Friday, July 24, 2026
Home Blog Page 407

Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Sandeep bhondave on Shivraj Rakshe suspension

0
Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Sandeep bhondave on Shivraj Rakshe suspension



Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Sandeep bhondave on Shivraj Rakshe suspension | ज्याच्यावर अन्याय झाला त्यानेच माफी मागायची? पंचांच्या चुकीचा बळी ठरलेल्या शिवराज राक्षेच्या निलंबनावर कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणाले…





Source link

थंडावा राहण्यासाठी कॉलेजच्या प्राचार्यांनी वर्गाच्या भिंती शेणाने सारवल्या, जशास तसे म्हणत विद्यार्थी संघटनेने…

0
थंडावा राहण्यासाठी कॉलेजच्या प्राचार्यांनी वर्गाच्या भिंती शेणाने सारवल्या, जशास तसे म्हणत विद्यार्थी संघटनेने…


Principal Coats Classroom Walls With Cow Dung: दिल्ली विश्व विद्यालयाच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी वर्गातील भिती शेणाने सारवल्याचे प्रकरण अधिकच चिघळत चाललं आहे. मंगळवारी दिल्ली विश्वविद्यालय विद्यार्थी संघटनेचा (DUSU) अध्यक्ष रौनक खत्री याने महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्ये ऑफिसमधील भिंतीवर शेण थापल्याचे समोर आले आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी लक्ष्मीबाई कॉलेजच्या प्राचार्य प्रत्यूष वत्सला यांनी वर्गातील भितीं शेणाने सावरल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.  त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटलं होतं की हा एक प्रकारचा संशोधनाचा विषय आहे. महाविद्यालयातील शिक्षकांच्या देखरेखीखाली याचे संशोधन सुरू आहे. पारंपारिक पद्धतीने घर किंवा खोल्या थंड ठेवण्याच्याय शक्यताचा विचार केला जात आहे. ज्या लोकांकडून अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांना या प्रकल्पाबद्दल काहीच माहिती नाहीये. म्हणून त्यांना हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

हा संशोधनाचा विषय असून एक महिन्यानंतर या विषयावर सविस्तर माहिती देईन. तसंच, शेण नैसर्गिक असून त्याला हात लावल्यास कोणतेही नुकसान होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. 

दिल्ली विश्वविद्यालय विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष रौनक खत्री यांनी लक्ष्मीबाई कॉलेजच्या प्राचार्याच्या कार्यालयात पोहोचून भिंतीवर शेण थापले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रौनक खत्री यांनी म्हटलं आहे की, कॉलेजच्या  प्राचार्यांनी वर्गात शेण थापले. त्यामुळं आम्ही त्यांच्या कार्यालयातील ऑफिसमध्ये शेण थापले. मॅडमने वर्गातील भिंती शेणाने सारवल्या आहेत तर त्यांच्या ऑफिसच्या भिंतींनाही शेण थापायला पाहिजे. जर क्लासरूम शेणामुळं थंड होऊ शकतात तर त्यांचे ऑफिसदेखील थंड होऊ शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे. 

रौनक खत्री यांनी पुढे म्हटलंय की, आम्हाला आशा आहे की मॅडम त्यांच्या ऑफिसमधील एसी हटवतील. जेव्हा रौनक खत्री प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा तिथे प्राचार्य उपस्थित नव्हते. तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याही वाद झाला. 





Source link

वानखेडे स्टेडियममधील स्टॅंडला रोहित शर्माचे नाव

0
वानखेडे स्टेडियममधील स्टॅंडला रोहित शर्माचे नाव



मुंबई क्रिकेट असोसिएशनने (Mumbai cricket association) वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला रोहित शर्माचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 एप्रिल रोजी मुंबई (mumbai) क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. हे स्टँड माजी भारतीय कर्णधार अजित वाडेकर आणि माजी एमसीए अध्यक्ष शरद पवार यांनाही समर्पित केले जातील.

“वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झालेला आणखी एक महत्त्वाचा ठराव म्हणजे वानखेडे स्टेडियममधील स्टँडला रोहित शर्माचे नाव देण्याचा प्रस्ताव सुरुवातीला मिलिंद नार्वेकर यांनी मांडला आणि जितेंद्र आव्हाड यांनी त्याला पाठपुरावा दिला,” असे एमसीएच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

प्रसिद्धीपत्रकानुसार पॅव्हेलियन लेव्हल 3 ला रोहित शर्माचे नाव देण्यात येईल. ग्रँड स्टँड लेव्हल 3 आता शरद पवार स्टँड म्हणून ओळखले जाईल. तर लेव्हल 4 चे नाव अजित वाडेकर स्टँड असे ठेवले जाईल.

असोसिएशनचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली वाहताना मुंबई क्रिकेट असोसिएशनने असेही जाहीर केले की एमसीए पॅव्हेलियनमधील मॅच-डे ऑफिसला आता एमसीए ऑफिस लाउंज असे नाव देण्यात येणार आहे.

असोसिएशनचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांचे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदावर असताना निधन झाले.

या नामांतराच्या निर्णयामुळे रोहित शर्माच्या (rohit sharma) चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच आता सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर अशा मोठ्या दिग्गज खेळाडूंच्या स्टॅंडनंतर रोहित शर्मा स्टॅंडचा यादीत समावेश होणार आहे.


हेही वाचा



Source link

परळीत किरीट सोमय्यांना काळे झेंडे

0
परळीत किरीट सोमय्यांना काळे झेंडे


बांगलादेशी किंवा रोहिंग्यांना येथील जन्माचे प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसह विविध ठिकाणी पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी दौरे काढत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार किरीट सोमय्या हे मंगळवारी परळीत दाखल झाले होते.

सोमय्या परळीत येत असल्याची माहिती मिळताच स्थानिक काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी शिवाजी चौक आणि एक मिनार चौकात सोमय्या यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. दरम्यान, सोमय्या यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानुसार काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच ते सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते, असे परळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी सांगितले.

किरीट सोमय्या यांनी मंगळवारी परळी तहसील व शहर पोलीस ठाण्यात जाऊन बैठका घेतल्या. यावेळी स्थानिक भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. माध्यमांसमोर बोलताना सोमय्या म्हणाले, महाराष्ट्राबाहेरच्या, बांगलादेशी किंवा रोहिंग्यांना परळी तहसीलमधून एक हजार २१४ जन्म प्रमाणपत्र रहिवासाशी संबंधित कोणतेही कागदपत्रे न पाहता दिलेली आहेत.

स्थानिक मुस्लिमांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचा हा प्रकार आहे. हा प्रकार अत्यंत घातक आहे. यासंदर्भातील सुनावणीवेळी स्थानिक नगरपालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. ज्या माणसाचा पत्ताच नाही, अशा व्यक्तीलाही प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. अशा चुकीच्या पद्धतीने रोहिंगे, बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्रांचे वाटप केल्याप्रकरणी बीडमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. परळीतही गुन्हा दाखल होणार असून, तहसीलदारांनी तक्रार दाखल करणार असल्याचे आपल्याला सांगितल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. या संदर्भाने परळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी सायंकाळपर्यंत तरी तहसीलदारांकडून कुठली तक्रार दाखल झालेली नव्हती. मात्र, त्यांच्या स्तरावरील प्रक्रियेचा भाग असू शकतो, असे स्पष्ट केले.

मी पुन्हा येणार

आपण पुन्हा एकदा पुढील आठवड्यात बीड जिल्ह्यात येणार आहोत, असे किरीट सोमय्या यांनी परळीत बोलताना स्पष्ट केले. परळीमध्ये सोमय्या यांनी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानालाही भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागतही करण्यात आले. मात्र, पंकजा मुंडे या परळीत नव्हत्या, अशी माहिती आहे.





Source link

धावत्या रेल्वे गाडीत तरुणीला जीवनदान

0
धावत्या रेल्वे गाडीत तरुणीला जीवनदान



पुणे : धावत्या रेल्वे गाडीत दोन परिचारिकांनी प्रसंगावधान राखून बेशुद्ध पडलेल्या तरुणीवर केलेल्या प्रथमोपचारामुळे २८ वर्षीय युवतीला जीवनदान मिळाले. ही घटना १४ एप्रिल रोजी दौंड पुणे डेमू या रेल्वेत घडली. प्राजक्ता असुर्लेकर आणि ज्योती सुल या परिचारिकांंनी प्रसंगावधान राखून तरुणीचे प्राण वाचविले. दोघी जहांगिर रुग्णालयातील परिचारिका आहेत. दौंड-पुणे डेमू ही दौंड रेल्वे स्थानकावरून पुण्याच्या दिशेने येत होती. ही गाडी सकाळी आठ वाजता यवत आणि उरळी स्थानकादरम्यान आली असता तरुणीला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. ही बाब प्राजक्ता आणि ज्योती यांना समजताच प्राजक्ता यांनी वेळ न दवडता तिला कार्डिओ पल्मनरी रेससिटेशन (सीपीआर) देत प्रथमोपचार करण्यास सुरुवात केली. साडेआठच्या सुमारास रेल्वे गाडी उरुळी स्थानकावर पोहचताच दोघींनी अन्य प्रवाशांच्या मदतीने त्या तरुणीला स्थानकावर उतरवले. त्या वेळी त्यांनी तत्काळ रुग्णवाहिकेला संपर्क साधण्याचे आवाहन केले. रुग्णवाहिका येईपर्यंत दोघींनी तरुणीला सतत ‘सीपीआर’ देण्याची प्रक्रिया सुरू ठेवली होती.

