Saturday, July 25, 2026
Home Blog Page 408

‘आयपीएल’मध्ये मैदानातच पंचांकडून फलंदाजांच्या बॅटची तपासणी… नक्की कारण काय?

0
‘आयपीएल’मध्ये मैदानातच पंचांकडून फलंदाजांच्या बॅटची तपासणी… नक्की कारण काय?



In IPL umpires inspect batsmen s bats on the field what is the reason विश्लेषण : ‘आयपीएल’मध्ये मैदानातच पंचांकडून फलंदाजांच्या बॅटची तपासणी… नक्की कारण काय?





Source link

Today’s Gold Rate in Maharashtra, 22 & 24 Carat Price

0
Today’s Gold Rate in Maharashtra, 22 & 24 Carat Price


Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज बुधवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 16 April 2024)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १६ एप्रिल २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९३,६५० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८५,८४६ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९५,१९० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९५० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८५,६९० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ९३,४८० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणेप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८५,६९० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ९३,४८० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८५,६९० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ९३,४८० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८५,६९० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ९३,४८० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.





Source link

शेतकऱ्यांच्या भरपाई रकमेवरील व्याजदरात कपात, विलंबातील १५ टक्क्यांपर्यंतची तरतूद रद्द

0
शेतकऱ्यांच्या भरपाई रकमेवरील व्याजदरात कपात, विलंबातील १५ टक्क्यांपर्यंतची तरतूद रद्द



in Maharashtra Interest rate on farmers compensation reduced शेतकऱ्यांच्या भरपाई रकमेवरील व्याजदरात कपात, विलंबातील १५ टक्क्यांपर्यंतची तरतूद रद्द





Source link

तप्त झळांच्या उन्हाळ्यानंतर यंदा पुरेपूर पावसाळा!

0
तप्त झळांच्या उन्हाळ्यानंतर यंदा पुरेपूर पावसाळा!



मुंबई : यंदा मोसमी पाऊस दमदार पडेल, अशी आनंदवार्ता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. जून ते सप्टेंबर या चारही महिन्यांत मोसमी पावसासाठी प्रादेशिक आणि जागतिक हवामानविषयक स्थिती अनुकूल राहील. देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे, १०५ टक्के पाऊस पडेल असा दीर्घकालीन अंदाज वर्तविण्यात आला.

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी र्नैऋत्य मोसमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. प्रशांत महासागरात ‘ला निना’ स्थिती संपून तटस्थ स्थिती निर्माण झाली आहे. एल निनो स्थिती सप्टेंबरपर्यंत म्हणजे पावसाळा संपेपर्यंत निर्माण होण्याची स्थिती नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात तटस्थ स्थिती राहून भारत आणि भारतीय उपखंडातील मोसमी पावसासाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यासाठी दिलासा

लडाख, ईशान्य भारत आणि तमिळनाडूवगळता देशाच्या अन्य भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्याचा विचार करता, दक्षिण कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. गतवर्षी १०६ टक्के अंदाज जाहीर केला होता, प्रत्यक्षात १०८ टक्के पाऊस झाला.

डिसेंबर-मार्च या काळात युरोशिया आणि हिमालयात बर्फाच्छादित भाग सरासरीपेक्षा कमी राहिला आहे. बर्फवृष्टी जास्त झाल्यास कमी पाऊस पडतो. कमी बर्फवृष्टीमुळे यंदा सरासरीपेक्षा जास्त १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

प्रमुख तीन अनुकूल घटक

●प्रशांत महासागरातील निष्क्रिय स्थिती

●हिंदी महासागर द्विध्रुवितेची निष्क्रिय स्थिती

●आशिया आणि युरोपात सरासरीपेक्षा कमी बर्फवृष्टी



Source link

अग्रलेख : ‘हार्ड वर्क’चा आनंद!

0
अग्रलेख : ‘हार्ड वर्क’चा आनंद!



सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानापैकी २२० कोटी डॉलर्स न देण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेऊनही, हे विद्यापीठ बधले नाही…

अमेरिकेचे दुसरे अध्यक्ष जॉन अॅडम्स, नंतरचे थिओडोर रुझवेल्ट, फ्रँकलिन डी रुझवेल्ट, जे. एफ. केनेडी, बराक ओबामा असे एक नाही दोन नाही तर तब्बल आठ अध्यक्ष, तत्त्वज्ञ हेन्री थोरो, वैज्ञानिक रुदरफोर्ड, ओपेनहायमर, ‘रोड लेस ट्रॅव्हल्ड’ लिहिणारे कवी रॉबर्ट फ्रॉस्ट, दृष्टिहीनांसाठी बरेच काही करणाऱ्या हेलेन केलर, कवी टी. एस. एलियट, हेन्री किसिंजर, बेनझीर भुत्तो, अल गोर, बिल गेट्स, ‘फेसबुक’चा जन्मदाता मार्क झकरबर्ग, रतन टाटा, राहुल बजाज, पी. चिदम्बरम, आनंद महिंद्रा, चित्रपट निर्मात्या मीरा नायर इत्यादी किती नावे सांगावीत! या सर्वांस जोडणारा एक समान धागा आहे. तो म्हणजे हार्वर्ड विद्यापीठ. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य-स्वप्न प्रत्यक्षात आणणारी मोहीम सुरू होण्याआधी, म्हणजे १६३६ साली अमेरिकेत हे विद्यापीठ प्रत्यक्षात आले. इंग्लंडातून जीव वाचवण्यासाठी अमेरिकेत आलेल्या शिक्षक जॉन हार्वर्ड यास अमेरिकेत अकाली मृत्यूने गाठले. त्या वेळी मृत्युशय्येवरून अखेरची इच्छा त्याने व्यक्त केली ती अशी एखादी शैक्षणिक संस्था काढण्याची. ती प्रत्यक्षात आली तेव्हा अमेरिकेचा जन्म १४० वर्षे दूर होता. याचा अर्थ हे विद्यापीठ वयाने अमेरिकेसही थोरले. आणखी ११ वर्षांनी ते चतुर्थ शताब्दी साजरी करेल. या काळात तब्बल १४९ नोबेल पारितोषिक विजेते, मानवी संस्कृती पुढे नेणारे जगभरातील अनेक प्रज्ञावंत, वैज्ञानिक, साहित्यिक या विद्यापीठाच्या मांडवाखालून गेले. अशी शिक्षण संकुले म्हणजे अमेरिकेने स्वकर्तृत्वाने, स्वकष्टाने स्वत:च्या हातावर स्वहस्ते कोरलेल्या भाग्यरेषाच जणू. शिक्षणावर, संस्कृतीवर आणि मुख्य म्हणजे सुसंस्कृततेवर प्रेम करणाऱ्या जगातील प्रत्येकास आज यातील मेरुमणी हार्वर्डविषयी अभिमानाची भावना दाटून आली असेल. याचे कारण शिक्षणशत्रू धनदांडग्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर नमते घ्यायला या विद्यापीठाने दिलेला ठाम नकार.

