मुंबई : राज्यात उन्हाचा ताप कायम आहे. तर, दुसरीकडे पावसाला पोषक वातावरणही निर्माण झाले आहे. अनेक भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर मुंबईतही पावसाळी वातावरण निर्माण होऊन पुढील एक दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भातील काही भागांत अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. राज्यभरातील अनेक भागांत आता पावसाचीही हजेरी लागणार असून त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे तयार होणाऱ्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पावसाचा शिडकावा होत आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असली तरी मुंबईतही त्याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे पुढील एक दोन दिवसांत मुंबईतही हलका पाऊस पडेल. या कालावधीत वातावरणही ढगाळ राहील त्यामुळे काहीसा उकाडा जाणवेल.
उन्हाचा चटका कायम
राज्यात पावसाळी वातावरण असले तरी उन्हाचा चटका कायम आहे. काही कालावधीसाठी पाऊस पडल्यानंतर तापमानात घट होत असली तरी, त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होते. बहुतांशी भागात तापमानाचा पारा अजूनही ४० अंशावरच आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा
पावसाचा अंदाज कुठे?
नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागात सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ भागात सोमवारनंतर पाऊस जोर धरणार आहे.
किनारपट्टीवरही पावसाचा अंदाज
कोकणातील मुंबईसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
india s laser based weapon system defense technology used to shoot down planes missiles drones लेझर-आधारित शस्त्र यंत्रणेने देशाची संरक्षण तंत्रज्ञानात मोठी झेप; विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोन पाडण्यासाठी वापर
It is not death that a man should fear, but he should fear never beginning to live.– Marcus Aurelius प्रख्यात रोमन विचारवंत सेनेका लिहितो की आयुष्याचा सगळ्यात मोठा भाग निरर्थक गोष्टींमध्ये जातो, एक मोठा भाग काहीही न करण्यात जातो आणि संपूर्ण जीवन अशा गोष्टी करण्यात जातं जे आपण बहुधा नसतोच. त्यादृष्टीनं, आपण फार अल्पकाळ खऱ्या अर्थानं जगत असतो आणि उर्वरित आयुष्य जगत नसून फक्त वेळ घालवत असतो. तो पुढे जाऊन नमूद करतो की आपला शेवटचा श्वास मृत्यू नसून, मृत्यू नावाच्या दीर्घ प्रक्रियेला पूर्णत्वास नेणारा बिंदू असतो. त्या बिंदूपर्यंत पोहचण्याआधी आपण दीर्घ काळ मृत्यूच पावत असतो. सेनेकाच्या विचारांना दुजोरा देणारा मार्कस ऑरेलिअस हा रोमन विचारवंत लिहितो की, आपल्याला शेवटच्या बिंदूची भीती न वाटता आपण कधी खऱ्या अर्थाने जगायला सुरुवातच केली नाही या गोष्टीची भीती वाटायला पाहिजे. शेवटचा बिंदू तर तुलनेने निरुपद्रवी असतो.
सेनेका आणि मार्कस ऑरेलिअस या स्टोइक विचारवंतांच्या उपरोक्त विधानांमध्ये उत्कट अस्तित्वभान आहे. एकूणच स्टोइक विचारवंतांची सूत्रे हादरा देणारी, अस्वस्थ करणारी आणि अंतर्मुख करणारी आहेत. स्टोइसिझम या प्राचीन तत्त्वज्ञानाने ‘स्व’ ला केंद्रस्थानी ठेवून मूलभूत विचार मांडले आहेत. खरं तर, प्रखर अस्तित्वभान आणि ‘स्व’ची काळजी (care of the self) स्टोइसिझम, एपिक्युरीअनिझम, सिनिसिझम या तीन महत्त्वाच्या प्राचीन तत्त्वप्रवाहांचा गाभा आहे. लक्षणीय गोष्ट म्हणजे, हे तीन्ही विचारप्रवाह एकाच ऐतिहासिक परिस्थितीची अपत्यं आहेत. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर दिशाहीन झालेल्या ग्रीक विचारविश्वात उदयाला आलेली ही तत्त्वज्ञानं ( philosophies of crisis) आहेत. प्रस्तुत लेखांकात स्टोइसिझम या विचारप्रवाहाची चर्चा करू.
अंतर्मुखता आणि बहिर्मुखता या दोन्ही वाटा अनंताकडे नेणाऱ्या असतात. माणूस या दोन्ही वाटांचा अनुभव घेत असतो. भोवतालच्या जगाविषयी सुरक्षितता, निश्चितता, आत्मीयता वाटते तेव्हा बहिर्मुखतेची शक्यता वाढते; मात्र जेव्हा परिचित संदर्भबिंदू नष्ट होतात, जगाला जोडणारा ज्ञानात्मक धागा खंडित होतो आणि इतरांशी नाळ तुटून परात्मता जाणवते तेव्हा माणूस संकटग्रस्त होतो. असा माणूस अंतर्मुख होऊन अस्तित्वाला मुळापासून प्रश्नांकित करतो. जर्मन विचारवंत हाना आरेंटच्या भाषेत सांगायचं तर, अशा संकटग्रस्त परिस्थितीत अंतर्मुख माणसाचा ( interior man) जन्म होत असतो. स्टोइसिझम या विचारप्रवाहाची प्रेरकशक्ती संकटग्रस्तावस्थेतील अंतर्मुखता ( life of interiority) आहे.
हेही वाचा
राजकीय महाशक्ती/ नागरिकतेचा शेवट
प्राचीन काळी ग्रीस हा एकसंध देश नव्हता. इसवीसनपूर्व चौथ्या शतकापर्यंत अथेन्स, स्पार्टा, ऑलंपिया, डेल्फी, कोरिन्थ सारखी अनेक स्वतंत्र ग्रीकभाषक शहरराज्यं (सिटी-स्टेटस्) होती. या शहरराज्यांचे आपापसांत कधी सहयोग तरी कधी संघर्ष चालत. अथेन्स हे अडीच-तीन लाख लोकसंख्येचं ‘लोकशाही मूल्यांना मानणारं’ शहरराज्य होतं, तिथल्या तीस हजार ‘नागरिकां’ना राजकारणात प्रत्यक्षपणे सहभाग घेता येत असे. पण इसवीसनपूर्व चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रीसमध्ये ऐतिहासिक स्थित्यंतरं झाली. मॅसेडोनियाचा राजा दुसरा फिलिप आणि त्याचा वारसदार अलेक्झांडर यांनी ग्रीक शहरराज्यांचा शेवट करून ग्रीक साम्राज्याची मेढ रोवली. परिणामी जुन्या, परिचित लोकशाही मूल्यांवर चालणाऱ्या राज्यसंस्थेचं विघटन होऊन त्याजागी ईश्वरसदृश साम्राज्यवादी राज्यसंस्था जन्माला येऊ लागली.