रुग्णवाहिका आल्यानंतर प्राजक्ता आणि ज्योती यांनी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली आणि तरुणीला तत्काळ उरळी येथील एका खासगी रुग्णालयात रवाना केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तरुणीवर उपचार करण्यात आले. त्यानंतर प्राजक्ता यांनी तरुणीच्या मोबाइलमधून कुटुंबातील व्यक्तींना संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

या प्रसंगात प्राजक्ता आणि ज्योती सुल यांनी दाखवलेले धाडस, माणुसकी व तत्परता कौतुकास्पद ठरली. त्यांच्या कृतीमुळे केवळ तरुणीला जीवनदान मिळण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत कसे प्रसंगावधान राखावे, याचा संदेश दिला.



Source link

“ऐ आवाज खाली कर…”, महिलांनी एकमेकांचे ओढले केस, पुरुषाने महिलेवर केला हल्ला; पुण्यातील सोसायटीत राडा, हाणामारीचा Video Viral

0
“ऐ आवाज खाली कर…”, महिलांनी एकमेकांचे ओढले केस, पुरुषाने महिलेवर केला हल्ला; पुण्यातील सोसायटीत राडा, हाणामारीचा Video Viral



women pulled each others hair man attacked woman Clash between women in a Pune Dhayari Society goes viral |”ऐ आवाज खाली कर…”, महिलांनी एकमेकांचे ओढले केस, पुरुषाने महिलेवर केला हल्ला; पुण्यातील सोसायटीत राडा, हाणामारीचा Video Viral





Source link

Police launch Shakti Box initiative to prevent crime in Baramati pune print news |

0
Police launch Shakti Box initiative to prevent crime in Baramati pune print news |



Police launch Shakti Box initiative to prevent crime in Baramati pune print news | | बारामतीत ‘शक्ती बॉक्स’चा गुन्हेगारांंवर वचक; भयमुक्त वातावरणासाठी पोलिसांंचा पुढाकार; महिलांंच्या छळाचे गुन्हे रोखण्यात यश





Source link

Senior civil judge S V Phulbandhe orders annulment of marriage of couple pune print news

0
Senior civil judge S V Phulbandhe orders annulment of marriage of couple pune print news



Senior civil judge S V Phulbandhe orders annulment of marriage of couple pune print news | पती पसंत नसल्याने संसार करण्यास नकार! न्यायालयाकडून विवाह रद्द; विवाहानंतर आठच महिन्यांत मुलगी माहेरी, नंतर परतलीच नाही





Source link

आंबेडकर हाऊस, लंडन येथे भिमस्फूर्ती पुरस्कार सोहळा थाटात संपन्न

0
आंबेडकर हाऊस, लंडन येथे भिमस्फूर्ती पुरस्कार सोहळा थाटात संपन्न

लंडन, दि. १५ एप्रिल २०२५: 🔹भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध इंटरनॅशनलतर्फे आयोजित जागतिक आंबेडकर जयंती कार्यक्रमांतर्गत लंडनमधील ऐतिहासिक आंबेडकर हाऊस येथे भिमस्फूर्ती पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवतावादी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना भिमस्फूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या विचारांना प्रेरणा देणारा ठरला.

☝️भिमस्फूर्ती पुरस्कार विजेते
या सोहळ्यात खालील व्यक्तींना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी भिमस्फूर्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला:
💐. सत्यप्रेम मकसरे: सामाजिक जागृती आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी.
💐. विजयकुमार गोल्हाइत: समाजातील वंचित घटकांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्यासाठी.
💐. जयश्री सोमकुवर: महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समतेसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी.
💐. विमल बगाटे: ग्रामीण विकास आणि सामाजिक कार्यातील समर्पणासाठी.
💐. सुप्रिया मकसरे: युवा प्रेरणा आणि सामाजिक बदलासाठी केलेल्या कार्यासाठी.
💐. डॉ. सुनीता गोल्हाइत: शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी.

🔹या सोहळ्याला लंडनमधील ज्येष्ठ समाजसेविका शारदा तांबे, आशा विरदी, वंदना अपरांती, डॉ. श्रीकांत बोरकर, बलजीत रणजित बौद्ध, अमोल भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते, विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि आंबेडकर विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मान्यवरांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याला पाठबळ देण्याचे आवाहन केले. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आधुनिक काळातील महत्त्व आणि त्यांचे सामाजिक परिवर्तनातील योगदान यावर विचार मांडले.