हुकूमशाही प्रवृत्तीचा नेता कोणत्याही देशात, कोणत्याही धर्मात आणि कोणत्याही संस्कृतीत असो. त्याचा पहिला राग असतो तो स्वतंत्र शिक्षण संस्थांवर. कारण अशा स्वतंत्र शिक्षण संस्थांतूनच उद्याचे प्रतिभावंत आकारास येत असतात आणि त्यांच्याकडून हुकूमशाही प्रवृत्तीच्या नेत्यांस धोका असतो. म्हणून अशा नेत्यांस हव्या असतात होयबांची पैदास करणाऱ्या साच्यातील मूर्तिशाला. यास; अमेरिकेसारख्या कमालीच्या स्वतंत्र हवेत जन्माला येऊनही ट्रम्प अपवाद नाहीत. आपली प्रदूषित मानसिकता आणि त्याहूनही प्रदूषित विचारसरणी त्यांनी हार्वर्ड विद्यापीठावर लादण्याचा प्रयत्न केला. या विद्यापीठातील विद्यार्थी चळवळी दंतकथा वाटाव्यात इतक्या खऱ्या. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष असो वा पारलैंगिकता वा अभिव्यक्तिस्वातंत्र्य वा अन्य काही. या विद्यापीठातील विद्यार्थी प्राणपणाने संघर्ष करतात. ट्रम्प यांस हे मान्य नाही. विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांस वेसण घालावी असा फतवा त्यांनी काढला. ज्यू धर्मविरोधी (अँटीसेमाईट) भावना या विद्यापीठात वाढीस लागल्याचे दिसते, सबब विद्यापीठाने या विद्यार्थ्यांचे कडक नियमन करावे, त्यांच्या अभ्यासेतर चळवळींवर नियंत्रण आणावे आणि अशा चळवळ्या विद्यार्थ्यांची माहिती सरकारहाती द्यावी, असा ट्रम्प यांचा आदेश. अमेरिकेत भिन्नतेला महत्त्व खूप. भिन्नवर्णीय, भिन्नधर्मीय, भिन्नलिंगी अशांस सर्वांस समान संधी कशा मिळतील असा प्रशासनाचा प्रयत्न. तो ट्रम्प यांस अमान्य. अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून ही भिन्नता कशी समूळ नष्ट करता येईल असा त्यांचा प्रयत्न आहे. विद्यापीठाने ही भिन्नता सोडावी असे त्यांनी बजावले आणि सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा तपशील सरकारदरबारी सुपूर्द करावा असाही आदेश काढला. गेल्या शुक्रवारी विद्यापीठास प्रशासनाकडून हे पाच पानी आज्ञापत्र सादर केले गेले.

सोमवारी विद्यापीठाचे अध्यक्ष अॅलन एम गार्बर यांनी त्यास प्रत्युत्तर दिले आणि ट्रम्प यांच्या आदेशवाणीस विद्यापीठ केराची टोपली दाखवत असल्याचे जाहीर केले. ‘‘विद्यापीठाने काय शिकवावे, कसे वागावे, कोणते अभ्यासक्रम आखावेत आणि कोणते आखू नयेत, विद्यार्थ्यांना कसे वागवावे वगैरे सांगण्याचा प्रशासनास काडीचाही अधिकार नाही. आपल्या प्रशासनाने काढलेले आदेश हे मर्यादाभंग आहेत. अमेरिकी घटना नागरिकांस, संस्थांस जे स्वातंत्र्य देते त्यावर आपल्या आदेशाने गदा येते. आम्ही ते पाळणार नाही’’, इतक्या स्पष्टपणे हार्वर्ड विद्यापीठाने आपल्या अध्यक्षास शब्दश: खुंटीवर टांगले. याचे पडसाद केवळ शैक्षणिक वर्तुळातच नव्हे तर अमेरिकेच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही उमटले असून माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह अनेकांनी हार्वर्डचे अभिनंदन केले. ‘‘हा ट्रम्प यांच्या राजवटीस कलाटणी देणारा क्षण’’, अशी भविष्यवाणी अमेरिकेत यानंतर केली जात असून गार्बर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो. अध्यक्ष ट्रम्प यांना हे सहन होणे अर्थातच अशक्य. त्यांनी स्वत: यावर काही भाष्य केले नसले तरी त्यांच्या वतीने प्रशासनाने हार्वर्डविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासन तेथेच थांबले नाही. त्यानंतर लगेच विद्यापीठाचे तब्बल २२० कोटी डॉलर्सचे अनुदान थांबवण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने जाहीर केला. या विद्यापीठास अमेरिकी सरकारकडून ९०० कोटी डॉलर्स येतात. त्यापैकी ७०० कोटी डॉलर्स विद्यापीठाच्या बोस्टन, केंब्रिज, मॅसेच्युसेट्स इत्यादी ठिकाणची रुग्णालये आणि वैद्याकीय संस्थांतील संशोधनावर खर्च होतात. अल्झायमर्स, मधुमेह, कर्करोग इत्यादी गहन विकारांवर या केंद्रातून महत्त्वाचे संशोधन सुरू आहे. असे असतानाही केंद्रीय सरकारकडून विद्यापीठास दिल्या जाणाऱ्या रकमेतील जवळपास एकपंचमाश रक्कम गोठवण्याचा निर्णय ट्रम्प घेतात. यावरून त्यांची असंवेनशीलता आणि अक्षरशत्रुत्व तेवढे दिसून येते.

