Saturday, July 25, 2026
Home Blog Page 416

बॉइज हॉस्टेलमधल्या सूटकेसमध्ये गर्लफ्रेंड? Video समोर आल्यावर विद्यापीठ म्हणालं, ‘काही विद्यार्थिनींनी…’

0
बॉइज हॉस्टेलमधल्या सूटकेसमध्ये गर्लफ्रेंड? Video समोर आल्यावर विद्यापीठ म्हणालं, ‘काही विद्यार्थिनींनी…’


Viral Video of Hostel Girl In Suitcase: हरियाणामधील सोनीपतमधील ओपी जिंदल युनिव्हर्सिटी सध्या भारतभरात चर्चेत आहे ती या शैक्षणिक संस्थेमधील व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी हॉस्टेलच्या पॅजेसमध्ये एका सूटकेसमधून बाहेर पडताना दिसत आहे. एक तरुण आपल्या प्रेयसीला मुलांच्या हॉस्टेलमध्ये लपून घेऊन जात असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आल्याचा दावा या व्हायरल व्हिडीओसंदर्भात करण्यात आला. मात्र आता या प्रकरणावर शैक्षणिक संस्थेनं आपली बाजू मांडताना सत्य समोर आणलं आहे. 

काय म्हटलं आहे शैक्षणिक संस्थेनं याबद्दल?

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कॉलेज प्रशासनाने स्पष्टीकरण देताना हा संपूर्ण प्रकार म्हणजे एक प्रँक होता असं म्हटलं आहे. “मुलींच्या हॉस्टेलमध्येच काही विद्यार्थिनींनी जाणूनबुजून हा प्रँक गंमत म्हणून केलेला,” असं कॉलेजने म्हटलं आहे. मात्र हे प्रकरण कॉलेज प्रशासनाने गांभीर्याने घेतलं असून या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थिनींना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच या विद्यार्थिनींना शिस्तपालन समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचं कॉलेजने स्पष्ट केलं आहे. 

व्हिडीओत काय आहे?

विद्यार्थ्यांची सुरक्षा ही विद्यापीठासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचं प्रवक्त्यांनी रविवारी म्हटलं आहे. “या प्रकरणामध्ये आम्ही तातडीने आणि परिमाणकारक कारवाई केली आहे,” असंही प्रवक्त्यांनी सांगितलं. शुक्रवारी ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये महिला सुरक्षारक्षक हॉस्टेलच्या पॅसेजमध्ये एक सूटकेस उघडून तपासणी करत असताना त्या सूटकेसमधून चक्क एक तरुणी बाहेर पडताना दिसली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर आता शिक्षण संस्थेनं यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. 

सोशल मीडियावरील दावे…

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुलांच्या हॉस्टेलमध्ये एकाने आपल्या प्रेयसीला बॅगमध्ये लपवून आणलं होतं असा दावा करण्यात आलेला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण संस्थेतील सुरक्षेसंदर्भात अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळेच आता या संस्थेनं स्पष्टीकरण देताना हा सारा व्हिडीओ मुलींच्या हॉस्टेलमध्येच काही विद्यार्थिनींनी गंमत म्हणून शूट करुन व्हायरल केल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर व्हायरल होणारे दावे खोटे असल्याचं या विद्यापीठाने म्हटलं आहे. 

त्या विद्यार्थिनींना नोटीस

बॅगमध्ये बसून या विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीला फिरवत होत्या. त्यानंतर त्या सर्वजणी ही सूटकेस घेऊन हॉस्टेलच्या कॉरिडोअरमध्ये गेल्या. हा भाग सीसीटीव्ही क्षेत्राअंतर्गत येतो. सुरक्षारक्षकांना या बॅगेतून मुलीचा आवाज आल्यानंतर त्यांनी ही बॅग उघडून तपासली आणि त्यामधून एक तरुणी बाहेर पडली. या व्हिडीओवरुन टीका होऊ लागल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने, “मुलींच्या हॉस्टेलमध्येच गंमत म्हणून हा सारा प्रकार विद्यार्थिनींनी केला. मात्र हे सारं सार्वजनिक पॅसेजमध्ये घडलं. या प्रकरणातील सर्व विद्यार्थिनींना नोटीस पाठवम्यात आली असून त्याच्यावर शिस्तपालन समितीकडून कारवाई केली जाणार आहे. विद्यापीठासाठी विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे,” असं अधोरेखित केलं आहे.





Source link

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2025 How BJP allies and opposition Congress outdid each other

0
Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2025 How BJP allies and opposition Congress outdid each other



Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2025 How BJP allies and opposition Congress outdid each other | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाभोवती कसं फिरतंय देशाचं राजकारण?