🔹कार्यक्रमाचे संयोजन मिलिंद दत्ता अहिवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि यशस्वीपणे केले. आंबेडकर हाऊसच्या ऐतिहासिक वातावरणात आयोजित या कार्यक्रमाने उपस्थितांवर विशेष प्रभाव टाकला. कार्यक्रमात पुरस्कार वितरणासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, आंबेडकर विचारांवर आधारित चर्चा आणि सामाजिक जागृतीचे सत्र आयोजित करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांनी कार्यक्रमाला अधिक अर्थपूर्ण बनवले.

🔹हा भिमस्फूर्ती पुरस्कार सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि तत्त्वांना पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. पुरस्कार विजेत्यांनी आपल्या मनोगतात समाजातील असमानता दूर करण्यासाठी आणि शिक्षण, समता आणि बंधुत्वाच्या मूल्यांना बळकटी देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाने उपस्थितांना सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणा दिली आणि आंबेडकरांच्या स्वप्नातील समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीला गती देण्याचा संदेश दिला. ।

सहारा समूहावर ईडीची मोठी कारवाई; लोणावळ्यातील अ‍ॅम्बी व्हॅलीची 707 एकर जागा जप्त, काय आहे प्रकरण?

0
सहारा समूहावर ईडीची मोठी कारवाई; लोणावळ्यातील अ‍ॅम्बी व्हॅलीची 707 एकर जागा जप्त, काय आहे प्रकरण?


Sahara Group Aamby Valley News : सहारा इंडिया आणि त्यांच्या समूहाच्या संस्थांविरुद्ध कोलकाता येथील ईडीनं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत सहारा समूहाची लोणावळ्याली अॅम्बी व्हॅलीची 707 एकर जागा जप्त करण्यात आली. सदर जमिनीची अंदाजे बाजारभाव किंमत सुमारे 1460 कोटी रुपये आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

कारवाईनुसार ही जमीन बेनामी नावांनी खरेदी केल्याचं तपासात उघड झालं असून, सहारा ग्रुपच्या विविध कंपन्यांकडून घेतलेल्या पैशांनी ही हजारो कोटींची जमीन खरेदी करण्यात आली होती. याची खरी मालकी लपवण्यासाठी बनावट नावांनी नोंदणी करण्यात आली होती, अशी माहिती ईडीच्या एका अधिकाऱ्याने दिली.

2.98 कोटींची बेहिशोबी रोकडसुद्धा जप्त 

सहासा समुहावर कारवाई करताना ईडीनं PMLA च्या कलम 17 अन्वये शोधमोहिम राबवत यादरम्यान 2.98 कोटी रुपयांची बेहिशोबी रोकडसुद्धा जप्त केली. ओडिशा, बिहार आणि राजस्थानमध्ये हुमारा इंडिया क्रेडिट को ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड आणि इतर कंपन्यांच्या फसवणुकीविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनंतर हे प्रकरण उघडकीस आलं. आतापर्यंत सहारा कंपनीशी संलग्न इतर कंपन्या आणि व्यक्तिंविरोधात देशभरात 500 हून जास्त एफआयआर दाखल करण्यात आले असून, यामध्ये 300 हून अधिक प्रकरणं PMLA मध्ये नमूद गंभीर अपराधांअंतर्गत येतात. 

चांगल्या परताव्याचं आमिष दाखवत फसवणूक….

देशभरातून ईडीकडे हजारो तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत जिथं गुंतवणुकीच्या नावे चांगल्या परताव्याचं आमिष दाखवत अनेकांचीच फसवणूक करण्यात आल्याची बाब इथं उघड झाली. काहींच्या तक्रारीनुसार त्यांच्या परवानगीशिवाय रक्कम गुंतवण्यास भाग पाडण्याकत आलं आणि वारंवार परताव्याची चौकशी करूनही त्यांना मॅच्युरिटे पेमेंट मात्र देण्यात आलं नाही. 

दरम्यान ईडीच्या तपासातून समोर आलेल्य़ा माहितीनुसार सहारा अनेक को-ऑपरेटिव सोसाइटीज म्हणजेच सहकारी समित्या आणि रिअल इस्टेट फर्मच्या माध्मयातून पोंजी-स्टाइल स्कीम घेऊन गुंतवणुकदारांपर्यंत पोहोचलं होतं. या समुहानं घसघशीत परताव्याचं आमिष दाखवत गुंतवणूकदार आणि एजंटचाही विश्वासघात केला आणि नॉन ट्रांसपेरेंट,अनरेगुलेटेड पद्धतीनं या रकमेचा दुरूपयोग केला. या समुहाच्या आर्थिक नोंदींमध्येसुद्धा मोठी अफरातफर आढळली असून, तिथं गुंतवणुकदारांचे पैसे परत दिले जात असल्याचं भासवण्यात आलं. मात्र इथं पैसे अडकवूनच ठेवत कंपनीनं देणंही वाढवलं. 





Source link