हा बदल सगळ्यात दूरगामी परिणाम करणारा ठरतो. आधी शहरराज्यांत ‘नागरिकां’ना राज्यसंस्थेविषयी आत्मीयता वाटत असे. त्यामुळे नागरिकता या संकल्पनेला ठोस अर्थ होता. राज्यसंस्थेत सहभाग घेणं, हस्तक्षेप करणं आणि प्रसंगी राज्यसंस्थेचा चेहरामोहरा बदलणं नागरिकांच्या आवाक्यातील गोष्टी असत. त्याउलट विशाल ‘साम्राज्या’त, नागरिकता या संकल्पनेचं विघटन होतं. लोकशाही संपुष्टात येते. समाजातली एकमयता, समाजशीलता उतरणीला लागते. समाजातले घटक बहिर्मुखतेसाठी लागणारा आत्मविश्वास हरवून बसतात. साम्राज्यवादी महाशक्ती एखाद्या महामारीप्रमाणे एका बाजूला सत्तेचं केंद्रीकरण, तर दुसऱ्या बाजूला लोकांचं अणुवादी विलगीकरण करून त्यांना क्वारन्टाइन करते. क्वारन्टाइन माणूस राजकीयदृष्ट्या शक्तिहीन आणि दैववादी असतो. तो अंतर्मुख, आत्मकेंद्री, समाजविन्मुख, अ-राजकीय बनतो. अशा परिस्थितीत अंतर्मुखतेला मध्यवर्ती स्थान देणाऱ्या स्टोइक विचाराचा उदय स्वाभाविकपणे झाला.
सॉक्रेटिक वळणादरम्यान ग्रीक माणसाचा ‘स्वत:ला जाणून घे’ या डेल्फीच्या सुविचारापासून सुरू झालेला प्रवास साम्राज्यवादी वातावरणात ‘स्वत:ची काळजी घे’ या अस्तित्वावादी सूत्रापर्यंत येऊन पोहोचतो. डेल्फीच्या आदेशात सॉक्रेटिसला ज्ञानाची शक्यता दिसली होती. अथेन्सच्या सांस्कृतिक, आर्थिक, वैचारिक भरभराटीच्या काळात स्वत:ला आणि स्वत:च्या भोवतालला जाणून घेऊन वैश्विक ज्ञानाची मांडणी करण्याचे प्रयोग झालेले होते. पण इसवीसनपूर्व चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रीक विश्वातला ज्ञानात्मक आत्मविश्वास हवेत विरून जातो. अनिश्चित, असुरक्षित, निराशावादी भोवतालात अंतर्मुख माणसासाठी ‘स्व’ आणि ‘स्व’च्या आत दडलेली अदम्य इच्छाशक्ती हा शेवटचा आधार ठरतो.
स्टोइसिझम म्हणजे काय?
इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीला झिनो ऑफ सिटिअम या ग्रीक तत्त्ववेत्त्याने ‘स्टोइसिझम’ची मांडणी केली. झिनोनं प्रतिपादित केलेला हा तत्त्वविचार ख्रिासिपस नावाचा अनुयायी पुढे नेतो. नंतर लॅटिन तत्त्वपरंपरेतले सेनेका, एपिक्टेटस आणि मार्कस ऑरेलिअस सारखे दिग्गज तत्त्ववेत्ते स्टोइसिझमला प्रतिष्ठा मिळवून देतात. जवळपास ५०० वर्षांची सलगता लाभलेल्या या तत्त्वप्रवाहात साम्राज्यवादी राजकीय व्यवस्थेतलं संवेदनशील आणि विचारशील मन प्रतिबिंबित होतं.
हेही वाचा
स्टोइसिझम हा शब्द ‘स्टोइआ’ (stoia) या ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. स्टोइआ म्हणजे दुतर्फा दगडी खांब असलेला द्वारमंडप. अथेन्सच्या अशा द्वारमंडपात स्टोइसिझमचा संस्थापक झिनो त्याच्या अनुयायांशी तत्त्वचर्चा करत असे. स्टोइक तत्त्वज्ञ स्वत:ला सॉक्रटिसचे वारसदार समजतात.
स्टोइसिझम आणि एपिक्युरियनिझममध्ये काही साम्य असलं तरी भिन्नताही आहे. एकाच परिस्थितीत उदयाला आलेले हे विचारप्रवाह मृत्यूच्या भीतीला अनाठायी ठरवतात. ओघानंच दोन्ही तत्त्वपरंपरा मृत्यूच्या भयामुळे निर्माण झालेल्या धर्मश्रद्धांचे कर्दनकाळ आहेत. प्रखर अस्तित्वभान आणि ‘स्व’ ची काळजी हा यांच्यातला समान धागा. दोन्ही विचारप्रवाह निसर्गवादी आहेत. स्वत:च्या नैसर्गिक क्षमता ओळखून, त्यांना इच्छाशक्तीच्या बळावर जागृत करून भोवतालाशी सुसंगत जगण्यातच खरा आनंद आहे, हे तत्त्व दोन्ही विचारप्रवाह स्वीकारतात.
