains

0
Why Mitchell Marsh is not Playing in LSG vs GT Match Despite of Being Fit IPL 2025 Rishabh Pant Explains


Why Mitchell Marsh is not Playing in LSG vs GT IPL 2025: ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील लखनौ सुपर जायंट्स संघाचा आयपीएलमधील पाचवा सामना गुजरात टायटन्स संघाविरूद्ध खेळवला जात आहे. या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण लखनौ संघाला या सामन्यात मोठा धक्का बसला आहे. संघाचा फॉर्मात असलेला मिचेल मार्श या सामन्यात संघाचा भाग नाहीये.

लखनौ सुपर जायंट्स संघाला आयपीएल २०२५ मध्ये मोठा धक्का बसला आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात संघाला ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शशिवाय खेळावे लागणार आहे. लखनौच्या या निर्णयामुळे सर्वच चकित झाले. पण नाणेफेकीनंतर ऋषभ पंतने यामागचं कारणही सांगितलं आहे.

कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेकीदरम्यान सांगितलं की मिचेल मार्श त्याची मुलगी आजारी असल्याने वैयक्तिक कारणांमुळे या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी दिल्लीचा फलंदाज हिम्मत सिंगला संघात स्थान देण्यात आले आहे आणि त्याला आज पदार्पणाची संधी मिळाली आहे.

हेही वाचा

मिचेल मार्शच्या जागी संधी मिळालेला हिम्मत सिंग आहे तरी कोण?

मिचेल मार्श खेळत नसल्याने त्याच्या जागी हिम्मत सिंगला संधी देण्यात आली आहे. कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, हिम्मत सिंग आज मिचेल मार्शच्या जागी संघात खेळेल. हिम्मत सिंग हा दिल्लीचा आहे आणि तो यापूर्वी दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसला होता. या हंगामाच्या मेगा लिलावात त्याला लखनौ संघाने ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीसह खरेदी केले. हिम्मत सिंगने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत ५५ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने यामध्ये ५ वेळा अर्धशतकं झळकावली आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट १३२.५१ आहे. आतापर्यंत त्याने एकूण ९१७ धावा केल्या आहेत.

हेही वाचा

LSGचा कर्णधार ऋषभ पंतने सांगितल्याप्रमाणे मिशेल मार्शची मुलगी आजारी असल्याने मार्श गुजरातविरूद्ध सामना खेळताना दिसणार नाही. ऑस्ट्रेलियाला परतला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु तो सध्या संघाचा भाग नाही.

हेही वाचा

मिचेल मार्श हा लखनौ संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने डावाची सुरुवात करताना ५ सामन्यांमध्ये ४ अर्धशतकं झळकावली आहेत आणि एकूण २६५ धावा केल्या आहेत. मिचेल मार्श हा अष्टपैलू खेळाडू असला तरी, दुखापतीनंतर तो पुनरागमन करत असल्याने तो सध्या फक्त फलंदाजी करत आहे.





Source link

land acquisition process speed up for mahatma phule memorial pune print news zws 70

0
land acquisition process speed up for mahatma phule memorial pune print news zws 70



land acquisition process speed up for mahatma phule memorial pune print news zws 70 | महात्मा फुले स्मारकासाठी जागा संपादन प्रक्रियेला गती; कार्यवाहीसाठी विशेष उपायुक्त नेमण्याचा निर्णय





Source link