तरीही विद्यापीठाने अध्यक्षांच्या मनमानीपुढे मान तुकवण्यास नकार दिला, ही बाब कमालीची महत्त्वाची. विशेषत: कोलंबिया विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनासमोर अलीकडेच नांगी टाकली हे वास्तव असताना हार्वर्डचे हे शौर्य सर्वार्थाने कौतुकास्पद ठरते. कोलंबियाचे ४० कोटी डॉलर्सचे अनुदान रोखण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आणि ते विद्यापीठ सरकारशी चर्चा करण्यास तयार झाले. हार्वर्ड विद्यापीठास मात्र अशी चर्चेची कोणतीही गरज वाटली नाही. त्यांनी सरळ ट्रम्प यांचा आदेश धुडकावूनच लावला. या विद्यापीठाची महती अशी की गेल्या एका वर्षातच, २०२४ साली, त्यास परदेशातून जवळपास ५३०० कोटी डॉलर्स देणगी रूपात मिळाले. आपल्या रतन टाटा यांनीही साधारण १५ वर्षांपूर्वी नव्या इमारत बांधणीसाठी या विद्यापीठास तब्बल पाच कोटी डॉलर्सची देणगी दिली आणि सध्या विद्यामान सत्ताधीशांचे आनंददूत मानले जाणारे आनंद महिंद्रा यांनाही याच विद्यापीठास कोटभर डॉलर्स देणगीदाखल द्यावेसे वाटले. यावरून या विद्यापीठाची महत्ता ध्यानी यावी. जगभरातील शंभरहून अधिक देशांत या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी, हितचिंतक विखुरलेले असून ट्रम्प यांच्यामुळे विद्यापीठास आर्थिक चणचण जाणवू लागल्यास हे सर्व मदतीस पुढे येतील. याचे कारण उत्तम शिक्षण आणि त्यासाठी आवश्यक निर्भय वातावरण यांची महती ट्रम्प यांस नसली तरी या सर्वांस ती आहे. म्हणून जगातील सर्व लोकशाहीवादी हार्वर्डचे अभिनंदन करतील.

या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’ने मंगळवारच्या अंकात पहिल्या पानावर प्रसिद्ध केलेली आपल्या शैक्षणिक संस्थांच्या हेळसांडीची बातमी अधिक वेदनादायी ठरते. महासत्ता, जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था इत्यादी इत्यादी होऊ पाहणाऱ्या आपल्या मायभूमीतील काही आयआयटी, आयआयएम अशा महत्त्वाच्या १७ केंद्रीय शिक्षण संस्थांस प्रदीर्घ काळ पूर्णवेळ प्रमुखच नाही. सर्व काही हंगामी. यात ‘बनारस हिंदू विश्वविद्यालय’ही आले. ही आपली शिक्षणाशी असलेली बांधिलकी. अशा वेळी सत्ताधीशांच्या दांडगाईसमोर ठाम उभे राहण्याचे ‘हार्ड वर्क’ अमेरिकेत का असेना कोणी करते ही समाधानाची बाब. तेवढाच आनंद!



Source link

विद्रोहाचे तंत्र, समतेचे यंत्र हाच भीमाचा मंत्र

0
विद्रोहाचे तंत्र, समतेचे यंत्र हाच भीमाचा मंत्र



dr Babasaheb Ambedkar on growth of science leads to social changes urbanization demolish caste system तंत्रकारण : विद्रोहाचे तंत्र, समतेचे यंत्र हाच भीमाचा मंत्र





Source link

गांजा वाहतूक करणाऱ्या मोटारीने पोलीस उपनिरीक्षकास फरपटत नेले, फलटणमध्ये कारवाई करताना धक्कादायक प्रकार