मानवी स्वातंत्र्याबाबत स्टोइसिझमची द्वैतवादी भूमिका आहे. स्टोइसिझम मनुष्याच्या अंतरंगाच्या बाबतीत स्वातंत्र्याचा, तर बाह्य जगाविषयी नियतीवादाचा पुरस्कार करतं. ऑरेलिअसच्या शब्दात सांगायचं तर, ‘फक्त मनाला आपण नियंत्रित करू शकतो- बाह्य घटनांना नाही! हे लक्षात ठेवून आपण आपल्यातल्या इच्छाशक्तीचा शोध घ्यावा’
स्टोइसिझमनुसार अंतर्मुख होऊन अंतरंगाचा ताबा घेतल्यास स्वातंत्र्याची अनुभूती होते. बाहेरची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आंतरिक स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. कारण आतल्या जीवनाच्या किल्ल्या आपल्या हातात असतात. सतत विचारशील राहून आतल्या गाभाऱ्याची रचना आणि विस्तार करणं माणसाचं नित्याचं कर्तव्य असतं. मार्कस ऑरेलिअस दैनंदिन विचारशीलतेला स्वातंत्र्याचं द्याोतक मानतो. तो म्हणतो, ‘very little is needed to make a happy life; it is all within yourself in your way of thinking.’ त्यामुळे स्टोइसिझमसाठी दैनंदिन चिंतन जणू प्रार्थनेसारखं आहे. स्टोइकांसाठी फिलॉसफी ईश्वराचं स्थान प्राप्त करते. स्टोइकांच्या प्रार्थनेचं विश्लेषण केल्यावर त्यांची जीवनदृष्टी अधिक स्पष्ट होते. ‘ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलण्यासाठी धैर्य मिळू दे! ज्या गोष्टी बदलू शकत नाहीत, त्यांचा स्वीकार निर्विकारपणे करण्यासाठी शांतचित्त लाभूदे! आणि माझ्यासाठी शक्य काय आणि अशक्य काय यांतला भेद कळण्यासाठी शहाणपण मिळू दे!’ थोडक्यात, बाह्य घटनांच्या बाबतीत स्टोइसिझम नियतीवादी आहे. स्टोइकांच्या नियतीवादात आगंतुकतेला स्थान नाही. नियतीला टाळता येत नाही म्हणून फरफटत जाण्याऐवजी स्वेच्छेनं नियतीसोबत जाण्यात खरं माणूसपण आहे.
हेही वाचा
स्टोइसिझममध्ये ‘प्लेजर’ आणि ‘हॅपीनेस’ यांत भेद स्पष्ट आहे. स्टोइकांचा आनंद सुखदु:खातीत निर्विकार अवस्था आहे. स्वत:च्या भावना आणि वासनांवर स्वामित्व मिळवणं स्टोइसिझमचा गाभा आहे. स्टोइक मनाकडे एखाद्या अभेद्या किल्ल्यासारखं पाहतात. मनाच्या तटबंदीवर सतत काम करत राहणं जेणेकरून बाहेरच्या वादळांचा निर्विकारपणे सामना करता यावा. त्यामुळे स्टोइकांचा दावा आहे की, स्टोइसिझम हे निष्क्रियतेचं प्रतीक नसून ‘निर्विकार कृतीशीलते’चं प्रतीक आहे. स्टोइसिझम अंतर्मुखतेला बहिर्मुखतेची पूर्वअट मानतो. मनोबल, स्पष्टता आणि निर्विकार मनस्थिती हे सर्वोच्च गुण समजले जातात.
थोडक्यात, स्टोइसिझमध्ये तत्कालीन साम्राज्यवादी राज्यसंस्था लोकांच्या आवाक्याबाहेरची महाशक्ती वाटते. अशा ईश्वरसदृश राज्यसंस्थेअंतर्गत सत्तेच्या अतिकेंद्रीकरणामुळे सामाजघटकांतली आत्मीयता लोप पावते आणि परात्मता वाढते. परिणामी बहुतेक मूक होतात आणि मोजकेच अंतर्मुख होऊन स्वत:च्या स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवू शकतात. त्यामुळे स्टोइसिझम हा एपिक्युरियन तत्त्वज्ञानाप्रमाणे मोजक्यांनाच झेपेल असा प्रखर बुद्धिवादी भौतिकवाद आहे. मात्र त्यातल्या स्वातंत्र्याविषयीचं द्वैत एकाप्रकारे ख्रिास्ती धर्मातील अध्यात्मिक समता आणि सामाजिक विषमता या द्वैताची नांदी ठरतं. त्यामुळे एपिक्युरिअनिझमला झाला, तसा विरोध ख्रिास्ती धर्मसंस्थेकडून स्टोइसिझमला झाल्याचं दिसत नाही.
Dr. Ambedkar reformed labour laws in India: संपूर्ण देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह पहायला मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अफाट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नामुळे फक्त दलितच नाही तर सर्व समाजातील कामगारांना काद्याचे संरक्षण मिळाले आहे. किमान वेतन, महागाई भत्ता, भर पगारी रजा, बोनस, आठ तास कामाचा दिवस, मध्यान्ह जेवणाची सुट्टी, अतिरिक्त कामासाठी दुप्पट दराने वेतन, आठवड्याची सुट्टी, असे अनेक दैनंदिन जीवनाशी निगडित अधिकार भारतामधील कामगारांना व कर्मचार्यांना मिळेत आहेत ते फक्त एका काद्यामुळे. कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देणारा हा कायदा आहे कामगार कायदा.
कामगार काद्यामुळेच कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत आहे. कुशल किंवा अकुशल कर्मचारी नुसार किमान वेतन बदलते. 2017 मध्ये, महिलांसाठी उपलब्ध सशुल्क प्रसूती रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्यात आली. जर एखाद्या महिलेने गेल्या 12 महिन्यांत 80 दिवसांपेक्षा जास्त काळ एखाद्या संस्थेत काम केले असेल, तर त्या महिलेा सशुल्क प्रसुती रजेचा लाभ मिळतो. 3 महिन्यांपेक्षा कमी वयाचे मूल दत्तक घेतले असल्यास, दत्तक घेतल्याच्या तारखेपासून 12 आठवड्यांच्या सशुल्क प्रसूती रजेसाठी देखील अर्ज करता येतो. सरोगेट मदर असलेल्या महिलेला मुलाच्या जन्माच्या दिवसापासून 12 आठवड्यांची प्रसूती रजा मिळते. मालकाने किंवा कंपनीने परस्पर सहमती दर्शवल्यास 26 आठवड्यांचा रजेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर महिला घरूनही काम करू शकतात.
एखाद्या कंपनीने दर महिन्याला उशीर पगार दिल्यास पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट, 1936 नुसार केल्यास मालकावर गुन्हा दाखल होऊ शकतो. समान मोबदला कायद्याअंतर्गत महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळते. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ झाल्यास लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा 2013 मध्ये लागू करण्यात आला. कर्माचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करुन भविष्य निर्वाह निधी कायदा बनवण्यात आला. या कायद्याचा उद्देश कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची बचत करणे हा आहे. कर्मचारी राज्य विमा योजना ही भारत सरकारद्वारे प्रदान केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे, जी नोकरीवर असताना झालेल्या दुखापती, आजारपण किंवा प्रसूतीच्या बाबतीत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा मिळते.