Source link

दलित, पीडित आणि गरीबांच्या प्रगतीत बाबासाहेबांची सर्वात मोठी भूमिका, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

0
दलित, पीडित आणि गरीबांच्या प्रगतीत बाबासाहेबांची सर्वात मोठी भूमिका, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य



आज देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने त्यांचे नातू व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या शिकवणीवर पुन्हा एकदा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी बाबासाहेबांचा वारसा, त्यांची प्रासंगिकता आणि जातीयवादाच्या आव्हानांवर चर्चा केली. प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या योगदानावर आणि ‘संविधान वाचवा’ यावर वक्तव्य केले आहे.

डॉ. आंबेडकरांच्या विचारांची प्रासंगिकता सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही कशाप्रकारे पाहता?

त्यांची प्रासंगिकता मी तीन भागांत विभागेन. संविधान, अर्थव्यवस्था व सामाजिक प्रासंगिकता त्यासाठी बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. मात्र, हे काम अजूनही अपूर्ण राहिले आहे. जोपर्यंत देशासमोर याबाबतचे प्रश्न येत राहतील तोपर्यंत आपल्याला कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आणि लेखन यांकडे परत जावे लागेल.

गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा या निवडणुका विरोधी पक्षांच्या ‘संविधान वाचवा’ या जनादेशावर आधारित नव्हत्या का?
भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. मात्र, मला वाटत नाही की, हा जनादेश केवळ ‘संविधान वाचवा’ या मुद्द्यावर आधारित होता. त्यामध्ये अनेक घटक होते. त्यापैकी विरोधी पक्षाचे अपयश सर्वांत महत्त्वाचे होते. भाजपाच्या विजयाचा अर्थ ‘संविधान वाचवा’, असा करता येणार नाही. संविधानाची शपथ घेणे व मूलभूत तत्त्वांनुसार काम करणे आणि समानता, बंधुत्व, तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे एकसारखे मुद्दे नाहीत.

संविधान अजूनही धोक्यात आहे का?

भाजपा आणि आरएसएस यांचा हिंदू राष्ट्राचा मुद्दा पुढे नेण्यासाठी आणि आरक्षण व्यवस्थेपासून मुक्त होण्यासाठी संविधानात बदल करण्याचा दीर्घकालीन अजेंडा आहे. हा केवळ आरक्षणाचा मुद्दा नाही, तर हिंदुत्ववादी शक्तींना धोका निर्माण करणारा एक मोठा वैचारिक मुद्दा आहे. लवकरच ते त्याला आव्हान देतील. या अर्थाने मला वाटते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे पालन करण्याच्या लढाईत अधिक प्रासंगिक झाले आहेत.

अर्थव्यवस्थेबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय होते आणि अजूनही ते किती सुसंगत मानले जातात?

बाबासाहेबांनी संसदीय लोकशाहीचा जोरदार पुरस्कार केला. सर्व धोरणात्मक निर्णय संसदेतील वादविवाद आणि चर्चेचा परिणाम असावेत यावर त्यांचा ठाम विश्वास होता. ते म्हणाले होते की, संसद ही आर्थिक धोरणे विकसित करण्यासाठी जबाबदार असलेली मुख्य संस्था असली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसद नियंत्रित अर्थव्यवस्थेची कल्पना केली होती. त्यामध्ये राज्ये प्रमुख भूमिका बजावतात. अर्थव्यवस्थेने सामाजिक न्याय आणि समान संधींना प्रोत्साहन द्यावे, अशी त्यांची इच्छा होती. ते खासगी क्षेत्राच्या विरोधात नव्हते. उलट लोकांनी पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहू नये यासाठी त्यांनी औद्योगिकीकरणाचे समर्थन केले. असे असताना त्यांनी भांडवलशाहीविरुद्ध इशाराही दिला. आज आपल्याकडे एक कार्यक्षम संसद आहे; पण तिथे सर्व आर्थिक निर्णय घेतले जातात का? सध्या सत्तेत असलेले लोक संसदीय व्यवस्थेला बाजूला ठेवत काही मूठभर कॉर्पोरेट कंपन्यांना पसंती देण्यासाठी तात्पुरते निर्णय घेतात.

संसदीय लोकशाहीबाबत काय मत आहे?

हे एका विशिष्ट व्यवस्था किंवा राजकीय पक्षाबद्दल नाही. जर सत्तेत असलेल्यांनी संसद-नियंत्रित आर्थिक धोरणाचे पालन केले असते, तर नवीन औद्योगिक शक्ती केंद्रे निर्माण करण्याचे प्रश्न किंवा पक्षपाताचे आरोप टाळता आले असते. विचारला जाणारा मोठा प्रश्न म्हणजे आर्थिक मॉडेलने जनतेला उन्नत करण्यास मदत केली आहे का? त्यामुळे बेरोजगारीच्या ज्वलंत समस्येवर उपाय शोधण्यास मदत झाली आहे का आणि सामान्य माणसाचे जीवनमान किती प्रमाणात सुधारले आहे? ही अशी मूलभूत तत्त्वे आहेत, ज्यांच्या आधारे संसदीय व्यवस्थेच्या यशाचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित आणि शोषित वर्गाच्या हक्कांसाठीचे एक कट्टर समर्थक होते. आता त्यांच्या परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहता?

सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात तसेच दलित, पीडित आणि गरीब दलितांच्या प्रगतीत बाबासाहेबांची सर्वांत मोठी भूमिका होती. हे कार्य करताना त्यांना असा समाज पाहायचा होता, जिथे जाती किंवा वर्ग यावर आधारित भेदभाव नसेल. शारीरिक भेदभाव स्पष्ट नसला तरी मानसिक अडथळे अद्याप आहेतच. आजही जातीयवाद प्रत्यक्षात आहे आणि लोकांमध्ये खोलवर रुजलेला आहे. पुढच्या पिढीसाठी या भेदभावापासून मुक्त होणे हे एक आव्हान आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आता अधिक प्रासंगिक बनले आहे.



Source link

Dance video on marathi old song phulale re kshan majhe young woman dance in saree viral video on social media

0
Dance video on marathi old song phulale re kshan majhe young woman dance in saree viral video on social media



Dance video on marathi old song phulale re kshan majhe young woman dance in saree viral video on social media | “मराठी मुलींनी तर कमालच केली”, ‘या’ जुन्या गाण्यावर साडी नेसून केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून कराल कौतुक





Source link

Entertainment News Live Updates : सनी देओलचा ‘जाट’ सिनेमा सलमान खानच्या ‘सिकंदर’वर पडला भारी; चौथ्या दिवशी कमावले तब्बल…

0
Entertainment News Live Updates : सनी देओलचा ‘जाट’ सिनेमा सलमान खानच्या ‘सिकंदर’वर पडला भारी; चौथ्या दिवशी कमावले तब्बल…



Entertainment Live News Today, 14 April 2025 : बॉक्स ऑफिसवर सध्या सनी देओलच्या ‘जाट’ सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय दाक्षिणात्य चित्रपट ‘गुड बॅड अग्ली’ सुद्धा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. यामध्ये अभिनेता अजित कुमार प्रमुख भूमिकेत झळकला आहे. सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपट चौथ्या दिवशीच्या कमाईत सलमान खानच्या ‘सिकंदर’वर भारी पडला आहे. या सिनेमांनी आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती कमाई केलीये जाणून घेऊयात…



Source link

Nationalist Congress Party state president Jayant Patil and MP Nilesh Lanke participated in the cleanliness drive at Dharmaveergad गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत राज्य सरकार उदासीन : जयंत पाटील

0
Nationalist Congress Party state president Jayant Patil and MP Nilesh Lanke participated in the cleanliness drive at Dharmaveergad गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत राज्य सरकार उदासीन : जयंत पाटील



Nationalist Congress Party state president Jayant Patil and MP Nilesh Lanke participated in the cleanliness drive at Dharmaveergad गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत राज्य सरकार उदासीन : जयंत पाटील





Source link

भारतीयांना 13 हजार 850 कोटींचा गंडा घालून 7 वर्षांपूर्वी पळून गेलेल्या उद्योजकाला ‘या’ छोट्याश्या देशात अटक

0
भारतीयांना 13 हजार 850 कोटींचा गंडा घालून 7 वर्षांपूर्वी पळून गेलेल्या उद्योजकाला ‘या’ छोट्याश्या देशात अटक


Rs 13850 Crore Scam Fugitive Arrested In Belgium: भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि मुंबईवर झालेल्या 26/11 या भ्याड दहशतवादी हल्ल्यामागचा खरा सूत्रधार तहव्वूर राणाला अमेरिकेमधून भारतात आणल्यानंतर आता भारत सरकारच्या गळाला लवकरच आणखीन एक मोठा मासा लागणार आहे. मागील सात वर्षांपासून देशातून फरार असलेला आणि तब्बल 13 हजार 850 कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणात वॉन्टेंड असलेल्या आरोपीला परदेशात अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारताने प्रत्यार्पणाची विनंती केल्यानंतर या आरोपीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. ज्या आरोपीबद्दल आपण बोलत आहोत त्याचं नाव आहे, मेहुल चोक्सी! त्याला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. 

सीबीआयच्या विनंतीवरुन कारवाई

पंजाब नॅशनल बँकेतील 13850 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली हवा असलेला मेहुल चोक्सी त्याची पत्नी प्रीती चोक्सीसह बेल्जियममधील अँटवर्पमध्ये राहत आहे. मेहुलला अटक करण्यात आल्याचा दावा एका वृत्तात करण्यात आला असून सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भारतीय केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विनंतीवरून 65 वर्षीय मेहुल चोक्सीला शनिवारी अटक करण्यात आली आणि तो सध्या तुरुंगात आहे, असे ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. 