0
गांजा वाहतूक करणाऱ्या मोटारीने पोलीस उपनिरीक्षकास फरपटत नेले, फलटणमध्ये कारवाई करताना धक्कादायक प्रकार



Police sub inspector dragged while trying to stop ganja vehicle in sakharwadi Phaltan taluka || गांजा वाहतूक करणाऱ्या मोटारीने पोलीस उपनिरीक्षकास फरपटत नेले, फलटणमध्ये कारवाई करताना धक्कादायक प्रकार





Source link

एकरकमी ‘एफआरपी’बाबत पुन्हा साशंकता, यावर्षीसाठी मान्यता, निर्णयाविरोधात मात्र सर्वोच्च न्यायालयात धाव

0
एकरकमी ‘एफआरपी’बाबत पुन्हा साशंकता, यावर्षीसाठी मान्यता, निर्णयाविरोधात मात्र सर्वोच्च न्यायालयात धाव



doubts again regarding lump sum frp approval for this year but appeal to Supreme Court against decision || एकरकमी ‘एफआरपी’बाबत पुन्हा साशंकता, यावर्षीसाठी मान्यता, निर्णयाविरोधात मात्र सर्वोच्च न्यायालयात धाव





Source link

माजी आमदार संजय घाटगे यांचा भाजपात प्रवेश; ठाकरे गटाला धक्का

0
माजी आमदार संजय घाटगे यांचा भाजपात प्रवेश; ठाकरे गटाला धक्का


कोल्हापूर : उध्दव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत मंगळवारी भाजपात प्रवेश केला. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला. यामुळे कागल तालुक्यातील राजकारणाचे संदर्भ बदलण्याची चिन्हे आहेत.शिवसेनेकडून यापूर्वी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले संजय घाटगे, त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी सभापती अंबरीश घाटगे यांनी पक्षात प्रवेश केल्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेस साथ देण्यासाठी उबाठा, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादीतून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. नव्याने प्रवेश केलेल्यांमुळे भाजपा सदस्य संख्या आणखी ५० लाखांनी वाढेल असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.

भाजपाची ताकद वाढली

कागल व शहापूरच्या माजी आमदारांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाला कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यात बळकटी मिळणार आहे. मोठा राजकीय वारसा लाभलेले प्रसाद बळीराम हिरे आणि हजारोंच्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमुळे नाशिक जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत होणार आहे. आरोग्य तसेच शिक्षण मंत्र्याची धुरा समर्थपणे सांभाळलेले तसेच दीर्घकाळ विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या स्व. बळीराम हिरे ह्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. त्यांचे पुत्र आणि इतर कुटुंबीयांच्या भाजपा प्रवेशामुळे आनंद झाल्याचे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा

अन्य पदाधिकाऱ्यांचेही प्रवेश

कागलचे माजी आमदार संजय घाटगे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि मालेगाव येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रसाद बळीराम हिरे, श्रीरामपूरचे माजी नगराध्यक्ष संजय फंड यांचा भाजपा प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश झाला. ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शिवाजीभाऊ देशमुख, श्रीरामपूरचे काँग्रेस नेते व माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास विहाणी यांच्यासह १२ माजी नगरसेवक, आगरी क्रांती संघटनेचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक इंद्रजित पडवळ, जिल्हा परिषद माजी सभापती निखिल बरोरा, फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, तुषार गांधी, प्रसाद हिरे यांच्या पत्नी गीतांजली हिरे, नाशिक जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष बाजीराव निकम, रामराव शेवाळे, राजेंद्र लोंढे, अशफाक शेख, सुधाकर बाचकर यांचा भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांत समावेश आहे.





Source link

Speeding motor vehicle crashes into divider on eastern freeways Mumbai print news |

0
Speeding motor vehicle crashes into divider on eastern freeways Mumbai print news |



Speeding motor vehicle crashes into divider on eastern freeways Mumbai print news | | पूर्व मुक्त मार्गांवर भरधाव मोटरगाडीची दुभाजकाला धडक; २ ठार, ४ जखमी





Source link