1965 नुसार, कंपन्यांना वैधानिक बोनस देणे बंधनकारक आहे. बोनसची किमान मर्यादा 8.33% आहे, म्हणजेच तुमच्या कंपनीने तुम्हाला तुमच्या वेतनाच्या 8.33% इतका किमान बोनस देणे आवश्यक आहे. एखाद्या कंपनीत पाच वर्षांहून अधिक काळ काम केले असेल आणि सोडण्याचा निर्णय घेतला असेल, तर कंपनीत काम केलेल्या प्रत्येक वर्षासाठी 15 दिवसांची ग्रॅच्युइटी मिळण्याचा अधिकार आहे.
फलटण :- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा! डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते.त्यांच्या आणि गांधीजींच्या संबंधांबद्दल अनेक विचारवंतांनी मांडणी केली आहे.या प्रस्तुत लेखात अहिंसेबद्दल त्यांची मते परस्पर पूरक होते की त्यांच्यात तीव्र मतभेद होते.हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच गांधीजींच्या मतांमध्ये परिवर्तन कसे होत गेले हेही यातून लक्षात येईल.हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त घेतलेला आढावा………
सत्य अहिंसेवरील गांधीजींची निष्ठा अपूर्व होती. त्यांचे जीवन अत्यंत शिस्तमय,सुसूत्र आणि शाश्वत मानवी मूल्यांवर आधारलेले होते.अहिंसा आणि सत्यावर त्यांची अढळ श्रध्दा असल्याने आयुष्यभर त्यांनी त्याचा पुरस्कार केला. २ ऑक्टोबर हा म.गांधीजींचा जन्मदिन सरकारी कार्यालयातून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सर्व कार्यालयांना, बँकांना, शाळा महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात येते. २ ऑक्टोबर २००७ या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात आला. २ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येणे हे सर्व भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.यामुळे जगाने सत्य अहिंसेची शिकवण देणार्या् या महात्म्याला वंदन केले आहे.परंतु गांधीजींच्या अहिंसेच्या संकल्पनेवर बरीच मतमतांतरे आहेत. त्यांच्या याबाबतच्या भूमिकेमुळे त्यांना नेहमीच टीकेचा सामना करावा लागला आहे.तो आज ही काम आहे. गांधींची शिकवण पाहिली तर ती दिसायला मोठी गोंडस आहे. सत्य आणि अहिंसा ही उदात्त तत्वे आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही. ती अगदी अनादिकालापासून मानवी समूहाने आत्मसात केलेली आहेत.तरीही गांधीजींनी ही तत्वे आधुनिक जगाला अपूर्व गाजावाजाने सांगितली. गांधीजी म्हणतात,‘अहिंसा हा सत्याचा पाया आहे. सत्याला जर अहिंसेचा आधार नसेल तर सत्याचे पालन असंभवनीय आहे.’असा माझा विश्वास आहे.अति तृष्णा सोडा, शेजार्यांरची सेवा करावयास शिका, व्यवहारात सत्यता पाळा,सहिष्णू बना, ईश्वरावर विश्वास ठेवा. लोभामुळे कोणावरही आक्रमण करू नका,कोणी दृष्टपणाने तुमच्यावर आक्रमण केले तर त्याला न मारता स्वत: मरायला शिका, भ्याडपणा आणि अहिंसा एक नव्हेत. शौर्याच्या परिसीमेला अहिंसा हे दुसरे नाव आहे. बलवानच क्षमा करू शकतो. पृष्ठ.91-92 असा पद्धतीने गांधीजीनी नि:शस्त्र प्रतिकारच्या पद्धतीचा स्वीकार केला आहे. गांधीजींचे अहिंसेचे स्वरूप कसे आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी इंग्रज लोकांना उद्देशून जे अनावृत पत्र लिहिले त्या पत्रावरून स्पष्ट होते. जर्मन लोकांनी इंग्लंडवरती स्वारी केली असताना आपला बचाव कोणत्या मार्गाने करावा याबाबतीत इंग्रज लोकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात गांधीजी म्हणतात, ‘ब्रिटिश जनतेने शस्त्राशिवाय जर्मन राष्ट्राचा प्रतिकार करण्याचा निर्धार करावा.हिटलर किंवा मुसोलिनी इंग्लिश भूमीवर स्वारी करण्याच्या अगोदरच ‘या तुम्हाला हवे असेल ते घ्या’ असे जाहिर करा तसेच हिटलरला स्वारी करून जे काही घ्यायचे असेल ते त्याला घेऊ द्या व हिटलर व त्याच्या सैनिकांना जर तुमच्या घरादारांचा ताबा घ्यावयाचा असेल तर व हिटलर जर तुम्हाला देश सोडून जाऊ देत नसेल तर त्याच्या हातून मरण्यास सिध्द व्हा. परंतु आत्मरक्षणासाठीकोणत्याही शस्त्रास्त्रांचा उपयोग करू नका.’’268 गांधीजींची ही योजना कोणताही सुज्ञ माणूस स्वीकारू शकत नाही. कारण सर्वच ठिकाणी अहिंसा धर्म पाळणे कठीण आहे. गांधीजींची नि:शस्त्र प्रतिकाराची योजना मनुष्यमात्राच्या जीवनाला पूर्णपणे उपयुक्त आहे असे म्हणता येणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी याविषयी विस्तृतपणे आपले मत मांडले आहे. ते म्हणतात, …….. “आज जगामध्ये अनेक राष्ट्रे गुलामगिरीत आहेत. त्या सर्व राष्ट्रांची मुक्तता व्हावयाची आहे. नैतिक बळाने त्यांची मुक्तता होणे शक्य असेल, तर पाशवी शक्तीचा विनाकारण उपयोग करा, असे म्हणणार्यात माणसास वेडयात काढण्यास कोणीच हरकत घेणार नाही.परंतु नैतिक बळाने हे कार्य होणार नसेल तर या कार्याला पाशवी शक्तीचा उपयोग करू नये, असे म्हणणार्याी माणसालाही मूर्खात काढल्याशिवाय गत्यंतर नाही. शक्ति साधन आहे.