जामीनासाठी प्रयत्न करण्याची शक्यता

पोलिसांनी चोक्सीला अटक करताना मुंबई न्यायालयाने जारी केलेल्या दोन ओपन-एंडेड अटक वॉरंटचा संदर्भ दिला आहे. ही वॉरंट 23 मे 2018 आणि 15 जून 2021 रोजी जारी करण्यात आली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. मात्र आता भारताच्या मागणीनुसार बेल्जियममध्ये अटक झाल्यानंतर चोक्सी प्रकृती अस्वस्थ्य असण्याचं कारण देत किंवा इतर कारणांमुळे जामीन आणि तात्काळ सुटकेची मागणी करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता तो या छोट्याश्या देशाचा आहे नागरिक

पंजाब नॅशनल बँकेतील 13850 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली हवा असलेला चोक्सी आता अँटिग्वा आणि बारर्म्युडा नागरिक आहे. छोटं बेटवजा राष्ट्र असलेल्या अँटिग्वा आणि बारर्म्युडावरुन चोक्सी वैद्यकीय उपचारांसाठी हा देश सोडून बेल्जियममध्ये गेला असल्याची माहिती समोर येत आहे. चोक्सीचा पुतण्या नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात सह-आरोपी आहे. नीरव मोदी सध्या लंडनमधून प्रत्यार्पणाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती समोर येत आहे. 

घोटाळा समोर येण्याच्या काही आठवडे आधीच पळाला

देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या बँकेत म्हणजेच पंजाब नॅशनल बँकमध्ये या काका-पुतण्याने केलेला घोटाळा उघडकीस येण्याच्या काही आठवड्यांपूर्वी म्हणजेच जानेवारी 2018 मध्ये दोघांनी भारतातून पळ काढला होता. त्यानंतर पहिल्यांदाच चोक्सीला अटक करण्यात आली आहे. हे भारतासाठी मोठं यश असल्याचं मानलं जात आहे. 





Source link

‘एआय’मुळे शाळा, विद्यापीठे, शिक्षक कालबाह्य होणार? ‘एआय’चे जनक डॉ. हिंटन यांना असे का वाटते?

0
‘एआय’मुळे शाळा, विद्यापीठे, शिक्षक कालबाह्य होणार? ‘एआय’चे जनक डॉ. हिंटन यांना असे का वाटते?



schools colleges universities teachers become outdated due to artificial intelligence Dr Hinton warns ‘एआय’मुळे शाळा, विद्यापीठे, शिक्षक कालबाह्य होणार? ‘एआय’चे जनक डॉ. हिंटन यांना असे का वाटते?





Source link

ऐन उन्हाळ्यात राज्यभरात पावसाचा इशारा

0
ऐन उन्हाळ्यात राज्यभरात पावसाचा इशारा


मुंबई : राज्यात उन्हाचा ताप कायम आहे. तर, दुसरीकडे पावसाला पोषक वातावरणही निर्माण झाले आहे. अनेक भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर मुंबईतही पावसाळी वातावरण निर्माण होऊन पुढील एक दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भातील काही भागांत अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. राज्यभरातील अनेक भागांत आता पावसाचीही हजेरी लागणार असून त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे तयार होणाऱ्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पावसाचा शिडकावा होत आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असली तरी मुंबईतही त्याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे पुढील एक दोन दिवसांत मुंबईतही हलका पाऊस पडेल. या कालावधीत वातावरणही ढगाळ राहील त्यामुळे काहीसा उकाडा जाणवेल.

उन्हाचा चटका कायम

राज्यात पावसाळी वातावरण असले तरी उन्हाचा चटका कायम आहे. काही कालावधीसाठी पाऊस पडल्यानंतर तापमानात घट होत असली तरी, त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होते. बहुतांशी भागात तापमानाचा पारा अजूनही ४० अंशावरच आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा

पावसाचा अंदाज कुठे?

नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागात सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ भागात सोमवारनंतर पाऊस जोर धरणार आहे.

किनारपट्टीवरही पावसाचा अंदाज

कोकणातील मुंबईसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.





Source link

मुर्शिदाबाद हिंसाचारप्रकरणी दीडशे जणांना अटक, घटनेवरून तृणमूल-भाजप यांच्यात आरोपांच्या फैरी

0
मुर्शिदाबाद हिंसाचारप्रकरणी दीडशे जणांना अटक, घटनेवरून तृणमूल-भाजप यांच्यात आरोपांच्या फैरी



Murshidabad violence 150 arrested west Bengal tmc bjp allegations on each other मुर्शिदाबाद हिंसाचारप्रकरणी दीडशे जणांना अटक, घटनेवरून तृणमूल-भाजप यांच्यात आरोपांच्या फैरी





Source link