स्वातंत्र्य हे ध्येय आहे.ध्येय जर निष्कलंक व शुद्ध असेल तर त्या ध्येयाची सिद्धी करण्याकरिताआत्यंतिक साधनांचा उपयोग करण्यास नीतीचे तत्व आड येऊ शकत नाही व जर आले तर ते नीतीचे तत्व खोटे आहे.असे म्हणण्यास काही हरकत नाही. अहिंसा हे साधन आहे. ध्येय नव्हे आणि ध्येयानुसार साधनांची युक्तायुक्तता ठरवायची असते.’’275 पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “ अहिंसा एक साधन आहे. ध्येय संपादनाकरिता ते जर पुरे पडत असेल तर पाशवी शक्तीचा कोणीही उपयोग करू नये,असे म्हणता येईल, परंतु ध्येयाच्या संपादनाकरिता जर अहिंसेचे साधन अपुरे पडत आहे आणि ध्येयाचा नाश होत आहे, तरी सुद्धा अहिंसेशिवाय दुसर्यात कोणत्याच साधनाचा उपयोग करता कामा नये,असा आग्रह धरणार्यान माणसाला मूर्खातच काढावे लागेल.”275 असे विस्तृत मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले आहे. वास्तविक पाहता सत्य आणि अहिंसा ही उदात्त तत्वे असून बुद्धानी ही तत्वे अखिल मानवजातीला दिलेली आहेत. त्याच्यामुळे याचे श्रेय गांधीजींना देता येणार नाही. गांधीजींनी त्याला व्यापक अर्थ देण्याचा प्रयत्न केला असे हवे तर म्हणता येईल.कारण मानवी समाजाच्या रक्षणासाठी सत्य व अहिंसा ही दोन तत्वे उपयुक्तच नाहीत तर अत्यावश्यकच आहेत. हे नव्याने सांगण्याची गरज नाही. बुद्धाची अहिंसा वैष्णव तथा जैन धर्मातील अहिंसेचा गांधीजींच्या मनावर मोठा पगडा होता. त्यामुळे गांधीजींच्या अहिंसेची संकल्पना यात तफावत आहे. अहिंसा तत्व हे याच भूमित उदयाला आले. आर्य लोक हे ध्येयाने व कृतीने हिंसावादी होते. यज्ञ हा त्यांच्या धर्माचा मुख्य पाया. त्या यज्ञात हिंसा व मद्यपान याशिवाय दुसरे काहीच नसे. या हिंसेचा इतका अतिरेक झाला होता की,त्या काळच्या काही आर्य लोकांना त्यांच्या हिंसेचा वीट आला होता.या हिंसक आर्य धर्माला कंटाळून महावीराने अहिंसावादी जैन धर्म प्रस्थापित केला. पण या दोहोत तत्वाचा अतिरेक झाला. आर्यांची आत्यंतिक हिंसा वृती तर जैनांची आत्यंतिक! या दोन्ही अव्यवहारी वृती असल्याने गौतम बुद्धाने आपला बौद्ध धर्म प्रस्थापित केला. या दोहोतील अतिरेक सोडून त्यातील सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न बुद्धाने केला. ,‘शक्य तोवर अहिंसा, जरूर तर हिंसा ही गौतम बुद्धाची भूमिका होती.”277थोडक्यात तथागत गौतम बुद्धाने या दोन्ही भूमिका तपासूनच सुवर्णमध्य साधला आहे. कारण अहिंसा व हिंसा ही दोन साधने आहेत. त्यामुळे शक्य तोवर अहिंसा मार्गाचा वापर करून शांततेसाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. परंतु जर ध्येय नैतिक मूल्यांवर आधारित असेल व त्या ठिकाणी त्यांच्या पूर्तीसाठी हिंसा करावी लागत असेल तर ती करण्याचे स्वातंत्र्य बुद्धाने दिले आहे. बुद्धाने अहिंसेला तत्व मानले. गांधीजींनी मात्र अहिंसेला नियम मानले; नियम पाळावयाचा असतो. नियम झाला की माणूस त्याचा गुलाम होतो. तत्व ठरले की माणूस त्याचा उपासक होतो. हा फरक तत्व आणि नियममध्ये असतो. 2 मार्च 1922 च्या यंग इंडियाच्या अंकात अहिंसेविषयी गांधीजींनी काही मुद्दे स्पष्ट केले.त्यामध्ये ते म्हणतात, ‘……I may be bold to say that violence is the creed of no religion and that, where as non-violence in most cases, is obligatory in all, violence is merely permissible in some cases. But I have not put before India the final from of non-violence……’279 हिंसा हे कोणत्याच धर्माचे ब्रीद नाही. उलटपक्षी बहुतेक सर्व धर्मात आहिंसा धर्माचे पालन करण्याचे बंधन त्या त्या धर्मातील व्यक्तीमात्रावर घालण्यात आले असून प्रसंगविशेष केवळ आपद्धर्म कर्म म्हणूनच हिंसेला मान्यता देण्यात आलेली आहे. शिवाय आत्यंतिक स्वरुपाच्या अहिंसेचा मार्ग मी हिंदुस्तानपुढे ठेवलेला नाही.’279यावरून गांधीजींनी आत्यंतिक स्वरुपाच्या अहिंसेचा मार्ग सांगितला नसल्याचे प्रतित होते. गांधीजींनी वेळोवेळी आपल्या मतांमध्ये बदल केला आहे. याचाच प्रत्यय 9 मार्च 1922 च्या यंग इंडियाच्या अंकातील विचारावरून येतो, ते म्हणतात,’ ‘……I entirely endorse that opinion that swaraj is the nation’s goal, not non-violence, it is true that my goal is as much swaraj as non-violence because I hold swaraj for the masses to be unattainable save through non-violence.But have I not repeatedly said in these columns that it would have India to become free even by violence rather that she should remain in bondage?” 280 “ राष्ट्राचे ध्येय स्वराज्य आहे,अहिंसा नव्हे या मताला माझी पूर्ण संमती आहे. माझ्या बाबतीत ही अहिंसा हे माझे ध्येय आहे. परंतु त्याबरोबर स्वराज्य हे देखील माझे ध्येय आहे, हे ही तितकेच खरे आहे कारण अहिंसा मार्गाचा अवलंब केल्याशिवाय जनतेला स्वराज्य प्राप्ती होणे अशक्य आहे. परंतु हिंदुस्तान देश पारतंत्र्याच्या बेडीत खितपत राहण्यापेक्षा अत्याचारच्या मार्गाने स्वराज्य मिळवणे मी पत्करेल……..२७९.” गांधीजींनी दि.२९मे १९२४ च्या यंग इंडियाच्या अंकात हिंदू मुसलमानाच्यादंग्यावरती एक लेख लिहिला त्यात असणारी त्यांची मते त्यांच्यामध्ये झालेले परिवर्तन दर्शवितात. ‘……I do not say ‘ eschew violence in your dealing with robbers or thieves or with nations that may invade India .’ But in order that we are better able to do so, we must learn to restrain ourselves. It is a sign of strength but of weakness to take up the pistol on the slightest pretext. Mutual fisticuffs are a training not in violence but in emaseution. My method of non- violence can never lead to loss of strength, but it alone will make it possible, if the nation wills it, to offer disciplined and concerted violence in the time of danger.’282 ‘………चोर,दरोडेखोर अगर हिंदुस्तान देशावर सवारी करणार्याcराष्ट्राचा समाचार घेताना ‘अत्याचार टाळा,अहिंसा पाळा’ असे मी मुळीच म्हणत नाही. परंतु अनत्याचारी व्रत धारण करण्यास समर्थ होण्यासाठी आपण संयम राखण्यास शिकले पाहिजे.क्षुल्लक कारणासाठी पिस्तुलाला हात घालावे हे ताकतीचे लक्षण नसून कमकुवतपणाचे लक्षण आहे. आपापसातील हातघाईने अत्याचाराचे शिक्षण न मिळता उलट नामर्दपणाच निर्माण होतो. माझ्या अनत्याचारीपद्धतीने बलहीनता येणे कदापि शक्य नसून,उलट ती मुळेच वेळ पडल्यास संकटसमयी राष्ट्राची इच्छा असल्यास पद्धतशीर शिस्तीने संघटितपणे अत्याचारी मार्गाचा अवलंब करणे शक्य होईल.’२८२ वरील लेखामधील गांधीजींचे मत हे त्यांचे परिवर्तन दर्शविते. ज्यावेळी बार्डोलीचा कायदेभंगाचा कार्यक्रम पुढे ढकलला गेला त्यावेळी गांधीजींची त्याबद्दल मिस्टर पोल रिचर्ड नावाच्या गृहस्थाबरोबर चर्चा झाली होती त्यावेळी गांधीजी म्हणाले, “ I do not work for freedom of India, I work for non-violence in the world and that is the difference between me and Mr.Tilak. Mr.Tilak was telling me, ‘I would sacrifice even truth for freedom of my country; but I am ready to sacrifice even freedom for the sake of truth.” “माझे कार्य हिंदुस्थान देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे नसून जगात अहिंसा तत्वाची प्राण प्रतिष्ठा करणे हे आहे. हा मी आणि टिळक यांच्यातला भेद आहे. टिळक मला म्हणत,” माझ्या देशाच्या करिता मी सत्याचा देखील बळी देईल.’परंतु मी म्हणतो की,’सत्याकरिता देशाच्या स्वातंत्र्याचाच बळी देण्यास देखील माझी तयारी आहे.”२८३ वरील विधानाचा खुलासा मि. रिचर्ड यांनी त्यावेळच्या ‘लोकमान्य’ वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी केला व म्हणाले की,गांधीजींची तहान हिंदुस्थानच्या पुढारपणानेभागणार नसून त्यांना जगातला महात्मा होण्याची इच्छा झाली आहे. या विधानासंबंधी पत्रकारांनी गांधीजींना विचारले त्यास उत्तर देण्यासाठी गांधीजींनी २३ फेब्रुवारी १९२२ च्या यंग इंडिया च्या अंकात ‘Noendtomysorrow’ माझ्या खेदाला सीमा उरली नाही हा लेख लिहिला.त्यात त्यांनी संगितले की,माझ्या तोंडी मि. रिचर्ड यांनी जे शब्द घातले आहेत त्यात अंतर्भूत असलेले सत्य मला नाकबूल करता येणार नाही,’It is not possible to deny the substance of it.)284 यावरून गांधीजींना जगातील अद्वितीय पुरुष म्हणून किर्ती संपादन करण्याची ओढलागल्याचे मि. रिचर्ड स्पष्ट करतात. याचाच भाग म्हणून गांधीजींनी आपल्या मतांमध्ये आमुलाग्र बदल घडवले. अगदी शेवटी ते म्हणतात, “ माझ्या श्रद्धाबद्दल मी गर्व बाळगीत नाही. पण माझ्या इतका दूसरा अहिंसेचा उपासक असेल असे मला वाटत नाही. माझी अहिंसा शुरांची आहे:भ्याडांची नाही. मी अहिंसेचे व्रत घेतले. यादवी युद्ध,भाऊ बंदकी:हिंदू मुस्लीम दंगल यांच्या मी पूर्ण विरोधी आहे. पण जेव्हा काही खडतर निर्णय घ्यायचे असतात,तेव्हा मला रक्तपाताची भिती वाटते. आज मला माझी अनुकंपा वाटत आहे.”१ गांधीजींचा पिंड आध्यात्मिक असल्याने त्यांनी समाजकारण, राजकरणाला आध्यात्मिक आणि अहिंसात्मक अधिष्ठान दिले. १९२७ साली भारत भेटीवर आलेल्या रेव्हरंड मोटयाधर्मगुरूच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,’ कितीही दाबाब आणून चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्याला अहिंसक आणि शांततापूर्ण प्रतिकार करण्याची येथील गरीब आणि सामान्य माणसाची क्षमता मला उमेद देणारी आहे.’१६-१७ त्यामुळे या देशाबद्दल मला आशा वाटते. वरवर पाहता गांधीजींनी आत्यंतिक अहिंसेचा स्वीकार केला नसला तरी त्यांच्या कृतीतून मात्र त्यांनी आत्यंतिक अहिंसेचाच पुरस्कार केल्याचे प्रतित होते. हिंसेपासून पुर्णपणे अलिप्त राहणेच त्यांनी पसंत केले आहे. अहिंसेचा गर्भितार्थ सांगताना ते म्हणतात,’दृष्टत्वाशी असहकार केल्याने मिळणारी शिक्षा स्वेच्छेने स्वीकारणे म्हणजे अहिंसा’११६ असा अहिंसेविषयी दृष्टीकोन गांधीजी मांडतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची अहिंसेविषयीची भूमिका परस्पर पूरक वाटते.डॉ. आंबेडकर ही अहिंसेचे पुरस्कर्ते होते. परंतु सत्यावाचून अहिंसेला अर्थ नाही अशी त्यांची भूमिका होती. सुप्तावस्था म्हणजे अहिंसा नव्हे. बलवंतांची अहिंसा त्यांना मान्य होती. म्हणून बर्टाड रसेलच्या अहिंसेचे त्यांनी कौतुक केले. महाड सत्याग्रहात प्रतिकारापासून अलिप्त ठेवले परावृत्त केले.’१४४ २० जुलैच्या समता सैनिक दलाच्या अधिवेशनात त्यांनी अहिंसेच्या तत्वाची चर्चा केली. यासाठी त्यांनी तुकारामाच्या प्रसिद्ध अभंगाचा आधार घेतला. ‘भूतदया आणि दृष्टांचे निर्दालन’ यातील ‘दृष्टांचे निर्दालन’ हे महत्वाचे असून शीलाचे नियंत्रण असलेली शक्ति हाच आमचा आदर्श आहे. असे जाहिर सांगितले.गांधीजींच्या अहिंसा सिद्धांतावर त्यांच्या हयातीत नव्हे तर आजही खूप टीका होते. गांधीजींच्या अहिंसा सिद्धांतावर आक्षेप घेताना सुभाषचंद्र बोस, म्हणाले,‘ जर गांधीजी दुसर्याो देशात जन्माला आले असते तर त्याठिकाणी ते राहू शकले नसते. त्यांच्या अहिंसेच्या सिद्धांतामुळे त्यांना सुळावर चढवले असते किंवा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवले असते. हिंदुस्थानची गोष्ट वेगळी आहे. पृ.६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही १९४१ साली अहमदाबादेत पेटलेल्या जातीय दंगली संबंधी आपल्या मालकीच्या ‘जनता’ या पत्रात ११ मे १९४१ ला लेख लिहून गांधीजींच्या अहिंसेच्या सिद्धांताची आलोचना केली. या मराठी लेखात त्यांनी गांधीजींचा उल्लेख एकेरी केला आहे. ते म्हणतात,‘ज्या दिवशी गांधीला ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली तो दिवस देशाच्या इतिहासात मोठा दुर्भाग्याचा आणि ज्या महापुरुषाला गांधीजीला महात्मा ही पदवी देण्याची बुध्दी झाली त्याला काळपुरुष समजण्यास हरकत नाही. महात्मा सर्व परीने जनतेवर आपत्ती आहे… लोक खुळे असल्याखेरीज महात्मेगिरी चालू शकत नाही आणि महात्मेगिरीचा पगडा लोकांवर बसला म्हणजे लोक खुळे होतात,गुलाम बनतात,गांधीची महात्मेगिरी अहिंसेवरच उभारलेली होती. अहिंसेच्या घोषणेमुळे ती टिकून राहिली. एकंदरीत गांधीजी अहिंसा म्हणजे एक मोठे ढोंग होते हे अहमदाबादच्या दंगलीमुळे सिद्ध झाले. अहमदाबादला हिंदू-मुसलमानांचा दंगा झाला नसता आणि तेथील हिंदूंची अहिंसेमुळे धूळधाण झाली नसती तर गांधी अहिंसेचे ढोंग आपल्या बडेजावाकरता तसेच उराशी धरून बसला असता अहमदाबादच्या दंग्याने ‘बरे झाले, राख उडाली, कोळसा राहिला, महात्मा गेला माणूस राहिला’ असे उद्गार काढण्यास जागा झाली. असा प्रकारे डॉ. आंबेडकरांनी गांधीजींच्या अहिंसा सिद्धांतावर खरमरीत टीका केली.गांधीजींनी काळानुरूप आपल्या मतांमध्ये परिवर्तन घडवले.त्यांची अहिंसा म्हणजे कुणाला न मारणे अथवा जखमी न करणे एवढाच भाग नव्हता. त्यांची अहिंसा भ्याडाची नव्हती तर शुराची होती.अहिंसेला गांधीजींनी आपल्या एकादशव्रतात स्थान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अहिंसा ही सुद्धा बलवंताचीच होती. त्यांच्या अहिंसेच्या मताचा विचार करता एखाद्या स्त्रीवर जर अत्याचार होत असेल तर तिने जिवाच्या आकांताने त्याचा प्रतिकार केला पाहिजे प्रसंगी त्यात प्राण गेले किंवा घेतले तरी हरकत नाही.कोणत्याही प्रकारच्या अत्याचारला शरण न जाता त्याचा निकराने प्रतिकार करणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होते. आपल्या न्यायी हक्कांसाठी शक्य तोवर अहिंसेच्या मार्गानेच लढा द्यायचा. त्यातून जर अपयश येणार असेल तर मात्र कोणत्याही प्रकारच्या लढ्याला सामोरे जाण्यासाठी हिंसेचा मार्ग चोखळला तरी हरकत नाही. परंतु प्रत्यक्षात मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही लढ्यामध्ये सनदशीर मार्ग सोडला नाही. आपले प्रत्येक आंदोलन हे नि:शस्त्र तत्वानेच पूर्णत्वाला नेले. मानवी हक्कांसाठीची लढाई त्यांनी बुद्धाच्या अहिंसेच्या तत्वाप्रमाणे लढून जन सामान्यांना न्यायी हक्क मिळवून दिले. अहिंसेचा खरा अर्थ सर्व प्राणिमात्रांवर,जीव जंतूनवर दया दाखवणे होय.फक्त कायेनेनव्हे तरकायेने, वाचेने,मनाने कोणाचीही हिंसा न करणे म्हणजेच अहिंसा.असाविचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात. ‘हिंसा, अहिंसा व सत्याग्रह यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मनन करण्यासारखा आहे.’
देव्हाऱ्यावरि विंचू आला । देवपूजा नावडे त्याला । तेथें पैजारेचें काम । अधमासि तों अधम ॥ दया तिचे नाव भुतांचे पालन । आणिक निर्दालन कंटकाचे ॥
“माझा आहिंसेवर विश्वास आहे.पण थोर संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ती आहिंसा असायला पाहिजे. तुकाराम महाराज बरोबरच सांगतात की ,आहिंसा दोन गोष्टींची मिळून होत असते.सर्व प्राणी मात्रांविषयी प्रेम, दया बुद्धी आणि दृष्टांचा संहार. अहिंसेच्या व्याखेच्या या दुसऱ्या भागाकडे प्राय:दुर्लक्ष होते आणि ते तसे होत असल्यामुळे आहिंसा येवढी हास्यास्पद ठरते. सर्व दृष्टांचा संहार करणे हा आहिंसा तत्वाचा प्रमुख घटक आहे.त्याच्या विना आहिंसा ही फक्त पोकळ शिंपल्यासारखी आहे. केवळ शोभेची वस्तू आहे.मग आहिंसा ही एक सकारात्मक कृती उरत नाही. (डॉ.बाबासाहेब आंबेडकर(नागपुर येथील समता सैनिक दलाच्या परिषदेत केलेल्या भाषणातून ) या तुकोबाच्या उक्तीशी आंबेडकरांच्या विचाराचे साधर्म्य आहे.”९५ आणि अहिंसा परमो धर्म: हे तत्व सर्वच ठिकाणी पाळता येणे शक्य नाही. आपला जीव घेणारा,स्त्रीवर अत्याचार करणारा,धनदौलत लुटणारा यांच्याशी झालेल्या झगडयात तो मरण पावला तर त्याच्या हत्येचे पाप हत्या करणार्यामस लागत नाही. जो दृष्ट मरतो तो आपल्या पापकर्माने. हिंसा म्हणजे मन दुखवणे असे असेल तर गांधीजींची अहिंसा ही एक हिंसाच आहे. अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अहिंसा तत्वाचे विश्लेषण केले आहे. गांधीजी पुढे म्हणतात,“व्यवहारातील सबलतेला बाजूला करून निष्क्रियता पत्करणे,कर्तव्यापासून पराड:मुख होणे याला अहिंसा म्हणता येणार नाही. अन्यायाचा अहिंसात्मक प्रतिकार करणे शक्य नसेल,तर त्यासाठी शस्त्राचा अवलंब केला तरी चालेल. पण भ्याडपणाने स्वस्थ बसणे हे मानवी प्रतिष्ठेला न शोभणारे आहे.”२५ असे मत गांधीजी व्यक्त केले आहे. असे मत व्यक्त करणारे गांधीजी मात्र हिंसात्मक मार्ग हा काही झाले तरी गौण असल्याचे बजावतात. अहिंसेच्या तत्वाला मुरड घालण्याची वेळ येऊ नये याकरता माणसाने आपली नैतिक शुद्धता व सामर्थ्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.२६ असे मत गांधीजी मांडतात. अगदी शंभर टक्के अहिंसा हे अंतिम ध्येय आहे. प्रत्यक्ष जीवनात किती प्रमाणात तिचे आचरण करता येईल,हे प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून असून प्रत्येकाने याचा विचार गांभिर्याने करावा. सर्व प्राणिमात्रावर दया दाखवून सत्य व अहिंसेच्या तत्वावर आपले नितिमान जीवन जगण्याचा विचार गांधीजी देतात. गांधीजी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार परस्पर पूरक वाटतात. काळाची पावले ओळखून मानवाला आपली वाट चोखाळावी लागते. याचाच भाग म्हणून गांधीजींनी आपल्या विचारात परिवर्तन घडवून आणले. त्यांना ते परिवर्तन करावे लागले.
आरसीबीने राजस्थान रॉयल्सविरूद्ध सहज विजय मिळवत आयपीएल २०२५ मधील तिसरा विजय नोंदवला. विराट कोहली आणि फिल सॉल्टच्या ९० अधिक धावांच्या भागीदारीसह संघाने विजयाचा पाया रचला. या सामन्यात विराट कोहलीने शानदार ६२ धावा केल्या तर त्याचा सलामीचा जोडीदार फिल साल्टनेही अर्धशतक (६५) झळकावले. सामन्यादरम्यान विराट कोहली आणि संजू सॅमसन यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.
१६ व्या षटकात, विराट कोहली आणि देवदत्त पडिकल क्रीजवर फलंदाजी करत होते. चेंडू तुषार देशपांडेच्या हातात होता. देशपांडेने चौथा चेंडू टाकला तेव्हा देवदत्त पडिक्कलने दोन धावा घेतल्या. धाव घेताना विराट कोहली धावता धावता अचानक थांबला. अचानक त्याला थोडं घाबरल्यासारखं वाटलं आणि तो बेचैन दिसला. यानंतर पंच आणि राजस्थानचे खेळाडू त्याच्याकडे आले. संजू सॅमसनने तर त्याच्या हृदयाचे ठोके तपासायला सुरुवात केली. विराटने स्वतः त्याला हार्ट रेट चेक कर सांगितलं.
राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकाच्या जोरावर ४ बाद १७३ धावा केल्या. जैस्वालने ४७ चेंडूत १० चौकार आणि दोन षटकारांसह ७५ धावा केल्या. त्याने रियान परागबरोबर (३०)दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली.
१७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या संघाने आरसीबीला केवळ १७.३ षटकांत विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्सकडून फक्त कुमार कार्तिकेयने १ विकेट घेतली. राजस्थानची फिल्डिंगही त्यांच्या पराभवाचे कारण ठरले. सामन्याच्या पहिल्याच षटकात रियान परागने विराट कोहलीचा झेल सोडला. विराट कोहलीने या जीवनदानानंतर संघाला विजय मिळवून दिला.
mi fans shouts about rohit sharma captaincy owner nita ambani gives this answer shirdi sai temple video goes viral | “रोहितला कॅप्टन करा मॅडम…”, शिर्डीच्या साई मंदिरात चाहत्याची मागणी; नीता अंबानींनी एका वाक्यात दिलं उत्तर
फलटण साहस Times :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाच फक्त सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृती नव्हे, तर महावितरणच्या अजब कारभारामुळे मंगळवार पेठ, फलटण येथील नागरिकांना चक्क अंधारात बसावे लागले. आज सध्यांकाळी २ ते २.३० तासांपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
संपूर्ण भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन चालू असताना . काही ठिकाणी ध्वनी-प्रक्षेपणाची तयारी, सुरू असताना. अशा वेळी अचानक वीज गायब झाल्याने सर्वच कार्यक्रम ठप्प झाले.
स्थानीय नागरिकांनी महावितरण कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, सोशल मीडियावरही नागरिकांनी संताप व्यक्त करत महावितरणला जाब विचारला.
“प्रत्येक वर्षी बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी असेच होणार का?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. यावर महावितरणने तात्काळ खुलासा करावा व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Forgive my mistakes Mayawatis nephew Akash Anand urges BSP chief to take him back | ‘मला क्षमा करा, परत सासऱ्याचं ऐकणार नाही’, मायावतींच्या पुतण्याचा माफीनामा; पक्षात परत घेतले जाणार?